Skip to main content

टोपीवाला आणि माकड

लेखक mohite jeevan
Published on सोमवार, 28/10/2013
एक टोपीवाला शहरातून टोपी विकुण वाटेत झाडाखाली झोपलेला आसतो, झाडाखाली दुपारची विश्रांती घेत आसतो. जवळच्या झाडावर खुप माकडे खेळत आसतात, त्या झाडावरील खेळत खेळत एक माकड टोपीवाला झोपलेल्या झाडावर येते ,माकड त्या टोपीवाल्याला पाहते आणि त्याच्या आग़ांवर एक पेरु टाकते. टोपीवाला झोपेत आसतो आचानक तो जागा होतो, माकड त्याच्याकडे पाहुन दात दाखवते,टोपीवाला हातात काठी घेऊन त्या माकडाला मारायला जातो, पण आचानक ते माकड झाडांवरून खाली येते आणि टोपीवाल्याला म्हणतो, ‘का रे माकडा मला का मारतोस,मी पण तुझ्यासारखा माकडच आहे,’ ‘जा रे माकडा तुला मी काय माकड वाटलो का तुझ्यासारखा?,’टोपीवाला म्हणाला, ‘आरे विसरलास का पुर्वी तु पण माकडच होतास,’माकड म्हणाला, ‘आरे पुर्वी होतो आता नाही , आता मी बुद्धीवान मानव आहे,’टोपीवाला म्हणाला, ‘शेवटी तु आमच्याच जातीचा हो की नाय?’,माकड म्हणाले, ‘ आरे मी मानव आहे,आता विसर हे आम्ही माकड होतो ते,’टोपीवाला म्हणाला, ‘जरा आमच्यासारख माकड होऊन बघ मानवी जीवन सोडुन देशील,’माकड म्हणाला, ‘माकड होऊन काय करु, खुळ्यासारख उड्या मारु, माझ्या सारख जीवन जग़ायला नशिब लाग़ते,’ टोपीवाला म्हणाला, ‘आरे मानवा मला वाटत तुझ्या सारखा दु:खी कोणी नसेल या विश्वात, आम्ही बघ कायम आनंदात आसतो, ‘माकड म्हणाला, ‘आरे माकडा आनंद कशात आसतो हे फक्त आम्हाला माहीत आहे, ते तुझ्या सारख्या माकडाला काय माहीत,’ टोपीवाला म्हणाला, ‘मग़ आस करुया एक दिवसासाठी तु माकड हो आणि मी एक दिवसासाठी मानव होतो,’ माकड म्हणाला, ‘आरे वा तुला तर खुप डोकं आहे,’ टोपीवाला म्हणाला, ‘आरे पुन्हा तु विसरलास, पुर्वी तु सुद्धा माकड होतास,’माकड म्हणाला, दोघे ही एकमेकांच्या सहमतीने एक दिवसांसाठी एकमेकाचे रुप द्यायला तयार झाले, दुसर्या दिवशी याच ठिकानी यायचं ठरवले, थोड्याच वेळात माकड टोपीवाला झाला आणि टोपीवाला माकड. तेथुन माकड टोपीवाला होऊन निघुन ग़ेला , त्याने आजची रात्र आणि उद्याचा दिवस फिरुन काढायचे ठरवले, म्हणुन तो शहरात आला. तो खुप फीरला तरी त्याला तो एवढी माणसे आसताना त्याला कोणी ही ओळखत नव्हते, खुप लोक आसताना ही त्याला एकटा आसल्याच वाटु लाग़ले,तो बैचेन झाला, या जगात माझे कोणीच नाही आसे वाटु लाग़ले. शहरात फीरताना त्याला फुकटात काही मिळत नव्हते,काही ही खाऊ शकत नव्हता,त्याला बांधुन ठेवल्यासारखे वाटु लाग़ले. कसेबसे त्याने खिशातल पैशाचा खाऊ खाल्ले पण पोट भरले नाही. आता रात्र भटकांयचे ठरवले,पण पोलिसाच्या मारामुळे तो भटकु शकला नाही,कसेबसे रात्र काढली सकाळी उठुन काय करावे आशा विचारात तो विचार करुन करुन डोक दुखायला लाग़ले आणि त्याने सरळ शहर सोडुन तो त्या झाडाखाली आला. तिकडे तो टोपीवाला माकड होऊन हावे तसे जिवन जग़त होता,आसा आनुभव त्याने कधी ही आनुभवला नव्हता,म्हणुन तो खुप फळे खात होता,तो आता शहरापासुन दुर ग़ेलेला होता एका आशा जंगलात जेथे खुप शांतता होती ,जिकडे पाहवे तिकडे नर्सग़ होता,मानवी जीवनापासुन दूरवर होता तो. आंनदच आंनद होता चोहीकडे,तो तेथे पोहचतात त्याला कशाची आठवण नव्हती, त्याला या धरतीवरच स्वर्ग वाटत होता. त्या जंगलात त्याला एक माकडीन भेटली आणि तो तीच्या प्रेमात पडला. इकडे तो मानव झालेला माकड वैताकुन झाडाखाली त्या टोपीवाल्या माकडाची वाट पाहत होता ,सायकाळ झाली तरी तो आला नाही, रात्र झाली तरी ही तो आला नाही ,तो मानव बनलेला माकड रडु लाग़ला, आनेक दिवस तो त्या ठीकणी आला पण माकड झालेला टोपीवाला आला नाही. शेवटी तो आता विचार करुन स्वत:चे घर शोधु लाग़ला
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचन संख्या 24297
प्रतिक्रिया 27

