Skip to main content

दिवाळी स्पेशल कट्टा..

लेखक नानबा यांनी गुरुवार, 17/10/2013 10:20 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, दिवाळी येऊ घातलीये. सुट्ट्या, फ़राळ, भटकंती किंवा आरामाचे आपापले कार्यक्रम ठरले असतील किंवा ठरू लागले असतील. सोबत एखादा दिवाळी गप्पा कट्टा झाला तर? गेल्या अचानक डोंबिवली कट्ट्याप्रमाणेच भेट, गप्पा, खाबूगिरी, अजून गप्पा, अजून खाबूगिरी असा विचार आहे. ठिकाण, तारीख, वेळ प्रतिक्रियांमध्ये चर्चा करून ठरवूया. कोणाकोणाला जमेल यायला?? समस्त मुंबई, पुणे आणि येऊ इच्छिणा-या मिपाकर मंडळींचे दिल से स्वागत आहे.

वाचने 18580
प्रतिक्रिया 87

प्रतिक्रिया

कट्टा १० तारखेला असता तर नक्कीच आलो असतो.पण १७ तारीखेला येता येणार नाही :(

In reply to by क्लिंटन

क्लिंट्या.लेका स्वत: होऊन कधीतरी एखादी तारीख सांग की. प्रत्येक वेळेस तू इतरानी ठरवलेली तारीख नाकारतोस. अवांतर : गारंबीला वकीली चांगली केली असतीस........

In reply to by विजुभाऊ

१० नोव्हेंबर नक्कीच चालेल :)
गारंबीला वकीली चांगली केली असतीस.
हे गारंबी काय आहे?

In reply to by क्लिंटन

गारंबीचा बापू नामक श्री.ना.पेंडशांची प्रसीद्द कादंब्री आहे तिच्यातले गाव. हे प्रतेक्श आहे क नाही ते माहिति नाहि.

In reply to by बॅटमॅन

गारंबी काल्पनिक गाव आहे. प्रत्यक्ष्यातलं ते गाव म्हणजे आसूद.

१० तारखेला सध्या तरी पूर्वनियोजित कार्यक्रम नाही आहे. तेव्हा कट्ट्याला यायचा प्रयत्न करेन. फक्त मध्येच काही दुसरा कार्यक्रम डोकावायला नको..

In reply to by वासु

बाकी तुम्हाला कुठे हवा आहे? "झिंबाब्वे ते झुमरीतलय्या" कुठलेही ठिकाण सुचवा. मी तर सुर्यावर पण यायला तयार आहे.

लोणावऴयात चहा वडा पण चांगला लागतो गारव्यामुळे .रेल्वेने जाता येता गप्पाही होतील . (एक कंजूस आईडिआ)

कर्जतला चालणार असेल तर मला कळवा, बाकी कुठेही असेल तरी चालेल