Skip to main content

हिंदुस्थानचे मंगळ अभियान आणि सामान्य नागरिकांचे जीवन !

लेखक मदनबाण यांनी मंगळवार, 05/11/2013 17:24 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या देशाने मंगळावर यान पाठवले आहे ही बातमी आता तुम्हा सर्वांना माहित झालीच असेल... तर सर्व प्रथम मी त्या सर्व शास्त्रज्ञ मंडळी / तंत्रज्ञ यांचे अभिनंदन करतो ज्यांनी त्यांची बुद्धीमत्ता वापरुन ही योजना साकरली आहे. - - - पण मला या निमित्त्यानी काही प्रश्न विचारावेसे वाटत आहेत, तुम्हालाही काही प्रश्न विचारावेसे वाटत असतील तर हा धागा त्यासाठीच टाकला गेलेला आहे. १) आपल्या देशाला $172 billion debt आहे जे मार्च २०१४ पर्यंत देय आहे. ( संदर्भ :- India has to repay $172 billion debt by March 2014 माझ्या माहिती प्रमाणे मंगळ मोहिमेचा खर्च ७० मिलीयन आहे.जरी असे मानले की जर ही मंगळ मोहिम फत्ते झाली तर इतर अनेक देश आपल्याकडे अशाच आणि इतर आंतराळ मोहिमांसाठी येतील ज्यामुळे आपल्याला पैसा देखील मिळेल,पण ज्या देशातील नागरिकांना साधा कांदा विकत घेणे परवडत नाही,महागाईने तो पूर्णपणे पिचला गेला आहे त्याला या मंगळ मोहिमेचा काय फायदा ? २) तंत्रज्ञानाचा विकास व्ह्यायलाच हवा, पण ज्या तंत्रज्ञानाच्या विकासामुळे सामान्य माणसाच्या आयुष्यात काहीच फरक पडणार नसेल तर त्याचा काय उपयोग ? हे मंगळयान मंगळाचा अभ्यास करेल...त्याच्या हवेत कुठला वायु आहे ? तिथे पाणी आहे का ? असेल तर कुठल्या अवस्थेत ? किंवा तिथे जीवसॄष्टी आहे का ? त्याचे काही पुरावे मिळतील का ? इ.इ. गोष्टींचा बहुधा वेध घेतला जाईल... पण जेव्हा महाराष्ट्रात दुष्काळ पडला तेव्हा लोक गटाराचे पाणी पीत होते... त्यांना मंगळावर पाणी असल्याने / नसल्याने फरक पडणार होता /आहे का ?मंगळवार जीवसॄष्टीचा शोध घेत असताना आपल्या देशात लुप्त होत जाण्यार्‍या प्राण्यांचे काय ? ते संपले तर मंगळावरुन इपोर्ट करता येतील काय ? आपल्या देशातुन नष्ट होण्याच्या मार्गात असलेल्या प्राण्यांची यादी :- List of endangered species in India ३) वायुप्रदुषण प्रचंड वाढले आहे, आणि दिवाळीत फटाके फोडुन वाढवु नका असा संदेश माहितीजाला पासुन ते सॅटेलाईट चॅनल पर्यंत सगळ्यांनी दिले, मंगळावर ऑक्सिजन जरी सापडला तर त्याचा फायदा काय ? ४) रोज आपण बातम्या वाचत आहोत की चीन ने आपल्या देशात घुसखोरी केली, पाकिस्तान घुसखोरी करतोय आपल्या जवानांना बोकडा सारखे कापतोय ! ज्या देशाला त्यांच्या सिमेचे रक्षण करण्यात तसेच जवांनांचे आयुष्य वाचवण्यात सातत्याने अपयश येत आहे ते मंगळावर यान पाठवुन कोणत्या विजयाचा झेंडा फडकवणार आहेत ? ५)ज्या देशात साधी दुचाकी चालवण्यासाठी आदर्श रस्ते नाहीत, ज्या देशातले नागरिक हे मोठ्या संख्येने फक्त रस्ते अपघातात मारले जातात तोच देश मंगळ मोहिमेवर यान पाठवतो ! A Million Road Deaths In A Decade & Climbing जाता जाता :- विज्ञान,तंत्रज्ञान, बुद्धीमत्ता आणि पैसा यांचा वापर करुन देशाचा आर्थीक विकास,सुबत्ता,सामन्य नागरिकाचे आयुष्य अधिक सुखकारक आणि जगण्यास सुलभ करण्यापेक्षा मंगळावर यान पाठवणे हे खरेच आपल्या प्रगतीचे लक्षण आहे का ? इतर देशांच्या तांत्रिक कौशल्याच्या पंगतीत जावुन बसण्याचा प्रयत्न करताना त्यांनी केलेली इतर प्रगती ( ज्यात वरील उल्लेखलेले मुद्दे देखील आहेत.) पाहता आपण मागे का ?

वाचने 26383
प्रतिक्रिया 121

प्रतिक्रिया

In reply to by बॅटमॅन

टेन्शन नको घेऊ सरकारचं,होऊ दे खर्च… इस्रो छाव्यांमध्ये छावा…मंगळावर फक्त त्याचीच हवा :P

In reply to by बॅटमॅन

सूर्यमालेतला सर्वात मोठा ग्रह गुरू आहे शुक्र नाही ! आकारमानाने पृथ्वीचा पाचवा आणि शुक्राचा क्रमांक सहावा आहे.

In reply to by बॅटमॅन

आसं बगा ते शुक्र आणि गुरू मंदी कमीतकमी ७८ कोटी व जास्तीतजास्त ११७ कोटी किलोमीटर अंतर आस्तया. उगाच फुड्च्या तितल्या यानाच्या फेरीत गफ्लत व्ह्वू नै म्हूनशान सांगिटलं ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

एक्का काका त्या पोस्टर बनवणार्यांनी मुद्दाम शुक्र लिहिलंय…चर्चा व्हावी म्हणून… चर्चा तर होणारच !

In reply to by बाबा पाटील

=)) =)) =)) बाकी आमच्या मते तरी हा स्त्रीवाद्यांचा डाव आहे. ते विंग्रजीत म्हणतात ना, पुरुष सगळे मंगळावरचे अन बायका शुक्रावरच्या? म्हणून त्यांनी स्वतःचा ग्रह सगळ्यात मोठा मानला ;)

In reply to by बॅटमॅन

त्या पोस्टरमधे 'बघतोस काय रागानं, ओवरटेक केलंय वाघानं' असं नासाच्या किंवा रशियाच्या यानाला दाखवून लिवायला हवं होतं राव!

