अद्वैत आणि सीमा एकाच कॉलेजात होते. दोघांत मैत्री होती. कॉलेज संपलं, आणि एकमेकांचा विरह सहन होईनासा झाला. दोघं पुन्हा त्यांच्या ग्रुपच्या नेहमीच्या कट्ट्यावर भेटायला लागले. हळूहळू जाणीवपूर्वक दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले. पाच-सहा वर्षं उलटली. सीमा करिअरिस्टिक मुलगी होती. हुशार आणि कर्तबगार होती. तिला कामात लगेच बढती मिळायला लागली. अद्वैतला खूप मेहनत घ्यावी लागली. खूप हालअपेष्टा सहन करून, खस्ता खाऊन त्यानं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. शेवटी त्याला चांगली नोकरी मिळाली. पण काम भरपूर होतं. प्रेशरही खूप. कॉलेजात गंमत म्हणून तुरळक वेळा ट्राय करणारा अद्वैत आता आठवड्यातून दोनदा तरी मोजके पेग घशाखाली ढकलायला लागला. अठ्ठावीसाव्या वर्षी दोघांचं लग्न लागलं. दोघांनी मिळून एक मस्त घरसुद्धा विकत घेतलं.
नोकरीत दोघेही चांगले सेटल झाले होते. दोघांना प्रमोशन मिळालं. दोघांचा पगार वाढला. सीमाला फॉरेनला जायची संधीसुद्धा चालून आली. आणि आता अद्वैतने आक्षेप घेतला. "तीन वर्षं झाली लग्नाला... अजून मूल नाही आपल्याला एकही. घरचे सगळे मागे लागल्येत. तुझ्याही माहेरच्यांना नातवंडांशी खेळायचंय. मध्यंतरी आपण दोघंही रोज थकून जायचो. आता तसं नाहीये. माझ्या कामाचा भार आता हलका झालाय. आता ताण तणाव नसतो आधीसारखा. आता आपण ट्राय करायला हवं. अजुन उशीर करणं बरोबर नाही. आणि तू फॉरेनला कुठे निघालीस? नाही जायचं. दुस-या कुणाला तरी पाठवा म्हणावं."
सीमाला धक्काच बसला. आपला नवरा आपल्यावर असा निर्बंध टाकेल असं तिला वाटलं नव्हतं. खरं तर त्याला विरोध करायची धमक तेव्हा तिच्यात होती, पण तिच्या माहेरची मंडळी, मित्रपरिवार, कोणालाच तिने परदेशी जाणं मान्य नव्हतं. त्यात सुरुवातीपासूनच नव-याचा विरोध म्हटल्यावर तिने आलेली संधी सोडली. दोघं आता मूल होण्यासाठी प्रयत्न करायला लागले.
दोन वर्षं निघून गेली. मूल होईना. अद्वैतने सीमाच्या माहेरच्या माणसांना पाठीशी धरून तिला नोकरी सोडायला लावली. "घरची कामं, त्यात नोकरीचा व्याप तुला झेपत नाहीये. आपल्याला मूल हवंय. तुझी तब्येत कशी, ठणठणीत हवी. तू घरीच राहा... माझ्या पगारावर भागेल सगळं. आपलं सेव्हिंगसुद्धा तसं भरपूर आहे." सीमा पुन्हा गप्प बसली. तिलाही आता मूल हवंच होतं.
घराची संपूर्ण आर्थिक जबाबदारी खांद्यावर आल्यावर अद्वैतचा तणाव वाढला. त्यातून दारूची सवय वाढली. ब-याचदा तो टाईट होऊन घरी यायला लागला. तमाशा करू लागला. सीमानं एकदोनदा त्याला प्रेमानं समजावून पाहिलं. अद्वैतने (शुद्धीत असताना) तिची माफीही मागितली. आणि पुन्हा असं करणार नाही, असं वचनही दिलं. पण कसचं काय!! बॉसने सगळ्या ऑफिससमोर अद्वैतची तासम्पट्टी करून त्याला दिलेलं प्रोजेक्ट त्याच्याकडून काढून घेऊन दुस-याला दिलं, आणि अद्वैतला आयतं निमित्तच मिळालं.
सीमा कधीची भुकेली अद्वैतची वाट पाहात बसली होती. तो फोनसुद्धा उचलत नव्हता. शेवटी साडे अकरा वाजता स्वारी झिंगत झिंगत आली. सीमाचा संयम सुटला; ती अद्वैतला ओरडायला लागली. दुपारीच ओरडा खाऊन आलेला अद्वैत अजून एक ओरडा खायला तयार नव्हता. त्याने सीमाला थोबाडीत ठेऊन दिली. सीमा रडत रडत न खाताच झोपायला गेली. पण अद्वैतला भूक लागली होती. तो सीमाला उठवायला लागला. सीमा "किचनमध्ये आहे सगळं तयार. तुझं तू घे वाढून खायला." अद्वैतला हे आवडलं नाही. सीमाला त्याने बदडून काढलं. आणि मग हे नित्याचं झालं. दोघांमध्ये भांडणं वाढली. सीमाने त्याच्याशी बोलणंच टाकलं. एकाच घरात दोघे अनोळख्यासारखे राहू लागले. घरच्यांना कळलं तर ते अद्वैतला पोलिसात देतील हे माहित होतं म्हणून सीमा माहेरी जात नव्हती. आठवड्यातून एखाद्-दोन रात्री मार खायचा, आणि आठवडाभर लागलेला मार आणि व्रण घालवत बसायचं, पुढच्या अशाच रात्रीची वाट बघत.
