Skip to main content

आहे मी ब्राह्मण!! मग??

लेखक वडापाव यांनी शनिवार, 09/11/2013 16:34 या दिवशी प्रकाशित केले.
आठवीनंतरच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत कोकणात गेलो होतो. तिकडे एका मित्राबरोबर पैज लाऊन सात वाट्या ताक प्यायलो होतो (तेव्हाची कॅपॅसिटी तेवढीच होती). आम्हांला ताक वाढणा-या मावशींनी सहाव्यांदा वाटीत ताक ओतताना 'तुझी जात कोणती रे?' असं हळूच विचारलं. "ब्राह्मण!!" "वाटलंच मला!" असं हसत म्हटलं आणि निघून गेल्या. सातव्यांदा ताक ओतताना, "राग नाही ना आला?" असं विचारलं आणि मी "नाही, राग का येईल?" असं म्हटल्यावर पुन्हा हसत हसत निघून गेल्या. नवीन नवीन मैत्री झालेल्या मित्रमंडळात मी एक गोष्ट नेहमी पाहिलीये. गप्पा मारताना सणवार, लग्न, किंवा घरातल्या इतर कोणत्यातरी समारंभाच्या विषयावरून "आम्ही अमुक अमुक जातीचे आहोत ना, आमच्यात असं असतं" असं कोणीतरी म्हटलं, की त्यावरून जातीचा विषय निघतो, आणि मग ग्रूपमधल्या निदान एकालातरी सगळ्यांची जात विचारायची खाज सुटते. तसं त्याने एक-दोघांना विचारल्यानंतर बाकीच्यांच्या चेह-यावर त्यांची पाळी आली की लगेच आपली जात सांगण्याची तयारीही दिसून येते. तशी ती माझ्यावर आली, आणि मी ब्राह्मण म्हटलं, की "तू ब्राह्मण आहेस???" अशी कोरसमध्ये प्रतिक्रिया ब-याचदा येते. मग त्यापाठोपाठ 'वाटत नाही तुझ्याकडे बघून', 'तुझ्या बोलण्याच्या स्टाईलवरून कळतं', 'वाटलंच होतं मला' अशा प्रतिक्रिया येतात. त्यांचं मला विशेष असं काही वाटत नाही. गंमत वाटते, ती 'सही रे!!!' या प्रतिक्रियेची. मी ब्राह्मण आहे, यात 'सही' काय आहे? मला कळत नाही. एकदा आमचा एक ग्रूप क्लासच्या दिशेने चालला होता. त्यात एक 'सुबक ठेंगणी' मुलगीही होती. मी अर्थात तिला कंपनी देत होतो. आणि आमचा बोलण्याचा विषय आमच्याच ग्रुपमध्ये आमच्या पुढे चालणा-या एका मुलाचा होता. ती मुलगी म्हणाली, 'तो मला अजिबात आवडत नाही. डोक्यात जातो.' 'का गं, काय झालं?' 'तो ब्राह्मण आहे आणि सगळे ब्राह्मण बायले असतात.' मी थबकलो. आणि त्या मुलीकडे बघून हसलो. तशी तीही चमकली. 'तू ब्राह्मण आहेस?' 'हो!!' 'सॉरी सॉरी सॉरी... तू बायल्या नाहीयेस. पण बरेच ब्राह्मण बायले असतात.' मी वाद घातला नाही. तिने सुद्धा माझ्या आडनावाचं एका भंडारी आडनावाशी साधर्म्य असल्याने मी ब्राह्मण कसा असा प्रश्न विचारला आणि मग तो विषय तिथेच थांबला. त्या दिवसानंतर ती मुलगी माझ्याशी तितक्याच सलगीने पुढे कधी बोल्ल्याचं मला आठवत नाही. गप्पा मारताना मध्येच मला, 'तू ब्राह्मण आहेस का?' असं निदान पंधरा-वीस लोकांनी तरी आत्तापर्यंत विचारलं असेल. 'नाही काय आहे, तू जे नॉर्मल मराठी बोलतोस ना ते सुद्धा खूपच हाय लेवलचं आहे ना म्हणून विचारलं!' काय संबंध???? माझे कितीतरी मित्र असे आहेत, ज्यांचं मराठी माझ्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त चांगलं आहे. त्यातला एक आग्री आहे, एक क्षत्रिय आहे आणि एक महार आहे(आणि यांनासुद्धा लोक 'तू ब्राह्मण आहेस का?' असं विचारतात). इतकच नाही, तर कितीतरी ओळखीची मंडळी अशी आहेत ज्यांचं मराठी भंगार आहे आणि ते ब्राह्मण आहेत. पुण्याच्या गोडबोले नावाच्या एका मित्राची टोपी हरवली होती. ती सापडली का, असं विचारलं तेव्हा तो 'हो भेटली!' असं म्हणाला होता. माझं स्वतःचं मराठीसुद्धा तितकसं चांगलं आहे असं मला वाटत नाही. चिरणे आणि कापणे, यात माझा नेहमी गोंधळ उडतो. भाजी चिरतात, फळं कापतात हे माहितीये, पण तरीही ब-याचदा मी उलटं बोलतो. आमच्या घरी नॉन-व्हेज खाण्यावर बंदी नाही. पण घरी आम्ही सहसा नॉन-व्हेज खात नाही, कारण कुणाला करताच येत नाही. त्यामुळे आम्हांला आमच्या शेजा-यांनी, वहिनीच्या माहेरच्यांनी, कधी हौसेने चिकन-मटन आणून दिलं, की आम्ही त्यावर मस्त ताव मारतो. वडिलांचे एक मित्र तर ब-याचदा आम्हांला त्यांच्या घरी मासे खायला बोलावतात. तरी माझे आई-वडील 'शक्यतो आपण जास्त नॉन-व्हेज खाऊ नये' असं म्हणतात. त्यामागे कारण हे, की लहानपणापासून शाकाहाराची सवय असलेल्या शरीराला एकदम नॉन-व्हेजचा पुरवठा झाला, तर त्याचे परिणाम खाल्ल्यानंतर दुस-या दिवशी सकाळी दिसून येतात. हॉटेलात मित्रमंडळींबरोबर नॉन-व्हेज खात असताना मात्र बरेच अब्राह्मण मित्रच माझ्या नॉन-व्हेज खाण्यावर आक्षेप घेताना दिसतात. मी तर श्रावणात सुद्धा नॉन-व्हेज खातो. 'तू ब्राह्मण ना, मग नॉन-व्हेज कसा काय खातोस?' अशी मला विचारणा होते. 'काही फरक पडत नाही. हल्ली सगळेच ब्राह्मण खातात.' असं मी म्हटलं, की माझ्या वाक्याला पुष्टी जोडणारी उदाहरणं सुद्धा मिळतात, आणि, 'नाही हा, आमच्याइकडे एक ब्राह्मण आहेत, जे नॉनव्हेज असलेल्या टेबलावर बसत सुद्धा नाहीत' 'आमचा एक ब्राह्मण मित्र नॉन-व्हेज तर खातो, पण घरी जाऊन स्वत:वर गोमुत्र शिंपडून घेतो.' असे किस्सेसुद्धा ऐकायला मिळतात. 'तुझ्या घरी माहितीये का तू इथे नॉन-व्हेज खातोस ते? तुला घरचे काही बोलत नाहीत?' असं लोक विचारायला लागले, की माझं एक लांबलचक उत्तर रेडी असतं. "पूर्वी शिक्षणाची मक्तेदारी ब्राह्मणांकडे होती. शिक्षण घेण्याची, किंवा देण्याची सगळ्याच जातीच्या लोकांना अनुमती नव्हती. आता बघा, शिक्षण देण्या-घेण्याचा अधिकार हा सगळ्या जातीच्या लोकांना समान आहे. तसंच पूर्वी ब्राह्मणेतर नॉन-व्हेज खायचे. आता सगळ्यांबरोबर ब्राह्मणही नॉन-व्हेज खाऊ लागले तर काय बिघडलं?" शरीराला पचत नाही, वासाचा त्रास होतो, दुस-या जीवाला मारून खाणं पटत नाही, म्हणून नॉनव्हेज कुणी खात नसलं तर ठीक आहे. पण 'मी ब्राह्मण आहे, म्हणून मी नॉन-व्हेज खाणार नाही', असा विचार करणारा माणूस (जो जन्मामुळे ब्राह्मण आहे) मागासलेल्या विचारांचा आहे असं नाही का म्हणता येणार?? विशिष्ट भाषा-जाती-धर्म-प्रांताच्या लोकांतील काही गुणांत-अवगुणांत साधर्म्य आढळतं हे मान्य!! पण ते एखाद्या जातीच्या सर्वच व्यक्तींत, सर्वच बाबतीत आढळून यावं असं तर नाही ना. आज समाजात अशी ब्राह्मण मंडळी आहेत, जी स्वतःला ते ब्राह्मण असल्यामुळे जास्त श्रेष्ठ समजतात. आणि त्यांचं हे मत उघडपणे मांडतात सुद्धा. बरीच अशी मंडळीही आहेत, जी ब्राह्मण असूनही ब्राह्मणांनाच शिव्या घालतात. पण काही अशी मंडळीसुद्धा आहेत, ज्यांना आपण ब्राह्मण असल्याचा गर्वही नाही, लाजही नाही. ब्राह्मणतेरात काही अशी मंडळी आहेत, जी ब्राह्मणांचा ते ब्राह्मण आहेत म्हणून द्वेष करतात. तर काही अशी मंडळी आहेत, ज्यांच्या मनात एखादा माणूस ब्राह्मण आहे हे कळल्यावर त्याच्याविषयी कौतुक आणि आदर वाटायला लागतो. जातीवरून माणूस चांगला की वाईट, हुशार की मठ्ठ, हे ठरवणं चुकीचं आहे. जातीचा दुराभिमान बाळगणारे, जातीवरुन लोकांना संघटित करणारे, जातीविषयी लाज बाळगणारे, जातीच्या अशा मानल्या गेलेल्या जुन्या रुढी परंपरा जपणारे, आणि जातीची यत्किंचितही पर्वा नसणारे असे लोक हे सगळ्या जातींत असतात. तेव्हा ठरावीक लोकांच्या स्वभावावरुन अख्ख्या जातीचं चारित्र्य ठरवणं हा मूर्खपणा आहे. हे फक्त ब्राह्मणांच्या बाबतीत होतं असं नाही. त्यामुळेच इथे ब्राह्मण-ब्राह्मणेतर असा मुद्दाही मांडायचा नाही. सगळ्याच जातींच्या बाबतीत होतं. मी ब्राह्मण जातीचा आहे त्यामुळे मी ब्राह्मणांबद्दल माझ्या अनुभवातून सांगितलं. दुस-या जातीचा असतो, तर फक्त नाव आणि उदाहरणांचं स्वरूप बदललं असतं, मुद्दा तोच राहिला असता.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 44786
प्रतिक्रिया 170

प्रतिक्रिया

In reply to by अत्रुप्त आत्मा

@काही दिवसांनी (पिढ्यांनी) जात सांगायचे / विचारायचे कारण आपोआप नाहिसे होईल.>>> ते मी म्हटलं तश्याच 'कार्यक्रमांनी' शक्य होणार आहे. नो प्रॉब्लेम ! एका किंवा अनेक कोणत्याही प्रकारे भारतातील अयोग्य रुढी-परंपरा जर दूर झाल्या तर आनंदच आहे... त्या भूतकाळात जाणे जास्त महत्वाचे. (एखादी गोष्ट करण्याचे एकापेक्षा जास्त प्रकार बरोबर असू शकतात यावर विश्वास असणारा) इए

माननीय वडापावजी, तुमच्या धाग्याच्या विषयामुळे एका संपादकाला हितं तळ ठोकून र्‍हावं लागतय व प्रतिसाद देत बसावं लागतय. असे धागे विकांताला काढून संपादकांना सुट्टीचा आनंद मिळू देत नाही तुम्ही! आता निदान तुमच्या धाग्याला चार प्रतिसाद दिलेत हे लक्षात ठेऊन माझा धागा येईल तेंव्हा सव्याज परतफेड करावी.

In reply to by रेवती

संपादकीय अधिकारांचा वापर करून "माझा कंपू" ही जात बनविण्याचा अशक्त प्रयत्न असल्याचा वास या प्रतिसादाला का ब्रे येतोय ? ;) (मिपा जमातीच्या रितीभातींप्रमाणे टीव्र णीशेढ वेग्रे करावा काय या विचारातला) इस्पीकचा एक्का (हघ्या)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मिळाला, नव्या धाग्याचा विषय मिळाला! "आहेच मी कंपूबाज!!! मग?" ;) मदनबाण, वडापाव यांना एवढ्यात चार प्रतिसाद देऊन झाल्याने त्यांच्याकडून किमान दोन दोन प्रतिसाद, तुम्ही एखादा द्या, मउवा, बाबा पाटील यांना आत्ताच एक उपप्रतिसाद दिलाय त्यामुळे तेही देतील. संपादकांना चावडीवर आणि महिलांना अनाहितामध्ये आवाहन केल्यास बघता बघता शंभरेक प्रतिसाद मिळतील.

In reply to by रेवती

प्रतिसादांबद्दल आभारी आहे. :) तुमच्या कंपूत यायलाही आवडेल, तसंही सांजसंध्यांनी माझा मित्रपरिवार वाढावा असा आशीर्वाद दिलेलाच आहे.

In reply to by रेवती

मतांची जमवाजमव करण्याची कोष्टकं पाहून निवडणूका जवळ आल्याची खात्री झाली ;) आमीपण तुमच्या कंपूत. तेवढेच दोनचार छानछान प्रतिसाद मिळले तर कोणाला नको आहेत? +D

'मी ब्राह्मण आहे, म्हणून मी नॉन-व्हेज खाणार नाही', असा विचार करणारा माणूस (जो जन्मामुळे ब्राह्मण आहे) मागासलेल्या विचारांचा आहे असं नाही का म्हणता येणार?? अहो प्राचीन काळापासुन ब्राम्हण अगदी व्यवस्थित मांसाहार करीत असत त्याला धर्माची पुरेपुर मान्यता होती. म्हणुन ब्राम्हण जर मांसाहार करीत नसतील तर ते आधुनिक ठरतात कारण ते आपल्या पुर्वजांची जुनी मांस खाण्याची परंपरा मानायला नकार देत आहेत. ते आधुनिक आणि बंडखोर आहेत म्हणुन आपल्या पुर्वज ब्राम्हणांची मांस खाण्याची परंपरा नाकारुन शाकाहार करीत आहेत. आता यझ संचालन करण्याचा अधिकार केवळ फ़क्त ब्राम्हणांना च होता हे तुम्हाला माहीत आहे हे गृहीत धरुन चालतो. क्षुद्र आदींना त्याच्या आसपास ही येण्यास मनाई होती हे ही माहीत असेल असे समजतो. एतरेय ब्राम्हण आपण वाचलेच असेल. आणि हा त्यातील प्रसिध्द श्लोक ज्यात यज्ञात बळी दिलेल्या प्राण्याच्या अवयवांची वाटणी यझ संचालित करणार्याक ब्राम्हणांत कशी करावी याचे स्वच्छ वर्णन केलेले आहे. याचा मुळ संस्कृतश्लोका ची लिंक ही देतो आणि त्याचा इंग्रजी अनुवाद ही देतो. हे समजण्यास काही अडचण आली तर अजुनही खोलात जाउ शकतो. तुर्तास एवढे पुरेल बहुधा आणि एक मधुपर्क म्हणजे काय ? तो कोणी कोणाला द्यायचा असतो ? आणि त्याच्या व्याख्येत नांमासो मधुपर्क भवति असे का म्हटलेले आहे हे जरा शोधुन काढा. Indology चा अगदी पहीला प्राथमिक धडा जरी अभ्यासला तरी चालेल. http://hinduonline.co/Scriptures/Brahmana/AitareyaBrahmana.html "Now follows the division of the different parts of the sacrificial animal (among the priests). We shall describe it. The two jawbones with the tongue are to be given to the Prastotar; the breast in the form of an eagle to the Udgatar; the throat with the palate to the Pratihartar; the lower part of the right loins to the Hotar; the left to the Brahma; the right thigh to the Maitravaruna; the left to the Brahmanuchhamsi; the right side with the shoulder to the Adhvaryu; the left side to those who accompany the chants; the left shoulder to the Pratipasthatar; the lower part of the right arm to the Neshtar; the lower part of the left arm to the Potar; the upper part of the right thigh to the Achhavaka; the left to the Agnidhra; the upper part of the right arm to the Aitreya; the left to the Sadasya; the back bone and the urinal bladder to the Grihapati (sacrificer); the right feet to the Grihapati who gives a feasting; the left feet to the wife of that Grihapati who gives a feasting; the upper lip is common to both, which is to be divided by the Grihapati. They offer the tail of the animal to wives, but they should give it to a Brahmana; the fleshy processes (maanihah) on the neck and three gristles (kikasaah) to the Grahvastut; three other gristles and one half of the fleshy part on the back (vaikartta) to the Unnetar; the other half of the fleshy part on the neck and the left lobe (Kloma) to the Slaughterer (Shamita), who should present it to a Brahmana, if he himself would not happen to be a Brahmana. The head is to be given to the Subrahmanya, the skin belongs to him (the Subrahmanya), who spoke, Svaah Sutyam (to morrow at the Soma Sacriice); that part of the sacrificial animal at a Soma sacrifice which beloings to Ilaa (sacrificial food) is common to all the priests; only for the Hotar it is optional. All these portions of the sacrificial animal amount to thirty-six single pieces, each of which represents the paada (foot) of a verse by which the sacrifice is carried up..." "To those who divide the sacrificial animal in the way mentioned, it becomes the guide to heaven (Swarga). But those who make the division otherwise are like scoundrels and miscreants who kill an animal merely." "This division of the sacrificial animal was invented by Rishi Devabhaaga, a son of Srauta. When he was departing from this life, he did not entrust (the secret to anyone). But a supernatural being communicated it to Girija,the son of Babhru. Since his time men study it." [Aitareya Brahman, Book 7, Para 1, ]

