Skip to main content

बाई'को' विकल्यावर

लेखक वाह्यात कार्ट यांनी गुरुवार, 05/12/2013 14:34 या दिवशी प्रकाशित केले.
हर्षोल्लासीत नावर्यांनो, आधीच सांगतोय शीर्षक वाचून भलते समज करून घेऊ नका. लेख चक्क चक्क बाईक वर आहे. “बाईक 'को' विकल्यावर”. थोडासा आपला हिंदीमिश्रित कोट्या करायचा क्षीण प्रयत्न. आता काय सांगू कसं सांगू असं झालंय. सुरुवात, “धूम” युगा पासूनच करतो. जो तो आपलं टॅनंनॅ नन नॅनननॅ करत गाड्या उडवू लागला. आमच्या इमारतीतलं एक कार्टं तर शेजारच्या इमारतीत गोट्या खेळायला पण स्कुटी वर जाऊ लागलं. फादरकडे बाईक मागताच त्यांनी मला मुस्काडून “दत्त दाखवायची” महत्वाकांक्षा जाहीर केली. शेवटी अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षाला असताना मातोश्रींना अगदीच दया आली आणि मला “कमीतकमी फक्त पास तरी हो रे बाबा” या अटीवर नवी कोरी बाईक बहाल केली गेली. पण खरं तर बाईक देण्यामागच मुख्य कारण असं होतं की माझं महाविद्यालय तसं वेशीबाहेरच होतं. आणि अस्मादिक पुणेकर असल्यामुळे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरायचा भ्याडपणा करण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. असो, बाईक घेतल्यावर पहिली अपेक्षा अशी होती की कॉलेजातल्या एखाद्या मृगनयना रसिकमोहिनीने लाडीकपणे रुमालाशी चाळ करत, हळूच नजर चुकवत लिफ्ट मागावी. पण असे आश्चर्य काही घडले नाही. त्या नजरा चुकवीत, भलत्याच्याच बाईकवर चौफेर उधळू लागल्या आणि आमच्यावर मात्र डोक्यावर रुमाल बांधलेल्या रानरेड्यांना लिफ्ट द्यायची वेळ आली. यथावकाश बाईकची मागील सीट बळकावली गेलीच. अगदीच मृगनयना नाही, पण रसिकमोहिनी मात्र सापडली. आणि मग ‘कोई ना कोई चाहिये प्यार करनेवाला’ म्हणणारा मी, ‘चांदी की सायकल सोनेकी सीट, आओ चले डार्लिंग चले डबल सीट’ असली गोविंदापंथी गाणी म्हणू लागलो. सहसीटधारिणी सोबत लोणावळा-खंडाळाच्या वाऱ्या घडू लागल्या. असो, परत लायनीवर येतो. बाईक घेतल्याच्या दुसऱ्या दिवशीच ती आपटायचा पराक्रमही पार पाडला. कारण पुण्यात बाईक अथवा कार घेतल्यावर ती ३ दिवसांत आपटली नाही तर तो पु.लं.च्या उक्तीनुसार फाउल धरतात. तर झालं असं की रात्री अलका टॉकिझला, ‘सुपरमॅन रीटर्न्स’ नामक सुमारपट पाहिल्यामुळे अर्ध झोपेत टिळक रस्त्यावर बाईक चालवत असताना जरा गुंगी आली आणि मी एका गाढवावर जाऊन आपटलो. आता टिळक रस्त्यावर रात्री १२:३० वाजता गाढव कुठून आले हे विचारू नका. पुण्यात हल्ली अजगर, बिबट्या, गव्यापासनं मगरीपर्यंत काही सापडू शकतं. महानगरपालिकेत तर लांडग्यांचा सुळसुळाट झालाय म्हणतात. हल्ली काय माणसं जंगलात आणि प्राणी शहरात असंच चाललाय. जाऊद्या तर सांगत काय होतो, गाढव बहुदा हुशार असावं, कारण त्याने त्याचे भाई-बंद (पक्षी:मी आणि मागे बसलेला मित्र) ओळखले, म्हणून आम्हाला ‘प्रसाद’ दिला नाही. बाईकला पण काही नव्हते झाले, फक्त बाईकचा आरसा आकाशाकडे वळला होता. आरश्यात बघून, वरून एखादं विमानं येत नाहीयेना याची शहनिशा करून आम्ही मार्गस्थ झालो. कॉलेज संपलं. चुकून अभियंताही झालो. थोडा खुर्दा खिशात खुळखुळू लागला, आणि मग “ट्रेकिंग” नामक एका व्यसनाने पूर्णपणे ताबा घेतला. बाईक आणि ट्रेकिंग ही आपली सचिन-सेहवाग प्रमाणे जोडीच जमली. खाच-खळगे, नदीपात्रात, जंगलात, चिखलात, सगळीकडे मुक्त संचार सुरु झाला. पार गुजरात सीमेवरील साल्हेर-मुल्हेर पासून खाली गोंयपर्यंतचे बरेचसे किल्ले ‘बाईक’दळी भटकून झाले. अभिमानाची गोष्ट अशी की बाईकनी कधी दगा नाही दिला. मित्रांच्या बाईक पंक्चर काय व्हायच्या, बंद काय पडायच्या, घसरायच्या काय, पेट्रोल काय संपायच. भलतीच नाटकं हो. शेवटी, घरकी मुर्गी दाल बराबर, असंच काहीसं माझ्याबाबतीत घडलं. मित्राची ‘अव्हेंजर’ चालवली आणि देवत्व प्राप्त करण्याची ओढ निर्माण झाली. Tagline आहे हो अव्हेंजरची “Feel Like God”. मी मर्त्य मानव तरी की करणार मग. शेवटी पल्सर देऊन अव्हेंजर आणली. पण ६ वर्षांच्या यशस्वी सहजीवानंतर करती सवरती बाईक विकताना, मनाला थोडी हुरहूर लागून राहायची ती राहिलीच. सध्या तरी मी अव्हेंजर चालवण्यात रममाण आहे. पण परवाच “थंडरबर्ड”चं नवीन मॉडेल शेजारून धुप्-धुप करत निघून गेलं. जीव वर-खाली झाला हो. आता “थंडरबर्ड”चे वेध लागलेत. ती जर घेतली तर मग अव्हेंजरच्या लेखाची अजून एक जिलेबी पडायला मी मोकळा !!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 46209
प्रतिक्रिया 164

प्रतिक्रिया

In reply to by सूड

अरे नाव यमी म्हणून हरितात्यामधल्या यमीपर्यंत नेले रे कल्पनासूत्र. बाकी कै नै. अन या यमीच्या गोरेपणाबद्दल बोलायचं तर शॉकाब्सर नळकांडी बघ पुढची ;)

काय एकेकाच्या प्रतिभांना बहर आलाय! आहाहा! योग्य जागी पण वापरत जा हो. ;) बाकी मदनबाण ने इतरांसारखं मी माझा मी माझा असं न करता फक्त बायडीचा फटु टाकला त्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

In reply to by प्यारे१

कायम दुसर्याच्या प्रतिभा पाहून जळायचे :) ही सिन्हा ची नाइ. सोताची आहे. ;-)

In reply to by अभ्या..

अर्ररर राजकुमार बघ मग. Smile पंकजपुत्राने हीच स्स्वीकारलीय पूर्ण चित्रपटात. हिरण्यचक्शु मागे बसल्यास कनिष्ठ चक्रास आसनस्पर्श होइलसे वाटते. Biggrin
हा उलघडा नुसता सिन्हा य एका शब्दाने झाला

In reply to by अभ्या..

असं म्हनू ने! साला सगळ्याला तुज्या येवडी शार्प पावर असती तर काय बोलाय्चं हुतं मं? आनि वरच्या जळण्याबद्दल तिजी भनं पडलं कड्यावनं! म्या कुडं जळ्ळो बे अभ्या कडू??? कवतुक केलो क व तु क. ;)

In reply to by प्यारे१

@वरचा गॉगलवाला प्रतिसाद वाच की बे

चोच्या!

>>> http://www.sherv.net/cm/emo/happy/rolling-on-the-floor-laughing-smiley-emoticon.gif

In reply to by अभ्या..

पण माझ्या प्रतिसादाच्यावेळी बहुतेक उषा नव्हती तेथे,असो आता आलीच आहे तर अनिरुद्ध पामराची काय खैर नाय (आता लपुन बसावे लागेलना,नाय्तर घरी माझी काय खैर नाय बगा अता माझ्या मिपाकर मित्राना मद्तीस धावावे लागेल)

ह ह पु वा =)) बाकी शिर्षक वाचून बाई आणि बाईक यांत पुरुषाला नेमकं जास्त कोण आवडतं (किंवा आवडायला हवं असं म्हणू आपण) या संभ्रमात; पुढील कारणांमुळे : (ह. घ्या) १. बाईकला आपण कितीही वेळा किक मारू शकतो. ती बिचारी काही बोलत नाही. २. नेहमी आपणच बाईकवर बसतो. बाईक आपल्या डोक्यावर कधीच बसत नाही. ३. बाईकचा कान जितका पिळाल, तेवढा ती बिनतक्रार वेग वाढवते. ४. नियमित आंघोळ, खाण्या-पिण्याचे लाड आणि गरजेनुसार तेलाची मालीश सोडून बाईक सहसा कोणत्याही मागण्या करत बसत नाही. ५. मूड खराब झाला की बाईकबरोबर एक शांत फेरफटका मारून यायचं. मस्त वाटतं. ६. बाईक पसेसिव्ह नसते. आपण इतर कुणाच्या बाईकवरून राऊंड मारायला गेलो तर आपली स्वतःची बाईक उगाच बसल्या बसल्या जळत नाही. इत्यादी इत्यादी इत्यादी...

In reply to by वडापाव

आणि दुसर्‍याची बाइक कशीही असली तरी आपल्याला स्वत:चीच चांगली वाटते.. :)

सुरेख .. प्रतिसाद वाचून मजा आला... ए़कूण मायबोलीचे भवितव्य उज्ज्वल आहे. एवेढे बोल्लोन मी माझे ४ शब्द संपवितो.

तुमच्या ह्या सुंदर सुंदर बायका सरासरी किती देतात हो :) (त्यात ही आज काल तर किती जण स्वार असतात ना) डंबिस शॅम्पेन

In reply to by माझीही शॅम्पेन

बायकांबद्दल असे वैयक्तिक प्रश्न विचारतात का ? अच्रत मेले =))

In reply to by प्यारे१

हा हा हा ... उसे की फर्क पेन्दा .. रच्याकं आणि केव्हाही कुठेही पुरूषच :)

मस्त लिहिलेय. विषेश उल्लेखनीयः "महानगरपालिकेत तर लांडग्यांचा सुळसुळाट झालाय म्हणतात."

आमची एकशृंगिणी अगदी 'लख लख चंदेरी..' मिरवायला, सरासरीला, उंचीला सगळेच बेष्ट.. उतार असलेल्या चिंचोळ्या आसनावरुन 'माल्'वहातुकीस दुसरे उपयुक्त काही नाही :)) दुसरी चपला आहे पण ती 'सामान'वाहून न्यायला बेष्ट, 'माल' नव्हे!

In reply to by भटक्य आणि उनाड

उजवीकडची आमची गडगडपक्षिणी = थंडरबर्ड.. पैसा वसुल..

ब्याटमन आणि अन्य प्रतिभावंत यांसी, बुलेट इलेक्ट्रा घेण्याच्या विचारात आहे. नाव सुचवावे हि नम्र विनंती. सौदामिनी कसे वाटते??? सद्या धकधक तालिका आहे माझ्याकडे. चारचाकी ना पण नावे सुचवा.

In reply to by खटपट्या

बुलेट इलेक्ट्रा = विद्युत गोलिका हे लिट्रल पण सौदामिनी अजून एलेगंट आहे. आवडेश! शिवाय दामिनी ऐवजी सौ-दामिनी नाव ठेवण्यातले औचित्य असे की ती 'तुमची' आहे, कुंवारी नाही ;) बाकी धकधक तालिका म्हणजे काय? ते अंमळ लक्षात नै आले. चारचाकींनाही यथावकाश नावे सुचवेनच.

In reply to by खटपट्या

वर कोणीतरी पल्सर ला धक धक तालिका म्हटलेय
मीच म्हटलंय पण तालिका नाय हो. तारिका. पल्सर म्हणजे पल्सेटिंग स्टार म्हणून. =))

In reply to by बॅटमॅन

बॅटमॅन भाऊ तुमचे एकदम सॉलीट ढिश्क्याँव्! ढिश्क्याँव्!! ढिश्क्याँव्!!! चालू आहे. विद्युत गोलिका आवडले. पूर्वी याच बुलेट/याझदी फटफटी म्हणायचे याची आठवण झाली. बाकी नामकरण सोहोळा मस्त रंगला आहे. ..... कामेंटण्या पेक्षा एक वेगळाच धागा किंवा तागा काढलात तर अजून मज्जा येईल.

लिखाण अफ्फाट आवडलंय साएब ! जबरदस्स्स्स्स्त ! काही कचकून स्ट्राईकलेल्या ओळी : पुणेकर असल्यामुळे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरायचा भ्याडपणा करण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता डोक्यावर रुमाल बांधलेल्या रानरेड्यांना आरश्यात बघून, वरून एखादं विमानं येत नाहीयेना याची शहनिशा करून आम्ही मार्गस्थ झालो. परवाच “थंडरबर्ड”चं नवीन मॉडेल शेजारून धुप्-धुप करत निघून गेलं येऊद्यात थंडरबर्ड ! पडूदेत आणखी एक जिलबी ! होउदे खर्च !

अप्रतिम प्रतिक्रिया. चारचाकी साठी एक नाव सुचते लवन्यलतिक (लीनीया हे पटकन सुचले कारण आम्ही हीच वापरतो.) प्रतिक्रिया येण्याच्या आधी स्पष्टा करतो की ही आम्हाला आमच्या बायको ने दिली (बैइको नाही) कारण डोने सुंदर स्त्रियांचे एकमेकींशी पटत नाहीत्यामुळे तूर्तास (म्हणजे गेली टीन वर्षे) आम्हीच लटिकेतून विहरात असतो

In reply to by झकासराव

ब्लॅक ब्युटी आहे म्हणुन कृष्णविवर म्हणावं काय? तीच ओ धकधक तारीका.. काळीशी असेल तर कृष्ण्विवर??

In reply to by झकासराव

श्यामा/श्यामासुंदरी/कृष्णसुंदरी वैग्रे चांगले आहे. कृष्णविवर फार तर पेट्रोल टँकला म्हणता येईल ;)

In reply to by प्रचेतस

मस्तच रे. (कुठली श्यामलिनी मस्त वाट्टे तेवढे विच्यारू नको-लंबी लिष्ट है ;) ) अवांतर: स्नेक ला "नाग निका" हे नाव कसे वाटेल ;)

In reply to by बॅटमॅन

=)) पण त्या नावावर आमच्या पहिल्या सातकर्णीचा कापीराईट आहे हे लक्षात ठेव.

In reply to by प्रचेतस

मान्य, म्हणून तर मध्ये स्पेस टाकलाय ना ;) "फोले पाखडिता तुम्ही निवडितो ते सत्त्व आम्ही निके" मधला निका अन आधीचा नाग.

In reply to by प्रचेतस

शामलिनी मस्त आहे.. :) पण ते जाहिरात पाहिलीये ना डेफिनेटली मेल्ची. त्यावर अन्याय होतोय अस वाटतय का?

चला आपण पण लाईम लाईट मध्ये यायलाच हवे ...! अभिनंदन...!! जेन - ६ गुरूजी..!!