हिंदुस्थानचे मंगळ अभियान आणि सामान्य नागरिकांचे जीवन !
आपल्या देशाने मंगळावर यान पाठवले आहे ही बातमी आता तुम्हा सर्वांना माहित झालीच असेल... तर सर्व प्रथम मी त्या सर्व शास्त्रज्ञ मंडळी / तंत्रज्ञ यांचे अभिनंदन करतो ज्यांनी त्यांची बुद्धीमत्ता वापरुन ही योजना साकरली आहे.
-
-
-
पण मला या निमित्त्यानी काही प्रश्न विचारावेसे वाटत आहेत, तुम्हालाही काही प्रश्न विचारावेसे वाटत असतील तर हा धागा त्यासाठीच टाकला गेलेला आहे.
१) आपल्या देशाला $172 billion debt आहे जे मार्च २०१४ पर्यंत देय आहे. ( संदर्भ :- India has to repay $172 billion debt by March 2014 माझ्या माहिती प्रमाणे मंगळ मोहिमेचा खर्च ७० मिलीयन आहे.जरी असे मानले की जर ही मंगळ मोहिम फत्ते झाली तर इतर अनेक देश आपल्याकडे अशाच आणि इतर आंतराळ मोहिमांसाठी येतील ज्यामुळे आपल्याला पैसा देखील मिळेल,पण ज्या देशातील नागरिकांना साधा कांदा विकत घेणे परवडत नाही,महागाईने तो पूर्णपणे पिचला गेला आहे त्याला या मंगळ मोहिमेचा काय फायदा ?
२) तंत्रज्ञानाचा विकास व्ह्यायलाच हवा, पण ज्या तंत्रज्ञानाच्या विकासामुळे सामान्य माणसाच्या आयुष्यात काहीच फरक पडणार नसेल तर त्याचा काय उपयोग ? हे मंगळयान मंगळाचा अभ्यास करेल...त्याच्या हवेत कुठला वायु आहे ? तिथे पाणी आहे का ? असेल तर कुठल्या अवस्थेत ? किंवा तिथे जीवसॄष्टी आहे का ? त्याचे काही पुरावे मिळतील का ? इ.इ. गोष्टींचा बहुधा वेध घेतला जाईल... पण जेव्हा महाराष्ट्रात दुष्काळ पडला तेव्हा लोक गटाराचे पाणी पीत होते... त्यांना मंगळावर पाणी असल्याने / नसल्याने फरक पडणार होता /आहे का ?मंगळवार जीवसॄष्टीचा शोध घेत असताना आपल्या देशात लुप्त होत जाण्यार्या प्राण्यांचे काय ? ते संपले तर मंगळावरुन इपोर्ट करता येतील काय ?
आपल्या देशातुन नष्ट होण्याच्या मार्गात असलेल्या प्राण्यांची यादी :- List of endangered species in India
३) वायुप्रदुषण प्रचंड वाढले आहे, आणि दिवाळीत फटाके फोडुन वाढवु नका असा संदेश माहितीजाला पासुन ते सॅटेलाईट चॅनल पर्यंत सगळ्यांनी दिले, मंगळावर ऑक्सिजन जरी सापडला तर त्याचा फायदा काय ?
४) रोज आपण बातम्या वाचत आहोत की चीन ने आपल्या देशात घुसखोरी केली, पाकिस्तान घुसखोरी करतोय आपल्या जवानांना बोकडा सारखे कापतोय ! ज्या देशाला त्यांच्या सिमेचे रक्षण करण्यात तसेच जवांनांचे आयुष्य वाचवण्यात सातत्याने अपयश येत आहे ते मंगळावर यान पाठवुन कोणत्या विजयाचा झेंडा फडकवणार आहेत ?
५)ज्या देशात साधी दुचाकी चालवण्यासाठी आदर्श रस्ते नाहीत, ज्या देशातले नागरिक हे मोठ्या संख्येने फक्त रस्ते अपघातात मारले जातात तोच देश मंगळ मोहिमेवर यान पाठवतो !
A Million Road Deaths In A Decade & Climbing
जाता जाता :- विज्ञान,तंत्रज्ञान, बुद्धीमत्ता आणि पैसा यांचा वापर करुन देशाचा आर्थीक विकास,सुबत्ता,सामन्य नागरिकाचे आयुष्य अधिक सुखकारक आणि जगण्यास सुलभ करण्यापेक्षा मंगळावर यान पाठवणे हे खरेच आपल्या प्रगतीचे लक्षण आहे का ? इतर देशांच्या तांत्रिक कौशल्याच्या पंगतीत जावुन बसण्याचा प्रयत्न करताना त्यांनी केलेली इतर प्रगती ( ज्यात वरील उल्लेखलेले मुद्दे देखील आहेत.) पाहता आपण मागे का ?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मन्गळावर सोने-चान्दी इत्यादी
माहिती मिळवुन काय फायदा ?
