Skip to main content

दुष्ट योगायोग!!

लेखक वडापाव
शुक्रवार, 22/11/2013 या दिवशी प्रकाशित केले.
अद्वैत आणि सीमा एकाच कॉलेजात होते. दोघांत मैत्री होती. कॉलेज संपलं, आणि एकमेकांचा विरह सहन होईनासा झाला. दोघं पुन्हा त्यांच्या ग्रुपच्या नेहमीच्या कट्ट्यावर भेटायला लागले. हळूहळू जाणीवपूर्वक दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले. पाच-सहा वर्षं उलटली. सीमा करिअरिस्टिक मुलगी होती. हुशार आणि कर्तबगार होती. तिला कामात लगेच बढती मिळायला लागली. अद्वैतला खूप मेहनत घ्यावी लागली. खूप हालअपेष्टा सहन करून, खस्ता खाऊन त्यानं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. शेवटी त्याला चांगली नोकरी मिळाली. पण काम भरपूर होतं. प्रेशरही खूप. कॉलेजात गंमत म्हणून तुरळक वेळा ट्राय करणारा अद्वैत आता आठवड्यातून दोनदा तरी मोजके पेग घशाखाली ढकलायला लागला. अठ्ठावीसाव्या वर्षी दोघांचं लग्न लागलं. दोघांनी मिळून एक मस्त घरसुद्धा विकत घेतलं. नोकरीत दोघेही चांगले सेटल झाले होते. दोघांना प्रमोशन मिळालं. दोघांचा पगार वाढला. सीमाला फॉरेनला जायची संधीसुद्धा चालून आली. आणि आता अद्वैतने आक्षेप घेतला. "तीन वर्षं झाली लग्नाला... अजून मूल नाही आपल्याला एकही. घरचे सगळे मागे लागल्येत. तुझ्याही माहेरच्यांना नातवंडांशी खेळायचंय. मध्यंतरी आपण दोघंही रोज थकून जायचो. आता तसं नाहीये. माझ्या कामाचा भार आता हलका झालाय. आता ताण तणाव नसतो आधीसारखा. आता आपण ट्राय करायला हवं. अजुन उशीर करणं बरोबर नाही. आणि तू फॉरेनला कुठे निघालीस? नाही जायचं. दुस-या कुणाला तरी पाठवा म्हणावं." सीमाला धक्काच बसला. आपला नवरा आपल्यावर असा निर्बंध टाकेल असं तिला वाटलं नव्हतं. खरं तर त्याला विरोध करायची धमक तेव्हा तिच्यात होती, पण तिच्या माहेरची मंडळी, मित्रपरिवार, कोणालाच तिने परदेशी जाणं मान्य नव्हतं. त्यात सुरुवातीपासूनच नव-याचा विरोध म्हटल्यावर तिने आलेली संधी सोडली. दोघं आता मूल होण्यासाठी प्रयत्न करायला लागले. दोन वर्षं निघून गेली. मूल होईना. अद्वैतने सीमाच्या माहेरच्या माणसांना पाठीशी धरून तिला नोकरी सोडायला लावली. "घरची कामं, त्यात नोकरीचा व्याप तुला झेपत नाहीये. आपल्याला मूल हवंय. तुझी तब्येत कशी, ठणठणीत हवी. तू घरीच राहा... माझ्या पगारावर भागेल सगळं. आपलं सेव्हिंगसुद्धा तसं भरपूर आहे." सीमा पुन्हा गप्प बसली. तिलाही आता मूल हवंच होतं. घराची संपूर्ण आर्थिक जबाबदारी खांद्यावर आल्यावर अद्वैतचा तणाव वाढला. त्यातून दारूची सवय वाढली. ब-याचदा तो टाईट होऊन घरी यायला लागला. तमाशा करू लागला. सीमानं एकदोनदा त्याला प्रेमानं समजावून पाहिलं. अद्वैतने (शुद्धीत असताना) तिची माफीही मागितली. आणि पुन्हा असं करणार नाही, असं वचनही दिलं. पण कसचं काय!! बॉसने सगळ्या ऑफिससमोर अद्वैतची तासम्पट्टी करून त्याला दिलेलं प्रोजेक्ट त्याच्याकडून काढून घेऊन दुस-याला दिलं, आणि अद्वैतला आयतं निमित्तच मिळालं. सीमा कधीची भुकेली अद्वैतची वाट पाहात बसली होती. तो फोनसुद्धा उचलत नव्हता. शेवटी साडे अकरा वाजता स्वारी झिंगत झिंगत आली. सीमाचा संयम सुटला; ती अद्वैतला ओरडायला लागली. दुपारीच ओरडा खाऊन आलेला अद्वैत अजून एक ओरडा खायला तयार नव्हता. त्याने सीमाला थोबाडीत ठेऊन दिली. सीमा रडत रडत न खाताच झोपायला गेली. पण अद्वैतला भूक लागली होती. तो सीमाला उठवायला लागला. सीमा "किचनमध्ये आहे सगळं तयार. तुझं तू घे वाढून