Skip to main content

दिवाळी स्पेशल कट्टा..

लेखक नानबा यांनी गुरुवार, 17/10/2013 10:20 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, दिवाळी येऊ घातलीये. सुट्ट्या, फ़राळ, भटकंती किंवा आरामाचे आपापले कार्यक्रम ठरले असतील किंवा ठरू लागले असतील. सोबत एखादा दिवाळी गप्पा कट्टा झाला तर? गेल्या अचानक डोंबिवली कट्ट्याप्रमाणेच भेट, गप्पा, खाबूगिरी, अजून गप्पा, अजून खाबूगिरी असा विचार आहे. ठिकाण, तारीख, वेळ प्रतिक्रियांमध्ये चर्चा करून ठरवूया. कोणाकोणाला जमेल यायला?? समस्त मुंबई, पुणे आणि येऊ इच्छिणा-या मिपाकर मंडळींचे दिल से स्वागत आहे.

वाचने 18580
प्रतिक्रिया 87

प्रतिक्रिया

कुठलाही दिवस आणि वेळ चालेल.. @ प्रथमेश, तुच साधारण दिवस आणि वेळ का नाही सांगत..

दिवस रविवार १० नोव्हेंबर ठरवला तर चालेल काय?? ठिकाण - डोंबिवली वेळ - सकाळी १०.३०-११ पर्यंत गप्पा नाष्टा कट्टा...

In reply to by नानबा

ऐला प्रथम शेट ,आमचं पैकं मुवि देणार म्हटल्यावर तुम्ही येकदम नास्टा कट्ट्यावर काय आले ब्वॉ ! म्हण्जे दुपारचं जेवण सासूकडं करायच काय आम्ही ऑं ...?

In reply to by किसन शिंदे

दिवाळीत काहीजण बाहेरगावी असतील, काहीजणांना घरात दिवाळसण असेल, या सगळ्या शक्यता गृहित धरून पुढला रविवार.

In reply to by नानबा

दिवाळीत काहीजण बाहेरगावी असतील, काहीजणांना घरात दिवाळसण असेल, या सगळ्या शक्यता गृहित धरून पुढला रविवार.
नाना, ऐन दिवाळीच्या दिवशी दुपारी झालेला कट्टा.. 1

In reply to by किसन शिंदे

भ्रमणध्वनीवर कट्ट्याची नोंद करून ठेवली आहे. सध्यातरी १० तारखेला काही पुर्वनियोजित कार्यक्रम नसल्याने कट्ट्याला यायला जमेल.

In reply to by किसन शिंदे

१ते ६ नोव्हेंबर मी असेन. त्यादरम्यान मुंबईत कट्टा असल्यास हजेरी लावण्यात येईल.

In reply to by नानबा

१० तारखेला मी पण यायचा प्रयत्न करेन. ९९% नक्की. शक्यतो ठिकाण स्टेशनजवळ हवे.आणि मेगाब्लॉकच्या वेळा सांभाळल्या जाव्यात ही अपेक्षा :)

हायला डोंबिवली चा जिल्हा पुणे येत नाही का? ;) शुभेच्छा कट्ट्यास.. - (जिथे रीक्षा नाही तिच मुंबई, बाकी सगळी उपनगरे मानणारा पक्का गिरगावकर) उपास

In reply to by तिमा

१७ तारीख जमेल का? कारण मला पण १७ तारीख योग्य वाटत आहे. कदाचित अजून एक दोघांना पण १७ तारीख कदाचित जमू शकेल...

In reply to by मुक्त विहारि

जर येणार्‍यांची संख्या वाढणार असेल तर १७ ला भेटू... किसनदेवा, १७ ला तरी या... ;)

अनिवासी असल्याने अनेकदा प्रत्यक्ष कट्यावर जाणे होत नाही मात्र वृत्तांत आवर्जून वाचला जातो , एक सल्ला असा होता की दिवाळी निमित्त संपूर्ण महाराष्ट्रातील मिपाकरांना एकत्र कट्टा करायला मिळावा म्हणून महाराष्ट्रातील एखादे नवे , उपेक्षित पण दर्जेदार पर्यटन स्थळी कट्टा सहल आयोजित केल्यास , नवीन स्थळासोबत नविन ओळखी सुद्धा वास्तविक जीवनात होतील.

सतरा चालेल, जितके जास्त सदस्य तितके चांगले. एखादा प्रायोजक भेटला तर सोन्याहून पिवळे.

कट्ट्याला हार्दिक शुभेच्छा! त्याच सुमारास मुंबईत असलो तरी १७ ला जमेल असं वाटत नाही :( - मात्र जमलंच तर नक्की हजेरी लावून जाईन. गेल्या फेरीच्या वेळी गविंनी आयोजित केलेला पॉप टेट्स, कोरम मॉलचा कट्टा अजून आठवतो.

जागा भन्नाटच आहे. पण तिकडे नंतर सविस्तर कट्टा ठेऊ. पॉपटेट्स ला जाण्याचे पॅरामीटर्स थोडे वेगळे असतात.. ;)

In reply to by नानबा

(आजकाल) पॉपटेट्स नको. तेथे पॉप संगीताचे सूर उच्चरवात चालू असतात त्यामुळे घसा फोडून बोलावे लागते वर पदार्थाचे दर दुप्पट असतात. गर्ल/ बॉय फ्रेंड बरोबर "इन"किंवा "हिप" आहोत दाखवायला ठीक आहे. "मिसळ पाव" किंवा "कट्टा" संस्कृतीशी फटकून राहणारे लोक जास्त दिसतात. असे माझे वैयक्तिक मत आहे कारण अलीकडेच तेथे जाण्याचा योग आला.

In reply to by सुबोध खरे

विक्रोळी पॉपटेट्स पासून थोडं पुढे गेलं की डाव्या हाताला कैलाश मॅन्शन म्हणून बिल्डींग आहे. तिथे साल्स पिझ्झा म्हणून आहे. पॉपटेटस सारखीच जागा, फक्त दुपारी १२ ते रात्री १२ हॅप्पी अवर्स असतात. (पॉपटेट्स मध्ये दुपारी २.४५ ते संध्याकाळी ७.१५) शिवाय पॉपटेट्स ला स्पर्धा म्हणून काढलेलं असल्यामुळे दर पॉपटेट्स पेक्षा निदान २५% स्वस्त आहेत, आणि बरीच जास्त व्हरायटीसुद्धा आहे. शिवाय कर्णकर्कश्श संगीताऐवजी मोठ्या स्क्रीनवर आवाज बंद ठेऊन क्रिकेट किंवा फूटबॉलच्या मॅचेस सुरू असतात.

In reply to by सुबोध खरे

Pop Tate's विषयी एका दर्शनात असा समज होणे साहजिक आहे. पण त्या संगीताचा त्रास नसलेला वेगळा सेक्षन असतो. बाकी इन किंवा हिप आहोत असे दाखवण्यासाठी हाही गैरसमज आहे. इथे टेस्ट अफलातून आहे. शो शा साठी जाणे हे ठिकाणावर अवलंबून नसून ते जाणार्याच्या हाती आहे.

In reply to by गवि

पण गवि, एकदा साल्स ला जाऊन बघा. पॉपटेट्स नक्की विसरायला लावेल अशी जागा आहे. टेस्ट, व्हरायटी, खिसा सगळ्या बाबतीत (सध्यातरी) साल्स बरं आहे.

In reply to by गवि

आपले म्हणणे मान्य आहे. आम्ही तेथे दुसर्याच्या आमंत्रणावर गेलो होतो आणि एकंदर रागरंग तसा दिसल्याने वरील प्रतिसाद दिला. आपण आमंत्रण दिल्यास नक्की येउन आमच्या मतात सुधारणा करण्यास आनंदच होईल.

दूरदेशी असल्याने येऊ शकत नाही आणि नेहमी नेहमी 'येऊ शकत नाही' हे सांगण्यानेही आता कानकोंडं वाटायला लागलं आहे. वृत्तांत येऊ द्यात, मन मारून वाचण्यात येईल. कट्ट्यास शुभेच्छा..!

पुण्यात पण होईल का कट्टा? मला पण मिपा कट्टा attain करायचा आहे, मी अजून एकही कट्ट्याला नाही आले. (नवर्‍याचा हात 2 महिन्यापासून प्लास्टर मध्ये आहे सो पुण्याच्या कट्टा प्रतीक्षेत), नाहीतर मी पण आले असते दिवाळी स्पेशल कट्ट्याला.

In reply to by त्रिवेणी

पुण्यात एखादा कट्टा. धागा काढा हवं तर. आणि तमाम पुणेकर मंडळींना बोलवा.. हाय काय नाय काय... ;)

In reply to by अन्या दातार

पुणे कट्टा रादर कट्टे धागा वगैरे काढून अगदी व्यवस्थित झालेले आहेत. अभ्यास काय वाढवा? बनयान ट्री नि सरुटॉबाने हे दोन आठवतातच. अर्थात हा इतिहास झाला. कधीकाळी दिल्लीवर नि अटके पार झेंडे लावलेले 'पेशवे' नंतर बेक्कार कर्जबाजारी झाले होते नि बाजारबुणग्यांच्या नादात देशोधडीला लागल्यात जमा होते हा देखील इतिहासच. (धाग्याचा काश्मिर झाला तर मला बोल लावू नयेत. बाकी आम्ही नाना फडणवीसांच्या शेजारचे तर रास्त्यांच्या गावचे बरं. ;) ;) )

In reply to by प्यारे१

पुणे कट्टा रादर कट्टे धागा वगैरे काढून अगदी व्यवस्थित झालेले आहेत
तसे एकेकाळी पुण्यात शिवाजी महाराजांचे वास्तव्य होते रे भाऊ. उगाच प्रागैतिहासिक काळातले दाखले का देताय? मुळात हल्ली पुण्यात कट्टे होतच नाहीत. वैयक्तिक भेटीगाठी रग्गड होत असतील म्हणा. त्यांना कट्टे म्हणायचे ?

एक आयडियाची कल्पना आली - कट्टा सुरू असतांनाचं व्हीडीओ शुटींग करायचं आणि निदान प्रत्येकाची ओळख त्याव्दारे करून द्यायची. बाकी मग खाद्यपदार्थ, जागा, वेळ, दिवस असे छोट-मोठे तपशील टाकल्यास हरकत नाही. मग हा व्हीडीओ तूनळीवरून इथे शेअर करायचा म्हणजे सर्व मिपाकरांना अप्रत्यक्षरित्या का होईना पण कट्टयात सामील झाल्यासारखं वाटेल :)

शक्य असेल तर कट्टा कर्जत चालेल का ??म्हणजे पुणेकरही येउ शकतिल आणि मुंबईकरही. फार्म हाउस आणि जेवणाचा नियोजन आमच्याकडे लागू (बाकि खर्च असेल तर आपापला) पुणेकरही येउ शकतिल म्हणुन विचारले.

In reply to by वरुण मोहिते

म्हणजे पुणेकरही येउ शकतिल
हीहीही !!! झोपेतून उठलास की सांग रे, मग बोलू ;-)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

फार्म हाउस आणि जेवणाचा नियोजन आमच्याकडे लागू (बाकि खर्च असेल तर आपापला) आयला फुकटातला कट्टा पुणेकर सोडतोय होय. काय विमे. अभ्यास वाढवा.