अव्यक्तांच्या समिधा
आज ना उद्या
वटवृक्षांची जोडी..आपोआप ढासळेल, उन्मळून पडेल..
तग धरून उभारलेली
अंग चोरून वाळलेली
आज ना उद्या
घाव बसतील कु-हाडीचे.. फांदीफांदीवरती
काही शिल्लक उरणार नाही, जमिनीवरती
पण एकमेकांत गुंतलेल्या पारंब्या
तुटता तुटणार नाहीत..
नाग-नागिणीसारख्या मिठ्या
सुटता सुटणार नाहीत
खोल खोल गेलेल्या..एकमेकांत गुंतलेल्या
कितीही खणलं तरी पुरून उरतील..
तुझ्या माझ्या वेदनांसारख्या !!
जगाच्या अंतापर्यंत खणत राहीलं तरी
अव्यक्ताचा गुंता सुटायचा नाही..
शेजारी उगवूनही जपलेल्या
विरहाची माती व्हायची नाही
जोडी अचेतन झाल्यावर
कुणी पाहीलंच जर.. खणून
तर सापडतील त्यांना
दबलेल्या हुंदक्यांत गुंडाळलेल्या
अव्यक्तांच्या समिधा... !
अवगुंठीत ज्वालामुखीसारख्या
आतल्या आत खदखदणा-या
अनामिक ओढीने एकमेकांत सळसळत गुंतणा-या
चैतन्याच्या समाध्या ...!!
वाचने
2954
वाचनखूण
प्रतिक्रिया
17
*****
सुरेख!
सुरेख
अनामिक ओढीने एकमेकांत सळसळत
एकदम भारी लिहिलय.
छान
सुंदर...
In reply to सुंदर... by झंम्प्या (verified= न पडताळणी केलेला)
मस्त प्रश्न आहे.
कविता आवडली...हुरहूर लावून
आवडली ! छान कविता !
सु रे ख!
आवडली
आपल्या सर्वांचे मनापासून आभार
!
सुंदर!
कवयित्री/कवि कोल्हापूरकडचे
In reply to कवयित्री/कवि कोल्हापूरकडचे by llपुण्याचे पेशवेll
वेल्कम टु द क्लब.