✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

५ राज्यांच्या डिसेंबर २०१३ मधील निवडणुका

श
श्रीगुरुजी यांनी
Fri, 11/01/2013 - 20:58  ·  लेख
लेख
नोव्हेंबर-डिसेंबर २०१३ मध्ये दिल्ली, म.प्र., छत्तीसगड, राजस्थान व मिझोराम या राज्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत. १) म.प्र. (१९८५ - काँग्रेस, १९९० - भाजप, १९९३ - काँग्रेस, १९९८ - काँग्रेस, २००३ पासून भाजप सत्तेत आहे) एकूण जागा - २३० २००८ ची परिस्थिती - भाजप (१४३), काँग्रेस (७१) २०१३ चा अंदाज - भाजप (१४८-१६०), काँग्रेस (५२-६२) http://ibnlive.in.com/news/prepoll-survey-bjp-sweeps-madhya-pradesh-may-win-148160-seats/431055-3-236.html २) छत्तीसगड (२०००- काँगेस, २००३ पासून भाजप सत्तेत आहे) एकूण जागा - ९० २००८ ची परिस्थिती - भाजप (५०), काँग्रेस (३८) २०१३ चा अंदाज - भाजप (६१-७१), काँग्रेस (१६-२४) http://ibnlive.in.com/news/prepoll-survey-bjp-set-to-rout-congress-in-chhattisgarh-win-6171-seats/431048-3-235.html ३) राजस्थान (१९८५ - काँग्रेस, १९९० - भाजप, १९९३ - भाजप, १९९८ - काँग्रेस, २००३ - भाजप, २००८ - काँग्रेस, २००८ पासून काँग्रेस सत्तेत आहे) एकूण जागा - २०० २००८ ची परिस्थिती - भाजप (७८), काँग्रेस (९६) २०१३ चा अंदाज - भाजप (११५-१२५), काँग्रेस (६०-६८) http://ibnlive.in.com/news/prepoll-survey-bjp-may-storm-to-power-in-rajasthan-with-115125-seats/431256-3-239.html ४) दिल्ली (१९९३ - भाजप, १९९८ पासून काँग्रेस सत्तेत आहे) एकूण जागा - ७० २००८ ची परिस्थिती - भाजप (२३), काँग्रेस (४३) २०१३ चा अंदाज - भाजप (२२-२८), काँग्रेस (१९-२५), आम आदमी पक्ष (१९-२५) http://ibnlive.in.com/news/prepoll-survey-hung-assembly-in-delhi-as-aap-hits-bjp-congress-hard/431438-80-258.html दिल्लीत अत्यंत चुरशीची स्थिती आहे. अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पक्षाने जबरदस्त आव्हान उभे केले आहे. या पक्षाची लोकप्रियता वेगाने वाढते आहे. कदाचित शेवटी या पक्षाला पूर्ण बहुमत मिळू शकेल. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीचा अंदाज - २००९ ची स्थिती - युपीए (२५५. यात काँग्रेसचा वाटा २०६), एनडीए (१६१. यात भाजपचा वाटा ११६) २०१४ चा अंदाज - युपीए (१३४-१४२. यात काँग्रेसचा वाटा ११६-१२४), एनडीए (१८७-१९५. यात भाजपचा वाटा १७१-१७९) http://ibnlive.in.com/news/big-gains-likely-for-bjp-nda-in-lok-sabha-polls-big-drop-for-upa-congress/431621-80.html काँग्रेस व पर्यायाने युपीएची जबरदस्त पीछेहाट होण्याचा अंदाज असून अनेक मित्रपक्ष व स्वकीय सोडून गेलेले असताना सुद्धा भाजप व पर्यायाने एनडीएची परिस्थिती खूपच सुधारत आहे. हाच मोदी इफेक्ट असेल का?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
59809 वाचन

💬 प्रतिसाद (153)

प्रतिक्रिया

रिझल्टची बरीच उत्सुकता आहे

लॉरी टांगटूंगकर
Fri, 11/01/2013 - 22:57 नवीन
रिझल्टची बरीच उत्सुकता आहे, मोदी एकटे किती ठिकाणी पुरे पडणार असा एक प्रश्न पडतोय. लोकल उमेदवाराच्या मतांवर याचे कसे परिणाम होतात अन् केजरीवाल काय मिळवू शकतात हे पाहणे लै इंत्रेष्टिंग असणार आहे.
  • Log in or register to post comments

सध्या तरी......

मुक्त विहारि
Fri, 11/01/2013 - 23:02 नवीन
हात दाखवून अवलक्षण न करणेच योग्य. ७०% मतदान झाले तर, मुद्दाम गहन विचार करणार्‍यांची अवस्था बेकार होईल.
  • Log in or register to post comments

कुठल्यातरी एका वाहिनीने

अपूर्व कात्रे
Fri, 11/01/2013 - 23:18 नवीन
कुठल्यातरी एका वाहिनीने केलेले prepoll surveyचे (मर्यादित) निष्कर्ष कितपत सत्य ठरू शकतात?
  • Log in or register to post comments

अंदाज!

