अरूप
अरूप उमजोनी जाय,
दाविते पंथ गुरुमाय,
अज्ञान विलया जाय,
तत्काले...
जन्मोजन्मीच्या ग्रंथी,
पाडिती जीवा गुंथी,
गुरुस्पर्शे निघे पंथी,
मुक्तीचिया...
सर्व स्थळी सर्व देही,
एकतत्व निश्चये पाही,
नित्यानुसंधानी राही,
आत्ममग्न...
फिटता भ्रमजाल,
जेथे तेथे पाहाल,
एकत्व अनुभवाल,
चित्शक्तीचे...
- सागरलहरी -
२३.११.२०१३
छान , प्रसन्न काव्य . आवडलं
+१
सुरेख.
+१
होय ग्रन्थी = गाठ
खूप छान
खूप छान!
छान.....
छम्न.
धन्यवाद
अतिशय
सुरेख!