✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

अस्तित्वाच्या पल्याड..

आ — आनंदमयी, गुरुवार, 11/07/2013 - 14:49
अस्तित्वाच्या पल्याड कोठे संथ नदीच्या पैलतिरावर, जललहरींसह वाहत गेली दूर तिथे स्वप्नांची घागर... त्या तीरावर गोकुळनगरी कान्हाची बेधुंद बासरी पाहुन लोभस रूप तयाचे, मनही झाले निळसर निळसर सर्वार्थाने देह लाजला पाहताच तो रोखुन मजला नाजुक कटिकमलावर बसला रुतुन तयाच्या नजरेचा शर हळूच जवळी आला कान्हा छेडित नाजुक अधरफुलाना भान हरपले जेव्हा मजला स्पर्शुन गेला तो मुरलीधर हलवुन मजला गेला वारा उधळुनी सुंदर स्वप्नफुलोरा विरून गेले रूप सावळे आणिक मागे उरली हुरहुर ©अदिती शरद जोशी

प्रतिक्रिया द्या
3132 वाचन

💬 प्रतिसाद (11)

सुरेख रचना.. आवडली

मिसळलेला काव्यप्रेमी
गुरुवार, 11/07/2013 - 18:27 नवीन
सुरेख रचना.. आवडली
  • Log in or register to post comments

हलवुन मजला गेला वारा

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 11/07/2013 - 18:55 नवीन
हलवुन मजला गेला वारा उधळुनी सुंदर स्वप्नफुलोरा विरून गेले रूप सावळे आणिक मागे उरली हुरहुरहुरहुर>>> सुंदर!
  • Log in or register to post comments

सुंदर जमली आहे कविता

राजेंद्र मेहेंदळे
गुरुवार, 11/07/2013 - 22:00 नवीन
आशय,तालबद्धता,वृत्त सगळ्या आघाड्यांवर सरस
  • Log in or register to post comments

खूप खूप धन्यवाद..

आनंदमयी
गुरुवार, 11/07/2013 - 23:52 नवीन
खूप खूप धन्यवाद.. :)
  • Log in or register to post comments

फार सुरेख लिहीता तुम्ही

स्पंदना
Fri, 11/08/2013 - 06:05 नवीन
फार सुरेख लिहीता तुम्ही आनंदमयी!
  • Log in or register to post comments

क्या बात है..

कोमल
Fri, 11/08/2013 - 09:52 नवीन
क्या बात है.. मस्तच.. "सर्वार्थाने देह लाजला पाहताच तो रोखुन मजला नाजुक कटिकमलावर बसला रुतुन तयाच्या नजरेचा शर" खुप आवडली
  • Log in or register to post comments

धन्यवाद

आनंदमयी
Fri, 11/08/2013 - 17:21 नवीन
धन्यवाद :)
  • Log in or register to post comments

सुंदर

सुधीर
Fri, 11/08/2013 - 17:50 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments

सुंदर कविता!

प्यारे१
Fri, 11/08/2013 - 19:40 नवीन
सुंदर कविता! हलवुन मजला गेला वारा उधळुनी सुंदर स्वप्नफुलोरा विरून गेले रूप सावळे आणिक मागे उरली हुरहुर ऐवजी आणिक सरले/नुरले माझे मीपण असं केलं तर?
  • Log in or register to post comments

कविता आवडली

जेनी...
Fri, 11/08/2013 - 23:50 नवीन
कविता आवडली पण २र्या आणि ४ थ्या कडव्या व्यतिरिक्त बाकिच्या कडव्यात तीसर्या लाइनीत शब्दांचा अतिरेक जाणवतोय बाकि तुमच्या सगळ्या कविता आवडीने वाचते . लिहित रहा
  • Log in or register to post comments

आशयगर्भ

psajid
Wed, 11/13/2013 - 11:24 नवीन
छान आणि चित्रमय कविता !
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा