✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

बाई'को' विकल्यावर

व
वाह्यात कार्ट यांनी
गुरुवार, 12/05/2013 - 14:34  ·  लेख
लेख
हर्षोल्लासीत नावर्यांनो, आधीच सांगतोय शीर्षक वाचून भलते समज करून घेऊ नका. लेख चक्क चक्क बाईक वर आहे. “बाईक 'को' विकल्यावर”. थोडासा आपला हिंदीमिश्रित कोट्या करायचा क्षीण प्रयत्न. आता काय सांगू कसं सांगू असं झालंय. सुरुवात, “धूम” युगा पासूनच करतो. जो तो आपलं टॅनंनॅ नन नॅनननॅ करत गाड्या उडवू लागला. आमच्या इमारतीतलं एक कार्टं तर शेजारच्या इमारतीत गोट्या खेळायला पण स्कुटी वर जाऊ लागलं. फादरकडे बाईक मागताच त्यांनी मला मुस्काडून “दत्त दाखवायची” महत्वाकांक्षा जाहीर केली. शेवटी अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षाला असताना मातोश्रींना अगदीच दया आली आणि मला “कमीतकमी फक्त पास तरी हो रे बाबा” या अटीवर नवी कोरी बाईक बहाल केली गेली. पण खरं तर बाईक देण्यामागच मुख्य कारण असं होतं की माझं महाविद्यालय तसं वेशीबाहेरच होतं. आणि अस्मादिक पुणेकर असल्यामुळे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरायचा भ्याडपणा करण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. असो, बाईक घेतल्यावर पहिली अपेक्षा अशी होती की कॉलेजातल्या एखाद्या मृगनयना रसिकमोहिनीने लाडीकपणे रुमालाशी चाळ करत, हळूच नजर चुकवत लिफ्ट मागावी. पण असे आश्चर्य काही घडले नाही. त्या नजरा चुकवीत, भलत्याच्याच बाईकवर चौफेर उधळू लागल्या आणि आमच्यावर मात्र डोक्यावर रुमाल बांधलेल्या रानरेड्यांना लिफ्ट द्यायची वेळ आली. यथावकाश बाईकची मागील सीट बळकावली गेलीच. अगदीच मृगनयना नाही, पण रसिकमोहिनी मात्र सापडली. आणि मग ‘कोई ना कोई चाहिये प्यार करनेवाला’ म्हणणारा मी, ‘चांदी की सायकल सोनेकी सीट, आओ चले डार्लिंग चले डबल सीट’ असली गोविंदापंथी गाणी म्हणू लागलो. सहसीटधारिणी सोबत लोणावळा-खंडाळाच्या वाऱ्या घडू लागल्या. असो, परत लायनीवर येतो. बाईक घेतल्याच्या दुसऱ्या दिवशीच ती आपटायचा पराक्रमही पार पाडला. कारण पुण्यात बाईक अथवा कार घेतल्यावर ती ३ दिवसांत आपटली नाही तर तो पु.लं.