Skip to main content

५ राज्यांच्या डिसेंबर २०१३ मधील निवडणुका

लेखक श्रीगुरुजी यांनी शुक्रवार, 01/11/2013 20:58 या दिवशी प्रकाशित केले.
नोव्हेंबर-डिसेंबर २०१३ मध्ये दिल्ली, म.प्र., छत्तीसगड, राजस्थान व मिझोराम या राज्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत. १) म.प्र. (१९८५ - काँग्रेस, १९९० - भाजप, १९९३ - काँग्रेस, १९९८ - काँग्रेस, २००३ पासून भाजप सत्तेत आहे) एकूण जागा - २३० २००८ ची परिस्थिती - भाजप (१४३), काँग्रेस (७१) २०१३ चा अंदाज - भाजप (१४८-१६०), काँग्रेस (५२-६२) http://ibnlive.in.com/news/prepoll-survey-bjp-sweeps-madhya-pradesh-may… २) छत्तीसगड (२०००- काँगेस, २००३ पासून भाजप सत्तेत आहे) एकूण जागा - ९० २००८ ची परिस्थिती - भाजप (५०), काँग्रेस (३८) २०१३ चा अंदाज - भाजप (६१-७१), काँग्रेस (१६-२४) http://ibnlive.in.com/news/prepoll-survey-bjp-set-to-rout-congress-in-c… ३) राजस्थान (१९८५ - काँग्रेस, १९९० - भाजप, १९९३ - भाजप, १९९८ - काँग्रेस, २००३ - भाजप, २००८ - काँग्रेस, २००८ पासून काँग्रेस सत्तेत आहे) एकूण जागा - २०० २००८ ची परिस्थिती - भाजप (७८), काँग्रेस (९६) २०१३ चा अंदाज - भाजप (११५-१२५), काँग्रेस (६०-६८) http://ibnlive.in.com/news/prepoll-survey-bjp-may-storm-to-power-in-raj… ४) दिल्ली (१९९३ - भाजप, १९९८ पासून काँग्रेस सत्तेत आहे) एकूण जागा - ७० २००८ ची परिस्थिती - भाजप (२३), काँग्रेस (४३) २०१३ चा अंदाज - भाजप (२२-२८), काँग्रेस (१९-२५), आम आदमी पक्ष (१९-२५) http://ibnlive.in.com/news/prepoll-survey-hung-assembly-in-delhi-as-aap… दिल्लीत अत्यंत चुरशीची स्थिती आहे. अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पक्षाने जबरदस्त आव्हान उभे केले आहे. या पक्षाची लोकप्रियता वेगाने वाढते आहे. कदाचित शेवटी या पक्षाला पूर्ण बहुमत मिळू शकेल. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीचा अंदाज - २००९ ची स्थिती - युपीए (२५५. यात काँग्रेसचा वाटा २०६), एनडीए (१६१. यात भाजपचा वाटा ११६) २०१४ चा अंदाज - युपीए (१३४-१४२. यात काँग्रेसचा वाटा ११६-१२४), एनडीए (१८७-१९५. यात भाजपचा वाटा १७१-१७९) http://ibnlive.in.com/news/big-gains-likely-for-bjp-nda-in-lok-sabha-po… काँग्रेस व पर्यायाने युपीएची जबरदस्त पीछेहाट होण्याचा अंदाज असून अनेक मित्रपक्ष व स्वकीय सोडून गेलेले असताना सुद्धा भाजप व पर्यायाने एनडीएची परिस्थिती खूपच सुधारत आहे. हाच मोदी इफेक्ट असेल का?

वाचने 60175
प्रतिक्रिया 153

प्रतिक्रिया

भाजपाला बहुमत मिळेल ही शक्यता कमी आहे. गडकरींची मनीमॅजीक चालली आणि शरदपवार भाजपच्या ताटात जाऊन बसले तर मात्र काही साम्गता येत नाही. पण बहुमत मिळाले तरी काठावरचे मिळेल भाजप आणि संघ यांची अवस्था असून अडचण नसून खोळंबा अशी झालेली आहे.

हा इंडीया-टुडेचा नवीन पोल http://indiatoday.intoday.in/story/india-today-org-poll-2014-general-el… या पोलनुसार खालील परिस्थिती असेल. १) म.प्र. - भाजप (१४०), काँग्रेस (७८) २) छत्तीसगड - भाजप (४६), काँग्रेस (४२) ३) दिल्ली - भाजप (३६), काँग्रेस (२२), आआप (८) ४) राजस्थान - भाजप (१२०), काँग्रेस (७६) झी न्यूज्-सी फोर चे अंदाज १) म.प्र. - भाजप (१००-११०), काँग्रेस (९९-१०९) २) छत्तीसगड - भाजप (४१-४६), काँग्रेस (४१-४६)

आज वानखेडेवर सामना बघण्यासाठी पप्पू आल्याआल्या लगेचच प्रेक्षकांनी "मोदी", "मोदी" अशा घोषणा सुरू केल्या. त्यानंतर बरेच इन्टरेस्टिंग ट्वीट्स पण आले. http://indiawires.com/26262/news/national/rahul-gandhi-comes-to-wankhed…

In reply to by श्रीगुरुजी

सोशल नेटवर्कींग साईटस वरचे ट्वीट आणि फिरणारे मेसेजेस हा एक निव्वळ भंपक प्रकार आहे. एखाद्या उमेदवाराची किंवा पक्षाची ईमेज तयार करण्यासाठी अशी कामे करणार्‍या बर्‍याच कंपन्या आहेत

मोदींच्या लाटेने भाजपला पूर्ण बहुमत मिळेल. जिथे भाजप नाही तिथे त्याला प्रवेश मिळेल. हे कर्नाटकात होताना मी पाहिले आहे. इतके काही अवघड नाही. फक्त निवडणूक येईपर्यंत भाजपकडून काही मोठी चूक व्हायला नको.

In reply to by arunjoshi123

सहमत आहे ! सौथ मधील स्थानिक लोकांशी पण बोलताना मोदी बाबत असलेले समर्थन वाढीस लागलेले स्पष्ट दिसते :)

मुलायमसिंग पंतप्रधान होऊ शकतात.

http://www.newsbullet.in/india/34-more/47958-abp-news-poll-predicts-bjp… या नवीन सर्वेक्षणानुसार म.प्र. मध्ये भाजप २३० पैकी १५५ जागा मिळवून पूर्ण बहुमत मिळविण्याची शक्यता आहे.

In reply to by श्रीगुरुजी

कालच्या टाईम्स ऑफ इंडियामध्ये आले होते की मोदींच्या मध्य प्रदेशातील सभांना फारशी गर्दी झाली नव्हती. पण अशा स्वरूपाची बातमी इतर कुठल्याही वर्तमानपत्रात वाचायला मिळाली नाही.मोदींच्या सभेचा फज्जा झाला तर ती वर्तमानपत्रांसाठी फार मोठी बातमी होईल आणि त्यावर भरपूर चर्वितचर्वण चालेल हे वेगळे सांगायला नकोच.या दुव्यावर मध्य प्रदेशातील सभांचे व्हिडिओ दिले आहेत.ते बघून खरोखरच गर्दी नव्हती का याची खातरजमा करायला मला वेळ मिळालेला नाही.पण त्याचबरोबर ज्योतिरादित्य शिंदे म्हणतात की मध्य प्रदेशात मोदींना बोलावावे लागले याचाच अर्थ भाजपला विजयाची खात्री नाही !! म्हणजेच मोदी भाजपची मते वाढवू शकतात हे एका परिने ज्योतिरादित्यांनी मान्यच केले की नाही? तेव्हा नक्की काय चालू आहे हे समजत नाही.

एबीपी न्यूज च्या नवीन सर्वेक्षणानुसार दिल्लीत अशी परिस्थिती असेल. भाजप - ३२, काँग्रेस - २५, आम आदमी पक्ष - १०, इतर - ३ http://indiatoday.intoday.in/story/hung-house-in-delhi-bjp-largest-part… इंडिया-टुडे च्या नवीन सर्वेक्षणानुसार दिल्लीत अशी परिस्थिती असेल. भाजप - ४०, काँग्रेस - १८, आम आदमी पक्ष - १०, इतर - २ एकंदरीत दिल्लीत काँग्रेसचा पराभव नक्की दिसतो, पण बहुमत कोणाला मिळेल हे अजून नक्की नाही.

इंडिया न्यूज-सी व्होटर च्या नवीन सर्वेक्षणानुसार दिल्लीत अशी परिस्थिती असेल. भाजप - २९, काँग्रेस - २७, आम आदमी पक्ष - १०, बसप - २, इतर - २ एकंदरीत दिल्लीत काँग्रेसचा पराभव नक्की दिसतो, पण बहुमत कोणाला मिळेल हे अजून नक्की नाही. वरील आकडे खरे ठरले तर काँग्रेसला जास्त संधी आहे. बसप काँग्रेसलाच पाठिंबा देणार (नाही दिला तर काँग्रेस ब्यूरो ऑफ इन्वेस्टिगेशनचा बडगा आहेच). इतर्/अपक्ष वगैरे काँग्रेसकडेच जातील. आआपचे काही आमदार काँग्रेसच्या गळाला लागतील. नाहीतर केजरीवालांवर काँग्रेस ब्यूरो ऑफ इन्वेस्टिगेशनच्या माध्यमातून दडपण आणून काँग्रेसलाच पाठिंबा द्यायला लावतील.

