HARRY HARLOW ची माकडं आपल्याला काय शिकवितातं !
लेखनप्रकार
हॅरी हार्लो ची थोडी पार्श्वभुमी
हॅरी हार्लो या महान मानसशास्त्रज्ञाचा जन्म १९०५ मध्ये फ़ेअरफ़ील्ड काउंटी आयोवा येथे झाला.याने ग्रॅज्युएशन रीड कॉलेज मधुन पुर्ण केल्यावर हा स्टॅनफ़ोर्ड या प्रसिद्ध युनिव्हर्सीटी त मानसशास्त्राच्या उच्च शिक्षणासाठी दाखल झाला.हार्लोने सुरुवातीला लेविस टर्मन या प्रसिद्ध संशोधकाच्या हाताखाली उमेदवारी केली. लेविस हा त्या काळात gifted child मध्ये असलेल्या बुद्ध्यांका वर I.Q. वर संशोधन करीत होता.लेविस च्या लॅब मध्ये एकाहुन एक विलक्षण बुध्दीमत्ता लाभलेली लहान मुल आणली जात असतं( आजकालच्या गुगल बॉय सारखी) यातल्या च एका गिफ़्टेड चाइल्ड शी ती मोठी झाल्यावर हार्लो ने लग्न केले तिचे नाव क्लारा मिअर्स होते तिचा आय.क्यु. १५५ नोंदला गेलेला होता.
हार्लो चे सुरुवातीचे प्रयोग आणि या प्रयोगांना कलाटणी देणारा अपघात
तर हार्लो पुढे युनिव्हर्सीटी ऑफ़ विस्कॉन्सीन मध्ये दाखल झाला आणि आता एक स्वतंत्र संशोधक म्हणुन काम करु लागला, त्याने RHESUS MACAQUE मंकीज ची बुध्दीमत्ता I.Q. वर सुरुवातीला संशोधन सुरु केले याला लेविस च्या संशोधनाची अर्थातच प्रेरणा होती.याने आपल्या संशोधनाने Primates च्या बुध्दीमत्तेविषयी अनेक नविन गोष्टींचा शोध लावला. आणि तोपर्यंत अज्ञात असलेले Primates च्या बुध्दीमत्ते संदर्भातील अनेक पैलु समोर आणले. या प्रयोगां दरम्यान अपघातानेच एक नविन गोष्टी कडे त्याचे लक्ष वेधले गेले. ती म्हणजे तो काही काळ या लहान माकडाच्या पिलांना प्रयोगा दरम्यान त्यांच्या आईशी आणि इतर पिलांशी वेगळ तोडुन एकट ठेवीत असे , तर त्याने बघीतलं की ही जी एकांतात ठेवलेली पिल्ल होती ती पिंजर्या च्या जमीनीवर जी सॉफ़्ट टॉवेल्स होती त्याला भलतीच बिलगत असत, त्या टॉवेल्स शी खेळत, आणि पिलांना याचा फ़ारच लळा लागत असे.जर ती टॉवेल्स बाजुला केली तर ही पिल्ले चिडुन प्रचंड गोंधळ घालीत असत आणि त्याने अजुन एक बघितले की यांची दुधाची बाटली यांच्या तोंडातुन काढली तर ते फ़ारसा विरोध करीत नाहीत पण सॉफ़्ट टॉवेल जर दुर नेण्याचा प्रयत्न केला तर मात्र ते जणु वेड लागल्या सारखे किंचाळु लागत त्यांच अन्ना पेक्षा वरचढ टॉवेल च हे आकर्षण बघुन हार्लो आश्चर्य चकीत झाला आणि त्याने याचा शोध घ्यायचे ठरविले यातुन एका विलक्षण प्रयोगाचा आणि चक्रावुन टाकणार्याक निष्कर्षांचा जन्म झाला. हा प्रयोग मानसशास्त्राच्या इतिहासातील एक मोठा प्रयोग आजही मानला जातो.
Psychology च्या क्षेत्रातील एक विलक्षण प्रयोग
या प्रयोगा साठी जी RHESUS MACAQUE प्रजातीची जी माकड वापरली गेली त्यांच एक मोठ वैशिष्ट्य अस की यांचा ९४ % जनुकीय वारसा मानवाच्या जनुकीय वारशाशी मेळ खातो.सोप करुन सांगायच म्हणजे मानव हे ९४% RHESUS MACAQUE माकड आहेत आणि ६ % स्वतंत्र मानवी वैशिष्ट्य जोपासुन आहेत. याच प्रमाणे ओरांग उटांग शी आपले साम्य ९८% आणि चिंपांझी शी ९९ % आहे. आणि याच कारणास्तव मानसशास्त्रज्ञांची विवीध प्रयोगांसाठी पहीली पसंत ही माकडे असतात यांच्या वर केलेले प्रयोग आणि त्यातुन निघालेले निष्कर्ष माणसांवर मोठ्या प्रमाणावर लागु होतात. म्हणुनच यांची प्रयोगासाठी निवड केली जात असते.
