सरत चालली रात
'अमर प्रेम' या चित्रपटामधील 'रैना बीती जाए'या हिंदी भावगीताला मराठीमध्ये साकारण्याचा हा प्रयत्न... काही चुकलं असेलतर सांभाळून घ्या..
अजून जागी दोन लोचने
नाव तुझे अधरांत
सख्या रे सरत चालली रात
कुठे राहिला श्याम सावळा
लागे न डोळ्यासी डोळा
का मजला वचनात बांधुनी
उगा फिरविसी पाठ
सख्या रे सरत चालली रात
झुरते कधिची रात्र बोचरी
दुःस्वप्ने घेतात भरारी
कुठली वैरीण सांग मुकुंदा
तुझी अडविते वाट
सख्या रे सरत चालली रात
बावरलेली प्रीत दिवाणी
अन राधेच्या डोळा पाणी
गेला सोडून श्याम सखा तिज
लोटुनीया विरहात
सख्या रे सरत चालली रात
© अदिती शरद जोशी
http://unaadpaus.blogspot.com
लेखनविषय:
याद्या
1309
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
छान कविता. मात्र पहिल्याच
सुरेख भावानुवाद!
आधारित असली तरी on its own ही जवळजवळ नवीनच कविता आहे
धन्यवाद