खायला." अद्वैतला हे आवडलं नाही. सीमाला त्याने बदडून काढलं. आणि मग हे नित्याचं झालं. दोघांमध्ये भांडणं वाढली. सीमाने त्याच्याशी बोलणंच टाकलं. एकाच घरात दोघे अनोळख्यासारखे राहू लागले. घरच्यांना कळलं तर ते अद्वैतला पोलिसात देतील हे माहित होतं म्हणून सीमा माहेरी जात नव्हती. आठवड्यातून एखाद्-दोन रात्री मार खायचा, आणि आठवडाभर लागलेला मार आणि व्रण घालवत बसायचं, पुढच्या अशाच रात्रीची वाट बघत. सुट्टीच्या दिवशी एकदा घरात बसलेलं असताना अद्वैतने सीमाचा सुजलेला चेहरा पाहिला आणि त्याला स्वतःचीच लाज वाटली. त्याने तिच्या पायाशी लोटांगण घातलं. माफी मागू लागला, आणि सीमानं आपला नवरा ताळ्यावर आला, यात आनंद मानून त्याला मोठ्या मनानं माफही केलं. दोघांमधले संबंध सुधारले. नातं पुन्हा बहरू लागलं, आणि रोमान्स वाढला. अद्वैत अजुनही दारू पित होताच, पण आता त्याचा स्वतःवर ताबा होता. तो आता आयुष्याच्या बाबतीत एकूण सुखी होता. काही महिने असेच सुखात गेले. एकदा काही कारणास्तव ऑफिसमधल्या एका ओळखीच्या माणसाशी वाद झाला, तेव्हा प्रकरण हमरीतुमरीवर आलं. तो दुसरा माणूस शिव्या घालता घालता अद्वैतला षंढ म्हणाला. झालं, अद्वैतचं टाळकंच फिरलं. त्याने ऑफिसमध्येच त्याच्याशी राडा घालायला सुरुवात केली. बाकीच्यांनी अडवलं म्हणून ते प्रकरण तेवढ्यावरच थांबलं. पण अद्वैतचं समाधान झालं नव्हतं. रागाच्या भरात त्याने भरपूर दारू ढोसली. पाय आपटतच तो घरी आला. टणाट्टण बेल वाजवू लागला. सीमाला कळलं, आज अद्वैत पिऊन आलेला दिसतोय. पण आज तिला मार खायचा नव्हता. आज गप्प बसायचं तिने ठरवलं. तिने दरवाजा उघडला. दार उघडल्या उघडल्या अद्वैतने तिला लाथ मारली. दरवाजा जोरात बंद केला. तिला तिथून फरफटवत नेत त्याने हॉलच्या मधल्या भागात आणलं, आणि पट्टा काढून तो तिला मारायला लागला. ती गयावया करु लागली, "अद्वैत, अद्वैत प्लीज मारू नकोस प्लीज मी हात जोडते माझं ऐकून घे अद्वैत प्लीज..." अद्वैतने तिचं अजिबात ऐकून घेतलं नाही. त्याच्या डोळ्यांत खुनशी भाव होते. "इथे मी जीवाचं रान करून, आटापिटा करून घर चालवतोय आणि ही वांझ माझ्या जीवावर घरात बसून ऐश करत्येय. तुझ्यामुळे, तुझ्यामुळे लोक आज मला इंपोटंट म्हणतायत भवाने तुझ्यामुळे!!" अद्वैत काहीच ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने रक्त निघेपर्यंत सीमाला बदडून काढलं. सीमा मूर्च्छित होऊन पडली. अद्वैत तरीही तिला मारतच राहिला. शेवटी थकला. त्याला भूक लागली होती. "ए ऊठ, मला खायला दे!!" सीमा उठेना. ती निपचित रक्तबंबाळ होऊन जमिनीवर पडून होती. "अरेरे... चुकलो चुकलो... मार खाल्ल्यावर जेवण वाढता येत नाही ना महाराणीसाहेबांना... बरं... घेतो मी वाढून स्वतःचं स्वतः" असं म्हणून तो किचन मध्ये गेला. तिथले दिवे बंद होते. डायनिंग टेबल वर दोन मेणबत्त्या तेवत होत्या. शिवाय ओट्यावर, ट्रॉलीवर, जिथे मिळेल तिथे मेणबत्त्या लावलेल्या होत्या. "हा काय प्रकार आहे?" अद्वैतने दरडावून विचारलं. उत्तर आलं नाही. तो पुढे सरकला. त्याला टेबलवर एक ग्रीटींग कार्ड दिसलं. त्याने ते घेतलं. मेणबत्तीच्या प्रकाशात त्यानं ते वाचलं. आणि तो हादरला. त्याची सगळी दारू क्षणार्धात उतरली. त्याचा चेहरा पडला. तो धावत सीमाकडे गेला. तिला गदागदा हलवून उठवायला लागला. पण सीमा उठत नव्हती. ती अद्वैतला सोडून निघून गेली होती. आणि जाता जाता स्वतःच्या गर्भात वाढणा-या अद्वैतच्या अंशालासुद्धा घेऊन गेली होती.
लेखनविषय:

