Skip to main content

आनंद - कार्लसन डाव ७

लेखक चतुरंग यांनी सोमवार, 18/11/2013 15:00 या दिवशी प्रकाशित केले.
४-२ गुणांनी मागे पडलेल्या आनंदसाठी अत्यंत कळीचा डाव! आज त्याला जिंकायलाच हवे. ड्रॉ होणारा प्रत्येक डाव कार्लसनला विजयाच्या जवळ नेतोय अर्ध्या गुणानी. कोणते ओपनिंग? कोणती स्ट्रॅटॅजी? २० कोटी लोक जगभरातून हा गेम फॉलो करताहेत. कदाचित क्रिकेट्पेक्षा जास्त प्रसिद्धी मिळाली आहे! चला गेम बघूयात.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 20777
प्रतिक्रिया 109

प्रतिक्रिया

डी ४ ने घोदा आणि वजीर एकत्र हल्ला का नाही केला आधी? गुप्ता भाऊ डी४ आउट ओफ क्वेस्चन आ म्हनाला?

आणि मग घोडा डी४ असे खेळया येईल आणि ड्रॉ झाला!!!!

तो मानसिक दृष्ट्या खचलेला वाटतोय. किंवा त्याला असे वाटत असावे की आत्ता बरोबरी तरी जमयेत का ते बघू जिंकायचे नंतर बघता येईल!!

In reply to by चतुरंग

आज तो रुक-पॉन एन्डिंगचा बराच अभ्यास करून आला असावा आणि मॅग्नसने झटपट दोन्ही हत्ती पटाबाहेर काढून त्याचा डाव उधळून लावला असे दिसते. :)

In reply to by रमताराम

(हे रिकामे प्रतिसाद कसे पडतायत) कदाचित असं असेल की आनंद आज रूक-पॉन एन्डिंगचा भरपूर अभ्यास करून आला असावा. पण दोन्ही हत्ती झटपट पटाबाहेर काढून मॅग्नसने त्याचा प्लान उधळून लावला असे दिसते.

In reply to by रमताराम

कारण बर्‍याचदा या खेळी पटावरच्या स्थितीप्रमाणेच खेळाव्या लागतात फारसा अभ्यास करण्यासारखे नसावे. त्याने एनर्जी वाचवली. काळ्या मोहोर्‍यांकडून खेळण्याचे त्याने नक्की केले आहे. कारण आनंदकडे फार पर्याय आहेत असे वाटत नाही. कार्लसनला खेळी करु द्यायची आणि त्यावर उत्तम पर्याय शोधायचा हीच स्ट्रॅटेजी त्याला काही देऊ शकेल असा माझा अंदाज!

In reply to by चतुरंग

तो रिकामा पडलेला प्रतिसाद कॉपी केला पण स्मायली कॉपी झाली नाही. आता टाक्तो घ्या. :)

In reply to by चतुरंग

पण ते खुप म्हणजे फारच म्हणजे लैच म्हणजे अतिचशय अवघड आहे !! आणि ह्यात नशिबाचा काही भाग नाही ... बाकी हीच गोष्ट आपल्याला चेस बाबत आवडते .... इट्स अ गेम विदाऊट चान्स !! पाऊस पडला म्हणुन डकवर्थ लुईस नाही की दव पडल म्हणुन स्पिनरला अ‍ॅडव्हान्टेज नाही .... नो लक फॅक्टर ... प्रत्येक पॉईट हा झगडुनच मिळवावा लागेल !!

In reply to by चतुरंग

त्या नेहमीच्या सांऽबर-बाऽत वाल्याकडून 'स्सार, डू यू येक्स्पेक्ट द्येम टू कान्फर बारतरत्न टू यू आफ्टर दिस चाम्पियनशिप म्याच?'

In reply to by रमताराम

त्या 'रत्ना'लाच मग चौदावे रत्न दाखवावे लागेल!! ;)

आनंद प्रेस कॉन्फरन्स मधे बराच रिलॅक्स्ड वाटतोय. नक्कीच काळ्या मोहोर्‍यांकडून प्लॅन आहे. त्यामुळे त्याने आज एनर्जी वाया घालवली नाही!

आनंदची जराशी चूक आणि कार्लसन संधी घेईल कारण प्याद्यांच्या एंडगेमवर राजाच्या मदतीनं खेळण्यात त्याचं कमालीचं कसब आहे (सहावा गेम!). ड्रॉ झाला तर आनंदचं नशिब (म्हणजे वजीरावजीरी करुन). नाही तर कार्लसन सहजासहजी ड्रॉ सुद्धा होऊ देत नाही असा मागच्या सर्व गेम्सचा अनुभव आहे.

In reply to by भडकमकर मास्तर

हा पत्रकारपरिषदेचा कार्यक्र्म म्हणजे एकदम फुल टू असतो राव, टेन्स गेमनंतर रिलॅक्सेशन आहे खेळाडूंना सुद्धा!! ;)

कुणीतरी विचारलं मॅग्नसला 'या टूर्नामेंटमधला तुमचा सर्वात 'टेन्स मोमेंट' कुठला ते सांगा(च!)'. उत्तर एकदम मासलेवाईक 'इट इज वेरी ऑप्टिमिस्टिक ऑफ यू.' ये ब्बात.

In reply to by रमताराम

कार्लसन हा कास्पारोवचा थोडा सॉफिस्टेकेटेड अवतार आहे त्याबाबतीत!! :)

तुम्हा सर्वांचे अभिनंदन आणी आभार . आणखीन एक छान समालोचन . आता पुढील डावासाठी आनंदला आणी सर्वांना शुभेच्छा

मला वाटतं आनंद आणि कार्ल्याचे ठरले आहे, या असल्या भंपक लोकांना अशी रूड एकशब्दी उत्तरे द्यायची... पण हे लोक थांबणार नाहीत... एन्तरटेन्मेन्ट कन्टिन्यूज :) :)

:( असो

हायला ह्या पत्रकारांना उत्तर द्यायला कॅस्पारोव्हच पाहिजे ....त्यानं आई बहीण एक केली असती