In reply to by मारवा

ब्राह्मणांच्या मांसाहाराचे पुरावे वेदकाळापासून आहेत- नाकारत कोणीच नाही. पण शाकाहार करणे हा प्रकार गेली दीडेक हजार वर्षे तरी सुरू आहे. त्यामुळे अगोदरची मांसाहारी परंपरा मोडली अन शाकाहारी परंपरा सुरू झाली त्यालाही लै वर्षे झाली, त्यामुळे सद्यस्थितीत मांसाहार करणे हे आधुनिक आहे इतके सांगून मी आपली (फुल्लि पेड) रजा घेतो.

In reply to by बॅटमॅन

अख्खी मानवजातच शाकाहारी होती आधी, नंतर ऑम्निवोरस म्हणून उत्क्रांत झाली, असे पुरावे आहेत. मांसाहार चुकीचा नाहीच. अन आपण मानव १००% मांसाहारी ही नव्हेत. आधुनिक, अर्वाचिन, प्राचीन, नक्की कोणत्या काळापासून हे फक्त चष्मे आहेत. खाण्याचाच विषय आहे, तर जातींशी जोडलेला आहार हा एक चष्मा छानही आहे अन वाईटही. रामग्याचं/शेंडीचं मटन, अन उकडीचा मोदक, किंवा आमटी-पाटवड्या, किंवा पाया सूप... जे असेल ते. एका विशिष्ट समाजघटकाच्या नेहेमीच्या खाण्यापिण्याचा भाग म्हणून विकसित झाले, अन त्या त्या 'जाती'ची ओळख म्हणून प्रसिद्ध झालेत. पूर्वी 'क्षक्षक्ष हिंदू मटन खाणावळ' अशी पाटी कुणाला खटकत नसे, तसेच शिंप्याचे दुकान, भटाची ओसरी, वाण्याची लबाडी, तांबोळ्याचे दुकान, किंवा खाटिकखाना इ. वाक्प्रचार/शब्दही खुपत नसत... लेखापाठचा मुद्दा, 'आजकाल अस्मिता जास्तच हुळहुळ्या झाल्यात', हा असावा.

In reply to by आनंदी गोपाळ

मान्य आहे ओ साहेऽबं, ते यकदोन स्मायल्या र्‍हाऊन गेल्या बगा अम्मळ :) लै शिरेस न्हौतो आमी. बाकी ते हुळहुळ्या अस्मितांबद्दल सहमत आहे. अस्मितेची गळवे लै ठसठसलेली आहेत अलीकडे ;)

In reply to by आनंदी गोपाळ

जातीशी संबंध फक्त आहाराचाच नाही, पत्येक गोष्टीचा लावला जातो ,जसे की 'देवता'... गणपती, दत्त, श्रीराम- ब्राह्मणांचे म्हसोबा, खंडोबा- धनगरांचा तुळजाभवानी ,ज्योतिबा -मराठ्यांचे एकविरा देवी- कोळ्यांची शंकर- लिंगायतांचे परशुराम -कोकणस्थांचे... (जातिअनुषंगाणे टिपाकल आहेत)

In reply to by ग्रेटथिन्कर

तुळजाभवानी ,ज्योतिबा -मराठ्यांचे काय राव कैच्या काय ? दोन्ही आमच्या कडे कुलदेवता व कुलदेव आहेत देवाला तरी जातीच्या बंधनात बांधू नकोस रे ग्रेट्या तुम्हाला कोणी अडवलेय दत्त गुरुन्जी, गणपतीची किंवा परशुरामाची भक्ती करायला ?करत जावा कि ! (काही भाग अप्रकाशित) - संपादक मंडळ. स्वतःला फक्त (शाकाहारी )हिंदू समजणारा

In reply to by चेतनकुलकर्णी_85

कुलकर्णी साहेब, त्यांनी फक्त जनरल स्टेटमेंट केलेलं आहे. नि त्यात 'थोडंसं' तथ्य आहे. तुळजाभवानीचे पुजारी हे जन्मानं ब्राह्मण नसतात. तिथं 'वशाटा'च्या सवासणी जेवायला घातल्या जातात नि तुलनेने ब्राह्मणांची संख्या खरंच कमी असते. ज्योतिबालासुद्धा पुजारी ब्राह्मण नाहीत. तिथं सुद्धा ब्राह्मणांची संख्या तुलनेनं कमी असावी. कुलदेव/देवी म्हणून दर्शनाला जाणं हा भाग वगळता 'आवड' म्हणून देवाला जाणारा वर्ग पाहिला तर वरचं स्टेटमेंट लक्षात येईल. मी वाईचा. मांढरदेवी (काळूबाई) इथं जाणारा वर्ग हा मुख्यत्वे गावाकडचा नि त्यातसुद्धा हरिजन वर्गातला असा असतो. तिथं मराठा समाज सुद्धा कमीच पहायला मिळतो. विठोबाच्या दर्शनाला जाणारा माणूस काळा, रापलेला, सुरकुतलेल्या चेहर्‍याचा कष्टकरी शेतकरी असतो. नि कृष्णाच्या दर्शनाला जाणारा गोरा, श्रीमंती छटा असलेला असतो. हे 'सामान्य' विधान आहे. जनरल स्टेटमेण्ट. असाच फरक वेगवेगळ्या सामाजिक संस्थांच्या, आश्रमांच्या विषयी करता येतो. -इतरांपेक्षा मागास म्हणून इतरमागास ;) प्यारे

In reply to by प्यारे१

तुळजाभवानीचे पुजारी हे जन्मानं ब्राह्मण नसतात
हे जण्रल असेल स्टेट्मेण्ट तर ओके. अन्यथा चूक आहे. ;) -मागास प्यारेचा अतिमागास मित्र ;) अभ्या

In reply to by अभ्या..

अबे अभ्या, आम्ही गेलो ते 'कदम' म्हणून होते... अगदी देवळासमोर. त्यांनी अगदी देवीची पूजा वगैरे सगळं सांगितलं नंतर मंगळावर म्हणून सवाष्णं आहेत म्हणे, मटण होतं. आम्ही पुरणपोळ्या घेतल्या बांधून. ते कदम पूजा करतात ना? देवीच्या पुजार्‍यांना काय म्हणतात ते नेमकं विसरलो बघ. (पंढरपूरचे विठोबाचे बडवे, रुक्मिणीचे उत्पात तसे) बाकी ज्योतिबाचे पुजारी नक्की ब्राह्मण नाहीत.