असले रीपोर्टस हे देतातच कसे या न्यूज चॅनेल्सना इन्कम टॅक्सची नोटीस पाठवावी सी बी आय चा झक्कू मागे लावावा झालंच तर विनयभंग, बला... च्या दोन चार केसेस टाकणेही सरकारला अवघड नाही

राजस्थानमधे तर वसुंधराबाईंना आताच अभिनंदनाचे संदेश यायला लागलेत म्हणे. १० डिसेंबरला शपथविधी!! यतपत तयारी चालु केलीये भाजपाने.

देशात घडलेल्या अशा कुठ्ल्या घटना आहेत , ज्याचा प्रतिकुल/अनुकूल परिनाम २०१३ मधील निवडणुकान वर होऊ शकतो?

In reply to by देव मासा

उघडकीस आलेले बरेच नवीन घोटाळे, वाढलेले दहशतवादी हल्ले, वाढलेली महागाई , वाढलेली जातीय तेढ, सरकारने निवडणुकीच्या तोंडावर जाहीर केलेले महत्वपूर्ण निर्णय ( अन्न सुरक्षा विधेयक, कसाब आणि अफजल गुरु ची फाशी ई. ) गोष्टी अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम करतील असे मला वाटते.

In reply to by देव मासा

>>> देशात घडलेल्या अशा कुठ्ल्या घटना आहेत , ज्याचा प्रतिकुल/अनुकूल परिनाम २०१३ मधील निवडणुकान वर होऊ शकतो? खालील गोष्टींचा काँग्रेससाठी अनुकूल व भाजपसाठी प्रतिकूल परीणाम होऊ शकतो. - अत्यंत स्वच्छ प्रतिमा, जागतिक कीर्तिचे अर्थतज्ज्ञ, अत्यंत कणखर, अत्यंत कार्यक्षम पण तरीही मितभाषी व नम्र असलेल्या मनमोहन सिंगांचे धडाडीचे नेतृत्व - भ्रष्टाचार व दहशतवाद याविरूद्ध त्यांनी घेतलेली अत्यंत कठोर भूमिका व त्याविरूद्ध "झिरो टॉलरन्स" धोरण - गेल्या ९-१० वर्षात न भूतो न भविष्यति अशी प्रगती करून जागतिक महासत्ता बनलेला भारत देश - जागतिक नेता म्हणून मनमोहन सिंगांना मिळालेली मान्यता व त्यांचा जगभर पसरलेला दबदबा - पाकिस्तान, चीन, श्रीलंका, बांगलादेश इ. खोडकर शेजार्‍यांवर त्यांनी बसविलेली जरब - सोनियाजींचा त्याग व त्यांची गरीब, दलित, महिला, आदिवासी, अल्पसंख्याक इ. विषयी असलेली तळमळ - राहुलजींचे सळसळते व स्फूर्तीदायी युवा नेतृत्व - भाजपचा जातीयवाद - इतर विरोधी पक्षांचा नाकर्तेपणा - सर्व जातीधर्मांना बरोबर घेऊन जाणारा, धर्मनिरपेक्ष असलेला, समाजवादी विचारांचा,गरीब, दलित, महिला, अल्पसंख्याक, आदिवासी यांच्या बाजूने लढणारा काँग्रेस पक्ष - दिग्विजयसिंग सारख्या आधुनिक चाणक्यांचे मार्गदर्शन हे सर्व मुद्दे बघितले तर २०१४ निवडणुकीत काँग्रेसला एकट्याच्या बळावर दोन तृतीयांश बहुमत मिळेल.

माझे अंदाज ऐसीवर दिले आहेत त्याचे फक्त दुवे देतो: मध्य प्रदेश छत्तीसगढ राजस्थान याव्यतिरिक्त दिल्लीमध्ये विरोधकांची मते दुभागली जाऊन काँग्रेसला निसटते बहुमत मिळेल असे वाटते.

In reply to by ऋषिकेश

इग्झिट पोल्स सत्याच्या जवळ असतील तर माझे छत्तीसगढ वगळता सगळेच अंदाज साफ चुकले आहेत :( निव्वळ आकड्यांवरून हे अंदाज बांधायला अधिक विदा हवा अशी खूणगाठ बांधली आहे.

