मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सये शीकलो आहे तुझ्यावाचून जगण्याची मी गोडी

वैभवकुमारन · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
धडधडत नाही पहिल्यासारखी हृदयाची नाडी निष्करश्यांची मज आता पडत नाहित कोडी झोपाण्यावर जगण्याच्या नाहीत काळ्या धाडी स्वन्पेही माझ्याशी आता करत नाहीत खोडी सये शीकलो आहे तुझ्यावाचून जगण्याची मी गोडी वाटच साला चुकली ती, पण नाही मनी अढी त्या निखाऱ्याच्या झोतात मी टाकली होती उडी भाजले तंव कळले मजला ते वेळच होती वेडी वाटच साला चुकली म्हणून सोडून दिली होडी सये शीकलो आहे तुझ्यावाचून जगण्याची मी गोडी पीकत नाहीत पहिल्यासारख्या काळजात फोडी डोळयाचीही कड सये होत नाही ओली आता दुनिया कशी रंगारंग , नभी सप्तरंगी होळी स्वतःवर प्रेम स्वतःशी , नाही रीकामी झोळी सये शीकलो आहे तुझ्यावाचून जगण्याची मी गोडी

वाचने 1754 वाचनखूण प्रतिक्रिया 8