Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Profile picture for user सुहास झेले
Submitted by सुहास झेले on Fri, 11/23/2012 - 16:30
१९७३ मध्ये मार्टीन कूपरने मोबाईलचा शोध लावला. तेव्हा त्याने कल्पनादेखील केली नसेल की, हे तंत्रज्ञान इतकं झटपट प्रगत होऊ शकेल. सुरुवातीला मोठ्या लोकांची वापरायची गोष्ट म्हणून मोबाईल ओळखले जायचे. कोणाला फोन करायचा तर १५-१६ रुपये मिनिटाला द्यावे लागायचे. आज निव्वळ भारताचा विचार केला तर, लोकसंखेच्या जवळजवळ ६५ ते ७० टक्के लोकांकडे मोबाईल आहेत. ही आकडेवारी अजून मोठ्या प्रमाणात वाढली असेलच, कारण ही २०१० च्या वार्षिक अहवालानुसार केलेली पाहणी होती. असो मोबाईलच्या इतिहासावर जास्त बोलायचे नाही. आज आपण मोबाईलचा आत्मा...ऑपरेटिंग सिस्टीमबद्दल थोडे जाणून घेणार आहोत. घाबरू नका... काही लेक्चर वगैरे देत नाही. फक्त हल्ली रोजच्या वापरातली अ‍ॅन्ड्रॉईड प्रणालीसाठी, काही उपयुक्त गोष्टी जाणून घेणार आहोत. जसजसे नवीन तंत्रज्ञान आले, तसे मोबाईल प्रगत होत गेले. मोबाईल्स आता स्मार्ट फोन्स किंवा टॅब्लेट पीसी झाले. लोकांच्या गरजा बघून त्यात रोज काही ना काही बदल घडत गेले आणि त्यासाठी अनेक डेव्हलपर्स दिवसरात्र मेहनत घेत आहेत. सुरुवातीच्या काळात करवंदाची (Blackberry) ओढ असायची लोकांना, ती आजही आहे म्हणा....पण त्यांच्या डेटा सर्व्हर्सवरून झालेला वाद बघता, काही कंपन्यांनी सुरक्षेच्यादृष्टीने करवंद हद्दपार करत, स्मार्टफोन्स दिले. आता थोडी माहिती ह्या स्मार्टफोन्सला स्मार्ट बनवणाऱ्या प्रणालीची. अ‍ॅन्ड्रॉईड (Android)- इंटरनेट जगतात एकहाती वर्चस्व असणाऱ्या गुगलचा सध्याचा हुकुमाचा एक्का. गुगल सर्च, जीमेल, यु ट्यूब, ऑर्कुट, बझ्झ, अश्या एकसोएक सोयी (व्यसनं) देणाऱ्या गुगलने, २००५ साली अ‍ॅन्ड्रॉईड ही कंपनी विकत घेतली. संपूर्णतः लिनक्सवर आधारीत ही प्रणाली, खूप कमी वेळात प्रसिद्ध झाली. सध्या अ‍ॅन्ड्रॉईडची प्रणाली जेली बिन (Jelly Bean) व्हर्जन ४.१ ग्राहकांसाठी उपलब्ध आहे आणि पुढील व्हर्जनसाठी काजू कतली हे नाव देण्यासाठी कँपेन जोरदार सुरु आहे. अ‍ॅन्ड्रॉईड प्रणाली वापरायला अतिशय सोप्पी आणि ह्या प्रणालीसोबत वापरण्यास लाखो ऍप्लिकेशन्स गुगल स्टोरवर ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत
अ‍ॅन्ड्रॉईडच्या आधी सिंम्बिअन (Symbian) ही प्रणाली अनेक फोन्समध्ये वापरली जायची आणि अजूनही वापरली जाते म्हणा. पण नोकीयाने सिंम्बिअनसोबत असलेला आपला करार गेल्यावर्षी मोडीत काढला आणि त्यांनी मायक्रोसॉफ्ट प्रणाली देण्यास सुरुवात केली. तरी काही नवीन फोन्समध्ये नोकीया सिंम्बिअन देत आहेच. कारण ही प्रणाली हाताळायला सोपी आणि विविध प्रकारचे ऍप्लिकेशन्स फार कमी वेळात सिंम्बिअनसाठी उपलब्ध झाले होते. नोकीया अजून तरी एक वर्ष ही प्रणाली ग्राहकांना देणार आहे आणि त्यानंतर ते पूर्णतः विंडोज बेस्ड फोन देणार आहेत. ह्याला कारण म्हणजे अ‍ॅन्ड्रॉईड आणि सफरचंदाचे (Apple) झपाट्याने वाढणारे मार्केट. विशेषतः अ‍ॅन्ड्रॉईड, कारण ऍपल उपकरणांची किंमत तुलनेने भारतात खूप आहे, त्यामुळे खिश्याच्या दृष्टीने अ‍ॅन्ड्रॉईड परवडेबल आहे. अगदी ८--९ हजारापासून ४० हजारापर्यंत अ‍ॅन्ड्रॉईड स्मार्टफोन्स मिळतात. फार कमी वेळात गुगलने ह्या क्षेत्रात मुसंडी मारली आणि त्यामुळे सिंम्बिअनची लोकप्रियता घटू लागली. त्यामुळेच नोकियाने दुश्मन का दुश्मन दोस्त, ह्या तत्वावर सिंम्बिअन बरोबर आपला करार मोडीत काढून मायक्रोसॉफ्टशी हात मिळवणी केली. (बातमी) सध्या मायक्रोसॉफ्ट विंडोज ८.