In reply to by ऋषिकेश

काँग्रेसला निसटते बहुमत? ह्ह्पुवा! जनतेच्या सुदैवाने आणि काँग्रेसमिंध्यांच्या दुर्दैवाने काँग्रेसला निसटते बहुमत न मिळता निसटते मत मिळाले. आप की ख्वाहिश पूरी!

वोट टाकून आलो. तिन्ही पार्टीनच्या टेबलांवर सारखीच गर्दी दिसत होती. खरी परिस्थिती ८ तारखेलाच कळू शकते.

4 Dec 2013, 2035 hrs ISTTweet दिल्लीत भाजपला बहुमत मिळत नसले तरी सर्वात मोठा पक्ष ठरतोय. राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपच्या हाती सत्तेची चावी येण्याची शक्यता आहे. तर मिझोरममध्ये कॉंग्रेस बहुमताच्या जवळ पोचणार असल्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे.

चारहि राज्यात भाजप सत्तेत येइल असा माझा अन्दाज आहे. रमण सिन्ग (छत्तीसगढ), शिवराज (मप्र) आणि आता हर्षवर्धन (दिल्ली) हे चार चान्गले चेहरे भाजपाने दिले आहेत.गोव्यामधील पर्रिकरपण या यादीमध्ये येतात.

कुणीतरी त्यामिझो राम कडेही लक्ष दया हो. ते राज्यही आपल्याच देशात आहे. भले छोटे राज्य का असेना. बहुतेक तिकडे एक्झिट पोल वाले फिरकले नसणार.

In reply to by उद्दाम

चांगला जोक आणि तोही तुमच्याकडून ! असो, ते रामाला (अयोध्येच्या) वाळीत टाकले ते चांगले कि वाईट ? वाळीत टाकल्यावर भाजप धर्मनिरपेक्ष झाला का ? भाजपने रामाला वाळीत टाकायला हवे होते कि नाही ? माझे टंकनश्रम नेहमीप्रमाणे फुकट आहेत पण क्लिंटन च्या पायावर पाय ठेवून लिहित आहे. तुम्ही शेपूट घालून पळणार हे नक्की आहेच !

In reply to by इष्टुर फाकडा

ते भाजपावाल्यांना इचारा. रामाला वाळीत त्यानी टाकलं. आम्ही न्हाई. त्यान्नी आधी राम सोडला. मग ते कलम ३७० की काय ते सोडलं. भाजपाच्या सगळ्या गोष्टी आता काँग्रेससारख्याच होणार. मग सरळ भाजपा काँग्रेसातच विलिन का नाही करत? :)

In reply to by उद्दाम

काय म्हणता? ही शॉकिंग न्युज आहे(असो निदान काँग्रेससारखे अस्तिवातच नव्हता असे नाही म्हटले हे ही नसे थोडके.)

In reply to by उद्दाम

माणूस आहात का ढोल ? सोडला तरी शिव्या धरला तर कम्युनल ! विचारांमध्ये स्पष्टता आणण्यासाठी वाचन करून अभ्यास वाढवा असे नम्रपणे सुचवतो ;)

In reply to by उद्दाम

ते भाजपावाल्यांना इचारा. रामाला वाळीत त्यानी टाकलं. किमान आत्तापर्यंतच्या कागदोपत्री तरी आपले विधान चुकीचे आहे असे म्हणावे लागत आहे. २००९ च्या Party Manifesto मध्ये पृष्ठ क्रमांक ३ वर खाली "Defending the Civilisation" मध्ये "The BJP remains committed to the construction of a grand Ram Mandir at Ayodhya." असे लिहीले आहे. आता २०१४ चा Party Manifesto अजून जाहीर होयचा आहे. त्यात काय म्हणतात ते पाहूयात आणि मग बोलूयात.

In reply to by मृत्युन्जय

काँग्रेसकडे सीताराम (केसरी) तरी होते.
यावरून मिपावरच मागे लिहिलेली एक गोष्ट आठवली. ती परत एकदा लिहितो. १९९८ च्या लोकसभा निवडणुकांनंतर अटलबिहारी वाजपेयींचे सरकार सत्तेवर आले. मार्च १९९८ च्या शेवटच्या आठवड्यात त्यांच्या सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावर लोकसभेत चर्चा चालू होती. रामविलास पासवान: ये भाजपावाले बोलते है की उनके पास राम है. उनके पास राम कहा है? राम तो यहा है जनता दल मै (स्वतःला उद्देशून) त्यावर शिवसेनेचे ठाण्याचे खासदार प्रकाश परांजपे म्हणाले: अरे ये तो विलासी राम है. सच मे राम हमारे यहा ही है (राम नाईकांकडे बोट दाखवत). यावर सगळ्या सभागृहात हशा पिकला. स्वतः रामविलास पासवानांनाही हसू आवरणे कठिण गेले.

In reply to by क्लिंटन

चांगला हजरजबाबीपणा दाखवला प्रकाश परांजपे यांनी... बाकी निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता लागली आहे.

In reply to by शिद

अहो कोकणी माणूस अस्तोच हजरजबाबी ! आणि वेळेवर काका-पुतण्याचा सोगा प़कडून हृद्यसम्राटांना अपशकुन केला ती समयसूचकता ही कौतुकास्पदच म्हणायला हवी !

In reply to by क्लिंटन

९०च्या दशकात, वाजपेयी विरोधीपक्ष नेते असताना, "हम वो बदलेंगे, ये बदलेंगे..." अशा थाटात "बदल" करण्याची भाषा जोरात करत होते. तेंव्हा त्यांना एका काँग्रेसच्या मंत्र्याने/खासदाराने थांबवत (उपहासाने) विचारले, "लेकीन आप तो 'अटल' हो"... वाजपेयींनी मिष्कीलपणे त्यांच्याकडे बघत उत्तर दिले, "हां लेकीन मै बिहारी भी हूं!" दोन्ही बाजूंनी एकदम हशा पिकला!

In reply to by ग्रेटथिन्कर

या निवडणुकीच्या निकालानंतर लक्षात येईल की काँग्रेसमध्ये अजिबात 'राम' राहिलेला नाही. निकाल लागल्यावर लगेचच काँग्रेस 'हे राम' म्हणून शेवटचा 'राम' म्हणणार. अर्थात व्यक्ती गेली तरी तिचे विचार मरत नाहीत. तसेच काँग्रेस पक्ष संपला तरी काँग्रेसची "भ्रष्टाचार, लूटमार, गुन्हेगारी, देशद्रोह, जातीयवाद" इ. विचार व तत्वे राष्ट्रवादी, समाजवादी, बसपा इ. इतर पक्षांच्या माध्यमातून जिवंतच राहणार.

In reply to by विटेकर

भारतीय टीनपॉट पार्टीला फोन केला होता.. अनेक वर्ष जनतेने प्रत्येक इलेक्शनमध्ये त्यांना प्यॅक करुन त्यांच्याच घरात मूव्ह केले.. त्यामुळे त्यांनीच हा धंदा सुरु केलाय...

In reply to by ग्रेटथिन्कर

नमो नमः हुच्च विचारवन्त..... ---------^--------- *new_russian* \m/ \M/ आपली सिग्नाचर लाइन अशीच हवी हो :- आपले मत एक-धर्मनिरपेक्ष, पुरो-पुरोगामी, अती-भ्रष्टाचारशिरोमणी व सर्वात लूटारू पक्षालाच द्या.....!!!! कसे ????..... *biggrin* :-D :D +D =D :biggrin: विनोद१८

In reply to by ग्रेटथिन्कर

>>> भारतीय टीनपॉट पार्टीला फोन केला होता.. हा काय चावटपणा आहे? तुम्ही कधी काँग्रेसला काँग्रेस म्हणता, कधी भारतीय टीनपॉट पार्टी म्हणता, कधी भारतीय जमालगोटा पार्टी म्हणता तर कधी भारतीय झंगड पार्टी म्हणता. १२८ वर्षे जुन्या असलेल्या अशा वयोवृद्ध पक्षाची अशी हेटाळणी बरी नव्हे. एक काहीतरी म्हणा.

In reply to by श्रीगुरुजी

128 वर्ष जुना पक्ष पोलाद असला पाहीजे ..त्याला टीनपॉट कशाला कोण म्हणेल?.. ज्या पक्षाला फक्त २८च वर्षे झालीत आणि ज्या पक्षात सगळेच अपना हाथ जगन्नाथ पंथाचे आहेत त्यांनाच मी टीनपॉट म्हणालो...

In reply to by ग्रेटथिन्कर

>>> ज्या पक्षाला फक्त २८च वर्षे झालीत आणि ज्या पक्षात सगळेच अपना हाथ जगन्नाथ पंथाचे आहेत त्यांनाच मी टीनपॉट म्हणालो... हे वर्णन फक्त "इंदिरा काँग्रेस" म्हणजेच काँग्रेस (आय) या पक्षालाच लागू पडते. हा पक्ष तुम्ही म्हणता तेवढाच जुना आहे व "हात (दाखवून अवलक्षण)" हे त्यांचे चिन्ह असल्याने त्या पक्षात सगळेच "अपना हाथ जगन्नाथ आणि मतदारांना घाला लाथ" या पंथाचे आहेत. म्हणजे तुम्ही काँग्रेसला टिनपाट असे म्हणता तर. अगदी यथार्थ वर्णन आहे.

एबीपी न्यूज च्या सर्वेक्षणानुसार दिल्लीत शीला दीक्षीत केजरीवालांविरूद्ध निवडणूक हरण्याची शक्यता आहे. दीक्षीतांना ३१ टक्के व केजरीवालांना ३६ टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे. दिल्लीत काँग्रेस हरणार यावर विश्वास ठेवता येईल पण प्रत्यक्ष शीला दीक्षीत पडतील असे वाटत नाही. सुदैवाने तसे झालेच तर त्या राजकारणातून कायमच्या हद्दपार होतील व आआपला बहुमत न मिळतासुद्धा केजरीवाल 'मॅन ऑफ द मॅच' ठरतील.

कृपया हा धागा निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत म्हणजे निदान ९ डिसेंबर २०१३ पर्यंत तरी वाचनमात्र करू नये किंवा नष्ट करू नये ही नम्र विनंती. धागे बंद पाडणार्‍या काही नेहमीच्याच यशस्वी कलाकारांनी या धाग्यावर आपल्या नेहमीच्या शैलीत प्रतिसाद द्यायला सुरूवात केली आहे. असे प्रतिसाद देऊन त्यांनी यापूर्वी इतर अनेक धागे यशस्वीरित्या बंद पाडले आहेत. तसेच इथे होऊ नये ही अपेक्षा आहे.

In reply to by सचीन

>>> मोडी प्रधानमंत्री होवो कि शहानवाझ हुसेन वरचष्मा संघाचाच राहणार राहू देत की. संघासारखी गेली ८८ वर्षे देशाकरता सर्वस्व देणारी संघटना देशहिताचेच मार्गदर्शन करणार. "१०, जनपथ" किंवा जामा मशिदीतून होणार्‍या मार्गदर्शन वजा आदेशापेक्षा संघासारख्या देशप्रेमी संघटनेचा वरचष्मा देशहिताचा आहे.

In reply to by श्रीगुरुजी

मोदी(फेकू) हे जातीने तेली आहेत, तेली तांबोळी विधीमंडळात जाऊन तागडी तोलणार आहेत काय?, असा जातीयवादी प्रश्न टीळकांनी विचारला होता..हारेसी मानसिकता त्याच पठडीतली आहे.. प्रतिगामी हारेसेस मोदींना वापरुन ओबिसींची मते लाटू पहात आहे,मोदींना चायवाला असे प्रोजेक्ट करुन श्रमकर्यांची मते मिळवण्याचा प्रयत्न आहे ,अंतिमतः सत्ता ही तेल्या तांबोळ्यांपेक्षा साडेतीनटक्क्यांकडेच कशी राहीले हे आरेसेसवाले बघणार ..ओबिसिंनी असल्या जातीयवादी पक्षाला मतदान करु नये...

In reply to by ग्रेटथिन्कर

साडेतीन ट्क्केवाल्यांनी ( यु.पी. तलं प्रमाण १० %) सर्वात जास्त काळ प्रधानमंत्री पद उपभोगुन देखील त्यांचं समाधान होत नाहि...

कोणत्याही पक्षाची बाजू न घेता लोकांच्या बाजूने विचार केला की सरळ दिसते. कॉंग्रेस काय किंवा भाजपा काय कोणत्याही पक्षाचा उमेदवार हा स्वच्छ आणि निर्दोष नसणार ही नामुष्की आपल्यावर आली आहे, कोणताही पक्ष सत्तेत आला तर भ्रष्टाचार हा होणारच. ह्या वृत्तीचा बिमोड इतक्यात तरी होणार नाही. निवडणुकांत एवढा पैसा लावायचा, तो निवडून आल्यावर कसातरी वसूल करावा लागणारच. हे चित्र आपल्याला विधानसभांच्या, लोकसभेच्या आणि इतर निवडणुकांमध्ये देखील दिसते. म्हणून बदलाची गरज आहे. लागोपाठ तीन वेळा कॉंग्रेस इतर पक्षांबरोबर हात मिळवणी करून सत्तेवर आली. भारताची प्रगती काय, हे साऱ्यांना स्वच्छ दिसत आहे. मग जर विचार करा काहीही करून, पुन्हा कॉंग्रेस सत्तेवर आली, तर जो मतदार / नागरिक आज एवढा निराश आहे तो कॉंग्रेसच्या त्या विजयानंतर किती निराश होइल. त्याचा भारतीय निवडणुकांवर, शासनावर आणि यंत्रणेवर असणारा विश्वास उडणार नाही? पुन्हा काय म्हणून तो मत द्यायला जाईल? आणि कॉंग्रेस सारख्या पक्षाचं काय? आज त्यांची मजल जे अनेक वाईट धंदे करण्याकडे आहे ती मजल त्या पुढे किती जाईल त्याची कल्पनाच करवत नाही. भाजपची सत्ता येवो ना येवो पण निदान कॉंग्रेसला अद्दल घडविण्यासाठी तरी आणि लोकशाहीची तत्वे शाबूत राहण्यासाठी तरी कॉंग्रेसची सत्ता गेली पाहिजे.

आयबीएनच्या मतदानोत्तर चाचणीनुसार दिल्लीत अशी परिस्थिती असेल. भाजप - ३२ ते ४२, आम आदमी पक्ष - १३ ते २१, काँग्रेस - ९ ते १७ काँग्रेस तिसर्‍या क्रमांकावर असेल. एकंदरीत बरीच संदिग्ध परिस्थिती दिसत आहे. भाजपला बहुमत मिळेल किंवा सर्वात मोठा पक्ष असेल. दुसर्‍या क्रमांकावर काँग्रेस किंवा आआप असेल. दिक्षित आज्जी पडण्याची शक्यता आहे. आआपच्या मतदारांना मुख्यमंत्रीपदी केजरीवाल हवे आहेत तर पंतप्रधानपदी मोदी हवे आहेत. पप्पू आणि त्याची मम्मी कोणाच्या खिजगणीतही नाही. दिल्लीत निवडणुकीनंतर राष्ट्रपती राजवट येणार बहुतेक.

काँग्रेससाठी अत्यंत खालावलेली परिस्थिती दिसत आहे. या पार्श्वभूमीवर २०१४ साठी काँग्रेस आपल्या ठेवणीतल्या यशस्वी युक्त्या बाहेर काढणार. प्रत्येक निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस मतदारांना राखीव जागा, स्मारके, नामांतर, सवलतींचा वर्षाव, कर्जमाफी इ. अफूच्या गोळ्या निवङणुकीच्या तोंडावर मतदारांना चारून मते मिळविली जातात व नंतर पुढील चार साडेचार वर्षे मतदार त्याच धुंदीत असतात. आता पुढील काही महिन्यात मराठा, गुज्जर, जाट, मुस्लिम इ. साठी राखीव जागांचे गाजर दाखविले जाईल; आंबेडकर, अण्णाभाऊ साठे इ. ची स्मारके; पुणे विद्यापीठाचे नामांतर; आयकरात सवलती; सेवाकरात सवलती; पेट्रोल्/डिझेल/गॅस इ. भावात घट; सरकारी नोकरांना महागाई भत्त्यात वाढ; शेतकर्‍यांना कर्जमाफी इ. अफूच्या गोळ्या वाटल्या जातील. आंध्राचे विभाजन करून निदान तेलंगणातील १७ जागा तरी मिळाव्यात याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे आंध्रात दंगलीचा भडका उडून आपल्या पोळ्या भाजण्याची काँग्रेसला आयती शेकोटी मिळणार. पण सर्वात भयंकर कृती म्हणजे हैद्राबादला दोन्ही राज्यांची संयुक्त राजधानी करणे (जे दोन्ही राज्यांना मान्य होणार नाही व एक नवीन धगधगता प्रश्न निर्माण होईल) आणि दोन्ही राज्यांना ३७१ वे कलम लागू करणे ज्यामुळे इतर कोणत्याही राज्यातील लोकांना तिथे स्थायिक होता येणार नाही व तिथे स्थावर मालमत्ता घेता येणार नाही. हे कलम आधीच काश्मिर व हि.प्र., ईशान्येकडील राज्ये यांना लागू आहे व त्याचे दुष्परिणामही दिसलेले आहेत. त्यात आता अजून या २ राज्यांची भर पडणार. हैद्राबादमध्ये जागतिक व भारतातील अनेक आयटी कंपन्यांनी मोठी गुंतवणूक केली आहे. हे कलम लागू झाले तर त्यांना बाहेरून कर्मचारी आणता येणार नाहीत किंवा गाशा गुंडाळून दुसर्‍या राज्यात जावे लागेल. अंतिमतः या २ राज्यांनाच त्याचा तोटा होईल. निवडणुका जिंकण्यासाठी काँग्रेस कोणत्याही थराला जाउ शकते, अगदी देशाचे अहित होत असले तरी काँग्रेस त्याची पर्वा करत नाही.

In reply to by श्रीगुरुजी

अण्णाभाऊ साठे,आंबेडकरांचे स्मारक ही अफूची गोळी???? मग सावरकरांच्या स्मारकाला नथुगुग्गुळवटी म्हणावे का?....?...

In reply to by ग्रेटथिन्कर

अहो ते अफुची गोळी वगैरे दूर राहूंदेत. पण तुम्ही जे इतरांच्या विरोधात लिहीता ते खरे असते का खोटे त्या प्रश्नाचे उत्तर देयचे का टाळत आहात?

In reply to by श्रीगुरुजी

तुम्ही म्हणताय तसे उपाय करुन काँग्रेस आपले बुडत्याचे पाय आणखी खोलाकडे नेणार नाहि. त्यापेक्षा काँग्रेसची सारी भिस्त आता भाजप, त्यातल्यात्यात मोदी, काहि मोठी चुक करतील काय यावर असेल. शिवाय, कर्मधर्मसंयोगाने एखादी "त्यागाची" लाट निर्माण करणे शक्य असल्यास काँग्रेस तेही पडताळुन पाहिल. आता काँग्रेसची सर्वात मोठी डोकेदुखी म्हणजे काँग्रेस वगळता इतर सर्व पक्ष, इन्क्लुडींग एन.सी.पी आणि रा.ज.द., काँग्रेसचं जास्तीत जास्त नुकसान करण्याचा प्रयत्न करतील. निवडणुकीपुरतं तरी काँग्रेस वि. नॉनकाँग्रेस असा सामना असेल. दूरदृष्टीने पाहता हे राहुल गांधींच्या पथ्यावर पडेल आणि त्याची जाण सोनीयाजींना निश्चित असेल. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली अस्थीर कोईलेशन सरकार बनवण्यापेक्षा काँग्रेस समर्थीत तीसरी आघाडी किंवा राहुल गांधीच्या अविरोध नेतृत्वात प्रमुख विरोधीपक्ष अशी भुमीका सोनीया गांधी पत्करतील. त्यांचे पुढील प्रयत्न याच दिशेने असतील.

In reply to by अर्धवटराव

>>> तुम्ही म्हणताय तसे उपाय करुन काँग्रेस आपले बुडत्याचे पाय आणखी खोलाकडे नेणार नाहि. त्यापेक्षा काँग्रेसची सारी भिस्त आता भाजप, त्यातल्यात्यात मोदी, काहि मोठी चुक करतील काय यावर असेल. शिवाय, कर्मधर्मसंयोगाने एखादी "त्यागाची" लाट निर्माण करणे शक्य असल्यास काँग्रेस तेही पडताळुन पाहिल. बरोबर आहे. अजून एक कृती म्हणजे स्वतःची रेघ मोठी करण्यापेक्षा दुसर्‍याची रेघ पुसणे. गेल्या अनेक वर्षांपासून मोदींना कोणत्यातरी खटल्यात अडकविण्याचा जोरदार प्रयत्न सुरू आहे. अजून तरी त्यात यश आलेले नाही. श्रीकुमार, संजीव भट्ट, प्रदीप शर्मा अशा तुरूंगात असलेल्या अनेकांना अभय देऊन व त्यांच्याकडून मोदिंविरोधात प्रतिज्ञापत्रे घेऊन मोदींना अडकविण्याचे आजवर असंख्य प्रयत्न झाले. आता काँग्रेस ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन आपल्याकडील गुप्त माहिती कोब्रापोस्ट, गुलैल इ. टॅब्लॉईड संस्थांना लीक करून मोदींची बदनामी करण्याचा जोरदार प्रयत्न करत आहे. पुढील काही महिन्यात हे प्रयत्न वाढतील, बेसावध असलेल्या भाजप नेत्यांविरूद्ध तहलकासारखी स्टिंग ऑपरेशने करून भाजपची रेघ लहान करण्याचा प्रयत्न राहील.

In reply to by श्रीगुरुजी

भाजपा निवडणुकीच्या टायमाला राममंदिराचा मुद्दा काढतो ते काय अफूचा गोळा. निवडणुका जिंकण्यासाठी काँग्रेस कोणत्याही थराला जाउ शकते, अगदी देशाचे अहित होत असले तरी काँग्रेस त्याची पर्वा करत नाही.>>>>>>कॉंग्रेस च्या ऐवजी भाजपा वाचावे काय ?

>>> कॉंग्रेस च्या ऐवजी भाजपा वाचावे काय ? नाही. काँग्रेस ऐवजी "राष्ट्रवादी काँग्रेस", "बसप", "समाजवादी", "कम्युनिस्ट" असे वाचले तरी चालेल.