वाचने 11249
प्रतिक्रिया 56

प्रतिक्रिया

शेक्स्पिअर नंतर आपणच....

शेवटची कलाटणी आवडली . बाकी , पॉपकॉर्न घ्या पॉपकॉर्न :-)

In reply to by बॅटमॅन

सगळ्या घटनात सगळी काशी फक्त पुरुष करतात लिहल क़ी झालं का पसंतीयुक्त ? स्त्रिया म्हणजे गायीच जणु

In reply to by अग्निकोल्हा

हेच म्हणते. हा बुवा मारतो तर बाईनं काय बांगड्या भरून बसायचं का फक्त, द्यायचे चार दणके! उगीच पुरुषांना वाईट्ट आणि बायकांना गरीब दाखवण्यात काय अर्थ आहे?

In reply to by रेवती

क्रिअर्च्या मोहात उस्गाव्ला जाण्यासाठी गुपचुप गर्भपात करताना दाखवले असते तर वास्तवाच्या जवळ जाणारी म्हटले तरी असते...

In reply to by इष्टुर फाकडा

नाही हो. अशा कथा वाचून रडणार्या बायकांची पिढी गेली असं वाटतय. इतक्यावेळा मार खाल्लाच कसा? हा प्रश्न आहे. एव्हाना पोलिसांकडे तक्रार नोंदवून, घर सोडून, जाताना चार दणके घालून बाईनं निघायला हवं होतं, सबब ष्टोरी आवडली नाही, पटली नाही.

In reply to by रेवती

खरंच ! ती पिढी कुबलबाई आपल्या कारकिर्दी बरोबर घेऊन गेल्या कधीच्या…हे असलं तेव्हाही पटत न्हवतं आणि आत्ता तर राग येतो. हल्ली बायका बेवड्या नवर्यांना भर रस्त्यात चपलेने बडवायला कमी करत नाहीत. तूनळीवर बरेच हिड्यू आहेत तसले :)

In reply to by इष्टुर फाकडा

फक्त पुरुष मारहाण करतो असं वाटतंय का तुम्हाला? मराठी कथालेखकांची "प्रेमकथा" वाचली नाही काय? ही कथा मी लिहिली असती तर सीमाने अद्वैतला पहिल्यांदा मारहाण केल्यावर वठणीवर आणलेला दाखवला असता! ;)

In reply to by पैसा

३ दिवस झाले, कोणाशी भांडण झालं नाह>>> हॅ हॅ हॅ , आणि आम्ही त्यावर विश्वास ठेवतो ;) o काडी सारत o ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ || नाही पुण्याची मोजणी, नाही गुंठाशी धरणी, जिथे भरे पाणी शरदिनी || ( पळणारी स्मायली )

In reply to by पैसा

तुम्ही नक्की तशीच कथा लिहिली असतीत याची खात्री आहे (आवडलीही असती). वपांना तुमचे बोल खाऊ लागू नयेत म्हणून म्हटले कि लपवून ठेवा ;)

In reply to by इष्टुर फाकडा

खर्‍या जगातल्या बायका कशा असतात माहित आहे? वासंती भाटकरसारख्या! ते अल्का बुकल छाप अश्रूपाती बायांचे दिवस आता लै बदललेत!

In reply to by पैसा

ते अल्का बुकल छाप अश्रूपाती बायांचे दिवस आता लै बदललेत!
सत्यमेव जयते चा बिग फॅट वेडिंग वाला भाग पाहिला होता का ???

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

मी सीरियल्स बघत नाही. पण माझं म्हणणं अजूनही कायम आहे. >>>ते अल्का बुकल छाप अश्रूपाती बायांचे दिवस आता लै बदललेत!>>> १००% बदल झालाय असं मी म्हटलेलं नाही. पण पूर्वीपेक्षा प्रमाण नक्कीच कमी आहे आणि या सगळ्याला विरोध करणार्‍या मुलींची संख्याही लक्षणीय आहे.

करियरवाल्या मुलीने पटटयाचा मार सहन केला?

ए कोण आहे रे तिकडे? या गोष्टीच्या लेखकाला ४९८अ लावा बरं जरा! (ह.घ्या)

दोघं आता मूल होण्यासाठी प्रयत्न करायला लागले.
ह्या वाक्याने कथेतला इंटरेस्ट वाढला होता. पण, कथानक फारच सात्विक आहे. >>>>सीमा करिअरिस्टिक मुलगी होती. हुशार आणि कर्तबगार होती. अरेच्या! मग कुठे गेली ती हुशारी आणि कर्तबगारी?

In reply to by प्यारे१

हायला बरं झालं आठवण करुन दिलीत ...लई दिवस मचाक वाचली नाहीये ... आता डाऊनलोडतो घरी जाऊन ;)

जीवनभौंची छाप आहे हो या तुमच्या लघुकथेवर...

In reply to by रामपुरी

जीवनभौंची छाप आहे हो या तुमच्या लघुकथेवर..
मला सुचली तशी मी लिहून काढली. बाकी सर्व प्रतिसादांतून कथेतल्या आणि माझ्या लेखनातल्या त्रुटी कळल्या. पुढच्या वेळी लिहीताना काळजी घेईन. प्रतिसादांबद्दल धन्यवाद. :)

वप्याचा आयडी हॅक झाला कि काय? नियमीत कथालेखन करणारे लांब राहिले, नित्य मिपावर येणारे वाचनमात्र तरी अशी कथा लिहीतील काय? व्हॉट्स राँग विथ यु ?

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

बाकी ते वप्या कुट मेलय आजकाल ?? वाजले वाटतं एकदाचं ( लग्न की बारा माहीत नाही ;) ) असो ...थोडे लेखाविषयी ... अरे वड्या ...अश्या कथा चेपुवर रोज ढिगाने येतात ....हे मिसळपाव आहे ...याचा मालक बिचारा सरकारी काम करून या तुला फु़कटात मिळणार्‍या लेखनकलेला धार मिळावी म्हणुन वेळ आणि पैसा खर्च करतो रे !! जरा कदर करत जा काय लिहीताय ते ...जरा ओरिजीनल, क्वॉलिटी लिहील्याने मुळव्याध होणार आहे का ? लिखाण खरच फालतु आणि बालिश आहे , ते मिपाकरांना तोंडावर बोलायची बंदी आहे म्हणून तुला मार्गदर्शन करत आहेत ( मी जरा युनिक आयडी मध्ये मोडतो.) .. बाकी ह्याच अनुषंगाने सर्वांनाच विनंतीवजा धमकी ... ( बाकी आमच्या विषयी , उपप्रतिसाद द्यायच्या आधी, विचारून घेणे .) धन्यवाद !

नका लिहू असल काही. जर कुणी निर्दयी असेल. दुसर्‍याला हानी पोहोचवणारा असेल तर त्याला तसच उत्तर देणारी कथा लिहा. वाचुन वाचुन फरक पडतो. या असल्या कथेचा पुढचा भाग मग नायकाने डोळे पुसले अन बारा दिवस झाल्याबरोबर दुसर्‍या लग्नाचा बार उडवला असा असू शकतो.

शेवटची कलाटणी आवडली . पण कथा अजिबात पटली नाही . एक तर ती आजच्या काळातली नहि. आणि त्यात घडली असेल तर कोणा अडाणी बाई च्या बाबतीत जिला कोणाचाच आधार नाही म्हणून नवर्याचा माजुरडे पणा सहन करतीये अश्या बाई च्या बाबतीत घडलेली सांगितली असती तर पटली अस्ति.

फारच बाळबोध ! शेवट तर अगदी अपेक्षित ! छ्या: संसारा उध्वस्त करी दारु | म्हणुन संसार नका करु ||