✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

हिंदुस्थानचे मंगळ अभियान आणि सामान्य नागरिकांचे जीवन !

म
मदनबाण यांनी
Tue, 11/05/2013 - 17:24  ·  लेख
लेख
आपल्या देशाने मंगळावर यान पाठवले आहे ही बातमी आता तुम्हा सर्वांना माहित झालीच असेल... तर सर्व प्रथम मी त्या सर्व शास्त्रज्ञ मंडळी / तंत्रज्ञ यांचे अभिनंदन करतो ज्यांनी त्यांची बुद्धीमत्ता वापरुन ही योजना साकरली आहे. - - - पण मला या निमित्त्यानी काही प्रश्न विचारावेसे वाटत आहेत, तुम्हालाही काही प्रश्न विचारावेसे वाटत असतील तर हा धागा त्यासाठीच टाकला गेलेला आहे. १) आपल्या देशाला $172 billion debt आहे जे मार्च २०१४ पर्यंत देय आहे. ( संदर्भ :- India has to repay $172 billion debt by March 2014 माझ्या माहिती प्रमाणे मंगळ मोहिमेचा खर्च ७० मिलीयन आहे.जरी असे मानले की जर ही मंगळ मोहिम फत्ते झाली तर इतर अनेक देश आपल्याकडे अशाच आणि इतर आंतराळ मोहिमांसाठी येतील ज्यामुळे आपल्याला पैसा देखील मिळेल,पण ज्या देशातील नागरिकांना साधा कांदा विकत घेणे परवडत नाही,महागाईने तो पूर्णपणे पिचला गेला आहे त्याला या मंगळ मोहिमेचा काय फायदा ? २) तंत्रज्ञानाचा विकास व्ह्यायलाच हवा, पण ज्या तंत्रज्ञानाच्या विकासामुळे सामान्य माणसाच्या आयुष्यात काहीच फरक पडणार नसेल तर त्याचा काय उपयोग ? हे मंगळयान मंगळाचा अभ्यास करेल...त्याच्या हवेत कुठला वायु आहे ? तिथे पाणी आहे का ? असेल तर कुठल्या अवस्थेत ? किंवा तिथे जीवसॄष्टी आहे का ? त्याचे काही पुरावे मिळतील का ? इ.इ. गोष्टींचा बहुधा वेध घेतला जाईल... पण जेव्हा महाराष्ट्रात दुष्काळ पडला तेव्हा लोक गटाराचे पाणी पीत होते... त्यांना मंगळावर पाणी असल्याने / नसल्याने फरक पडणार होता /आहे का ?मंगळवार जीवसॄष्टीचा शोध घेत असताना आपल्या देशात लुप्त होत जाण्यार्‍या प्राण्यांचे काय ? ते संपले तर मंगळावरुन इपोर्ट करता येतील काय ? आपल्या देशातुन नष्ट होण्याच्या मार्गात असलेल्या प्राण्यांची यादी :- List of endangered species in India ३) वायुप्रदुषण प्रचंड वाढले आहे, आणि दिवाळीत फटाके फोडुन वाढवु नका असा संदेश माहितीजाला पासुन ते सॅटेलाईट चॅनल पर्यंत सगळ्यांनी दिले, मंगळावर ऑक्सिजन जरी सापडला तर त्याचा फायदा काय ? ४) रोज आपण बातम्या वाचत आहोत की चीन ने आपल्या देशात घुसखोरी केली, पाकिस्तान घुसखोरी करतोय आपल्या जवानांना बोकडा सारखे कापतोय ! ज्या देशाला त्यांच्या सिमेचे रक्षण करण्यात तसेच जवांनांचे आयुष्य वाचवण्यात सातत्याने अपयश येत आहे ते मंगळावर यान पाठवुन कोणत्या विजयाचा झेंडा फडकवणार आहेत ? ५)ज्या देशात साधी दुचाकी चालवण्यासाठी आदर्श रस्ते नाहीत, ज्या देशातले नागरिक हे मोठ्या संख्येने फक्त रस्ते अपघातात मारले जातात तोच देश मंगळ मोहिमेवर यान पाठवतो ! A Million Road Deaths In A Decade & Climbing जाता जाता :- विज्ञान,तंत्रज्ञान, बुद्धीमत्ता आणि पैसा यांचा वापर करुन देशाचा आर्थीक विकास,सुबत्ता,सामन्य नागरिकाचे आयुष्य अधिक सुखकारक आणि जगण्यास सुलभ करण्यापेक्षा मंगळावर यान पाठवणे हे खरेच आपल्या प्रगतीचे लक्षण आहे का ? इतर देशांच्या तांत्रिक कौशल्याच्या पंगतीत जावुन बसण्याचा प्रयत्न करताना त्यांनी केलेली इतर प्रगती ( ज्यात वरील उल्लेखलेले मुद्दे देखील आहेत.) पाहता आपण मागे का ?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
26182 वाचन