तर आता हार्लो ने आता दोन प्रकारच्या कृत्रीम आई बनविल्या एक सॉफ़्ट सरोगेट मदर कार्डबोर्ड वापरुन त्याला माकडीणी सारखा आकार देउन त्याभोवती अतिशय मउ सॉफ़्ट टॉवेल गुंडाळला तिला एक कृत्रीम स्माईली चेहरा जोडला आणि एक सॉफ़्ट स्पर्श केल्यास उबदार वाटेल अशी एक कृत्रीम आई बनविली हीला मुव्हमेंट करु शकेल अशी सुविधा दीली की जेणेकरुन ती पिलाला स्पर्श करु शकेल आणि कुरवाळु शकेल. दुसरी कृत्रीम आई बनविली तीला दुध देइल अशा सुविधेने बनविली मात्र तीला सॉफ़्ट टॉवेल वगैरे न देता केवळ कडक स्टील असलेली, विदाउट स्माईल अशी Steel mother with milk बनविली.
आता त्याने नुकत्याच जन्मलेल्या काही पिलांना त्यांच्या खर्याे आईपासुन तोडुन दुसरीकडे पिंजर्या त एकाकी ठेवले. सुरुवातीला ही आईवेगळी पिलं प्रचंड रडत किंचाळत असत.आईविना ती फ़ार व्याकुळ अस्वस्थ होत असत चिडचिडी होत, हार्लो ने त्यांचे बारकाइने निरीक्षण करणे नोंदी ठेवणे सुरु केले. त्यांच्या शारीरीक अवस्थे वरुन , मुव्हमेंट्स , stools च्या विश्लेषणातुन त्यांची पराकोटीची अस्वस्थता निश्चीत झाल्यावर त्याने त्यांच्या पिंजर्यामत दोन्ही कृत्रीम आया सोडल्या एक सॉफ़्ट कुरवाळणारी स्मायलीफ़ेस आई आणि दुसरी हार्ड स्टील पण दुध देणारी आई. आता ही आपल्या नैसर्गिक आई पासुन वंचित झालेली पिलं पटकन Soft Mother कडे आकर्षीत झाली ही छोटी माकडाची पिल. त्या Soft Mother ला जाउन बिलगत असत,तिच्या अंगावर खेळत, आपल्या इवल्याशा हातांनी तिचा चेहरा ओरबाडत.,तिला चावत आणि तास न तास तिच्या अंगा पोटा वर तिला घट्ट बिलगुन पडुन राहत.मात्र एक गोची होती या आई कडे खाय प्यायला काही नसे तर मग ही पिलं भुक लागल्यावर Steel mother with milk जी होती तिच्याजवळ जात एकदाच तिथे दुध प्यायले की लगेच परत सॉफ़्ट मदर कडे येउन तिला बिलगत असत.यातुन एक महत्वाचा निष्कर्ष निघाला की बाळाच्या संगोपनात दुधाच्या गरजेपेक्षाही मोठी गरज ही मायेच्या स्पर्शाची,कुरवाळण्याची ही होती.आईचा स्पर्श व कुशीतला उबदार पणा अधिक गरजे चा आहे.दुसरा एक निष्कर्ष होता की खर्याु आईच्या प्रेमाचा बंध जरी मजबुत असला तरी Substitute mother ही तिची जागा भरुन काढु शकते.हार्लो म्हणतो" Certainly man cannot live by milk alone"
चेहरा हा प्रयोगाचा दुसरा पैलु
या प्रयोगा चे आणखीही काही पैलु होते त्यांनी प्रेमाचा एक घटक contact comfort शोधला तसाच दुसरा एक प्रयोग केला चेहर्याु संबंधी. हार्लोने एका आईपासुन तोडलेल्या दुसर्याी पिलाच्या पिंजर्या त एक वरच्यासारखीच एक Soft Mother ठेवली मात्र तिला चेहर्याणचे कुठलेच features जसे नाक,डोळे. कान न देता blank face च ठेवली.परीणाम असा पाहण्यात आला की ते जे छोट पिलु होत ते या blank face मदर च्या प्रेमात पडलं, नंतर हार्लो ने एक सुंदर सर्व features असलेला मास्क या blank face मदर ला लावला जि फ़ार च आकर्षक features असलेली होती.पण झाल अस की पिलु नविन चेहरा बघुन घाबरुन जात असे, किंचाळुन दुर पळत असे.त्याच्या अगदी जवळ तीला ठेवल तर पिलु तो मास्क काढुन टाकीत असे आणि पुर्वीचा blank face दिसला की च शांत बसत असे.यावरुन हा निष्कर्ष आला की जो बाळाच्या अगदी सुरुवातीला बघितलेला प्रेमळ आईचा जो चेहरा असतो तो त्याच्या नेणीवेवर खोलवर ठसा उमटवितो मग तो कसा का असेना आणि बाळ ते विसरु शकत नाही.