In reply to by प्यारे१

भोपी भोपी. कदम असतात ते भोपी किंवा भोप्या. कोंडो, पोफळे आहेत ते उपाध्ये. पूजेची वर्णी त्यांना असते. जातवार डिट्टेल लैच आहेत पार आदिलशाही, निजामशाहीपासून चालत आलेत. असल्या अधिक माहितीसाठी दै. सकाळ ची उस्मानाबाद आवृत्ती वाचावी नवरात्रात. ;)

In reply to by प्यारे१

(पंढरपूरचे विठोबाचे बडवे, रुक्मिणीचे उत्पात तसे)
बडवे हे पांडुरंगाचे पुजारी नव्हेत हे नमूद करू इच्छितो. विठोबाच्या पुजार्‍याचे आडनांव पुजारी च आहे. बडवे हे केवळ विश्वस्त आहेत. बडवे हे मूळचे कर्नाटकातील देवर निंबर्गी गावचे. ह्या पुजार्‍यांचे आणि बडव्यांचे विळ्या भोपळ्याचे सख्य आहे. पण एकूणच संख्या बळात जास्त असल्यामुळे बडव्यांचा वचक वाढत गेला. असे असले तरी विठठलाच्या पूजेचा अधिकार पुजार्‍यांनाच आहे. आपण विठ्ठ्लापुढे पहिल्यांदा जी दक्षिणा ठेवतो ती बडव्यांकडे जाते (आता ती मंदिर समितीकडे जाते) आणि पुढची ठेवलेली दक्षिणा (ज्याला ओवाळणी म्हटले जाते) पुजार्‍यांना मिळते. ह्याच कारणामुळे आलेल्या भक्ताकडे बर्‍याचदा दुसर्‍यांदा दक्षिणेची मागणी केली जाते. ज्यांना ही विभागणी माहिती आहे ते स्वखुशीने ठेवतात, पण ज्यांना माहीत नाही, त्यांचा गैरसमज होतो आणि वादाचे प्रसंग उद्भवतात. अर्थात ह्यात भाविकांचा काहीच दोष नाही. असो, बरेच अवांतर झाले. बाकी चर्चा चालु द्या (विठोबाच्या पुजार्‍यांचा भाचा) चावटमेला

In reply to by प्यारे१

कदम पाटलांना येथील तुळजापूर धरून १६ गावची पाटीलकी होती, ते येथील पारंपारिक पुजारी आहेत.देवीच्या विधीचे ,कार्याचे इतर काही मान आहेत ते वेगवेगळ्या समाजाला आहेत. देवीचा विड्याचा मान मुस्लिम धर्मियांना आहे.देवीच्या खानपानाचा मान दीक्षितांना आहे. देवीला मटनाचा नैवैद्य असला तरी पहिला नैवैद्य हा साधी भाजी आणि भाकरीचा असतो

In reply to by आनंदी गोपाळ

'क्षक्षक्ष हिंदू मटन खाणावळ' अशी पाटी कुणाला खटकत नसे, तसेच शिंप्याचे दुकान, भटाची ओसरी, वाण्याची लबाडी, तांबोळ्याचे दुकान, किंवा खाटिकखाना इ. वाक्प्रचार/शब्दही खुपत नसत...
मी तर, 'संत ज्ञानेश्वर मटण शॉप' अशी पाटीही पुण्यात पाहिली आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

मी तर शेतकी महाविद्यालय चौकात (पोलिस ग्राऊंडच्या समोर) वीर चाफेकर मटण मार्केट देखील पाहीले होते. महानगरपालिकेचे मटण मार्केट होते ते. नंतर लोकांनी आंदोलन करून ते नाव बदलायला लावले.

http://www.maayboli.com/node/46230 हे असलं अजूनही असतं. बाकी लेख उत्तम व संतुलित आहे. प्रतिसादही छान आहेत. टायटलवरून पर्सूरामब्रिगेड वर्सेस संबाजीब्रिगेड अस्लं कायतरी असेल असं वाटलेलं. ते चुकीचं निघालं याचा आनंद आहे. -आनंदी, गोपाळ.

In reply to by आनंदी गोपाळ

अजिबात धक्का बसला नाही. कोरियातच काय, कुठेही अशा प्रकारचा जातीयवाद व उलटजातीयवादही चालतच आहे. अगदी आजही. आणि ग्रेथिंच्या म्हणण्यानुसार मुली जास्त जातीयवादी असतात हेही खरंच आहे. "आणि तोपर्यंत?" हा प्रश्नमात्र कायम अनुत्तरितच राहतो. काय करायचे तोपर्यंत?

अहो प्राचीन काळापासुन ब्राम्हण अगदी व्यवस्थित मांसाहार करीत असत त्याला धर्माची पुरेपुर मान्यता होती.
ऐकून आहे. म्हणूनच त्याकाळी त्यांच्याकडे गायी भरपूर असायच्या... नंतर ते जसेजसे दक्षिणेकडे वळले तसं-तसं त्यांचा मांसाहार कमी झाला आणि मग ते कालांतराने शाकाहारी झाले इ इ असंही ऐकलंय. याची आठवण करुन दिल्याबद्दल आणि त्यापुढे एवढी विस्तृत माहिती दिल्याबद्दल आभार. पण याचा अर्थ 'शाकाहार करणे' हे चल तत्त्वांत गणावे लागेल का? आधी मासांहार करायचे, मग बंद झाले, आता काही जण करतात काही जण नाही. धर्माची काही स्थिर आणि काही चल तत्त्वे असतात . चल तत्त्वे कालानुरूप बदलतात ,जसे की १९ व्या शतकात चालू असलेल्या सतीप्रथा / विधवा केशवपन इत्यादि कुप्रथा आज बन्द झाल्या म्हणून धर्म बुडाला नाहीए . पण धर्माची स्थिर तत्त्वे असलेले व्यक्तिगत सन्स्कार ,जसे की चोरी करणे हे पाप आहे ,आणि ते मागच्या शतकातही पाप होते आणि आजही पाप आहे - मंदार कात्र्यांच्या या बोलण्यावरुन ते शाकाहार हे स्थिर तत्त्वांत मोडतायत असं दिसतं. मुळात इथे ब्राह्मणांनी किंवा कोणीही मांसाहार करावा की करु नये हा मुद्दाच मांडायचा नव्हता - नाहीये. मांसाहार करणे हे ज्याच्या-त्याच्यावर अवलंबून आहे - मान्य. पण मांसाहार न करण्यामागची भूमिका ही 'माझा धर्म किंवा माझी जात भ्रष्ट होईल' अशी असेल तर ते त्या व्यक्तीचं मागसलेपण आहे.

अहो तुम्ही नाकारत नाही ही चांगलीच गोष्ट आहे पण मी या धागाकत्यांना उत्तर देत होतो त्यांच्या लेखावरुन तरी त्यांना याविषयी काही माहीती असेल असे दिसत नाही. अन्यथा त्यांनी जे त्यांना मांसाहारा वरुन हीणवत आहेत अशांना मांसाहाराच्या उज्वल परंपरे च्या समर्थनार्थ त्याच जोशात उत्तर दिले असते ज्या जोशात त्यांनी हा लेख लिहीलेला आहे.

In reply to by मारवा

पण धागाकर्त्याचे मत कै 'शाकाहार हेच जीवन आणि मांसाशन हा मृत्यू' असे दिसत नै. त्या प्रतिक्रिया अजून तरी इथे आल्या नैत हे बरेच झाले.

थोड विस्तारांन सांगा कुठली स्थिर तत्वे आणि ब्राम्हणांचा त्याच्याशी असलेला संबंध सांगितला तर मलाही थोडीफ़ार माहीती होइल.दुसर म्हणजे तुमच्या लेखात दुर दुर पर्यंत स्थिर तत्वांविषयी काही सांगितलेलं दिसत नाहीये!

In reply to by मारवा

मला त्यातली घंटा माहिती नाही. मुळांत ही स्थिर-चल तत्त्वांची संकल्पना प्रतिक्रियांमधून कळली. कुतुहूल निर्माण झालं, म्हणून तर तुम्हांला शंका विचारतोय... तुम्ही जाणकार दिसता. आणि माहिती असती तरी लेखात त्याबद्दल काही दिलं नसतं कारण मला विशिष्ट जाती आणि त्या जातीबद्दलच्या लोकांच्या विचारसरणीवर लिहायचं होतं, त्यात उदाहरण म्हणून मी ब्राह्मण जातीची निवड केली कारण मग मला आलेले अनुभव मला सोयीने मांडता आले.

