✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

जमात : उच्चभ्रु आणि गुंठामंत्री !!

स
सुहास.. यांनी
Mon, 01/03/2011 - 15:03  ·  लेख
लेख
काही दिवसांपूर्वी आपण माझ्या बरोबर काही आयटी वाल्यांच्या सवयीचा आस्वाद घेतलात. आता अजुन काही जमातीं कडे आपण पहाणार आहोत. सर्वात पहिले : उच्चभ्रू !! (आंतरजालीय भाषेत या जमातीच्या लोकांना हुच्चभ्रू असे ही म्हटल्या जाते.) आमचे कट्टर शत्रुत्व असलेली ही जमात, आपल्याला गल्ली-बोळात सहजासहजी सापडणार नाही, मात्र शनिवारी-रविवारी एखाद्या मॉल मध्ये आरामशीर सापडेल. अंगात , आंग्लभाषेत, आय एम अश्या ऍटिट्यूड धारी अक्षराने सुरु होणारं , अथवा एखादं प्रवचनीय वाक्य असलेले राऊंड नेक चे टी-शर्ट असेल. खाली पंधरा ते वीस खिशे असलेली दोन-तृतीयांश पाय झाकणारी (ज्याला धड 'चड्डी ' म्हणता येत नाही ) अशी विजार असेल. पायात सॉक्स सकट ब्रॅन्डेड शुज असतील. गळ्याभोवती भरगच्च हेडसेट असेल.(आणि अंगाभोवती भरगच्च मास असेल.)हाताशी मॉलमध्ये वस्तू वाहून नेणारी पाळणा-गाडी असेल.त्या पाळणा-गाडीत किमान एक तरी रेडि-टु-कुक किंवा मग पास्ता वगैरे ची पाकिटे असतील आणि नजर बावचळल्यासारखी इकडे-तिकडे भिरभिरत असेल. त्याच्या शेजारी एखादी जीन्स आणि जॅकेट परिधान केलेली, नाईट स्लिपर्स घातलेली स्त्री असेल.आपल्याला नुकतच सोळावं संपवून सतरावं लागलय असा अविर्भाव करीत केस मोकळे सोडलेले असतील. मोकळे केस नुकतेच 'गार्नियर' अथवा इतर तत्सम केश-कलप लावण्याचा उत्पादनाने रंगविलेले स्पष्टपणे दिसतील. वि.सु. : गळ्यात असलेले मंगळसूत्र झाकलेले असण्याची दाट शक्यता आहे. पाळणा-गाडीत रेडि-टू-कुक मध्ये एक पाकिट दाल-तडका चं देखील आहे, याची अजिबात लाज, खंत, शरम चेहर्‍यावर दिसणार नाही, उलट माज दिसेल. या वर्णन केलेल्या बाबी आपल्याला आढळून आल्यास समजून जावे की हा त्या जमातीचा प्राणी आहे. या जमातीतील लोकांना बर्‍याच सवयी असतात . ही मंडळी खूपच कमी-वेळा घरात जेवतात आणि जेवलेच तर, जेवताना काटे-सुरे (आणि मोकळं झाल्यावर 'प्रेशर पाइप ' ;) ) वापरतात. (काही महाभाग तर 'गो ग्रीन - डोन्ट वेस्ट पेपरचा टी -शर्ट घालुन मुक्तहस्ताने टिश्यू पेपर वापरतात.) असो. केवळ अंगाने भारतात रहाणारी ही जमात एकुण आंतरजाल, फोन , दूरचित्रवाणी या माध्यमातून जगाच्या संपर्कात असते. पण शेजारच्या खोलीत आपली नुकतीच वयात आलेली कन्यका फोनवर काय गुण उधळते आहे ? हे यांना माहीत नसते. कुठल्यातरी देशाचे पंतप्रधान/राष्ट्राध्यक्ष सध्या कुठल्या देशाच्या टुरवर जाउन काय टुर-टुर करताहेत हे यांना चांगले ठावूक असते. त्यातल्या त्यात बीबीसी आणि सिएनएन या दोन चॅनेल्स शिवाय जगात बातम्या देणारे दुसरे चॅनेल नाही असा यांचा ठाम विश्वास असतो. या जमातीतील सहसा समस्त प्राण्यांचा फेसबुकवर पॉलिटिकल व्युज चा स्टेटस नॉट इंटरेस्टेड असा असतो. शिवाय मतदानाच्या दिवशी हे प्राणिमात्र, मॅकडोनाल्ड, सब-वे किंवा त्याच प्रकारच्या हॉटेलात बसून, ' बर्गर ' मधील माल-मसाला टेबलावर सांडवत असतात. आपल्या सुपूत्र किंवा सुपूत्रीला , पेप्सी पिताना भरल्या नजरेने (जणू काही ते अमृत पीत आहेत) पहात असतात. मात्र वर्ष-समाप्ती ला यांना चांभाराची तीव्र गरज पडते. टॅक्सचे कॅलक्युलेशन्स करताना ' दिस ब्लडी पॉलिटिशयन, रुनडं दिस कन्ट्री ' किंवा अश्या प्रकारच्या वाक्यात या देशात चाललेल्या ढिसाळ राज्यकारभाराची कुंथून-कुंथून आठवण काढतात. अन्यथा वर्षभर ही मंडळी ओबामा - ओबामा असा जप करताना आढळते. वार्षिक सहलीला जाणे, ही या मंडळी अजुन छान एक सवय.सहलीला जाणे म्हणजे शॉर्ट पॅन्ट, पाठीला सॅक आणि हातात बिसलरीची बॉटल असणे आवश्यक आहे असा यांचा समज आहे. नाही, नाही , प्रत्येक गोष्ट करताना ड्रेस कोड असणे असा यांचा एक समज आहे. (आतील कपड्यांना ही ड्रेस कोड असेल का ? असा कधी-कधी मला विचार पडतो.) तर , सहलीला जाताना ही मंडळी सहसा स्वतःच्याच कारनं जातात. आणि कार मध्ये लॅपटॉप ही घेउन जातात. छानपैकी हिरवळीचा, ऐतिहासिक वास्तुचा,वारश्यांचा आनंद घेत असताना, ऍडीशनल आनंद म्हणवून आपल्या ब्लॅकबेरी वर इ-मेल्स चेकवत असतात किंवा फोनवरच मोठ्या आवाजात, मिट द टारगेट, व्हेअर आर मिनीटस ऑफ मिटींग, व्हेयर डु वी स्टॅन्ड ऑन दिस, आय विल पूट दिस टु सीइओ, अशी काहीतरी वाक्य उच्चारतात.(चार विरंगुळ्याचे क्षण जग की रे लेका कधीतरी !! ) बद्धकोष्ठ !! हा रोग निसर्ग नियमाने म्हणा वा जन्मजात देणगी प्रमाणे यांना मिळतो. तसं पहायला गेले की ही मंडळी , साधी शिंक जरी आली तर, चहात आलं टाकुन प्यायच्या ऐवजी, रूबी , जहांगीर, इनलॅक्स किंवा मग दिनानाथ इस्पितळात स्वतःला अ‍ॅडमीट करून घेतात. महिन्यातून एकदा उगाच अंतर्बाह्य मेडिकल चेक-अप नावाचा महागडा आणि गोंडस प्रकार करून इस्पितळाचा वार्षिक ताळेबंदाचा आकडा यांच्या इतकाच फूगवित असतात आणि इतके करून ही सरते शेवटी म्हातारपणात या प्राणिमात्रांना हास्य-क्लबात दाखल व्हावे लागते. आमची दुसरी प्रिय जमात म्हणजे : गुंठा मंत्री !! मित्रांनो, या जमातीतील लोकांना भेटणे अवघड नाही तसेच ते सोप्पे देखील नाही. या जमातीतील प्राणिमात्रांना बघण्याकरिता आपल्याला शहराच्या मध्यवर्ती भागापासून जरा दूर जावे लागेल.समजा, उदाहरणार्थ, आपण पुणे शहर घेवू यात. (च्या मारी हे वाक्य लिहीताना क्षणभर गणिताच्या मास्तरसारखं वाटल मला.) शहरापासून दूर चाकण, वाघोली, खडकवासला, निगडी पासून ते तळेगाव या हाय-वे ला टच असणार्‍या रस्त्यावर , एखाद्या ढाब्यात, वाईन शॉपी, किंवा बार मध्ये आपल्याला ही जमात सापडेल. बाहेर स्कॉर्पियो ऊभी असेल (त्या आधी क्वालिस उभ्या असायच्या आणि त्या ही आधी अ‍ॅम्बॅसिडर) आणि त्यावर घड्याळाचे चिन्ह असण्याची दाट शक्यता आहे. घड्याळाचे चिन्ह नसले तर आख्ख्या खान-दानाच्या नावाची पाटी नक्की असेल, भगवा वा शिवरायांचे चित्र देखील असू शकतं , पण अशी स्कॉर्पिओ असणे जरा विरळाच .बार मध्ये गेल्यावर, माणसांच्या गर्दीत, ज्या प्राणिमात्रांच्या शरीराच्या उघड्या (बोटे,मान,मनगट, अगदी कधी-कधी कान सुद्धा) भागात सर्वात जास्त सोनं दिसेल तोच हा मनुष्य-प्राणी !! पण त्या ही पेक्षा सोप्या पद्धतीने त्याला ओळखायचं असेल तर त्याच्या उन्हाने रापलेल्या चेहेऱ्याकडे बघावं. दिपक मानकर, राखी सांवत, मंहम्मद अली,अब्बु आजमी, आजम पानसरे,शोएब अख्तर, रिकी पॉन्टिंग, अजित पवार आणि विराट कोहली या सर्वांच्या चेहेऱ्यावर मिळून जो माजोरीपणा आहे त्याच्या दहापट माजोरी चेहरा दिसला रे दिसला की समजून जावे की हा प्राणीमात्र ' गुंठा मंत्री " या सदरात मोडतो. या लोकांच्या काही खास सवयी आहेत. कपड्यांचा बाबतीत ही लोक अतिशय दक्ष असतात. स्वच्छ पांढरा शर्ट (हाफ ही असू शकतो .) आणि खाली पांढरी पॅन्ट, सहसा सूतीची असते. पण बुट हा पायात घालायचा प्रकार नसून, आपल्याच एखाद्या कार्यकर्त्याकडून, भर सभेत खायचा प्रकार आहे, असा यांचा समज असतो त्यामुळे पायात सदैव चप्पल असते. घड्याळ ही फक्त वेळ बघण्यासाठी ची वस्तू आहे यावर या जमातीच्या लोकांचा विश्वास नसतो.सोनं तर अंगभर पसरलेले असते. शिवाय घड्याळ ही सोन्याचा खर्व असलेली वापरतात. (वर हिरेजडीत !! च्या मारी , अशी घड्याळ वापरल्याने जर मॅनेजरच्या आणि बापाच्या शिव्या खाण्याचा वेळा चुकणार असतील तर मी आजच्या 'घडीला किमान दहा तरी ऑर्डर द्यायला तयार आहे.) लग्न सोहळा !! या प्रणिमातेरांचा (हा शब्द असाच मुद्दामून लिहीला आहे.) लग्न सोहळा नामक जो काही प्रकार आहे त्याला आपण ' शक्ती प्रदर्शन ' सोहळा देखील म्हणू शकता. ५० तोळे सोने घेणे अथवा देणे ही अतिशय किरकोळ बाब आहे. नववधू चा साडीच्या(शालू) ऐवजी दागिन्यांनी देखील झाकल्या जाऊ शकते असे आपल्याला वाटू शकते. एखादा मंत्री (मग तो भु-विकास मंत्रालयाचा का असेना.), पालक मंत्री नाहीतर किमान साखर कारखान्याचा चेअरमन लग्नाला हजर असतोच, शिवाय लग्न-पत्रिका म्हणजे मतदान-यादीतील एखाद पान असलेच पाहिजे (समस्त नावे पाटील या तीन शब्दाने संपणारी ) समस्त पाव्हण्यांची नावे जरी पत्रिकेत असली तरी ऐन वेळेला नवरदेवाच्या मावशीची नणंदेच्या जावयाच्या तिसर्‍या मुलीच्या सासूची चौथ्या नंबरची बहीण अडून बसतेच. शिवाय सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली एखाद्या लग्नात आपल्याला बायका नाचविलेल्या ही दिसतील. हे प्राणीमात्र 'धनदांडगे' या सदरात मोडतात. मन्थंली रिजल्टस, व्कार्टरली रिझल्टस, इयरली रिझल्टस किंवा रेसेशन या टर्मशी या लोकांचा काही सबंध नसतो, उलट जर का 'मार्केट पडलं ' असं आपण यांना सांगीतले तर " कुढ्ढालं ? बाजार समिती च का ?" असे विचारुन समोरच्याला कपाळावर हात मारायला लावेल. बाजार समिती, सरकारी गाळे,आडते, बाळू वाहतुकीचे ट्रक्स अश्या सरकारी मालमत्ता म्हणजे यांची सत्ता-स्थाने असतात, पर्सनल लोन्स, होम लोन्स वगैरै फालतू प्रकार आहेत, (आमच्या एका गुंठा मंत्री मित्राला गोड आवाजातल्या कन्येने " आपली काही पर्सनल लोन ची रिक्वायरमेंट आहे का ? " असे विचारल्यावर त्याने " मला तर नाही पण तुला पाहिजे असलं तर सांग ,पाच-पन्नास देतो मी, ये सांजच्याला असे म्हणून त्या कन्येला अक्षरशः रडवले होते. ) असो. ज्या प्रमाणे सवयी आहेत, त्याच प्रमाणे त्याला अपवाद ही. पुढील भागात : फिल्मी, पुस्तकी आणि बुंगारी.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
20689 वाचन

💬 प्रतिसाद (72)

प्रतिक्रिया

तुम्ही "कॉमन म्यान"च्या

टवाळ कार्टा
गुरुवार, 11/28/2013 - 19:48 नवीन
तुम्ही "कॉमन म्यान"च्या व्याखेत बसत नाहीत हो...बंगला, ऑडी, गन आणि खास पोलिस दोस्त :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील

वळख असु द्या

कपिलमुनी
गुरुवार, 11/28/2013 - 20:04 नवीन
राम राम पाटील ! वळख ठीवा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील

वळख ठेवा सायेब. कधी भेटण्याचा

खटपट्या
Fri, 11/29/2013 - 13:29 नवीन
वळख ठेवा सायेब. कधी भेटण्याचा योग आला तर….
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील

तुम्ही बंदूक घेऊन चौकात

विद्युत् बालक
Fri, 11/29/2013 - 22:54 नवीन
तुम्ही बंदूक घेऊन चौकात गप्पा मारता?
एका जवळच्याच आमदारसाहेबांचे नातेवाइक निघाले. त्यांनी माफी मागितल्यावर प्रकरण मिटले.
आयला असे पण उलटे होते काय? अपक्ष आमदार होते कि काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील

दिट्टो का काय म्हणतात तसे वर्णन

भ ट क्या खे ड वा ला
गुरुवार, 11/28/2013 - 19:58 नवीन
लय भारी ,चपखल , हुबेहूब अजून येउद्यात
  • Log in or register to post comments

आम्ही कॉमन मॅनच...

बाबा पाटील
गुरुवार, 11/28/2013 - 20:19 नवीन
आमच्यातला प्रत्येकजण प्रचंड कष्ट करुन वर आलोय. मी मराठी शाळा मास्तरचा मुलगा आहे,ज्याची ऑडी आहे त्याने बारावीला पेपरची लाइन टाकली आहे.पोलिसवाल्याची आईवडील भाजीविक्रेते होते.पेट्रोलपंपवाल्याचे वडील पोलिस हवलदार होते,मेरीट वर आत डी वाय एस पी आहेत.प्रत्येकाचे शिक्षण मेरीटवर झाले आहे शिवाय प्रत्येक जण ओपन कॅटेगरीत येतो त्यामुळे आरक्षणाचा संबधही नाही. कुनालाही संध्याकाळचे जेवन भाकरीशिवाय जात नाही आणी प्रत्येकाचे आई वडील त्याच्याबरोबरच राहतात.त्यामुळे तथाकथीत उच्च वर्गात आम्ही कधीच जाउ शकत नाही
  • Log in or register to post comments

_/|\_ आमुचा दंडवत...

टवाळ कार्टा
गुरुवार, 11/28/2013 - 20:38 नवीन
_/|\_ आमुचा दंडवत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील

_/|\_ आमुचा दंडवत...

रुस्तम
Fri, 11/29/2013 - 07:09 नवीन
_/|\_ आमुचा दंडवत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील

तेथे कर माझे जुळती...

वामन देशमुख
Fri, 11/29/2013 - 10:58 नवीन
आपणांस आणि आपण चौघांसारखी स्वकष्टावर प्रगती करणाऱ्या सर्वांसच- तेथे कर माझे जुळती...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील

तुम्हाला गन का घ्यावीशी वाटली

मृत्युन्जय
Fri, 11/29/2013 - 11:30 नवीन
तुम्हाला गन का घ्यावीशी वाटली हे जाणुन घ्यायची उत्सुकता आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील

व्यवहारात प्रत्येक गोष्ट जाहिर करता येत नाही.