सुट्टीच्या दिवशी एकदा घरात बसलेलं असताना अद्वैतने सीमाचा सुजलेला चेहरा पाहिला आणि त्याला स्वतःचीच लाज वाटली. त्याने तिच्या पायाशी लोटांगण घातलं. माफी मागू लागला, आणि सीमानं आपला नवरा ताळ्यावर आला, यात आनंद मानून त्याला मोठ्या मनानं माफही केलं. दोघांमधले संबंध सुधारले. नातं पुन्हा बहरू लागलं, आणि रोमान्स वाढला. अद्वैत अजुनही दारू पित होताच, पण आता त्याचा स्वतःवर ताबा होता. तो आता आयुष्याच्या बाबतीत एकूण सुखी होता.
काही महिने असेच सुखात गेले. एकदा काही कारणास्तव ऑफिसमधल्या एका ओळखीच्या माणसाशी वाद झाला, तेव्हा प्रकरण हमरीतुमरीवर आलं. तो दुसरा माणूस शिव्या घालता घालता अद्वैतला षंढ म्हणाला. झालं, अद्वैतचं टाळकंच फिरलं. त्याने ऑफिसमध्येच त्याच्याशी राडा घालायला सुरुवात केली. बाकीच्यांनी अडवलं म्हणून ते प्रकरण तेवढ्यावरच थांबलं. पण अद्वैतचं समाधान झालं नव्हतं. रागाच्या भरात त्याने भरपूर दारू ढोसली. पाय आपटतच तो घरी आला. टणाट्टण बेल वाजवू लागला. सीमाला कळलं, आज अद्वैत पिऊन आलेला दिसतोय. पण आज तिला मार खायचा नव्हता. आज गप्प बसायचं तिने ठरवलं. तिने दरवाजा उघडला.
दार उघडल्या उघडल्या अद्वैतने तिला लाथ मारली. दरवाजा जोरात बंद केला. तिला तिथून फरफटवत नेत त्याने हॉलच्या मधल्या भागात आणलं, आणि पट्टा काढून तो तिला मारायला लागला. ती गयावया करु लागली, "अद्वैत, अद्वैत प्लीज मारू नकोस प्लीज मी हात जोडते माझं ऐकून घे अद्वैत प्लीज..." अद्वैतने तिचं अजिबात ऐकून घेतलं नाही. त्याच्या डोळ्यांत खुनशी भाव होते. "इथे मी जीवाचं रान करून, आटापिटा करून घर चालवतोय आणि ही वांझ माझ्या जीवावर घरात बसून ऐश करत्येय. तुझ्यामुळे, तुझ्यामुळे लोक आज मला इंपोटंट म्हणतायत भवाने तुझ्यामुळे!!" अद्वैत काहीच ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने रक्त निघेपर्यंत सीमाला बदडून काढलं. सीमा मूर्च्छित होऊन पडली. अद्वैत तरीही तिला मारतच राहिला. शेवटी थकला. त्याला भूक लागली होती.
"ए ऊठ, मला खायला दे!!" सीमा उठेना. ती निपचित रक्तबंबाळ होऊन जमिनीवर पडून होती. "अरेरे... चुकलो चुकलो... मार खाल्ल्यावर जेवण वाढता येत नाही ना महाराणीसाहेबांना... बरं... घेतो मी वाढून स्वतःचं स्वतः" असं म्हणून तो किचन मध्ये गेला. तिथले दिवे बंद होते. डायनिंग टेबल वर दोन मेणबत्त्या तेवत होत्या. शिवाय ओट्यावर, ट्रॉलीवर, जिथे मिळेल तिथे मेणबत्त्या लावलेल्या होत्या. "हा काय प्रकार आहे?" अद्वैतने दरडावून विचारलं. उत्तर आलं नाही. तो पुढे सरकला. त्याला टेबलवर एक ग्रीटींग कार्ड दिसलं. त्याने ते घेतलं. मेणबत्तीच्या प्रकाशात त्यानं ते वाचलं. आणि तो हादरला. त्याची सगळी दारू क्षणार्धात उतरली. त्याचा चेहरा पडला. तो धावत सीमाकडे गेला. तिला गदागदा हलवून उठवायला लागला. पण सीमा उठत नव्हती. ती अद्वैतला सोडून निघून गेली होती. आणि जाता जाता स्वतःच्या गर्भात वाढणा-या अद्वैतच्या अंशालासुद्धा घेऊन गेली होती.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
11249
प्रतिक्रिया
56
मिसळपाव
प्रतिक्रिया
आगाया...!
