Skip to main content

'वाढदिवस'

लेखक अमेय६३७७ यांनी शनिवार, 02/11/2013 00:02 या दिवशी प्रकाशित केले.
रोजच्याच राघववेळी, उठण्याची घटिका झाली  दिवसाचे विझले डोळे, रात्रीस नीज ना आली वडिलांच्या कानी बोले, आवाज आज आईचा, "पुत्राच्या वाढदिनाचा, सोहळा खास घाईचा" "पाहता पाहता सरली, परि कैशी इतकी वर्षे?"  बाळाचे कौतुक दाटे, डोळ्यांतुन श्रावण बरसे औक्षणास उठते माता, वडिलांचा धरुनी बाहू  "उठवाया सोनूल्याला, दोघेजण मिळुनी जाऊ"   थरथरत्या हातांवरती, सावरती हार फुलाचा भिंतीवर सैनिकवेषी, हसतो चेहरा मुलाचा -- अमेय
लेखनविषय:

वाचने 6458
प्रतिक्रिया 28

प्रतिक्रिया

शब्दांचा फापटपसारा न मांडता एक अत्यंत प्रभावी काव्य प्रसविणार्‍या कवीच्या प्रतिभेला, संवेदनशीलतेला थरथरत्या हाताने सॅल्यूट.

कवितेची गाडी त्या शेवट्च्या ओळींवर गचकन थांबली. नि:शब्द !