आतिवास
Fri, 11/01/2013 - 23:31 नवीन
या वाहिनीने मागच्या दोन-तीन निवडणुकांत वर्तवलेले अंदाज कितपत बरोबर निघाले होते याविषयी काही माहिती आहे का? त्यावरुन मग यावेळच्या अंदाजाला कितपत महत्त्व द्यायचे याचा एक अंदाज बांधता येईल :-) अवांतरः आपल्या देशात अशी सर्वेक्षणं म्हणजेही मतदारांना प्रभावित करण्याचा एक मार्ग असतो अशी अनेकदा शंका येते.
  • Log in or register to post comments

>>> या वाहिनीने मागच्या दोन

श्रीगुरुजी
Sat, 11/02/2013 - 10:24 नवीन
>>> या वाहिनीने मागच्या दोन-तीन निवडणुकांत वर्तवलेले अंदाज कितपत बरोबर निघाले होते याविषयी काही माहिती आहे का? त्यावरुन मग यावेळच्या अंदाजाला कितपत महत्त्व द्यायचे याचा एक अंदाज बांधता येईल अवांतरः आपल्या देशात अशी सर्वेक्षणं म्हणजेही मतदारांना प्रभावित करण्याचा एक मार्ग असतो अशी अनेकदा शंका येते. पूर्वी अनेक वेळा मतदाता चाचण्यांचे निष्कर्ष आश्चर्यकारकरित्या खरे ठरले आहेत. 'इंडिया टूडे'ने १९८० साली काँग्रेसला ३५३, १९८४ ला ३६०+ व १९८९ ला १९५ जागांचा अंदाज दिला होता. प्रत्यक्षात काँग्रेसला १९८० मध्ये ३५५, १९८४ मध्ये ४१४ व १९८९ मध्ये १९५ जागा होत्या. म्हणजे हे अंदाज खूपच अचूक होते. नंतर बर्‍याच वाहिन्यांनी कोणत्या तरी एका पक्षाच्या विचारसरणीला वाहून घेतल्यामुळे त्यांचे अंदाज पक्षपाती होऊ लागले. तरीसुद्धा अशा चाचण्यांवरून वारे कोणत्या दिशेने वाहत आहे याचा अंदाज येतो.
  • Log in or register to post comments

हे सर्व्हे म्हणजे

चौकटराजा
Sat, 11/02/2013 - 10:51 नवीन
ही सर्व्हे म्हणजे एक फालतू गिरी आहे असे मला ही प्रथम वाटायचे. पण त्यांचा सॅम्पल कमी असला तरी ते वाईड सॅम्पल घेतात असे कळते आहे. सबब हवामान खात्याचा अंदाज हा जसा आता चेष्टेचा विषय राहिलेला नाही तद्वत हे सर्व्हे म्हणजे ही अगदीच बकवास नाही. आम आदमी पार्टी दिल्लीत स्थिरावली तर मला व्यक्तिशः आनंद होईल . कारण तो पक्ष म्हणजे राज ठाकरेंचा मनसे नव्हे की शरद पवारांचा रा का नव्हे. तो पूर्ण पणे नवीन पक्ष असणार आहे. नमो अजूनही अर्थिक नीति, पराराष्ट्र धोरण, सुशासन याविषयी जो पर्यंत काही क्रांतिकारी बोलत नाहीत. तो पर्यंत नुसत्या गुजरातची प्रगति ची पारायणे करून काहीही साध्य होणार नाही. केजरीवाल ही या आघाडीवर कच्चे खेळाडू वाटतात मला.
  • Log in or register to post comments

>>> आम आदमी पार्टी दिल्लीत

श्रीगुरुजी
Sat, 11/02/2013 - 10:58 नवीन
>>> आम आदमी पार्टी दिल्लीत स्थिरावली तर मला व्यक्तिशः आनंद होईल . आम आदमी पक्षाला दिल्लीत पूर्ण बहुमत मिळावे अशी माझी इच्छा आहे. इतर राज्यात काँग्रेसचा दणकून पराभव व्हावा व भाजपला बहुमत मिळावे असे वाटते.
  • Log in or register to post comments

+५००

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 11/02/2013 - 11:30 नवीन
+५००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

