Skip to main content

भास...आभास.... कि अमानवीय !!! भाग - १

लेखक गजानन५९
गुरुवार, 21/11/2013 या दिवशी प्रकाशित केले.
भास...आभास.... कि अमानवीय !!! भाग - १ खरे तर हा विषय थोडा ट्रिकी आहे कारण या विषयाव तीन गट पडतात एक जो अशा गोष्टींवर विश्वास आहे असा दुसरा ज्यांचा अशा गोष्टींवर विश्वास नाही ते आणि तिसरा गट तळ्यात मळ्यात असतो या लोकांना कळतच नसते कि नक्की आपण कुठे उभे आहोत असे. हा विषय इथे मांडायचे कारण हेच आहे कि गेले काही दिवस माझा या गोष्टींवरचा विश्वास दृढ होईल अशा काही घटना माझ्या आयुष्यात घडत आहेत. सर्वात आधी हे स्पष्ट करू इच्छितो कि सध्यातरी माझा सुष्ट-दुष्ट अथवा प्लस-मायनस उर्जा या जगात असते या गोष्टीवर विश्वास आहे. जसे कि जगात जिथे प्लस उर्जा आहे तिथे मायनस उर्जेला नाकारायचे काही कारणच नाहीये (असे आपले मला वाटते) कारण जगात बरयाच गोष्टी अशा आहेत कि ज्यांची उत्तरे ना विज्ञान देऊ शकले आहे आजवर ना हि कुणी त्याचे सुसंगत असे स्पष्टीकरण देऊ शकले आहे. जगात सुष्ट आणि दुष्ट यामध्ये पूर्वीपासून संघर्ष चालू आहे, मला असे वाटते कि या दोहोंमधील जी रेषा आहे ती काहीशी पुसट आहे म्हणजे असे कि बऱ्याचदा असे होते कि काही विचित्र अशा संवेदना आपल्याला जाणवतात पण काही वेळा आपण त्याकडे दुर्लक्ष्य करतो अथवा आपण त्याला भास समजतो काही जण तर असे असतात कि इतर लोक काय म्हणतील अथवा आपले हसे होईल म्हणून अशा गोष्टी इतरांना सांगायचे टाळतात. त्याउलट रात्री बर्याचदा काळोखामुळे सावल्यांच्या खेळाला आपण वेगळेच अमानवीय असे काहीतरी समजून बसतो. आत्म्याचा प्रवास कुणालाच उलगडून सांगता आला नाहीये, माणसाचे मृत्युनंतरचे जीवन अथवा आपण असे म्हणू कि त्याचे मृत्युनंतर नक्की काय होते हेही कुणाला सांगता आलेले नाहीये, मग बरेच जण आपल्या कल्पनेचे वारू सैल सोडतात आणि बऱ्याचदा अशा गंभीर विषयाचा विचका होतो. मी अशा काही ठिकाणी फिरलेलो आहे कि जिथे टळटळीत दुपारीसुद्धा हात पाय थंड पडतात. अशा ठिकाणी तुम्ही रात्रीचे जावा नाहीतर दुपारचे काही फरक नाही पडत पण पूर्वापारपासून आपण अंधाराचा आणि अमानवीय गोष्टींचा ओढून ताणून संबंध लावायला पाहत असतो कारण सरळ आहे अंधारात कुणी काय पाहिले हे कोणी विचारायला जात नाही मग त्याची शहानिशा करणे तर दूरची बात. आजही काही जागा अशा आहेत कि जिथे गेले कि माणसाला अस्वस्थ वाटायला लागते, कधी एकदा इथून बाहेर पडतोय असे होते, नाहीतर कुणीतरी आपल्यावर सतत नजर ठेवून आहे असाही फील येतो अशा ठिकाणी. खरे तर तुम्ही सगळे विचार करत असाल कि हा काय डोक्यावर पडला आहे का नक्की काय म्हणायचे आहे याला ? खरे तर मला जे म्हणायचे आहे ते म्हटले तर साधे सरळ आहे आणि म्हटले तर थोडे विचित्र कारण मला माझ्या आयुष्यात घडलेल्या अशाच विचित्र गोष्टींचा संदर्भ द्यायचा आहे इथे आणि ती गोष्ट तुम्हाला खरी वाटावी, पटावी म्हणून हे सारे अवांतर लिहिले गेले आहे. बाकी तुमचे काय मत आहे ते हि जाणून घ्यायला आवडेल मला कारण जसजशी माझी गोष्ट पुढे जाईल तसतसे तुम्हाला आणि मला सुद्धा काही गोष्टींचा उलगडा होऊ शकतो. माझे म्हणणे इतकेच आहे कि मी जसा माझा सत्यानुभव तुम्हाला सांगणार आहे त्याच प्रकारे तुमच्याकडून पण मला ते ऐकायचे आहेत, मात्र अट एकच आहे हे अनुभव प्रामाणिक असावेत, त्यात अतिरंजितपणा नसावा हीच विनंती आहे, तसेच कुण्या लांबच्या मित्राचे अनुभव इथे देऊ नका, तुम्हाला स्वतः ला आलेले अथवा जवळच्या व्यक्तीला आलेले अनुभव टाकले तर जास्ती चांगले. असो यावरच्या पुढील भागात माझे काही अनुभव मी तुमच्याशी शेयर करणार आहे ते अनुभव म्हणजे एका विचित्र घटनांची साखळी आहे जिच्या काही कड्या कुठे जोडल्या आहेत ते ना मला माहित आहे ना बाकी कुणाला, तसेच या सर्व घटना मती गुंग करून सोडणाऱ्या आहेत. सरधोपट गूढ कथांसारखा याचा शेवट नाहीये रादर या घटनांना शेवटच नाहीये सध्यातरी कारण अजून याचा शेवट बाकी आहे याचे स्पष्ट संकेत मला मिळत आहेत. त्या कड्या शोधायचा माझा प्रयत्न मात्र मी सोडणार नाही आणि त्या जुळणाऱ्या कड्या तुमच्यासमोर ठेवायचे काम सुद्धा मी सोडणार नाही. सध्या इतकेच बोलून तुम्हा सर्वांचा निरोप घेतो.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 8768
प्रतिक्रिया 41

