Skip to main content

हिंदुस्थानचे मंगळ अभियान आणि सामान्य नागरिकांचे जीवन !

लेखक मदनबाण यांनी मंगळवार, 05/11/2013 17:24 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या देशाने मंगळावर यान पाठवले आहे ही बातमी आता तुम्हा सर्वांना माहित झालीच असेल... तर सर्व प्रथम मी त्या सर्व शास्त्रज्ञ मंडळी / तंत्रज्ञ यांचे अभिनंदन करतो ज्यांनी त्यांची बुद्धीमत्ता वापरुन ही योजना साकरली आहे. - - - पण मला या निमित्त्यानी काही प्रश्न विचारावेसे वाटत आहेत, तुम्हालाही काही प्रश्न विचारावेसे वाटत असतील तर हा धागा त्यासाठीच टाकला गेलेला आहे. १) आपल्या देशाला $172 billion debt आहे जे मार्च २०१४ पर्यंत देय आहे. ( संदर्भ :- India has to repay $172 billion debt by March 2014 माझ्या माहिती प्रमाणे मंगळ मोहिमेचा खर्च ७० मिलीयन आहे.जरी असे मानले की जर ही मंगळ मोहिम फत्ते झाली तर इतर अनेक देश आपल्याकडे अशाच आणि इतर आंतराळ मोहिमांसाठी येतील ज्यामुळे आपल्याला पैसा देखील मिळेल,पण ज्या देशातील नागरिकांना साधा कांदा विकत घेणे परवडत नाही,महागाईने तो पूर्णपणे पिचला गेला आहे त्याला या मंगळ मोहिमेचा काय फायदा ? २) तंत्रज्ञानाचा विकास व्ह्यायलाच हवा, पण ज्या तंत्रज्ञानाच्या विकासामुळे सामान्य माणसाच्या आयुष्यात काहीच फरक पडणार नसेल तर त्याचा काय उपयोग ? हे मंगळयान मंगळाचा अभ्यास करेल...त्याच्या हवेत कुठला वायु आहे ? तिथे पाणी आहे का ? असेल तर कुठल्या अवस्थेत ? किंवा तिथे जीवसॄष्टी आहे का ? त्याचे काही पुरावे मिळतील का ? इ.इ. गोष्टींचा बहुधा वेध घेतला जाईल... पण जेव्हा महाराष्ट्रात दुष्काळ पडला तेव्हा लोक गटाराचे पाणी पीत होते... त्यांना मंगळावर पाणी असल्याने / नसल्याने फरक पडणार होता /आहे का ?मंगळवार जीवसॄष्टीचा शोध घेत असताना आपल्या देशात लुप्त होत जाण्यार्‍या प्राण्यांचे काय ? ते संपले तर मंगळावरुन इपोर्ट करता येतील काय ? आपल्या देशातुन नष्ट होण्याच्या मार्गात असलेल्या प्राण्यांची यादी :- List of endangered species in India ३) वायुप्रदुषण प्रचंड वाढले आहे, आणि दिवाळीत फटाके फोडुन वाढवु नका असा संदेश माहितीजाला पासुन ते सॅटेलाईट चॅनल पर्यंत सगळ्यांनी दिले, मंगळावर ऑक्सिजन जरी सापडला तर त्याचा फायदा काय ? ४) रोज आपण बातम्या वाचत आहोत की चीन ने आपल्या देशात घुसखोरी केली, पाकिस्तान घुसखोरी करतोय आपल्या जवानांना बोकडा सारखे कापतोय ! ज्या देशाला त्यांच्या सिमेचे रक्षण करण्यात तसेच जवांनांचे आयुष्य वाचवण्यात सातत्याने अपयश येत आहे ते मंगळावर यान पाठवुन कोणत्या विजयाचा झेंडा फडकवणार आहेत ? ५)ज्या देशात साधी दुचाकी चालवण्यासाठी आदर्श रस्ते नाहीत, ज्या देशातले नागरिक हे मोठ्या संख्येने फक्त रस्ते अपघातात मारले जातात तोच देश मंगळ मोहिमेवर यान पाठवतो ! A Million Road Deaths In A Decade & Climbing जाता जाता :- विज्ञान,तंत्रज्ञान, बुद्धीमत्ता आणि पैसा यांचा वापर करुन देशाचा आर्थीक विकास,सुबत्ता,सामन्य नागरिकाचे आयुष्य अधिक सुखकारक आणि जगण्यास सुलभ करण्यापेक्षा मंगळावर यान पाठवणे हे खरेच आपल्या प्रगतीचे लक्षण आहे का ? इतर देशांच्या तांत्रिक कौशल्याच्या पंगतीत जावुन बसण्याचा प्रयत्न करताना त्यांनी केलेली इतर प्रगती ( ज्यात वरील उल्लेखलेले मुद्दे देखील आहेत.) पाहता आपण मागे का ?

वाचने 26383
प्रतिक्रिया 121

प्रतिक्रिया

In reply to by विटेकर

हे जरा जास्त होते आहे .. तुम्हाला २५ वर्षांनी म्हणायचे आहे का ? तुम्ही फारच विनोदी अपेक्षा ठेवता बॉ... ;) अहो आज तंत्रज्ञान इतके विकसित होउन सुद्धा लाईव्ह डिबेट मधे सॅटेलाईट लिंक बंद होउन कॅमेरा आणि आवाज क्षणात बंद होतो. ;) कुठल्यातरी बॉम्बस्फोटात्,रस्ते अपघातात खपला नाहीर तर हे स्वप्न पाहात नक्कीच जगण्याची कसरत कराल याची मात्र कराल याची खात्री देउ शकतो बरं का ? ;)

In reply to by मदनबाण

कुठल्यातरी बॉम्बस्फोटात्,रस्ते अपघातात खपला नाहीर तर हे स्वप्न पाहात .... अहो खपलो तर खपलो.. पुन्हा जन्मायचे आहेच की! " मी" थोडाच खपणार आहे ? पुनरपि जननम.. पुनरपि मरणमं.. पुनरपि जननी जठरे शयनमं.. हाय काय आणि नाय काय ! जाता जाता... Personal Computers have no future” - Olsen(Founder of Digital “Airplanes are interesting toys but of no military value” - Marshal Foch “This ‘TELEPHONE’ has too many shortcomings to be considered as a means of communication” - Western Union Internal memo “The earth is the center of Universe” - Ptolemy, IIND century “Everything that can be invented has been invented” - Charles H Duell US Commissioner of Patents

In reply to by विटेकर

पुनरपि जननम.. पुनरपि मरणमं.. पुनरपि जननी जठरे शयनमं.. तसं म्हणाला तर माणसाचा सगळा उध्योग हा मटेरिअल अ‍ॅडवान्समेंट करण्यातच चालु आहे ना ? स्पिरिच्युल डेव्हलपमेंट मधे रस घेणारे हातावर मोजता येतील इतकेच ! We are not meant to solve economic questions of life by balancing on a tottering platform; rather, we are meant to solve the ultimate problems of life which arise due to the laws of nature. Civilization is static unless there is spiritual movement. The soul moves the body, and the living body moves the world. We are concerned about the body, but we have no knowledge of the spirit that is moving that body. Without the spirit, the body is motionless, or dead. The human body is an excellent vehicle by which we can reach eternal life. It is a rare and very important boat for crossing over the ocean of nescience which is material existence. On this boat there is the service of an expert boatman, the spiritual master. By divine grace, the boat plies the water in a favorable wind. With all these auspicious factors, who would not take the opportunity to cross over the ocean of nescience? If one neglects this good chance, it should be known that he is simply committing suicide.There is certainly a great deal of comfort in the first-class coach of a train, but if the train does not move toward its destination, what is the benefit of an air-conditioned compartment? Contemporary civilization is much too concerned with making the material body comfortable. No one has information of the real destination of life, which is to go back to Godhead. We must not just remain seated in a comfortable compartment; we should see whether or not our vehicle is moving toward its real destination. There is no ultimate benefit in making the material body comfortable at the expense of forgetting the prime necessity of life, which is to regain our lost spiritual identity. The boat of human life is constructed in such a way that it must move toward a spiritual destination. Unfortunately this body is anchored to mundane consciousness by five strong chains, which are: (1) attachment to the material body due to ignorance of spiritual facts, (2) attachment to kinsmen due to bodily relations, (3) attachment to the land of birth and to material possessions such as house, furniture, estates, property, business papers, etc., (4) attachment to material science, which always remains mysterious for want of spiritual light, and (5) attachment to religious forms and holy rituals without knowing the Personality of Godhead or His devotees, who make them holy.These attachments, which anchor the boat of the human body, are explained in detail in the Fifteenth Chapter of the Bhagavad-gétä. There they are compared to a deeply rooted banyan tree which is ever increasing its hold on the earth. It is very difficult to uproot such a strong banyan tree, but the Lord recommends the following process: "The real form of this tree cannot be perceived in this world. No one can understand where it ends, where it begins, or where its foundation is. But with determination one must cut down this tree with the weapon of detachment. So doing, one must seek that place from which, having once gone, one never returns, and there surrender to that Supreme Personality of Godhead from whom everything has begun and in whom everything is abiding since time immemorial." (Bg. 15.3-4)Neither the scientists nor speculative philosophers have yet arrived at any conclusion concerning the cosmic situation. All they have done is posit different theories about it. Some of them say that the material world is real, others say that it is a dream, and yet others say that it is ever existing. In this way different views are held by mundane scholars, but the fact is that no mundane scientist or speculative philosopher has ever discovered the beginning of the cosmos or its limitations. No one can say when it began or how it floats in space. They theoretically propose some laws, like the law of gravitation, but actually they cannot put this law to practical use. For want of actual knowledge of the truth, everyone is anxious to promote his own theory to gain certain fame, but the actual fact is that this material world is full of miseries and that no one can overcome them simply by promoting some theories about the subject.The Personality of Godhead, who is fully cognizant of everything in His creation, informs us that it is in our best interest that we desire to get out of this miserable existence. We must detach ourselves from everything material. To make the best use of a bad bargain, our material existence must be one-hundred-percent spiritualized. Iron is not fire, but it can be turned into fire by constant association with fire. Similarly, detachment from material activities can be effected by spiritual activities, not by material inertia. Material inertia is the negative side of material action, but spiritual activity is not only the negation of material action but the activation of our real life. "Science of Self Realization" by His Divine Grace A.C. Bhaktivedanta Swami Prabhupada

इतरत्र लिहिलेले आकडे पुन्हा देतो. 'अंतराळ संशोधन व विकास' यासाठी आपल्या बजेटच्या ०.३% रक्कम राखलेली असते. त्यातील बहुतांश रक्कम ही दळणवळणासाठीचे व हवामान खात्याशी संबंधित उपग्रह व त्यांना वाहून नेणार्‍या वाहकांवर खर्च होतो. चांद्रमोहिमा/मंगळ मोहिमा वगैरे सारख्या नव्या मोहीमांसाठी या ०.३%च्या ८%च्या आसपास पैसा खर्च होतो. भारताला आपल्या आर्थिक बजेटच्या ०.३% च्या ८% इतका खर्च केला म्हंजे लगेच या धाग्यात केलाय तशी ओरड (बोभाटा?) करणे योग्य कसे ठरावे? (हा खर्चही अख्ख्या एका मोहिमेवर वगैरे नाहीच, त्यातही अनेक मोहिमा वाटेकरी) शिवाय या ०.३% खर्चातून हवामन खात्याच्या उपग्रहांमुळे शेतकरी, मासेमार वगैरेंना होणारे फायदे, दळवणळणाच्या उपग्रहांमुळे जवळजवळ आपल्या प्रत्येकाला होणारे फायदे मोजले तर लोकहित आहे हे ही नाकारता येऊ नये. बरं, तुम्ही म्हणताय त्या समस्या नाहित असे नाही पण त्या काही १०-२० वर्षात सुटणार्‍या नव्हेत (किंबहुना त्या टेन्ड्स टु झिरो होऊ शकतील पण शुन्य होतील का नाही शंकाच आहे) तेव्हा त्या समस्या सुटेपर्यंत आपण नुसते बसून का रहायचे? शिवाय त्या समस्यांवर भारत सरकार या योजनेच्या कित्येक पट खर्च करत आहे. उदा. द्यायचं तर अन्न सुरक्षा योजनेवर बजेट मध्ये १०,००० कोटींची तरतूद आहे. शिवाय ८०,००० कोटींच्या आसपास अन्नाशी संबंधित सबसिडी आहेत. (तुलनेने मंगळ यानाचा खर्च ४५० कोटी. १२५ कोटी लोकसंख्या असलेल्या देशाला ४५० कोटी रू खर्च होतोय हे लक्षात घ्या) सरकार इतर समस्यांच्या तुलनेत मंगळयानासारख्या मोहिमांना प्राथमिकता देत असतं तर ही ओरड समजू शकलो असतो. मात्र प्रत्यक्षात अश्या रिसर्च वेस्ड मिशन्सना अजिबातच प्राथमिकता मिळताना दिसत नाहीये, खरंतर यावर अजून अधिक खर्च व्हायला हवा असे मी म्हणेन.

In reply to by ऋषिकेश

डेव्हलप केलेली किंवा मिळवलेली टेक्नॉलॉजी टेस्ट करणे, ट्रायल्स घेणे, व्हॅलिडेशन याबद्दल बोला. याशिवाय टेक्नॉलॉजी व्यर्थ आहे. अशा प्रकारच्या मोहीमेत आपल्ञा सामर्थ्याचा कस लागतो या आव्हानातून आपल्या उणिवाही स्पष्ट होतात आणि त्यावर मात करण्यासाठी विचार करता येतो. सोने मिळणे वगैरे काहीही आहे.

In reply to by ऋषिकेश

इस्रोची ही मंगळ मोहिम आत्तापर्यंत सर्वांत स्वस्त आहे!! फक्त ४५० कोटी म्हणजे रु.१२/किमी, मुंबईच्या रिक्षाभाड्यापेक्षाही कमी!!

या मोहिमेत किती पैसा खर्च झाला हा महत्वाचा मुद्दा नसुन, तंत्रज्ञानाच्या ज्या स्पर्धेत आपण उतरु पाहतो आहे त्या बद्धल अधिक आहे. अमेरिका,रशिया आणि युरोप हे देखील अशाच मोहिमा आखतात परंतु ज्या टेक्नोलॉजीचा वापर ते इतर क्षेत्रात करतात तिथे सुद्धा आपण स्पर्धा का करत नाही ? जर काही महिन्यांच्या कालावधीत आपण हा लो कॉस्ट प्रोजेक्ट करु शकतो,तर जिथे अशाच आणि अधिक तात्पर्याने करायच्या गोष्टीत ही तत्परता,तंत्रज्ञान का वापरले जात नाही ? संशोधन ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे,त्याचे कसे फळ मिळेल हे काळच ठरवतो...पण सामान्य माणसाची एक माफक अपेक्षा असते की त्याचे रोजचे जीवन अधिक सोप्पे आणि जगण्यास सुयोग्य कसे होईल यावर सुद्धा तितकेच लक्ष घातले जावे.ठाण्याच्या आणि दादरच्या रेल्वे स्थानकात आत्ता फिरते जिने लावले गेले आहे. ( फक्त काहीच ठिकाणी ) ही सुद्धा आपल्याला मोठी बातमी वाटते ! का ? प्रगत देशामधे ही स्थिती किती वर्षांपूर्वी केली गेली आहे ? मुंबकरांना नविन लोकल मिळणार अशी बातमी आपल्या वर्तमान पत्रात छापली जाते, तेव्हा आपण हे देखील लक्षात ठेवले पाहिजे की चीन मधे आत्ता बुलेट ट्रेन धावत आहे, तर जपान मधे रेल्वेची वेळ इतकी काटेकोरपणे पाळली जाते की त्यांच्या वेळा पत्रकामधे संपूर्ण वर्षभरात फक्त १६ सेकंदाचा फरक पडतो. हे देश सुद्धा आंतराळ मोहिमा आखतात्,यावर आणि अशाच इतर गोष्टींमधे संशोधन करतात... पण आधी त्यांचे बेसिक इन्र्फास्ट्रक्चर मजबुत करण्याला जास्त महत्व आणि प्रायोरिटी देण्यात आली हे आपल्याला नाकारता येणार नाही. इस्त्रोचे या यशाचे कौतुकच आहे,परंतु मला हे देखील लक्षात ठेवायला हवे की याच इस्त्रोला टाटा स्कायवाले कोर्टात खेचणार आहेत...का तर त्यांना कबुल केलेली ट्रान्सपॉन्डर कपॅसिटी ते अजुनही देउ शकलेले नाही. आजच्या घडीला देशात डिटीएच बिजनेस मोठ्या वेगाने वाढतोय... आपल्याकडे इस्त्रोने उभे केलेले उपग्रह असताना देखील झी / भारती एअरटेल /सन डायरेक्ट /रिलायन्स /व्हिडीयोकॉन हे परदेशी सॅटॅलाईटवर मायग्रेट झाले, का ? आपण मंगळावर यान पाठवण्याची क्षमता आणि तंत्रज्ञान विकसित करतो,पण भारतीय कंपन्यांना साधी ट्रान्सपॉन्डर क्षमता वाढवुन देउ शकत नाही ? शेवटी फायदा कोणाचा ? विदेशी सॅटेलाइट मालकांचा... मी वारंवार आपल्या देशातल्या रस्त्यांचे उदाहरण देतो,कारण उत्तम रस्ते हे खर्‍या प्रगत राष्ट्रांच्या प्रगतीचे पहिले लक्षण मानले जाते...उत्तम रस्ते-कमी ट्राफिक-कमी प्रदुषन-इंधन खपात बचत-इंधन खपत कमी झाल्याने परकियचलन खर्चात कपात-अर्थव्यवस्थेवर कमी ताण-वेळेची बचत -दळवळणाची सुलभता- दळवळणाची सुलभतेने सामान्य नागरिकांच्या आयुष्यावर होणारा परिणाम. मुंबईचे सिंगापुर,शांघाय आणि कोकणाचे कॅलिफोर्निया हे फक्त पोकळ शब्दात पण प्रत्येक्षात काय ? जाता जाता :- कुठल्याही संशोधनाला / प्रयोगांना माझा विरोध नाही,परंतु प्रगतराष्ट्र म्हणुन जर मिरवायचे असेल तर कुठेतरी बेसिक प्रायॉरिटीला मिशन क्रिटीकल बनवायला हवे ! ३०० माळ्यांची इमारत बांधायची इसेल तर त्याचा पायाही तितकाच भक्कम असावा ही अपेक्षा अयोग्य कशी ठरेल ?

In reply to by मदनबाण

मी वारंवार आपल्या देशातल्या रस्त्यांचे उदाहरण देतो,कारण उत्तम रस्ते हे खर्‍या प्रगत राष्ट्रांच्या प्रगतीचे पहिले लक्षण मानले जाते...उत्तम रस्ते-कमी ट्राफिक-कमी प्रदुषन-इंधन खपात बचत-इंधन खपत कमी झाल्याने परकियचलन खर्चात कपात-अर्थव्यवस्थेवर कमी ताण-वेळेची बचत -दळवळणाची सुलभता- दळवळणाची सुलभतेने सामान्य नागरिकांच्या आयुष्यावर होणारा परिणाम. मुंबईचे सिंगापुर,शांघाय आणि कोकणाचे कॅलिफोर्निया हे फक्त पोकळ शब्दात पण प्रत्येक्षात काय ? याबाबतीत दोष पूर्णतः राजकिय इछाशक्ती, शुचिता आणि गव्हर्नन्सचा आहे... तेव्हा त्याचा रोख राजकारण्यांकडे आणि त्यांना निवडून देणार्‍या मतदाराकडॅ (तुमच्या-आमच्याकडे) असायला हवा. त्याबाबतित शास्त्र अथवा शास्त्रज्ञांना दोषी धरणे योग्य वाटत नाही... कारण ते त्यांचे काम कराताहेत (निदान इस्रोच्या बाबतित तरी), राजकारण्यांना ते काय करताहेत ते विचारायला पाहिजे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

कारण ते त्यांचे काम कराताहेत (निदान इस्रोच्या बाबतित तरी), अगदी सहमत ! निदान काही लोक तरी या देशात असे आहेत जे दिलेल काम चोखपणे करत आहेत आणि त्यांचा अभिमान आहेच ! पण... मंगळावर यान पाठवले याचा अर्थ सर्वकाही साध्य करता आले असा होत नाही,सामान्य माणसाच्या आयुष्यात अशी १०० याने पाठवल्याने काहीच फरक पडणार नाही,पण चांगले रस्ते असल्यानी नक्कीच पडेल ना ? देशातला एक विभाग उत्तम काम करतो आणि दुसरा काहीच करत नाही तर लक्ष कुठल्या भागाकडे दिले पाहिजे ? दैनंदिन गरजा भागवणे जर कठीण होणार असेल आणि तुमच्याकडे त्याचे उत्तर नसेल तर ते मंगळावर देखील नक्कीच सापडणार नाही.

In reply to by मदनबाण

पण वर हृषिकेशने म्हटल्याप्रमाणे, जर हा खर्च अंतरीक्ष अभियानांसाठी "इयरमार्क" केलेल्या पैशांतूनच होत असेल तर त्याला हरकत का? रस्ते, वीजपुरवठा, शिक्षण इ. गोष्टींसाठी सरकारने प्रत्येक पातळीवर पैशांची तरतुद केलेली असतेच. आता जी तरतुद आहे, तोच पैसा जर भ्रष्टाचार, राजकीय/ शासकीय इच्छाशक्तीचा अभाव इ. कारणांनी योग्यपणे वापरला जात नसेल तर शास्त्रज्ञ त्यांना नेमून दिलेल्या कामावर जो पैसा योग्यपणे वापरतात, त्यावर टिका का? आपण जो प्रश्न उभा केलाय, त्याप्रमाणे जर हा खर्चही रस्ते, अन्नपुरवठा इ. कडे वळता केला, तरी त्याला जर आधीच्या पैशंप्रमाणे गळतीच लागणार असेल, तर फायदा काय? उपाय हा आहे, की दिलेल्या कामांना योग्य प्रकारे, योग्य मुदतीत आणि योजलेल्या बजेटमध्ये पुर्ण करण्यासाठी प्रयत्न करावा, सिस्टम्स बनवाव्यात.. नाहीतर मग ना मंगळ अभियान, ना धड रस्ते अशी स्थिती होईल..

In reply to by मदनबाण

इस्त्रोचे या यशाचे कौतुकच आहे,परंतु मला हे देखील लक्षात ठेवायला हवे की याच इस्त्रोला टाटा स्कायवाले कोर्टात खेचणार आहेत...का तर त्यांना कबुल केलेली ट्रान्सपॉन्डर कपॅसिटी ते अजुनही देउ शकलेले नाही. आजच्या घडीला देशात डिटीएच बिजनेस मोठ्या वेगाने वाढतोय... आपल्याकडे इस्त्रोने उभे केलेले उपग्रह असताना देखील झी / भारती एअरटेल /सन डायरेक्ट /रिलायन्स /व्हिडीयोकॉन हे परदेशी सॅटॅलाईटवर मायग्रेट झाले, का ? आपण मंगळावर यान पाठवण्याची क्षमता आणि तंत्रज्ञान विकसित करतो,पण भारतीय कंपन्यांना साधी ट्रान्सपॉन्डर क्षमता वाढवुन देउ शकत नाही ? शेवटी फायदा कोणाचा ? विदेशी सॅटेलाइट मालकांचा...
इस्रो ने व्यापारी तत्त्वावर उपग्रह भाड्याने द्यायचे असतील तर क्वालिटी ऑफ सर्व्हिस उच्चतम हवीच, तरच ग्राहक आकर्श्तित होतील.

In reply to by मदनबाण

आजच्या घडीला देशात डिटीएच बिजनेस मोठ्या वेगाने वाढतोय... सर्वसामान्य जनतेच्या किती समस्या हा व्यवसाय सोडवू शकलाय. त्या डीटीएच चा वापर कशाला करायचा तर " बालाजीच्या" सीरीयल्स बघायलाच ना? नाहीतर आयपील म्याचेस बघायलाच ना? शेती / हवामान यासाठी किती टक्के डी टी एच बिझनेस वापरला जातो हो?

मंगळाचे अंतर सूर्यापासून पृथ्वीच्या तुलनेने जरी जास्त असले तरी सुर्यप्रकाशाची तीव्रता मंगळावर जास्त असते. मंगळावर सौर उर्जा घट बसवून ती उर्जा जमा करायची आणि लेसर किरणांमध्ये ती उर्जा रुपांतरीत करून पृथ्वीवर आणायची अशी एका शास्त्रज्ञाने संकल्पना मांडली होती. या सगळ्या कल्पना आत्ता जरी अतिरंजित वाटत असल्या तरी भविष्यात तंत्र ज्ञानाने हे चमत्कार होऊ पण शकतील.नंतर बैल गेला आणि झोपा केला असा प्रकार व्हायला नको

In reply to by lakhu risbud

नंतर बैल गेला आणि झोपा केला असा प्रकार व्हायला नको हॅहॅहॅ...आधी झोपल्या बैलाला तो झोपला आहे याची जाणीव तरी करुन द्या म्हणतो ! या ग्रहावर देखील जो मुबलक सूर्यप्रकाश येतो ना तो आधी वापरा, मंगळ आहेच बाजुला त्याला देखील स्टॅडबाय म्हणुन वापरु बरं का ! ;)

In reply to by lakhu risbud

हॅहॅहॅ ! हे देखील वाचा बरं का... Will India be next semiconductor manufacturing facilities hub? अजुन सेमिकंडक्टर सारख्या महत्वपूर्ण गोष्टीत आपण मागे आहोत ! बरं मंगळावर यान पाठवायचं म्हणता ? त्याने आम आदमीला काय फायदा? एका पक्षाचा राजपुत्र म्हणतो एक पूर्ण रोटी खा -१०० दिवस काम करा आणि आमच्या पक्षाला मत द्या ! Rahul Gandhi to aam admi: Eat full roti, work for 100 days, vote for Congress आम आदमीला जर रोटीवर ठेवायचय, तर मंगळयान पाठवुन त्याच्यासाठी गुलाबजाम ची सोय होणार का ?

अमेरिकेतील रस्त्याचे कौतुक असणारे भारताच्या अवकाश मोहिमेला विरोध करत आहेत. ज्या समस्या पैसा न्हवे तर राजकीय इच्चाशाक्तिने रखडल्या आहेत त्याचा वापर वैद्न्यानिक सिध्दातेला खो घालायला करणे यापेक्षा दुसरे खराब राजकारण नोहे! एज अ प्रोढ़ मिपाकर इ फेल्ट पीती फॉर डी धागाकर्ता :(

खर्च करावा. भावी अपत्यांच्या (आणि वृद्धत्वाकडे वाटचाल करणार्‍या आईवडिलांच्या) आयुष्याची, शिक्षणाची, संभाव्य आजारपणातील खर्चाची तरतूद पूर्ण केल्याशिवाय नवदांमपत्याने सिनेमा पाहण्यास जाऊ नये असा काहीसा युक्तिवाद वाटतो.

डॉन या वृत्तपत्राच्या साईटवरील इथे रझाक नावाच्या एका पाकिस्तानी वाचकाची ही प्रतिक्रिया बोलकी आणि मार्मिक वाटली: (अनुवाद मी केला आहे. चुभुद्याघ्या)
भारताला मंगळावर मिथेन मिळते का नाही याची काहीही पडलेली नाही. त्यांच्यासाठी ही केवळ गुंतवणूक आहे. तशीच गुंतवणूक जी त्यांनी काही दशकांपूर्वी सॉफ्टवेअर आणि आयटी क्षेत्रात केली होती. शिक्षण-संशोधनात गुंतवणूक करा, टॅलेंटला वाव द्या-जोपासा, तुमचे टॅलेंट जगाला दिसेल असे ते सगळ्यांसमोर मांडा आनि एक नवी इंडस्ट्री तयार करा असे ते सुत्र आहे. भारत $४५०बिलियन उलाढाल असणार्‍या 'रॉकेट' इंडस्ट्रीवर डोळा ठेऊन आहे. जर भारत पाश्चात्यांपेक्षा १/६ किंवा १/१० किंमतीत हे करू शकत असेल तर त्यांच्याकडे ही रॉकेट लाँचिंगचे जॉब ऑटसोर्स होतील. भारतासाठी ही सहज $२० ते $४० बिलीयन ची इंडस्ट्री बनू शकेल. आतापर्यंतच PSLVने १४-१५ युरोपियन उअप्ग्रहांना भुस्थिर कक्षेत पोचवलं आहे. जर हे (मंगळयान) मिशन यशस्वी झालं तर आंतरग्रहीय उड्डाणासाठीही त्यांची मदत घेतली जाऊ लागेल. आपण पाकिस्तानी लोकांनी यापासून शिकले पाहिजे. हे कटू असले तरी सत्य आहे.

माझ्या माहिती नुसार लष्करी उपग्रह पूर्णपणे वेगळे आणि वेगळ्या क्षमतेचे असतात... कुठल्याही डिफेन्स रिलेटेड प्रकप्ला बद्धल ही मोहिम नक्कीच नाही.तसेच हा रकल्प राबवणारे लोक उच्च दर्जाचे संशोधक, विचारवंत असतात. दूधखुळे नव्हेत हे ठावुक असल्यानेच असे प्रश्न प्रकर्षाने विचारावेसे वाटतात. लष्करी आणि अंतराळ मोहिमांच्या प्रकल्पांतून अनेक सार्वसाधारण माणसाच्या जिवनात उपयोगी अश्या बर्‍याच गोष्टी निर्माण झाल्या आहेत. त्यांना "स्पिन ऑफ्" असे म्हणतात. १. नासाच्या महत्वाच्या स्पिन ऑफ्स ची ही छोटीशी यादी... 1 Health and medicine 1.1 Light-emitting diodes (LEDs) in medical therapies 1.2 Infrared ear thermometers 1.3 Ventricular assist device 1.4 Artificial limbs 1.5 Invisible braces 1.6 Scratch-resistant lenses 1.7 Space blanket 2 Transportation 2.1 Aircraft anti-icing systems 2.2 Highway safety 2.3 Improved radial tires 2.4 Chemical detection 3 Public safety 3.1 Video enhancing and analysis systems 3.2 Fire-resistant reinforcement 3.3 Firefighting equipment 4 Consumer, home, and recreation 4.1 Temper foam 4.2 Enriched baby food 4.3 Portable cordless vacuums 4.4 Freeze drying 5 Environmental and agricultural resources 5.1 Water purification 5.2 Solar Cells 5.3 Pollution remediation 6 Computer technology 6.1 Structural analysis software 6.2 Remotely controlled ovens 6.3 NASA Visualization Explorer 6.4 Space Race Blastoff 7 Industrial productivity 7.1 Powdered lubricants 7.2 Improved mine safety 7.3 Food safety (संदर्भः http://en.wikipedia.org/wiki/NASA_spin-off) गुगलून पाहिले तर अजून बरेच काही सापडेल. याशिवाय इतर गोष्टी म्हणजे... २. उपग्रह संशोधनामुळेच आजची मोबाईल टेलिफोन, दूरशिक्षण, दूरबँकींग, आंतरजाल वगैरे सेवा सामान्य माणसाच्या आवाक्यात आलेल्या आहेत. ३. हा प्रकल्प (ज्याचा ७० मिलियन म्हणजे साधारण ४५० कोटी हा खर्च म्हणजे भारताच्या बजेट मध्ये फार काळजी करण्याइतकी रक्कम नसलेला आहे) ही एक जगाला भारताच्या अंतराळ मोहिम क्षमतेची प्रभावपूर्ण जाहिरात म्हणूनही बघितले पाहिजे. आतापर्यंत भारताने आपले स्वतःचे उपगह अवकाशात पाठवून परकिय चलन वाचवले इतकेच नाही तर अनेक परदेशी (कोरिया, जर्मनी, बेल्जियम, इटली, इ.) उपग्रह अवकाशात पाठवून परकिय चल मिळवलेही आहे. शिवाय हे इतर देशांच्या तुलनेने खूप कमी किमतीत करून दाखवून याबाबतित बाजरपेठेत स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे ही मोहीम यशस्वी होण्याने ते कमालिचे बळकट होईल... मग ७० मिलियन खर्चाचे ७,०० किंवा अगदी ७,००० मिलियनच्या फायद्यात रुपांतर करणे अशक्य नाही. हा या मोहिमेमागचा फार मोठा "स्पिन ऑफ्" म्हणता येईल. ४. या संशोधनातील पात्रता, त्याचे लष्करी उपयोग आणि राजकिय इच्छाशक्ती यांचा संगम झाला तर भारताची सतत कुरापत काढणार्‍या देशांवर काय परिणाम होउ शकेल हे सांगायला पाहिजेच असे नाही. कालच बातमी होती की चीनने भारताबरोबर अशा मोहिमांसाठी सहकार्य करण्याच्या प्रस्तावाचे संकेत दिले आहेत. ही कदाचित् एखादी राजकीय हूलही असू शकेल. पण आतापर्यंत चीनची (आणि जपानची सुद्धा) मंगळ मोहीम अयशस्वी झालेल्या आहेत हे ही विसरता येत नाही. ४. आज संगणक क्षेत्रातल्या भारतियांच्या कामगिरीने जागतिक पातळीवर भारताला जी पत, आर्थिक फायदा आणि स्वभिमान दिला आहे त्याची बरोबरी करण्याची किंवा त्याला ओलांडून पुढे जाण्याची भारतात सद्यातरी अवकाश-शास्त्राची पात्रता आणि तयारी आहे असे मला तरी वाटते. अजून बरेच काही आहे, पण सद्या इतकेच पुरे.

In reply to by खटासि खट

माफ करा. तुम्ही नासाचा आढावा घेतला आहे. इस्त्रोच्या यशाचे देशांतर्गत परिणाम (स्पिन ऑफ) यावर एक लेख तुम्ही लिहू शकाल असं वाटतं.

धन्यवाद ऋषिकेशजी ,, योग्य संदर्भ दिलात ..थान्कु . जे त्या पकिस्तान्याला कळले ते एत्तदेशीयांना कळेल तो सुदिन.. (बाकी रझाक ही एत्तदेशीयच म्हणायला हवा ..कालपरवापर्यन्त त्याचे आजोबा -पणजोबा भारतात होते आणि उद्या परवा त्याचे नातवंडे- परतवंडे स्वःताला भारतीय म्हणून घेण्यात अभिमान बाळगतील...!! हा आशावाद खरा ठरेल अश्याच घटना आजू-बाजूला घडत आहेत ..)

हे असेच अवांतर खर्च करून काही सॅटेलाईट्स ढगात पाठवले म्हणून मिपा चालू आहे... किमान तितके तरी उपकार लक्षात ठेवावेत. आपल्याकडे ४५० कोटीच्या अवकाश मोहिमेवर प्रष्णचिन्ह लावले जाते आणि २५०० कोटीच्या पुतळ्याचे कौतुक केले जाते.. हे दुर्दैव.

In reply to by एम.जी.

२५०० कोटींच्या पुतळ्याचं कौतुक ? नाही हो.. त्याचा तर एकदम शुद्ध निषेध.. धागाकर्त्या मदनबाणालाही २५०० कोटीचा पुतळा मंगळ मोहिमेपेक्षा बरा वाटतो असं म्हणणं चुकीचं ठरेल. मंगळ मोहिमेचा मुद्दा हा फक्त सध्या थेट "मंगळ" मोहिम करण्याबाबत आहे अन्य स्पेस मिशन्स किंवा प्रोजेक्ट्सबद्दल नाही हे लक्षात घेतलं जावं.

या चर्चेत केवळ मंगळावर जीवसृष्टीचा शोध किंवा पाण्याचा शोध इतक्याच मर्यादित मुद्द्यापलीकडचे असंख्य मुद्दे आणि उद्दिष्टं समोर आली. १. वैज्ञानिक सज्जता २. अवकाशमोहिमा, विशेषतः मंगळ-मोहिमेइतक्या प्रगत मिशनसाठी आपण तयार आहोत यामुळे अंतराळ-विज्ञान संबंधित व्यवसायात आपल्याला मिळू शकणारा भावी आर्थिक लाभ ३. या निमित्ताने अन्य संरक्षणविषयक तंत्रांमधेही आपण सज्ज असल्याचा जागतिक संदेश ४. पुढच्या अनेक शक्यतांची दारं उघडणारं पहिलं पाऊल ५. प्रत्यक्ष मोहिमेचा सामान्य माणसाला थेट फायदा नसला तरी अप्रत्यक्ष असे फायदे असू शकणं. सध्या पब्लिकली जाहीर न केलेला अजेंडा असू शकणं वगैरे मुद्दे आणि त्याला मदनबाणने केलेला उत्तम मुद्देसूद प्रतिवाद यामुळे ही चर्चा एकदम उपयोगी आणि माहितीपूर्ण झाली आहे. सध्यातरी वाटला त्यापेक्षा हा प्रकल्प रास्त आहे असं दिसतं आहे.

@ मदनबाण भाऊ याआधी एक प्रतिक्रिया दिली होती. पण आमच्या बोटात वेडसरपणाची झाक असल्याने ती त्या मोडमधे दिली. तुम्ही उपस्थित केलेले प्रश्न महत्वाचे नाहीत असं काहीच नाही. पण इथं अनेकांनी म्हटल्याप्रमाणे मंगळ मोहीमेशी त्याचा संबंध जोडण्यात गल्लत होतेय. त्या प्रश्नांची उत्तरं भलतीकडेच आहेत. तुम्ही घेतलेली ऑब्जेक्शन्स ठराविक भागातच विकास का या पद्धतीची असती तर ते सुसंगत झालं असतं. इस्पीकचा एक्का यांचा प्रतिसाद मस्त आहे. स्पिन ऑफ फार महत्वाचं. हा एका स्वतंत्र धाग्याचा विषय होईल. याहीपुढे जाऊन (एक्का यांनी दिलेल्या यादीच्या) तंत्रज्ञानाचा वैयक्तिक जीवनात वापर हा मुद्दा कायम असल्यास वैज्ञानिक दृष्टीकोण तरी किती रुजलाय हे पहावं लागेल. मोबाईल स्वस्त झाले तरी हट्टाने आम्ही मोबाईल वापरत नाहीत असं सांगणारी मंडळी होती. प्रेत जाळण्यासाठी विद्युतदाहीनीचा वापर ही एक साधी गोष्ट आहे, ती सुद्धा केली जात नाही. अजूनही मुलींना उच्च शिक्षण दिलं जात नाही. तंत्रज्ञानाचा विवेकपूर्ण वापर ही तर पुढची पायरी आहे. ही आपली सामाजिक अवस्था आहे. समाजातूनच प्रतिनिधी, प्रशासनातले नोकर जाणार आहेत. त्यांच्यात बदल झाल्याशिवाय, अवेअरनेस आल्याशिवाय तुम्ही म्हणता ते बदल सहज कसे येतील ? दंडुका घेऊन तर प्रत्येक प्रश्न सुटत नसतो. ( प्रतिसाद खूप संक्षिप्त आहे आणि प्रश्नांची व्याप्ती मोठी, तेव्हां भाव समजून घ्यावा ही विनंती ).

आंतरजालावर विविध वृतपत्रांच्या वेबसाईट्सवर वाचक अतिशय गमतीदार प्रतिक्रीयाही देतात. त्याचे काही नमुदे देत आहे: १. ४५०कोटी म्हणजे भारतात काहीच वाटणार नाही. आमची पुणे वॉरीअर टिमसुद्धा १२०० कोटींना विकत घेतली आहे २. पृथ्वी ते मंगळ अंतर धरून हिशोब केला तर साधारण रु.१२ प्रतिकिमी खर्च आला. पुण्यात तर रिक्षाही याहून महाग आहे ;) ३. चला दिवाळीतच तेही दहा वाजायच्या आत रॉकेट उडवलं ते बरं झालं!

In reply to by ऋषिकेश

पृथ्वी ते मंगळ अंतर धरून हिशोब केला तर साधारण रु.१२ प्रतिकिमी खर्च आला. पुण्यात तर रिक्षाही याहून महाग आहे नकोच त्या रिक्षा... या पुढे मी पुण्यात आल्यावर मंगलयानच वापरणार. :)

http://history.fnal.gov/testimony.html हा संवाद वाचनीय आहे. १९६९ साली अमेरिकेमध्ये पार्टिकल अक्सिलरेटर बनवायला शेकडो मिलियन डॉलर्स खर्चावेत का? या विषयावरचा संवाद. त्यातला उल्लेखनिय भाग म्हणजे
SENATOR PASTORE. When you consider priorities, I know exactly what you mean, provided we have the money. After all, when you have people who are hungry, the big question here is: Is it more important to put a man on the moon, or to fill the stomachs of our starving children? DR. WILSON. It is most important to fill the stomachs of our starving children. SENATOR PASTORE. You would put that as the first priority, would you not? DR. WILSON. Yes, sir. SENATOR PASTORE. Of course. DR. WILSON. But it is also important to get on with the things that make life worth living, and, fortunately, it is possible to do these things in a manner which also contributes to the feeding of hungry children. We have seen great developments in the science of elementary particles in this country-a golden age of physics. We should not lose the tremendous momentum that has built up in this field. We should not pass up this opportunity. We have a great American tradition. The moment to move is here. We have the men who are ready and enthusiastic to get on with it. If we falter, I can see the whole effort dispersed and lost.
आणि
It only has to do with the respect with which we regard one another, the dignity of men, our love of culture... it has to do with: Are we good painters, good sculptors, great poets? I mean all the things that we really venerate and honor in our country and are patriotic about. In that sense, this new knowledge has all to do with honor and country but it has nothing to do directly with defending our country except to help make it worth defending.[4]

संशोधनात २ प्रकार असतात.. मूलभूत (fundamental) आणि applied (मराठी शब्द ??) मूलभूत नक्की काय साध्य होणार याची पूर्ण कल्पना नसते.. तर दुसर्‍या प्रकरात मूलभूत संशोधनातील साध्य वापरून त्याचा व्यावहारीक उपयोग करण्याचा प्रयत्न असतो.. मंगळावरील यान हे मूलभूत संशोधनाचा भाग आहे.. त्यातून मंगळावरील वातावरणाचा खूप विदा गोळा करता येईल व त्यातील पॅटर्न ओळ्खून पुढील संशोधनाला दिशा मिळेल..

In reply to by बाळ सप्रे

मुलभुत संशोधन कधी जादु दाखवेल सांगता येत नाही. जगभर वापरल्या जाणार्या नॅस्ट्रॅन/सारख्या टुल्सची सुरुवात अशाच मोहीमेसाठी झाली असावी. अशा गोष्टींचे फायदे लगेच दिसत नाहीत पण आज टेक्नोलॉजी घ्यायला प्रचंड पैसा बाहेर जातो तो कधी तरी भविष्यकाळात रोखता/कंट्रोल करता येइल.

In reply to by बाळ सप्रे

खरं पाहिलं तर आजच्या घडीला "TRANSLATIONAL Research" ह्या एका फार महत्वाचा दुव्याने मुलभूत व उपयोजीत या दोन प्रकारच्या संशोधनातील रेखा अस्पष्ट केलेली आहे. केवळ "स्पिन ऑफ"च नाही तर "मूळ संशोधनाचाही नक्की उपयोग काय?" हे काम सुरू करण्या अगोदर योग्य रित्या पटविल्याशिवाय हल्ली संशोधनाला बजेट मिळत नाही.

आजच्या मटा मधील लेखातील काही भाग इथे पेष्ट करतोय
अवकाशविषयक आपल्या मोहिमासुद्धा आपल्याच देशाच्या हितासाठी आपण आखलेल्या आहेत. आज दळणवळणसाठीचे १० आणि दूरसंवेदनाची शक्ती असलेले (रिमोट सेन्सिंग) १० असे आपले २० उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत फिरत आहेत. त्यामुळे होणारे फायदे आपण अनुभवतच आहोत. अलीकडेच आलेल्या पायलिन या चक्रीवादळाची आपल्याला पूर्वसूचना मिळाली आणि आपण होणारे संभाव्य नुकसान टाळले, ही गोष्ट आपण नजरेआड करता कामा नये. त्यामुळेच खर्चाचा बाऊ करून मंगळमोहिमेवर टीका करणे गैर आहे. अशा मोहिमांतून मिळणारे ज्ञान हे अखेरीस मानवजातीला उपकारक ठरत असते.

१ ९ ९ ८ साली झालेल्या "पोखरण -२ " नंतर शाळेत अश्याच धर्तीवर "भारताला गरज कशाची अणुबॉम्ब ची कि भाकरीची ? " अश्या नेभळट , कमजोर व गांधी वादाने ठासून भरलेल्या व ग्रासलेल्या मनोवृत्तीचे दर्शन करणाऱ्या निबंधाचे पेव फुटले होते . त्याच आशयाचा हा अपेक्षित धागा दिसतोय. जाता जाता एवढेच सांगतो कि तंत्रज्ञान हे असे एकमेव क्षेत्र आहे कि ज्या मध्ये राजकारणी व इतर अक्षरशत्रू असलेल्या लोकांची लुडबुड हि जास्त नसते म्हणूनच कि काय आपण (भारताने ) तंत्रद्यानात विशेषतः अणुउर्जा न अंतराळ विज्ञानात विशेष अशी झेप घेतली आहे आणि ती हि कमी कालावधीत . अश्या लोकांची पाठ थोपटायची नसल्यास कमीत कमी पाय तरी ओढू नका राव .

स्शस्शतक

जर येथे (अथवा इतरत्र अशा) चर्चा करत बसण्याऐवजी आपण सर्वच काम करु लागलो, समाजसेवा का काय असते ते करू लागलो तर जिडीपी वाढण्यास आणि सामाजीक प्रश्न सुटण्यास कित्ती मदत होईल! :) मंगलयान पण असायला हवे मदनबाणचे जे काही इतरत्र (आपण कमी असणारे) मुद्दे आहेत, त्यात देखील सुधारणा समांतर पद्धतीने झाली पाहीजे. Either -- Or ची भाषा बोलूया नको! बाकी ते जाउंदेत, येथे जे कोणी भारतात रहाणारे भारतीय आहेत, त्यांनी किमान मतदारयादीत नाव नोंदवा आणि निवडणुकीत न चुकता, कुणाला हवे त्याला, पण मतदान करा...

हॅकिंगच्या धास्तीने म्हाडाची वेबसाइट बंद
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/mhada/article…
ह्याच विषयावर आलेली एक प्रतिक्रिया - आपल्या देशाने नुकतीच मंगळाच्या दिशेने झेप घेतली.. याच बरोबर अनेक क्षेत्रात गरुडझेप घेतली असताना आपण 'सायबर क्षेत्रात' इतके मागासलेलं असण फार लाजीरवाण आहे.

आत्ताच मिपावर एका धाग्यात खालील मजकूर वाचला.
विसा साठी फार मोठी रांग नव्हती. माझ्यापुढे काही अमेरिकन आणि काही स्वीडिश लोक होते. त्यांना विसा पटापट मिळाला एकही प्रश्न न विचारता . मला मात्र पारपत्र बघताच तिथल्या अधिकार्याने १०० प्रश्न विचारले. का आलास , कशासाठी, कधी परत जाणार , कुठे कुठे फिरणार आहेस वगैरे वगैरे . हा अनुभव परदेशात बर्याच ठिकाणी येतो. आपल्याला अनेक प्रश्न विचारले जातात , खूप चौकशी केली जाते जी इतर देशातल्या नागरिकांची होत नाही.
मंगळ मोहीम वगैरेमुळे भारताची प्रतिमा जागतीक पटलावर सुधारेल, आणि हळू-हळू आपल्या नागरिकांना अशी वागणूक मिळणे कमी होइल, ही आशा.

पत्रिकेतील मंगळावर जाता येत का ? चेआयला लई परेशान झालोय . आठव्या स्थानी आलाय म्हण , लय बेकार . ईचीबन शांती कर म्हणत्यात .

108 वा प्रतिसाद माझा प्रतिसाद होता काय फरक पडेल का ?

मंगळयानाबद्दल बरीच उत्सुकता जागी झालेली दिसते. या मोहिमेचा नफा तोटा वगैरेचा विचार न करता या विषयाची थोडक्यात ओळख करून देण्याचा एक प्रयत्न मी या लेखामध्ये करणार आहे.