बाबा पाटील
Fri, 11/29/2013 - 11:37 नवीन
माझी शेती व वैद्यकिय व मिनरला वॉटरचा प्लांट असे तीन तीन व्यवसाय आहेत.त्यामुळे बहुतेक फिरण किंवा लोकांच्या भेटीगाठी दवाखान्याची वेळ संपल्यावर रात्री दहानंतर असतात.जरी बंद गाड्यातुन फिरत असलो तरी कुठली वेळ कशी असेल ते कोनीच प्रेडीक्ट करु शकत नाही त्यामुळे स्वसंरक्षनार्थ शस्र परवाना मिळाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

मलाही रात्री अपरात्री बरेच

मृत्युन्जय
Fri, 11/29/2013 - 12:56 नवीन
मलाही रात्री अपरात्री बरेच भटकायला लागते. एखादी घेउन टाकेन म्हणतो. काय करावे लागते (आणि काही पैसे वगैरे चारायला लागतात का?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील

टोटल २४ कागदपत्रे जोडावी लागतात.

बाबा पाटील
Fri, 11/29/2013 - 13:17 नवीन
सगळ्यात महत्वाची दोन एक बायकोचे आणी दुसरे जन्मदात्या वडीलांचे संमतीपत्र ते पन तहसिलदारांसमोर अ‍ॅफेडेव्हीट करुन ते मिळाल की सांगा,बाकीची कागदे सहज मिळतील ,फाइल भक्कम झाली की एक रुपयाही चारावा लागत नाही,निदान मला तरी तसा अनुभव आला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

हम्म

सुहास..
Fri, 11/29/2013 - 11:15 नवीन
हम्म
  • Log in or register to post comments

धन्यवाद सर्वांना...

बाबा पाटील
Fri, 11/29/2013 - 11:29 नवीन
म्हणुन एकच गोष्ट नेहमी सांगत असतो,आपले बापजादे काय होते हे उगाळत न बसता,शिक्षणाची कास धरा,प्रचंड कष्ट आणी परमेश्वराने दिलेल्या मेंदुचा काळजीपुर्वक वापर केला केला की यश मिळतेच.बाकी दुनियादारी गेली......ड्यात.
  • Log in or register to post comments

++++४१४१

सिरुसेरि
गुरुवार, 02/11/2016 - 11:03 नवीन
-------"म्हणुन एकच गोष्ट नेहमी सांगत असतो,आपले बापजादे काय होते हे उगाळत न बसता,शिक्षणाची कास धरा,प्रचंड कष्ट आणी परमेश्वराने दिलेल्या मेंदुचा काळजीपुर्वक वापर केला केला की यश मिळतेच"----- सुरेख .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील

बाबा.......................

इरसाल
Fri, 11/29/2013 - 13:01 नवीन
तुम्हाला ख म्हणायचे होते ना ? ;)
  • Log in or register to post comments

पण दुसर्‍या क्षणी आमच्या

ईश्वरसर्वसाक्षी
Wed, 02/10/2016 - 18:22 नवीन
पण दुसर्‍या क्षणी आमच्या चौघांच्या हातात मोजुन पाच गन्स त्यांचा दिशेने रोखल्या गेल्या होत्या,इतर तिघांच्या तिन आणी पोलिसवाल्याच्या दोन्ही हातात दोन जबरा...एकदम अस वाटल काउबॉय मुव्हि बघतोय. शतपावली करताना सुद्धा गन्स सोबत बाळगाव्या लागतात आणि पोलिसवाला तर दोन्हि गन्स बाळगतो वैयक्तिक आणि सर्विस रिव्हॉल्वर्...खरच भारत आता राहण्यालायक नाहि राहिलाय.
  • Log in or register to post comments

राम राम पाटील....

सतिश पाटील
Wed, 02/10/2016 - 22:23 नवीन
राम राम पाटील.... तुमीबी पाटील आमीबी पाटील..तवा तेवढी वळख ठुवा आमची...कसं... आयला ४ जणांनी मिळून ५ बंदुकी काढल्यावर तेची फुटभर फाटलीच आसल दीत्तो शिन्मात्ला शिन...
  • Log in or register to post comments

इकणारे इकित्याय घेणारे

भिकापाटील
Wed, 02/10/2016 - 22:38 नवीन
इकणारे इकित्याय घेणारे घेत्याय मंग तुमची कम्हूण जळती
  • Log in or register to post comments

यक नंबर लेख सुहास भाऊ. लय

shvinayakruti
Sun, 02/14/2016 - 20:22 नवीन
यक नंबर लेख सुहास भाऊ. लय आवडला
  • Log in or register to post comments

बाबा पाटील. तुम्हाला आणी

shvinayakruti
Sun, 02/14/2016 - 20:26 नवीन
बाबा पाटील. तुम्हाला आणी तुमच्या मित्रांना नुसता दंडवतच नाही तर माझा मुजरा
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा