Skip to main content

संस्थानिकांच्या गढ्या... नेमक्या कुणाच्या?

लेखक उद्दाम यांनी शनिवार, 09/11/2013 19:30 या दिवशी प्रकाशित केले.
भारतात पूर्वी काही संस्थाने होती . त्याना प्रिन्सली स्टेट असे म्हणत. इथे त्यांची यादी आहे. http://en.wikipedia.org/wiki/List_of_princely_states_of_India भारतातील लोकांचा आजही मुघल आणि इंग्रज यांच्यावर प्रचंड राग आहे. त्यान्नी देशाला लुटले हीच भावना आजही कायम आहे. पण १८५७ साली अखेरचा मुघल बादशाहा बहाद्दूर शहा जफर इंग्रजांविरुद्ध लढला . त्यात तो हरला. अखेर काही वर्षे तुरुंगात राहून मग तो त्यातच मेला. मुघल साम्राज्याचे इतर तुकडेही असेच नष्ट झाले.. म्हणजे इंग्रजांनी गिळले. लखनौ (अवध) चा नबाब साजिद अली हाही इंग्रजांपुढे पराभूत झाला. जेंव्हा त्याला इंग्रज पकडून घेऊन जात होते, तेंव्हा त्याने त्याच्या भावना व्यक्त करायला चार ओळी खरडल्या. सैगलपासून पार भिमसेनजींपर्यंत सर्वांनाच त्या ओळीनी भुरळ घातली. बाबुल मोरा, नैहर छूटो ही जाए चार कहार मिल, मोरी डोलिया सजावें (उठायें) मोरा अपना बेगाना छूटो जाए | बाबुल मोरा ... आँगना तो पर्बत भयो और देहरी भयी बिदेश जाए बाबुल घर आपनो मैं चली पीया के देश | बाबुल मोरा ... मुघल संपले. त्यांच्या इमारती, राज्ये, पैसा हे सर्व इंग्रजांच्या मालकीचे झाले. पुढे १९४७ साली इंग्रजही देश सोडून गेले आणि त्यान्नी इंग्लंडला नेलेलं जरी आपल्याकडून गेलं, तरी भारतातील गंगाजळी, भारतातील स्थावर मालमत्ता , इतर उद्योगधंदे , इतर शासकीय संपत्ती ही भारतातच आणि भारताच्या मालकीचीच राहिली. त्यामुळं मुघलानी आणि इंग्रजान्नी घेतलेलं काही अंशी तरी देशाला परत मिळालं. पण ज्या संस्थानिकांच्या गढ्या, राजवाडे , महाल होते, त्यातील मात्र बर्‍याचशा वास्तू संस्थानिक घराण्याच्याच राहिल्या आणि आजही त्या 'शासकीय ' मालकीच्या झालेल्या नाहीत. १९४७ साली संस्थानिकांनी आपली प्रजा लोकशाहीच्या मांडीवर बसवली , पण राजकोष आणि राजमहाल हे भारतात विलीन झाले का? उदाहरणार्थ, आमच्या गावचा कुरुंदवाडचा राजवाडा हा आजही संस्थानिकांचीच खाजगी मालमत्ता आहे. का, ही त्यांची अर्जित प्रॉपर्टी होती? इतर ठिकाणी काय परिस्थिती आहे? मुघलांचे वाडे सरकारचे झाले. शिवाजी महाराजांचे किल्ले सरकारजमा आहेत. इंग्रजांच्या वास्तूही सरकारजमा आहेत. पेशवाई शनिवारवाडा हाही पेशव्यांचा खाजगी राहिलेला नाही. मग संस्थानिकांच्या गढ्या, महाल, वाडे हे मात्र त्यांच्याच नावाने कसे राहिले?

वाचने 42984
प्रतिक्रिया 147

प्रतिक्रिया

सरकारी कार्यालये, शाळा, कॉलेज, हॉस्पिटले याना या जागा द्याव्यात. सी एस टी पासून लाल किल्ल्याप्र्यंत ढीगभर वास्तू भारतीय जनता आनंदाने वापरत आहे. लोकोपयोगी कामांना जागा नाही आणि नॉस्टाल्गियाच्या नावानं असल्या रावबहाद्दुरांचे फोटो आणि त्यांच्या रखेल्यांची भांडी कुंडी ठेवायला जनतेच्या हक्काच्या जागा कशाला वापरायच्या? एखाददुसरा हॉल ठेवावा. पण मुख्य जागा आणि संपत्ती सरकारजमाच व्हायला हवी. इंदिरा गांधींनी या बांडगुळांची पेन्शन बंद करुन एक चांगला पायंडा पाडला. या जागा ताब्यात घेऊन याला लोकशाही राजवटीचा पुढचा अध्याय जोडला जायला हवा.

In reply to by उद्दाम

पण मुख्य जागा आणि संपत्ती सरकारजमाच व्हायला हवी.
म्हणजे बिल्डर लोकांना घशात घालता येइल आरामात. आणि काचेच्या भिंती असलेले ठोकळे बनवता येतील.

In reply to by उद्दाम

सरकारी कार्यालये, शाळा, कॉलेज, हॉस्पिटले याना या जागा द्याव्यात
पुणे,कोल्हापूर,सातारा,मुंबई,नागपूर इथे दिल्यात कि जागा-वाडे , प्रतिसाद आणि लेख दोन्हीही अभ्यास करून टाकत चला !

In reply to by मालोजीराव

ज्या जागा अद्यापही संस्थानिकांकडेच आहेत, त्यांच्याबद्दल हा लेख आहे. तुमचा अभ्यास वाढवायचा असेल तर कुरुंदवाडात येऊन बघून जा. अजुनही भारतात अनेक ठिकाणे असलीत, तिथे फिरुन या.

In reply to by ग्रेटथिन्कर

तुमच्याकडे कुणी भीक मागितली की तुझेच धन तुला देतो म्हणून परत देता का =)) मीपण लग्गेच येतो आहे नै ते घ्यायला.

In reply to by बॅटमॅन

प्रश्न संस्थानिकांच्या मालमत्तेचा आहे, ती मालमत्ता जनतेचीच आहे. ती परत मागितली की भीक होते का.. बरं बरं असेल असेल.

In reply to by ग्रेटथिन्कर

जनतेनी मागितली म्हणजे नक्की कुणी मागितली? का हे अर्णव गोस्वामी च्या 'जनता आपसे जवाब मांग रही है' या प्रश्नाच्या छापाचं??

In reply to by ग्रेटथिन्कर

मला एक सांगा भारतातील किंवा जगातील जे काही राजे किंवा संस्थानिक झालेत्,त्या सर्वानी आपली मालमत्ता फक्त जनतेला ठकवुन मिळवली होती का? जी काही किल्ले किंवा गढ्या उभ्या आहेत त्या १०० % जनतेवर अत्याचार करणार्‍यानी ऊभ्या केल्या आहेत? अहो ज्याच्या मनगटात धमक होती किंवा ज्याना आपल्या जिवाची पर्वा नव्हती असे त्यात कित्येक योध्दे होते. त्यानी पराक्रम गाजवला त्यानी संपत्ती मिळवली. ज्यानी जनतेवर अत्याचार केले त्याची संपत्ती जनतेने उठाव करुन लुटली आहेच ना.जर तुमचे आमचे पुर्वज भ्याड किंवा भाडखावु असतील तर आपल्याला ह्यातले काहिच मिळणार नाही. उगाच ह्याचा वाडा का नाही मिळाला,किण्वा त्याची जमीन का सरकार जमा झाली नाही असे दाखले देण्यात काय हाशिल आहे?त्याच्या मनगटात आज जोर आहे ते लोक सोन्याचा धुर काढत आहेत,तुम्ही पण कष्ट करुन मिळवाना संपती आणि त्यावर बांधा ना महाल. मुकेश अंबानीने आज जगातील सर्वात दिमाखदार महाल उभा केलाच आहे ना?तुम्ही आम्ही फक्त आम्हाला राखिव कोटा द्या व ह्याचा वाडा व जमीन सरकार जमा करुन आम्हाला वापरायला द्या हेच तुणतुणे वाजवत राहणार आहे. मग ही भीक नाही तर काय आहे?

तेंव्हाचे शिरपेच अन मोरचेल मिरविणारे, रयतेकडून जुलमाने खंडरुपी धन गोळाकरून अनेक बेगमा/ उपस्त्रिया ठेवणारे, स्वतंत्र गाडीतून फिरणारे, आपल्याच नातेवाईकाला मोठ्या अधिकराच्या जागा देणारे, अनेक नोकर-चाकर पदरी बाळगणारे, मन रिझवण्यासाठी शिकार करणारे, कधी नर्तकीच्या वा गाणारीच्या कलेचा मद्य धुंद होउन अस्वाद घेणारे अन इंग्रजांपुढे लाचार असणार्‍या पण स्वकियांपुढे मुजोर असणार्‍या संस्थानिकांमध्ये आणि आजच्या नगरसेवक-आमदार-राज्य मंत्री-खासदार-केंद्रिय मंत्री ह्यांच्यात काय फरक आहे. किरकोळ तपशिलात फरक असेल पण तीच मुजोरी, तीच भ्रष्ट सिस्टीम, आपल्या मुला-नातवंडांसाठी, वारसांसाठी अमाप जमिनी इस्टेटी, कंत्राटांमधून प्रचंड नफा/ लाच, बदल्या करण्यासाठी लाच, घोटाळे, निवडणूकांमध्ये अफरातफर, आलिशान सरकारी महाल, लाल दिव्याच्या गाड्यांचा ताफा, शिकारी, प्रोटोकॉलच्या नावाखाली झडणारे सॅल्यूट्स, स्वतःच्या मुलाला मंत्रीपद मिळण्यासाठी आटापिटा... यादी खूप मोठी आहे. मी तर म्हणेन तेव्हांच्या संस्थानिकांपेक्षा अन इंग्रजांपेक्षासुद्धा हे आत्ताचे नीच राजकारणी खरे भारतद्रोही आहेत. कसली लोकशाही आहे आपल्याकडे..थट्टा मात्र आहे. निवडणूकांच्या काळात मतदारांना पाच पाच हजार वाटण्याचे प्रकार मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आहेत. जाऊ देत, हा सगळा विषयच बीपी वाढविणारा आहे, त्यामुळे हतबल होण्यापलिकडे आपल्या हातात काहीही उरलेले नाही.

कसली लोकशाही आहे आपल्याकडे..थट्टा मात्र आहे.
१००% सहमत

१८५७ च्या लढ्यात महादजी शिंद्यांचे वंशज इंग्रजाना समर्थ देत होते. त्यांचा स्वतःचा दिल्लीतील वाडा हा इंग्रजांचा किल्ला म्हणून वापरात होता. त्यांचे वंशज आता केंद्रीयमंत्री म्हणून दोन्ही मोठ्या पक्षांतर्फे मिरवतात.

In reply to by विजुभाऊ

१८५७ च्या लढ्यात महादजी शिंद्यांचे वंशज इंग्रजाना समर्थ देत होते.
झाशीची राणी आणि तात्या टोपे यांच्याविरुद्ध…याला झाशी संस्थान बळकवण्याची जयाजीरावाची इच्छा आणि पेशवा-शिंदे कटू संबंधाची पार्श्वभूमी होती. १८५७ स्वातंत्रलढ्याच्या मुख्य प्रवाहाशी याचा संबंध नाही. हा लढा मोडून काढण्यात राजपुतान्याचा सिंहाचा वाटा होता.

In reply to by मालोजीराव

उत्तरेकडे खरा पराक्रम दाखवला शिंदे आणि होळकर या दोन सरदारांनी, परंतु त्याचे श्रेय पुण्यात बसणार्या पेशव्यांनी घ्यायचे असे चालू होते. एक तर पेशव्यानी सातारच्या गादीला नामधारी बनवले होते वर पळीपंचांगानुसार युद्धाचे मुहुर्त काढायचे ,असला पोरखेळ शिंदे व होळकरांना मानवणार कसा? त्यातच नर्तकीचे प्रकरण, दारुबाजपणा , ध चा मा करण्याची या पेशव्यांची अनैतीक वृत्ती . शिवभुपाचे स्वराज्य पेशव्यांनी कवडीमोलाने उधळायचा सपाटा लावला होता. त्यामुळेच पेशवे शिंदे यांच्या संबंधात कटुता आली.

In reply to by ग्रेटथिन्कर

पानिपतच्या युद्धात अतुलनीय पराक्रम गाजवून भाऊसाहेब पेशवे व विश्वासराव पेशवे हुतात्मा झाले होते. त्याच युद्धात मल्हारराव होळकर युद्ध सोडून निघून आले होते.

In reply to by श्रीगुरुजी

शिंदे ,होळकरांची खडी फौज होती, तर पेशव्यांच्या ताफ्यात अर्धेअधिक बाजारबुणगेच होते. त्यात परत फुकट जेवणारे, तीर्थयात्रा करणारे भोळसट बायाबापुडे घेऊन सदाशिवभाऊ युद्धाला आले होते .या असल्या बाजारबुणग्यांमुळे लाख मराठा तिथे कापला गेला.या बाजारबुणग्यांनीच अर्धी रसद खाऊन संपवली होती. युद्ध कूटनीती करायचे सोडून ब्राह्मणभोजने आणि तिर्थक्षेत्री जिर्णोधार करण्यात पेशवाई मश्गुल होती .यामुळे मराठ्यांची चाल धीमी पडली .अशा मुर्खांसाठी होळकर कशाला जीव धोक्यात घालतील? आणि होळकरांनी माघार घेतली त्याआधी सदाशीवभाऊ युद्धातुन पळुन गेले होते असेही इतिहासकार मान्य करतात. हरीयाणात भाऊंचे मंदीरही आहे. जिथे ते छुपे रहात होते.ते महाराष्ट्रात पळून आल्याचेही मानले जाते.

In reply to by ग्रेटथिन्कर

आणि होळकरांनी माघार घेतली त्याआधी सदाशीवभाऊ युद्धातुन पळुन गेले होते असेही इतिहासकार मान्य करतात. हरीयाणात भाऊंचे मंदीरही आहे. जिथे ते छुपे रहात होते.ते महाराष्ट्रात पळून आल्याचेही मानले जाते.
पानिपतात प्रत्यक्ष हजर असलेला अवधचा नबाब सुजाउद्दौला याचा दिवाण काशीराज याने त्या एकूण प्रकरणावर काही वृत्तांत लिहिला आहे. त्याचे भाषांतर कोणा ब्राऊन नामक इंग्रजाने केलेय आणि शेजवलकरांनी ते आपल्या ग्रंथात वापरलेय. त्यात स्पष्ट दिलेय की लढाईच्या दुसर्‍या दिवशी काही मंडळी सुजाकडे आली आणि डेड बॉडी दहनाकरिता मागू लागली. विश्वासरावांची बॉडी पेंढा भरून काबूलला नेऊ म्हणून पठाण मागे लागले होते पण त्यांना मनवण्यात कसेबसे यश आले. सदाशिवरावभाऊंचे धड दुसर्‍या दिवशी मिळाले. शीर कापले होते. त्या धडावरचे भरजरी कपडे, अलंकार व काही जखमा, विशेषतः १७५९ साली पुण्यातल्या गारपिरावर एका गारद्याने केलेला वार, इ. ताडून पाहता ते भाऊचेच आहे याची खात्री पटली. पण शीर काही मिळाले नाही. पुढे काही वेळाने एका पठाण सैनिकाने ते कापून जमिनीत पुरून ठेवले होते असे कळाले. मग ते उकरून ताब्यात घेतले आणि दहन झालेय रणभूमीवरच. अस्सल पुरावे बघण्याचे कष्ट न घेऊन सोनवणी आणि नरके यांच्यासारख्या रेम्याडोक्यांच्या भजनी लागणारी तुमच्यासारख्यांची पिलावळ आजकाल वाढत लागली आहे. कधी हे ग्रहण सुटणार देव जाणे.

In reply to by ग्रेटथिन्कर

नरके आणि सोनवणी हे तुमचे गुरू, तुम क्या जानो सच्चाई क्या होती है. अश्वत्थाम्याला खरे दूध काय ते माहितीच नव्हते म्हणतात, पाण्यात पीठ मिसळून तेच खात असे गरिबीमुळे. पुढे हस्तिनापुरात खरे दूध प्याला ते त्याला आधीच्या सवयीमुळे आवडेचना तशी गत झालीये तुमची =))

In reply to by बॅटमॅन

सफेद दाढ्या वाढवलेले प्लांटेड लोक तुमचे गुरु, या दाढीवाल्याने अनेक ऐतीहासिक अस्सल कागदपत्र नष्ट केल्याचे सांगितले जाते. संस्थानिक ,वंशज यांच्याकडून कागदपत्र मिळवायची आणि नंतर गहाळ करायची .शिवाजीँचे धर्मनिरपेक्ष स्वरुप लोकांसमोर येऊ नये याची पुरेपुर खबरदारी ही आरेसी बांडगुळे घेत असतात. या दाढीवाल्याची लबाडी कळल्यानंतर एका संस्थानिकाने याला काठीने बदडून हाकलून दिले होते. काही संघटनांनी यांची लायकी मराठी जनांपुढे आणली हे एक बरेच झाले .लोक जाब विचारायला लागले ,लोकांची चर्चेची वादाची तयारी असूनही हे कणाहीन इतिहासतज्ञ कुठे गायब झालेत हे त्या पासोड्या विठोबाला आणि पत्र्या मारुतीलाच ठाऊक.

In reply to by ग्रेटथिन्कर

नरके, सोनवणी अन खेडेकर यांचे बाळकडू पिलेला ट्रोल असेच बोलणार हो. भांडारकरवर हल्ला करणार्‍यांची जात तुमची, तुम्ही काय ऐकणार हिंसेत कुणाला.

In reply to by बॅटमॅन

बॅटमन, तुम्ही ज्या तत्परतेने ग्रेटस्टिंकरसारख्या ब्राह्मणद्वेष्ट्या जातीयवाद्यांचे निराधार आरोप सप्रमाण खोडून काढत आहात त्याबद्दल तुमचे अभिनंदन! खेडेकर, कोकाटे, नरके, सोनवणी इ. जातीयवाद्यांची पुस्तके हे वाचणार आणि इथे येऊन त्यातली गरळ ओकणार. पण तुम्ही त्यांचा प्रत्येक गलिच्छ आरोप सप्रमाण खोडून काढलेला आहे.

In reply to by श्रीगुरुजी

तूम्हीही ज्या तत्परतेने पुरंदरे ,मेहंदळे, बेडेकर या आरेसी बांडगुळांचे, जातियवाद्यांचे,इतिहासाची मोडतोड करणार्यांचे समर्थन करण्यासाठी जो आटापीटा करत आहात त्यासाठी आपले अभिनंदन.

In reply to by ग्रेटथिन्कर

पुरंदरे, पांडुरंग बलकवडे, मेहेंदळे, बेडेकर इ. स्वतंत्र प्रज्ञेचे व निष्पक्षपाती इतिहास संशोधक आहेत. ते काही इतरांसारखे सरकार स्पॉन्सर्ड जातीयवादी ब्राह्मणद्वेष्टे नाहीत. अर्थात तुम्हाला ते काय कळणार म्हणा? आणि तुम्हाला हे समजत नाही यात तुमचा फारसा दोष नाही.

In reply to by श्रीगुरुजी

अनुमोदन. इतिहासाची मोडतोड करायला आणि हवा तसा प्रसिद्ध करायला प्रज्ञावंत माणुस लागतो हे मात्र मान्य.

In reply to by ग्रेटथिन्कर

=)) हहपुवा. मेहेंदळे हे आरेसी बांडगूळ? बरं बरं. त्यांच्या संशोधनातील एक चूक दाखवा, त्यांना फोन लावून निषेध करतो, हाकानाका. नै म्हणजे नरके, सोनवणी व खेडेकरांनी आपल्या अमूल्य बिनबुडाच्या संशोधनात काय गरळ ओकलीये त्यात काहीतरी मिळेलच की. आता होऊनच जाऊदे. मेहेंदळे कुठे चुकले ते दाखवाच. आव्हान आहे.

In reply to by बॅटमॅन

>>> मेहेंदळे कुठे चुकले ते दाखवाच. आव्हान आहे. त्यांचे संशोधन काय तपासायचे? त्यांचे आडनाव हीच सर्वात मोठी चूक आहे. बाकी त्यांचे संशोधन वगैरे लक्षात घेण्याची गरजच नाही.

In reply to by श्रीगुरुजी

अगदी अगदी. या ब्रिगेडींना बाकी ब्राह्मणांची भीती का वाटते हे एक न उलगडलेले कोडे आहे. मुळातला फट्टूपणा असा उघडा पडतो की काय कोण जाणे.

In reply to by श्रीगुरुजी

धन्यवाद. पण तरीही यांची बिनबुडाची पोपटपंची काही बंद व्हायला तयार नाही.

In reply to by बॅटमॅन

पण तरीही यांची बिनबुडाची पोपटपंची काही बंद व्हायला तयार नाही.
+१ अहो त्यांना पण माहित आहे आपण असत्य पसरवतोय ते …. पण त्यांचा उद्देशच तो आहे. याचा फटका यापुढील इतिहास संशोधनाला बसणार आहे. खासकरून मराठा इतिहासाच्या बाबतीत . एकतर जास्त कोणी यावाटेला जाणार नाहीत अन गेलेच तरी एखादा वेगळा निष्कर्ष लोकांपुढे मांडणे त्यांना ब्रिगेडी गाढवांच्या दंडेली मुले शक्य होणार नाही.

In reply to by बॅटमॅन

(फक्त आणि फक्त )फुले ,आंबेडकर आणि शाहूंच्या ह्या पवित्र पुरोगामी महाराष्ट्रात ,महाराष्ट्र घडवायला ब्राह्मणांनी पण हातभार लावला असे म्हणणे पण महापाप आहे ! कुठे फेडाल हि पापे तुम्ही बॅटमॅन राव ? ---- विकांतला मिपावर वावरून "उपरोधनिझम" ची लागण झालेला

In reply to by ग्रेटथिन्कर

म्हणजे खडी फौज बाळगणारे युद्धातून धूम पळून गेले आणि बुणग्यांची फौज बाळगणारे अतुलनीय पराक्रम गाजवून धारातीर्थी पडले! >>> आणि होळकरांनी माघार घेतली त्याआधी सदाशीवभाऊ युद्धातुन पळुन गेले होते असेही इतिहासकार मान्य करतात. हरीयाणात भाऊंचे मंदीरही आहे. जिथे ते छुपे रहात होते.ते महाराष्ट्रात पळून आल्याचेही मानले जाते. असे कोणते इतिहासकार मान्य करतात? नरके का सोनवणी का ब्रिगेडचे महान संशोधक खेडेकर्/कोकाटे? ब्रिगेडींप्रमाणे तुमचा ब्राह्मणद्वेष आता अगदी किळसवाण्या पातळीला पोहोचला आहे. सर्व कायदेशीर, बेकायदेशीर मार्ग वापरून, इतिहासाची मोडतोड करून, यांच्या श्रद्धास्थानावर प्रहार करून आणि गुंडगिरी करूनसुद्धा ही जमात नेस्तनाबूत होत नाही आणि यांची उत्तरोत्तर प्रगतीच होत आहे या वैफल्यातून आणि नैराश्यातून तुम्ही अत्यंत असत्य विधाने करत आहात. रामदास स्वामी व दादोजी कोंडदेव हे आदिलशहाचे हेर होते व स्वातंत्र्यवीर सावरकर हे ब्रिटिशांचे हस्तक होते यांसारख्या अत्यंत हास्यास्पद आणि किळसवाण्या आरोपांइतकाच भाउसाहेब पेशव्यांवरील हा आरोपही अत्यंत हास्यास्पद आणि किळसवाणा आहे.

In reply to by प्रचेतस

आणि निषेध!!!!! आमचा राजे नाही तर तात्या संपादकात असते तर आत्ता पर्यंत आयडी पुर्ण ब्लॉक झालेले असते. क्रु्.ह.घेउ नये

In reply to by ग्रेटथिन्कर

शिंदे होळकर पुढे आणले पेशव्यांनीच. पुढे ते स्वतंत्र झाले, पण त्यांचा मुख्य पराक्रम पानिपतोत्तर काळात जास्त दिसतो. त्याआधी अहमदिया करार वैग्रे गोष्टी आहेतच, पण त्यांनी आपल्या बुद्धी अन सामर्थ्याचे विशेष दर्शन पानिपतोत्तर काळात जास्त घडवले. तोपर्यंत उत्तरेत पेशव्यांचेही वर्चस्व होतेच. बाकी पोरखेळच काढायचे झाले तर दौलतराव शिंदे, नागपूरकर भोसले, इ. चे पोरखेळही तितकेच जबरी आहेत. 'पेशवाईच्या सावलीत' नामक त्र्यंबक शंकर शेजवलकरांचा लेख वाचल्यास समजून येईल. पेशवे एकटे तेवढे गंडलेले अन बाकी सर्वच भारी हे समीकरण चूक आहे. तसे उदात्तीकरण करण्याची लाट सध्या असली म्हणून चुकीची गोष्ट बरोबर होत नाही.

In reply to by बॅटमॅन

घ्या. त्र्यंबक शंकर शेजवलांकडे इतिहासाची कुठली डिग्री होती? केवळ ते शेजवलकर होते या अवगुणाच्या जोरावरच त्यांचे संशोधन बाद होते. पुढचे काय बोलता?

In reply to by मृत्युन्जय

ते बी.ए. होते :) एम.ए चा थेसिस त्यातल्या वादग्रस्त मुद्द्यांमुळे युनिव्हर्सिटीने फेरफार करावयास सांगूनही त्यांनी न केल्याने एम.ए डिग्री मिळाली नाही. इतकेच कशाला, पुण्याच्या डेक्कन कॉलेजात प्राध्यापक होते इतिहासाचे. शिवाय काही पीएचडीच्या विद्यार्थ्यांचे गाईड होते. डेक्कन कॉलेजात त्यांची खोली अजून दाखवतात. माझे स्मरण बरोबर असेल तर आरमारविषयक थेसिस एकाने त्यांच्या मार्गदर्शनाखालीच लिहिलेला आहे.

In reply to by ग्रेटथिन्कर

धोतरबडवी सल्ले कोणी दिले, शत्रुच्या गळ्यात गळे घालुन मराठी साम्राज्याच्या पाठीत खंजीर कोणी खुपसला ऐन युद्धातुन कोण पळुन गेले याचीही माहिती असेलच ना तुमच्याकडे? शिवाय शिवाजी महाराजांनी स्वतःहुन फार थोड्या लढाया लढल्या त्या नात्याने त्यांना त्यांचे श्रेय मिळायलाच नको नाही का? उलटपक्षी असाही निष्कर्ष काढता येउ शकतो की " मुरारबाजी सुलतानढवा करुन स्वतःच्या जीवाची बाजी लावत होता तेव्हा शिवाजी महाराज मिर्झाराजे आणि दलेरसिंगाच्या शामियानात पुख्खे झोडत होते" किंवा " बाजीप्रभु स्वतःच्या रक्ताने पावनखिंडीत रक्त सांडत असताना 'लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा वाचला पाहिजे' या वक्तव्याचा आधार घेउन चक्क पळुन गेले". इतिहासाचा अर्थ चुकीचाच लावायचा म्हटल्यावर काय वाट्टेल ते थुंकता येते हो.

In reply to by विजुभाऊ

ज्या संस्थानिकांनी इंग्रजांना साथ दिली (१८५७ वा अन्य वेळी) त्यांच्या गढ्या, वाडे आणि नामाधारी संस्थानिकपद इंग्रजांनी कायम ठेवले. याउलट ज्यांनी इंग्रजांशी पंगा घेतला त्यांची वाट लावली. एक राज्यकर्ते ह्या दृष्टीकोनातून पाहिल्यास इंग्रजांचे हे वर्तन ठीकच. परंत्, आजच्या स्वतंत्र भारतातदेखिल पहिल्या प्रकारचे संस्थानिक आजदेखिल आपल्या (तेव्हा संस्थान असलेल्या) प्रजेची आपुलकी बाळगून आहेत. उलट दुसर्‍या प्रकारचे संस्थानिक आजही दुर्लक्षितच आहेत. असे का झाले असावे?

>>> १८५७ च्या लढ्यात महादजी शिंद्यांचे वंशज इंग्रजाना समर्थ देत होते. त्यांचा स्वतःचा दिल्लीतील वाडा हा इंग्रजांचा किल्ला म्हणून वापरात होता. त्यांचे वंशज आता केंद्रीयमंत्री म्हणून दोन्ही मोठ्या पक्षांतर्फे मिरवतात. म्हणजे १८५७ पासून आजतगायत या वंशजांचे भारताचे अनहित करणार्‍यांना समर्थन दिसते.

वाचायला मजा येतेय. प्रतिसाद पुराव्यानिशी असतील तर अजून मजा येईल. दुध का दुध पानी का पानी हो जायेगा. नरके चे भाषण तू नळीवर ऐकतोय…. कोण खरे कोण खोटे देव जाणे.

शिवछत्रपतींनी एक एक माणुस देउन आनी रक्ताच मोल देउन स्वराज्य उभे केले.पुढे शंभुराजांनी असामन्य विरतेने स्वधर्माचे रक्षण करण्याकरिता बलिदान दिले,त्यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातुन महाराष्ट्रातला प्रत्येक मराठा पेटुन उठला व राजरानी महाराणी ताराराणी आणी संताजी धनाजीच्या अतिव पराक्रमाने हे स्वराज्य राखले.शाहुमहाराजांच्या दुरदृष्टीने व गुणग्राहकतेने बाळाजी विश्वनाथ व महापराक्रमी थोरल्या बाजीरावांनी याचा विस्तार केला.हा सर्वगुणसंपन्न पेशवा घरातल्या मुर्खांमुळे अकाली मरण पावला.नंतर नानासाहेब पेशव्याने प्रचंड घोडचुका केल्या त्यात सर्वात महत्वाच इंग्रजांच्या मदतीने दौलतीचे हिंदुस्तानातले सर्वात प्रबळ असे आरमार बुडवले.दुसरी घोड्चुक म्हणजे मराठयांची खरी युद्धनिती म्हणजे गणिमी कावा तो सोडुन मुख्य सरदारांचा विरोध असताना बाजारबुनग्यांसह मैदानी युध्ध करावयास भाउला पाठवले.मल्हाररावांचा योग्य सल्ला भाउंनी मानला नाही हे पाणिपताच्या मानहानीचे फार मोथे कारण होते.त्यानंतर महादजीबाबा शिंदेनी अतुल पराक्रम धाडस व अव्वल दरबारी राजकारणाने नाना फडवणविस्,पटवर्धन्,होळकर ,गायकवाड, भोसले यांच्या मदतीने परत मराठा साम्राज्याची घडी बसवली. जो पर्यंत नाना आणी महादजीबाबा होते.तोपर्यंत मराठा साम्राज्यात ढवळाढवळ करन्याची इंग्रजांची हिंमत नव्हती.पण ते गेल्यावर रघुनाथरावाने पेरलेल्या नादान बिजाने सगळ्या साम्राज्याचा सत्यानाश झाला,खर तर या उतरत्या काळातही यशवंतराव होळकरासारखा महापराक्रमी विर होउन गेला पण त्याला साथ द्यायला खंबीर पेशवा नव्हता. राज्य स्थापने पासुन ते नावरुपाला येउन परत अस्तंगत होई पर्यंत मराठा असो,ब्राम्हण असो ,धनगर असो वा इतर कोनीही प्रत्येकाचा प्रत्येक गोष्ठीत काहीना काही वाटा होता.शेकडो वर्ष मोगली अन्यायाने पिचलेल्या मनात स्पुलिंग पेटवुन स्वराज्य निर्माण करण्याचे महान कार्य शिवछत्रपतींनी केले. त्याकाळी प्रत्येकाने आपपल्या परीने त्याला हातभार लावला.त्याच्यापासुन काहीतरी शिकायच सोडुन उठसुठ जातीवर जाताना लाज नाही का वाटत. च्यायला पायाखाली साध झुरळ आल तर बेंबीच्या देठापासुन बोंब मारणार्‍याची आपली लायली.कोनी राज्य केले आणी कोनी बुडवल म्हणुन आता बोंबलत बसताय होय रे,थुत तुमच्या जिंदगाणीवर....

माझ्यासाठी मराठा म्हणजे,जो या महाराष्ट्रावर प्रेम करतो तो मराठा,या मातीशी इनाम राखतो तो मराठा,आई वडीलांचा सांभाळ करतो तो मराठा,गोरगरिबांच्या मदतीला धाउन जातो तो मराठा.अन्यायाला सरळ रस्त्यावर उतरुन प्रतिकार करतो तो मराठा. एखादा कितीही बलिष्ठ असला पण अन्यायाने,बळजबरीने वागत असेल तर त्याचे थोबाड फोडायची हिंमत दाखवतो तो मराठा.जो आजच्या काळात नांगर आणी तलावरीबरोबरच लेखनी आणी तराजु सारख्याच हिमतीने पेलतो तो मराठा. मग तो ब्राम्हण,कुणबी,माळी,यनगर किंवा अगदी एखादा शेख,खान किंवा आपला पाटील-देशमुख असु द्या. या माय मराठीवर प्रेम करणारा हा प्रत्येकजण शिवछत्रपती प्रणित मराठाच होय.

In reply to by बाबा पाटील

पाटील साहेब, आपल्या मराठ्याच्या व्याख्येशी १००% सहमत आहे. मला मराठा जात असे अजिबात म्हणायचे नाही.

In reply to by बाबा पाटील

पुरंधरवर लढलेला मुरारबाजी मराठा , पावनखिंडीत पडलेला बाजीप्रभू मराठा, प्रतापगड रणसंग्रामात युद्धात मुत्सद्देगिरीची शिकस्त करणारे पंताजी गोपीनाथ बोकील मराठा, एका दिवसाचा शिवाजी होऊन धन्य पावलेला शिवा काशीद मराठा, औरंग्याच्या मगरमिठीतून राजांना सोडवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणारा इमानी मदारी मेहतर मराठा, शिवराज्याभिषेक करणारे गागाभट्ट मराठा, शिवभारतकार कवीन्द्र परमानन्द मराठा, 'शेर शिवराज' म्हणणारा कवी भूषण मराठा, संभाजी राजांवर पुत्रवत प्रेम करणारे बाळाजी आवजी मराठा, 'मैत्री' शब्दाला खरा जगणारा कवी कलश मराठा , १८० किल्ल्यांचे प्रभू किल्लेदार हे हि मराठाच , मराठा आरमाराच्या सीमा बुलंद करणारा दौलतखान मराठा स्वराज्याचे शिवराय,संभाजीराजे,राजाराम,ताराराणी,शाहू असे ५ छत्रपति पाहिलेले हुकुमतपन्हा रामचंद्रपंत अमात्य हि मराठाच

In reply to by मालोजीराव

दुर्देवाने प्रत्यक्ष दुनियेपेक्षा या आभासी दुनियेतच जातीयवादाचे पेव जास्तच फुटले आहे.

In reply to by बाबा पाटील

इथं समोर नस्तंय ना कुणी....! सगळ्यांना लई फुरफुरतं. लिहीतात भसाभसा. डोळ्यात डोळे घालून समोर बसायची वेळ येते तेव्हा तंतरते. स्वत:चा लॅपटॉप, स्वतःचा मोबाईल, स्वतःचे हात असं असलं की स्वतःचीच लाल. उगा आवया नुस्त्या.

In reply to by मालोजीराव

अनुमोदन. महाराज प्रजाप्रतिपालक असेच होते.काही लोक त्यांना गोब्राह्मणप्रतिपालक उपाधी लावुन एका विशिष्ट जातीपुरते मर्यादीत करत आले आहेत.

In reply to by ग्रेटथिन्कर

आयला मग अभिमान पाहिजे की.... एका मराठ्याने बामनांना पोसलं म्हनून. हायेच बामन जात बांडगुळाची. फुडं? प्रॉब्लेम काय आहे? डबल ढोलक्या च्यायला. कुणी म्हणालं म्हणून राजा तसा झाला का? त्यांनी मराठ्यांना पण पोसलंच्च की. कुणब्यांना पण पोसलं. काशिदाला पण. मेहतराला पण. भिकारचोट साले. शिवाजी महाराज तिकडं डोक्याला हात लावून बसले असतील. :(

गोब्राह्मणप्रतिपालक क्षत्रियकुलावतंस बहुजनोद्धारक प्रौढप्रतापपुरन्दर राजा श्री शिवछत्रपतीं.येथे फक्त गोब्राम्हण प्रतिपालक नसुन्,क्षत्रियकिलवंतास आणी बहुजनोद्धारक हे दोन शब्दही आहेत.त्याचाही विचार करावा.इतिहास व वर्तमान कधीच बदलत नसते.जर बदलायचे असेल तर भविष्य बदलायची तयारी करा.मी पाटलाचा पोर्,स्वतःच्या आईसाठी मागच्या सातपिढ्यात कोनी न केलेला आयुर्वेदाचा व्यवसाय स्विकारला नव्हे तो अतिशय व्यवस्थित त्यात स्वतःला सिद्ध केले.त्या साठी मला स्वतःची पाटीलकी सोडुन ब्राम्हण बनायला लागल का ?अजिबात नाही.आजच जग तलावरीवर नाही चालत हो.शिक्षणावर चालतो.असही आपल्याला साल आरक्षण नाही.मग मागच्या गोष्टी उगाळत बसुन राहण्यांपेक्षा एक तर शिक्षणाने स्वतःला सिद्ध करत प्रगती करा अन्यथा बापजाद्यांनी सोडलेल्या पिढिजात जमिनींची वाढ करा.अन्यथा आपल्या रक्तातुन आलेला राजकरणाचा व्यवसाय म्हणुन स्विकार करा.हो कारण आजकाल राजकारण हा देखिल फुल्ल टाइम बिजनेस आहे.माझे कित्येक मित्र यातुन अफाट कमाई करत आहेत.आणी येथे तत्व सांगत बसणार्‍यांना नोकरीवर ठेवा.