मी पण जंगी कुस्ती सामना बघायच्या उद्देशाने आलेलो, परंतु इथे तर चमचालिंबु सामना चालू होता... ( सामाजीक इषयावर टंकायची खुमखुमी भागवायला आजकाल संकेतस्थळ मिळत नाहीत ,अशी संकेतस्थळं असल्यास, लिहा अथवा समक्ष भेटा-ग्रेटथिंन्कर)

In reply to by ग्रेटथिन्कर

आता या धाग्यात तुमच्यासारख्या रथीमहारथींनीसुद्धा कामदेवी बाण मारले तर मग रणधुमाळी माजून त्याचं महाभारत कसं होणार रावसाहेब? काही धाग्यांचं नशिबच तसं बघा ;) पण एक नक्की. या धाग्यावरचे तुमचे विचार आवडले. याबाबत धन्यवाद आणि अभिनंदन ! (समतोल विचार करणारे सभासद बहुसंख्येने आहेत म्हणून मिपावर टिकून राहिलेला) इए

In reply to by ग्रेटथिन्कर

सामाजीक इषयावर टंकायची खुमखुमी भागवायला आजकाल संकेतस्थळ मिळत नाहीत ,अशी संकेतस्थळं असल्यास, लिहा अथवा समक्ष भेटा
स्वतःचेच संस्थळ काढा! ;)

आम्ही तसे हॉटमेलच्या जमान्यातले... आजवरच्या नेट आयुष्यात जात पात विषयक अनेक चर्चा वाचायला मिळाल्या, ब्राह्मण देशस्थ कोकणस्थ कंजूष, दानशूर पुणेरी सदाशिवपेठी अशी ठरलेली स्टेशने यायला लागली की गाडी कुठे जाणार याचा अंदाज यायला लागतो... २००४ पासून बी-ग्रेडने त्यात आणखी नवे रंग भरले... असो चालू द्या

खर सागांयच म्हणजे आजकाल रोजच्या व्यवहारात जातपात अगदी मनात पण येत नाही . सर्वांना इतर जातीतले मित्रमंडळीच जास्त असतात.आणी संकट काळी आपल्या नात्यागोत्या पेक्षा हे मित्र व शेजारच जास्त कामी येतात. ही जात पात बहुतेक १०००-१५०० वर्षात विकसीत झालेलि दिसते.त्यापुर्वी आर्य, द्र्विड इ. असेच वर्गीकरण असावे.

In reply to by अशोक पतिल

खर सागांयच म्हणजे आजकाल रोजच्या व्यवहारात जातपात अगदी मनात पण येत नाही . सर्वांना इतर जातीतले मित्रमंडळीच जास्त असतात.आणी संकट काळी आपल्या नात्यागोत्या पेक्षा हे मित्र व शेजारच जास्त कामी येतात.
१००% सहमत

वाचतेय ... बाकी रेवतीताईशी सहमत. -(रेवतीताईची जातवाली) माउ :P

लेख आवडला. संतुलित आहे. मला चक्क "तू ब्राह्मण नाहीस? वाटत नाही!" अशा प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या आहेत. बाकी "आपल्यातला" हा शब्द ऐकला की तिथून काढता पाय घेणे सवयीचे झाले आहे.

बर्गात पहिल्या मुलाच्या कानात मेसेज सांगायचा आणि तो पास करायचा. शेवटच्या मुलाकडे काय मेसेज पोहोचला ते पहायचं या खेळाची आठवण झाली. शेवट इंटरेस्टिंग असायचा. एकदा एका माणसाने नेटवर लिहीलं. जात तोडायला पाहीजे. एकत्र आलं पाहीजे. त्यासाठी आंजा लग्न झाली पाहीजेत. पहिलं उत्तर : म्हणजे आमच्या मुलींवर डोळा आहे तर दुसरं उत्तर : समाजवाद्यांची थेरं अजून चालू आहेत ? तिसरं उत्तर : समाजवादी :हसून हसून लोळणारी स्मायली: चौथं उत्तर : ओ धागाकर्ते , तुम्ही मुसलमान का हिंदू ते नाही लिहीलं ? पाचवं उत्तर : अगदी हेच म्हणतो. लव जिहाद वाले इथं पण आले ? पुन्हा पहिल्याचं उत्तर :सहमत तिसरा : काय संबंध इथं लव जिहादचा ? पहिला : जरा डोळे उघडे ठेवा. ब्ला ब्ला ब्ला ब्ला

मिपाकर बरे आहेत ना? काड्या टाकण्याच्या उद्देशाने पण निरागसपणाचा अविर्भाव असणारे २ प्रतिसाद वगळता इतर सगळे प्रतिसाद सोज्ज्वळ आहेत चक्क. त्यामुळे मी पण " त्या " २ प्रतिसादांवर प्रतिक्रिया देण्याचे टाळतो. बाकी आपल्याला तर ब्राह्मण असल्याचा अभिमान आहे ब्वॉ. जसा भारतीय असल्याचा, महाराष्ट्रीयन असल्याचा, हिंदु असल्याचा आहे तसाच ब्राह्मण असल्याचा पण आहे. तळाटीपः मी ब्राह्मण असल्याचा अभिमान आहे या अर्थी: १. इतर लोकांनी त्यांच्या जाती धर्म आणि पंथाचा अभिमान बाळगु नये असे काही माझे मत नाही. २. प्रत्येकाने आपल्या जाती धर्म आणि पंथाचा अभिमान बाळगावा असे माझे मत आहे (अर्थात अभिमान बाळगण्याचे कारण नाही असे मानणार्‍या वर्गाशी माझा काही आकस नाही) ३. मी माझ्या जाती धर्माचा अभिमान बाळगतो म्हणजे इतर जाती धर्मांना तुच्छ मानतो असे नाही.

In reply to by मृत्युन्जय

बास का राव. मोजून २ प्रतिसाद होते. त्यातला एक डिलीट झाला. आमची कुठेही शाखा नाही हे दिलखेचक वाटल्याने दिला होता तो.. मग नेटवर काय करताय वाला चंबूगबाळं आवरून निघायची वेळ झाली भौतेक.

गेल्याच महिन्यात अशाच चर्चा सुरु झाल्या. मग रितीभाती, लग्नाच्या पद्धती असं सगळं चालू असताना एका मित्राने मध्येच माझं बोलणं तोडलं "म्हणजे, तू ब्राह्मण नाहीस ??" म्हणलं "नाही, पण तुला असा प्रश्न का पडला?" मित्रः "नाही, तुझं बोलणं कसं सात्विक सात्विक आहे, त्यात जानवं सुद्धा आहे की तुझं" यावर काय बोलावं कळलं नाही. हां, यावरुन आमची मैत्री वैगरे काही तुटली नाही. पण मी ब्राह्मण वाटू नये म्हणून जानवं काढून ठेवावसं वाटलं नाही किंवा माझ्या बोलण्यात बदल करावा असंही वाटलं नाही. मी आहे हा असा आहे, ज्यांना पटतं त्यांनी बोलावं, नाय त्यांना लांब ठेवण्यास माझा खवचटपणा पुरेसा आहे. ;)

आमच्या वडिलानी मी सामिष खायला सुरुवात केल्यावर एक गोष्ट सांगितली होती. आपण ब्राम्हण आहोत यात आपले कर्तृत्व काही नाही. कारण जन्म घेणे कोणाच्या हातात नाही. पण कर्म स्वतःच्या हातात आहे. ब्राह्मण्य हे केवळ जानवे किंवा शेंडीवर नसून ते तुमच्या आचार विचारात असते. ब्राम्हण म्हणून जन्माला आलात पण ब्राम्हणांच्या चांगल्या गोष्टी मात्र पुढे चालू ठेवा. यात शरीर(रोज स्नान करणे) आचार(स्वच्छ आणि शुद्ध आचरण) आणि विचारांची शुद्धता(दुसर्याचा द्वेष न करणे आणि स्त्रियांना समान हक्क देणे-- आमच्या आत्याचे नाव घराच्या सात बारा मध्ये मुद्दाम टाकून घेतले तलाठी उलट सुचवत असताना सुद्धा) हे सर्वात महत्त्वाचे आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिक्षणाचे महत्त्व लक्षात ठेवा. विद्या हि जगात कुठेही पुज्य मानली जाते. त्यांनी स्वतः सुरुवातीला नातेवाईकांच्या घरी राहून आणि नंतर नोकरी करून आपले शिक्षण त्रि पदवीधर पर्यंत पूर्ण केले.त्यानंतर आमच्या आई चे शिक्षण (द्विपदवीधर होई पर्यंत) पूर्ण झाले. जर वरील गोष्टी आपण आयुष्यात आचरणात आणू शकलात तर आपण कर्माने ब्राम्हण आहात अन्यथा नुसते जन्माने ब्राम्हण असून काय उपयोग?

In reply to by सुबोध खरे

जर वरील गोष्टी आपण आयुष्यात आचरणात आणू शकलात तर आपण कर्माने ब्राम्हण आहात अन्यथा नुसते जन्माने ब्राम्हण असून काय उपयोग? खरे सर तुमच्या म्हणण्यास १००० % अनुमोदन.

जाती पातींना पब्लिकली विरोध करणारे, जातीपाती गेल्या पाहिजेत असे म्हणणारे लोक खरे डेंजरस. हे लोक व्यवहारात जाम जातीयवादी असतात.

माझे बरेच जिवलग मित्र अ-ब्राम्हण आहेत (कुणबी, जैन, महार इत्यादी). त्यांच्याकडे "तुम्ही बामन म्हंजे बारा बोड्याचे" असे सरळ बोलण्याचा मोकळेपणा आहे. आणि "तुम्ही मराठा म्हणजे गुढघ्यात" हे ऐकण्याचाही. अर्थात हे सगळे मित्र बि-ग्रेड च्या राजकारणापूर्वीचे आहेत. पण गेल्या काही वर्षात "गड्या आपुली जात बरी" असे माझे मत झाले आहे. सर्वसाधारणपणे ब्राम्हण लोक अ-ब्राम्हण लोकांचा जितका द्वेष करतात, त्यापेक्शा कैक पटीने अ-ब्राम्हण लोक ब्राम्हणांचा द्वेष करतात असे मला आढळून आले. दादोजी प्रकरणानंतर तर शिवाजी तुमचा, बाजीराव आमचा हेच बरे आणि यामुळे निदान जातींमधील शांतता तरी कायम राहील असे वाटते.

In reply to by काळा पहाड

मला माझे लहानपणीचे मित्र आठवले हे वाचून. टोटली असेच वातावरण होते. एका बाजूने "गोड आमटी" तर दुसर्‍या बाजूने "ताटात हात (धुणे)" याबद्दल यथेच्छ टिंगली होत. नंतर एक दोन दिवसांत एकमेकांच्या घरी जेवताना ते आठवतही नसे. त्यात आमच्यातील एक मराठा मित्र सुपर ब्रिलियंट होता, तर एक ब्राह्मण कुस्तीत कोणाला हरत नसे. हे खरेच होते, उगाच काहीतरी बॅलन्स्ड लिहायचे म्हणून लिहीलेले नाही. आमचे सगळ्यांची आधीची पिढी त्यांच्या लहानपणापासून एकाच वाड्यातली, त्यामुळे नाती घट्ट. बामणांचे बामणपण व मराठ्यांचे मरहट्टेपण तितकेच रोकठोक व ओपन होते. भांडणेही होती पण त्यात जात नव्हती. २००४ नंतर काय फरक पडला आहे माहीत नाही, आता बरेच लोक विविध ठिकाणी विखुरले आहेत.

ब्राह्मण या जातीची काही वैशिष्ट्ये आहेत. कमालीची लवचिकता, वास्तविकता स्वीकारून व परिस्थितीशी जुळवून घेऊन पुढे जाण्याची तयारी व सातत्याने आधुनिकतेचा स्वीकार करून स्वतंत्र विचार करून स्वतःला पटलेल्या कालबाह्य गोष्टींचा त्याग करण्याची वृत्ती ही त्यांची मुख्य वैशिष्ट्ये आहेत. पूर्वी बहुसंख्य ब्राह्मण व्रतवैकल्यात गुंतलेले होते. शिवाजी महाराजांच्या काळात ते राजकारणात आले. काही काळ तलवारही गाजविली. नंतर ब्रिटिशांच्या काळात शिक्षणाचे महत्त्व ओळखून लेखणी हातात धरली. शेती व्यवसायातही ब्राह्मण होते. १९४७ नंतर राखीव जागांमुळे संधी कमी झाल्या. १९४८ ला गांधीवधानंतर झालेल्या दंगलीत खेड्यातील ब्राह्मणांची घरे जाळल्यावर व कूळकायदा करून शेतजमिनी हिसकावून घेतल्यावर काळाची पावले ओळखून ते शहराकडे वळले. राजकारणातून हद्दपार झाल्यावर आता परत आपल्याला सत्तेत स्थान नाही हे ओळखून स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रीत केले. पुढे मंडल आयोग आल्यावर अजून संधी कमी झाल्या. साधारणपणे १९७५-८० पर्यंत शालेय शिक्षकी पेशात असणारे ब्राह्मण त्यापेक्षा अधिक आकर्षक अशा प्राध्यापकी पेशात व खाजगी शिकवणीच्या क्षेत्रात गेले. नंतर पुन्हा एकदा काळाची पावले ओळखून संगणक क्षेत्र, माध्यमे, आर्थिक क्षेत्र, अभिनय क्षेत्र इ. क्षेत्रात शिरकाव केला. शेंडी, घेरा, जानवे इ. गोष्टी बहुतांशी ब्राह्मणांनी सोडल्या. पूर्वी परदेशगमन पाप मानून प्रायश्चित्त घेणार्‍या ब्राह्मणांची नवीन पिढी वेगाने परदेशात स्थायिक होण्यास उत्सुक आहे. वास्तविकता स्वीकारून लवचिकता दाखविल्यामुळेच हे शक्य झाले आहे. पूर्वीच्या पिढ्यांनी केलेल्या जातीयवादामुळे मनात काहीशी अपराधी भावना असूनसुद्धा, राखीव जागांमुळे संधी कमी झालेली असताना सुद्धा, कूळकायदा करून शेती हिसकावून घेतलेली असताना सुद्धा, १९४८ साली घरे जाळली गेलेली असताना सुद्धा आणि राजकारणातून हद्दपार झालेले असताना सुद्धा ही जमात नेस्तनाबूत होत नाही हे काहींना बघवत नाही. म्हणूनच ब्राह्मण समाजातले संत (उदा. संत रामदास), नेते (उदा. स्वातंत्र्यवीर सावरकर), पूर्वीचे लढवय्ये (थोरले बाजीराव पेशवे, शिवाजी महाराजांचे गुरू दादोजी कोंडदेव) इ. ची यथेच्छ बदनामी करून त्यांच्या श्रद्धास्थानावर आघात करण्याचे प्रयत्न सरकारी आशिर्वादाने सुरू आहेत. ब्राह्मण आपल्या स्वभावानुसार याविरूद्ध प्रतिकार न करता व अस्मितेचा मुद्दा न करता याकडे संपूर्ण दुर्लक्ष करून केवळ स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रीत करताना दिसतात.

In reply to by श्रीगुरुजी

कूळकायदा इंदीरा गांधीने म्हणजेच ,ब्राह्मणाच्या कन्येने केला आणि आरोप मात्र ब्राह्मणेत्तरांवर लावायचा, कसब चांगले आहे. गांधीहत्येनंतर तूरळक ठिकाणी, अगदी दहापंधरा घरे जाळली असतील तीही पश्चिम महाराष्ट्रात कुठेतरी .परंतु आजही त्याचे भांडवल करणारे कमी नाहीत, असे भासवतात की जणु खैड्यातून ब्राह्मणांचे तांडेच्या तांडे शहराकडे गेले..

In reply to by ग्रेटथिन्कर

गांधीहत्येनंतर तूरळक ठिकाणी, अगदी दहापंधरा घरे जाळली असतील तीही पश्चिम महाराष्ट्रात कुठेतरी " गांधीजी २७ खून आणि ५२ बलात्कार करणारे एक विकृत सिरियल किलर होते " या वाक्याएवढेच वरील विधान हास्यास्पद, खोटे आणि चुकीचे आहे.

In reply to by ग्रेटथिन्कर

ग्रेटस्टिन्कर, तुमचे अज्ञानही तुमच्या प्रतिसादातून दरवळणार्‍या स्टिंकइतकेच ग्रेट आहे. असो. बहुत काय लिहिणे.

In reply to by ग्रेटथिन्कर

माझ्या माहितीप्रमाणे कुळकायदा हा स्वातंत्र्याच्या आसपास आलेला आहे (१ ९ ४ ८ - ४ ९). व्यंकटेश माडगुळकर यांचे वावटळ हे जगप्रसिद्ध (भारतात त्यामानाने कमी प्रसिद्ध असलेले) पुस्तक वाचावे. यामध्ये गांधीहत्येच्या नंतर झालेली जाळपोळ याचे चक्षुरवै सत्यं हकीकत आहे. आपली माहिती त्रोटक आहे असे वाटते.सत्याचा विपर्यास होऊ नये इतकीच इच्छा असो आपले मत आपल्यापाशी

In reply to by ग्रेटथिन्कर

कूळकायदा इंदीरा गांधीने म्हणजेच ,ब्राह्मणाच्या कन्येने केला
इंदिरा गांधी हि ब्राम्हणाची मुलगी ??????

In reply to by llपुण्याचे पेशवेll

खालील लिंक वर काही वेगळीच माहिती आहे. कोणाला अजून काही माहिती असेल तर सांगा. http://blog.sureshchiplunkar.com/2007/04/blog-post_18.html

In reply to by श्रीगुरुजी

सर्वं स्वं ब्राम्हणस्य इदं यत किंचिद जगती-गतम. श्रेष्ठ्येन अभिजनेन इदं सर्वं वै ब्राम्हण: अहर्ती. स्वम एव ब्राम्हण: भुड्क्ते स्वं वस्ते स्वं ददाति च. आनृशंस्याद ब्राम्हणस्य, भुज्ज्ते हि इतरे जना: ( मनुस्मृती १.१००-१०१) अनुवाद- या जगामध्ये जी काही संपत्ती असते, ती संपत्ती ब्राम्हणांची असते.श्रेस्ष्ठत्वामुळे आणि जन्माच्या उच्चतेमुळे या सर्वांसाठी ब्राम्हण योग्य असतो. ब्राम्हण स्वत:चेच खातो, स्वत:चेच नेसतो आणि स्वत:चेच देतो. ब्राम्हणाच्या दयेमुळे इतर लोक (त्यांनी स्वत: कमावलेल्या संपत्तीचा) उपभोग घेतात. विश्लेषण- जगातील सर्व च संपत्ती ही ब्राम्हणाचीच आहे त्यामुळे त्याने दुसर्याा एखाद्याची संपत्ती वापरली तर ती त्याने चोरी केली आहे असे होउच शकत नाही. तो दुसर्यातची अर्जीत केलेली संपत्ती वापरत असतो ती त्याचा जगावरील प्रत्येक संपत्ती वर त्याला जन्मजात श्रेष्ठत्वामुळे जो मालकी हक्क प्राप्त झाला आहे त्यामुळेच. म्हणुन ब्राम्हण दुसर्याकचे नव्हे तो स्वत:चेच खातो ,स्वत:चेच नेसतो आणि स्वत:चे देतो त्यामुळे ब्राम्हणाने कोणाची चोरी वगैरे केली असा प्रश्न च उपस्थित होत नाही. या उलट एखाद्या दुसर्याेने कष्ट करुन काही संपत्त्ती मिळविली आणि जर का तो तिला ब्राम्हणांची दया नसतांना परवानगी नसतांना वापरु बघत असेल तर ही त्या माणसाची चोरी मानली जाते. कारण मुळ मालक हा ब्राम्हण असता या माणसाने त्याच्या दये-परवानगी शिवाय अशी संपत्ती वापरणे ही चोरीच नव्हे का ? चोरी न करणे हे धर्माच्या एका महान अशा स्थिर तत्वांमध्ये येते. मनुस्मृती हे महान असे धर्माचे शास्त्र त्यावर महान असा स्थिर नियम घालुन देते.आणि स्थिर नियम कधीही बदलत नाहीत त्यावरच धर्म शतकानुशतके स्थिर टिकुन ही राहतो. बाकी मुर्ख लोक म्हणी बनवित राहतात उदा. एव्हरीथींग चेंजेस एक्सेप्ट द लॉ ऑफ़ चेंज. तरीही काही बिनडोक लोंक ब्राम्हणां च्या चोरी विरुध्द न्याय मागण्यासाठी एखाद्या राजा किंवा न्यायाधीशांकडे जातातच मग राजा किंवा न्यायाधीश ही कधीकधी अशा बिनडोक लोकांच्या नादी लागुन ब्राम्हणांविरुध्द निकाल देण्याची शक्यता निर्माण होउ शकते. आणि मग न्याय हे दुसरे महान असे स्थिर तत्व धोक्यात येउ शकते. कारण न्याय हा ही जगातल्या सर्वच धर्मांमधील एक महत्वाचं अस स्थिर तत्व आहे. मग काय करावे बरे ? चला तैत्तिरीय संहीता आली की हो न्याय करायला काय म्हणते बघु या यद ब्राम्हण: च अब्राम्हण:च प्रश्नम इयातां ब्राम्हणाय अधिब्रुयात. यद ब्राम्हणाय अधि-आह आत्मने अधि-आह. यद ब्राम्हणं परा-आह आत्मानं परा-आह. ( तैत्तिरीय संहीता २.५.११.९ ) अनुवाद- जर एखाद्या कडे एक ब्राम्हण आणि एक अब्राम्हण आपला प्रश्न (तक्रार) घेउन आला तर ,ब्राम्हणाच्या बाजुने निर्णय द्यावा. ब्राम्हणाच्या बाजुने बोलणे म्हणजे स्वत:च्या बाजुने बोलणे होय.ब्राम्हणाच्या विरोधात बोलणे म्हणजे स्वत:च्या विरोधात बोलणे होय. म्हणुन ब्राम्हणांच्या विरोधात बोलु नये. विश्लेषण- हे काय हो गडे आता विश्लेषण ही तुम्हीच करणार का तुम्ही कीनई फ़ार फ़ार पुर्वग्रह दुषीत आहात.,आम्हाला ना आमचे धुंडीराज बापट शास्त्रीजी जे आहेत ना त्यांनी स्वत: या श्लोकाच केलेल भाषांतरच हवे कारण त्यांच्या इतका या विषयावरील अधिकारी माणुस शोधुन सापडायचा नाही तुम्ही तेच द्या बर. अहो अस काय करता मी पण ब्राम्हण च आहे की , हो पण तुम्ही कीनई बिघडलेले नास्तिक आहात ठिक आहे त्यांच्याच शब्दात.. धुंडीराज बापट शास्त्रिंचे या श्लोकाचे विश्लेषण " ब्राम्हण व अब्राम्हण या दोहोंमध्ये " मी तु्झ्याहुन श्रेष्ठ आहे, मी तु्झ्याहुन श्रेष्ठ आहे, असा वाद जेव्हा उत्पन्न होईल आणि या वादाच्या निर्णयासाठी ते दोघेही एखाद्या तिर्हााइता कडे येउन प्रश्न विचारतील, तेव्हा निर्णय करणार्याश तिर्हासइताने ब्राम्हण श्रेष्ठ आहे असाच निर्णय द्यावा. म्हणजे त्याने स्वत:ला श्रेष्ठत्व मिळविल्यासारखे होते. ब्राम्हण हा पराभुत म्हणजे अब्राम्हणाहुन कमी योग्यतेचा आहे, असा निर्णय दिल्याने तो निर्णय देणार्याश तिर्हााइताने स्वत:चाच पराभव बोलुन दाखविल्याप्रमाणे होते. यास्तव ब्राम्हण हा अब्राम्हणापेक्षा कमी योग्यतेचा आहे असे कधीही बोलु नये. (कृष्ण यजुर्वेद-भाग १-तैत्तिरीय संहीता पृष्ठ क्रमांक-३३०-३३१ प्रकाशक:- चि.धुं बापट- कानपुर-१६- १९९४) समारोप- १-जगातील सर्व संपत्ती ही ब्राम्हणांचीच आहे कोणी दुसरा ब्राम्हणांच्या दये अथवा परवानगी शिवाय जर ती वापरत असेल आणि स्वत: कष्टाने कमविली म्हणुन माझीच असा गैरसमज करुन घेत असेल तर ही त्याने केलेली ब्राम्हणांच्या संपत्तीची चोरी च आहे आणि चोरी करणे हे पाप आहे आणि ते मागच्या शतकातही पाप होते आणि आजही पाप आहे. आणि हे धर्माचे स्थिर तत्व आहे. २ चल तत्वे आणि त्यामुळे निर्माण झालेल्या वेदना उदा सति या धर्माच्या चल तत्वा ने स्त्रियांना जळतांना होणार्या थोडयाफ़ार वेदना हे म्हणजे फ़ार च बिनमहत्वाच आणि किरकोळ आहे त्या तुलनेने स्थिर तत्वे ज्याने धर्म स्थिर राहतो ते फ़ार फ़ार महत्वाचे आहे. आणि केशवपन काय उकरुन काढता हो कीती कीती क्षुद्र विषय होता तो काय ते चल तत्व किरकोळ हे बघा आपण बालाजीला नाही बघत का मुली केशवपन करतात ते आणि त्याने उवा वगेरेंचा ही त्रास होत नाही शिवाय केशवपना ने स्त्रियांच्या सौंदर्यात ही वाढ च होते नाही का ? आणि बंद झाल हो ते सर्व आता तुम्ही सोडा बर ती चल तत्वे आता महान अशा स्थिर तत्वांवरच बुध्दी स्थिर करु या!

In reply to by मारवा

हायला. मनू म्हनाला काय हे? सध्या हेच्च म्हण्ण एका सम्प्रदायाच आहे... ते म्हनतात आमीच पैले आन काही लोक वाट चूकून दुसरीकडे गेले. म्हणजे आमि त्याम्चि सम्पत्ति आणी जमिन लुटली तर ते बरोबरच आहे. सेक्युलरपन त्यांच्या बाजुने बोलताना दिसतात.

In reply to by मारवा

मनुस्मृती आणि तैत्तरीय संहितेत मांडलेल्या या विचारांशी तुम्ही स्वतः सहमत आहात का?? कारण हे विचार मला तरी कालबाह्य वाटतात. फक्त आपण ब्राह्मण आहोत म्हणून जसे वाईट ठरत नाही, तसंच आपण फक्त ब्राह्मण आहोत म्हणून कोणीतरी मोठे लागून गेलो आहोत असंही मला वाटत नाही. स्थिर आणि चल तत्त्वांविषयी अधिक माहिती जाणून घेण्यास उत्सुक होतो, ती दिल्याबद्दल आभार. रसच उरला नाहीये आता.

In reply to by वडापाव

वडापाव यांच्या प्रतिसादाशी पूर्ण सहमत.. श्री मारवा यांनी जी आवतरणे दिली आहेत, त्यातील " ब्राह्मण" हा शब्द "ब्रह्म जाणणारा" या अर्थी असावा असे मला वाटते आणि मग श्लोकाची संगती ही लागते. ब्राह्मण = ब्रह्म जाणणारा = ज्ञानी = ज्याच्या कडे आप- परं भाव नाही, ज्याचे द्वैतच नाहीसे झाले आहे, त्याच्या दृष्टीने त्याचे स्वतः चे ही काही नाही आणि दुसर्याचे ही काही नाही.. अवघा रंग एक झाला !तो चोरी कशाला करेल? आणि लौकिकार्थाने अथवा सामान्य माणसाच्या नजरेने जरी ती चोरी असली तरी त्यात ज्ञानी पुरुषाला स्व:तला काहीही आसक्ती नसल्याने ते कर्म देखील "ज्ञानोत्तर कर्मच" असले पाहीजे, जागाच्या अथवा समष्टीच्याच कल्याणाकरता असले पाहीजे म्हनून ती चोरी ठरत नाही. आणि स्वाभाविक "अशी" चोरी जर राजांसमोर आली तर त्याने सहज पुराव्यांच्या आधारे, निवाडा न करता हे ज्ञानोत्तर कर्म आहे हे समजून ज्ञानी माणसाच्या बाजूने निवाडा करावा असे सांगितले आहे.. अर्थात हेच बरोबर आहे असा माझा अजिबात दावा नाही. श्री मारवा यांचा हेतु आणि भूमिका विधायक आहे असे ग्रूहीत धरुन हा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला आहे. बी-ग्रेडी धुमाकुळ घालायचा असेल तर आमचा प्रतिसाद खुषाल उडवावा.

In reply to by मारवा

१-जगातील सर्व संपत्ती ही ब्राम्हणांचीच आहे कोणी दुसरा ब्राम्हणांच्या दये अथवा परवानगी शिवाय जर ती वापरत असेल आणि स्वत: कष्टाने कमविली म्हणुन माझीच असा गैरसमज करुन घेत असेल तर ही त्याने केलेली ब्राम्हणांच्या संपत्तीची चोरी च आहे आणि चोरी करणे हे पाप आहे आणि ते मागच्या शतकातही पाप होते आणि आजही पाप आहे. आणि हे धर्माचे स्थिर तत्व आहे.
असे मानणारे ब्राह्मण सध्या तरी बहुतेकांच्या पाहण्यात नाहीत. आपल्या पाहण्यात असतील तर आपण अजूनही मध्ययुगात आहात असे वाटते. खरे तर सध्या ९९% ब्राह्मणांना "मनुस्मृती" पेक्षा management च्या तत्वांमध्ये जास्त स्वारस्य आहे. काही मध्ययुगीन कालबाह्य ग्रंथांचे संदर्भ देऊन, अवास्तव आणि निरर्थक गोष्टींवर चर्चा कितीही केली तरी त्याला अंत नाही. बाकी सध्या ब्राह्मणांपेक्षा इतर जातींचाच "मनुस्मृती" चा दांडगा अभ्यास चाललाय, असं दिसतयं. असो. बाकी चालु द्या...

In reply to by श्रीगुरुजी

फारच छान आणि समतोल प्रतिसाद !
.....केवळ स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रीत करताना दिसतात.
पण हे बरोबर नाही! हा ब्राह्मणांचा स्वार्थीपणा आहे. स्वार्थी असणे हे पाप नसले तरीही समाजाच्या द्रुष्टीने हे भले नव्हे. ज्यांनी समाजासाठी मार्गदर्शन करायचे त्यांनी गांधीवधानंतर आणि कुळकायदानंतर गाव सोडला ..गावांचे संतुलनच बिघडले. ब्राह्मणांसाठी गांधीवध आणि कुळकायदा ही इष्टापत्ती ठरली ! परंपरेने आलेली विद्या आणि तैल बुद्धीच्या जोरावर ब्राह्मणांनी आपली उन्नती करुन घेतली. पण मागे राहीलेल्या समाजाचे काय ? गावोगावचे दैवी उत्सव बंद पडले. पुराण-श्रवणाने माणसांची दु:ख हलकी होत. दुष्काळ पडत, लोक कर्ज-बाजारी होत पण आत्महत्येचा अघोरी मार्ग कोण स्वीकारत नव्हते ! दुष्काळ पडला तर पाट्लाच्या शेतावर कोणी उपाशी मरत नव्हते ! पाटील ही ती वेळ येऊ देत नसत ! पाटिल -कुलकर्णी हे गावाचे तारणहारच होते ! गांधी हत्येनंतर : १.ब्राह्मणांनी स्वत:चा फायदा करुन घेतला. ज्यांची घरे जळाली त्यांची अमेरिकेत घरे झाली. २.सर्वात जास्त वाताहात झाली ती मराठ्यांची ( अपवाद सोडून ) ! सगळेच मराठे काही सधन शेतकरी नव्हते आणि राजकारणातही नव्हते !पण आपला आब ठेऊन होते. विद्येची कास धरली नाही , किबहुना तशी परंपरा नव्हतीच, त्यांना शेतमालकावरुन शेतमजूर असे पाय-उतार व्हावे लागले किंवा कारखान्यात कामगार व्हावे लागले. पांढर्या कपड्यातील काळ्या ईंग्रजांनी त्यांचेही कंबरडे मोडले.आणि त्यांनाही आरक्षणाची कटोरी घेऊन सरकार दरबारी उभे रहावे लागले. ! ३. बी सी आणि ओ बी सी ना तर घटनेनेच आरक्षण दिले होते. किती प्रगती झाली त्यांची ? उलट आरक्षणांमुळे अन्य समाजाच्या रोष मात्र ओढून घ्यावा लागला ! जाति- व्यवस्था मोडून आपण नक्की काय मिळवले ? जुनी ( सदोष होती पण त्याचे फायदेही होते) व्यवस्था मोडली आणि नवी,समकक्ष व्यवस्था आपण उभी करु शकलो नाही हे खरे अपयश होय . झालेला एकमेव फायदा म्हणजे अस्पृश्यता जनातून नाहीशी झाली ( मनात अजून आहेच ) , पण ती तशी आमच्या संतांनी नष्ट केलीच होती ना ? ब्राह्मणांनी आणि क्षत्रियांनी ही आपली नैसर्गिक जबाबदारी टाळून आप-आपले भले करुन घेण्याचा खटाटोप केला , त्याचे दीर्घकालीन परिणाम पुढच्या पिढ्यांना भोगावे लागतील. गावे ओस पडत आहेत आणि शहरांची बजबजपुरी वाढते आहे हा जाति व्यवस्था अनैसर्गिकपणे मोडल्याचाच परिणाम आहे !

In reply to by विटेकर

कुठे बरं वाचलं होतं ते वाक्य आठवेना. "कूळकायद्याने गमावले ते सिलिकॉन व्हॅलीने कमावले", पर्फेक्ट वर्णन. बाकी अशी स्थित्यंतरे होतच असतात. दरवेळेस जुन्या व्यवस्थेच्या नावाने कढ काढण्याचे कारण नाही. उलट आधीच्या व्यवस्थेत झापडबंद नियमांमुळे अंगभूत कौशल्याला वाव न मिळणार्‍यांसाठी नवी व्यवस्था वरदान आहे. यात ब्राह्मण-क्षत्रिय-वैश्य-शूद्र सर्वच वर्णांचे लोक आले. जे लोक जुन्या व्यवस्थेत कोळपून गेले असते ते लोक नव्या व्यवस्थेत मानाने जगू शकतात. अशी उदाहरणे पाहिली आहेत.