**
टिचला बिलोरी आयना भाउंच्या
कुठे इंद्राचा ऐरावत
In reply to टिचला बिलोरी आयना भाउंच्या by आनंद
काय डोक्याला तरास देताय राव.
+१
In reply to काय डोक्याला तरास देताय राव. by बॅटमॅन
काय चांगलं आहे राव ?
In reply to काय डोक्याला तरास देताय राव. by बॅटमॅन
हेच म्हणते. हा बुवा मारतो तर
In reply to काय चांगलं आहे राव ? by अग्निकोल्हा
सहमत. पुन्हा गल्ली चुक्लिका विचारायची सोय नाय
In reply to हेच म्हणते. हा बुवा मारतो तर by रेवती
बायकांच्या आडीयंस ला रडवायची
नाही हो. अशा कथा वाचून
In reply to बायकांच्या आडीयंस ला रडवायची by इष्टुर फाकडा
कथेला समर्पण नाव कसं वाटेल :)
In reply to नाही हो. अशा कथा वाचून by रेवती
खरंच ! ती पिढी कुबलबाई आपल्या
In reply to नाही हो. अशा कथा वाचून by रेवती
वडापाव,
In reply to खरंच ! ती पिढी कुबलबाई आपल्या by इष्टुर फाकडा
काय गडबड आहे हो? आँ?
In reply to वडापाव, by इष्टुर फाकडा
पाशवी अलर्ट
In reply to काय गडबड आहे हो? आँ? by पैसा
येवा येवा!
In reply to पाशवी अलर्ट by बॅटमॅन
हॅ हॅ हॅ
In reply to येवा येवा! by पैसा
पळतो का रे?
In reply to हॅ हॅ हॅ by सुहास..
हहपुवा
In reply to हॅ हॅ हॅ by सुहास..
तुम्ही नक्की तशीच कथा लिहिली
In reply to काय गडबड आहे हो? आँ? by पैसा
खर्या जगातल्या बायका
In reply to तुम्ही नक्की तशीच कथा लिहिली by इष्टुर फाकडा
ते अल्का बुकल छाप अश्रूपाती
In reply to खर्या जगातल्या बायका by पैसा
हाहाहा!
In reply to ते अल्का बुकल छाप अश्रूपाती by विश्वनाथ मेहेंदळे
मी हो काय केलं आता?
In reply to वडापाव, by इष्टुर फाकडा
दिलात न पैसातैंना प्रतिसाद !
In reply to मी हो काय केलं आता? by बॅटमॅन
ही हा हा हा
In reply to दिलात न पैसातैंना प्रतिसाद ! by इष्टुर फाकडा
करियर
हम, खुप सरळधोप झालीये...
हम, खुप सरळधोप झालाय प्रतिसाद
In reply to हम, खुप सरळधोप झालीये... by स्पा
छान प्रतिसादीक विडंबन आवडले
In reply to हम, खुप सरळधोप झालाय प्रतिसाद by अत्रुप्त आत्मा
चला...या निमित्तानी स्पांडु
In reply to छान प्रतिसादीक विडंबन आवडले by स्पा
कशी या त्यजू पदाला
ए कोण आहे रे तिकडे?
असो.
मग मचाक नसती का बनली
In reply to असो. by प्रभाकर पेठकर
ए मचाक म्हणजे काय असतं रे??
In reply to मग मचाक नसती का बनली by टवाळ कार्टा
खो खो खो, खी खी खी =))
In reply to ए मचाक म्हणजे काय असतं रे?? by जेनी...
(No subject)
In reply to खो खो खो, खी खी खी =)) by बॅटमॅन
मचाक म्हणजे...
In reply to ए मचाक म्हणजे काय असतं रे?? by जेनी...
मराठी चातुर्य कथा.
In reply to ए मचाक म्हणजे काय असतं रे?? by जेनी...
हायला
In reply to मराठी चातुर्य कथा. by प्यारे१
अरेरेरे, जीवनभौंच्या कथांना
वा!
असेल कदाचित!!
In reply to वा! by रामपुरी
वप्या, काय झालं रे तुझं ??
तो वपाडाव... हे वडापाव.. लय
In reply to वप्या, काय झालं रे तुझं ?? by अर्धवटराव
तरीच...
In reply to तो वपाडाव... हे वडापाव.. लय by विश्वनाथ मेहेंदळे
बाकी ते वप्या कुट मेलय आजकाल
In reply to तो वपाडाव... हे वडापाव.. लय by विश्वनाथ मेहेंदळे
कुठल्या शत्कात्ली कथायेहि
फिल्मी ..
नका लिहू असल काही. जर कुणी
कथा पूर्ण वाच(व)ली नाही.
सुंदर विनोदी कथा
शेवटची कलाटणी आवडली . पण कथा
फारच बाळबोध !