भास...आभास.... कि अमानवीय !!!
भाग - १
खरे तर हा विषय थोडा ट्रिकी आहे कारण या विषयाव तीन गट पडतात एक जो अशा गोष्टींवर विश्वास आहे असा दुसरा ज्यांचा अशा गोष्टींवर विश्वास नाही ते आणि तिसरा गट तळ्यात मळ्यात असतो या लोकांना कळतच नसते कि नक्की आपण कुठे उभे आहोत असे.
हा विषय इथे मांडायचे कारण हेच आहे कि गेले काही दिवस माझा या गोष्टींवरचा विश्वास दृढ होईल अशा काही घटना माझ्या आयुष्यात घडत आहेत. सर्वात आधी हे स्पष्ट करू इच्छितो कि सध्यातरी माझा सुष्ट-दुष्ट अथवा प्लस-मायनस उर्जा या जगात असते या गोष्टीवर विश्वास आहे. जसे कि जगात जिथे प्लस उर्जा आहे तिथे मायनस उर्जेला नाकारायचे काही कारणच नाहीये (असे आपले मला वाटते) कारण जगात बरयाच गोष्टी अशा आहेत कि ज्यांची उत्तरे ना विज्ञान देऊ शकले आहे आजवर ना हि कुणी त्याचे सुसंगत असे स्पष्टीकरण देऊ शकले आहे.
जगात सुष्ट आणि दुष्ट यामध्ये पूर्वीपासून संघर्ष चालू आहे, मला असे वाटते कि या दोहोंमधील जी रेषा आहे ती काहीशी पुसट आहे म्हणजे असे कि बऱ्याचदा असे होते कि काही विचित्र अशा संवेदना आपल्याला जाणवतात पण काही वेळा आपण त्याकडे दुर्लक्ष्य करतो अथवा आपण त्याला भास समजतो काही जण तर असे असतात कि इतर लोक काय म्हणतील अथवा आपले हसे होईल म्हणून अशा गोष्टी इतरांना सांगायचे टाळतात. त्याउलट रात्री बर्याचदा काळोखामुळे सावल्यांच्या खेळाला आपण वेगळेच अमानवीय असे काहीतरी समजून बसतो.
आत्म्याचा प्रवास कुणालाच उलगडून सांगता आला नाहीये, माणसाचे मृत्युनंतरचे जीवन अथवा आपण असे म्हणू कि त्याचे मृत्युनंतर नक्की काय होते हेही कुणाला सांगता आलेले नाहीये, मग बरेच जण आपल्या कल्पनेचे वारू सैल सोडतात आणि बऱ्याचदा अशा गंभीर विषयाचा विचका होतो.
मी अशा काही ठिकाणी फिरलेलो आहे कि जिथे टळटळीत दुपारीसुद्धा हात पाय थंड पडतात. अशा ठिकाणी तुम्ही रात्रीचे जावा नाहीतर दुपारचे काही फरक नाही पडत पण पूर्वापारपासून आपण अंधाराचा आणि अमानवीय गोष्टींचा ओढून ताणून संबंध लावायला पाहत असतो कारण सरळ आहे अंधारात कुणी काय पाहिले हे कोणी विचारायला जात नाही मग त्याची शहानिशा करणे तर दूरची बात.
आजही काही जागा अशा आहेत कि जिथे गेले कि माणसाला अस्वस्थ वाटायला लागते, कधी एकदा इथून बाहेर पडतोय असे होते, नाहीतर कुणीतरी आपल्यावर सतत नजर ठेवून आहे असाही फील येतो अशा ठिकाणी.
खरे तर तुम्ही सगळे विचार करत असाल कि हा काय डोक्यावर पडला आहे का नक्की काय म्हणायचे आहे याला ? खरे तर मला जे म्हणायचे आहे ते म्हटले तर साधे सरळ आहे आणि म्हटले तर थोडे विचित्र कारण मला माझ्या आयुष्यात घडलेल्या अशाच विचित्र गोष्टींचा संदर्भ द्यायचा आहे इथे आणि ती गोष्ट तुम्हाला खरी वाटावी, पटावी म्हणून हे सारे अवांतर लिहिले गेले आहे.
बाकी तुमचे काय मत आहे ते हि जाणून घ्यायला आवडेल मला कारण जसजशी माझी गोष्ट पुढे जाईल तसतसे तुम्हाला आणि मला सुद्धा काही गोष्टींचा उलगडा होऊ शकतो.
माझे म्हणणे इतकेच आहे कि मी जसा माझा सत्यानुभव तुम्हाला सांगणार आहे त्याच प्रकारे तुमच्याकडून पण मला ते ऐकायचे आहेत, मात्र अट एकच आहे हे अनुभव प्रामाणिक असावेत, त्यात अतिरंजितपणा नसावा हीच विनंती आहे, तसेच कुण्या लांबच्या मित्राचे अनुभव इथे देऊ नका, तुम्हाला स्वतः ला आलेले अथवा जवळच्या व्यक्तीला आलेले अनुभव टाकले तर जास्ती चांगले.
असो यावरच्या पुढील भागात माझे काही अनुभव मी तुमच्याशी शेयर करणार आहे ते अनुभव म्हणजे एका विचित्र घटनांची साखळी आहे जिच्या काही कड्या कुठे जोडल्या आहेत ते ना मला माहित आहे ना बाकी कुणाला, तसेच या सर्व घटना मती गुंग करून सोडणाऱ्या आहेत. सरधोपट गूढ कथांसारखा याचा शेवट नाहीये रादर या घटनांना शेवटच नाहीये सध्यातरी कारण अजून याचा शेवट बाकी आहे याचे स्पष्ट संकेत मला मिळत आहेत. त्या कड्या शोधायचा माझा प्रयत्न मात्र मी सोडणार नाही आणि त्या जुळणाऱ्या कड्या तुमच्यासमोर ठेवायचे काम सुद्धा मी सोडणार नाही.
सध्या इतकेच बोलून तुम्हा सर्वांचा निरोप घेतो.
वाचने
8768
प्रतिक्रिया
41
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाचत आहे
वाट
@आत्म्याचा प्रवास कुणालाच
१ नंबर
In reply to @आत्म्याचा प्रवास कुणालाच by अत्रुप्त आत्मा
'अत्रुप्त आत्म्याचा वैकुंठास प्रवास'
In reply to @आत्म्याचा प्रवास कुणालाच by अत्रुप्त आत्मा
आत्माजी
In reply to @आत्म्याचा प्रवास कुणालाच by अत्रुप्त आत्मा
माझा प्रवास अजुन चालू(च) आहे!
In reply to @आत्म्याचा प्रवास कुणालाच by अत्रुप्त आत्मा
@आत्मुस तुझा प्रवास चांगलाच
In reply to माझा प्रवास अजुन चालू(च) आहे! by सस्नेह
बर
हरवलेला
In reply to बर by हरवलेला
गजानन 59,
तथास्तुजी
In reply to गजानन 59, by जेपी
लवकर लेख येऊ द्या.
गजानन५९ साहेब, तुमच्या लेखाच्या प्रतिक्षेत आहे.
@ निश
गजानन५९ साहेब, जे मनात असेल तेच लिहायच असेल तर...
गजानन दादा, हे असं खरंच असतं
चहापेक्षा किटलीच गरम आहे...
शेअर करायला माझ्याकडे फार
हम्म बरे झाले मी थेट अनुभव
अहो
In reply to हम्म बरे झाले मी थेट अनुभव by गजानन५९
+१
In reply to अहो by अनिरुद्ध प
@त्या अतृप्त आत्मा सारखा
In reply to +१ by प्यारे१
च्यायला ह्या आत्म्याला तर
In reply to @त्या अतृप्त आत्मा सारखा by अत्रुप्त आत्मा
दिड वर्षात दोघे मृत्युमुखी ?
तुम्ही
>>>इथली मंडळी तशी चांगली आहेत
In reply to तुम्ही by तिमा
तशी चांगली आहेत, पण काही
In reply to >>>इथली मंडळी तशी चांगली आहेत by प्यारे१
येउद्या
@ तिमा/ बॅटमॅन/ प्यारे१/ अत्रुप्त आत्मा
सहमत आहे. अहो इतकेच काय,
In reply to @ तिमा/ बॅटमॅन/ प्यारे१/ अत्रुप्त आत्मा by गजानन५९
माझं नाव लिहीलंय म्हणून.
In reply to @ तिमा/ बॅटमॅन/ प्यारे१/ अत्रुप्त आत्मा by गजानन५९
@ प्यारे जी
कन्फ्युजन कन्फ्युजन!
In reply to @ प्यारे जी by गजानन५९
@ प्यारे जी
लिखाण आवडले
आत्म्याचा प्रवास कुणालाच
धन्यवाद ज्योतीताई!!!
गजानन महाराज कधी टाकताय लेख?
म्हैसराव
एक कथाकल्पना नुकतीच माझ्या ही