च्या उक्तीनुसार फाउल धरतात. तर झालं असं की रात्री अलका टॉकिझला, ‘सुपरमॅन रीटर्न्स’ नामक सुमारपट पाहिल्यामुळे अर्ध झोपेत टिळक रस्त्यावर बाईक चालवत असताना जरा गुंगी आली आणि मी एका गाढवावर जाऊन आपटलो. आता टिळक रस्त्यावर रात्री १२:३० वाजता गाढव कुठून आले हे विचारू नका. पुण्यात हल्ली अजगर, बिबट्या, गव्यापासनं मगरीपर्यंत काही सापडू शकतं. महानगरपालिकेत तर लांडग्यांचा सुळसुळाट झालाय म्हणतात. हल्ली काय माणसं जंगलात आणि प्राणी शहरात असंच चाललाय. जाऊद्या तर सांगत काय होतो, गाढव बहुदा हुशार असावं, कारण त्याने त्याचे भाई-बंद (पक्षी:मी आणि मागे बसलेला मित्र) ओळखले, म्हणून आम्हाला ‘प्रसाद’ दिला नाही. बाईकला पण काही नव्हते झाले, फक्त बाईकचा आरसा आकाशाकडे वळला होता. आरश्यात बघून, वरून एखादं विमानं येत नाहीयेना याची शहनिशा करून आम्ही मार्गस्थ झालो. कॉलेज संपलं. चुकून अभियंताही झालो. थोडा खुर्दा खिशात खुळखुळू लागला, आणि मग “ट्रेकिंग” नामक एका व्यसनाने पूर्णपणे ताबा घेतला. बाईक आणि ट्रेकिंग ही आपली सचिन-सेहवाग प्रमाणे जोडीच जमली. खाच-खळगे, नदीपात्रात, जंगलात, चिखलात, सगळीकडे मुक्त संचार सुरु झाला. पार गुजरात सीमेवरील साल्हेर-मुल्हेर पासून खाली गोंयपर्यंतचे बरेचसे किल्ले ‘बाईक’दळी भटकून झाले. अभिमानाची गोष्ट अशी की बाईकनी कधी दगा नाही दिला. मित्रांच्या बाईक पंक्चर काय व्हायच्या, बंद काय पडायच्या, घसरायच्या काय, पेट्रोल काय संपायच. भलतीच नाटकं हो. शेवटी, घरकी मुर्गी दाल बराबर, असंच काहीसं माझ्याबाबतीत घडलं. मित्राची ‘अव्हेंजर’ चालवली आणि देवत्व प्राप्त करण्याची ओढ निर्माण झाली. Tagline आहे हो अव्हेंजरची “Feel Like God”. मी मर्त्य मानव तरी की करणार मग. शेवटी पल्सर देऊन अव्हेंजर आणली. पण ६ वर्षांच्या यशस्वी सहजीवानंतर करती सवरती बाईक विकताना, मनाला थोडी हुरहूर लागून राहायची ती राहिलीच. सध्या तरी मी अव्हेंजर चालवण्यात रममाण आहे. पण परवाच “थंडरबर्ड”चं नवीन मॉडेल शेजारून धुप्-धुप करत निघून गेलं. जीव वर-खाली झाला हो. आता “थंडरबर्ड”चे वेध लागलेत. ती जर घेतली तर मग अव्हेंजरच्या लेखाची अजून एक जिलेबी पडायला मी मोकळा !!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मुक्तक
लेखनप्रकार (Writing Type)
लेख