प्रतिक्रिया

In reply to by स्पंदना

जीवन भाऊंच्या कथांचा पंखा आहे.

चला आता कुवेत मधे माकड शोधायला हवं. पण चुकुन मिळालच तरी निसर्ग काय नाय ब्वॉ! सगळिकडे रखरखीत वाळवंट

ह्ये मात्र भारी हां जीवन्राव. शेवटी माणूस माकड होउन शुकी होतो असच महनाच ना तुमाला. आगे पूजे ! ये ग ये! एखांदी चांगली कमेंट टाक येथे.

धिस टाइप ऑफ हॅकलिंग इज नॉट टॉलरेबल आय से ! नव्या होतकरु लेखकाला जर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्रा म्हणुन शवास घेवु देत नाहीत.

तसं नाही हो. मी खरंच त्यांचा पंखा आहे. लिखाणातल्या साफसफाईचा प्रश्न सोडला तर कथेचा एकंदरीत आशय चांगला आहे. कथेची मांडणीसुध्दा आवडलीच.

त्या टोपीविक्याचे माकड झालेल्या माणसाला जी माकडीण भेटली ना, ती त्याला रोज फांदीने बडवून काढायला लागली. अन त्याला ही ते आवडायला लागले. म्हणून तो परत आला नाही.

In reply to by मुक्त विहारि

हायला!! हे बराय. स्वतःच कथा लिहायच्या स्वतःच वर आणायाच्या आणी स्वतःच कूट सोडवायचं? ८०० क्लबात कसे जावे यावर १ धागा काढाच. ;)

जीमो, तुम्हालाही एखादे माकड भेटले का हो ? इथे तुम्ही आम्हाला सोडून गेलात म्हणून सगळे दु:खाने रडत आहेत. लवकर परत या आणि आमचा माकडाचा जन्म आम्हाला परत द्या.

इथे टोपीवाला आणि माकड हे २ वेगळे संस्कुतीबंध आहेत. ंटोपीवाला हा एका विशिष्ट्य बेडीत अडकला आहे.म्हणजे बघा ना, कूणाची गांधी टोपी तर कुणाची हॅट.कुणाची हिरवी तर कुणाची भगवी. पण इथे मोजींनी टोपीला कुठलाही रंग दिलेला नाही.थोडक्यात सगळ्या टोपीवाल्यांना त्यांनी एकाच सुत्रात गुंफले आहे. आणि ते सुत्र म्हणजे एखादी मुलगी असलेल्या बापाचे. आता आपण माकडाकडे वळू या. माकडांना तसा कुठलाच घर-बंध नसतो.मिळाली तर फळे नाहीतर पाने खावून पण जगू शकतात.पण शेवटी माकड झाला तरी त्याला पण संसार-सूख हवेच असणार.म्हणून शेवटी तो टोपीवाल्याला पटवून त्याच्या मुलीशी लग्न करतो आणि संसारसुखाची टोपी आपल्या स्वतःच्या डोक्यावर चढवतो. तर इथे टोपीवला मात्र जबाबदारीतून मुक्त होवून माकड-चाळे परत एकदा करायला मोकळा होतो. थोडक्यात काय तर टोपीवाला होण्या पुर्वी भरपूर माकडचाळे करून घ्या. (वरील प्रतिसाद एक पण दादा कोंडके स्टाईल वाक्य नाही.मराठी भाषा वळवावी तशी वळते,हे वेसांनल.)