जन्मलो तेव्हा मला खूप अक्कल होती, कारण तेव्हा मला माहित होतं, हे जग किती घाण आहे ते. म्हणून तर आल्या आल्या रडायला लागलो. पण घाणीत राहून आपणही घाण होतो म्हणून असेल, किंवा मी रडून रडून कंटाळलो असेन, म्हणून असेल - मी रडायचा थांबलो. मग वय हळू हळू वाढत गेलं आणि अक्कल भराभरा कमी होत गेली. मग पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागली. नर्सरी म्हणू नका, शिशुवर्ग म्हणू नका, शाळा म्हणू नका, कॉलेज म्हणू नका... सगळं पालथं घातलं. आणि आत्ता कुठे, मी गमवलेल्या अकलेचा एखाद-टक्का परत मिळवल्याची जाणीव होत्येय.
इथे निसर्गाचा एकच कायदा आहे, 'आपण जगायचं, दुस-याला मारायचं. सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट!! माणूस निसर्गाच्या वर चढू पाहतोय म्हणतात. शक्यच नाही. निसर्गाने माणसाला जसा तयार केलाय, जसा घडवलाय, अगदी तसाच तो वागतोय. तो कोणतेच नियम मोडत नाही. मानवाने इतर प्राण्यांची शिकार केली, म्हणून आज काही जाती नष्ट होतायत, झाल्यात. इतिहासात मानव यायच्या आधीही ब-याच प्रजाती नष्ट झाल्यात की. आणि शिकार काय फक्त माणूसच करतो? वाघ, सिंह, तरस, लांडगे, चित्ता, बिबट्या असे भरपूर पशू आहेत. मानव हा सुद्धा पशूच. मानवाला पशू म्हटल्याने ना पशूंचा अपमान होतो, ना मानवाचा. कारण खरच तो पशूच आहे, आणि पशूप्रमाणेच वागतो. त्यात काही चुकीचं नाही.
माणूस झाडं तोडतो, तोडत असेल, पण त्यांचा काहीतरी वापर करतो. हत्ती, माकडं यांना मस्ती चढली की विनाकारण कित्येक झाडं हकनाक मरतात. माणूस धरणं बांधून गावं बुडवतो. निसर्ग कित्येक गावं-शहरं तशीही अधुन-मधुन बुडवतच असतो की. शेतक-याला सुखावणारा पाऊस काही पक्ष्यांना, किड्यामुंग्यांना भारी पडू शकतो की. निसर्गातील कोणतीही घटना, त्या घटनेने निर्माण झालेली अवस्था, ही नेहमी काही प्रकारच्या सजीवांना मदत करते, तर काहींचा -हास करते.
आपण स्वतःला निसर्गापेक्षा वेगळे का म्हणतो हेच मला कळत नाही. सोयीचं जातं म्हणून? अरे पण सोयीच्या फंदात आपण आपलं मूळ विसरून जातो त्याचं काय!! आपण बांधलेली इमारत 'मानव-निर्मित' आणि मुंग्यांनी बांधलेली मोठीच्या मोठी वारुळं मात्र निसर्गाची किमया?? का?? आपल्या बिल्डिंग्ज, टॉवर्स, इतर सर्व वास्तू, ही निसर्गाचीच किमया आहे. आपण कशाचीही निर्मिती केली, की ती निसर्गाची कल्पकता आहे. आणि जर आपण विध्वंस केला, तर तो निसर्गाच्या रुद्रावताराचाच एक अंश आहे.
त्यामुळे आपण आज कितीही प्राण्यांची शिकार करुन त्यांच्या जाती नष्ट केल्या, कितीही खनिजं उकरून पृथ्वीच्या पोटातलं सगळं वापरून संपवून टाकलं, तरी निसर्गाची काळजी करण्याचं काही कारण नाही. फार फार तर काय होईल? सगळे बर्फ वितळतील, सगळी शहरं बुडतील. बरेच जीव मरतील. त्यात माणसं सुद्धा. मरुदेत!!! निसर्गाला काही फरक पडणार नाहिये. या घटनेला आपण जरी 'महाप्रलय' असं नाव दिलं, तरी त्यात विशेष असं काहीच होणार नाहीये. एके काळी जगात जिकडे तिकडे डायनॉसॉर्स होते, आता ते कुठेच अस्तित्वात नाहियेत. त्याच प्रकारे आज जगात जिकडे तिकडे कच-यासारखी मानवजात पसरलीये. महाप्रलयानंतर ती कुठेही आढळणार नाही. नाही तर नाही. डायनॉसॉर गेले म्हणून निसर्गाचं काही बिघडलं? मग माणूस गेल्याने तरी काय मोठं होणार आहे? सगळेच जीव तर जाणार नाहीत. आणि निसर्गाची किमयाच म्हणता, तर महाप्रलयात असे जीव उत्क्रांत होतील, ज्यांना त्यावेळी त्या परिस्थितीत स्वतःची जीवनपद्धती प्रस्थापित करता येईल. जीवसृष्टी आहे तश्शीच राहील... फक्त थोडे फार फेर बदल होतील इतकंच... सजीवाचा आकार, रंग, गुणधर्म बदलला, बदलुदे!! काय वाईट झालं? काही नाही.
तेव्हा निसर्गाची काळजी करणा-यांनी ती अजिबात करु नये. काळजी करायला हवी ती माणसाने, स्वतःचीच. आपण जे काही उपद्व्याप चालवल्येत, ते आपल्याच अस्तित्वावर घाला घालतील, निसर्गाला घंटा फरक पडणार नाही, त्याचा उलट चांगलाच टाईमपास होईल.
जगाचं समीकरण हे असं साधं सिम्पल आणि सरळसोट आहे - शक्ती, बुद्धी, आणि क्रौर्य!! या ३ गोष्टींचा समेट ज्या जीवात नीट घडून येईल, तो जीव जगेल. बाकीचे गेले तेल लावत!! आता मला सांगा, अशा या जगात फक्त बुद्धी घेऊन आलेल्या माझ्यासारख्या अडीच वीत उंचीच्या जीवाला, रडायला नाही का येणार?? जग नेहमी समतोल राखून असतं. त्यामुळे जशी माझी शक्ती आणि माझं क्रौर्य वाढत गेलं, तशी माझी बुद्धी त्या प्रमाणात कमी कमी होत गेली. आज माझ्यात या तिन्ही गोष्टी नेमक्या किती प्रमाणात आहेत, माहित नाही. पण तिन्ही आहेत. नाहीतर मी जिवंत कसा राहिलो असतो? सर्व्हाइव्ह कसा झालो असतो? शेवटी मी कोण आहे? मी निसर्ग आहे. आणि हा सगळा पसारा मी मला स्वतःशीच खेळता यावं, म्हणून माझ्यासाठीच मांडून ठेवलाय!!!
वाचने
10527
प्रतिक्रिया
46
मिसळपाव
प्रतिक्रिया
हं!
आपण बांधलेली इमारत 'मानव
क्रौर्य कमी होण्याबद्दल काही
In reply to आपण बांधलेली इमारत 'मानव by राजेश घासकडवी
वा आप्पा !! घासुगुर्जींची
In reply to क्रौर्य कमी होण्याबद्दल काही by अप्पा जोगळेकर
स्टीव्हन पिंकरचं पुस्तक वाचा
In reply to क्रौर्य कमी होण्याबद्दल काही by अप्पा जोगळेकर
त्या पिंकरमहाशयांवर अगदी
In reply to आपण बांधलेली इमारत 'मानव by राजेश घासकडवी
मी टीका वाचेनच, वरवर चाळली
In reply to त्या पिंकरमहाशयांवर अगदी by बॅटमॅन
पिंकरचे पुस्तक चाळले. सर्वात
In reply to मी टीका वाचेनच, वरवर चाळली by राजेश घासकडवी
पिंकर म्हणजे..
In reply to पिंकरचे पुस्तक चाळले. सर्वात by नगरीनिरंजन
माणसाची बुद्धीजीवी वागणुक
In reply to आपण बांधलेली इमारत 'मानव by राजेश घासकडवी
माणसाची बुद्धीजीवी वागणुक वाढत चालली आहे आणि क्रौर्य कमी होत चाललं आहे असं स्टीव्हन पिंकर म्हणतो...हे विधान सबळ पुराव्यांवर आधारीत नाही तर कविमनाचा आशावाद वाटतो आहे. एका बाजूने जसे लोकांमधील दळणवळण वाढल्यामुळे आणि नितीमत्तेच्या लाजे-काजेखातर मनुष्यवध आणि वंशविच्छेद करण्यावर दडपण आले आहे तसेच दुसर्या बाजूने त्याच प्रगत मेंदूचा आणि बुद्धीचा वापर करून वंशविछेद करू शकणारी पुर्वीपेक्षा कित्येक पटीने सामर्थ्यवान असणारी (ऑटोमॅटीक रायफल पासून वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन पर्यंत) हत्यारेही तयार केलेली आहेत आणि वर वंशविच्छेदाची काळी कृत्ये झाकून टाकायला वेगवेगळ्या क्लुप्त्या आणि कारणे शोधून काढली गेली आहेत... जगातले संख्येचा दृष्टीने मोठे वंशविच्छेद (जेनोसाईड) हे अलिकडच्या काळातच जास्त झाले आहेत. उदा: १. अमेरिकन मूलवासींच्या युरोपियन वसाहतवाद्यांनी केलेल्या कत्तली, २. ऑस्ट्रेलियन मूलवासीमच्या युरोपियन वसाहतवाद्यांनी केलेल्या कत्तली, ३. नाझी वंशवादाचे बळी, ४. रशियन लोकांनी पोलिश आणि स्लावज् ची केलेली कत्तल (१९४०), ५. रुआंडा आणि बुरूंडीमध्ये तुत्सी आणि हुतूंनी केलेल्या एकमेकाच्या कत्तली (१९६० आणि १९७० ची दशके) ६. लेबॅनॉनच्या यादवी युद्धात मुस्लिम आणि ख्रिश्चनांनी केलेल्या एकमेकाच्या कत्तली ७. ख्मेर रुजने कंबोडियात केलेल्या स्वकियांच्या कत्तली (१९७५-७९) ही झाली फक्त काही मोठी उदाहरणे. काही शें लोकांच्या कत्तलींची उदाहरणे असंख्य आहेत. त्यांतली बरीच भौगोलीक परिस्थितीमुळे (उदा. मध्य आफ्रिकन राज्ये) बाहेर येत नाहीत तर अनेकदा राजकीयदृष्ट्या गैरसोईची असल्याने केवळ उघड गौप्य (ओपन सिक्रेट) म्हणुन राहतात. क्रोर्य कमी झाले नाही तर (१) ते उघडपणे घोषित करून करणे जास्त धोकादायक बनले आहे आणि (२) क्रोर्य करणारा बलवान असला तर त्याची करणी उघड करणे धोकादायक असते हे तर सार्वकालीक सत्य (आजही) आहेच.हे विधान सबळ पुराव्यांवर
In reply to माणसाची बुद्धीजीवी वागणुक by डॉ सुहास म्हात्रे
माफ करा
In reply to हे विधान सबळ पुराव्यांवर by राजेश घासकडवी
बुद्धी, शक्ती आणि क्रौर्य
+१
माणसाचं आयुष्य हे काळाच्या
In reply to +१ by जे.पी.मॉर्गन
माणसात आणि इतर प्राण्यात मूळ
राजीव साने..
सहमत.
In reply to राजीव साने.. by गवि
माणूस पशू आहे तर बलात्कार
लेख लिहिण्यामागचा नेमका
In reply to माणूस पशू आहे तर बलात्कार by नगरीनिरंजन
समजले.
In reply to लेख लिहिण्यामागचा नेमका by वडापाव
निती-अनितीच्या
In reply to माणूस पशू आहे तर बलात्कार by नगरीनिरंजन
शब्दांचे खेळ टाळून स्पष्टीकरण
In reply to निती-अनितीच्या by ऋषिकेश
मला जे कळतं ते...
In reply to शब्दांचे खेळ टाळून स्पष्टीकरण by नगरीनिरंजन
गल्लत
In reply to शब्दांचे खेळ टाळून स्पष्टीकरण by नगरीनिरंजन
गल्लत तुमची होतेय.
In reply to गल्लत by ऋषिकेश
माणूस पशू आहे तर बलात्कार
In reply to माणूस पशू आहे तर बलात्कार by नगरीनिरंजन
खुलासा
In reply to माणूस पशू आहे तर बलात्कार by राजेश घासकडवी
नैसर्गिक आणि मानवी
बलात्कार अन समलैगीकत्व हे
In reply to नैसर्गिक आणि मानवी by चित्रगुप्त
वर विस्ताराने लिहिलं आहेच पण
In reply to नैसर्गिक आणि मानवी by चित्रगुप्त
सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट!!
वडापाव, हे पहाच :)
जगदंब जगदंब! जे जे होईल ते ते
दीपिका पदुकोण...
एक वेगळा धागा...
काहीतरी वेगळा विचार
सगळेच ड्यांबिस असतात, कोणाला नावं ठेवणार?
In reply to काहीतरी वेगळा विचार by पिशी अबोली
आमच्याकडे टोण्या नावाचा एक
In reply to सगळेच ड्यांबिस असतात, कोणाला नावं ठेवणार? by ३_१४ विक्षिप्त अदिती
ह्युमन प्लॅनेट या बीबीसीवर
In reply to सगळेच ड्यांबिस असतात, कोणाला नावं ठेवणार? by ३_१४ विक्षिप्त अदिती
अजिबात पाळीव नसणारे primates,
In reply to ह्युमन प्लॅनेट या बीबीसीवर by नगरीनिरंजन
आणि हो...
In reply to ह्युमन प्लॅनेट या बीबीसीवर by नगरीनिरंजन
हौसेसाठी शिकार माणूसच करतो ना
In reply to काहीतरी वेगळा विचार by पिशी अबोली
लेखाची मांडणी आवडली
लेख आणि प्रतिसाद वाचून हेच
In reply to लेखाची मांडणी आवडली by पैसा
निसर्गाला फरक पडत नाहि??