श्री गुरुजी तुम्हाला दिल्लीची

विवेकपटाईत
Tue, 12/03/2013 - 19:25 नवीन
श्री गुरुजी तुम्हाला दिल्लीची कल्पना नाही. लोक सत्तापक्ष पासून नाराज आहे. हे थिंक टेंक ने आधीच ओळखले आहे. रणनीती आधीच आखून ठेवली आहे. बहुतेक कांग्रेस मधून निघालेले (?) आणि मोठे-मोठे प्रापर्टी डीलर आम आदमीच्या तिकीटा वर उभे आहे. अधिकांश कार्यकर्ता 'मानधन' घेत आहे. (अस ऐकिवात आहे) आमच्या बिंदापूर येथून वर्ष भर आधी कांग्रेस सोडलेला व्यक्तीच आम आदमी कडून उभा आहे. (बिंदापूर एक्स्टेंशन- दोन वर्षांपासून पाणी येत नाही आहे, पिण्याच्या पाण्यासाठी टेन्कर येतात). कांग्रेस उम्मिद्वाराचा प्रचार थंड आहे, शिवाय या भागात (जिथे पाणी येत नाही) जुने कार्यकर्ते आपचा प्रचारात मग्न आहे. आणखीन एक नारा आहे 'दिल्लीत केजरीवाल आणि लोकसभेत मोदी' लोकांना हा नारा आवडतो आहे. अर्थात भाजपला नुकसान पोह्चणारच. (मत विभाजणीचा कांग्रेसला फायदा होऊ शकतो मागे ४६% वोट मिळाले होते आणि भाजपला ३६%. आता कॉंग्रेसला ३०% मते मिळाली तरी नैया पार लागू शकते. म्हणून श्रीमती दीक्षित (यांचे पूर्वज ही महाराष्ट्रातून उत्तरांचल येथे येऊन स्थायी झाले होते) यांचा आत्मविश्वास ढळला नाही आहे. थंड प्रचार ही विजय मिळवून देऊ शकतो. ही आशा. शेवटी बहुमत नाही मिळाले तर आप + कॉंग्रेस युती होईलच. (सांप्रदायिक शक्तींना दूर ठेवण्यासाठी, नेहमीचाच बहाणा). मला वाटते निवडूकीनंतर सर्वाना घोर निराशा होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

तुम्ही म्हणता त्यात तथ्य आहे.

श्रीगुरुजी
Wed, 12/04/2013 - 13:49 नवीन
तुम्ही म्हणता त्यात तथ्य आहे. जर भाजपला ७० पैकी किमान ३६ जागा मिळाल्या नाहीत (अगदी ३४ जरी मिळाल्या तरी) तर उर्वरीत सर्वांना एकत्र आणून बहुमत जमविण्याची काँग्रेसकडे क्षमता आहे. काँग्रेस ब्यूरो ऑफ इनव्हेस्टिगेशनची भीति दाखवून बसपला फरफटत आणता येईल. अपक्ष व आम आदमी पक्षाचे जिंकलेले उमेदवार अगदी सहज स्वस्तात विकत मिळतील. असे करून ३६ आमदारांची जमवाजमव काँग्रेस सहज करू शकते. मार्च २०१२ मध्ये झालेल्या उत्तराखंड निवडणुकीत ७० पैकी भाजप ३१ व काँग्रेस ३२ अशी त्रिशंकू परिस्थिती होती. पण उर्वरीत ७ आमदारांपैकी (त्यातले ३ बसपचे होते) एकही आमदार भाजपच्या गळाला लागला नाही. सर्वजण काँग्रेसकडे जाऊन काँग्रेसने बहुमत मिळविले. यावेळी दिल्लीत त्रिशंकू परिस्थितीचा अंदाज आहे. म्हणजेच काँग्रेसच शेवटी सत्ता स्थापन करणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

अरेरे !! निराश होऊ नका.

नितिन थत्ते
Wed, 12/04/2013 - 18:56 नवीन
अरेरे !! निराश होऊ नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

त्यांना सांगता आहात की

मृत्युन्जय
गुरुवार, 12/05/2013 - 11:30 नवीन
त्यांना सांगता आहात की स्वतःला समजावत आहात चाचा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

भारतीय झंगड पार्टी सारख्या

ग्रेटथिन्कर
Wed, 12/04/2013 - 20:27 नवीन
भारतीय झंगड पार्टी सारख्या टीनपॉट पक्षाला घरीच बसवावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

इनो वगैरे घ्याव अधुन मधुन ...

लोटीया_पठाण
Wed, 12/04/2013 - 20:52 नवीन
इनो वगैरे घ्याव अधुन मधुन ....इतकी जळ्जळ बरी नव्हे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ग्रेटथिन्कर

>>> इनो वगैरे घ्याव अधुन मधुन

श्रीगुरुजी
गुरुवार, 12/05/2013 - 13:20 नवीन
>>> इनो वगैरे घ्याव अधुन मधुन ....इतकी जळ्जळ बरी नव्हे ते नथु गुग्गुळचे अ‍ॅडिक्ट आहेत. नथु गुग्गुळचीच किक त्यांना बसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लोटीया_पठाण

भारतीय झंगड पार्टी......

विनोद१८
गुरुवार, 12/05/2013 - 01:14 नवीन
नमो नमः हुच्च विचारवन्त..... ---------^--------- आपली सिग्नाचर लाइन अशीच हवी हो :- आपले मत धर्मनिरपेक्ष, पुरोगामी, अती भ्रष्टाचारी व सर्वात लूटारू पक्षालाच द्या कसे ???? विनोद१८
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ग्रेटथिन्कर

आपले मत धर्मनिरपेक्ष,

मृत्युन्जय
गुरुवार, 12/05/2013 - 11:29 नवीन
आपले मत धर्मनिरपेक्ष, पुरोगामी, अती भ्रष्टाचारी व सर्वात लूटारू पक्षालाच द्या नाही भ्रष्टाचारी आणि लुटारु कोण ते समजले पण धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामी असणारा पक्ष कुठला म्हणे? भाजपाला लुटारु आणि भ्रष्टाचारी म्हणता येणार नाही. पुरोगामी म्हणता येइल पण धर्मनिरपेक्षा मानणे जरा अवघड जाउ शकते लोकांना. पक्ष मुसलमानविरोधी नसला तरी हिंदुत्वाकडे झुकणारा आहे हे अमान्य करुन चालणार नाही. थोडक्यात भाजप तर एकाच विशेषणावर खरा उतरतो. भ्रष्टाचारी आणि लुटारु असे दोन्ही असणारा पक्ष आपल्या सगळ्यांना माहिती आहेच. पण त्या पक्षाला धर्मनिरपेक्षपणाचा केवळ देखावाच करता आलेला आहे बाकी लांगुलचालन तर एकाच धर्माचे चालु आहे आणि त्या पक्षाला पुरोगामी म्हणणे ही "पुरोगामी" शब्दाची क्रुर थट्टा आहे. त्यामुळे थोडा संभ्रम झाला आहे तो कृपया दूर करावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनोद१८

भारतीय जमालगोटा पार्टी

ग्रेटथिन्कर
गुरुवार, 12/05/2013 - 11:55 नवीन
भारतीय जमालगोटा पार्टी पुरोगामी?????..n*हहपुवा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

हहपुवा वात झालाय का?

मृत्युन्जय
गुरुवार, 12/05/2013 - 11:58 नवीन
हहपुवा वात झालाय का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ग्रेटथिन्कर

>>> आणि त्या पक्षाला पुरोगामी

श्रीगुरुजी
गुरुवार, 12/05/2013 - 12:58 नवीन
>>> आणि त्या पक्षाला पुरोगामी म्हणणे ही "पुरोगामी" शब्दाची क्रुर थट्टा आहे. हाच तथाकथित "पुरोगामी" पक्ष एका बाबाला पडलेल्या एका अत्यंत हास्यास्पद स्वप्नावर विश्वास ठेवून कुठल्यातरी किल्यात उत्खनन करतो, त्यासाठी लाखो रुपयांचा चुराडा करतो आणि तिथून रिकाम्या हातांनी परतून जगभर भारताचे हसे करून ठेवतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

आणि भाजपाचा मुरली जोशी पाचशे

ग्रेटथिन्कर
गुरुवार, 12/05/2013 - 15:56 नवीन
आणि भाजपाचा मुरली जोशी पाचशे कोटीचे ज्योतिष विद्यापीठ उभे करणार होता तो कोणता पुरोगामी विचार होता?... आणखि एक जोशी गणपतीला दूध पाजायला गेला होता आणि बाहेर येऊन गणपतीने दूध पिले अशी लोणकढी थाप मारण्याचा 'पुरोगामी'प्रयत्न केला होता...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

हा काय प्रतिवाद आहे मला समजलं

अनुप ढेरे
गुरुवार, 12/05/2013 - 16:10 नवीन
हा काय प्रतिवाद आहे मला समजलं नाही. काँग्रेसच्या प्रतिगामित्वाचं उदाहरण देऊन, काँग्रेस ही पुरोगामी नाही अशी आर्ग्युमेंट असताना भाजपाच्या मूर्खपणाचा दाखला देण्याचं प्रयोजन नाही समजलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ग्रेटथिन्कर

तेच म्हणतो … भाजप कडून

लोटीया_पठाण
गुरुवार, 12/05/2013 - 16:13 नवीन
तेच म्हणतो … भाजप कडून पुरोगामी पुरोगामी करत उर बडवलेला अजून पाहण्यात आला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

वर मृत्युंजय यांच्या

नितिन थत्ते
गुरुवार, 12/05/2013 - 16:35 नवीन
वर मृत्युंजय यांच्या प्रतिसादात वरून चौथ्या ओळीत भाजपला पुरोगामी म्हणता येईल असं न्हटलं आहे. त्याला उत्तर दिलेलं असावं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लोटीया_पठाण

या

नितिन थत्ते
गुरुवार, 12/05/2013 - 16:36 नवीन
या प्रतिसादात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

सत्यसाईबाबांना सरकारी

श्रीगुरुजी
गुरुवार, 12/05/2013 - 19:12 नवीन
सत्यसाईबाबांना सरकारी बंगल्यात बोलावून त्यांची पाद्यपूजा करणारा कोणत्या "पुरोगामी" पक्षाचा होता? सत्यसाईबाबांच्या जीवनावरील धडा बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात टाकणारा कोणत्या "पुरोगामी" पक्षाचा होता? ज्योतिषांचा सल्ला घेऊन निवडणूक लढविणारे कोणत्या "पुरोगामी" पक्षाचे असतात? धीरेंद्र ब्रह्मचारी, स्वामी अग्निवेश, चंद्रास्वामी इ. भोंदू बाबा कोणत्या "पुरोगामी" पक्षाशी संबंधित होते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ग्रेटथिन्कर

ब्वॉर...

ग्रेटथिन्कर
गुरुवार, 12/05/2013 - 19:29 नवीन
ब्वॉर... मग हे काय पुरोगामी काम करत होत तेही लिहा. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

ते काही पाद्यपूजा करताना दिसत

श्रीगुरुजी
गुरुवार, 12/05/2013 - 19:36 नवीन
ते काही पाद्यपूजा करताना दिसत नाहीत किंवा त्यांचा धडादेखील अभ्यासक्रमात टाकलेला नव्हता किंवा आपण "पुरोगामी" आहोत अशी खोटी जाहिरातबाजी देखील करताना दिसत नाही. इतर तथाकथित "पुरोगामी" पक्षांसारखे त्यांचे दाखवायचे व खायचे दात वेगळे नसतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ग्रेटथिन्कर

यात काय करतायत...

ग्रेटथिन्कर
गुरुवार, 12/05/2013 - 19:43 नवीन
यात काय करतायत... नतमस्तक झाले पण पाद्यपूजा केली नाही..यालाच म्हणायचं खरा "पुरोगामी" Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

तुम्ही इथे जो फोटो टाकलाय

श्रीगुरुजी
गुरुवार, 12/05/2013 - 19:46 नवीन
तुम्ही इथे जो फोटो टाकलाय त्याचे ३ निष्कर्ष निघतात. (१) सत्यसाईबाबांबरोबर असणे हे पुरोगामीपणाचे लक्षण नाही. म्हणजे आपल्या सरकारी बंगल्यात बोलावून त्यांची पाद्यपूजा करणारे व त्यांचा धडा पाठ्यपुस्तकात टाकणार्‍यांचा पक्ष सुद्धा पुरोगामी नाही. किंवा (२) सत्यसाईबाबांशी संबंध असणे हे पुरोगामीपणाचे लक्षण आहे. म्हणजे वाजपेयी व त्यांचा पक्ष सुद्धा किंवा पुरोगामी आहे. किंवा (३) सत्यसाईबाबा जर भाजप नेत्यांबरोबर असतील तर ते प्रतिगामी आणि ते जर काँग्रेसवाल्यांबरोबर असतील तर ते पुरोगामी. तुमचा व तुमच्या पक्षाची ढोंगी विचारसरणी लक्षात घेता, तुम्ही निष्कर्ष क्र. (३) काढणार हे उघड आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

निष्कर्ष १ आपण काँग्रेसला

ग्रेटथिन्कर
गुरुवार, 12/05/2013 - 19:55 नवीन
निष्कर्ष १ आपण काँग्रेसला लावणार निष्कर्ष २ भाजपला लावणार... घ्या लावून.. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

तुम्ही कोणतेही निष्कर्ष

श्रीगुरुजी
गुरुवार, 12/05/2013 - 19:59 नवीन
तुम्ही कोणतेही निष्कर्ष कोणालाही लावा. तुमचा पराभव अटळ आहे. असो. बहुत काय लिहिणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ग्रेटथिन्कर

अरेरे! पराभवाच्या भीतिने

श्रीगुरुजी
गुरुवार, 12/05/2013 - 20:13 नवीन
अरेरे! पराभवाच्या भीतिने ग्रेटथुंकरांसारख्या पुरोगाम्यांनी सूंबाल्या केलेला दिसतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ग्रेटथिन्कर

श्रीगुरुजी त्यांची पळण्याची वेळ आता जवळ आली आहे

सुहासदवन
Sun, 12/08/2013 - 10:22 नवीन
सध्याच्या निवडणुकीत समोर पराभव दिसत असताना हे पहा पुरोगामी म्हणवणारे काय करताहेत ते. शीला दीक्षित यांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांचं होमहवन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

चित्र पुन्हा टाकतो

सुहासदवन
Sun, 12/08/2013 - 10:23 नवीन
https://plus.google.com/photos/117182536131445242815/albums/5954878205495656721/5954878204463079378?banner=pwa&pid=5954878204463079378&oid=117182536131445242815
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

अजून फोटो

विकास
गुरुवार, 12/05/2013 - 23:00 नवीन
Image removed. Image removed. Image removed. बाईंचे देऊळ Image removed. पंतप्रधान रामाची आरती करत आहेत आणि बाईसाहेब थांबा तरी म्हणत आहेत अथवा "हाताच्या पंजाने" आशिर्वाद देत आहेत. तेहेलकात गुंतवणूक करणारे कपिल सिबल पण हसताना दिसत आहेत. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ग्रेटथिन्कर

.............

विद्युत् बालक
गुरुवार, 12/05/2013 - 23:26 नवीन
होली शिट =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

शेवटचा फोटो भारतीय घटनेत १९७५

श्रीगुरुजी
Fri, 12/06/2013 - 14:16 नवीन
शेवटचा फोटो भारतीय घटनेत १९७५ साली टाकलेल्या "धर्मनिरपेक्षता" या तत्वाचे प्रतीक आहे. बुरसट व प्रतिगामी हिंदू धर्माचे प्रतिनिधी असलेले श्रीराम व श्रीलक्ष्मण यांची पूजा एक शीख व्यक्ती करत असून ख्रिश्चन महिला आनंदाने सूचना देत आहे व सिब्बल, शीलाआज्जी यांसारख्या निधर्मांच्या चेहर्‍यावर हसू फुलले आहे. धर्मनिरपेक्षता व एकात्मता अजून वेगळी असते का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

(((.)))

शिद
Sat, 12/07/2013 - 02:09 नवीन
बुल्सआय प्रतिसाद.. ._/\_दडंवत घ्या गुरुजी...!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

तो फोटो आणि प्रतिसाद ... लंबर

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 12/07/2013 - 10:48 नवीन
तो फोटो आणि प्रतिसाद ... लंबर वन्न !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

@ ग्रेटथिंकर,

लोटीया_पठाण
Sat, 12/07/2013 - 12:06 नवीन
@ ग्रेटथिंकर, तुम्हाला सर्व मुद्दे समजले अन अनिच्छेने का होईना पटले पण आहेत, फक्त प्रतिवाद करता येत नाही म्हणून अजूनही निरागस असल्याच ढोंग करत आहात असं वाटून राहिलंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ग्रेटथिन्कर

अतिशयोक्ती का खोटेपणा?

विकास
Fri, 12/06/2013 - 01:17 नवीन
भाजपाचा मुरली जोशी पाचशे कोटीचे ज्योतिष विद्यापीठ उभे करणार होता तो कोणता पुरोगामी विचार होता?... वैचारीक विरोधक असले तरी किमान वय पाहून "अरे-तुरे" करू नये असे वाटते. अर्थात हा भारतीय संस्कृतीचा भाग झाला आणि तुम्हाला संस्कृती बाळगणे मान्य नसेल असे तुमचे प्रतिसाद वाचून वाटते. असो. आता जे काही लिहीत आहे ते मुरली मनोहर जोशी यांची अथवा भाजपाची बाजू घेण्यासाठी नाही किंवा ज्योतिषाच्या बाजूने अजिबातच नाही. पण तुमचे (या प्रतिसादात) वर चिकटवलेले विधान खोटे असावे असे वाटते. "वाटते" अशा साठी म्हणतो कारण मला तशी माहिती कधी वाचल्याचे आठवत नाही, आत्ता देखील शोधली तेंव्हा मिळाली नाही. पण तुम्ही जर काही संदर्भ दिलात तर मोकळ्यामनाने घेण्याची तयारी आहे याची १०००% खात्री देतो. पण देऊ शकत नसलात तर अतिशयोक्ती केलीत का खोटेपणा हे येथे सांगावेत ही विनंती.... आता तुमचेच वरचे (कळत का नकळत माहीत नाही पण) दिशाभूल करणार्‍या विधानाची सत्यासत्यता शोधताना मला मुरली मनोहर जोशींची १७ सप्टेंबर २००१ चा इंडीया टूडे मधील एक मुलाखत वाचायला मिळाली: "Astrology Course Isn't My policy. That's UGC's Baby." ती मुलाखत मुळातून वाचण्यासारखी आहे. कारण त्यात त्यांची मते स्पष्टपणे आलेली आहेत... सगळ्यात महत्वाचे म्हणणे असे आहे की, " The UGC takes independent decisions. The ministry does not order the UGC. In the NCERT, I am the chairman. In the UGC, I am nobody." त्या व्यतिरीक्त असेही दिसले की हे कोर्सेस "आर्टच्या" यादीत आहेत, "सायन्सच्या" नाही. त्यांचे एक म्हणणे मला तर अजूनच पटले (आणि मजेदार वाटले) की मार्क्सवाद हा चुकीचा ठरला तरी देखील तो आपल्याकडील विद्यापिठात का शिकवला जातो? (हा प्रतिवाद त्यांनी ज्योतिष शिकवण्याच्या संदर्भात केलेला नसून मार्क्सवादी नेते त्यांच्याविरोधात जे काही ओरडत होते त्यासंदर्भात केलेला दिसला. आता घटकाभर असे समजूयात की मनुष्यबळ विकासमंत्री या नात्याने त्यांनी मनुष्यबळ विकास खात्याच्या अख्त्यारीतील युजिसीवर छुपा दबाव आणला... राजकारणात असे सहजशक्य आहे. पण मग याचीच corollary काय ठरू शकते? की गेल्या ८-९ वर्षात युपिएचे राज्य आल्यापासून ज्योतिषशास्त्र शिकवणे हे युजिसीने बंद करायला हवे (कारण आताचे मनुष्यबळ विकास मंत्री आणि त्यांचा पक्ष हा पुरोगामी तसेच सेक्यूलर आहे). पण दिसते भलतेच... आजही अनेक (मनुष्यबळ विकास खात्याच्या अख्त्यारीतील) युजीसीमान्य विद्यापिठात ज्योतिषशास्त्र विषयात एम एच काय अगदी पिएचडी पण करता येते? अजून एक गंमत म्हणजे डॉ. नारळीकर (ज्यांच्याबद्दल मला नितांत आदर आहे आणि ज्यांच्या लेखनाचा मी पंखा आहे) ते त्यांच्या एप्रिल २०१३ च्या An Indian Test of Indian Astrology लेखात लिहीतात, "Its main government funding agency, the University Grants Commission, provides support for BSc and MSc courses in astrology in Indian universities". पण खाली दिलेली सुची पाहीलीत तर लक्षात येईल की शास्त्रातील पदवी कोणतेच विद्यापिठ देत नाही, मग डॉ. नारळीकरांसारखी शास्त्रज्ञ व्यक्ती असे खातरजमा न करता कसे लिहीते?
ज्योतिषशास्त्रात पदवी आणि पदव्योत्तर अभ्यासक्रम असलेली युजीसीमान्य विद्यापिठे: Rajasthan Vidyapeeth, Udaipur, (One year diploma course in Bharatiya Jyotish). Maharishi Mahesh Yogi Vedic Vishwavidyalaya, Jabalpur (One year B.A./M.A. /Ph.D. in Astrology). Vikram University, Ujjain (Paper in Astrology and M.A. in Sanskrit). Chaudhary Charan Singh University, Meerut (Taught in Sanskrit Department) M.S.University, Baroda (Research work in Astrology). Kavikulaguru Kalidas Sanskrit University (Courses in Jyotish Shastra known as Vedanga Jyotish). North-Gujarat University, Patan, Gujarat ( 2 years graded course in Vedic Astrology by conducting week and classes). P.S. Telugu University, Hyderabad (has a strong Department of Vedic Astrology running M.A. in Astrology through correspondence) Awadesh Pratap University, Rewa, M.P. (B.A. (Sanskrit), Jyotish, M.A. (Acharya) Jyotish). Gurukul Kangri Vishwavidyalaya, Haridwar (Vedic) Kameshwara Singh Darbhanga Sanskrit University, Darbhanga (B.A, (Sanskrit) Jyotish, Falit Jyotish) Rashtriya Sanskrit Vidyapeeth, Tirupati (B.A.(Jyotish), M.A. (Phalita Jyotish), M.A. (Shidhanta Jyotisha). Sampuranand Sanskrit Vishwavidhalya, Varanasi Shri Jagannath Sanskrit Vishvavidyalaya, Puri Shri Lal Bahadur Shastri Rashtriya Sanskrit Vidyapeeth, New Delhi (B.A. Shastri)(Sidant Jyotish, B.A. (Falit Jyotish), M.A. Shastri Sidant Jyotish, M.A. Acharya Falit Jyotish Sree Sankaracharya University of Sanskrit, Distt. Ernakulam (M.A.Jyotisha)
मग आता ते कॉंग्रेसचे काय झाले, कम्युनिस्टांचे काय झाले, तथाकथीत सेक्यूलर विचारवंतांचे काय झाले आणि तेंव्हा सातत्याने या विषयाच्या मागे लागणार्‍या माध्यमांचे काय झाले? सगळेच भंपक झालं. असो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ग्रेटथिन्कर

धन्यवाद

अनिरुद्ध प
Fri, 12/06/2013 - 13:23 नवीन
विकासभाऊ, ईतक्या उत्क्रुष्ठ आणि प्रगल्भ माहिती साठी,निदान आतातरी,मुद्दाम हुच्च विचार करणार्याचे समाधान झाले तर ठीकच्,असो माहीतीसाठी परत अनेक धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

विकास,

श्रीगुरुजी
Fri, 12/06/2013 - 14:18 नवीन
विकास, जबरदस्त व अभ्यासू प्रतिसाद! पण डोळ्यांवर काँग्रेसी विचारांची निधर्मी झापडे बांधलेल्यांना जाग येणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

झोपलेले कोण आहे?

विकास
Fri, 12/06/2013 - 18:05 नवीन
अहो असले काँग्रेसी विचारांचे पण नसतात. काँग्रेसवाले स्वतःस विचारवंत वगैरे समजत नाहीत. स्वतःला विचारवंत म्हणवत खोटे बोलणे आणि इतरांची दिशाभूल करणे इतकाच यांचा रिकामटेकडा उद्योग असतो. खोटारडेपणा आहे झालं सगळा... असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

सिग्नाचर लाइन...

विनोद१८
गुरुवार, 12/05/2013 - 23:50 नवीन
तेच तेच वाचुन कन्टाळा आला हो म्हटले जरा काही बदल सुचवून पाहु, कदाचित दुसरे काहीच सुचत नसेल...... . मी जे बदल सुचविले त्याचा अर्थ फक्त शब्दश: तेथे वस्तुस्थितीला धरून आहे, त्याशिवाय त्या पक्षाची ओळख पूर्ण होउ शकत नाही. विनोद१८
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

तृतिय पक्ष अणि निवडणूक

तर्री
Sat, 11/02/2013 - 12:36 नवीन
दिल्ली मध्ये आम आदमी पार्टी ने चुरस निर्माण केली आहे. त्यांना चांगली मते ही मिळतील पण जागा किती मिळतील ह्या बद्दल मी शशांक आहे. भाजप निसटते बहुमत मिळवेल असा अंदाज आहे ( आणि मग आम आदमी पार्टी च्या खऱ्या अर्थाने राजकारणात प्रवेश होईल. ) १.माध्यमांचा / सेफोलोजीस्तचा कल नेहमी तिसरा पक्षाकडे (तृतीय पंथ-डोळा मिचकावून )झुकलेला असतो किंवा त्यांचा अंदाज जनता चुकवते असे वारेच वेळा दिसते. १.१ गुजराथ आणि कर्नाटक मध्ये गुपप आणि कजप यांच्या निवडणूक पूर्व जागांचे अंदाज साफ चुकले आहेत. त्यांना अपेक्षेपेक्षा जागा कमी मिळाल्या. शेवटच्या निर्णायक टप्प्यात मतदारांचा मानस बदलतो. तो बदल एक्क्षिट पोल मध्ये स्पष्ट दिसून येवू शकतो. २.अलीकडच्या काळात जनतेने "त्रिशंकू" कौल दिलेला नाही.उत्तर प्रदेश मध्ये चौरंगी लढतीमध्ये सपा मिळालेला अनेपेक्षित आणि स्पष्ट कौल अलीकडची मतदारांची मानसिकता दर्शवतो. निवडणूक पूर्व आणि नंतरचे अंदाज तेथेही चुकले. संपला निसटते बहुमत मिळेल असा अंदाज होता आणि कोन्ग्रेस व भाजप ह्याना बर्यापैकी यश मिळेल असा अंदाज होता पण ३/४ क्रमांकाच्या पक्षाची वाताहत झाली. ३.तिसऱ्या स्थानाची मते आणि जागा यांचे वर्तमान काढणे तुलनेने कठीण आहे. ज्यांना स्टतिस्टिक ह्या विषयाची ओळख आहे त्यांना ही हे जाणवेल . ४. अनपेक्षित पणे आआप दुसऱ्या स्थानावर (आणि कोन्ग्रेस स्लिपरी स्लोप मुळॅ तिसऱ्या स्थानावर ?? ) दिसेल का ? अगदीच अशक्य नाही. ५.दिल्ली मध्ये जर जनतेने कोन्ग्रेस ला तिसऱ्या जागी फेकले तर भाजप लोकसभेत २५० आणि एन डी ए २७२ जागा मिळवेल
  • Log in or register to post comments

जागा किती मिळतील ह्या बद्दल

विजुभाऊ
Sat, 11/02/2013 - 12:41 नवीन
जागा किती मिळतील ह्या बद्दल मी शशांक आहे.
तर्री भौ तो शब्द " साशंक " असा आहे हो. शशांक म्हणजे चंद्र. असो. कोणत्याही मध्यावधी निवडणूकीत बहुतेकदा विरोधी पक्षाचीच सरशी होते.
  • Log in or register to post comments

अरे होच की !

तर्री
Sat, 11/02/2013 - 13:24 नवीन
संपादित करायचे राहून गेले - बऱ्याच चुका आहेत - क्षमा असावी विजुभाऊ !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

मध्यावधी निवडणुक?

क्लिंटन
Sun, 11/03/2013 - 00:19 नवीन
इथे मध्यावधी निवडणुक नक्की कुठे होत आहे? या पाचही राज्यांमध्ये पाच वर्षे झाल्यानंतरच निवडणुक होत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा