Skip to main content

तुमच्या अ‍ॅन्ड्रॉईडसाठी...

लेखक सुहास झेले यांनी शुक्रवार, 23/11/2012 16:30 या दिवशी प्रकाशित केले.
१९७३ मध्ये मार्टीन कूपरने मोबाईलचा शोध लावला. तेव्हा त्याने कल्पनादेखील केली नसेल की, हे तंत्रज्ञान इतकं झटपट प्रगत होऊ शकेल. सुरुवातीला मोठ्या लोकांची वापरायची गोष्ट म्हणून मोबाईल ओळखले जायचे. कोणाला फोन करायचा तर १५-१६ रुपये मिनिटाला द्यावे लागायचे. आज निव्वळ भारताचा विचार केला तर, लोकसंखेच्या जवळजवळ ६५ ते ७० टक्के लोकांकडे मोबाईल आहेत. ही आकडेवारी अजून मोठ्या प्रमाणात वाढली असेलच, कारण ही २०१० च्या वार्षिक अहवालानुसार केलेली पाहणी होती. असो मोबाईलच्या इतिहासावर जास्त बोलायचे नाही. आज आपण मोबाईलचा आत्मा...ऑपरेटिंग सिस्टीमबद्दल थोडे जाणून घेणार आहोत. घाबरू नका... काही लेक्चर वगैरे देत नाही. फक्त हल्ली रोजच्या वापरातली अ‍ॅन्ड्रॉईड प्रणालीसाठी, काही उपयुक्त गोष्टी जाणून घेणार आहोत. जसजसे नवीन तंत्रज्ञान आले, तसे मोबाईल प्रगत होत गेले. मोबाईल्स आता स्मार्ट फोन्स किंवा टॅब्लेट पीसी झाले. लोकांच्या गरजा बघून त्यात रोज काही ना काही बदल घडत गेले आणि त्यासाठी अनेक डेव्हलपर्स दिवसरात्र मेहनत घेत आहेत. सुरुवातीच्या काळात करवंदाची (Blackberry) ओढ असायची लोकांना, ती आजही आहे म्हणा....पण त्यांच्या डेटा सर्व्हर्सवरून झालेला वाद बघता, काही कंपन्यांनी सुरक्षेच्यादृष्टीने करवंद हद्दपार करत, स्मार्टफोन्स दिले. आता थोडी माहिती ह्या स्मार्टफोन्सला स्मार्ट बनवणाऱ्या प्रणालीची. अ‍ॅन्ड्रॉईड (Android)- इंटरनेट जगतात एकहाती वर्चस्व असणाऱ्या गुगलचा सध्याचा हुकुमाचा एक्का. गुगल सर्च, जीमेल, यु ट्यूब, ऑर्कुट, बझ्झ, अश्या एकसोएक सोयी (व्यसनं) देणाऱ्या गुगलने, २००५ साली अ‍ॅन्ड्रॉईड ही कंपनी विकत घेतली. संपूर्णतः लिनक्सवर आधारीत ही प्रणाली, खूप कमी वेळात प्रसिद्ध झाली. सध्या अ‍ॅन्ड्रॉईडची प्रणाली जेली बिन (Jelly Bean) व्हर्जन ४.१ ग्राहकांसाठी उपलब्ध आहे आणि पुढील व्हर्जनसाठी काजू कतली हे नाव देण्यासाठी कँपेन जोरदार सुरु आहे. अ‍ॅन्ड्रॉईड प्रणाली वापरायला अतिशय सोप्पी आणि ह्या प्रणालीसोबत वापरण्यास लाखो ऍप्लिकेशन्स गुगल स्टोरवर ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत
अ‍ॅन्ड्रॉईडच्या आधी सिंम्बिअन (Symbian) ही प्रणाली अनेक फोन्समध्ये वापरली जायची आणि अजूनही वापरली जाते म्हणा. पण नोकीयाने सिंम्बिअनसोबत असलेला आपला करार गेल्यावर्षी मोडीत काढला आणि त्यांनी मायक्रोसॉफ्ट प्रणाली देण्यास सुरुवात केली. तरी काही नवीन फोन्समध्ये नोकीया सिंम्बिअन देत आहेच. कारण ही प्रणाली हाताळायला सोपी आणि विविध प्रकारचे ऍप्लिकेशन्स फार कमी वेळात सिंम्बिअनसाठी उपलब्ध झाले होते. नोकीया अजून तरी एक वर्ष ही प्रणाली ग्राहकांना देणार आहे आणि त्यानंतर ते पूर्णतः विंडोज बेस्ड फोन देणार आहेत. ह्याला कारण म्हणजे अ‍ॅन्ड्रॉईड आणि सफरचंदाचे (Apple) झपाट्याने वाढणारे मार्केट. विशेषतः अ‍ॅन्ड्रॉईड, कारण ऍपल उपकरणांची किंमत तुलनेने भारतात खूप आहे, त्यामुळे खिश्याच्या दृष्टीने अ‍ॅन्ड्रॉईड परवडेबल आहे. अगदी ८--९ हजारापासून ४० हजारापर्यंत अ‍ॅन्ड्रॉईड स्मार्टफोन्स मिळतात. फार कमी वेळात गुगलने ह्या क्षेत्रात मुसंडी मारली आणि त्यामुळे सिंम्बिअनची लोकप्रियता घटू लागली. त्यामुळेच नोकियाने दुश्मन का दुश्मन दोस्त, ह्या तत्वावर सिंम्बिअन बरोबर आपला करार मोडीत काढून मायक्रोसॉफ्टशी हात मिळवणी केली. (बातमी) सध्या मायक्रोसॉफ्ट विंडोज ८.० आणि मायक्रोसॉफ्ट ऑनलाईन ऍप्लिकेशन स्टोर वर तुफान काम करत आहेत. तज्ञांचे मत जाणून घ्याल तर, पुढील एका वर्षात गुगलच्या तोडीसतोड ऍप्लिकेशन स्टोर बनवण्याचा त्यांनी चंग बांधलाय. ऍपलचे मार्केट स्टोर सुद्धा खूप मोठे आहे, पण तुलनेने त्यांची ग्राहकसंख्या भारतात कमी आहे. तरीसुद्धा अनेक क्रियेटीव्ह ऍप्लिकेशन्समुळे, त्यांनी त्यांचा वेगळेपणा स्मार्टफोन्स जगतात ठसवला आहे. (अवांतर - मी तर पंखा आहे स्टीव्ह जॉब्सचा आणि त्याच्या कंपनीच्या विविध प्रोडक्ट्सचा, पण खिश्याने दगा दिला.... असो !!) आता पुढे जे होईल ते होईल, पण तूर्तास आपण काही प्रसिद्ध अ‍ॅन्ड्रॉईड मार्केट ऍप्लिकेशन्सची माहिती करून घेऊ. मी Samsung Galaxy S II हा फोन वापरतोय. तुम्ही वापरलेल्या ऍप्लिकेशन्सची माहिती लेखाच्या प्रतिसादात द्या, आणि कुठले फीचर्स तुम्हाला आवडले वगैरे सांगितले तर उत्तम. १. WhatsApp Messenger - सुरुवातीला गरीबांचा बीबीएम (BBM - BlackBerry Messanger) म्हणून अनेकांनी ह्या ऍप्लिकेशनची थट्टा उडवली, पण आज सर्वात जास्त वापरले जाणारे ऍप्लिकेशन म्हणून ह्याची नोंद आहे. हे ऍप तुम्ही सिंम्बिअन, ब्लॅकबेरी, ऍपल आणि अ‍ॅन्ड्रॉईड अश्या सर्व प्रणालीवर वापरता येते. इंटरनेटच्या सहाय्याने तुमचा मोबाईल नंबर वापरून तुम्ही जगात कोणाशीही संवाद साधू शकता आणि तेही फुकट. २. M-Indicator - मुंबईकरांसाठी हे सर्वात महत्त्वाचे ऍप. लोकल ट्रेन्सचं टाईमटेबल, मेगा ब्लॉकचे डायरेक्ट अपडेट्स, बेस्ट बसेसची माहिती, रिक्षा आणि काळ्या-पिवळ्या टॅक्सीचे दर पत्रक, मराठी नाटक आणि सिनेमांची माहिती, हिंदी सिनेमांची माहिती, भारतीय रेल्वेच्या PNR स्टेटस जाणून घेण्याची सुविधा अश्या अनेक लोकोपयोगी सुविधांमुळे हे ऍप प्रसिद्ध आहे आणि सर्वप्रकारच्या प्रणालीवर वापरता येते. ३. NewsHunt - अपडेटेड बातम्या तुम्हाला ह्या ऍपमुळे मिळू शकतील. मराठीतील सकाळ, लोकसत्ता, सामना, लोकमत आणि पुढारी ही वृत्तपत्रे तुम्ही वाचू शकता. इतर अनेक भाषांतील वृत्तपत्रेसुद्धा उपलब्ध आहेत. ४. Smart App Protector - तुम्ही वापरत असलेल्या कुठल्याही ऍप्लिकेशन्स परवलीचा शब्द लावून सुरक्षित करू शकता. ५. Wattpad - Free Books & Stories - भरपूर ई-बुक्स आणि कथा संग्रहाचा खजिना. तुम्ही पुस्तके डाऊनलोडसुद्धा करू शकता आणि ऑफलाईन वाचू शकता. ६. मराठीत टाईप करण्यासाठी - अ) GO Keyboard आणि देवनागरी प्लगईन ब) PaniniKeypad Marathi IME क) AnySoftKeyBoard - Devanagari ड) Lipikaar Hindi Keyboard Free मी चारही प्रकारच्या IME मी वापरून बघितल्या आहेत. त्यातल्यात्यात लिपिकार आणि गो कीबोर्ड आवडले. ७. Hide It Pro - तुमची प्रायव्हसी जपण्यासाठी हा एक प्रकारचा सिक्युरिटी व्हॉल्ट आहे. जिथे तुम्ही तुमच्या महत्त्वाच्या फाईल्स ठेवू शकता. ह्यालाही पासवर्ड असतो. ८. Truecaller - Global directory - नावाप्रमाणे ही एक डिरेक्टरी आहे, पण हे ऍप ऑनलाईन रजिस्टर केलेले फोन नंबर्सचा डेटा वापरते. जसे तुम्ही तुमचा नंबर सोशल साईटवर देता, हे असा डेटा जमा करतात. तसेच इंटरनेटवर स्पॅम केलेले नंबर्स दाखवून, तुम्ही त्यांना परस्पर ब्लॉक करू शकता. ९. Scan - आजवर उपलब्ध असलेला सर्वात जलद क्यूआर कोड (QR Code) स्कॅनर. १०. Justdial - ही पण एक प्रकारची लोक डिरेक्टरी, ज्यात तुम्ही आपल्या जवळपास असलेली हॉटेल्स, मॉल्स, डॉक्टर, हॉस्पिटल्स वगैरे माहिती पत्त्यासकट शोधू शकता. ११. Instagram - फोटो शेअरिंगसाठी अतिशय उपयुक्त. १२. Autodesk SketchBook Mobile - ह्या ऍपची माहिती अनलिमिटेड भटकंती करणाऱ्या पंकजने दिली. उत्तम ट्रेकर आणि फोटोग्राफर असणाऱ्या पंकजला ह्या ऍपमुळे डूडल्स रेखाटनाचासुद्धा छंद लागला. बाळासाहेब ठाकरे जेव्हा गेले, तेव्हा १० मिनिटात ह्याने श्रद्धांजली म्हणून एक डूडल काढले, जे खूप प्रसिद्ध झाले. काही डूडल्स इथे बघू शकता. १३. Misalpav - आपल्या लाडक्या मिपाचेही ऍप उपलब्ध आहे बरं :) १४. TED - Ideas worth spreading :) :) बाकी जीमेल, गुगल मॅप्स, फेसबुक, स्काईप ही नेहमीची ऍप्लिकेशन्स आहेतच, पण तुम्हाला माहित असलेली आणि तुम्ही स्वत: वापरलेली ऍप्लिकेशन्स जाणून घ्यायला आवडतील. तुमचे अनुभव नक्की शेअर करा. - सुझे !!

वाचने 448367
प्रतिक्रिया 716

प्रतिक्रिया

Kingsoft Office 5.8 (Free) तुम्हाला जर तुमच्या मोबल्यावर एमएस वर्ड आणि इतर फाईल्स उघडायच्या असतील तर हे झकास आहे. :) Titanium Backup ★ root तुम्हाला तुमच्या अ‍ॅप्सचा बॅकअप घ्यायचा आहे ? फोनचा बॅकअप घ्यायचा आहे तर हे बेस्ट हाय. :) *हे अ‍ॅप वापरण्यासाठी फोन रुट केलेला हवा. Drippler - Android Tips & Apps अ‍ॅन्ड्रॉइड मधे नविन काय चालले आहे ? नविन उपयोगी अ‍ॅप्स कोणती इ. गोष्टींची माहिती देणारे उपयोगी अ‍ॅप. :) Google Keep तुम्हाला चेकलिस्ट बनवायची आहे ?व्हॉइस नोट बनावायची आहे मग गुगलबाबाचे हे अ‍ॅप तयारच आहे. :) बीबीएम (BBM) हो,तेच ब्लॅकबेरीचे मेसेंजर आता अ‍ॅन्ड्रॉइडवर दाखल झाले आहे. सध्या रजिस्ट्रेशन जोरात असुन तुमच्या मेलवर कन्फर्मेशन आल्या शिवाय हे सुरु करता येणार नाही. हे मेल यायला सध्या बराच वेळ लागत आहे. *महत्वाची सुचना :- तुमचा बीबीएम पीन विसरु नका, तो योग्य ठिकाणी नोंदवुन ठेवा. इस्पेश्यल अ‍ॅप :- बर्‍याच अ‍ॅन्ड्रॉइड धारकांना फोन रुट करायचा असतो.पण त्यासाठी लागणारी पद्धत किंवा एपीके जालावर शोधताना घोळ होउ शकतो. पण या अ‍ॅपमुळे फोन वन क्लीक रुट करता येतो. माझा झोलो क्यु ८०० काही सेकंदाच रुट झाला. :) *** रुट करताना फोनचा डब्बा होउ शकतो,ज्यांची रिस्क घेण्याची तयारी आहे त्यांनीच या एपीकेचा उपयोग करावा. Framaroot

(१)जावा सपॉट आहे/नाही म्हणजे काय ?असल्यास फायदा काय ? (२)GPS /AGPS यापैकी कोणते सिमकाड नसतानाही चालेल ? खास GPS चे गैजेट ट्रेकिंगसाठी वापरतात तसा अॅंडरॉईड फोन उपयोगात आणायचा असल्यास .या गैजेटमध्ये चालू ठेवून रानात भटकतांना पडद्यावर रूटची एक रेष उमटत राहाते .त्याचा उपयोग करून वाट चुकल्यास मूळ जागी तरी येता येते .कोणत्या हैँडसेटमध्ये हे करता येते /येत नाही ते कोणी सांगेल का ?जागेची उंची अल्टिट्युडपण कळते .ग्रेव्हिटि सेंसर हे काम करेल का?

In reply to by कंजूस

जावा सपॉट आहे/नाही म्हणजे काय ?असल्यास फायदा काय ? Comparison of Java and Android API GPS /AGPS यापैकी कोणते सिमकाड नसतानाही चालेल ? खास GPS चे गैजेट ट्रेकिंगसाठी वापरतात तसा अॅंडरॉईड फोन उपयोगात आणायचा असल्यास .या गैजेटमध्ये चालू ठेवून रानात भटकतांना पडद्यावर रूटची एक रेष उमटत राहाते .त्याचा उपयोग करून वाट चुकल्यास मूळ जागी तरी येता येते .कोणत्या हैँडसेटमध्ये हे करता येते /येत नाही ते कोणी सांगेल का ?जागेची उंची अल्टिट्युडपण कळते .ग्रेव्हिटि सेंसर हे काम करेल का? या बद्धल जास्त माहिती नाही, पण सिमकार्ड नसल्यास GPS चालणार नाही असे वाटते. बाकी GPS Navigation साठी एक चांगले अ‍ॅप :- Sygic: GPS Navigation & Maps मी स्वतः हे अ‍ॅप अजुन वापरुन पाहिले नाही.

#मदनबाण ,नोकिआ लुमिआ ६२० हा फोन(विंडोज) वर सेव केलेल्या मैप च्या डिरेकशन रेंज नसतांनाही फक्त जिपिएस देतो असे नोकिआने म्हटले आहे तसे अॅनडरॉईड देईल का ?

In reply to by कंजूस

मदनबाण ,नोकिआ लुमिआ ६२० हा फोन(विंडोज) वर सेव केलेल्या मैप च्या डिरेकशन रेंज नसतांनाही फक्त जिपिएस देतो असे नोकिआने म्हटले आहे तसे अॅनडरॉईड देईल का ? या माहितीची लिंक द्याल का प्लीज ? नक्की काय पद्धतीने तुमचे लोकेशन फोनला समजते ते माहित करुन घ्यायला आवडेल.नेटवर्क नसताना जीपीएसला अ‍ॅक्सेस मिळु शकतो का ? आणि मिळत असेल तर कोणत्या टेक्नोलॉजीमुळे ? Sygic India: GPS Navigation यात तुम्ही ऑफलाईन मॅप्स पाहु शकता,पण ते नेव्हीगेटपण करता येतात की नाही या बद्धल साशंक आहे. { हे Works with GPS only, internet is not needed असे त्यांनी म्हंटलेले आहे.}जीपीएस बद्धल अजुन एकही अ‍ॅप मी वापरले नसल्याने त्या बद्धल अधीक माहिती नाही. वेळ मिळताच वरील अ‍ॅप वापरुन मात्र नक्की पाहिन.

फ़ोन फ़ूल रुट करायचे सॊफ्टवेअरचा पत्ता लागला तर सांगा. मला लागलाय पण फ़ोन संपूर्ण रुट होत नै वाटतं. :( कोणताही अँड्राईड फोन रुट होतो. दुवा थोड्यावेळाने अपड्वतो.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जमण्यास हरकत नसावी.माझ्या फोन चे नाव पण त्या लिस्ट मधे नव्हते बहुधा,पण रुट झाला. त्या पानावरची लेटेस्ट झीप फाइल डाउनलोड करा आणि त्यातली एपीके रन करा.

In reply to by मदनबाण

पूर्ण रुट होत नाही. प्रयोग करुन पाहिला आहे. अँड्रॉइड फोनचे फाँट बदलायचा असल्यास कोणते अ‍ॅप वापरावे ? पूर्वी मी माझा फोन रुट असल्यावर फाँट इन्स्टॉलर वापरायचो आता ते चालत नाहीहे. फोन रुट करुनही. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रथम Root Checker वापरुन फोन खरचं रुट झाला आहे का ? ते तपासुन घ्या. फॉन्ट इन्स्टॉलरचा पण प्रॉब्लेम असु शकतो, तेव्हा खालील फॉन्ट इन्स्टॉलर वापरुन पहा:- iFont(Fonts For Android) MyFont(Fonts For Android) अवांतर :- Sygic India: GPS Navigation इनस्टॉल केले,आणि ते आवडले देखील. महाराष्ट्राचा मॅप डाउनलोड मारुन ठेवला आहे,तुमच्या गरजेप्रमाणे देशातल्या कुठल्याही भागाचा / राज्याचा मॅप डाउनलोड करुन ठेवता येतो. नेटवर्क नसताना तसेच जीपीएस नसताना तुम्ही मॅप पाहु शकता.

In reply to by मदनबाण

हे बघा रुट अ‍ॅक्सेस आहे. बहुतेक फाँट इन्स्टॉलरचाच प्रॉब्लेम असावा. आता आय फाँट टाकणं आलं. -दिलीप बिरुटे

In reply to by कंजूस

कंजूस महोदय तुम्ही विचारलेल्या जीपीएस वैशिष्ठा बद्धल या रिव्हु लिंक मधे काहीच दिसले नाही. या बद्धल अधिक इथे मिळेल :- हेच सर्व तुम्हाला - Sygic India: GPS Navigation करता येईल असे दिसते... मी वरती सांगितल्या प्रमाणे हव्या त्या ठिकाणचा / राज्याचा मॅप डाउनलोड मारावा लागतो जसा मी महाराष्ट्राचा मॅप डाउनलोड मारुन ठेवला आहे. *** विशेष सुचना :- मॅपची साईझ मोठी असल्या कारणाने तो वायफाय नेटवर्क किंवा ३जी च्या सहाय्यानेच डाउनलोड मारावा.

#मदनबाण ,मला यामध्ये HERE MAPS बद्दल दिसते आहे की मैप ऑफलाईन डाऊनलोड करता येतात .नंतर त्याठिकाणी गेल्यावर NOKIA DRIVE हे GPS FREE अॅप वापरून ड्रायविँग डिरेक्शन मिळतात .दुसऱ्या एका ठिकाणी (?)हेच वाचले होतं ३जी न वापरता ऑफलाईन मैप सोबत GPS काम करते .

In reply to by कंजूस

#मदनबाण ,मला यामध्ये HERE MAPS बद्दल दिसते आहे की मैप ऑफलाईन डाऊनलोड करता येतात कुठलेही अ‍ॅप / मॅप डाउनलोड करण्यासाठी ऑनलाईन जावेच लागते. एकदाका मॅप डाउनलोड झाला की मग डेटा नेटवर्कची गऱ नाही लागत कारण तो तुमच्या फोनमधे किंवा एसडी कार्ड मधे सेव्ह झालेला असतो. दुसऱ्या एका ठिकाणी (?)हेच वाचले होतं ३जी न वापरता ऑफलाईन मैप सोबत GPS काम करते . परत तेच ! मॅक डाउनलोड करण्यासाठी किंवा त्या अ‍ॅपचा अपडेट घेण्यासाठीच फक्त नेटवर्क लागते ! इतरवेळी त्याची गरज नाही. मी जे अ‍ॅन्ड्रॉइड अ‍ॅप दिले आहे ते नोकिया अ‍ॅप प्रमाणेच चालते असे दिसते.

Framaroot लिनोव्हो आयडीया ए१००० वर तरी नाही चाललं. :(

गुगलची ओएस चांगली असली तरी फोन बनवणाऱ्या कंपन्या त्यामध्ये बरीच काटछाट करून आपला माल भरतात .ब्रैंडेड टैबलेट (आइडिआ ,रिलाअन्स वगैरे )यात ऑपरेटर कंपन्याही आणखी कापतात .वस्तु वापरायला घेतली कि कळते किती कापले आहे .

अ‍ॅन्ड्रॉईडसाठी काही नवीन भन्नाट अ‍ॅप्लीकेशन्स वगैरे काही आलंय का ? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

https://play.google.com/store/apps/details?id=com.eterno हे वापरून बघितलं का ? भन्नाट नाही पण भारतातील सगळ्या भाषेतली वर्तमानपत्रे उपलब्ध आहेत.

How to Disable SMS to MMS Conversion एसेमेस करतांना मोठा एसेमेस असला तर अ‍ॅड्राइडवर तो आपोआप एमएमस होतो ? याच्यावर काही उपाय आहे का ? 8sms (Stock Messaging, KitKat) हा उपाय आहे पण एकाच हँडसेट मधे दोन वेळेस मेसेज पाहतांना बोर होतं. काही उपाय आहे का कोणाकडे ? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सेटींग > मॅनेज अॅप > आॅल > मेसेजिंग मधे जाऊन शो नोटिफीकेशन वर अनचेक करा ...डिफाॅल्ट मेसेजींग चे नोटिफिकेशन आॅफ होईल :-)

In reply to by जोशी 'ले'

दोन मेसेजेस दिसत होते ते मात्र बंद झाले. आभार.......!!! :) बाकी, मुख्य बग कसा सोडवावा बॉ त्यावर काही मदत करता आली तर करा राव. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मुळात हा बग नाहिचये :-) हे रिस्ट्रिक्शन सर्विस प्रोव्हायडर चे आहे, cdma मधे 70 कॅरेक्टर चे लिमिट आहे, कदाचित रुटिंग करुन 'बग' टाकुन एक्सपर्टस हा प्राॅब्लम करु शकतील :-)

In reply to by जोशी 'ले'

>>> हे रिस्ट्रिक्शन सर्विस प्रोव्हायडर चे आहे, cdma मधे 70 कॅरेक्टर चे लिमिट आहे हे बरोबर आहे. पण, तीन मेसेज झाले म्हणजे ते अ‍ॅटोमॅटीक MMS होते. खरं तर रुट एक्सप्लोररने css फाईल कोणत्या तरी ठिकाणी true चे false करायचे आहे. पण, मला ते तपशिलवार नै म्हैती. मी केलं असतं पण माझ्या फोनला वरच्या वर काड्या केल्यामुळे फोन मेला की चाललो की सर्वीस सेंटरला. सर्वीस सेंटरवाला आता म्हणतो सर आपकेही फोन को कैसा प्रॉब्लेम आता समज मे नही आता. त्यामुळे मी जरा गप्प बसायचे ठरविले आहे. -दिलीप बिरुटे

सध्याचे नवं वर्जन तर कीटकॅट आहे ना , काजुकतली नाही बायदवे अड्राईड वडापाव वर्जन कसे वाटेल

सध्या Sophos Antivirus and Security वापरतोय... याचा वापर करुन फोन एनक्रीप्ट केला.त्याच बरोवर Sophos Mobile Encryption वापरुन गुगल ड्राइव्ह कनेकट करुन सिक्युअर केला. जाता जाता :- सध्या लेटेस्ट काय म्हणाल तर... hike messenger ची हवा तयार केली जात आहे असे म्हणीन.

ब्लॅकबेरी मेसेंजर (BBM for android) वापरता का कुणी? बॅटरी आणि मेमरी दोन्ही खुप खातो म्हणतात....तुम्हा सर्वांचा अनुभव काय आहे?

In reply to by सॅगी

ब्लॅकबेरी मेसेंजर (BBM for android) वापरता का कुणी? ट्राय मारले होते,एकदमच डब्बा वाटल्याने लगेचच काढुन टाकले. बॅटरी आणि मेमरी दोन्ही खुप खातो म्हणतात....तुम्हा सर्वांचा अनुभव काय आहे? माझ्या व्यक्तिगत अनुभवानुसार मेमरी खातो... बॅटरीचा सांगता येत नाही, मला वाटत तितका वेळ सुद्धा बीबीएमला माझ्या मोबल्यात मी दिला नाही.

WECHAT & LINE हे दोन अ‍ॅप्स सध्या भरपुर कार्यक्रमांना sponcer करत असतात. या अ‍ॅप्स चा INCOME SOURCE काय असेल की एवढे पैसे मार्केट मध्ये ओतणे यांना परवडत असेल??

मी माझ्या काही कोन्टॅक्ट्सना रिंग टोन सेट केला होता जो डिफॉल्ट रिंगटोन पेक्षा वेगळा होता. आता मला असे सर्‍व कॉन्टॅक्ट्सना एकच - डिफॉल्ट रिंगटोन - द्यायचा आहे, हे कसे करता येइल? नक्की कुणाकुणाचे वेगळे आहेत हे कसे शोधावे ? i have "Me" as a contact in my address book, i tried to set ringtone there but that did not change all these ring tones that i had tampered with previously फोन - मायक्रोमाक्स canvas A110 jellybean

NSE MOBILE - राष्ट्रीय शेअर बाजाराचे अधिकृत अ‍ॅप. समभागांच्या किमती लाईव्ह स्ट्रीम होतात. २जी वर ही उत्तम काम करते. Moneycontrol.com - moneycontrol.com चे अधिकृत अ‍ॅप. तुमचा पोर्टफोलिओ moneycontrol.com वर असल्यास कुठुनही पाहता येतो. अर्थविषयक बातम्या पाहता येतात. CNBC TV18 आणि CNBC आवाज या चॅनेल्स चे लाईव्ह स्ट्रिमींगही पाहता येते (३जी किंवा वाय-फाय आवश्यक).

इंजिनीयर लोकांसाठी... dwg / dxf files viewer फक्त 830 Kb चे हे साॅफ्टवेअर भलतच कामाचं, यात तुम्हि Autocad च्या फाईल्स offline सुद्घा बघु शकतात ज्या तुमच्या मेमरी कार्ड मधे स्टोर्स असतील... जी सुविधा offical autodesk च्या Autocad 360 मधे नाहि "SchemataCAD viewer DWG/DXF" https://play.google.com/store/apps/details?id=com.elmer.SchemataCAD_vie…

अरे कोणी क्रुड स्केचिंग साठी एखादी अ‍ॅप सांगा ना , म्हणजे अगदी आपलं फिंगर पेंटींग असते तसे स्केचिंग (स्ट्रेस बस्टर) म्हणुन ! बघा काही मदत आपण करु शकत असल्यास :)

यंदा कालनिर्णय ने त्यांचे ऍप्लिकेशन मोफत देउ केले आहे, सईजला जरा जास्त आहे १५ एमबी , मराठी कालनिर्णयला तेवढी जागा दिली तर काय हरकत आहे , वापरायला अगदी स्मुथ आहे ,अगदी भिंती वरच्या कालनिर्णय सारखा आहे, पंचांग सकट , Reminderchi सोय आहे 5height="200" alt="1" /> 2 4 3 https://play.google.com/store/apps/details?id=com.kalnirnay.kalnirnay

नवीन काही फोन मॉडल्स किंवा काही नवीन अप्लिकेशन्स ? डाटा सोफ्टवेअर केबल नावाचं अप्लिकेशन वापर्तोय एका मोबाइल मधुन वेगाने डाटा सेंड करणारं भन्नाट अप्लिकेशन वाटलं -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ही आधी दिली आहेत की नाही ते लक्षात नाही...पण ट्राय मारावी अशी आहेत. AppLock:-हवं ते अ‍ॅप लॉक करण्यासाठी असलेल मस्त अ‍ॅप. File Hide Expert:-या अ‍ॅपचे नाव त्याचा उपयोग सांगतोय. :) AndroZip™ File Manager:-अ‍ॅन्ड्रॉइडसाठीचे 1 ZIP application and first Android archiver is with you since beginning of 2009.

https://play.google.com/store/apps/details?id=com.baloota.dumpster हे अॅप रिसायकल बिन प्रमाणे करते , हे अॅप डाऊनलोड केल्यानंतरचा सगळा डाटा जसे इमेजेस,आॅडियो, विडियो व डाॅक्युमेंट्स डिलिट झाले तर ते रिकव्हर करता येतात , रिकव्हरी साठी नेट कनेक्षन ची गरज नाहि...

In reply to by जोशी 'ले'

चांगलं वाटलं अ‍ॅप्लीकेशन. -दिलीप बिरुटे

मराठयांच्या इतिहासासंबंधी काही अ‍ॅप्स... १. दुर्ग सह्याद्री - ह्यात किल्ल्यांचे नकाशे आणि छोटीशी टीपवजा माहिती आहे. अजून पुढील वर्जन येणे बाकी आहेत. तोवर त्या त्रुटी काढल्या जातील अश्या अपेक्षा करूया. २. इतिहास मित्र - हे अ‍ॅप गुगल ड्राईव्हवर अपलोड केलेले आणि आणि सेफ आहे. काळजी करू नका. ह्यात मोडी, ऐतेहासिक नोंदी, कालगणना आणि किल्ल्यांची माहिती आहे. माझ्या मित्राने हे अ‍ॅप डेव्हलप केलंय आणि तूर्तास बेसिक लेव्हलला आहे, पण लवकरच अपडेट होणार आहे.

In reply to by सुहास झेले

ह्या दोन्ही कल्पना खूप आवडल्या. तुमच्या मित्राला अभिनंदन आणि धन्यवाद पोहोचवावे !

मी ओपन सोर्सवाला असल्याने (आणि खिसा फार गरम नसल्याने) सफरचंद,खिडक्या वगैरेच्या नादाला कधीच लागत नाही. आणि अ‍ॅप्सबद्दल म्हणाल तर गेम्सच जास्त डाउनलोड करतो पोरांना खेळायला. १.अँगी बर्ड २. कट द रोप ३. टेंपल रन सध्या वापरतोय http://swipetelecom.com/store/index.php?route=product/product&product_i…

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

अवांतर :- गेम्सच जास्त डाउनलोड करतो पोरांना खेळायला. १.अँगी बर्ड सध्या रागावलेला पक्षी एका वेगळ्याच वादात सापडला आहे ! NSA spying revelations मुळे या गेमवर सगळ्यांची नजर वळली आहे,परंतु कंपनीने या बाबत सगळ्या आरोपांचा इन्कार केला आहे. Angry Bird {चित्र जालावरुन घेण्यात आलेले आहे.} अधिक इथे :- Angry Birds firm calls for industry to respond to NSA spying revelations

मेसेंजर अ‍ॅप्सची महाप्रचंड लाट आलीय... त्यात अजून एक भर टेलिग्रामची वापरायला घेतलंय. इंटरफेस वगैरे WA सारखंच...पण डेटा इंक्रीप्शन आणि सिक्युरिटी हा त्यांचा दावा आहे. वापरतोय सध्या https://telegram.org/faq Q: How is Telegram different from WhatsApp? Unlike WhatsApp, Telegram is cloud-based and heavily encrypted. As a result, you can access your messages from several devices (including desktops!) and share an unlimited number of photos, videos and documents (doc, zip, mp3, etc). Thanks to our multi-data center infrastructure and encryption, Telegram is also faster and way more secure. On top of that, Telegram is free and will stay free — no ads, no subscription fees, forever.

In reply to by सुहास झेले

मी ऑलरेडी टेलीग्रामवर स्वीच झालोय, काही जण आधीच स्वीच झाले आहेत तर काही जण यावर विचार करत आहेत.हे व्होट्सअ‍ॅप सारखेच पण सिक्युर असल्याने स्वीच व्हायचे फायदेच आहेत. जे विचार करत आहेत त्यांच्यासाठी खाली काही दुवे देतो आणि ते वाचुन त्यांनी स्वीच व्हावे का ? यावर नक्कीच करावा. https://telegram.org/faq#q-how-secure-is-telegram https://telegram.org/faq#q-get-technical-already https://telegram.org/faq#q-how-are-secret-chats-different टेलिग्रामवाल्यांना आपल्या त्यांच्या एनक्रीप्शन बद्धल एव्हढी खात्री आहे की त्यांनी जो हे एनक्रीप्शन ब्रेक करेल त्याला $200,000. चे बक्षिस जाहीर केले आहे. व्होट्सअ‍ॅप सारखेच पण सिक्युर असल्याने स्वीच व्हायचे फायदेच आहेत.

In reply to by मदनबाण

टेलिग्रामवाल्यांना आपल्या त्यांच्या एनक्रीप्शन बद्धल एव्हढी खात्री आहे की त्यांनी जो हे एनक्रीप्शन ब्रेक करेल त्याला $200,000. चे बक्षिस जाहीर केले आहे.
रोचक. प्रयत्न करुन बघावा म्हणतो. दुवा देता येइल काय ?

In reply to by मदनबाण

याआधी टेलिग्राम वापरले नाहीये, पण ज्या पध्दतीने रिअलटाइअम ट्राफिक दाखवत आहेत ते डिक्रीप्ट करायला मजा येते आहे. बघुया काय शिकता येते ते. की शिकवायची संधी मिळते ;)

In reply to by आत्मशून्य

२-४ गोष्टी आम्हाला बी सांगा... यातल जास्त काही कळत नाही मला ! पब्लिक की आणि प्राव्हेट की इतकच काय ते माहित. ;)

आजचे अ‍ॅप :- NoRoot Firewall :-तुमचा फोन रुट केलेला नसेल तरी सुद्धा तुम्हाला फायरवॉल वापरणे या अ‍ॅपमुळे शक्य आहे. हे वापरण्यास अगदी सोप्पे आहे. तुमचा फोन जेव्हा नेटला कनेक्टेड असतो तेव्हा तुमच्या फोन मधील बरीचशी अ‍ॅप त्यांची { तुमच्या फोन मधली त्यांनी जमवलेली} माहिती बाहेर पाठवतात. तुम्हाला फक्त हव्या त्या अ‍ॅपनाच जर नेट अ‍ॅक्सेस द्यायचा असेल तर फायरवॉलचा उपयोग करता येईल. सध्या मी हे वापरत आणि याचा परफॉर्मन्स एकदम चंगा वाटला ! ;)

In reply to by रुस्तम

@ निलापी हल्ली जवळपास प्रत्येक अँन्टीव्ह्यारस {अ‍ॅन्ड्रॉइडसाठी बनवलेले} मधे हा ट्रॅक अँड फाइंडचा ऑप्शन दिलेला असतो. मात्र यासाठी सेटिंक मध्ये जाउन Device Administration मधल्या Device administrators या पर्याया जाउन त्या अ‍ॅप्लिकेशनला {अ‍ॅन्टीव्हायरस आणि तस्तम}सिलेक्ट करावे लागते. हे केल्यावर तुम्ही तुमचा फोन हरवल्यास रिमोटली त्याचा डेटा वाईप करु शकता,अलर्ट अर्लाम सुरु शकता, त्याला लोकेट करु शकता,त्याला लॉक करु शकता. विशेष सुचना :- जर अश्या प्रकारचे अ‍ॅप तुम्हाला तुमच्या फोन मधुन अनइनस्टॉल करायचे असेल तर Device administrators जाउन ते अ‍ॅप्लिकेशन अनचेक करावे लागेल {जर चेक केले असेल तर} नाहीतर हे अ‍ॅप अनइनस्टॉल होणार नाही.

फोन कुठे विसरला किंवा कुठे आहे हे शोधायचे असल्यास...जीपीएस वरून लोकेशन बरेच अचूक मिळते. तसेच फोन सायलेंट मोड वर ठेवून सापडत नसल्यास हे छोटेसे अ‍ॅप वापरुन रिंग देता येते - https://play.google.com/store/apps/details?id=com.orisyssoft.phonefinder

टेलीग्राम चा काही फीडब्याक ? वाट्सअ‍ॅप आणि टेलीग्राम यांच्यात येत्या काळात स्पर्धा लागून आपल्याला फायदाच होईल असे दिसते. काल काही तरी टेलीग्राम वर काही तरी बग आला होता आणि माझ्या काँटेक्ट लिष्ट मधे नसलेले मित्र मला अ‍ॅड झाले होते अर्थात टेलीग्रामचा त्याबद्दल युजर्सना मेसेज आला होता की आम्ही यावर काम करतोय म्हणून. बाकी वाट्सअ‍ॅप फेसबूकने घेतल्याने नवीन काय सुविधा मिळतील असे वाटते ? अँड्राईडचे काही नवे अ‍ॅप काही फंडे आले असतील तर सांगा...! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

टेलीग्राम आवडलं मला... बाकी फेसबुकने WA घेतल्यावर काही नवीन बदल अपेक्षित आहेत... आज रिलीज झालेल्या अपडेटमध्ये लास्ट सीन डिसेबल करायची प्रायव्हसी सेटिंग उपलब्ध करून देण्यात आलीय... http://maharashtratimes.indiatimes.com/infotech/mobile/whatsapp/articleshow/30844810.cms

In reply to by सुहास झेले

न्यु व्हर्जन वाट्सअ‍ॅपची लास्ट सीन डिसेबलची आयड्या आवडली. आजच ट्राय केले. ऑनलाईन हाईड झालं पाहिजे हो.:) -दिलीप बिरुटे

टेलीग्राम चे सातत्याने अपडेट येत आहेत, पूर्वी पेक्षा जरा स्लो झाले आहे असे वाटते, बहुधा युजर डाटाबेस वाढल्याने तसे होत असेल असे वाटते.

आजचे अ‍ॅप :- CM Security - Antivirus FREE वापरायला अगदी सोपे,सिस्टीमवर एकदम लाईट आणि फास्ट. यातली vulnerabilities फिक्स करण्याचा फायदा झाला,माझ्या मोबल्यात एसएमएस बद्धल असलेली vulnerabiliti याने फिक्स केली.

In reply to by जोशी 'ले'

यावर CM Security वे उत्तर होते :- The "SMS Phishing Vulnerability" means your android system has a Vulnerability(flaw), which can be used by other application on your phone to insert an incoming SMS to your inbox, the content and sender could be arbitrary, this will be very dangerous, if it's exploited by malware. And fix solution of CM Security is dynamic protection, while malware trying to use this system's flaw and send fake SMS to you, CM Security will help you to block it and remind you it's not a real SMS from the SMS's sender संदर्भ :- CM (Cleanmaster) Security - Free Antivirus APP Developed by Clean Master Team तसेच अधिक इथेही वाचता येइल :- Researcher uncovers Android SMS phishing vulnerability