प्रतिक्रिया

पहात आहे पु भा प्र

@आत्म्याचा प्रवास कुणालाच उलगडून सांगता आला नाहीये,>>> आं............. :-/ माझा प्रवास अजुन चालू(च) आहे! http://www.sherv.net/cm/emoticons/horror/sad-ghost-smiley-emoticon.gif

In reply to by अत्रुप्त आत्मा

अतृप्त...सॉरी 'अत्रुप्त आत्म्याचा वैकुंठास प्रवास' यावर एक प्रवासवर्णन लिहा. =))

In reply to by अत्रुप्त आत्मा

माझा प्रवास अजुन चालू(च) आहे!
हो, हो, अगदी खरं ! आत्मुस तुझा प्रवास चांगलाच 'चालू' आहे हो !

ठीक आहे

In reply to by हरवलेला

आशा करतो कि माझ्या प्रतिसादानंतर तरी तुम्हाला माझ्यातील तळमळ जाणवेल :(

गजानन 59, तुमची आधिची कथा थरार चा दुसरा भाग का नाही टाकला ? ति आणी ही दोन्ही कथेचे वातावरण एकच दिसतय .

In reply to by जेपी

तथास्तुजी बरोबर आहे तुमचे पण पाहिजे तसे सुचतच नाहीये ( अर्धा भाग तयार आहे पण...) त्यामुळे जेव्हा सुचेल तेव्हा टाकेल नक्की. बाकी आत्ता जे मी लिहिणार आहे ती कथा नाहीये त्यातील बरेचसे खरे आहे पण मी वर बोलल्याप्रमाणे त्यामागे नक्की काय कारण आहे हेच मला जाणून घ्यायचे आहे खूप विचार करूनच हा धागा इथे चालू केला आहे ( गेल्या दीड वर्षात २ जवळच्या व्यक्ती मला सोडून गेल्या आहेत) त्यामुळे हा धागा माझ्यासाठी फ़क़्त एखादे समोरच्याचे मनोरंजन करायचे साधन नाहीये उलट काही गोष्टींचा उलगडा मला होऊ शकतो ( जर माझ्या डोक्यात मी काही खुळचट गोष्टी भरून घेतल्या असतील तर)

लवकर लेख येऊ द्या. इथे प्रतिसाद न देता लेखच टाकावा. वाट पाहत आहे.