० आणि मायक्रोसॉफ्ट ऑनलाईन ऍप्लिकेशन स्टोर वर तुफान काम करत आहेत. तज्ञांचे मत जाणून घ्याल तर, पुढील एका वर्षात गुगलच्या तोडीसतोड ऍप्लिकेशन स्टोर बनवण्याचा त्यांनी चंग बांधलाय. ऍपलचे मार्केट स्टोर सुद्धा खूप मोठे आहे, पण तुलनेने त्यांची ग्राहकसंख्या भारतात कमी आहे. तरीसुद्धा अनेक क्रियेटीव्ह ऍप्लिकेशन्समुळे, त्यांनी त्यांचा वेगळेपणा स्मार्टफोन्स जगतात ठसवला आहे. (अवांतर - मी तर पंखा आहे स्टीव्ह जॉब्सचा आणि त्याच्या कंपनीच्या विविध प्रोडक्ट्सचा, पण खिश्याने दगा दिला.... असो !!) आता पुढे जे होईल ते होईल, पण तूर्तास आपण काही प्रसिद्ध अ‍ॅन्ड्रॉईड मार्केट ऍप्लिकेशन्सची माहिती करून घेऊ. मी Samsung Galaxy S II हा फोन वापरतोय. तुम्ही वापरलेल्या ऍप्लिकेशन्सची माहिती लेखाच्या प्रतिसादात द्या, आणि कुठले फीचर्स तुम्हाला आवडले वगैरे सांगितले तर उत्तम. १. WhatsApp Messenger - सुरुवातीला गरीबांचा बीबीएम (BBM - BlackBerry Messanger) म्हणून अनेकांनी ह्या ऍप्लिकेशनची थट्टा उडवली, पण आज सर्वात जास्त वापरले जाणारे ऍप्लिकेशन म्हणून ह्याची नोंद आहे. हे ऍप तुम्ही सिंम्बिअन, ब्लॅकबेरी, ऍपल आणि अ‍ॅन्ड्रॉईड अश्या सर्व प्रणालीवर वापरता येते. इंटरनेटच्या सहाय्याने तुमचा मोबाईल नंबर वापरून तुम्ही जगात कोणाशीही संवाद साधू शकता आणि तेही फुकट. २. M-Indicator - मुंबईकरांसाठी हे सर्वात महत्त्वाचे ऍप. लोकल ट्रेन्सचं टाईमटेबल, मेगा ब्लॉकचे डायरेक्ट अपडेट्स, बेस्ट बसेसची माहिती, रिक्षा आणि काळ्या-पिवळ्या टॅक्सीचे दर पत्रक, मराठी नाटक आणि सिनेमांची माहिती, हिंदी सिनेमांची माहिती, भारतीय रेल्वेच्या PNR स्टेटस जाणून घेण्याची सुविधा अश्या अनेक लोकोपयोगी सुविधांमुळे हे ऍप प्रसिद्ध आहे आणि सर्वप्रकारच्या प्रणालीवर वापरता येते. ३. NewsHunt - अपडेटेड बातम्या तुम्हाला ह्या ऍपमुळे मिळू शकतील. मराठीतील सकाळ, लोकसत्ता, सामना, लोकमत आणि पुढारी ही वृत्तपत्रे तुम्ही वाचू शकता. इतर अनेक भाषांतील वृत्तपत्रेसुद्धा उपलब्ध आहेत. ४. Smart App Protector - तुम्ही वापरत असलेल्या कुठल्याही ऍप्लिकेशन्स परवलीचा शब्द लावून सुरक्षित करू शकता. ५. Wattpad - Free Books & Stories - भरपूर ई-बुक्स आणि कथा संग्रहाचा खजिना. तुम्ही पुस्तके डाऊनलोडसुद्धा करू शकता आणि ऑफलाईन वाचू शकता. ६. मराठीत टाईप करण्यासाठी - अ) GO Keyboard आणि देवनागरी प्लगईन ब) PaniniKeypad Marathi IME क) AnySoftKeyBoard - Devanagari ड) Lipikaar Hindi Keyboard Free मी चारही प्रकारच्या IME मी वापरून बघितल्या आहेत. त्यातल्यात्यात लिपिकार आणि गो कीबोर्ड आवडले. ७. Hide It Pro - तुमची प्रायव्हसी जपण्यासाठी हा एक प्रकारचा सिक्युरिटी व्हॉल्ट आहे. जिथे तुम्ही तुमच्या महत्त्वाच्या फाईल्स ठेवू शकता. ह्यालाही पासवर्ड असतो. ८. Truecaller - Global directory - नावाप्रमाणे ही एक डिरेक्टरी आहे, पण हे ऍप ऑनलाईन रजिस्टर केलेले फोन नंबर्सचा डेटा वापरते. जसे तुम्ही तुमचा नंबर सोशल साईटवर देता, हे असा डेटा जमा करतात. तसेच इंटरनेटवर स्पॅम केलेले नंबर्स दाखवून, तुम्ही त्यांना परस्पर ब्लॉक करू शकता. ९. Scan - आजवर उपलब्ध असलेला सर्वात जलद क्यूआर कोड (QR Code) स्कॅनर. १०. Justdial - ही पण एक प्रकारची लोक डिरेक्टरी, ज्यात तुम्ही आपल्या जवळपास असलेली हॉटेल्स, मॉल्स, डॉक्टर, हॉस्पिटल्स वगैरे माहिती पत्त्यासकट शोधू शकता. ११. Instagram - फोटो शेअरिंगसाठी अतिशय उपयुक्त. १२. Autodesk SketchBook Mobile - ह्या ऍपची माहिती अनलिमिटेड भटकंती करणाऱ्या पंकजने दिली. उत्तम ट्रेकर आणि फोटोग्राफर असणाऱ्या पंकजला ह्या ऍपमुळे डूडल्स रेखाटनाचासुद्धा छंद लागला. बाळासाहेब ठाकरे जेव्हा गेले, तेव्हा १० मिनिटात ह्याने श्रद्धांजली म्हणून एक डूडल काढले, जे खूप प्रसिद्ध झाले. काही डूडल्स इथे बघू शकता. १३. Misalpav - आपल्या लाडक्या मिपाचेही ऍप उपलब्ध आहे बरं :) १४. TED - Ideas worth spreading :) :) बाकी जीमेल, गुगल मॅप्स, फेसबुक, स्काईप ही नेहमीची ऍप्लिकेशन्स आहेतच, पण तुम्हाला माहित असलेली आणि तुम्ही स्वत: वापरलेली ऍप्लिकेशन्स जाणून घ्यायला आवडतील. तुमचे अनुभव नक्की शेअर करा. - सुझे !!
  • Log in or register to post comments
  • 447152 views