💬 प्रतिसाद (121)

प्रतिक्रिया

काही जालीय प्रतिक्रीया: चंमतग

ऋषिकेश
Wed, 11/06/2013 - 13:37 नवीन
आंतरजालावर विविध वृतपत्रांच्या वेबसाईट्सवर वाचक अतिशय गमतीदार प्रतिक्रीयाही देतात. त्याचे काही नमुदे देत आहे: १. ४५०कोटी म्हणजे भारतात काहीच वाटणार नाही. आमची पुणे वॉरीअर टिमसुद्धा १२०० कोटींना विकत घेतली आहे २. पृथ्वी ते मंगळ अंतर धरून हिशोब केला तर साधारण रु.१२ प्रतिकिमी खर्च आला. पुण्यात तर रिक्षाही याहून महाग आहे ;) ३. चला दिवाळीतच तेही दहा वाजायच्या आत रॉकेट उडवलं ते बरं झालं!
  • Log in or register to post comments

यापुढे...

विकास
Wed, 11/06/2013 - 23:06 नवीन
पृथ्वी ते मंगळ अंतर धरून हिशोब केला तर साधारण रु.१२ प्रतिकिमी खर्च आला. पुण्यात तर रिक्षाही याहून महाग आहे नकोच त्या रिक्षा... या पुढे मी पुण्यात आल्यावर मंगलयानच वापरणार. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

सेंच्युरी झाली हो

क्लिंटन
Wed, 11/06/2013 - 23:23 नवीन
शतक झळकावायचा मान माझा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

http://history.fnal.gov

अनुप ढेरे
Wed, 11/06/2013 - 13:46 नवीन
http://history.fnal.gov/testimony.html हा संवाद वाचनीय आहे. १९६९ साली अमेरिकेमध्ये पार्टिकल अक्सिलरेटर बनवायला शेकडो मिलियन डॉलर्स खर्चावेत का? या विषयावरचा संवाद. त्यातला उल्लेखनिय भाग म्हणजे
SENATOR PASTORE. When you consider priorities, I know exactly what you mean, provided we have the money. After all, when you have people who are hungry, the big question here is: Is it more important to put a man on the moon, or to fill the stomachs of our starving children? DR. WILSON. It is most important to fill the stomachs of our starving children. SENATOR PASTORE. You would put that as the first priority, would you not? DR. WILSON. Yes, sir. SENATOR PASTORE. Of course. DR. WILSON. But it is also important to get on with the things that make life worth living, and, fortunately, it is possible to do these things in a manner which also contributes to the feeding of hungry children. We have seen great developments in the science of elementary particles in this country-a golden age of physics. We should not lose the tremendous momentum that has built up in this field. We should not pass up this opportunity. We have a great American tradition. The moment to move is here. We have the men who are ready and enthusiastic to get on with it. If we falter, I can see the whole effort dispersed and lost.
आणि
It only has to do with the respect with which we regard one another, the dignity of men, our love of culture... it has to do with: Are we good painters, good sculptors, great poets? I mean all the things that we really venerate and honor in our country and are patriotic about. In that sense, this new knowledge has all to do with honor and country but it has nothing to do directly with defending our country except to help make it worth defending.[4]
  • Log in or register to post comments

संशोधनात २ प्रकार असतात..

बाळ सप्रे
Wed, 11/06/2013 - 13:50 नवीन
संशोधनात २ प्रकार असतात.. मूलभूत (fundamental) आणि applied (मराठी शब्द ??) मूलभूत नक्की काय साध्य होणार याची पूर्ण कल्पना नसते.. तर दुसर्‍या प्रकरात मूलभूत संशोधनातील साध्य वापरून त्याचा व्यावहारीक उपयोग करण्याचा प्रयत्न असतो.. मंगळावरील यान हे मूलभूत संशोधनाचा भाग आहे.. त्यातून मंगळावरील वातावरणाचा खूप विदा गोळा करता येईल व त्यातील पॅटर्न ओळ्खून पुढील संशोधनाला दिशा मिळेल..
  • Log in or register to post comments

अगदी! +१००००००००००००००००००००००००

लॉरी टांगटूंगकर
Wed, 11/06/2013 - 15:45 नवीन
मुलभुत संशोधन कधी जादु दाखवेल सांगता येत नाही. जगभर वापरल्या जाणार्या नॅस्ट्रॅन/सारख्या टुल्सची सुरुवात अशाच मोहीमेसाठी झाली असावी. अशा गोष्टींचे फायदे लगेच दिसत नाहीत पण आज टेक्नोलॉजी घ्यायला प्रचंड पैसा बाहेर जातो तो कधी तरी भविष्यकाळात रोखता/कंट्रोल करता येइल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

applied उपयोजित

प्यारे१
Wed, 11/06/2013 - 16:10 नवीन
applied उपयोजित
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

खरं पाहिलं तर आजच्या घडीला

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 11/06/2013 - 17:33 नवीन
खरं पाहिलं तर आजच्या घडीला "TRANSLATIONAL Research" ह्या एका फार महत्वाचा दुव्याने मुलभूत व उपयोजीत या दोन प्रकारच्या संशोधनातील रेखा अस्पष्ट केलेली आहे. केवळ "स्पिन ऑफ"च नाही तर "मूळ संशोधनाचाही नक्की उपयोग काय?" हे काम सुरू करण्या अगोदर योग्य रित्या पटविल्याशिवाय हल्ली संशोधनाला बजेट मिळत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

आजच्या मटा मधील लेखातील काही

विजुभाऊ
Wed, 11/06/2013 - 14:03 नवीन
आजच्या मटा मधील लेखातील काही भाग इथे पेष्ट करतोय
अवकाशविषयक आपल्या मोहिमासुद्धा आपल्याच देशाच्या हितासाठी आपण आखलेल्या आहेत. आज दळणवळणसाठीचे १० आणि दूरसंवेदनाची शक्ती असलेले (रिमोट सेन्सिंग) १० असे आपले २० उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत फिरत आहेत. त्यामुळे होणारे फायदे आपण अनुभवतच आहोत. अलीकडेच आलेल्या पायलिन या चक्रीवादळाची आपल्याला पूर्वसूचना मिळाली आणि आपण होणारे संभाव्य नुकसान टाळले, ही गोष्ट आपण नजरेआड करता कामा नये. त्यामुळेच खर्चाचा बाऊ करून मंगळमोहिमेवर टीका करणे गैर आहे. अशा मोहिमांतून मिळणारे ज्ञान हे अखेरीस मानवजातीला उपकारक ठरत असते.
  • Log in or register to post comments

डोक्यावर पडलेला धागा.?

बाबा पाटील
Wed, 11/06/2013 - 16:41 नवीन
डोक्यावर पडलेला धागा.? याच्यापेक्षा चांगला शब्द माझ्याकडे तरी नाही.
  • Log in or register to post comments

१ ९ ९ ८ साली झालेल्या "पोखरण

चेतनकुलकर्णी_85
Wed, 11/06/2013 - 16:43 नवीन
१ ९ ९ ८ साली झालेल्या "पोखरण -२ " नंतर शाळेत अश्याच धर्तीवर "भारताला गरज कशाची अणुबॉम्ब ची कि भाकरीची ? " अश्या नेभळट , कमजोर व गांधी वादाने ठासून भरलेल्या व ग्रासलेल्या मनोवृत्तीचे दर्शन करणाऱ्या निबंधाचे पेव फुटले होते . त्याच आशयाचा हा अपेक्षित धागा दिसतोय. जाता जाता एवढेच सांगतो कि तंत्रज्ञान हे असे एकमेव क्षेत्र आहे कि ज्या मध्ये राजकारणी व इतर अक्षरशत्रू असलेल्या लोकांची लुडबुड हि जास्त नसते म्हणूनच कि काय आपण (भारताने ) तंत्रद्यानात विशेषतः अणुउर्जा न अंतराळ विज्ञानात विशेष अशी झेप घेतली आहे आणि ती हि कमी कालावधीत . अश्या लोकांची पाठ थोपटायची नसल्यास कमीत कमी पाय तरी ओढू नका राव .
  • Log in or register to post comments

+१११

टवाळ कार्टा
Wed, 11/06/2013 - 17:33 नवीन
+१११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतनकुलकर्णी_85

एक अतिशय उत्तम चर्चा....

मुक्त विहारि
Wed, 11/06/2013 - 16:48 नवीन
वाचत आहे. (अज्ञानी) मुवि
  • Log in or register to post comments

१००

विटेकर
Wed, 11/06/2013 - 21:03 नवीन
स्शस्शतक
  • Log in or register to post comments

मिपावरील धाग्यांचे इंधन गोळा

पिशी अबोली
Wed, 11/06/2013 - 21:06 नवीन
मिपावरील धाग्यांचे इंधन गोळा केले तर आपला इंधनाचा प्रश्न सुटेल...
  • Log in or register to post comments

जर

विकास
Wed, 11/06/2013 - 23:12 नवीन
जर येथे (अथवा इतरत्र अशा) चर्चा करत बसण्याऐवजी आपण सर्वच काम करु लागलो, समाजसेवा का काय असते ते करू लागलो तर जिडीपी वाढण्यास आणि सामाजीक प्रश्न सुटण्यास कित्ती मदत होईल! :) मंगलयान पण असायला हवे मदनबाणचे जे काही इतरत्र (आपण कमी असणारे) मुद्दे आहेत, त्यात देखील सुधारणा समांतर पद्धतीने झाली पाहीजे. Either -- Or ची भाषा बोलूया नको! बाकी ते जाउंदेत, येथे जे कोणी भारतात रहाणारे भारतीय आहेत, त्यांनी किमान मतदारयादीत नाव नोंदवा आणि निवडणुकीत न चुकता, कुणाला हवे त्याला, पण मतदान करा...
  • Log in or register to post comments

मदनबाण याने मांडलेला मुद्दा (कदाचित) बरोबर आहे

सुहासदवन
गुरुवार, 11/07/2013 - 09:13 नवीन
हॅकिंगच्या धास्तीने म्हाडाची वेबसाइट बंद
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/mhada/articleshow/25339811.cms
ह्याच विषयावर आलेली एक प्रतिक्रिया - आपल्या देशाने नुकतीच मंगळाच्या दिशेने झेप घेतली.. याच बरोबर अनेक क्षेत्रात गरुडझेप घेतली असताना आपण 'सायबर क्षेत्रात' इतके मागासलेलं असण फार लाजीरवाण आहे.
  • Log in or register to post comments

भारताची प्रतिमा

चित्रगुप्त
गुरुवार, 11/07/2013 - 17:04 नवीन
आत्ताच मिपावर एका धाग्यात खालील मजकूर वाचला.
विसा साठी फार मोठी रांग नव्हती. माझ्यापुढे काही अमेरिकन आणि काही स्वीडिश लोक होते. त्यांना विसा पटापट मिळाला एकही प्रश्न न विचारता . मला मात्र पारपत्र बघताच तिथल्या अधिकार्याने १०० प्रश्न विचारले. का आलास , कशासाठी, कधी परत जाणार , कुठे कुठे फिरणार आहेस वगैरे वगैरे . हा अनुभव परदेशात बर्याच ठिकाणी येतो. आपल्याला अनेक प्रश्न विचारले जातात , खूप चौकशी केली जाते जी इतर देशातल्या नागरिकांची होत नाही.
मंगळ मोहीम वगैरेमुळे भारताची प्रतिमा जागतीक पटलावर सुधारेल, आणि हळू-हळू आपल्या नागरिकांना अशी वागणूक मिळणे कमी होइल, ही आशा.
  • Log in or register to post comments

****

जेपी
गुरुवार, 11/07/2013 - 19:03 नवीन
पत्रिकेतील मंगळावर जाता येत का ? चेआयला लई परेशान झालोय . आठव्या स्थानी आलाय म्हण , लय बेकार . ईचीबन शांती कर म्हणत्यात .
  • Log in or register to post comments

हायला

जेपी
गुरुवार, 11/07/2013 - 19:06 नवीन
108 वा प्रतिसाद माझा प्रतिसाद होता काय फरक पडेल का ?
  • Log in or register to post comments

मंगळयानाची माहिती

आनंद घारे
गुरुवार, 11/21/2013 - 22:55 नवीन
मंगळयानाबद्दल बरीच उत्सुकता जागी झालेली दिसते. या मोहिमेचा नफा तोटा वगैरेचा विचार न करता या विषयाची थोडक्यात ओळख करून देण्याचा एक प्रयत्न मी या लेखामध्ये करणार आहे.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा