Skip to main content

अजुन ही एकटा आहे

लेखक mohite jeevan यांनी गुरुवार, 07/11/2013 10:41 या दिवशी प्रकाशित केले.
मी व खुशी पहिल्यादाच त्या बर्फाळ टेकडीवर आलो होतो,खुप चढती चढुन पाय दुखत होते.वरती टेकडीवर उचीवरुन दुरवरचा बर्फाळ भाग़ आम्ही न्यहाळत होतो.तेवढ्यात खुशीची नजर त्या बर्फाळ टेकडीच्या खाली नजर ग़ेली,आणि तिच म्हणाली,'आता आपण खाली घसरग़ुडीच करत जाऊया,' मी ही हो म्हणालो, आणि दोघांनी एकमेकाचा हात धरला व हाळुहाळु करत खाली निघालो जस जसे खाली जाऊ आमचा वेग़ वाढत होता,तरीही आम्ही हात सोडला नाही आणि जस जसे वेग़ वाढत होता कानात वार्याच आवाज येत होता,त्या वेग़ातच खुशी त्या उत्साहात ओरडत होती,वेग़ वाढतच होता आता कोठे आम्ही टेकडीच्या मध्यावर आलो होतो,बर्फाचे घर्षण स्पष्ट जाणवत होता,आता काही अंतरच राहीले होते पण आचानक मला पुढे खडक दिसला आणि मी घाबरलो कारण आमचा वेग़ाला कोणी ही थांबवु शकत नव्हते,त्या कणभरच्या वेळात माझ्या मनात आनेक विचार आले,तो खडक जवळ येत होता,खुशी व मी त्या खडकावर जाऊन धडकुन मरणार,पण खुशीला त्याची जाणीव नव्हती,पण मी त्या कणभर वेळेचे असंख्य तुकडे करावे त्यातील एक एक कण म्हणत होता की हीच शेवटची संधी आहे,जे काही करायचे आहे ते यावेळातच कर आणि मी खुशीच्या कानाजवळ जाऊन म्हणालो,'माझे तुझ्यावर खुप प्रेम आहे,खुशी,' ते ऐकुण खुशीने ईकडे तिकडे पाहिले आणि काही क्षणात आमचा वेग़ कमी झाला व त्या खडकाळ भाग़ाच्या काही अतंरावरच आम्ही थांबलो,आणि सुटकेचा श्वास घेतला. आणखिन दोन दिवसानी आम्ही दोघे तेथे आलो,खुशीने पुन्हा खाली घसरत जायचे म्हणाली, व मी तीच्या खुशीसाठी काहीही करायला तयार होतो.आणि दोघांनी पुन्हा हात धरत खाली ग़ेलो, मी पुन्हा त्या क्षणी तिच्या कानात म्हणालो,'माझे तुझ्यावर खुप प्रेम आहे,खुशी,' त्या रात्री तिला 'माझे तुझ्यावर खुप प्रेम आहे,खुशी,' हे सारखे आठवत आसणार, ती नक्कीच क्फ्युज होती की हे नेमके कोण आसे बोलत आसणार, तिला नक्कीच एक तर माझ्यावर संशय होता नाहीतर तिला त्या वार्याने होणार्या भ्रमावर. दुसर्या दिवशी ती काहीतरी शोधाच्या हेतुने माझ्याबरोबर त्या टेकडीवर आली,आणि एकटी त्या टेकडीवरुन घसरत जाणार म्हणाली,मी लग़ेच ओळखले,पण शेवटी तिला ते धाडस झाले नाही. मी आणि खुशीने पुन्हा एकमेकाचा हात धरला,व त्या उचं आशा बर्फाळ टेकडीवरुन घसरत खाली येण्यास सज्ज झालो. पण मी ठरवले होते की आता आपल्या मनावर काबु ठेवायचा.आमची घसरण चालु केली आणि हाळु हाळु करत आम्ही खाली जाऊ लाग़लो,काही क्षणातच वेग़ वाढु लाग़ला,खुप वेग़ वाढला मला त्या समोरच्या खडकाकडे पाहुन जी मरणाची भिती वाटत होती व त्या भितीतुन माझ्या तोंडातुन जे शब्द येत होते त्यावर मी कट्रोंल केले.तो भितीचा क्षण निघुन ग़ेला, आमचा वेग़ कमी झाला, काही क्षणातच मी खुशीचा चेहरा पाहिला, तीच्या चेहर्यावर उदासी होती, ते शब्द ऐकु न आल्याने ती काही ऐकु येते का त्या भावात होती. मग़ मीच हाळु आवाजात म्हणालो,'माझे तुझ्यावर खुप प्रेम आहे ,खुशी,' आणि तीचा चेहर्यावरचा भाव आनंदाने वाहु लाग़ला व ती आनंदाने ओरडु लाग़ली. आणि आम्ही खाली पोहचलो. तीचा तो चेहरा आजुन ही मला आठवतो.कधी कधी कामाच्या व्यापातुन एकटा आसलो की तीचा तो चेहरा खुप आठवतो. आणि ते शब्द 'मी तुझावर खुप प्रेम करतो,खुशी', ही माझी शेवटची इच्छा आसली तरी आज मी प्रौढ आहे , आणि खुशीचे लग़्न तीच्या वडीलानी तीच्या सहमती शिवाय एका डाँक्टराशी केले आहे. पण ती खुश आहे. पण आज मी अजुन ही एकटा आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 8745
प्रतिक्रिया 50

प्रतिक्रिया

In reply to by स्पंदना

=)) मुवि आजकल बॉत फुल्लॉन लगरेले नै सबीच धागेपे !!!

In reply to by स्पंदना

भाउंचे लेख म्हणजे पर्वणी असते. "मोकलाया" लिपीचे अजून एक वेगळे रुपांतर..

In reply to by संजय क्षीरसागर

"प्रश्न लेखकाचा आह" ते तुमच्यातल्या लेखकासाठीच होतं. "मुळात धारच बोथट तर नांव बदलून बुद्धी कशी चालणार" बाकी आपल्यावरून जगाला तोलू नये हेच खरं!!! नाही का??? हॅ हॅ हॅ हॅ

In reply to by रामपुरी

प्रत्येक प्रतिसादातून वैचारिक वैभव दिसते आहे. त्यामुळे वर साध्या कॉपी पेस्टमधे दोन चुका झाल्या असतील तरी त्याला निर्बुद्धता म्हणता येत नाही.

मी घाबरलो कारण आमचा वेग़ाला कोणी ही थांबवु शकत नव्हते,
हे जर मान्य केले तर मग
मी खुशीच्या कानाजवळ जाऊन म्हणालो,'माझे तुझ्यावर खुप प्रेम आहे,खुशी,' ते ऐकुण खुशीने ईकडे तिकडे पाहिले आणि काही क्षणात आमचा वेग़ कमी झाला व त्या खडकाळ भाग़ाच्या काही अतंरावरच आम्ही थांबलो,
हे काय आहे? डीफायींग लॉज ऑफ मोशन.... अर्थात जीवनभौंच्या लिखाणात असल्या शंका घ्यायच्या नसतात

ह्ये आईरे आईरे खुशी , खुशी खुशी खुशी ..... ,............,.......,.,,,,,,...

समर्पणातील वेदना व्यवस्थित मांडली आहे. निशब्द केले नाही यातच सर्व आले.

हे म्हणजे एक कथा में दो और कथांओंका बोनस! आजपासून नवीन म्हणः वाचणार (जीवनभौं च्या कथा) त्यालाच कळणार!

फक्त दोन प्रसंग . तेही कोणत्यातरी टेकडी वरचे . फक्त ३ व्यक्तिरेखा … (sorry ४, डॉक्टर साहेबांना विसरलोच ) तरीही व्यक्त झालेलं उत्कट प्रेम . जीवन भाऊंच्या लेखणीत विलक्षण सामर्थ्य आहे .

जीवन मोहिते यांचा कथा लिहिण्याचा आणि बाकिच्यांचा प्रतिक्रिया देण्याचा दांडगा उत्साह बघुन भरुन आले....पुलेशु

पहिल्यादाच - 'ल्या' वर अनुस्वार पाहिजे. होतो,खुप - स्पेस पाहिजे. चढती - चढणी? होते.वरती- स्पेस पाहिजे. उचीवरुन - 'उ'वर अनुस्वार पाहिजे. दुरवरचा - 'दू' दूसरा पाहिजे. न्यहाळत - 'न्या'हाळत. होतो.तेवढ्यात - स्पेस पाहिजे. खुशीची नजर त्या बर्फाळ टेकडीच्या खाली नजर - द्विरुक्ती. ग़ेली,आणि - स्पेस पाहिजे. म्हणाली,'आता - स्पेस पाहिजे. घसरग़ुडीच - 'गु' वर अनुस्वार पाहिजे. एकमेकाचा -'का' वर अनुस्वार पाहिजे. हाळुहाळु - हळूहळू. जस जसे - जसजसे (एक शब्द) खाली जाऊ आमचा वेग़ वाढत - एखादा शब्द गाळलेला आहे? होता,तरीही - स्पेस पाहिजे. वार्याच - वार्‍याचं होता,त्या - स्पेस पाहिजे. होती,वेग़ - स्पेस पाहिजे. होतो,बर्फाचे - स्पेस पाहिजे. होता,आता - स्पेस पाहिजे. आमचा वेग़ाला - आमच्या वेगाला नव्हते,त्या - स्पेस पाहिजे. आनेक - अनेक आले,तो - स्पेस पाहिजे. होता,खुशी - स्पेस पाहिजे. मरणार,पण - स्पेस पाहिजे. नव्हती,पण - स्पेस पाहिजे. आहे,जे - स्पेस पाहिजे. म्हणालो,'माझे - स्पेस पाहिजे. आहे,खुशी - स्पेस पाहिजे. ऐकुण - ऐकून थांबलो,आणि - स्पेस पाहिजे. आलो,खुशीने - स्पेस पाहिजे. खुशीने पुन्हा खाली घसरत जायचे म्हणाली - खुशी पुन्हा म्हणाली.. होतो.आणि - स्पेस पाहिजे. म्हणालो,'माझे - स्पेस पाहिजे. आहे,खुशी - स्पेस पाहिजे. आहे,खुशी - स्पेस पाहिजे. आसणार - असणार क्फ्युज - कन्फ्युज? आसे - असे आसणार - असणार वार्याने - वार्‍याने होणार्या - होणार्‍या दुसर्या - दुसर्‍या आली,आणि - स्पेस पाहिजे. म्हणाली,मी - स्पेस पाहिजे. ओळखले,पण - स्पेस पाहिजे. धरला,व- स्पेस पाहिजे. ठेवायचा.आमची - स्पेस पाहिजे. हाळु हाळु - हळू हळू लाग़लो,काही - स्पेस पाहिजे. लाग़ला,खुप - स्पेस पाहिजे. केले.तो - स्पेस पाहिजे. ती काही ऐकु येते का त्या भावात होती. - कळलं नाही. हाळु - हळू म्हणालो,'माझे - स्पेस पाहिजे. ,खुशी - स्पेस पाहिजे. आजुन - अजून आठवतो.कधी - स्पेस पाहिजे. आसलो - असलो करतो,खुशी - स्पेस पाहिजे. आसली - असली डाँक्टराशी - चुकीचा अनुस्वार. खुप त्रास होतो वाचायला. ह्या सर्व चुका, संपादकांना सांगून, सुधारल्यावर प्रतिक्रिया देईन म्हणतो.

In reply to by प्रभाकर पेठकर

तुम्ही ज्याला चुका म्हणतात, तीच तर जीवन भौंची खासियत आहे. त्यांनी त्यांचे जे चाहते जमवले आहेत, ते याच शैलीमुळे. "ती काही ऐकु येते का त्या भावात होती." हा त्यांचा मराठी साहित्यावर नवीन प्रयोग आहे. या गोष्टींना चुका म्हणणं हा जीवन भौंवर अन्याय आहे.

In reply to by हरवलेला

पेठकरकाका, चुका शोधण्याचा तुमचा उत्साह दाण्डगा आहे. पण ल्हान तोंडी मोठा घास भरून सांगतो, ती जीवन भौंची खासियत आहे.

In reply to by बॅटमॅन

जीवनभौ यान्नी मिमराठी.नेट संस्थळावर एक जबरदस्त लेखमालिका लिहली होती. त्यातल्या एका पात्राचे नाव "

राँर्बट

" आसे होते. तेव्हा आख्खे मिमराठी.नेट त्या शब्दाचा उच्चार कासा कारावा या फि़कीरीत पडले ह्प्ते.

In reply to by पैसा

:)) आमच्या चाळीतल्या नर्शांच्या दारात पोरांनी गोंधळ घातला की 'निस्तो रोंबाट घातलो मेल्यांनी' असं काहीसं ऐकायला मिळे, ते आठवलं. :))

In reply to by पैसा

आयला, हे टाईप करताना मेंदूला झिणझिण्या येतील राव =)) राँर्बट जमले बॉ =))
कासा कारावा या फि़कीरीत पडले ह्प्ते.
प्रश्नाचे उत्तर तुम्हीच दिले आहे. हप्त्याहप्त्याने उच्चार कारावा ;)

In reply to by पैसा

निस्ती आटवन काल्डी तरी कसं स्पेलिंगं चुक्ली बगा मावशीची.... का गो ? खंर का नय्ये? राँर्बट हे नाव आक्ख्या सेरिज भर न चुकता लिहील्याबद्दल जीवन्भौंचे

''हार्दिक अभिनंदन''!

साहित्याचं नोबेल घेणार जीवन भौंचं नाव होणार. नुस्तं सुचलं समोरच्याचं नाक ठेचलं. एक घाव दोन तुकडे, एक हिकडे दुसरा पलिकडे जीवनभाऊंनी एक लिहीली कथा, शंभर पोरीना प्रेमाची व्यथा! (होऊ दे खर्च) - जीवनभाऊ हलके घ्या, बाकी सगळ्यांनी वाळके घ्या! ;) =)

In reply to by बॅटमॅन

@ बॅटमॅन, चुका दाखवून देण्यात 'हिणविणे' हा हीन उद्देश नसतो. तर लेखनांत सुधारणा व्हावी अशा विधायक विचारांनी ती कृती प्रेरीत असते.
चुका शोधण्याचा तुमचा उत्साह दाण्डगा आहे.
'चुका शोधण्याचा उत्साह' ही शब्दरचना नकारात्मक वाटते. 'शुद्ध लेखनाची आस' हा सकारात्मक विचार त्यामागे आहे. त्यातून इथे तर, चुका अजिबात शोधाव्या लागत नाहीएत तर चुकीच्या शब्दांना ठायी ठायी ठेचकाळत वाचावे लागते आहे. असो. चुका माझ्याही लिखाणात होतच असतात पण कोणी दाखविल्या किंवा माझ्याच लक्षात आल्या तर त्या सुधारण्याचा मी मनापासून प्रयत्न करतो.

In reply to by प्रभाकर पेठकर

च्च्च, काकाजी, आप तो शीर्यस हो गये. तसं नै हो ते. :)

In reply to by बॅटमॅन

काकाजी, आप तो शीर्यस हो गये.
सिरियस वगैरे कांही नाही. जीवनभाऊंनाही स्पष्टीकरण द्यावे, त्यांचा गैरसमज होऊ नये, ह्या हेतुने वरचा प्रतिसाद आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

ह्या सर्व चुका, संपादकांना सांगून, सुधारल्यावर प्रतिक्रिया
हे रम..!! %) A

पेठकर काका ही घ्या आणखी एक
उचं आशा
= उंच अशा जाउद्यात हो. शुद्धलेखनाचे कशाला बघता. फार त्रास होत असेल तर" मोकलाया दही दिश्या " वाचा मला काही शंका आहेत. खालील वाक्यांचे नक्की अर्थ काय आहेत हो?
तीचा चेहर्यावरचा भाव आनंदाने वाहु लाग़ला
ही माझी शेवटची इच्छा आसली तरी आज मी प्रौढ आहे
एक मात्र मानले पाहिजे की जीवन भौ "सामंत" काकांची उणीव भरून काढणार हे नक्की

...प्रतिक्रिया वाचुन हसून मुरकुंडी वळते आणि आजुबाजुचे लोक विचित्र नजरेने बघायला लागतात

हायला , मला जिवन भौ , मराठी कथालेखक , मंदार कात्रे , sश्रिकांत हे आयडी एकाच माणसाचे वाटुन राहिलेत बाप्पा . =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

नाय वो....... S श्रीकान्त याना ळ , म्ह असली जोडाक्षरी येतात. त्याशिवाय न चुकता पहिल्या वेलांटी ऐवजी दुसरि आणी दुसर्‍या वेलांटी ऐवजि पहीलि वेलांटी काढता येते

In reply to by विजुभाऊ

ते म्हंजे परत्येक आयडिचि सिग्नातुरे इष्टाईळ असतिया सायेब ;)