आहे मी ब्राह्मण!! मग??
आठवीनंतरच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत कोकणात गेलो होतो. तिकडे एका मित्राबरोबर पैज लाऊन सात वाट्या ताक प्यायलो होतो (तेव्हाची कॅपॅसिटी तेवढीच होती). आम्हांला ताक वाढणा-या मावशींनी सहाव्यांदा वाटीत ताक ओतताना 'तुझी जात कोणती रे?' असं हळूच विचारलं.
"ब्राह्मण!!"
"वाटलंच मला!" असं हसत म्हटलं आणि निघून गेल्या. सातव्यांदा ताक ओतताना, "राग नाही ना आला?" असं विचारलं आणि मी "नाही, राग का येईल?" असं म्हटल्यावर पुन्हा हसत हसत निघून गेल्या.
नवीन नवीन मैत्री झालेल्या मित्रमंडळात मी एक गोष्ट नेहमी पाहिलीये. गप्पा मारताना सणवार, लग्न, किंवा घरातल्या इतर कोणत्यातरी समारंभाच्या विषयावरून "आम्ही अमुक अमुक जातीचे आहोत ना, आमच्यात असं असतं" असं कोणीतरी म्हटलं, की त्यावरून जातीचा विषय निघतो, आणि मग ग्रूपमधल्या निदान एकालातरी सगळ्यांची जात विचारायची खाज सुटते. तसं त्याने एक-दोघांना विचारल्यानंतर बाकीच्यांच्या चेह-यावर त्यांची पाळी आली की लगेच आपली जात सांगण्याची तयारीही दिसून येते. तशी ती माझ्यावर आली, आणि मी ब्राह्मण म्हटलं, की "तू ब्राह्मण आहेस???" अशी कोरसमध्ये प्रतिक्रिया ब-याचदा येते. मग त्यापाठोपाठ 'वाटत नाही तुझ्याकडे बघून', 'तुझ्या बोलण्याच्या स्टाईलवरून कळतं', 'वाटलंच होतं मला' अशा प्रतिक्रिया येतात. त्यांचं मला विशेष असं काही वाटत नाही. गंमत वाटते, ती 'सही रे!!!' या प्रतिक्रियेची. मी ब्राह्मण आहे, यात 'सही' काय आहे? मला कळत नाही.
एकदा आमचा एक ग्रूप क्लासच्या दिशेने चालला होता. त्यात एक 'सुबक ठेंगणी' मुलगीही होती. मी अर्थात तिला कंपनी देत होतो. आणि आमचा बोलण्याचा विषय आमच्याच ग्रुपमध्ये आमच्या पुढे चालणा-या एका मुलाचा होता.
ती मुलगी म्हणाली, 'तो मला अजिबात आवडत नाही. डोक्यात जातो.'
'का गं, काय झालं?'
'तो ब्राह्मण आहे आणि सगळे ब्राह्मण बायले असतात.'
मी थबकलो. आणि त्या मुलीकडे बघून हसलो. तशी तीही चमकली.
'तू ब्राह्मण आहेस?'
'हो!!'
'सॉरी सॉरी सॉरी... तू बायल्या नाहीयेस. पण बरेच ब्राह्मण बायले असतात.'
मी वाद घातला नाही. तिने सुद्धा माझ्या आडनावाचं एका भंडारी आडनावाशी साधर्म्य असल्याने मी ब्राह्मण कसा असा प्रश्न विचारला आणि मग तो विषय तिथेच थांबला. त्या दिवसानंतर ती मुलगी माझ्याशी तितक्याच सलगीने पुढे कधी बोल्ल्याचं मला आठवत नाही.
गप्पा मारताना मध्येच मला, 'तू ब्राह्मण आहेस का?' असं निदान पंधरा-वीस लोकांनी तरी आत्तापर्यंत विचारलं असेल. 'नाही काय आहे, तू जे नॉर्मल मराठी बोलतोस ना ते सुद्धा खूपच हाय लेवलचं आहे ना म्हणून विचारलं!' काय संबंध???? माझे कितीतरी मित्र असे आहेत, ज्यांचं मराठी माझ्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त चांगलं आहे. त्यातला एक आग्री आहे, एक क्षत्रिय आहे आणि एक महार आहे(आणि यांनासुद्धा लोक 'तू ब्राह्मण आहेस का?' असं विचारतात). इतकच नाही, तर कितीतरी ओळखीची मंडळी अशी आहेत ज्यांचं मराठी भंगार आहे आणि ते ब्राह्मण आहेत. पुण्याच्या गोडबोले नावाच्या एका मित्राची टोपी हरवली होती. ती सापडली का, असं विचारलं तेव्हा तो 'हो भेटली!' असं म्हणाला होता. माझं स्वतःचं मराठीसुद्धा तितकसं चांगलं आहे असं मला वाटत नाही. चिरणे आणि कापणे, यात माझा नेहमी गोंधळ उडतो. भाजी चिरतात, फळं कापतात हे माहितीये, पण तरीही ब-याचदा मी उलटं बोलतो.
आमच्या घरी नॉन-व्हेज खाण्यावर बंदी नाही. पण घरी आम्ही सहसा नॉन-व्हेज खात नाही, कारण कुणाला करताच येत नाही. त्यामुळे आम्हांला आमच्या शेजा-यांनी, वहिनीच्या माहेरच्यांनी, कधी हौसेने चिकन-मटन आणून दिलं, की आम्ही त्यावर मस्त ताव मारतो. वडिलांचे एक मित्र तर ब-याचदा आम्हांला त्यांच्या घरी मासे खायला बोलावतात. तरी माझे आई-वडील 'शक्यतो आपण जास्त नॉन-व्हेज खाऊ नये' असं म्हणतात. त्यामागे कारण हे, की लहानपणापासून शाकाहाराची सवय असलेल्या शरीराला एकदम नॉन-व्हेजचा पुरवठा झाला, तर त्याचे परिणाम खाल्ल्यानंतर दुस-या दिवशी सकाळी दिसून येतात. हॉटेलात मित्रमंडळींबरोबर नॉन-व्हेज खात असताना मात्र बरेच अब्राह्मण मित्रच माझ्या नॉन-व्हेज खाण्यावर आक्षेप घेताना दिसतात. मी तर श्रावणात सुद्धा नॉन-व्हेज खातो. 'तू ब्राह्मण ना, मग नॉन-व्हेज कसा काय खातोस?' अशी मला विचारणा होते. 'काही फरक पडत नाही. हल्ली सगळेच ब्राह्मण खातात.' असं मी म्हटलं, की माझ्या वाक्याला पुष्टी जोडणारी उदाहरणं सुद्धा मिळतात, आणि, 'नाही हा, आमच्याइकडे एक ब्राह्मण आहेत, जे नॉनव्हेज असलेल्या टेबलावर बसत सुद्धा नाहीत' 'आमचा एक ब्राह्मण मित्र नॉन-व्हेज तर खातो, पण घरी जाऊन स्वत:वर गोमुत्र शिंपडून घेतो.' असे किस्सेसुद्धा ऐकायला मिळतात. 'तुझ्या घरी माहितीये का तू इथे नॉन-व्हेज खातोस ते? तुला घरचे काही बोलत नाहीत?' असं लोक विचारायला लागले, की माझं एक लांबलचक उत्तर रेडी असतं. "पूर्वी शिक्षणाची मक्तेदारी ब्राह्मणांकडे होती. शिक्षण घेण्याची, किंवा देण्याची सगळ्याच जातीच्या लोकांना अनुमती नव्हती. आता बघा, शिक्षण देण्या-घेण्याचा अधिकार हा सगळ्या जातीच्या लोकांना समान आहे. तसंच पूर्वी ब्राह्मणेतर नॉन-व्हेज खायचे. आता सगळ्यांबरोबर ब्राह्मणही नॉन-व्हेज खाऊ लागले तर काय बिघडलं?" शरीराला पचत नाही, वासाचा त्रास होतो, दुस-या जीवाला मारून खाणं पटत नाही, म्हणून नॉनव्हेज कुणी खात नसलं तर ठीक आहे. पण 'मी ब्राह्मण आहे, म्हणून मी नॉन-व्हेज खाणार नाही', असा विचार करणारा माणूस (जो जन्मामुळे ब्राह्मण आहे) मागासलेल्या विचारांचा आहे असं नाही का म्हणता येणार??
विशिष्ट भाषा-जाती-धर्म-प्रांताच्या लोकांतील काही गुणांत-अवगुणांत साधर्म्य आढळतं हे मान्य!! पण ते एखाद्या जातीच्या सर्वच व्यक्तींत, सर्वच बाबतीत आढळून यावं असं तर नाही ना. आज समाजात अशी ब्राह्मण मंडळी आहेत, जी स्वतःला ते ब्राह्मण असल्यामुळे जास्त श्रेष्ठ समजतात. आणि त्यांचं हे मत उघडपणे मांडतात सुद्धा. बरीच अशी मंडळीही आहेत, जी ब्राह्मण असूनही ब्राह्मणांनाच शिव्या घालतात. पण काही अशी मंडळीसुद्धा आहेत, ज्यांना आपण ब्राह्मण असल्याचा गर्वही नाही, लाजही नाही. ब्राह्मणतेरात काही अशी मंडळी आहेत, जी ब्राह्मणांचा ते ब्राह्मण आहेत म्हणून द्वेष करतात. तर काही अशी मंडळी आहेत, ज्यांच्या मनात एखादा माणूस ब्राह्मण आहे हे कळल्यावर त्याच्याविषयी कौतुक आणि आदर वाटायला लागतो.
जातीवरून माणूस चांगला की वाईट, हुशार की मठ्ठ, हे ठरवणं चुकीचं आहे. जातीचा दुराभिमान बाळगणारे, जातीवरुन लोकांना संघटित करणारे, जातीविषयी लाज बाळगणारे, जातीच्या अशा मानल्या गेलेल्या जुन्या रुढी परंपरा जपणारे, आणि जातीची यत्किंचितही पर्वा नसणारे असे लोक हे सगळ्या जातींत असतात. तेव्हा ठरावीक लोकांच्या स्वभावावरुन अख्ख्या जातीचं चारित्र्य ठरवणं हा मूर्खपणा आहे. हे फक्त ब्राह्मणांच्या बाबतीत होतं असं नाही. त्यामुळेच इथे ब्राह्मण-ब्राह्मणेतर असा मुद्दाही मांडायचा नाही. सगळ्याच जातींच्या बाबतीत होतं. मी ब्राह्मण जातीचा आहे त्यामुळे मी ब्राह्मणांबद्दल माझ्या अनुभवातून सांगितलं. दुस-या जातीचा असतो, तर फक्त नाव आणि उदाहरणांचं स्वरूप बदललं असतं, मुद्दा तोच राहिला असता.
वाचने
44563
वाचनखूण
प्रतिक्रिया
170
बरं ...मग ?
In reply to बरं ...मग ? by प्रसाद गोडबोले
तुम्ही ब्राम्हण आहात का
In reply to तुम्ही ब्राम्हण आहात का by देवांग
छ्या:
In reply to छ्या: by प्रसाद गोडबोले
+१
बरच संतुलीत लिखाण!
In reply to बरच संतुलीत लिखाण! by स्पंदना
+१
उत्तम विचार. जातियवादाने
In reply to उत्तम विचार. जातियवादाने by डॉ सुहास म्हात्रे
उत्तम विचार. जातियवादाने
In reply to उत्तम विचार. जातियवादाने by llपुण्याचे पेशवेll
तत्व आणि वास्तविकता....
In reply to तत्व आणि वास्तविकता.... by डॉ सुहास म्हात्रे
चांगला प्रतिसाद.
लेख आवडला. अर्थात balanced
...
'हो भेटली!'सही रेतुमचा मित्रपरिवार खूप मोठा
****
+११११११
In reply to +११११११ by गजानन५९
................
In reply to ................ by चेतनकुलकर्णी_85
काय राव .सिंपल आहे.ब्राम्हनां
त्या दिवसानंतर ती मुलगी
जातीना अर्थ असतो अन नसतोही
सहमत नाही
In reply to सहमत नाही by मंदार कात्रे
याचा अर्थ
In reply to सहमत नाही by मंदार कात्रे
@मंदार कात्रे
In reply to @मंदार कात्रे by वडापाव
विचारसरणी
In reply to विचारसरणी by मंदार कात्रे
मी असं लिहीलंय.
In reply to विचारसरणी by मंदार कात्रे
मंदार कात्रे आणि वडापाव यांना सविनय सादर !
जग कितीही बदलले आणि कितीही वैज्ञानिक प्रगती झाली तरी धर्माची काही स्थिर आणि काही चल तत्त्वे असतात . चल तत्त्वे कालानुरूप बदलतात ,जसे की १९ व्या शतकात चालू असलेल्या सतीप्रथा / विधवा केशवपन इत्यादि कुप्रथा आज बन्द झाल्या म्हणून धर्म बुडाला नाहीए . पण धर्माची स्थिर तत्त्वे असलेले व्यक्तिगत सन्स्कार ,जसे की चोरी करणे हे पाप आहे ,आणि ते मागच्या शतकातही पाप होते आणि आजही पाप आहेसर्वं स्वं ब्राम्हणस्य इदं यत किंचिद जगती-गतम. श्रेष्ठ्येन अभिजनेन इदं सर्वं वै ब्राम्हण: अहर्ती. स्वम एव ब्राम्हण: भुड्क्ते स्वं वस्ते स्वं ददाति च. आनृशंस्याद ब्राम्हणस्य, भुज्ज्ते हि इतरे जना: ( मनुस्मृती १.१००-१०१) अनुवाद- या जगामध्ये जी काही संपत्ती असते, ती संपत्ती ब्राम्हणांची असते.श्रेस्ष्ठत्वामुळे आणि जन्माच्या उच्चतेमुळे या सर्वांसाठी ब्राम्हण योग्य असतो. ब्राम्हण स्वत:चेच खातो, स्वत:चेच नेसतो आणि स्वत:चेच देतो. ब्राम्हणाच्या दयेमुळे इतर लोक (त्यांनी स्वत: कमावलेल्या संपत्तीचा) उपभोग घेतात. विश्लेषण- जगातील सर्व च संपत्ती ही ब्राम्हणाचीच आहे त्यामुळे त्याने दुसर्याा एखाद्याची संपत्ती वापरली तर ती त्याने चोरी केली आहे असे होउच शकत नाही. तो दुसर्यातची अर्जीत केलेली संपत्ती वापरत असतो ती त्याचा जगावरील प्रत्येक संपत्ती वर त्याला जन्मजात श्रेष्ठत्वामुळे जो मालकी हक्क प्राप्त झाला आहे त्यामुळेच. म्हणुन ब्राम्हण दुसर्याकचे नव्हे तो स्वत:चेच खातो ,स्वत:चेच नेसतो आणि स्वत:चे देतो त्यामुळे ब्राम्हणाने कोणाची चोरी वगैरे केली असा प्रश्न च उपस्थित होत नाही. या उलट एखाद्या दुसर्याेने कष्ट करुन काही संपत्त्ती मिळविली आणि जर का तो तिला ब्राम्हणांची दया नसतांना परवानगी नसतांना वापरु बघत असेल तर ही त्या माणसाची चोरी मानली जाते. कारण मुळ मालक हा ब्राम्हण असता या माणसाने त्याच्या दये-परवानगी शिवाय अशी संपत्ती वापरणे ही चोरीच नव्हे का ? चोरी न करणे हे धर्माच्या एका महान अशा स्थिर तत्वांमध्ये येते. मनुस्मृती हे महान असे धर्माचे शास्त्र त्यावर महान असा स्थिर नियम घालुन देते.आणि स्थिर नियम कधीही बदलत नाहीत त्यावरच धर्म शतकानुशतके स्थिर टिकुन ही राहतो. बाकी मुर्ख लोक म्हणी बनवित राहतात उदा. एव्हरीथींग चेंजेस एक्सेप्ट द लॉ ऑफ़ चेंज. तरीही काही बिनडोक लोंक ब्राम्हणां च्या चोरी विरुध्द न्याय मागण्यासाठी एखाद्या राजा किंवा न्यायाधीशांकडे जातातच मग राजा किंवा न्यायाधीश ही कधीकधी अशा बिनडोक लोकांच्या नादी लागुन ब्राम्हणांविरुध्द निकाल देण्याची शक्यता निर्माण होउ शकते. आणि मग न्याय हे दुसरे महान असे स्थिर तत्व धोक्यात येउ शकते. कारण न्याय हा ही जगातल्या सर्वच धर्मांमधील एक महत्वाचं अस स्थिर तत्व आहे. मग काय करावे बरे ? चला तैत्तिरीय संहीता आली की हो न्याय करायला काय म्हणते बघु या यद ब्राम्हण: च अब्राम्हण:च प्रश्नम इयातां ब्राम्हणाय अधिब्रुयात. यद ब्राम्हणाय अधि-आह आत्मने अधि-आह. यद ब्राम्हणं परा-आह आत्मानं परा-आह. ( तैत्तिरीय संहीता २.५.११.९ ) अनुवाद- जर एखाद्या कडे एक ब्राम्हण आणि एक अब्राम्हण आपला प्रश्न (तक्रार) घेउन आला तर ,ब्राम्हणाच्या बाजुने निर्णय द्यावा. ब्राम्हणाच्या बाजुने बोलणे म्हणजे स्वत:च्या बाजुने बोलणे होय.ब्राम्हणाच्या विरोधात बोलणे म्हणजे स्वत:च्या विरोधात बोलणे होय. म्हणुन ब्राम्हणांच्या विरोधात बोलु नये. विश्लेषण- हे काय हो गडे आता विश्लेषण ही तुम्हीच करणार का तुम्ही कीनई फ़ार फ़ार पुर्वग्रह दुषीत आहात.,आम्हाला ना आमचे धुंडीराज बापट शास्त्रीजी जे आहेत ना त्यांनी स्वत: या श्लोकाच केलेल भाषांतरच हवे कारण त्यांच्या इतका या विषयावरील अधिकारी माणुस शोधुन सापडायचा नाही तुम्ही तेच द्या बर. अहो अस काय करता मी पण ब्राम्हण च आहे की , हो पण तुम्ही कीनई बिघडलेले नास्तिक आहात ठिक आहे त्यांच्याच शब्दात.. धुंडीराज बापट शास्त्रिंचे या श्लोकाचे विश्लेषण " ब्राम्हण व अब्राम्हण या दोहोंमध्ये " मी तु्झ्याहुन श्रेष्ठ आहे, मी तु्झ्याहुन श्रेष्ठ आहे, असा वाद जेव्हा उत्पन्न होईल आणि या वादाच्या निर्णयासाठी ते दोघेही एखाद्या तिर्हााइता कडे येउन प्रश्न विचारतील, तेव्हा निर्णय करणार्याश तिर्हासइताने ब्राम्हण श्रेष्ठ आहे असाच निर्णय द्यावा. म्हणजे त्याने स्वत:ला श्रेष्ठत्व मिळविल्यासारखे होते. ब्राम्हण हा पराभुत म्हणजे अब्राम्हणाहुन कमी योग्यतेचा आहे, असा निर्णय दिल्याने तो निर्णय देणार्याश तिर्हााइताने स्वत:चाच पराभव बोलुन दाखविल्याप्रमाणे होते. यास्तव ब्राम्हण हा अब्राम्हणापेक्षा कमी योग्यतेचा आहे असे कधीही बोलु नये. (कृष्ण यजुर्वेद-भाग १-तैत्तिरीय संहीता पृष्ठ क्रमांक-३३०-३३१ प्रकाशक:- चि.धुं बापट- कानपुर-१६- १९९४) समारोप- १-जगातील सर्व संपत्ती ही ब्राम्हणांचीच आहे कोणी दुसरा ब्राम्हणांच्या दये अथवा परवानगी शिवाय जर ती वापरत असेल आणि स्वत: कष्टाने कमविली म्हणुन माझीच असा गैरसमज करुन घेत असेल तर ही त्याने केलेली ब्राम्हणांच्या संपत्तीची चोरी च आहे आणि चोरी करणे हे पाप आहे आणि ते मागच्या शतकातही पाप होते आणि आजही पाप आहे. आणि हे धर्माचे स्थिर तत्व आहे. २ चल तत्वे आणि त्यामुळे निर्माण झालेल्या वेदना उदा सति या धर्माच्या चल तत्वा ने स्त्रियांना जळतांना होणार्या थोडयाफ़ार वेदना हे म्हणजे फ़ार च बिनमहत्वाच आणि किरकोळ आहे त्या तुलनेने स्थिर तत्वे ज्याने धर्म स्थिर राहतो ते फ़ार फ़ार महत्वाचे आहे. आणि केशवपन काय उकरुन काढता हो कीती कीती क्षुद्र विषय होता तो काय ते चल तत्व किरकोळ हे बघा आपण बालाजीला नाही बघत का मुली केशवपन करतात ते आणि त्याने उवा वगेरेंचा ही त्रास होत नाही शिवाय केशवपना ने स्त्रियांच्या सौंदर्यात ही वाढ च होते नाही का ? आणि बंद झाल हो ते सर्व आता तुम्ही सोडा बर ती चल तत्वे आता महान अशा स्थिर तत्वांवरच बुध्दी स्थिर करु या!In reply to मंदार कात्रे आणि वडापाव यांना सविनय सादर ! by मारवा
नक्की काय लिहिले आहे
In reply to नक्की काय लिहिले आहे by lakhu risbud
उपहास की उपरोध की अज्ञान ?
In reply to उपहास की उपरोध की अज्ञान ? by मंदार कात्रे
अहो आपण चल आणि स्थिर तत्वांविषयी लिहीत होतात ना ?
In reply to अहो आपण चल आणि स्थिर तत्वांविषयी लिहीत होतात ना ? by मारवा
मूळ वैदिक
In reply to नक्की काय लिहिले आहे by lakhu risbud
रीसबुड
In reply to रीसबुड by मारवा
अहो हा पवित्र धर्मग्रंथाचा
लेख आवडला. यात ब्राह्मण-
In reply to लेख आवडला. यात ब्राह्मण- by प्रकाश घाटपांडे
वाह
In reply to लेख आवडला. यात ब्राह्मण- by प्रकाश घाटपांडे
आजचा सुधारक या विवेकवादाला
दिवाळी अंकाचे संपल्यावर
मागासलेपण ठरवण्यासाठी...
In reply to मागासलेपण ठरवण्यासाठी... by अनन्न्या
अनन्न्या तुमचा मुद्दा पटला.
ब्राह्मण असल्याचे तोटे कमी
In reply to ब्राह्मण असल्याचे तोटे कमी by ग्रेटथिन्कर
ग्रेटथिंकरांशी चक्क अंशतः
In reply to ब्राह्मण असल्याचे तोटे कमी by ग्रेटथिन्कर
हो हो, मीही चक्क अंशत: सहमत.
In reply to ब्राह्मण असल्याचे तोटे कमी by ग्रेटथिन्कर
घरच्यांचा विरोध.
'तू ब्राह्मण आहेस का?'
In reply to 'तू ब्राह्मण आहेस का?' by कॅप्टन जॅक स्पॅरो
मलाही "तू ब्राह्मण??? वाटत
In reply to मलाही "तू ब्राह्मण??? वाटत by बॅटमॅन
बाकी ब्राह्मणांतसुद्धा एकूणच
In reply to बाकी ब्राह्मणांतसुद्धा एकूणच by कॅप्टन जॅक स्पॅरो
अगदी, अगदी!! अव्वल वर्णाचे!
In reply to बाकी ब्राह्मणांतसुद्धा एकूणच by कॅप्टन जॅक स्पॅरो
अगदी अगदी. मी कुलकर्णी नसले
In reply to मलाही "तू ब्राह्मण??? वाटत by बॅटमॅन
हाईट म्हणजे आमच्या काही
In reply to हाईट म्हणजे आमच्या काही by कॅप्टन जॅक स्पॅरो
कोब्रांच्या जीन्समध्ये काही
In reply to कोब्रांच्या जीन्समध्ये काही by बॅटमॅन
हा पेपर घेउन गेलो तर व्हिसा
In reply to हाईट म्हणजे आमच्या काही by कॅप्टन जॅक स्पॅरो
हा हा हा. भारी विनोद आहे.
In reply to मलाही "तू ब्राह्मण??? वाटत by बॅटमॅन
@मलाही "तू ब्राह्मण??? वाटत
In reply to मलाही "तू ब्राह्मण??? वाटत by बॅटमॅन
त्यात देशस्थ गोरे घारे वैग्रे
In reply to 'तू ब्राह्मण आहेस का?' by कॅप्टन जॅक स्पॅरो
बीग्रेडी दहशतवाद
In reply to 'तू ब्राह्मण आहेस का?' by कॅप्टन जॅक स्पॅरो
हा हा..
In reply to हा हा.. by योगी९००
+१
In reply to +१ by भुमन्यु
नॉन व्हेज महाग
In reply to नॉन व्हेज महाग by सुबोध खरे
सगळ्या ब्राम्हणांना हे ऐकावेच लागते
सांभाळून बुवा!!
In reply to सांभाळून बुवा!! by वडापाव
आडनाव जोशी होतं का हो त्याचं?
पाटील तुम्ही आयुर्वेदात काय करणार ?
In reply to पाटील तुम्ही आयुर्वेदात काय करणार ? by बाबा पाटील
हे मात्र प्रत्यक्ष पाहीलयं.
In reply to पाटील तुम्ही आयुर्वेदात काय करणार ? by बाबा पाटील
अहो डॉक्टर माझे तेच म्हणणे
In reply to अहो डॉक्टर माझे तेच म्हणणे by रेवती
होतं असं कधी कधी....
भारतात प्रत्येक गोष्ट जातीय
अंतरजातीय विवाह हे जे जात
In reply to अंतरजातीय विवाह हे जे जात by अत्रुप्त आत्मा
असं नाही काही. समजा
In reply to असं नाही काही. समजा by वडापाव
वडापाव,
In reply to अंतरजातीय विवाह हे जे जात by अत्रुप्त आत्मा
असहमत
In reply to असहमत by डॉ सुहास म्हात्रे
+१
In reply to असहमत by डॉ सुहास म्हात्रे
@यात धोका असा की त्यामुळे
In reply to @यात धोका असा की त्यामुळे by अत्रुप्त आत्मा
@काही दिवसांनी (पिढ्यांनी)
@काही दिवसांनी (पिढ्यांनी) जात सांगायचे / विचारायचे कारण आपोआप नाहिसे होईल.>>> ते मी म्हटलं तश्याच 'कार्यक्रमांनी' शक्य होणार आहे.नो प्रॉब्लेम ! एका किंवा अनेक कोणत्याही प्रकारे भारतातील अयोग्य रुढी-परंपरा जर दूर झाल्या तर आनंदच आहे... त्या भूतकाळात जाणे जास्त महत्वाचे. (एखादी गोष्ट करण्याचे एकापेक्षा जास्त प्रकार बरोबर असू शकतात यावर विश्वास असणारा) इएमाननीय वडापावजी, तुमच्या
In reply to माननीय वडापावजी, तुमच्या by रेवती
संपादकीय अधिकारांचा वापर करून
In reply to संपादकीय अधिकारांचा वापर करून by डॉ सुहास म्हात्रे
मिळाला, नव्या धाग्याचा विषय
In reply to मिळाला, नव्या धाग्याचा विषय by रेवती
रेवतीताई,
In reply to रेवतीताई, by वडापाव
@मित्रपरिवार वाढावा असा
In reply to मिळाला, नव्या धाग्याचा विषय by रेवती
मतांची जमवाजमव करण्याची
In reply to मतांची जमवाजमव करण्याची by डॉ सुहास म्हात्रे
ते कंपू बिंपू काय नको पण
थोड सफ्जुन घ्या !
'मी ब्राह्मण आहे, म्हणून मी नॉन-व्हेज खाणार नाही', असा विचार करणारा माणूस (जो जन्मामुळे ब्राह्मण आहे) मागासलेल्या विचारांचा आहे असं नाही का म्हणता येणार??अहो प्राचीन काळापासुन ब्राम्हण अगदी व्यवस्थित मांसाहार करीत असत त्याला धर्माची पुरेपुर मान्यता होती. म्हणुन ब्राम्हण जर मांसाहार करीत नसतील तर ते आधुनिक ठरतात कारण ते आपल्या पुर्वजांची जुनी मांस खाण्याची परंपरा मानायला नकार देत आहेत. ते आधुनिक आणि बंडखोर आहेत म्हणुन आपल्या पुर्वज ब्राम्हणांची मांस खाण्याची परंपरा नाकारुन शाकाहार करीत आहेत. आता यझ संचालन करण्याचा अधिकार केवळ फ़क्त ब्राम्हणांना च होता हे तुम्हाला माहीत आहे हे गृहीत धरुन चालतो. क्षुद्र आदींना त्याच्या आसपास ही येण्यास मनाई होती हे ही माहीत असेल असे समजतो. एतरेय ब्राम्हण आपण वाचलेच असेल. आणि हा त्यातील प्रसिध्द श्लोक ज्यात यज्ञात बळी दिलेल्या प्राण्याच्या अवयवांची वाटणी यझ संचालित करणार्याक ब्राम्हणांत कशी करावी याचे स्वच्छ वर्णन केलेले आहे. याचा मुळ संस्कृतश्लोका ची लिंक ही देतो आणि त्याचा इंग्रजी अनुवाद ही देतो. हे समजण्यास काही अडचण आली तर अजुनही खोलात जाउ शकतो. तुर्तास एवढे पुरेल बहुधा आणि एक मधुपर्क म्हणजे काय ? तो कोणी कोणाला द्यायचा असतो ? आणि त्याच्या व्याख्येत नांमासो मधुपर्क भवति असे का म्हटलेले आहे हे जरा शोधुन काढा. Indology चा अगदी पहीला प्राथमिक धडा जरी अभ्यासला तरी चालेल. http://hinduonline.co/Scriptures/Brahmana/AitareyaBrahmana.html "Now follows the division of the different parts of the sacrificial animal (among the priests). We shall describe it. The two jawbones with the tongue are to be given to the Prastotar; the breast in the form of an eagle to the Udgatar; the throat with the palate to the Pratihartar; the lower part of the right loins to the Hotar; the left to the Brahma; the right thigh to the Maitravaruna; the left to the Brahmanuchhamsi; the right side with the shoulder to the Adhvaryu; the left side to those who accompany the chants; the left shoulder to the Pratipasthatar; the lower part of the right arm to the Neshtar; the lower part of the left arm to the Potar; the upper part of the right thigh to the Achhavaka; the left to the Agnidhra; the upper part of the right arm to the Aitreya; the left to the Sadasya; the back bone and the urinal bladder to the Grihapati (sacrificer); the right feet to the Grihapati who gives a feasting; the left feet to the wife of that Grihapati who gives a feasting; the upper lip is common to both, which is to be divided by the Grihapati. They offer the tail of the animal to wives, but they should give it to a Brahmana; the fleshy processes (maanihah) on the neck and three gristles (kikasaah) to the Grahvastut; three other gristles and one half of the fleshy part on the back (vaikartta) to the Unnetar; the other half of the fleshy part on the neck and the left lobe (Kloma) to the Slaughterer (Shamita), who should present it to a Brahmana, if he himself would not happen to be a Brahmana. The head is to be given to the Subrahmanya, the skin belongs to him (the Subrahmanya), who spoke, Svaah Sutyam (to morrow at the Soma Sacriice); that part of the sacrificial animal at a Soma sacrifice which beloings to Ilaa (sacrificial food) is common to all the priests; only for the Hotar it is optional. All these portions of the sacrificial animal amount to thirty-six single pieces, each of which represents the paada (foot) of a verse by which the sacrifice is carried up..." "To those who divide the sacrificial animal in the way mentioned, it becomes the guide to heaven (Swarga). But those who make the division otherwise are like scoundrels and miscreants who kill an animal merely." "This division of the sacrificial animal was invented by Rishi Devabhaaga, a son of Srauta. When he was departing from this life, he did not entrust (the secret to anyone). But a supernatural being communicated it to Girija,the son of Babhru. Since his time men study it." [Aitareya Brahman, Book 7, Para 1, ]In reply to थोड सफ्जुन घ्या ! by मारवा
ब्राह्मणांच्या मांसाहाराचे
In reply to ब्राह्मणांच्या मांसाहाराचे by बॅटमॅन
ब्याटोबा,
In reply to ब्याटोबा, by आनंदी गोपाळ
मान्य आहे ओ साहेऽबं, ते यकदोन
In reply to ब्याटोबा, by आनंदी गोपाळ
जातीशी संबंध फक्त आहाराचाच
In reply to जातीशी संबंध फक्त आहाराचाच by ग्रेटथिन्कर
तुळजाभवानी ,ज्योतिबा
तुळजाभवानी ,ज्योतिबा -मराठ्यांचेकाय राव कैच्या काय ? दोन्ही आमच्या कडे कुलदेवता व कुलदेव आहेत देवाला तरी जातीच्या बंधनात बांधू नकोस रे ग्रेट्या तुम्हाला कोणी अडवलेय दत्त गुरुन्जी, गणपतीची किंवा परशुरामाची भक्ती करायला ?करत जावा कि ! (काही भाग अप्रकाशित) - संपादक मंडळ. स्वतःला फक्त (शाकाहारी )हिंदू समजणाराIn reply to तुळजाभवानी ,ज्योतिबा by चेतनकुलकर्णी_85
कुलकर्णी साहेब,
In reply to कुलकर्णी साहेब, by प्यारे१
जण्रल असेल स्टेट्मेण्ट तर ओके.
In reply to जण्रल असेल स्टेट्मेण्ट तर ओके. by अभ्या..
+१
In reply to जण्रल असेल स्टेट्मेण्ट तर ओके. by अभ्या..
अबे अभ्या,
In reply to अबे अभ्या, by प्यारे१
>>>मंगळावर...
In reply to अबे अभ्या, by प्यारे१
भोपी भोपी.