प्रेमाच्या उगमी येथे,
सहजी कवित्व झरते
जे बोलत जातो मी ही
ते ते कवित्व होते
जरूरी ना काव्यगुणांची
श्वासासम सहजी येते
कुणी न करताही तेथे
ती-कविता होऊन जाते
उस्फूर्तता ही कैशी?,
प्रतिभेशी नाही घेणे
ते देवाजीच्या घरचे
सहजाचे साधे लेणे.
कधी हात तिचे दिसतात
मज मेहेंदी दिसून येते
स्पर्शाची अठवण का ही?
मग मनात उरुनी जाते?
शरीराचा गंध तसाही
मज वेडाऊनच जाई
शब्दांचे सरते काम
अन कविता केवळ राही
प्रेमाच्या गावापाशी
मी भिऊनी उभा आहे.
आकर्षणी सीमा रेषा
हलकीच मधेही आहे.
हे नकळत कैसे कोडे
ठरवून मनाला पडते?
सुटकेची आली वेळ
तरी सुटका कोठे घडते???
हव्यास अम्हाही ऐसा
तो तुरुंग मोहक आहे
जन्मोजन्मी प्रेमाचा
मी...कायमचा कैदी आहे.
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
7014
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्रेमाच्या गावापाशी
अप्रतिम.
सहीच्च्च्च!
अरे वा!
सुरेख कविता!
+१
धन्य हो गुर्जी .
:)
गुर्जि
कडक
वा बुवा वा क लिवलय
मस्त.
@ कोण ही कविता ?>>> मनात
In reply to मस्त. by सस्नेह
खुप सुंदर आवडली
सुंदर..
मस्त !!
जियो
कविता आवडली. काही शब्दयोजना
छान आहे कविता.
हे घ्या !
मस्त
मस्त...
बेष्ट ...
बुवा काय काय करता हो , कविता