'वाढदिवस'
रोजच्याच राघववेळी, उठण्याची घटिका झाली
दिवसाचे विझले डोळे, रात्रीस नीज ना आली
वडिलांच्या कानी बोले, आवाज आज आईचा,
"पुत्राच्या वाढदिनाचा, सोहळा खास घाईचा"
"पाहता पाहता सरली, परि कैशी इतकी वर्षे?"
बाळाचे कौतुक दाटे, डोळ्यांतुन श्रावण बरसे
औक्षणास उठते माता, वडिलांचा धरुनी बाहू
"उठवाया सोनूल्याला, दोघेजण मिळुनी जाऊ"
थरथरत्या हातांवरती, सावरती हार फुलाचा
भिंतीवर सैनिकवेषी, हसतो चेहरा मुलाचा
-- अमेय
काय बोलू समजत नाही
आई ग्गं !!
निशःब्द !
.....
....:(
__/\__
प्रतिक्रिया
आवडली असं म्हणणंही अवघड आहे!!
......
अनपेक्षित
निशब्द.....
नि:शब्द झालो!
भावा, डोळयात चट्कन पाणी
............
अशक्य...
!!
आई ग!
*****
..........
__/\__
....
.
अप्रतीम...
काय बोलू?
हृदयद्रावक !
शोकाकुल ...
बापरे
छान कविता