प्रतिक्रिया द्या
45889 वाचन

💬 प्रतिसाद (164)

प्रतिक्रिया

ही हा हा हा

बॅटमॅन
गुरुवार, 12/05/2013 - 18:14 नवीन
ही हा हा हा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

अगोबाची बाईक अगोबासारखीच भव्य

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 12/05/2013 - 21:14 नवीन
अगोबाची बाईक अगोबासारखीच भव्य आणी दिव्य... ;) ते असो... मी पण धूम शिनूमापाई येडा झाल्तो आनी मंग येलिमिनेटर घेतलीवती. त्याणंतर लै जबरी किस्सा घडलावता !
झैरात...झैरात...झैरात
=)) तर किस्सा असा,आमी आमच्या धोतारछाप-भटजी वेषात सांजच्या टायंबाला येका कार्यालयात शिमांतपुजणाला चाल्लो व्हतो.आनी त्यो आपला डेक्कनचा झेडब्रीज नव्ह का...,,, त्येच्यावरून माज्या नीलंसुंदरीयेलमीन्येटर(ब्याट्या-शब्द बग रे!!! ;) ) संगं चाल्लोवतो. तेव्हढ्यात येक पल्सरवरचा मानूस(विंडीयन येक्सप्रेसचा येक रिपोर्टर-अनिरुद्ध राईच) माला हाका मारून थांबवाया लागला. म्या थांबलू .. म्हन्लं,"का वो रस्त्यात थांबिवता?" मंग त्यानी आमाला बरुबर ह्येरल्येलं असल्यामुळं "गुर्जी कवा भेटू मंग?" असं इचारलं..णंतर त्यो भेटला. त्येच्या फोटू ग्राफरनी आम्चा आमच्या लाडक्या बाय'को सकट फोटू काडला. आनी २५ का २६ च्या फेपरात(पुणे हेराल्ड..टाइम्स ऑफ इंडीया२५/२६..१०/२००४) आमच्या फोटू सकट आम्ची,म्हंज्जे आम्च्या धंद्याची त्याणी कव्हरश्टोरी छापली. लै भारी लिवलवतं बेन्यानं =)) तवाचा यक शिनूमा "द डी कंपणी" च्या धर्तीवर त्याणं आम्हा गुर्जींची "द जी कंपणी" असा मथळा दीऊन धमाल उडवून दिल्ती. Image removed. मंग काय त्याच्या णंतरचे दोण..तीण दिवस आमचा शारुकखान झाल्ता. Image removed. रस्त्यावं/शिग्नलला लोक आमाला "लै भारी बर्र का प्येपरातला फोटू आनी श्टूरी" अश्या कॉमेंटी द्यायचे! लै मज्जा वाटायची तवा. येकतर तवा येलिमिनेटर मंजी किंमत बी लाखात व्हती... आनी त्या बजाज वाल्यांनी अव्हेंजर ह्ये तिचं देशी मॉड्येल बी बाजार'ला आन्लं णव्हतं . त्यामुळं रस्त्यावर दिसायला,तशी बी ती लाखात येक! त्यातनं येखाद्या भटजीनी ती "घ्यावी" ह्येपन लाखात येकच! आनी त्येच्याहून फुडं तिचा भटजीसकट प्येप्रात फोटू..मंजी त काय..आम्च्या णशिबात ह्ये कित्तेक लाख...आणी आम्च्या धंद्यातली बाकिची भटं जळूण खाक. =)) त्येच्यामायला त्याणंतर आठवडाभर आमी णिस्ते आस्मानात तरंगत हुतो! Image removed. लय बोल्लो.. अता बास आमच्या आत्मस्तुतीचा तास...
आनी तुमी बगा ह्यो फोटू खासमखास...आम्ची मुलाखत घ्येवुण केल्येल्या शब्दांकना-सह
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

वा बुवा!

पैसा
गुरुवार, 12/05/2013 - 21:19 नवीन
लै भारी!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

गुरजी म्या येलिमिनेटर वर

अभ्या..
गुरुवार, 12/05/2013 - 21:45 नवीन
गुरजी म्या येलिमिनेटर वर मांडी घालून बसायचा इशय तरी काढला होता का? ;-) पण भारी दिसताव एकदम. आंक्षी आर्नोल्ड्शास्त्री . :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

मी तरी मांडी घालुन बसलेला

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 12/05/2013 - 22:29 नवीन
मी तरी मांडी घालुन बसलेला दिसतोय का??? :-/ उगीच मुद्दाम कै तरी! :-/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

आर्नोल्ड्शास्त्री?????

स्पंदना
Fri, 12/06/2013 - 03:43 नवीन
ए! या अभ्याला थांबवा कुणी. आर्नोल्ड्शास्त्री??? आम्बाक?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

अगदी आर्नोल्डशास्त्री

बॅटमॅन
Fri, 12/06/2013 - 03:53 नवीन
=)) अगदी आर्नोल्डशास्त्री शिरगुरकर ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

गुरजी म्या येलिमिनेटर वर

अभ्या..
गुरुवार, 12/05/2013 - 21:49 नवीन
गुरजी म्या येलिमिनेटर वर मांडी घालून बसायचा इशय तरी काढला होता का? ;-) पण भारी दिसताव एकदम. आंक्षी आर्नोल्ड्शास्त्री . :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

अरे मस्तच गुर्जी....

प्यारे१
गुरुवार, 12/05/2013 - 21:58 नवीन
अरे मस्तच गुर्जी.... तुमचा हा किस्सा म्हायती न्हवता. अरे एलिमिनेटरवर 'बसणार' कोण? गुर्जींशिवाय हायेच कोण!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

आयला.. भारीच

शैलेन्द्र
गुरुवार, 12/05/2013 - 22:28 नवीन
आयला.. भारीच :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

काय ओ एलिमिनेटरवाले बुवा, हा

प्रचेतस
गुरुवार, 12/05/2013 - 22:59 नवीन
काय ओ एलिमिनेटरवाले बुवा, हा किस्सा बोलला नैत कधी? बाकी फोटू एकदम जबरीच. शिन्व्ह्गड रोडवरचा अक्षयकुमार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

@शिन्व्ह्गड रोडवरचा

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 12/05/2013 - 23:08 नवीन
@शिन्व्ह्गड रोडवरचा अक्षयकुमार.>>> Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

बुवा खूष!

बॅटमॅन
Fri, 12/06/2013 - 01:22 नवीन
बुवा खूष! (चला, अजून जरा खोडी काढू ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

आई शप्पत!!! बुवा यू रॉक्स

बॅटमॅन
Fri, 12/06/2013 - 01:28 नवीन
आई शप्पत!!! बुवा यू रॉक्स इंडीड!!!! फोटो लैच रापचिक आलाय :) यावर एक जबराट फ्लेक्सपण होऊ शकेल ;) सौथ पिच्चरचे हीरो म्हणूनही शोभाल या पोजमध्ये. कोण आहे फटूग्राफर खरंच, नाद खुळा काढलाय फटू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

हाहा.

प्रचेतस
Fri, 12/06/2013 - 09:55 नवीन
हाहा. अगदी अगदी. बाकी बुवांनी पण तो फोटू फ्रेम करून मर्मबंधातली ठेव असल्यागत जपून ठेवलेला दिसतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

(No subject)

अत्रुप्त आत्मा
Fri, 12/06/2013 - 10:52 नवीन
:-/ :p :-/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

भारीच!

आदूबाळ
Fri, 12/06/2013 - 02:31 नवीन
भारीच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

बुवा आता एक ट्याबलेट पण घ्या

मालोजीराव
Fri, 12/06/2013 - 11:45 नवीन
बुवा आता एक ट्याबलेट पण घ्या…आणि एखादी कडक टंचनिका…मंजी लेडी असिस्टंट पण 'ठेवा' ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

@मंजी लेडी असिस्टंट पण 'ठेवा'

अत्रुप्त आत्मा
Fri, 12/06/2013 - 15:32 नवीन
@मंजी लेडी असिस्टंट पण 'ठेवा'>>> =)) हा अनमोल "ठेवा" मिळवून देण्यात सहाय्यभूत होऊ शकाल काय? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव

ठेवीदार बुवा =))

बॅटमॅन
Fri, 12/06/2013 - 15:36 नवीन
ठेवीदार बुवा =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

ब्याटुक ... एक शब्द खाटुक!

अत्रुप्त आत्मा
Fri, 12/06/2013 - 19:25 नवीन
ब्याटुक ... एक शब्द खाटुक! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

आम्ही आमच्या यामिनी सोबत

स्पा
गुरुवार, 12/05/2013 - 16:04 नवीन
आम्ही आमच्या यामिनी सोबत आनंदात आहोत :)
  • Log in or register to post comments

आमची यामिनी उर्फ यमी

स्पा
गुरुवार, 12/05/2013 - 16:36 नवीन
आमची यामिनी उर्फ यमी Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

आमची म्हणजे कोणाकोणाची ??

सूड
गुरुवार, 12/05/2013 - 16:59 नवीन
आमची म्हणजे कोणाकोणाची ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

एकषष्ठांश गोरी यमी बेष्टंय हो

बॅटमॅन
गुरुवार, 12/05/2013 - 17:01 नवीन
एकषष्ठांश गोरी यमी बेष्टंय हो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

ब्याट्या, अरे ही गोरी कोणत्या

सूड
गुरुवार, 12/05/2013 - 17:03 नवीन
ब्याट्या, अरे ही गोरी कोणत्या अंगान् दिसली तूस??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

अरे नाव यमी म्हणून

बॅटमॅन
गुरुवार, 12/05/2013 - 17:08 नवीन
अरे नाव यमी म्हणून हरितात्यामधल्या यमीपर्यंत नेले रे कल्पनासूत्र. बाकी कै नै. अन या यमीच्या गोरेपणाबद्दल बोलायचं तर शॉकाब्सर नळकांडी बघ पुढची ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

काय एकेकाच्या प्रतिभांना बहर

प्यारे१
गुरुवार, 12/05/2013 - 16:14 नवीन
काय एकेकाच्या प्रतिभांना बहर आलाय! आहाहा! योग्य जागी पण वापरत जा हो. ;) बाकी मदनबाण ने इतरांसारखं मी माझा मी माझा असं न करता फक्त बायडीचा फटु टाकला त्याबद्दल हार्दिक अभिनंदन!
  • Log in or register to post comments

कायम दुसर्याच्या प्रतिभा

अभ्या..
गुरुवार, 12/05/2013 - 16:19 नवीन
कायम दुसर्याच्या प्रतिभा पाहून जळायचे :) ही सिन्हा ची नाइ. सोताची आहे. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

आवडलंय

वाह्यात कार्ट
गुरुवार, 12/05/2013 - 16:26 नवीन
अर्ररर राजकुमार बघ मग. Smile पंकजपुत्राने हीच स्स्वीकारलीय पूर्ण चित्रपटात. हिरण्यचक्शु मागे बसल्यास कनिष्ठ चक्रास आसनस्पर्श होइलसे वाटते. Biggrin
हा उलघडा नुसता सिन्हा य एका शब्दाने झाला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

हायला प्यारे.

अभ्या..
गुरुवार, 12/05/2013 - 16:29 नवीन
हायला प्यारे. अजुन एक सरकारी मरक्युरी :-D असू दे असू दे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाह्यात कार्ट

असं म्हनू ने! साला सगळ्याला

प्यारे१
गुरुवार, 12/05/2013 - 16:57 नवीन
असं म्हनू ने! साला सगळ्याला तुज्या येवडी शार्प पावर असती तर काय बोलाय्चं हुतं मं? आनि वरच्या जळण्याबद्दल तिजी भनं पडलं कड्यावनं! म्या कुडं जळ्ळो बे अभ्या कडू??? कवतुक केलो क व तु क. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

आयला !!

सूड
गुरुवार, 12/05/2013 - 16:27 नवीन
झालं, ठुसठुसलं ह्यांचं अध्यात्माचं गळू!! 'मी माझा मी माझा' म्हणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

वरचा गॉगलवाला प्रतिसाद वाच की

प्यारे१
गुरुवार, 12/05/2013 - 16:34 नवीन
वरचा गॉगलवाला प्रतिसाद वाच की बे चोच्या! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

@वरचा गॉगलवाला प्रतिसाद वाच

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 12/05/2013 - 19:31 नवीन
@वरचा गॉगलवाला प्रतिसाद वाच की बे

चोच्या!

>>> Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

लेख मस्त!

पैसा
गुरुवार, 12/05/2013 - 17:23 नवीन
लेख आवडला. मग प्रतिक्रिया वाचल्या आणि लेख काय होता हेच विसरले मिनिटभर!
  • Log in or register to post comments

cd dawn ला काय म्हंता .

जेपी
गुरुवार, 12/05/2013 - 17:29 नवीन
cd dawn ला काय म्हंता . गावारान -तथास्तु
  • Log in or register to post comments

हौ अबौट उषा?

बॅटमॅन
गुरुवार, 12/05/2013 - 17:33 नवीन
हौ अबौट उषा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

धाग्यापेक्षा

अनिरुद्ध प
गुरुवार, 12/05/2013 - 17:34 नवीन
प्रतिसाद्च जास्त भावले,अत्यंत उत्तम प्रतिसाद.
  • Log in or register to post comments

का ओ?

अभ्या..
गुरुवार, 12/05/2013 - 18:14 नवीन
उषा आली की अनिरुध्दाने यायलाच पायजे का? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध प

हा हा हा...

विटेकर
गुरुवार, 12/05/2013 - 18:24 नवीन
अहो , येउ द्या ना अनिरुद्धाला , आपलं काय जातय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

अहो

अनिरुद्ध प
गुरुवार, 12/05/2013 - 18:54 नवीन
पण माझ्या प्रतिसादाच्यावेळी बहुतेक उषा नव्हती तेथे,असो आता आलीच आहे तर अनिरुद्ध पामराची काय खैर नाय (आता लपुन बसावे लागेलना,नाय्तर घरी माझी काय खैर नाय बगा अता माझ्या मिपाकर मित्राना मद्तीस धावावे लागेल)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

लेख मस्त... प्रतिसाद जबरदस्त!!

वडापाव
गुरुवार, 12/05/2013 - 17:49 नवीन
ह ह पु वा =)) बाकी शिर्षक वाचून बाई आणि बाईक यांत पुरुषाला नेमकं जास्त कोण आवडतं (किंवा आवडायला हवं असं म्हणू आपण) या संभ्रमात; पुढील कारणांमुळे : (ह. घ्या) १. बाईकला आपण कितीही वेळा किक मारू शकतो. ती बिचारी काही बोलत नाही. २. नेहमी आपणच बाईकवर बसतो. बाईक आपल्या डोक्यावर कधीच बसत नाही. ३. बाईकचा कान जितका पिळाल, तेवढा ती बिनतक्रार वेग वाढवते. ४. नियमित आंघोळ, खाण्या-पिण्याचे लाड आणि गरजेनुसार तेलाची मालीश सोडून बाईक सहसा कोणत्याही मागण्या करत बसत नाही. ५. मूड खराब झाला की बाईकबरोबर एक शांत फेरफटका मारून यायचं. मस्त वाटतं. ६. बाईक पसेसिव्ह नसते. आपण इतर कुणाच्या बाईकवरून राऊंड मारायला गेलो तर आपली स्वतःची बाईक उगाच बसल्या बसल्या जळत नाही. इत्यादी इत्यादी इत्यादी...
  • Log in or register to post comments

समस्त स्त्रीजातीने केलाय

विनटूविन
गुरुवार, 12/05/2013 - 18:08 नवीन
.....णिषेध!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वडापाव

आणि दुसर्‍याची बाइक कशीही

शैलेन्द्र
गुरुवार, 12/05/2013 - 20:02 नवीन
आणि दुसर्‍याची बाइक कशीही असली तरी आपल्याला स्वत:चीच चांगली वाटते.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वडापाव

हा एक महत्त्वाचा फरक आहे खरे

बॅटमॅन
गुरुवार, 12/05/2013 - 20:09 नवीन
हा एक महत्त्वाचा फरक आहे खरे तर दोहोंत ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

फरक स्पश्ट करा

प्रभू-प्रसाद
गुरुवार, 12/05/2013 - 22:38 नवीन
पॅ़कीच्या पॅकी गुंण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वडापाव

फरक स्पश्ट करा

प्रभू-प्रसाद
गुरुवार, 12/05/2013 - 22:57 नवीन
पॅ़कीच्या पॅकी गुंण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वडापाव

देवा!! वाचव!

स्पंदना
Fri, 12/06/2013 - 03:49 नवीन
देवा!! वाचव!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वडापाव

ह ह पु वा

विटेकर
गुरुवार, 12/05/2013 - 17:59 नवीन
सुरेख .. प्रतिसाद वाचून मजा आला... ए़कूण मायबोलीचे भवितव्य उज्ज्वल आहे. एवेढे बोल्लोन मी माझे ४ शब्द संपवितो.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा