Skip to main content

अरूप

लेखक सागरलहरी यांनी शनिवार, 23/11/2013 09:40 या दिवशी प्रकाशित केले.
अरूप उमजोनी जाय, दाविते पंथ गुरुमाय, अज्ञान विलया जाय, तत्काले... जन्मोजन्मीच्या ग्रंथी, पाडिती जीवा गुंथी, गुरुस्पर्शे निघे पंथी, मुक्तीचिया... सर्व स्थळी सर्व देही, एकतत्व निश्चये पाही, नित्यानुसंधानी राही, आत्ममग्न... फिटता भ्रमजाल, जेथे तेथे पाहाल, एकत्व अनुभवाल, चित्शक्तीचे... - सागरलहरी - २३.११.२०१३
लेखनविषय:

वाचने 2975
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

सुरेख.
जन्मोजन्मीच्या ग्रंथी, पाडिती जीवा गुंथी, गुरुस्पर्शे निघे पंथी, मुक्तीचिया...
सुंदर..

In reply to by यशोधरा

छानच! (ग्रंथी म्हणजे गाठी ना?)

आपणा सर्वाना मनापासुन धन्यवाद

अतिशय सुंदर __/\__!!