"वेडी"
येताजाता शिव्या सारख्या
गाड्यांवरती दगड मारते
जरतारीच्या आवेशाने
लक्तर दैवी ती सावरते
केस पांढरे - जटाच भारी
मिचमिच डोळे लुकलुकताना
तोंड चालते हातांसोबत
तारस्वराने ओरडताना
येणारा अन् जाणाराही
वाट वाकडी दुरून करतो
मधमाश्यांच्या मोहोळाशी
कोण कशाला उगाच भिडतो?
हसते वेडी सदा मुखाने
आनंदी परि कधी न दिसते
मूल पाहुनी कुणी गोजिरे
तळमळताना अश्रू पुसते
स्थळकाळाशी तुटले नाते
एकच आठव गतकाळाचे
रहदारीने ठोकरलेल्या
शिशुदेहाच्या कलेवराचे
प्रेत टांगुनी वेशीवरती
कुणी चौकशी, कुणी सांत्वना
दुःखामागे धिंडवड्यांच्या
नको जाहल्या उरी यातना
वेड पांघरुन विसरू पाही
दैवगतीची बधिर कहाणी
जगता, झिजता कणाकणाने
तेव्हापासुन मरे 'शहाणी' …
-- अमेय
*****
उत्कृष्ठ.
अप्रतिम कविता!
बाप रे!
सत्य, कल्पना, सहवेदना
कविता आवडली!! डोळ्यांसमोर
अत्यंत प्रभावी
ओ नका ओ!
प्रभावोत्पादक
:)
केवळ आवड म्हणून-- त्यासाठी
सुन्न
किती विदारक आणि मन सुन्न करणारी
अत्यंत प्रभावी चित्रण
अरेरे
सुंदर कविता, आवडली
कविता आवडली.... उत्कृष्ट
शेवटचा चटका...सहन न होणारा!
ब धी र...
अप्रतिम .
छान.
कविता छान आहे पण "बाई गेली"
प्रतिसाद
चित्रदर्शी रचना. लिहीत रहा.
.
धन्यवाद
अस्वस्थ. आणि हेल्प लेस करुन