गजानन५९ साहेब, तुमच्या लेखाच्या प्रतिक्षेत आहे. नक्की तुमचे अनुभव लवकर येऊ द्यात. त्रयस्थ व्यक्तिने ते अनुभव वाचले तर ते तुमच्या अनुभवांची कारण मिमांसा अतिशय अचुकपणे करु शकतील. व उपाय सांगु शकतील.

नक्की निश, तुम्हाला एक संगी इच्छितो खरे तर मी काही लेखक नाहीये त्यामुळे अनुभव शब्दबद्ध करताना खूप अडचणी येत आहेत आणि बराच वेळही लागत आहे ( माझा तोच प्रोब्लेम आहे मनात जे असते ते नेमकेपणे उतरवणे कधी जमलेच नाहीये मला ) तरीही लवकरच पुढील भाग टाकू शकेन असे सध्यातरी वाटत आहे,

गजानन५९ साहेब, जे मनात असेल तेच लिहायच असेल तर आधी जे मनात आहे ते लिहायची वेळ यायच्या आधी जे मनात आहे ते तुम्ही ऐका कागदावर संक्षिप्त स्वरुपात लिहा. म्हंजे थोडक्यात मुद्दे काढा व जेव्हा तुमच मन आनंदी असेल व लिहावस वाटत असेल तेव्हा त्या मुद्दांच सविस्तर लेखात विस्तारीकरण करा.

शेअर करायला माझ्याकडे फार गोष्टी आहेत, पण वर तुम्ही दिलेले कारणच ..लोक वेड्यात काढतील. येउ दे लिखाण! वाचुन पाहू.

In reply to by गजानन५९

अनुभव लिहुन टाकाच त्याशिवाय मनाची तगमग कमी होणार नाही,लोक हसतील याचा विचार करु नका,मन मोकळे झाल्याने कदाचीत शान्तता मिळेल मनाला असे वाटते.

In reply to by अनिरुद्ध प

+१ काय असेल ते लिहून मोकळे व्हा! 'नंतर' भटकत राहील ना त्या अतृप्त आत्मा सारखा तुमचा आत्मा पण! - लायटर (हलका नि पेटवणारा पण ) मोड

In reply to by प्यारे१

@त्या अतृप्त आत्मा सारखा तुमचा आत्मा पण!>>> णिसेध...! http://www.freesmileys.org/smileys/smiley-fc/diablo.gif आमची संख्या वाढली तर वाढू दे की! :-/ ================= आमचे जग:::::आमचे राज्य http://www.freesmileys.org/smileys/smiley-stargate007.gif

In reply to by अत्रुप्त आत्मा

च्यायला ह्या आत्म्याला तर काही कळतच नाही. अरे त्यांनी लिहू दे का नको???????? का न लिहीताच.......????? प्रोस्ताहन म्हणतात त्याला प्रोस्ताहन. (येसवायजी तो शब्द बरोबरच लिहीलाय. ;) तुमच्यासाठी काय पण! ) समजलं?

नक्कीच आपण विवंचना करत असणार. कोणीही प्रिय व्यक्ती अकस्मात असे नाहीशी होणे मनाला मोठा धक्का देऊन जाते. दुःख, नैराश्य, अस्थिरता , भीती, क्वचित प्रसंगीआपण काही करू शकलो असतो काय असा अपराधी पणाची विचीत्र टोचणी निर्माण करणारा अनुभव व् टाळता न आलेल्या क्लेशदायक घटनेने निर्माण होणारे प्रश्न...प्रश्न अन फक्त अनुत्तरित प्रश्न व्यक्त करण्यात कसलाही संकोच नको.

तुम्ही निवांत लिहा हो, आम्ही गंभीरपणे वाचू. विज्ञानवादी असल्यानेच अगदी ओपन माईंड ठेवून वाचू. कारण ह्या जगांत अनेक अतर्क्य गोष्टी आहेत यावार माझाही विश्वास आहे. इथे थोडीफार चेष्टा होईलही, पण मनावर घेऊ नका. इथली मंडळी तशी चांगली आहेत. - (अनुभवी सदस्य) तिमा उर्फ तिरशिंगराव माणूसघाणे

चेष्टेला किंवा गमतीला मी नाही घाबरत हो मालक, पण साला वाईट इतकेच वाटते कि मिपावरील सदस्यांना (सरसकट बोलत नाहीये मी) गंभीर विषयसुद्धा चेष्टेवारी घ्यायचे कारण मात्र मला समजले नाही कारण मी वरती २/३ दा विनंती सुद्धा केली कि मंडळी मला इथे गंभीरपणे काही गोष्टी मांडायच्या आहेत वाटल्यास त्या मांडल्यानंतर माझी खिल्ली उडवली असती तरी चालले असते पण विषय पूर्ण व्हायच्या आधी इतका गोंधळ आणि इतका बालिश पणा? हे म्हणजे खूप अति झाले हो मंडळी. असो बाकी कुणी कुणाला काय प्रतिसाद द्यावा ह्यावर कुणाचे बंधन नाही हे मलाही मान्य आहे पण ज्या सदस्यां विषयी मनात आदर होता त्यांनी पण असे वागावे ह्या उपर दुखं ते काय. आता इथे मी माझे अनुभव मांडले काय अन नाही काय काही फरक पडणार नाहीये आणि हे मी मनात कुठलाहि कटूपणा न ठेवता बोलत आहे.

In reply to by गजानन५९

सहमत आहे. अहो इतकेच काय, प्रामाणिक मत व्यक्त केले तरी चांभारचौकशा करून पगार काढणारे दांभिक लोकही याच मिपावर आहेत. इतरवेळी मारे आध्यात्मिक डोस पाजतात, पण वेळ आली की पितळ उघडे पडते.

In reply to by गजानन५९

माझं नाव लिहीलंय म्हणून. मी माझा पहिला प्रतिसाद काय लिहीलाय ते वाचता का एकदा? इथे प्रतिसाद न देत बसता तुम्ही तुमचे अनुभव टाका. वाट पाहत आहे. असं लिहीलेलं. त्याचं काय झालं? तुम्ही लेख लिहा की. लोकांना आवडेल तरी नाहीतर नाही आवडणार तरी. तुम्ही लेख न लिहीता आम्ही वाट पाहत बसावी अशी अपेक्षा असेल तर आम्ही 'अशा' प्रकारे वाट बघत बसलोय.

इथे प्रतिसाद न देत बसता तुम्ही तुमचे अनुभव टाका >>>>>>>>>>>>>>>> @ प्यारे जी इथे प्रतिसाद द्यायचा कि नाही द्यायचा हे मला ठरवू द्या हि विनंती आहे तुम्हाला तुम्ही लेख लिहा की. लोकांना आवडेल तरी नाहीतर नाही आवडणार तरी. तुम्ही लेख न लिहीता आम्ही वाट पाहत बसावी अशी अपेक्षा असेल तर आम्ही 'अशा' प्रकारे वाट बघत बसलोय. >>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> मला वाटते कि मी वरती कंसात जे लिहिले ते तुम्हाला दिसले नसावे अथवा दिसून न दिसल्य्प्रमाणे करीत आहात मी वर स्पष्ट लिहिले आहे कि मी हे विधान सरसकट नाही केलेले ज्याला लागायचे त्याला लागेल कि मामा तुम्ही का त्रागा करून राह्यलाय ? आणि मी आधीच स्पष्ट केले आहे कि मी काही लेखक नाहीये मी इथे फ़क़्त काही गोष्टी सांगला आलो आहे तुम्हाला आणि त्या तुम्ही कशा ऐकता ते तुम्हालाच माहित चांगले नाही का ? आणि तुम्ही कशी का वात बघाना मला काही त्याचे सोयरे सुटक नाहीये बाकी इतका प्रतिसाद बास आहे तुम्हाला नाही का ?

In reply to by गजानन५९

कन्फ्युजन कन्फ्युजन! तुम्ही माझं नाव घेतलं ना दादा? म्हणून मी बोललो. इथे कालापव्यय न करता लेख शांतपणे लिहावा असं म्हणायचं होतं. बाकी आपली मर्जी. लेख चांगला वाटला तर प्रतिसाद मिळेलच. बाकी चालू द्या.

नाही हो प्यारेजी मिपावर आत्ता जरी मी दिसत असलो तरी खूप दिवसांपासून मी मिपावरील उत्तम लेख, साहित्य वाचत आलो आहे (उदा- स्पा/ इस्पिक एक्काजी/ जयंत सर/ आत्माजी यांचा करंट मिसळ लेखाचा तर मी पंखा आहे/ गवी दादा असे बरेच आहेत ज्यांचे लेख मनाला आनंद देत आले आहेत, आणि येथील चर्चे मधून ( म्हणजे मिपाव्कारांच्या ) इथल्या खेळकर वातावरणाचा अंदाज पण आहे मला पण मनस्थिती ठीक नाहीये म्हणून २/४ उणे शब्द बाहेर पडले बाकी तुम्ही मनात काही ठेवू नका मी पण नाही ठेवत. बाकी तुमचे हि चालू द्या ( खरा मिपावकर होत आहे मी पण बहुतेक साला )

तुमचे अनुभव असतील तर तसे स्पष्ट सांगा म्हणजे मस्करी होणार नाही आणि शक्य असेल तर निदान भावनिक आधाराची मदत तरी कोणी करू शकेल. तुमच्या प्रतिसादांवरून तुमची मनस्थिती ठीक नाही असे वाटले. जवळच्या माणसाच्या जाण्याने माणूस सैरभैर होतोच. त्रास होणार असेल तर जरा थांबून लिहा पण मनातलं मनात कोंडून ठेवू नका.

आत्म्याचा प्रवास कुणालाच उलगडून सांगता आला नाहीये, माणसाचे मृत्युनंतरचे जीवन अथवा आपण असे म्हणू कि त्याचे मृत्युनंतर नक्की काय होते हेही कुणाला सांगता आलेले नाहीये, मग बरेच जण आपल्या कल्पनेचे वारू सैल सोडतात आणि बऱ्याचदा अशा गंभीर विषयाचा विचका होतो.
काही अंशी हे बरोबर अहे. प्रत्यक्ष अनुभव नसताना किवा कशाची माहिती नसताना कल्पना करून , ह्याच्या त्याच्या सांगण्यावरून हे लोक मनोरंजनात्मक काहीतरी लिहितत. परंतु हिराभाई ठक्कर याचं 'मृत्युनंतरचे जीवन' ह्यात लिहिलेल्या गोष्टी खर्या वाटल्या. परमहंस योगानंद च 'योगी कथामृत ' ह्या पुस्तकात युक्तेश्वर जी पार्थिव देहाचा त्याग केल्यावर पुन्हा येतात आणि मृत्युनंतरच्या प्रवासाचं वर्णन करतात . देवी भागवत , एकनाथी भागवत मध्ये मृत्युनंतरच्या जिवनाच वर्णन अहे. दिल्लीहून प्रकाशित होणार्या 'कल्याण ' नावाच्या मासिकात उच्च कोटीच्या साधकांनी त्यांचे अनुभव लिहिले आहेत हि सगळी पुस्तके काल्पनिक गोष्टींवर आधारलेली नहित. त्यामुळे माझा ह्या गोष्टींवर पूर्ण विश्वास अहे. आपण जरूर पुढचा लेख लिहा . अजूनही प्रतिक्रिया द्यायची आहे पण पुढचा लेख वाचल्यावर देईल . अनिरुद्ध प च्या मताशी सहमत

म्हैसराव वाईस दम धरा टाकणारच हाये