आता तुमीच सांगा रायल बुलेट वापरावी का? ऑ?
आता तुमीच सांगा रायल बुलेट वापरावी का? ऑ?
तसं म्हनाल तर आपला बारदाना लई मोट्टा है. चाळीसपंनास एकर उस है. निम्मा उस जातोय साकरकारखान्यात. निम्या उसाचं गुर्हाळं लागत्यात. द्राक्षे है. मागल्या सालाच्या मागल्या साली वायनरी फैक्ट्रीचे सत्तर टक्के शेर घेतले. द्राक्षे वायनरीत नाय तर फारेनला जात्यात. सोसायटी, ग्रामपंचायत झालंच तर पंचायत समिती आपल्याच ताब्यात है. पुढल्या सालाला झेडपीत उडी मारायची है. दोन गण आपलेच है त्यामुळे फिकीर नै. उगाच नै कै पंचक्रोशीत बाळासायेब म्हनून आपल्याला वळखतेत. काय?
तस सौंसारपानी बरा चाललाय. घरामदी एकाला तिन तिन गाड्या हैत. म्हंजी स्कार्पीओ, सपारीचं नवं माडेल स्टार्म, मारूतीची ग्रांडे वैतरणा है. लई बेस हायती या गाड्या. पन बायलीला सालं बुलेटच पसंत हाय. काय तर म्हंती, 'तुमी लय गुनाचं दिस्ता बुलेटवर. लई मर्द वाटता बुलेटवर. तुमी शेतातून परतायच्या रातीच्या वेळी गाडी कितीबी लांब आसूद्या, पार नदीकाठच्या गढीवरून जरी तुमची गाडी येत आसली का मला आवाज पार आपल्या वाड्यात येतूया बघा.'
काय कळंना बाबा. आसं काय हाय त्या बुलेटमधी काय जानो. म्या काय म्हंतो, तुमाला काय समजलं का काय हाय ते?
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिक्रिया
मस्त...
बुलेटचा अवाअज बायलीला सावध
वा वा वा अत्यंत र्हद्य गोष्ट
>>>दर्भासहीत
भाग दोनः
अगागागागागा जबरीच
आगागागागा!
_/|\_ अप्रतिम
भाग २ मस्त.
@त्यापरीस आपली... बोलता बोलता
जब्राट
हाहाहा!
गावरान
हाण्ण तेजायला... दोन्ही भाग
रायल बुलेट घिऊनच टाका राव.
भाग ३
:))
इशय तर्र्र बुलेटचा चालला न्हवं? कि वैनीबायचा?
(No subject)
@ आनंद पाटील....
+१११११११११११.
म्या म्हनलं ह्ये पाभेला अस्लं
भाग ४
हाहाहा!
चालूद्या धमाल!
घिउन टाका भाउ रायल बुलुट...
आर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र फकिस्त बुलट्च कशाला आख्खी आगिनगाडीच घे
हैश्शा
हा हा हा, आवडले. हा ज्योक एका
माहितीतला एक कॉलेज विद्यार्थी
मंडळी म्या काय म्हंतो. तुमा
चार वर्सं झाली, तशी आपल्याला
होउ दे थर्थर, मोड वाढे भर्भर!!
आत्ता ! आयला, तुमची कता
कन्च्या गावचं वो तुमी?
भाग कितवा हाय रं ह्यो. नोंदवून घ्या च्यायला.
आर तुज मड बशीवलं.