1
मदनबाणाच्या मूळ प्रश्नात तथ्य
गल्फ मध्ये पेट्रोल...
पण गरीबी संपल्यावर, रस्ते बांधल्यावरच मंगळावर जा,
भाकरी ..
पुण्यातल्या बलवंतपूरम सारख्या टोलेजंग ईमारतींपर्यंत पोचायचा भिकार रस्ता, पाण्याची/विजेची बोंबसहमत .. मी बलवण्त्पुरम मध्येच राहतो ..बिल्डर लै चालू आहे .. गंडवल आम्हाला .! त्याच्यवर केस करता येईल का हो ?मनपा
हा हा हा..
रेवतीशी सहमत
सुरेख प्रतिसाद पैसाताई....
राष्ट्राचा आत्मसन्मान
मंगळावर गेलेल्या यानामुळे
+१
मंगळावरील यानाचा खर्च आणि
जीवनविषयक अत्यंत मूलभूत
देशाचे मार्केटिंग
मंगळयान
मंगळावर यान पाठवायचा आणि आज
२५०० वर्षांनी ?
२५०० वर्षांनीहे जरा जास्त होते आहे .. तुम्हाला २५ वर्षांनी म्हणायचे आहे का ?हे जरा जास्त होते आहे ..
खपलो तर खपलो...
कुठल्यातरी बॉम्बस्फोटात्,रस्ते अपघातात खपला नाहीर तर हे स्वप्न पाहात ....अहो खपलो तर खपलो.. पुन्हा जन्मायचे आहेच की! " मी" थोडाच खपणार आहे ? पुनरपि जननम.. पुनरपि मरणमं.. पुनरपि जननी जठरे शयनमं.. हाय काय आणि नाय काय ! जाता जाता... Personal Computers have no future” - Olsen(Founder of Digital “Airplanes are interesting toys but of no military value” - Marshal Foch “This ‘TELEPHONE’ has too many shortcomings to be considered as a means of communication” - Western Union Internal memo “The earth is the center of Universe” - Ptolemy, IIND century “Everything that can be invented has been invented” - Charles H Duell US Commissioner of Patentsपुनरपि जननम.. पुनरपि मरणमं..
अश्या धाग्यांचे आश्चर्य वाटते
डेव्हलप केलेली किंवा मिळवलेली
एकदम स्वस्त!!
या मोहिमेत किती पैसा खर्च
मी वारंवार आपल्या देशातल्या
मी वारंवार आपल्या देशातल्या रस्त्यांचे उदाहरण देतो,कारण उत्तम रस्ते हे खर्या प्रगत राष्ट्रांच्या प्रगतीचे पहिले लक्षण मानले जाते...उत्तम रस्ते-कमी ट्राफिक-कमी प्रदुषन-इंधन खपात बचत-इंधन खपत कमी झाल्याने परकियचलन खर्चात कपात-अर्थव्यवस्थेवर कमी ताण-वेळेची बचत -दळवळणाची सुलभता- दळवळणाची सुलभतेने सामान्य नागरिकांच्या आयुष्यावर होणारा परिणाम. मुंबईचे सिंगापुर,शांघाय आणि कोकणाचे कॅलिफोर्निया हे फक्त पोकळ शब्दात पण प्रत्येक्षात काय ?याबाबतीत दोष पूर्णतः राजकिय इछाशक्ती, शुचिता आणि गव्हर्नन्सचा आहे... तेव्हा त्याचा रोख राजकारण्यांकडे आणि त्यांना निवडून देणार्या मतदाराकडॅ (तुमच्या-आमच्याकडे) असायला हवा. त्याबाबतित शास्त्र अथवा शास्त्रज्ञांना दोषी धरणे योग्य वाटत नाही... कारण ते त्यांचे काम कराताहेत (निदान इस्रोच्या बाबतित तरी), राजकारण्यांना ते काय करताहेत ते विचारायला पाहिजे.कारण ते त्यांचे काम कराताहेत
सहमत..
या मुद्द्याशी सहमत आहे
आजच्या घडीला देशात डिटीएच
सुर्यप्रकाशाची तीव्रता मंगळावर जास्त
नंतर बैल गेला आणि झोपा केला
हे वाचा
हॅहॅहॅ !
काय मजा आहे
??
एक पाकिस्तानी प्रतिक्रीया
छान
माझ्या माहिती नुसार लष्करी
माझ्या माहिती नुसार लष्करी उपग्रह पूर्णपणे वेगळे आणि वेगळ्या क्षमतेचे असतात... कुठल्याही डिफेन्स रिलेटेड प्रकप्ला बद्धल ही मोहिम नक्कीच नाही.तसेच हा रकल्प राबवणारे लोक उच्च दर्जाचे संशोधक, विचारवंत असतात. दूधखुळे नव्हेत हे ठावुक असल्यानेच असे प्रश्न प्रकर्षाने विचारावेसे वाटतात.लष्करी आणि अंतराळ मोहिमांच्या प्रकल्पांतून अनेक सार्वसाधारण माणसाच्या जिवनात उपयोगी अश्या बर्याच गोष्टी निर्माण झाल्या आहेत. त्यांना "स्पिन ऑफ्" असे म्हणतात. १. नासाच्या महत्वाच्या स्पिन ऑफ्स ची ही छोटीशी यादी... 1 Health and medicine 1.1 Light-emitting diodes (LEDs) in medical therapies 1.2 Infrared ear thermometers 1.3 Ventricular assist device 1.4 Artificial limbs 1.5 Invisible braces 1.6 Scratch-resistant lenses 1.7 Space blanket 2 Transportation 2.1 Aircraft anti-icing systems 2.2 Highway safety 2.3 Improved radial tires 2.4 Chemical detection 3 Public safety 3.1 Video enhancing and analysis systems 3.2 Fire-resistant reinforcement 3.3 Firefighting equipment 4 Consumer, home, and recreation 4.1 Temper foam 4.2 Enriched baby food 4.3 Portable cordless vacuums 4.4 Freeze drying 5 Environmental and agricultural resources 5.1 Water purification 5.2 Solar Cells 5.3 Pollution remediation 6 Computer technology 6.1 Structural analysis software 6.2 Remotely controlled ovens 6.3 NASA Visualization Explorer 6.4 Space Race Blastoff 7 Industrial productivity 7.1 Powdered lubricants 7.2 Improved mine safety 7.3 Food safety (संदर्भः http://en.wikipedia.org/wiki/NASA_spin-off) गुगलून पाहिले तर अजून बरेच काही सापडेल. याशिवाय इतर गोष्टी म्हणजे... २. उपग्रह संशोधनामुळेच आजची मोबाईल टेलिफोन, दूरशिक्षण, दूरबँकींग, आंतरजाल वगैरे सेवा सामान्य माणसाच्या आवाक्यात आलेल्या आहेत. ३. हा प्रकल्प (ज्याचा ७० मिलियन म्हणजे साधारण ४५० कोटी हा खर्च म्हणजे भारताच्या बजेट मध्ये फार काळजी करण्याइतकी रक्कम नसलेला आहे) ही एक जगाला भारताच्या अंतराळ मोहिम क्षमतेची प्रभावपूर्ण जाहिरात म्हणूनही बघितले पाहिजे. आतापर्यंत भारताने आपले स्वतःचे उपगह अवकाशात पाठवून परकिय चलन वाचवले इतकेच नाही तर अनेक परदेशी (कोरिया, जर्मनी, बेल्जियम, इटली, इ.) उपग्रह अवकाशात पाठवून परकिय चल मिळवलेही आहे. शिवाय हे इतर देशांच्या तुलनेने खूप कमी किमतीत करून दाखवून याबाबतित बाजरपेठेत स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे ही मोहीम यशस्वी होण्याने ते कमालिचे बळकट होईल... मग ७० मिलियन खर्चाचे ७,०० किंवा अगदी ७,००० मिलियनच्या फायद्यात रुपांतर करणे अशक्य नाही. हा या मोहिमेमागचा फार मोठा "स्पिन ऑफ्" म्हणता येईल. ४. या संशोधनातील पात्रता, त्याचे लष्करी उपयोग आणि राजकिय इच्छाशक्ती यांचा संगम झाला तर भारताची सतत कुरापत काढणार्या देशांवर काय परिणाम होउ शकेल हे सांगायला पाहिजेच असे नाही. कालच बातमी होती की चीनने भारताबरोबर अशा मोहिमांसाठी सहकार्य करण्याच्या प्रस्तावाचे संकेत दिले आहेत. ही कदाचित् एखादी राजकीय हूलही असू शकेल. पण आतापर्यंत चीनची (आणि जपानची सुद्धा) मंगळ मोहीम अयशस्वी झालेल्या आहेत हे ही विसरता येत नाही. ४. आज संगणक क्षेत्रातल्या भारतियांच्या कामगिरीने जागतिक पातळीवर भारताला जी पत, आर्थिक फायदा आणि स्वभिमान दिला आहे त्याची बरोबरी करण्याची किंवा त्याला ओलांडून पुढे जाण्याची भारतात सद्यातरी अवकाश-शास्त्राची पात्रता आणि तयारी आहे असे मला तरी वाटते. अजून बरेच काही आहे, पण सद्या इतकेच पुरे.सहमत
स्पिन ऑफ वर वेगळा लेख टाकाच.
माफ करा. तुम्ही नासाचा आढावा
सुंदर प्रतिसाद.
धन्यावाद ..
हे असेच अवांतर खर्च करून काही
२५०० कोटींच्या पुतळ्याचं
या चर्चेत केवळ मंगळावर
@ मदनबाण भाऊ