पुढील सर्व प्रेमसंबंध त्या पहील्या अनुभवाची पुनरावृत्ती
यावरुन च एक महत्वाची psychological थेअरी बनली जिच्या अनुसार पान्हा आटल्यावर देखील आईवरचं बाळांच जे प्रेम अबाधित राहतं याचं कारण तिच्या स्पर्शातुन मिळालेल प्रेम आणि हीच जी मुळ प्रेमाची स्मृती memory आहे तीच ते बाळ मोठ झाल्यावर carry करतो आणि मोठेपणीची त्याची प्रत्येक इतरांशी झालेली प्रेमाचे संबंध ही त्या पहील्या आईच्या प्रेमाची पुनुरावृत्ती केवळ असते.
Evil Mother चा परीणाम काय झाला ?
या प्रयोगात त्याने आणखी एका Evil Mother चा देखील समावेश केला यात ही Evil Mother बाळाला सुरुवातीला कुरवाळणे आदी प्रेम स्पर्श दिल्यानंतर या पिलांवर थंडगार पाणी ओतत असे, उचलुन जोराने दुर फ़ेकुन देत असे, कधी भोसकत ,मारत असे आणि आश्चर्य म्हणजे तरी ही पिलं अशा मारणार्या द्रुष्ट आईला प्रेमाच्या आशेने पुन्हा पुन्हा जाउन बिलगतं असत. याने अजुन एक निष्कर्ष समोर येत होता. की माणसाला कीतीही लाथाडलं तरी त्याच प्रेमस्त्रोता (source of love ) कडे जाणं थांबत नाही. माणुस सतत प्रेम शोधत असतो त्याचा एकवार मिळालेल्या प्रेमावर विश्वास बसतो. त्या source शी तो पुन्हा पुन्हा connect करण्याचा desperate प्रयत्न माणुस सतत करीत असतो.
प्रेमा पासुन मायेच्या स्पर्शापासुन वंचित झालेल्या रोमानियन मुलांवर काय परीणाम झाला ?
तर जी मुल अशा प्रेमापासुन वंचित राहतात अथवा प्रेम मिळण्याएवजी child abuse चा शिकार होतात त्यांच्या मेंदुच्या भावनिक नियंत्रण करणार्याम भागावर मोठा परीणाम घडुन येतो. मोठे सीरीयल कीलर्स हे बहुतेकदा child abuse चे शिकार अथवा आईच्या प्रेमा पासुन वंचित असतात. याचे एक उदाहरण म्हणजे रोमानीया या देशात १९६६ मध्ये कम्युनिस्ट सरकार होते यांचा हुकुमशहा नेता निकोल सेयुसेच याने सर्व प्रकारच्या गर्भनिरोधकांवर काही राजकीय हेतुंनी बंदी घातली. परीणाम स्वरुप मोठ्या प्रमाणावर मुलांचा जन्म झाला. जे गरीब कुटुंबातील होते, ज्यांना पोसणे जड होते त्यांनी सरकारी अनाथालयात आपली मुल जमा केली. मुलांच्या मोठ्या संख्येमुळे त्यांची अनाथालयात अजिबात काळजी घेतली गेली नाही. त्यांना बेड ला बांधुन ठेवुन एक बाटली पकड्वुन दीली जात असे, जास्त रडणार्याा बाळांना गुंगीची औषधे देउन झोपवुन ठेवले जात असे. मायेच्या स्पर्श अजिबात मिळत नसे.थंडीत उबदारपणाचा ही अभाव होता. सरकारी यंत्रणा एक ब्याद मिटवावी तसे ही बाळ सांभाळीत असे.यातील २५ % बाळ ५ वर्षांची होण्याच्या आतच दगावली. या मुलांच्या शारीरीक वाढी वर तर परीणाम झालाच मात्र त्याहुन भयानक परीणाम यांच्या मनावर झाला. ज्या पालकांनी ही रोमानीयन मुले दत्तक घेतलेली होती त्यांना या मुलांची अशी निरीक्षणे नोंदविली.
यातील काही मुले त्यांना स्पर्श केल्याबरोबर जोरजोरात रडायला सुरुवात करीत, काही मुले तासन तास शुन्यात बघत बसत काही अचानक हींसक होत असत आणी जे हातात येइल त्याने मारण सुरु करीत असत. एका कॅनेडीयन जोडप्याने असेच एक रोमानियन मुल दत्तक घेतलं होत त्यांनी एकदा बेडरुम मध्ये जाउन बघीतल तर त्यांच्या दत्तक मुलाने त्यांच्या मांजरीच्या पिल्लाला उचलुन सरळ खिडकीतुन बाहेरच फ़ेकुन दिल
या रोमानीयन मुलांचा एक मोठा सर्व्हे केला गेला यात जेव्हा या मुलांच्या मेंदुचा अभ्यास केला गेला त्यात यांच्या मेंदु च Imaging करुन बघीतल गेल तर अस लक्षात आल की. मेंदु चे दोन भाग orbifrontol cortex आणि amygdale ज्या माणसांतील भावना आणि माणसाचा सामाजिक व्यवहार या गोष्टींच नियंत्रण करतात या दोन्ही भागाची कार्यक्षमता मंदावलेली आहे. या मुलांमध्ये इतरांच्या भावना समजावुन घेण्याची आणि इतरांच्या चेहर्यांवरील भाव समजुन घेण्याची त्याचा अर्थ लावण्याची क्षमताच संपुन गेली होती.आणि सर्वात महत्वाच म्हणजे vasopressin आणि oxytocin ही महत्वाची हार्मोन्स जी माणसाला इतरांशी सामाजीक संबध स्थापण्यात महत्वाची भुमिका बजावतात या हार्मोन्स चे प्रमाण या मुलांत अतिशय कमी झालेले होते. ज्याने चांगले सामाजिक सकारात्मक संबंध प्रस्थापित करण्याची क्षमता ही मुलं हरवुन बसलेली होती. दुसर्यां च्या भावना समजुन घेण्याची कुवत ही मुल हरवुन बसली होती. प्रेम स्पर्श याने वंचित झालेल्या मुलांची अशी दयनीय करुण अवस्था झाली होती
हार्लो च्या प्रयोगांमधील प्राण्यावर करण्यात आलेली कृरता
हार्लो आपल्या प्रयोगांत करण्यात आलेल्या प्राण्यांवरील कृरते मुळे ही फ़ार बदनाम झाला. प्राणि हक्कांची चळवळ सुरु करण्यामागे याचे प्रयोग ही एक मुख्य प्रेरणा होते. हार्लो ने असंख्य वेगवेगळे प्रयोग या प्राण्यांवर केले होते काही तर अत्यंत भयानक असे क्रुर होते. सर्व जागे अभावी देता येत नाही पण एका चे उदाहरण देउन लेख संपवितो. आयुष्याच्या शेवट च्या काळात हार्लो ला डिप्रेशन वर संशोधन करायचे होते त्यासाठी त्याने परत एकदा RHESUS MACAQUE प्रजातीच्या माकडांची निवड केली. त्याने एक पुर्ण ब्लॅक अशा चेंबर ची निर्मीती केली. जे बाहेरील वातावरणा पासुन पुर्णपणे तोडलेले होते त्यात ही माकड त्याने सलग दोन वर्ष उलटी टांगुन ठेवली आणि ज्यांना साधी हालचाल किंवा बाहेरचा प्रकाश ही दिसणार नाही अशी व्यवस्था केली यांना अन्न एका जाळीमधुन खालुन दीले जात असे. याला तो वेल ऑफ़ डीस्पेयर म्हणत असे. याच्या लॅब समोर आजही प्राणी हक्क कार्यकर्ते दरवर्षी आंदोलन करतात.
वाचने
3665
वाचनखूण
प्रतिक्रिया
18
छान माहितीपूर्ण लेख!
माणसाच्या बाळाला दुधापेक्षा मायेच्या स्पर्शाची जास्त गरज असते असा निष्कर्ष निघाला असेल तर तो मॉस्लोच्या उतरंडीविरुद्ध जात नाही काय?
In reply to छान माहितीपूर्ण लेख! by नगरीनिरंजन
सिम्पथी, प्रेम वगैरे भावना ऊत्क्रांतीच्या अगदी अलीकडच्या टप्प्यावरच्या असल्याने, मॉस्लोच्या पिरॅमिडमध्ये त्यांना कोणता प्राधान्यक्रम द्यावा, हे निश्चितपणे सांगता येत नाही (मॉस्लोने हे कसं सांगितलं याची कल्पना नाही).
स्ट्रगल फॉर सर्व्हायव्हल, हे अजूनही बर्याच अंशी सत्य असलं तरी ते तसं राहीलच असं खात्रीलायकरित्या सांगता येणार नाही.
In reply to छान माहितीपूर्ण लेख! by नगरीनिरंजन
इथे त्यांना अन्नाची कमतरता न्हवती, म्हणून पिलांचे वागणे नैसर्गिक आहे.
केवळ चार घास पोटात ढकलून उरलेला बहुतांश वेळ घराबाहेर व्यतीत करणारे बरेच महाभाग या जगात असतात....
छान लेख.
अजून लिहा.
अजून लिहा
छान लिहिलं आहे. अजून लिहा. शीर्षक थोडे अजून रंजक करता आले असते.
अजून लिहा
माहितीपूर्ण आणि रंजक लेख आहे. आवडला.
याने अजुन एक निष्कर्ष समोर येत होता. की माणसाला कीतीही लाथाडलं तरी त्याच प्रेमस्त्रोता (source of love ) कडे जाणं थांबत नाही. माणुस सतत प्रेम शोधत असतो त्याचा एकवार मिळालेल्या प्रेमावर विश्वास बसतो. त्या source शी तो पुन्हा पुन्हा connect करण्याचा desperate प्रयत्न माणुस सतत करीत असतो.हे निरिक्षण विवाहित पुरुषांबाबतीत अगदी चपखल आहे नै!
In reply to छान लेख. by प्रभाकर पेठकर
अगदी अगदी.
लग्न झाले तरी विवाहित पुरुष सारखं 'आई, आई' करत राहतात. मेलं बायकोनी लाड केले तरी काही कौतुकच नसतं त्याचं... रोजच्या जेवणात पण आईच आठवत राहते! :D
In reply to अगदी अगदी. by कवितानागेश
:))
Animal cruelty definitely can't be the answer to the experiments.
Well written article.
फार छान माहीती आहे. अजुन लिहा.
चर्चेच्या वादळांत नि शाब्दिक खणाखणीत कधीतरी असा सुरेख अभ्यासपूर्ण लेखही वाचायला मिळावा हे सुचिन्ह. पुलेशु.
या प्रयोगात वापरण्यात आलेल्या माकडांची दया येते.
आणि उलटे टांगुन ठेवणे वगैरे तर क्रौर्याची परिसीमा आहे.
माया, ममता, प्रेम अशा भावनांसंबधी संशोधन करण्यासाठी, इतके असंवेदनाशील प्रयोग करावे लागावेत हे दुर्दैव !
माहितीपूर्ण लेख आवडला.
एका सर्वस्वी नव्या विषयावर अभ्यासपूर्ण लेख वाचायला मिळाला. धन्यवाद.
मायकल क्रायटनने लिहिलेल्या 'नेक्स्ट' या पुस्तकाची आठवण झाली. त्यात एका मादी चिम्पाझीमध्ये तिच्यावर प्रयोग करणारा शास्त्रज्ञ स्वत:चे शुक्राणु टाकतो आणि त्यातून जन्माला आलेला चिम्प/माणूस कधी माणसासारखा तर कधी माकडासारखा वागतो. त्याला पूर्णपणे माणसात आणण्याच्या फंदात तो चिम्प/माणूस धमाल उडवून देतो.
तसेच माणसासारखे बोलायची कला अवगत असलेल्या एका ट्रान्सजेनिक ओरांग उटांगचा त्या कथेत मानवी मोहापायी शोकांत कसा होतो तेही लिहीलं आहे.
छान. असेच लिहीत रहा आणि आमच्या ज्ञानात भर घालत रहा. :)
वेगळ्या विषयावरचा एक जबरदस्त लेख !!!
अजुन लिहीत राहा !!!
छान माहितीपूर्ण लेख!