प्रतिक्रिया

Profile picture for user सुहास झेले

Submitted by सुहास झेले on गुरुवार, 04/04/2013 - 14:24

In reply to एक अज्ञ प्रष्न by सुप्रिया

Permalink

सुप्रियाजी,

सुप्रियाजी, नोकिया सी५ मध्ये सिम्बिअन ओएस आहे. मिपा अ‍ॅप तूर्तास अ‍ॅन्ड्रॉईडसाठी आहे. तुम्हाला ब्राउजरमध्येच मिपा वाचता येईल आणि सिम्बिअनसाठी अ‍ॅप असेल तर नीलकांत त्याबद्दल जास्त माहिती देऊ शकेल...
  • Log in or register to post comments

Submitted by सुप्रिया on गुरुवार, 04/04/2013 - 15:56

In reply to सुप्रियाजी, by सुहास झेले

Permalink

माहितीबद्द्ल आभार

माहितीबद्द्ल आभार. पण ब्राउजरमध्ये मिपा नीट वाचता येत नाही. म्हणजे अक्षरं नीट दिसत नाहीत. त्याला काहि उपाय आहे का?
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास झेले

Submitted by सुहास झेले on गुरुवार, 04/04/2013 - 19:09

In reply to माहितीबद्द्ल आभार by सुप्रिया

Permalink

ऑपेरामध्ये मराठी उत्तम दिसतं.

ऑपेरामध्ये मराठी उत्तम दिसतं. तुम्ही कुठला ब्राऊजर वापरत आहात?
  • Log in or register to post comments

Submitted by सुप्रिया on Fri, 04/05/2013 - 10:55

Permalink

अच्छा....

आजच ऑपेराडाउनलोड करते. आभारी आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by ईन्टरफेल on Fri, 04/05/2013 - 20:55

Permalink

सर्वांचे आभार !

पन मला एक प्रोब्लेम आहे ! माझा देखिल अ‍ॅन्ड्रॉईड मो. आहे पन मि कुनाला फोन केला तर समोरच्या व्यक्तिने फोन कट नाहि केला तर मला जादा बिल येते ! मला फोन कट करायचा म्हन्टले कि खुप शोधा शोध करावि लागते ! एका बट्नात डिस्कनेक्ट व्हायला पाहिजे ! ते होइल का ?
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास झेले

Submitted by सुहास झेले on Sat, 04/06/2013 - 10:52

In reply to सर्वांचे आभार ! by ईन्टरफेल

Permalink

सेटिंग्जमध्ये जाऊन > कॉल >

सेटिंग्जमध्ये जाऊन > कॉल > कॉल आन्सरिंग/एंडिंग > पॉवर की टू एंड कॉल
  • Log in or register to post comments

Submitted by अश्फाक on Mon, 04/08/2013 - 21:18

In reply to सेटिंग्जमध्ये जाऊन > कॉल > by सुहास झेले

Permalink

१ नं

मि सुध्दा हैरान होतो फार उपयोग झाला,धन्यवाद .
  • Log in or register to post comments

Submitted by ईन्टरफेल on Tue, 07/09/2013 - 20:34

In reply to सेटिंग्जमध्ये जाऊन > कॉल > by सुहास झेले

Permalink

धन्यवाद मन ......जमले एकदाचे

धन्यवाद मन ......जमले एकदाचे
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Sat, 04/06/2013 - 10:23

Permalink

काही नविन अ‍ॅप्स :-FREE Hindi

काही नविन अ‍ॅप्स :- FREE Hindi Radio Stations :- कालच हे अ‍ॅप ट्राय मारले, ठीक वाटले.काही निवडक स्टेशन्स आहेत्,साउंड क्वालिटी छान वाटली. UltraChron Stopwatch Lite :- एक उपयोगी स्टॉपवॉच अ‍ॅप रुट केलेल्या फोनसाठी काही अ‍ॅप्स :- Android Firewall :- एक सोप्पी फायरवॉल. CacheMate for Root Users Free :- कॅश क्लिअर करण्यासाठी एक उत्तम अ‍ॅप्,एसडी कार्ड वरील कॅश सुद्धा क्लिअर करते. SD-Booster :- एसडी कार्डचा स्पीड ४०% वाढतो असा दावा हे करते,मला तरी फरक तसा समजला नाही,पण उपयोगी. SD Maid - System cleaning tool :- एक पॉवरफुल क्लिनींग टुल्,शिवाय इतर काही टुल्स सुद्धा या अ‍ॅप मधे आहेत. CacheMate for Root Users Free :- कॅश क्लीन करायचे एक अजुन उत्तम अ‍ॅप Swapper for Root :- एसडी कार्डची पार्टीशन शिवाय स्वॅप स्पेस करता येते. Android Assistant :- १८ फिचर्स असलेले हे टुल उपयोगी आहे. Wifi Signal Speed Booster:- वायफायचा सिग्नल बुस्ट होतो असा या अ‍ॅपचा दावा आहे,मला तरी विशेष फरक जाणवला नाही,तरी ट्राय मारुन पाहायला हरकत नाही. Network Info II :- तुमच्या नेटवर्कची सगळी माहिती मिळवण्यासाठी एक सोप्पे आणि उपयोगी अ‍ॅप. CPU tuner (Rooted phones):- तुमच्या फोनच्या CPU ला ओव्हरक्लॉक करण्यासाठीचे सोप्पे अ‍ॅप. FasterFix :-तुमच्या जीपीएसची क्षमता वाढवते. मी तरी अजुन वापरुन पाहिले नाही,नुसतेच लोड करुन ठेवले आहे. Smart Time Sync :- अ‍ॅन्ड्रॉइडची वेळ अचुक करते.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sun, 04/07/2013 - 09:56

In reply to काही नविन अ‍ॅप्स :-FREE Hindi by मदनबाण

Permalink

मस्त दुवे

फ्री रेडियो मस्त. बाकी सोसो. पण, माहितीबद्दल धन्स. अजून येऊ दे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by दिपक on Sat, 05/04/2013 - 12:38

In reply to काही नविन अ‍ॅप्स :-FREE Hindi by मदनबाण

Permalink

मस्त

मस्त रे बाणा! पण रेडियो मध्ये "TuneIn Radio" ला पर्याय नाही. मस्तच आहे. Pro वर्झन मध्ये रेकॉडींग चे फि़चर आहे. कालच फोन रुट केला. Gemini Backup आणि Titanium Backup ने बरेचसे चांगले काम केले आहे. रुट फोनसाठी चांगले ऍप्स सुचवा !
  • Log in or register to post comments

Submitted by jaypal on Wed, 05/15/2013 - 13:32

In reply to काही नविन अ‍ॅप्स :-FREE Hindi by मदनबाण

Permalink

पीसी रेडीओ

PC radio नक्की वापरुन पहा ऑडीओ क्वालीटी आपुन तो एकदम फिदा हो गयेला है
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद on Sun, 04/07/2013 - 05:04

Permalink

हिंदी किंवा मराठी भाषा ४ आय

हिंदी किंवा मराठी भाषा ४ आय सी एस किंवा जेली बीन वर चालते का? म्हणजे एस एम एस पण दिसतात का? की फक्त चौकोनच दिसतात? असल्यास सॅमसंग एस २ वर चालते का? की किमान एस ३ घ्यायला हवा? मला अ‍ॅप विषयी माहिती नको आहे. फोन ने हिंदी किंवा मराठी सपोर्ट करायला हवे आहे. हिंदी किंवा मराठी सपोर्ट करणारा उत्तम फोन कोणता? (मायक्रोमॅक्स, सोनी नको आहे) कुणी माहिती देणार का?
  • Log in or register to post comments

Submitted by श्री गावसेना प्रमुख on Sun, 04/07/2013 - 09:32

In reply to हिंदी किंवा मराठी भाषा ४ आय by निनाद

Permalink

नोकीयाचा सिंबीयन बेले ओ एस

नोकीयाचा सिंबीयन बेले ओ एस असलेला कुठलाही घ्याImage removed. मराठी उत्तम प्रकारे दिसते
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sun, 04/07/2013 - 09:53

In reply to हिंदी किंवा मराठी भाषा ४ आय by निनाद

Permalink

मस्त फोन

निनाद माझी शिफारस लावा N४००. मस्त फोन. आइस्क्रिम सँडविच ऑसि. आहे. भारतीय रुपयातील किंमत ६२०० फक्त. फोनचे अवगुण : १] फोनची इंटरनल मेमरी कमी. २] जीपीएस कनेक्टला उशीर लागतो. - -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Mon, 04/08/2013 - 20:35

Permalink

हे अ‍ॅप अनेकांना आवडेल आणि

हे अ‍ॅप अनेकांना आवडेल आणि उपयोगी पडेल. Adblock Plus:- तुमच्या मोबल्यात काही अ‍ॅप्स अशी असतात की ज्यात जाहिराती असतात्,आणि त्याचा तुम्हाला कंटाळा येउ शकतो.मग या फुकट्टच्या जाहिराती घालवायच्या कशा ? त्यावर उपाय म्हणजे हे वरती सांगितलेले अ‍ॅप. गुगल प्ले मधे यावर बंदी टाकण्यात आलेली आहे,परंतु हे अ‍ॅप धोकादायक नाही.गुगलने यासाठी वेगळे कारण दिलेले आहे. या बद्धल अधिक माहिती इथे मिळेल :- http://www.theregister.co.uk/2013/03/14/adblocker_blocked_by_google_play/ तसेच जालावर देखील अधिक माहिती मिळेल. सध्या मी हे अ‍ॅप वापरतो आणि यामुळे फालतुच्या जाहिरातीं मधुन माझ्या मोबल्याला मुक्ती मिळाली आहे.याची फाईल डाउनलोड मारुन फ्लॅश मारा की काम झाले. :) ज्यांच्या मोबल्यात हे कॉनफिगर करण्यात अडचण येत असेल,तर त्यांनी खालचा दुवा वाचावा. http://adblockplus.org/en/android-config (गरज लागलीच तरच ही माहिती वापरावी.)
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदी गोपाळ on Wed, 07/10/2013 - 21:46

In reply to हे अ‍ॅप अनेकांना आवडेल आणि by मदनबाण

Permalink

आजोबा,

फ्लॅश मारणे या साठी आधी रूट करावा लागतो फोन हे कोण सांगेल :P
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on गुरुवार, 04/11/2013 - 16:49

Permalink

हे सगळ वाचल्यावर आपण या

हे सगळ वाचल्यावर आपण या क्षेत्रात अत्यंत मागासलेलो आहोत हे जाणवल.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on गुरुवार, 04/18/2013 - 17:37

Permalink

मदत

माझ्या फोनवर फोन इनकमींग कॉलच्या वेळी 0 पासून सुरुवात होत आहे. खरे तर +91असे इनकमींग कॉल यायला पाहिजे (भारतातला नंबर)पण तसे येत नाहीत. किंवा फोन नंबर सेव्ह करतांना नंबरच्या अगोदर शुन्य लावून नंबर सेव्ह करावा लागतो म्हणजे फोन येतांना ज्यांच्या नावाने फोन नंबर साठवला आहे, त्याचं नाव दिसतं नसता दिसत नाही. एस्सेमसच्या वेळी बरोबर +91................. पासून सुरुवात दिसते. [मला काय म्हणायचे आहे, ते कळले असावे] १] मला असं वाटतं हा सीमकार्डचा प्रॉब्लेम असावा. कारण दुसरे सिम टाकले तर बरोबर +९१ ने नंबर येतात. २] हा अ‍ॅन्ड्रॉईडचा बग आहे, यावर उपाय नाही. असा कोणाला काही अनुभव. काही त्यावर उपाय ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by तर्री on गुरुवार, 04/18/2013 - 19:59

Permalink

प्रा. डॉ.

मी ह्या साठी पुढील गोष्टी करतो. १. जी-मेल कॉन्टॅक्ट्स सिन्क करतो. २. डीफॉल्ट देश - भारत .
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on गुरुवार, 04/18/2013 - 21:28

In reply to प्रा. डॉ. by तर्री

Permalink

--------डीफॉल्ट देश - भारत .

--------डीफॉल्ट देश - भारत . हे कसं करायचं ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Sat, 04/20/2013 - 21:04

Permalink

(१)कार्बन लावा वगैरे फोनवाले

(१)कार्बन लावा वगैरे फोनवाले ५१२ रैम आहे सांगतात पण त्यातली म्हणे ३५० त्यांच्याच ओएसने खाल्लेली असते व वापरायला थोडीच उरते हे खरे आहे का ? (२)सोनीचा नवीन एक्सपिरिआ ई ड्यूल सिम (फास्ट गेम सोडून ) अॅन्ड्रॉईड चा आनंद देतो/देईल का ?
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sat, 04/20/2013 - 23:00

In reply to (१)कार्बन लावा वगैरे फोनवाले by कंजूस

Permalink

बरोबर.

>>>> (१)कार्बन लावा वगैरे फोनवाले ५१२ रैम आहे सांगतात पण त्यातली म्हणे ३५० त्यांच्याच ओएसने खाल्लेली असते व वापरायला थोडीच उरते हे खरे आहे का ? हो. (लावा वापरतो म्हणून) >>> सोनीचा नवीन एक्सपिरिआ ई ड्यूल सिम (फास्ट गेम सोडून ) अॅन्ड्रॉईड चा आनंद देतो/देईल का ? माहित नाही. (सोनी एक्सपिरिया माझ्याकडे नाही म्हणून) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on Fri, 04/26/2013 - 11:27

Permalink

अ‍ॅन्ड्रॉईड ४.० वर मराठी नीट

अ‍ॅन्ड्रॉईड ४.० वर मराठी नीट दिसत नाही का? (आंजावर पहाता हा प्रॉब्लेम जेलीबीन वर कसा नाहीये वगैरे स्तुतीसुमनं आहेत. पण ४.० वर कसा सोडवायचा हे लिहिलंच नाहीये.) कोणी मदत करू शकेल काय?
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदी गोपाळ on Sun, 05/12/2013 - 19:32

In reply to अ‍ॅन्ड्रॉईड ४.० वर मराठी नीट by आदूबाळ

Permalink

फोन कोणता आहे?

फोन कोणता आहे? ते सांगितलेत तर नक्की काय प्रॉब्लेम आहे ते समजते. माझ्या ४.०.क्ष वाल्या दोन्ही फोन्सवर : Galaxy Tab 7 (P3100), MMx A110 वर उत्तम दिसते.
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on Mon, 05/13/2013 - 22:52

In reply to फोन कोणता आहे? by आनंदी गोपाळ

Permalink

फोन नाही, शामसुंग ग्यालेक्षी

फोन नाही, शामसुंग ग्यालेक्षी ट्याब (नोट १०.१) आहे. पण काहीतरी जादू होऊन आपोआप जेलीबीन अपडेट झाला आणि झक्कास दिसायला लागलं मराठी...
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sat, 05/04/2013 - 09:11

Permalink

मस्त.

फोनवर जर ३जी नेट कनेक्षन असेल तर विविध दुरदर्शन वाहिन्या पाहण्यासाठी Dtv india मस्त अ‍ॅप्लीकेशन वाटलं. आता या पेक्षा उत्तम अ‍ॅप्लीकेशन असेल तर चाचणी करुन जरुर सांगा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदी गोपाळ on Sun, 05/12/2013 - 19:43

In reply to मस्त. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

प्राडॉ,

बीएसेनेल २जी वर झक्कास चालतंय माझं. मस्त अ‍ॅप आहे धन्यवाद लिंकेसाठी.
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदी गोपाळ on Sun, 05/12/2013 - 19:29

Permalink

मायक्रोमॅक्स कॅनव्हास २

आज सुटी असल्याने रिकाम्या वेळात रूट केला. पण रूट करणे खूप सोपे होते. अजून कस्टम रॉम वगैरे मारली नाही. रूट केल्यावर पहिल्यांदा सरळ Adfree नावाचे अ‍ॅप टाकले. उत्तम काम करते आहे. प्लेस्टोअर वरून सर्व अ‍ॅड ब्लॉकर्स गूगलने ब्यान केलेली आहेत. सबब ही .apk इन्स्टॉल करावी लागेल. फोन रूट नसेल तर डालो करून उपयोग नाही. MMx A110 Rooted वाल्या सम-आनंदी लोकांनी संपर्क साधावा, हे विनंती.
  • Log in or register to post comments

Submitted by मराठे on Mon, 05/13/2013 - 22:38

Permalink

मराठी टाईप करण्यासाठी तसे

मराठी टाईप करण्यासाठी तसे अनेक कीबोर्ड अ‍ॅप्स गूगलबाजारात आहेतच. पण परवाच गूगलचं स्वतःचं ट्रान्सलिटरेशनवालं की-बोर्ड अ‍ॅप उचललं. तसं तर ते हिन्दी इन्पुटसाठी असलं तरी मराठी सुद्धा छान टाईप करता येतं.
  • Log in or register to post comments

Submitted by मराठे on Mon, 05/13/2013 - 22:42

Permalink

वायबर: स्काईप सारखंच अ‍ॅप आहे

वायबर: स्काईप सारखंच अ‍ॅप आहे. पण बर्‍याच लोकांकडून चांगला रिव्हु मिळालाय.
  • Log in or register to post comments

Submitted by नानबा on Tue, 05/14/2013 - 09:34

In reply to वायबर: स्काईप सारखंच अ‍ॅप आहे by मराठे

Permalink

viber मस्तच अ‍ॅप आहे. २जी

viber मस्तच अ‍ॅप आहे. २जी वरसुद्धा व्यवस्थित कॉलता येतं. GPS वापरणार्‍यांसाठी काही कामाची अ‍ॅप्स - १. GPS Speedometer - गाडीचा वेग, कापलेले अंतर, दिशा, मार्ग इ. चा माग ठेवतं. २. GPS Essentials - GPS वापरणार्‍यांसाठी सगळ्यात जब्राट अ‍ॅप. यात बरेच ऑप्शन्स आहेत. होकायंत्राने दिशादर्शन करण्यापासून Navigation पर्यंत बर्‍याच गोष्टी आहेत. फोन्सच्या Stock Navigation पेक्षा कैक पटीने उत्तम Navigation मिळतं.
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास झेले

Submitted by सुहास झेले on गुरुवार, 05/16/2013 - 00:06

In reply to वायबर: स्काईप सारखंच अ‍ॅप आहे by मराठे

Permalink

वायबर अल्टीमेट आहे.... मी

वायबर अल्टीमेट आहे.... मी वापरतोय, पण फोनच्या बॅटरीची लागते. लगेच ड्रेन होते. :( :(
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधन वाळिंबे on Wed, 05/15/2013 - 13:11

Permalink

र र रिप्लायचा

अगदी ८--९ हजारापासून ४० हजारापर्यंत अ‍ॅन्ड्रॉईड स्मार्टफोन्स मिळतात.
हल्ली किमती कमी होत-होत ४-५ हजारापर्यंत आल्यात..!! फाईव जी यायला २०२० उजाडेल असले म्हणतात.. आपण बहुतांश सध्या २ जी वापरत असलो तरी फोर जी तरी लवकरात लवकर वापरायला मिळो.. (एयरटेलने सुरूही केलय) ते पण परवडेबल रेट मध्ये..!! :-)
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास झेले

Submitted by सुहास झेले on Fri, 05/17/2013 - 18:08

Permalink

Google Currents - एक जबरदस्त

Google Currents - एक जबरदस्त अ‍ॅप. जागतिक घडामोडी, बातम्या, काही पूर्वप्रसिद्ध निवडक लेख, खादाडी, आणि तांत्रिक जगत. प्रचंड आवडले :) :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Tue, 05/21/2013 - 10:13

Permalink

अरे नवं काही आलं का नाही.

गुगल म्याप वापरतो तेव्हा गुगल म्याप उघडल्याबरोबर कधी कधी काही हँडसेट्सवर वेटींग फॉर लोकेशन असे येते आणि म्यापवर जीपीएस कनेक्ट व्हायला उशीर लागतो किंवा होत नाही. त्यावर मी केलेला उपाय असा. गुगल प्ले Handy GPS फ्री अ‍ॅप्लीकेशन इन्ष्टॉल करतो. मोबाईल मधे इनबिल्ट असलेले YGPS अ‍ॅप्लीकेशन डिसेबल करतो. आणि ह्यांडी जीपीएस अ‍ॅप्लीकेशन सुरु करुन त्यातील सॅटेलाईट वर क्लीक केले की जीपीएस लवकर कनेक्ट होते. आणि मग गुगल म्याप सुरु करा. बाकी, काही नवीन अ‍ॅप्लीकेशन्स आले असतील तर सांगा. काल किसन शिंदे म्हणत होते की वाट्सपसारखे एक अ‍ॅप्लीकेशन हँगाऑऊट आले आहे, मी वापरुन पाहिले पण मला काय लाईक झाले नाही. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by नानबा on Tue, 05/21/2013 - 12:50

In reply to अरे नवं काही आलं का नाही. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

We Chat म्हणून एक अ‍ॅप आलं

We Chat म्हणून एक अ‍ॅप आलं आहे. व्हॉट्स अ‍ॅप सारखंच इंस्टंट मेसेंजर आहे. पण त्यात ऑडिओ मेसेजसुद्धा पाठवता येतात. म्हणजे टाईप करत बसायची पिडा नाही. आणि २जी वरसुद्धा व्हिडिओ कॉल्स करता येतात हे मला त्याचं सर्वात आवडलेलं वैशिष्ट्य.
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदी गोपाळ on Mon, 05/27/2013 - 21:41

Permalink

बिरुटे गुर्जी,

हे बघा. नुस्ता स्क्रीन ला हात लावून स्क्रीन जागा करायची आयडिया हवी होती ना? इथे आहे असे दिसते. ट्रायल वर्जन वापरून पहा, मग फुल्लॅप्स ला रिक्वेस्ट करून फुडली .apk भेटेल.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Mon, 05/27/2013 - 23:04

In reply to बिरुटे गुर्जी, by आनंदी गोपाळ

Permalink

धन्स

आमच्या मोबाईलला सपोर्ट नाय करत :( स्यामसंग,नेक्सस,आणि अन्य साठी उप्योगाचं आहे धन्स...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Fri, 12/12/2014 - 20:30

In reply to बिरुटे गुर्जी, by आनंदी गोपाळ

Permalink

सापडलं एकदाचं.

https://play.google.com/store/apps/details?id=dev.suriv.suscreen&hl=en -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by संदिप एस on गुरुवार, 05/30/2013 - 18:49

Permalink

जेलीबीन चे फायदे

मी आजच माझा एक्स्पीरीया एस जेलीबीन वर अपग्रेड केलाय, जेलीबीन चे फायदे काय काय आहेत ते सांगू शकाल का? मी स्वतः पण एक्स्प्लोअर करतोच आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Tue, 07/09/2013 - 07:44

Permalink

अ‍ॅन्ड्रॉईडसाठी नवं काही आलं

अ‍ॅन्ड्रॉईडसाठी नवं काही आलं का नाही ? आता धाग्यावर आलोच आहे तर वाट्सप साठी Z - Art for WhatsApp चांगलं आहे. मस्त पेनानं लिहिल्यासारखं लिहून WhatsApp वर चित्र पाठविता येतात. काहींच्या हँडसेटवर मराठी अक्षरं उमटत नाही तेव्हा मराठीत संदेश लिहून चित्र पाठविता येतात. माझ्या फोनमधे इंटरनल मेमरी कमी असल्यामुळे Sygic: GPS Navigation & Maps इच्छा असूनही नकाशा वापरता आलेला नाही, कोणी वापरला असेल तर अनुभव शेअर करायला विसरु नका. आणि अजून काही खास असलं तर सांगायला विसरु नका. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Wed, 07/10/2013 - 09:50

Permalink

बॅटरी सेव्ह करण्याचे एक

बॅटरी सेव्ह करण्याचे एक चांगले अ‍ॅप सध्या वापरतो आहे. GO Battery Saver
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Wed, 07/24/2013 - 13:24

Permalink

महासुविधा

आता महाराष्ट्र शासनाचे शासन निर्णय सहजपणे मोबाईलवर कळणारे महासुविधा नावाचे अ‍ॅप्लीकेशन लातुर येथील उपजिल्हाधिकारी डॉ.विकास नाईक यांनी तयार केले आहे. मला तरी ते अप्लिकेशन आवड्ले. आपल्याला आवडले तर उपजिल्हाधिकारी साहेबांना कौतुकाची पोच नक्कीच द्याल असे वाटते. Image removed. आजच्या दै.सकाळमधील बातमी यावरुनच मला हे अ‍ॅप्लिकेशन आणि साहेबांचा हा झकास उपक्रम कळला. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Mon, 10/07/2013 - 10:15

Permalink

आज एक नविन गेम देत आहे, एकदम

आज एक नविन गेम देत आहे, एकदम झकास आणि मजेदार ! रंगाचा हा खेळ अगदी मजेशीर आहे आणि डोक चालवण्यास भाग पाडणारा देखील. ५ मिलिअन पेक्षा जास्त लोकांनी हा खेळ खेळला आहे.:) खेळाचे नाव आहे :- Blendoku ( आत्ता लिंक देता येत नसल्याने कॄपया गुगल प्लेवर हा खेळ शोधावा.)
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Mon, 10/07/2013 - 10:34

In reply to आज एक नविन गेम देत आहे, एकदम by मदनबाण

Permalink

नाव वाचून सुरुवातिला वाटलं की

नाव वाचून सुरुवातिला वाटलं की हा "BINdoku" नावाचा गुगली आहे काय? पण गुगलवर बघितल्यावर खराखरा गेम आहे हे कळले. उतववून घेण्यात आला आहे ! धन्यवाद !
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Mon, 10/07/2013 - 10:47

In reply to नाव वाचून सुरुवातिला वाटलं की by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

नाव वाचून सुरुवातिला वाटलं की

नाव वाचून सुरुवातिला वाटलं की हा "BINdoku" नावाचा गुगली आहे काय? हा.हा.हा... :) उतववून घेण्यात आला आहे ! धन्यवाद ! कसा वाटला तेही कळवा...
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Mon, 10/07/2013 - 14:38

In reply to नाव वाचून सुरुवातिला वाटलं की by मदनबाण

Permalink

छान आहे. ल्बेंड उर्फ रंगछटा

छान आहे. ल्बेंड उर्फ रंगछटा क्रमाने लावाल्या कि तुम्ही यशस्वी ! रंगांधळ्या (color blind) व्यक्तींना हा खेळ खेळता येणार नाही :)
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Mon, 10/07/2013 - 17:08

Permalink

छान आहे.

छान आहे. थांकु ! :) तुम्ही कुठले वेगळे उपयोगाचे अ‍ॅप वापरत असाल तर नक्की सांगा...
  • Log in or register to post comments

Submitted by दिपक on Fri, 10/11/2013 - 12:36

Permalink

व्हॅट्स ऍप प्लस

फोन रुट केला असेल तर व्हॅट्स ऍप प्लस वापरुन बघा. बरेच फिचर्स आहेत. पण सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुमचे Online स्टेटस हाईड करु शकता. ;-)
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • पान 6
  • पान 7
  • पान 8
  • पान 9
  • …
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com