हिंदुस्थानचे मंगळ अभियान आणि... भारतातली गरिबी+क्रिश३ चा गल्ला+निवडनुकिवरचा खर्च+क्रिकेटवरचा खर्च + पतंगावरचा खर्च+दिवाळीच्या फटाक्यांचा खर्च+गणपतीची वर्गणी+तुमचा आमचा खर्च+नेत्यांचे जीवन+सिनेतारकांच्या पार्ट्या+... अरे काय चाल्लय काय, उचलले बोट आणि काढला धागा... पण खात्री आहे कि हा विनोदी धागा आहे...म्हणुन फक्त प्रतिसाद सन्ख्या वाढवतोय..

चालु द्या . जेवढा काथ्था कुटला जाईल तेव्हढा फायदा . बारदाना घेऊन येतो .

वर नमूद केलेले प्रश्न आहेत पण म्हणून बाकी प्रगती करायचीच नाही का? हे प्रकार खर्चीक असतातच! लोक गरीब आहेत, दोनवेळचे अन्न नाही, शौचालये नाहीत इ. प्रश्न सगळे निकालात काढून मगच आम्ही बाकीचा विचार करू असे ठरवले तर झाले कल्याण! जे गरीब आहेत त्यातले ५० टक्के लोक हे विचारी आहेत (असे धरून चालू)त्यांनी (वैध मार्गाने)गरिबी हटाव कार्यक्रम आपल्या कुटुंबापुरता कितपत हाती घेतलाय? पाणी नसलेल्या गावांनी पोपटराव पवारांकडून मार्गदर्शन घेण्याचा विचार केलाय का? अपल्या गल्लीत होणारे जातीय दंगे थांबवणे आपल्याच हातात आहे हे कितीजणांनी मान्य करून कृती केलीये (ज्यामुळे मालमत्तेचे नुकसान टळेल)? यातलं कणभरही आपल्यापुरतंही करायचं नाही अन् मोहिमा थांबवायच्या याला काय अर्थ आहे? वाईट, आळशी लोकांसाठी दुसर्‍यांनीही आपली बुद्धी गंज चढवत ठेवायची. हेच शास्त्रज्ञ नंतर परदेशी निघून गेले की ब्रेन ड्रेनचे हळ्हळणारे विचार करायचे. समाजात सगळ्या प्रकारच्या लोकांसाठी जागा आहे. गरिबांचा विचार गरीब बिच्चारे म्हणून होतो किंवा केल्यासारखा दाखवतात पण कित्येक बुद्धिवंत मुलामुलींना आपल्या देशात साजेसे, योग्यतेचे काम मिळत नाही. परदेशी जाण्याची संधी मिळेलच असे नाही. त्यांचे मानसिक हाल किती असतात याचा विचार कुठे केला जातो? त्यांचाही विचार व्हायला हवा. सगळ्या देशात गरीबी हटाव होईपर्यंत या बुद्धिवंतांनी काय करायचे? वाट बघत बसायची? असे असेल तर महाराष्ट्राने बिहार सुधारेपर्यंत वाट बघायला हरकत नाही. शेवटी देशबंधू आहेत ते आपले!

In reply to by रेवती

वर नमूद केलेले प्रश्न आहेत पण म्हणून बाकी प्रगती करायचीच नाही का? माझा कोणत्याही प्रगतीला विरोध नाही, देशातल्या कोणत्याही व्यक्तीचा देखील प्रगतीला विरोध नसावा ! पण ज्या मूलभुत सुविधा आवश्यक आहेत त्या नसताना मंगळावर यान पाठवुन फायदा काय ? रस्ते नसलेल्या देशात नक्की ही कुठली प्रगती ? @ बॅटमॅन ५ रुपयात पोटभर जेवण मिळते हा क्रूर विनोद ज्या देशात सहजते ने केला जातो... तिथे हा धागा विनोदी वाटल्यास दोष नसावा !

In reply to by मदनबाण

रस्ते नसलेल्या देशात नक्की ही कुठली प्रगती ? प्रगती ही अनेक आघाड्यांवर होत असते ना! संशोधन हा प्रकार (बर्‍याच क्षेत्रातले) खर्चीकच असतो. काही प्रगती कुटुंब पातळीवर, काही गावपातळीवर, तालुका, जिल्हा, राज्य पातळीवर वेगवेगळ्या स्वरूपात असते तशी ही जगाच्या पातळीवर आहे. पातळी बदलली की खर्चाचे प्रमाण बदलते, किंवा (बरेचदा) बदलायला हवे. कित्येक गावांनी आपाला पाण्याचा, विजेचा आणि रस्त्याचा प्रश्न श्रमदानाने सोडवलाय की! आता मी फार याबाबतीत बोलत नाही कारण यातली कोणतीही गोष्ट मी केलेली नाही. एक दोनदा पुण्यात असताना आमच्या सोसायटीपुरता प्रयत्न म्हणून काही गोष्टी कराव्यात असे मनात येईपर्यंत दहा नकारच आले. उदा. सोलर पॅनल्स ब्सवणे, आमच्या एरियातील वीज बिले, घरांचे टॅक्स भरताना तिथे मिळणारी सेवा सुधारावी म्हणून काही विचार केला होता पण प्रतिसाद फारसा मिळाला नाही. निदान आपल्यापुरते काही प्रश्न चाम्गल्या मार्गाने सोडवण्याचा विचार होता. आता तर ऑनलाईन होतात ही कामे म्हणून ठीक आहे. त्यावेळी तसे नव्हते.

In reply to by रेवती

प्रगती ही अनेक आघाड्यांवर होत असते ना! ज्या देशात माणसांठी रस्ते नाहीत तिथे मंगळयान काय कामाचे ? प्रश्न खर्च किती होतो ते महत्वाचे नसुन तो कोणत्या कारणासाठी केला जातोय आणि त्याने सामान्य माणसाच्या आयुष्यात काय फरक पडतो या बद्धल आहे.

In reply to by मदनबाण

बरं ठीक आहे. आपण आधी रस्ते बांधणी हातात घेऊ. त्यासाठी जे बजेट असते तेवढ्याच खर्चात ते काम होईल असे तुला वाटते का? ही कंत्राटे कशी मिळतात, कोणाला दिली जातात हे वेगळे साम्गावयास नको (त्याचं डिट्टेलवार वर्णन करू शकेन इतकं लहनपणापासून हेच बघितलय पण बोलणे अवघड आहे ना). एवढे करून रस्त्यांचं आयुष्य किती असतं? म्हण्जे परिस्थिती जैसे थे झाली ना!

In reply to by रेवती

म्हण्जे परिस्थिती जैसे थे झाली ना! अगदी बरोबर ! मग अशा देशाचे मंगळ अभियान सुद्धा काय कामाचे ? कारण शेवटी परिस्थीती जैसे थे अशीच राहणार ना ? अमेरिका देखील असाच उध्योग करते,पण तिथे रस्ते हे रस्त्यां सारखेच असतात ना ? तिकडच्या लोकांना श्रमदान करावे लागते का ?

In reply to by मदनबाण

ज्या देशात माणसांठी रस्ते नाहीत तिथे मंगळयान काय कामाचे
मंगळावर तरी कुठे आहेत रस्ते? यान तिथे चालले की मग देशात पण चालेल की बिनरस्त्याचे. तेवढा रस्ते तयार करायचा खर्च पण वाचेल की?

In reply to by मदनबाण

काही अंशी सहमत आहे. पण अशा प्रत्येक गोष्टींचा विचार केला तर मग नक्की कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यायचे हे ठरवणे अवघड होते. उदा : अन्न हवे.संरक्षणावर खर्च कशाला हवा आहे आरोग्य हवे आहे. रस्ते बांधणीवरचा खर्च कशाला करताय सर्वाना शिक्षण हवे आहे. विमानतळासाठी खर्च कशाला? हा विचार निवडणूकीतील सवंग भाषणांसाठी ठीक आहे. जनतेला असे विचार भावतात. या सर्व गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत. उदा देशाच्या सुरक्षेसाठी अद्ययावत सैन्यदल हवे. सर्वांगीण आरोग्यासाठी संशोधन तसेच औषध निर्माण उद्योग असायला हवेत. औषधे इकडेतिकडे नेण्यासाठी रस्ते हवेत. रस्ते बांधणीसाठी वाहन उद्योग , सिमेंट उद्योग हवेत्.लोकाना शिक्षण हवे त्यासाठी संशोधन हवे. हे सगळे असेल तरच एकात्मिक विकास शक्य आहे. बर्‍याचदा एखादे संशोधन कशासाठी आवश्यक आहे असा प्रश्न पडतो. कदाचित त्यावेळेस ते संशोध आणि तदनुषंगीक उद्योग हे बाल्यावस्थेत असतात. उदा: इलेक्ट्रीक एनर्जी निर्माण करणार्‍या मायकेल फॅरॅडे ला विचारले गेले होते की विद्युत शक्तीचा उपयोग काय? त्याने उत्तर दिले होते की नवजात बालकाचा तरी तसा काय उपयोग असतो? पण आज आपण बघतो बहुतेक जग विद्यूत उर्जेवर अवलंबून आहे. अनेक संशोधने ही त्यावेळेस सर्वसामान्य माणसाला उपयोगी नव्हती मात्र त्यानंतर त्याचा मानवाला जीवनमान सुधारण्यासाठी खूपच उपयोग झालेला आहे. उदा :मायक्रो ओव्हन, मोबाईल , कम्युनिकेश क्रान्ती इत्यादी. देशावरचे कर्ज आणि संशोधनावर होणारा खर्च यांचा परस्पर संबन्ध लावणे हास्यास्पद वाटते. अमेरीकेला आपल्यापेक्षा जास्त कर्ज आहे.म्हणून त्यानी नासा वर होणारा किंवा सी आय ए वरचा खर्च हा कधीच कमी केला नाही. कर्ज होईल म्हणून एखादी गोष्टच टाळणे हा पलायन वाद होतो. काही कर्जे धरणे बांधण्यासाठी / रस्ते बांधण्यासाठी घेतली जातात. त्यांची परतफेड ही नीट प्लॅनिंग करून देश देतच असतो.
ज्या देशात माणसांठी रस्ते नाहीत तिथे मंगळयान काय कामाचे ?
हे विचारणे म्हणजे घरात दोन मुले असतील तर मोठा मुलाला ताप आलेला असताना धाकटा मुलगा जेवूच कसा शकतो असे विचारण्यासारखे आहे. ज्या देशात माणसांसाठी रस्ते नाहीत त्या देशात.......... या गाळलेल्या जागा आयपील स्पर्धा हव्यात कशाला / ऑलिंपीक स्पर्धेत सहभाग कशाला / विमानतळ कशाला हवे / रणगाड्यांवर खर्च कशाला / अद्ययावत हॉस्पिटले कशाला / निवडणुकांवर खर्च कशाला / टीव्ही सीरीयल्स वर खर्च कशाला / क्रिकेट सामन्यांवर खर्च कशाला असे अनेक प्रश्न विचारले जावु शकतात. ( या पैकी पहिला प्रश्न खरोखरच विचारकरण्याजोगा आहे.) संशोधन हे त्याच्या जागेवर असते. इतर प्रश्न त्यांच्या जागी. एकमेकांत सरमिसळ करु नये

In reply to by विजुभाऊ

रस्ते आणि यानाचा संबंध जोडायचा असल्यास रस्त्यावरून धावणारे यान बनवण्याबद्दल इस्त्रोला आदेश देणारं सरकार निवडून आणा.

In reply to by मदनबाण

आपले लोक टीनपाट क्रिकेट टीम खरेदीत ह्या पेक्षा जास्त पैसे लावतात, त्यांना शिकवायला हवं हे सगळं. जेवढे पैसे या मोहिमेवर खर्च झालेत तेवढ्यामधे आज हमरस्त्यांच्या रस्तारुंदीकरणाची काँट्रॅक्टपण घेत नाहीत ठेकेदार. बरं हे पैसे कुठल्याही जीवनावश्यक, पायाभूत, मूलभूत वगैरे काय असते त्या सगळ्या गोष्टींना ढीगभर पैसे उपलब्ध करून उरलेल्या पैशांचे जे विज्ञानविषयक तरतूदींसाठी राखीव बजेट केले जाते तिथून येतात. त्यामुळे गरीब, गरजू वगैरे वगैरेंनी वाईट वाटून घेऊ नये. त्यापेक्षा त्यांनी कचरा कचरापेटीत टाकणे, त्याची विल्हेवाट निट लावली जाते का हे पहाणे, साधे सोपे नियम न मोडणे आणि करचुकवेगिरी न करणे इतक्या साध्या गोष्टी केल्या तरी पुरे. तुमचा पहिला मुद्दाच परत वाचलात तर लक्षात येईल की या मोहिमेचा उद्देश फक्त क्षमता दाखवण्याचा नसून त्यातून आर्थिक नफा कमावण्याचासुद्धा आहे. आज आपण ज्या सगळ्या टेक्नॉलॉजीज वापरतो त्या सगळ्या अशा स्पेसरेस आणि टेक्नॉलॉजी रेसेस मधूनच जन्माला आल्यात. जेव्हा आपले उपग्रह पृथ्वीच्या कक्षांमधे स्थापित करण्यात येत होते तेव्हाही आपल्याकडे गरीब होतेच पण म्हणून तेव्हा ह्या गोष्टी थांबवल्या असत्या तर आपली इतर पिछाडीवर राहिलेल्या देशांप्रमाणेच आपली अवस्था असती (कदाचित असल्या गप्पा मारायला स्वस्त इंटरनेट, फोनही उपलब्ध झाले नसते) हे असले जळकू लेख अमेरीकन, युरोपिअन पत्रकारांनी लिहीले तेव्हा गंमत वाटली होती. पण आपलेच लोक जेव्हा असे लिहीतात तेव्हा मात्र वाईट वाटते.

मंगळावर ऑक्सिजन जरी सापडला तर त्याचा फायदा काय ?
याऐवजी मंगळावर सोने सापडले तर? असा विचार करा. खुप खुप वर्षांपूर्वी या देशाला आधुनिक शस्त्रांची गरज काय असा एका महान नेत्याने विचार केला. हा विचार किती "बरोबर" होता हे आपल्या हुशार शेजार्‍याने लागलीच दाखवून दिले होते.

In reply to by परिंदा

याऐवजी मंगळावर सोने सापडले तर? असा विचार करा. मध्यंतरी देशात आहे ते सोने विका असा सल्ला कोणी दिला होता ?

In reply to by मदनबाण

जरी समजा सोने मिळाले तर त्यावर हक्क कुणाचा असेल? इंधनासाठी आधीच कुरघोड्या चालल्यात.. आणी इंधन मिळाले तरी ते तिथले इंधन आपण इथे वापरणार कसे? भारताने शोधले म्हणुन इतर देश (उदा- अम्रिका, रश्या) गप्प बसतील?

असे प्रकल्प जाहीर हेतूंखेरीज खेरीज प्रामुख्याने महत्वाच्या लष्करी आणि देशाच्या सुरक्षा-संबंधी संशोधनासाठी राबवले जात असतात, हे नमूद करू इच्छितो. दक्षिण ध्रुव, उत्तर ध्रुव इ. च्या संशोधन मोहिमांमधेही हा महत्वाचा भाग असतो. असे प्रकल्प राबवणारे लोक उच्च दर्जाचे संशोधक, विचारवंत असतात. दूधखुळे नव्हेत. युद्ध आणि त्यासंबंधित संशोधन, यातून 'सामान्य नागरिकांच्या' दैनिक जीवनास अतिशय उपयोगी असे तंत्रज्ञान निर्माण केले गेले असल्याचा इतिहास आहे. कदाचित ओकांसारखे सैन्यात दीर्घकाळ काम केलेल मिपाकर, आणि विज्ञानाशी संबंधित क्षेत्रातील मिपाकर यावर प्रकाश टाकू शकतील.

In reply to by चित्रगुप्त

असे प्रकल्प जाहीर हेतूंखेरीज खेरीज प्रामुख्याने महत्वाच्या लष्करी आणि देशाच्या सुरक्षा-संबंधी संशोधनासाठी राबवले जात असतात, हे नमूद करू इच्छितो. दक्षिण ध्रुव, उत्तर ध्रुव इ. च्या संशोधन मोहिमांमधेही हा महत्वाचा भाग असतो. असे प्रकल्प राबवणारे लोक उच्च दर्जाचे संशोधक, विचारवंत असतात. दूधखुळे नव्हेत. युद्ध आणि त्यासंबंधित संशोधन, यातून 'सामान्य नागरिकांच्या' दैनिक जीवनास अतिशय उपयोगी असे तंत्रज्ञान निर्माण केले गेले असल्याचा इतिहास आहे. माझ्या माहिती नुसार लष्करी उपग्रह पूर्णपणे वेगळे आणि वेगळ्या क्षमतेचे असतात... कुठल्याही डिफेन्स रिलेटेड प्रकप्ला बद्धल ही मोहिम नक्कीच नाही.तसेच हा रकल्प राबवणारे लोक उच्च दर्जाचे संशोधक, विचारवंत असतात. दूधखुळे नव्हेत हे ठावुक असल्यानेच असे प्रश्न प्रकर्षाने विचारावेसे वाटतात.

In reply to by मदनबाण

ही माहिती अति गोपनीय असल्याने तुम्हा-आम्हापर्यंत कधीच पहुचत नाही. अश्या काही महत्वाच्या प्रकल्पाशी संबंधित काही उच्च अधिकारी, संशोधक परिचयात होते, पण ते या बद्दल अवाक्षरही बोलत नाहीत, असा अनुभव आहे. अमेरिकन एम्बसीत अनेक वर्षे काम केल्याने याबद्दल थोडासा अंदाज आहे, एवढेच. म्हणजे परदेशी वकिलाती, मोठ्या संशोधन मोहिमा या हिमनगाप्रमाणे असतात. त्यांच्या कामापैकी फार थोडा भाग जाहीर असून मुख्य भाग गोपनीय असतो. आपल्याला उघडपणे दिसते, त्यापेक्षा जग फार वेगळे, गुंतागुंतीचे, गोपनीय, अकल्पनीय, अद्भुत, खतरनाक आणि अज्ञात असते राव. हे सर्वच बाबतीत खरे आहे. रस्ते वा अन्य सुविधांसाठी मंजूर होऊन खर्च होणार्‍या रकमेचा मोठा हिस्सा विविध लोकांच्या घशात जात असल्याने आपल्या इकडे त्या समस्या वर्षानुवर्षे तश्याच रहातात, त्या तशाच राहू देण्यातूनच दर वर्षी नवी कंत्राटे दिली जाऊ शकतात, हे सर्वविदित आहेच. माहिती अधिकाराचा उपयोग करून याविषयी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करावा, असे सुचवतो.

In reply to by चित्रगुप्त

आपल्याला उघडपणे दिसते, त्यापेक्षा जग फार वेगळे, गुंतागुंतीचे, गोपनीय, अकल्पनीय, अद्भुत, खतरनाक आणि अज्ञात असते राव. हे सर्वच बाबतीत खरे आहे

जिथ सधन व्यक्ति हि दारिद्ररेषेखालील योजनेत नाव लागव म्हणुन धडपडतो तिथ गरीबी सारखा प्रश्न कधि सुटण्याचा सुतराम शक्यता वाटत नाहि . त्यामुळे सर्वच आघाडीवर योग्य ते पाऊल उचलेच पाहिजे

जगातले बरेचसे लोक पीडित वा गरीब राहातात कारण दुसर्यास गरीब ठेवणे ही एक मूलभूत मानवी विकृती आहे.( प्रेरणा म्हणा हवं तर ! ) बरेच जण आळशी, कल्पना शून्य असतात . म्हणून वरील मूलभूत प्रेरणेला खत पाणी मिळते. या कारणे सामान्य लोकांचे हाल व श्रीमंत लोकांची चंगळ यात सनातन झगडा होतो. विशेष म्हणजे हा झगडा आहे असे अति गरीब व अति श्रीमंताना वाटतच नसते. आता सुद्धा पहा या मंगळ अभियानाला मुकेश्॑ अंबानीचा विरोध असणार नाही ना मोलकरणीचा. वरचा लेख लिहिलेले हे मध्यम वर्गीय आहेत यात सर्व आले.

आता सुद्धा पहा या मंगळ अभियानाला मुकेश्॑ अंबानीचा विरोध असणार नाही ना मोलकरणीचा. स्वतःचे पोट भरलेले असले की कुठलाही इतर विचार सहज करता येतो... बरं इथे तुम्ही मुकेश अंबानीच्या विरोध करण्या बद्धल म्हणताय... जरा त्यांच्या बायकोच्या हल्लीच झालेल्या वाढदिवसात झालेला खर्चाचा आकडा शोधुन पहा बरं !

In reply to by मदनबाण

तुला काय करायचय त्या खर्चाशी? तू तुझ्या बायकोच्या वादीला १००० रुपये खर्च केलास तर बापरे किती हा खर्च म्हणणारे किती गरीब आणून दाखवू? मग तुझी बायको किंवा मी आणि माझ्यासारख्या लाखोजणी फक्त किराणामालाची बिले भागली आणि वर्षाला दोन कपडे मिळाले की खूष राहणार्‍या आहोत का? कालच झालेल्या दिवाळी पाडव्याला नवर्‍यांनी (आपापल्या, प्रत्येकी एक) बायकांना ओवाळणीत काय दिलय ते बघितलस तरी उत्तर मिळेल. (नाही, असा धागा मी काढणार नाही, खरी उत्तरे मिळण्याची अपेक्षा नाही, मीही तसे देणार नाही). (बाणा, आता माझा धागा आला की तू चार प्रतिसाद दे म्हणजे सहज १०० प्रतिसाद होतील).

In reply to by रेवती

तुला काय करायचय त्या खर्चाशी? हेच म्हणतो मी काय उपयोग मंगळावर यान पाठवुन ? ;) बायडीला पाडव्याला खुष ठेवले तर दोन वेळ मला धड जेवायला मिळेल याची निदान खात्री तरी देता येईल ! ;) मंगळयान देइल का ती खात्री ? ;) बाकी तू धागा काढच !

In reply to by मदनबाण

मला तरूण असताना गरीबांबद्द्ल कळवळा असे व श्रीमंताबद्द्ल चीड . आता असे वाटते की गरीबी वा श्रीमंती या काहीशा नशीबाने काहीशा वर सांगितलेल्या मूलभूत प्रेरणेने व काहीशा उद्योगी वा आळशी स्वभावाने येतात. मंगळावर यान नेऊन एकच गोष्ट साध्य होईल. " आम्ही मंगळाला तुडविला आता पत्रिकेतील मंगळाला फेकून द्या बाजूला " अशी वैचारिक क्रांति होईल .( कदाचित) .

सगळे जग मूर्खाप्रमाणे सोन्याच्या मागे धावत आहे .पुराणकाळापासून सोन्याला चिकटलेल्या सगळ्या कविकल्पना बाजूला केल्या तर सोने केवळ एक चकाकणारा धातू आहे. पण या सोन्याच्या भ्रामक मोहापायी आपण भारतीय अब्जावधी डॉलर्स परकीय देशाना दान करत आहोत....! दुसरे म्हणजे मन्गळावर सोने-चान्दी इत्यादी शोधण्यासाठी जायचे नसून भविश्यकाळात इन्धनाचे स्रोत ठरू शकणार्या अनेक वायू व मूलद्रव्यान्ची अतिशय महत्त्वाची माहिती मिळवणे हे एक महत्त्वाचे उद्दिशठ आहे . इतरही अनेक उद्देश आहेत या मोहिमेपाठी . यास्तव भारताच्या सध्याच्या परिस्थितीत खर्चिक मन्गळ मोहीम राबवावी का? असा प्रश्न गैरलागू व अप्रस्तुत वाटतो.

In reply to by मंदार कात्रे

मन्गळावर सोने-चान्दी इत्यादी शोधण्यासाठी जायचे नसून भविश्यकाळात इन्धनाचे स्रोत ठरू शकणार्या अनेक वायू व मूलद्रव्यान्ची अतिशय महत्त्वाची माहिती मिळवणे हे एक महत्त्वाचे उद्दिशठ आहे . माहिती मिळवुन काय फायदा ? तिथले इंधन आणता येईल इकडे ? पाठवलेले यान जरी त्याच्या कक्षेत व्यवस्थित पोहचले तरी फार मोट्ठी गोष्ट ठरेल. प्रश्न खर्चा पेक्षा या मोहिमेतुन कोणता फायदा देश हितास, तसेच सामान्य माणसाठी हितकारक ठरणार आहे याचा आहे.ज्या ग्रहावर तुम्ही राहता तिथले पाणी कसे टिकुन राहिल यावर अधिक वेळ संशोधन आणि पैसा खर्च करणे जास्त उपयोगी की मंगळावर पाणी आहे की नाही यावर शोध घेणे फायदेशीर ?

In reply to by मदनबाण

माहिती मिळवुन काय फायदा ? तिथले इंधन आणता येईल इकडे ? पाठवलेले यान जरी त्याच्या कक्षेत व्यवस्थित पोहचले तरी फार मोट्ठी गोष्ट ठरेल.
थोडे थांबा. तूप खाल्यावर लगेच रूप कसे येईल. यान पोहचू तर दे. बाकी "सोने मिळाल्यास त्यावर हक्क कोणाचा?" - हे म्हणजे बाजारात तुरी नि भट भटनीला मारि.

रौप्य महोत्सवी माझा प्रतिसाद .

मदनबाणाच्या मूळ प्रश्नात तथ्य आहे. किंबहुना आमच्यात या विषयावर रंगलेली चर्चा इथे सर्वांसमोर यावी आणि सर्वांचा सहभाग व्हावा म्हणून या प्रश्नांतून चर्चा व्हावी असा उद्देश आहे. मुळात एकूण संशोधनाचे बजेट रुद्ध अन्य विकासकामांचे बजेट हा प्रश्न नाही. शिवाय कोणत्याच प्रकारचे महागडे संशोधन नको असेही नाही. आपण फक्त मंगळ मोहीम या विशिष्ट प्रकल्पाकडे पाहिलं तर त्यातून येत्या काळात काय फायदे होतील? तिथे सोनंच काय प्लॅटिनम जरी मिळालं तरी त्याची इथली किंमत k किती ? अशा स्पेसिफिक माहितीसह समर्थन वा विरोध झाला तर सर्वानाच काहीतरी जाणायला मिळेल.

आखाती देशामध्ये क्रूड ऑईल चे मोठे साठे असल्याचा शोध ब्रिटिशाना १९४० च्या दरम्याने लागल्यावर त्यानी अरब देशान्शी आपल्या फायद्याचे करार करून प्रचण्ड फायदा उठवला हे विसरू नका. आज जरी मन्गळावरून इन्धन्स्रोत आणण्याचे मार्ग उपलब्ध नसले तरी भविश्यात ते नक्की उपलब्ध होवू शकतात .

असं कुठे मदनबाण म्हणतोय? "मंगळावर यान पाठवण्यासारखे प्रकल्प ईतर क्षेत्रातले तंत्रज्ञान विकसित करायला मदत करतो जेणे करून ईतर क्षेत्रातहि सुधारणा होऊ शकते. हे ईंग्लंड/अमेरीकेत होतं. आपल्याकडे होतंय का?" हा मुद्दा आहे. दुर्दैवाने आपल्याला सेल फोन आले, ई-बिल पेमेंट करता आलं, माहिम-वरळी सी-लिंक बांधली, IPL मधे करोडोंची उलाढाल व्ह्यायला लागली की वाटतं we did it! निष्काळजी ग्राहकसेवा, पुण्यातल्या बलवंतपूरम सारख्या टोलेजंग ईमारतींपर्यंत पोचायचा भिकार रस्ता, पाण्याची/विजेची बोंब हे आपण चालवून घेतो. वीस वर्ष झाली आपण उपग्रह सोडून. मालाड, ठाणे, चर्चगेट ईथलं हवामान अचूक सांगता येतं? "पश्चिम मुंबईत थोड्याफार सरी येतील" हिच भाषा असते. बॅटमॅन/ केदार-मिसळपाव - या मोहीमेने तुमच्या आमच्या आयुष्यात फरक पडेल असं काय काय ठोस हाती लागेल असं तुम्हाला वाटतं ते सांगाल का?

In reply to by भाकरी

पुण्यातल्या बलवंतपूरम सारख्या टोलेजंग ईमारतींपर्यंत पोचायचा भिकार रस्ता, पाण्याची/विजेची बोंब सहमत .. मी बलवण्त्पुरम मध्येच राहतो ..बिल्डर लै चालू आहे .. गंडवल आम्हाला .! त्याच्यवर केस करता येईल का हो ?

In reply to by विटेकर

विटेकर काका,भाकरी पाण्यासारखाच रस्त्याचा पण प्रश्न सुटेल,आस्ते'कदम'हि कामे होणारच आहेत फ़क्त मनपा च्या निवडणुकीपर्यंत धीर धरा.

In reply to by lakhu risbud

कदमांचे कदम फारच अस्ते अस्ते आहेत !!! असो व्य. नि केला आहे.

रेवतीशी बहुतांशाने सहमत आहे. ही मंगळ मोहीम जरी डिफेन्सशी थेट संबंधित नसली तरी दूर पल्ल्यावर अचून क्षेपणास्त्रे पाठवायच्या योजनेत आणि इम्धनाच्या कार्यक्षम वापरासाठी नक्कीच उपयोग होऊ शकेल. सगळे आक्षेप खरे असले तरी एका देशाच्या बजेटमधे ७० मिलियन्स ही अगदी लहान रक्कम ठरेल. त्याचा उपयोग "फील गुड" फ्याक्टर म्हणूनही होतो. तसे तर अण्वस्त्रे कार्यक्रम चालू आहेच. पण त्यातली कितीशी अण्वस्त्रे प्रत्यक्ष वापरली जाणार आहेत? महासत्ता वगैरे सगळे बाजूला ठेवा. मग सर्व सरकारे कला-साहित्य क्षेत्रातल्या मान्यवरांना पुरस्कार देतात. शौर्य पुरस्कार दिले जातात. त्यांचा थेट उत्पादक असा कोणता उपयोग दाखवता येईल? कला साहित्य संस्कृती हे सगळे जसे आवश्यक आहे तसे संशोधन सुद्धा आवश्यक आहे. जुन्या काळात संशोधक लोक स्वत;चे पैसे वापरून संशोधन करत असत. कधी राजेलोक त्यांना पैसे देत. आता सरकार पैसे पुरवते. यात काही चूक आहे असे वाटत नाही. या संशोधनचा उपयोग भविष्यकाळात सर्व जगाला होऊ शकतो. एक पाऊल उचलल्याशिवाय पुढे खड्डा आहे की रस्ता आहे हे कसं कळेल?

In reply to by पैसा

पैसातैशी सहमत ! ( व्हावच लागतं , त्या संपादक मंड्ळात आहेत ! )
राष्ट्राचा आत्मसन्मान
नावाची एक गोष्ट असते आणि त्यासाठी या बाबी अत्यंत आवश्यक आहेत .. मदन्बाण म्हणतात , त्या हिशेबाने विचार करु गेल्यास , संरक्षणाचा खर्च देखील वायफळ च आहे. काय फरक पडतो चीन च्या अंकीत आपण असलो म्हणून ? निदान लोकांना पोत्भर खायला तरी मिळेल, चांगले रस्ते देखील मिळतील..???? पण आपण असा विचार करत नाही कारण भौतिक सुविधांच्यापल्याड अस्मिता म्हनून एक प्रकार असतो ( आठवा मोस्ले चा त्रिकोण ) , तो जसा व्यक्तिला आहे तसा राष्ट्रालाही आहेच आहे! तस्मात.. या सार्या शंका गैरलागू आणि औचित्यभंग करणार्या आहेत. धागा इनोदी असल्याने तूर्तास एवढेच पुरे!

In reply to by विटेकर

राष्ट्राचा आत्मसन्मान नावाची एक गोष्ट असते आणि त्यासाठी या बाबी अत्यंत आवश्यक आहेत .. राष्ट्राचा आत्मस्न्मान फक्त मंगळावर यान पाठवुनच मिळतो ? मिल्खा सिंग ने सुद्धा राष्ट्रस्न्मान वाढवण्यात मदतच केली ना ? त्यांच्यावर आधारीत चित्रपटाने तरुणांना प्रेरणा दिलीच ना ? संरक्षणाचा खर्च देखील वायफळ च आहे. काय फरक पडतो चीन च्या अंकीत आपण असलो म्हणून ? संरक्षण खर्च इतर देश सुद्धा करतात,ते टेक्नॉलॉजिचा विकास आणि "वापर" देखील करतात... आज नेवाडामधे बसुन पाकिस्ताना ड्रोन करणारा अमेरिका या टेक्नॉलॉजिमधे अव्वल झाला आहे,पण आपले काय ? सिमेवर मुंडके धडावेगळे झालेला जवान आपलाच आहे ! त्याच्या आयुष्याची काहीच किंमत नाही ? त्याचे आयुष्य वाचवुन आतंकवाद्यांना ठार करणारी टेक्नॉलॉजी आपण कधी वापरणार ? रोज इथल्या स्त्रीया आणि मुलींवर बलात्कार होत असताना आपण नक्की कुठली अस्मिता गोंजारत आहोत ?

मंगळावर गेलेल्या यानामुळे गरिबी वाढणार आहे. हा मंगळ अधिकच वक्री होउन चक्री वादळे येण्याची शक्यता दिसते. विज्ञानाच्या प्रगतीचं असं हिडीस प्रदर्शन केल्याने स्वयंघोषित विज्ञानिष्ठ कल्टची बेमुर्वतखोर मंडळी बेताल होतील असं दिसत आहे. याच मंडळींनी देशातलं वातावरण बिघडवलेलं आहे. आमच्या काळी या मंडळींना तोंडातून ब्र काढण्याची सोय नव्हती. काय दिवस होते ते. हिंदू मुसलमान दंगली, खलिस्तानचे अतिरेकी, सुवर्णमंदिरातली कारवाई, जन अरुणकुमार वैद्य यांची जीवनचक्रातून पुण्यनगरीत मुक्ती, रामजन्मभूमी आंदोलन, बाबरी सपाटीकरण, मुंबई -गुजरातेतले युद्धसराव, मुंबईतली आतिषबाजी, राष्ट्रीय संत दाउद कासकर, टायगर मेनन यांचा विदेशदौरा, गोध्रा गुजरात चळवळ, गरजूंना कोळसा वाटप मोहीम, तू २(जी) खा मी ३(जी) खातो हे सामाजिक समरसता अभियान, बोफोर्स सांस्क्रुतिक निधी उभारणी, लोहपुरुषाचा मंगळाला टेकणारा लोखंडी पुतळा.... या रम्य वातावरणात गरिबीची चिंताच राहत नव्हती. म्हणूनच या राष्ट्रविघातक अमंगलमोहीमेचा तीव्र शब्दात निषेध - टणाटण मसालेभात

In reply to by खटासि खट

विज्ञानाच्या प्रगतीचं असं हिडीस प्रदर्शन केल्याने स्वयंघोषित विज्ञानिष्ठ कल्टची बेमुर्वतखोर मंडळी बेताल होतील असं दिसत आहे.
हा हा हा!!! मस्त प्रतिसाद. वाचून टारझन नावाच्या अफलातून आयडीची आठवण झाली..

मंगळावरील यानाचा खर्च आणि आजच्या काही समस्या सोडविण्यासाठी त्या निधिचा खर्च केला असता तर अशी काही तुलना तितकीशी पटत नाही. विचार येतो खरा. पण, शोधांचा हेतु सफल होतो तेव्हा त्याचे महत्त्व लक्षात येते. आज ते फार महत्वाचे नसेल वाटत पण संशोधकांना त्यात भविष्याच्या वाटा निश्चित दिसत असतीलच. यान अपयशी ठरले असते तर गेले आपले पैसे वगैरे असे म्हणता आले असते. आज तरी संशोधकांचे अभिनंदनच केले पाहिजे. ''बालाजी चरणी प्रतिकृती भारताच्या मंगळमोहिमेला आशीर्वाद मिळविण्यासाठी इस्रोचे प्रमुख के. राधाकृष्णन यांनी सोमवारी तिरुपती बालाजीची पूजा केली. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी पदमिनी होती. इस्रोच्या प्रत्येक उड्डाणापूर्वी यानाची प्रतीकृती घेऊन राधकृष्णन हे तिरुपती मंदिरात पूजेसाठी येत असतात. यावेळीही त्यांनी मंगलयानाची प्रतिकृती आणली होती. ती बालाजीपुढे ठेवण्यात आली." (सौजन्य मटा) आपण कुठून कुठे चाललो ते मात्र मला समजत नाहीहे. -दिलीप बिरुटे

जीवनविषयक अत्यंत मूलभूत प्रश्नांकडं नि समाजामध्ये असणार्‍या आत्यंतिक विरोधाभासावर तीव्र प्रकाशझोत टाकणारा हा धागा आहे असं मला वाटतंय. बर्‍याचदाच अवकाशात काय चाललंयचं औत्सुक्य असणारांना पायाखाली काय जळतंय ते दिसत नाही. जळत नसलं तरी ते सुरळीत नाही हे ठाऊक देखील असतं मात्र कदाचित हेतुपुरस्सर दुर्लक्ष होत असतं. परवाच मला असाच प्रश्न पडलेला की एवढे 'हाऊसिंग प्रोजेक्ट्स' करुन करायचंय काय? राहणारे कमी नि इन्व्हेस्ट्मेण्ट म्हणून घेणारे जास्त. बंगलेच्या बंगले रिकामे नि फूटपाथ्स तुडुंब भरलेली. मात्र ह्या सगळ्यात जो खरंच कष्ट करुन दिवस काढतो त्याला काही कमी पडत नाही, त्याचा आलेख उंचावता दिसतो, त्याची धडपड कुठंतरी कामी येते असं दिसावं असं वाटत राहतं नि मी गप्प बसतो. उगाच चुळबूळ करुन आपल्याकडून चळवळ उभी राहणार नाही हे ठाऊक असल्यानं, स्वतः पोह्याची डिश हातात घेऊन मेळ घाटचे कुपो षित बालकांचे फोटो न बघता त्यांना माझ्या स्वतःच्या हातून काही करता येणं शक्य आहे का हे पाहणं जास्त श्रेयस्कर.

मंगळावर यान पोचवण्याचा थेट काही फायदा नसला तरी विज्ञानाच्या क्षेत्रात काहीतरी भरीव करू शकणारा इच्छिणारा देश अशी भारताची प्रतिमा निर्माण व्हायला ह्या मोहिमेचा हातभार लागेल. हे यान मंगळावर यशस्वीरित्या पोचले तर आणखीच चांगले. अशाने कदाचित हायटेक उद्योजक भारताकडून आपले काम करुन घ्यायला जास्त उत्सुक असतील अशी एक आशा. बाकी भ्रष्टाचाराने, बलात्काराने बरबटलेला असला तरी निदान ह्या देशात विज्ञान, तंत्रज्ञान जाणणारे हुषार लोक आहेत अशी एक पावती परकीयांना मिळेल. याउलट सौदी अरेबिया, कुवेत ह्यासारखे अतीश्रीमंत देश बघा. इतका पैसा असून अशी कुठली मोहीम काढताना दिसत नाहीत. ही मोहीम फत्ते झाली तर काँग्रेसलाही निवडणुकीत प्रचाराकरता एक मुद्दा मिळेल. अर्थात हे फायदे असले तरी इतका खर्चिक प्रकल्प भारताने करावा का हा मुद्दा वादातीत नाही हे मान्य.

मी "हिंदुस्थानचे मंगळ अभियान आणि सामान्य नागरिकांचे जीवन" ह्या विषयावर प्रतिक्रिया दिली होती. हे दोन्हिही पुर्णपणे वेगळे विषय आहेत. "हिंदुस्थानचे मंगळ अभियान" हा भारताच्या (मानवाच्या) भविष्यकाळाशी निगडीत आहे तर "सामान्य नागरिकाचे जीवन" हा वर्तमानकाळाशी निगडित आहे. पहिला विषय हा एक निरंतर चालु ठेवावे लागणारे संशोधन असुन त्यात बर्याच गोष्टी अन्तर्भुत आहेत. आपले शात्रज्ञ सध्या बर्याच गोष्टींवर लक्ष देउन आहेत. ऊदाहरणादाखल जसेकी वातावरणात (अंतराळात) वेगाने जाणारे आणि जाउन पुर्वस्थानी परत येऊ शकणारे यान. दुसरे म्हणजे प्रुथ्वीच्या कक्षेबाहेरच्या वातावरणात टिकुन रहाण्यासाठी आवश्यक गोष्टी. तिसरे म्हणजे प्रुथ्वी बाहेरील इतर ग्रहांचा अभ्यास (तिथले वातावरण, मानवाच्या वस्तीसाठी अनुकूल गोष्टी ईत्यादी..) जगातले सर्व देश/लोक ही क्षमता प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील आहेत आणि त्यात आपणही आहोत. ह्या संशोधनाचे इतर दुरगामी फायदे आहेत. (जसे कि अंतराळ स्थानकाची उभारणी, प्रुथ्वीच्या कक्षेतील उपग्रहांचे व्यवस्थापन्,इतर देशांच्या उपग्रहांची टेहाळनी..). तुम्ही विचार करुन पाहा, आज आपले मानवी जीवन मानवनिर्मीत उपग्रहांमुळे किती सुसह्य बनले आहे. पुढे जाऊन हेच अंतराळ तंत्रज्ञान महत्वाचे ठरणार आहे. हे तंत्रज्ञान टप्या टप्याने विकसीत करावे लागते आणि ही मंगळमोहिम (त्यासाठी लागणार्या यानाचे प्रक्षेपण जे जवळ जवळ ३०० दिवस प्रवास करेल. पुढे कदाचीत ह्याच पठडीतले पण परत येणारे यान विकसीत करतांना ह्या माहितीचा खुप उपयोग होइल , अंतराळात संदेश आदन्-प्रदान, अंतराळातिल नॅव्हीगेशन विषयी ज्ञान) त्यातलाच एक भाग आहे. आणि लक्षात घ्या कि अशा प्रकारच्या संशोधनासाठी लागणारा निधी हा सध्या जरी चर्चेचा विषय असला तरी भविष्यात तो अतिशय नगण्य असेल कारण तसा पैसा कदाचित उभा करता येइल पण त्यासाठीचा वेळ मात्र मिळवता येणार नाही. राहिला प्रश्ण "सामान्य नागरिकांचे जीवन " तर ह्या सगळ्या आपल्या वर्तमान समस्या आहेत. त्यासाठी सोडवण्यासाठी आपणच "लोकप्रतिनीधी" दर पाच वर्षांनी निवडुन देत असतो. बाकिच्या प्रगत देशांनी बहुतांशी प्रमाणात अश्या समस्या सोडवण्यात बर्यापैकी यश मिळवले आहे. आपण जोपर्यंत सार्वजनिक शिष्त, जवाबदार लोकव्यवस्थापन आणि नियोजन आपल्या देशात प्रस्थापित करत नाहीत तोपर्यंत गरिबी, उपासमार, वाहातुकिचे प्रश्न हे रहाणारच.

मंगळावर यान पाठवायचा आणि आज देशासमोर असणार्‍या समस्यांचा एकमेकांशी काडीइतका संबध नाहीये. ह्या मंगळ मोहीमेचे बाकी फायदे खर्चाचा मुद्दा बाजुला ठेवुन विचारात घ्यायला हवेत. १. यानाचं क्रायोजेनिक ईंजिन आज एफिशियन्सि मधे जगात एक नंबर वर आहे. बाहेरील महासत्तांकडुन क्रायोजेनिक तंत्रज्ञानासाठी नकार मिळाल्यावर आपण अजुन जास्त चांगलं ईंजिन बनवु शकलो ही गोष्ट चांगली नाही का? २. एवढ्या लांब अंतरावर जायला जर का यश मिळत असेल तर आपल्या आय.सी.बी.एम. (ईंटरकाँटीनेंटल बॅलेस्टीक मिसाईल्स) च्या टप्प्यात सगळं जगं आलय. ह्याचा अर्थ आपली कुरापत काढायच्या आधी महासत्ता आता ४ वेळा विचार नक्कीचं करतील. (आता आपलं सरकार दुसरं गाल पुढे करणारं आहे ह्याचा दोष तंत्रज्ञानाला देउन चालणार नाही). ३. कदाचीत ह्या संशोधनातुन आपल्याला माहीत नसणार्‍या नवीन धातु-अधातु, इंधन अश्या गोष्टींचा शोधही लागु शकतो. त्यांच्या शोधानी कदाचीत आजच्या आपण वापरत असलेल्या तंत्रज्ञानात अमुलाग्र बदलही होऊ शकतील. गरिबी हटाव किंवा चांगले इन्फ्रस्ट्रक्चर बनावं साठी नुसत्या पैशाची नाही तर राजकीय आणि सामाजिक इच्छाशक्तीची गरज जास्त आहे. इस्रो च्या सर्व शास्त्रज्ञांचं हार्दीक अभिनंदन. आता थोडं गमतीमधे, १. काय माहीत २५०० वर्षांनी आपली पुढची पिढी तिकडे बसुन मिपा वाचत असेल. ;) २. महिला वर्ग "आमच्या ह्यांनी किनै, प्लुटो वरुन ही मार्थोयस ची आंगठी आणलीये" म्हणुन आपल्या बुधावर्च्या सोसायटीमधे मिरवत असेल. ;) ३. आम्च्या ह्यांन्ना किनै फिरायची काही म्हंजे काही हौस नाही बघा. शेजार्च्या घरी बघा दर विकांताला कमीत कमी चंद्रावर तरी शॉपींगला नेऊन आणतात, असही कदाचीत ऐकायला मिळेल. :P. ४. आमच्या मिपाकरांना दुसर्‍या सुर्यमालिकेमधे नोकर्‍या मिळतील, आणि तिकडेही ते मिसळीचे आणि खादाडीचे अड्डे बनवतील. :). _______ (आय.आर.सी.टी.सी. च्या वेबसाईट ला शिव्या घालणारा) मन उधाण वार्‍याचे.