✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मॉल संस्कृति

ब
बलि यांनी
Wed, 10/16/2013 - 17:42  ·  लेख
लेख
सर्वप्रथम मला सामील करून घेतल्याबद्दल मिपा चे आभार. माझं पहिलं लेखन तुमच्यासमोर ठेवतो आहे . चूकभूल माफ असावी . काही दिवसांपूर्वी मी माझ्या फेसबुक च्या भिंतीवर एक चित्र प्रकाशित केले होते. त्यात एक गरीब स्त्री रस्त्याच्या कडेला बसून भाजी विकत होति. त्या चित्राचा आशय असा होता कि, " कृपया रस्त्यावर भाजी विकणाऱ्या लोकांबरोबर भाव कमी जास्त करू नका. ते आपल्या शेतातील माल कमी किमतीला विकतात. मॉल मध्ये खरेदी करू नका. शेतकरी आपल्या उपजीविकेसाठी भाजी विकत असतो. " ह्या चित्रावर बऱ्याच प्रतिक्रिया आल्या. माझ्या मित्राबरोबर मी ह्या विषयी खूप वेळ गप्पा मारल्या . त्याचा सारांश असा , माझ्या मित्राला हे मान्य नव्हतं. त्याच्या म्हणण्यानुसार काही नामांकित मॉल चालवणाऱ्या संस्था भाजीपाला थेट शेतकऱ्यांकडून विकत घेतात आणि ते सुद्धा पिक यायच्या आधीच त्याचा बुकिंग करून ठेवतात. पण सगळ्याच शेतकऱ्यांना ह्याचा लाभ होत असावा का ? अगदी शहरातील भाजी विक्रेते सोडा, पण शहराबाहेरच्या रस्त्यांवर भाजी विकणारे नक्कीच शेतीमध्ये काम करणारे असतील आणि त्यांना जर फायदा होत असेल तर काय बिघडले ? आजच्या बाजारात दलालांचा सुळसुळाट आहे हे खरंय पण सगळेच धंदा म्हणून भाजी विकतात असेही नहि. त्याच्या म्हणण्यानुसार मोल्स मध्ये स्वस्त दरात भाजी मिळते म्हणून तिथून खरेदी करावं. ह्यावर माझी प्रतिक्रिया अशी होती कि, २००-३०० रुपयांच्या पिज्जा खाणार्यांनी २-३ रुपयांचा विचार करणं योग्य आहे का ? ( अर्थात पिज्जा मलादेखील आवडतो आणि इतर पिज्जा खाणार्यान्बद्दल मला काही आक्षेप नाही ). ह्या विषयावर मिपाकरांच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायची इच्छा झाली म्हणून हे लेखन करावा असं मनात आलं.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
35179 वाचन

💬 प्रतिसाद (146)

प्रतिक्रिया

का हो खातात तिथे जावुन?

शैलेन्द्र
Fri, 10/18/2013 - 18:55 नवीन
:) का हो खातात तिथे जावुन?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

खर॑च प्रश्न अहे..

उपास
Fri, 10/18/2013 - 19:23 नवीन
माझ्या अल्पमतिप्रमाणे - १. दुसरा स्वस्त पर्याय ग्रहकांना उपलब्ध नाही २. नियम पाळायचेच नाहीत इतके आपण ग्राहक म्हणून बेशिस्त आहोत ३. व्यवस्थेचा (इथे पोलिसांचा) वचक नाही, त्यांना हप्ता पोहोचवून काम भागतं आणि ते ही निर्ल्लज्ज पणे कानाडोळा करतात अशा अवैध टपर्‍यांकडे.. सद्ध्या मुंबईत (दक्षिण, दक्षिण्-मध्य) सकाळी साडेसहा ते नऊ ह्यावॅळात रस्त्यावर उभे राहून पोहे, उपमा, वडे विकले जातात, प्रमाण इतकं हाताबाहेर गेलय की सगळ्या हॉटेलवाल्यांचा सकाळचा धंदा ऑलमोस्ट बसलाय, इमाने इतबारे हॉटेल चालवणारे रडकुंडीला आलेत. मग ही फेअर कॉपिटीशन आहे की सामान्य गरिबाने केलेला काळाबाजर? डोकं चालत नाही...!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

चटणी

चिरोटा
Fri, 10/18/2013 - 20:45 नवीन
मग ही फेअर कॉपिटीशन आहे की सामान्य गरिबाने केलेला काळाबाजर?
एकूण गिर्‍हाईकांच्या प्रमाणात हॉटेलवाले प्रामाणिकपणे किती कर भरतात हा संशोधनाचा मुद्दा आहे.मुंबईत उडुपी हॉटेलवाल्यांचे कौतुक असते.पण जादा चटणीला जिची किंमत ५० पैसेही नसते तिला ५ रुपये आकारले जातात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपास

१००-१२५ रुपयात तयार होणारा

बलि
गुरुवार, 10/17/2013 - 19:46 नवीन
१००-१२५ रुपयात तयार होणारा शर्ट आपण १०००-१५०० रुपयाला घेतो
असं शक्यतो मॉल मध्ये होतं . लहान दुकानामध्ये ४ ० ० -५ ० ० पर्यंत मिळतो तसाच शर्ट .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

ब्रॅन्ड

चिरोटा
Fri, 10/18/2013 - 20:53 नवीन
ब्रॅन्ड कुठला ह्यावरही किंमत अवलंबून असते. अ‍ॅरो,पिट्रींग्लंडचे सदरे,विजारी महाग असतातच.तो दुकानात्/मॉलमध्ये एका हंगामात एकाच किंमतीला मिळेल.मॉलवाले फेस्टिव सीझनच्या नावाखाली माल (upto 50% off)च्या पाट्या लावून स्वस्तात विकतात.अर्थात त्यामागे गिर्‍हाईक जादा माल विकत घेईल हे गणित असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बलि

१००-१२५ रुपयात तयार होणारा

काळा पहाड
Sun, 10/20/2013 - 23:18 नवीन
१००-१२५ रुपयात तयार होणारा शर्ट आपण १०००-१५०० रुपयाला घेतो.
नाई ब्वा.. मि तर काही महिन्यापूर्वीच लक्ष्मी रोड वरून २५० रुपयाचा शर्ट आहे का म्हणून विचारत फिरत होतो. मिळाला सुद्धा एके ठिकाणी. आता तिथूनच घ्यायचे ठरवलेत शर्ट.. २५०, ३००, ३५० मध्ये मस्त मिळतात शर्ट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

कुठं?

तुषार काळभोर
Wed, 10/23/2013 - 10:14 नवीन
कुठं? मी पण जावं म्हणतो.. १००० चा एक घेण्यापेक्षा १००० चे ३-४ घेऊन वापरले तर वापरताना व्हरायटीपन होईल. अन् १००० चा शर्ट २ वर्षं टिकणार असेल आणि ४ शर्ट ६-६ महिने टिकले तरी चालेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

व्यवस्थेचा अभ्यास करायची गरज नाही.

नेत्रेश
Sun, 10/20/2013 - 13:18 नवीन
जर आपल्याला आपले शहर साफ, सुंदर, सुरक्षीत हवे असेल, तर या गोष्टीना बाधा आणणार्या घटकांना विरोधच करायला हवा. अगदी प्रत्यक्ष विरोध करायचा नसेल तरी कमीत कमी त्यांना उत्तेजन तरी देउ नये. फक्त १५ दीवस कुणीही रस्त्यावरच्या फ़ेरीवाल्यांकडून काहीही खरेदी केली नाही तर सगळे फ़ुटपाथ, रस्ते मोकळे होतील. शहराची साफ सफाइ करायला पालीकेची यंत्रणा पुरेशी पडू लागेल. पोलीस, अतीक्रमण वीभाग व इतर काही सरकारी खात्यांचा वेळ आणि करदात्यांचा पैसा वाचेल. पण जर आपण थोडाफार पैसा वाचवण्यासाठी रस्त्यावरच्या फेरीवाल्यांसारख्या गोष्टींना उत्तेजन देणार असू, तर आपली लायकीच बकाल आणि उकीरडा झालेल्या शहरात रहायची आहे असेच म्हणावे लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

कर्ज घेऊन नंतर त्याचे हप्ते

नितिन थत्ते
Sun, 10/20/2013 - 17:31 नवीन
कर्ज घेऊन नंतर त्याचे हप्ते भरू नयेत आणि मग बँकेशी रिनिगोशिएट करावे अशा अर्थाचा आपला प्रतिसाद पूर्वी वाचला होता. [पक्षी- नैतिकता-कायदा वगैरे गेली तेल लावत. आपला फायदा आपण पहावा]. त्या पार्श्वभूमीवर हा प्रतिसाद आश्चर्यजनक वाटतो. (मतपरिवर्तन?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नेत्रेश

त्याचं असं आहे, की ज्या

शैलेन्द्र
Sun, 10/20/2013 - 22:13 नवीन
:) त्याचं असं आहे, की ज्या गोष्टी करता येण्याजोग्या आहेत त्यावर चर्चा करुया. साफ- सुंदर आणि सुरक्षित यात फरक आहे. लोकांचे रोजगार हिरावून घेतलेल्या स्वच्छ पण सामाजिक खदखद असणार्‍या अशांत शहरात राहण्यापेक्षा कायदे वाकवून का होईना पण जिथे नैतिक मार्गाने लोकांना दोन पैसे मिळवता येतात अशा शहरात/ समाजात राहणे कधीही चांगले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नेत्रेश

लोकांचे रोजगार हिरावून

काळा पहाड
Sun, 10/20/2013 - 23:27 नवीन
लोकांचे रोजगार हिरावून घेतलेल्या स्वच्छ पण सामाजिक खदखद असणार्‍या अशांत शहरात राहण्यापेक्षा
व्वा.. म्हणजे रिक्षा ना प्रवाशाना लूटू द्यावे नाही तर ते अशांत असतील; खिसेकापूंना काही खिसे कापू द्यावे नाही तर ते अशांत होतील; सरकारी ऑफिस मधल्या एजंट लोकांकडे दुर्लक्ष करावे नाही तर ते अशांत होतील; झोपड्पट्टी वाल्यांच्या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष करावे नाही तर ते अशांत होतील; यादी मोठी आहे. अशांत लोकांना "शांत" करण्यासाठी रबरी बुलेट्स आणि बांबू कधीही वापरता येतात हे लक्शात ठेवावं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

अशांत लोकांना "शांत" करण्यासाठी

मुक्त विहारि
Mon, 10/21/2013 - 08:54 नवीन
रबरी बुलेट्स आणि बांबू कधीही वापरता येतात हे लक्शात ठेवावं." मला नाही वाटत की, असे दिवस येतील. आझाद मैदान साक्षी आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

चालू द्या

शैलेन्द्र
Mon, 10/21/2013 - 13:31 नवीन
:) चालू द्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

तुमचं माहिती जाळं सॉलिड दिसतंय :)

बलि
Mon, 10/21/2013 - 18:06 नवीन
शहराची साफ सफाइ करायला पालीकेची यंत्रणा पुरेशी पडू लागेल.
यंत्रणा कमी पडते आहे हि माहिती कुठून मिळवलीत भाऊ ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नेत्रेश

स्ट्रीट व्हेंडर बिल !

मालोजीराव
गुरुवार, 10/17/2013 - 14:52 नवीन
आमच्या परमदयाळू, गोर गरिबांच्या कैवारी,दिनदलीतांसी आधारू,माय्नोरीटीस गोंजारू अश्या काँग्रेस सरकारने रस्त्यावर व्यवसाय करणार्यांना सुरक्षा आणि परवाना देणारे बिल आणले आहे…रस्त्यावरच्या भाजीवाल्यांविरुद्ध गळा काढणार्यांनी बसा कोकलत !!
  • Log in or register to post comments

.

उद्दाम
Sat, 10/19/2013 - 09:07 नवीन
रस्त्यावर भाजी विकली तर बिघडलं कुठं? रायगडावरही मॉल नव्हता . भाजीबाजार रस्त्यावरच भरायचा असे ऐकून आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव

चांगला लेख आहे. ग्रेटथिन्करTM

ग्रेटथिन्कर
Fri, 10/18/2013 - 14:02 नवीन
चांगला लेख आहे. ग्रेटथिन्करTM
  • Log in or register to post comments

बाकी सगळ्यावर भाष्य नाही पण

वेल्लाभट
Mon, 10/21/2013 - 10:41 नवीन
बाकी सगळ्यावर भाष्य नाही पण
२००-३०० रुपयांच्या पिज्जा खाणार्यांनी २-३ रुपयांचा विचार करणं योग्य आहे का ? २००-३०० रुपयांच्या पिज्जा खाणारे २-३ रुपयांचा विचार करत नाहित. सहा महिन्यातुन एखादा पिझ्झा खात असतिल तर गोष्ट निराळी...
यावर नक्कीच आहे. अशी डबल स्टँडर्ड्स वाली लोकं जागोजागी बघायला मिळतात आणि ती डोक्क्क्यात जातात. तळपायाची मस्तकात.
  • Log in or register to post comments

२-३

उद्दाम
Mon, 10/21/2013 - 13:03 नवीन
२-३ रुपये १०० ठिकाणी वाचवतात म्हणून तर ते २०० रु चा पिझ्झा खाऊ शकतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

ह्या भाजीवाल्यांना रस्त्यावरुन हाकलून दिले पाहीजे.

प्रसाद१९७१
Mon, 10/21/2013 - 15:29 नवीन
आपण कष्ट करुन मिळवलेल्या पैश्यावर टॅक्स भरतो, त्यातुन हे रस्ते बनतात. हे भाजीवाले ते रस्ते फुकट वापरतात. ह्यांच्या मुळे वाहतुक कोंडी होते.आपले कीती पेट्रोल आणी वेळ वाया जात असेल ( सिंहगड रोड बघा ) घाण करुन ठेवतात. महानगर पालिके ने सफाई ची माणसे काय ह्या फु़कट्यांसाठी ठेवली आहेत का? वजनात मारतात. उर्मट बोलतात. पुण्यातल्या बर्‍याच भाजी विकणार्‍यांचे उत्पन्न टॅक्सबल आहे, पण एक पैसा टॅक्स भरत नाहीत. पैसे जास्त गेले तरी चालतील पण मॉल किंवा लीगल दुकानातुन भाजी घेत जा.
  • Log in or register to post comments

निषेध!! निषेध !!

बाळ सप्रे
Mon, 10/21/2013 - 15:49 नवीन
निषेध!! निषेध !! रस्त्यावरील विक्रेत्यांच्या रोजगारावर गदा आणणारा प्रतिसाद!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

.

उद्दाम
Tue, 10/22/2013 - 12:11 नवीन
चार दमड्या मिळवून दोन चार रुपये ट्याक्स भरणार्‍या टिपिकल मध्यमवर्गीय माणसाचा हा निर्बुद्ध प्रतिसाद आहे. इन्कम ट्याक्स वगळता , इनडायरेक्ट ट्याक्सेसही असतात, ते सगळेच भरत असतात. लीगल दुकान म्हणजे काय? रस्त्यावर बसणार्‍या लोकांकडूनही नगरपालिका रोजच्या रोज पावती फाडून पैसे गोळा करत असते. ( पुण्यात ही शिष्टिम नाही की काय? )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

हे पटले बघा...

मुक्त विहारि
Tue, 10/22/2013 - 14:01 नवीन
"टिपिकल मध्यमवर्गीय माणसाचा हा निर्बुद्ध प्रतिसाद आहे." अहो हे सगळे मिपा पण आजकाल असेच आहे. असे माझे मत आहे. मग अशावेळी शहाणी माणसे दूर राहतात.हे आपल्या सारख्या सुज्ञ माणसांना पण सांगावे लागते म्हणजे निर्बुद्धाहून निर्बुद्ध कोण?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उद्दाम

चार दमड्या मिळवून दोन चार

मृत्युन्जय
Tue, 10/22/2013 - 15:59 नवीन
चार दमड्या मिळवून दोन चार रुपये ट्याक्स चार दमड्यांवर चार रुपये टॅक्स भरणारा नक्कीच निर्बुद्ध असला पाहिजे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उद्दाम

या धाग्यावरील वरील सर्व

त्रिवेणी
Tue, 10/22/2013 - 15:24 नवीन
या धाग्यावरील वरील सर्व प्रतिसाद वाचताना सहज एक विचार मनात आला की इथे फक्त भाजी वरच चर्चा चालू आहे, पण हल्ली दुकानदार दूध आणतो त्याचेही रोज 2 रु. प्रमाणे महिन्याचे एक्सट्रा पैसे चार्ज करतो.घरातील रद्दी हा अजून एक मुद्दा होऊ शकेल, पुण्यात बर्‍याच ठिकाणी रद्दीचे दर वेगवेगळे असतात, सध्या आमच्या भागात 9 रु, तर मॉडेल कोलोंनीत 12 रु.,आमच्या सोसायटी बाजूचा 6रु. ने घेतो, कारण काय तर तो किराणा माल देण्यासाठीच फक्त या कागदांचा वापर करतो म्हणे.म्हणजे आपल्या सारख्या सामान्यांच्या खिश्यातून महिना minimum 100/- असे खर्च होतात. वरती एक मुद्दा फुलांचा आला होता, मी सुद्धा डेक्कनला एक मोटठा हार 80रु घेतला दसर्‍याच्या दिवशी. मला सुद्धा तो महाग वाटला, ते विकणारा एक 18-19 वर्षाचा मुलगा होता, तो स्वता हार बनवत होता आणि त्याच्याहून छोटा त्याला मदत करत होता. मी विचार केला जाऊ देत मुलगा मेहनत करतो आहे ना, माझे थोडे पैसे जास्त गेले पण विचार केला कितीतरी मुल, तरुण बेरोजगार असतात, जे खरच नुस्त बसून राहण्यापेक्षा काही उद्योग करत आहेत तर त्यांच्यासाठी जाऊ देत माझे थोडे पैसे जास्त. सगळ्यांच्या मतांचा आदर करून आपण आपले विचार व्यक्त करू यात. एक प्रश्न उसुकता म्हणून- दारू चे दर किती दिवसांनी किवा महिन्यांनी वाढतात.कारण त्या भाववाढीचा कुठे उल्लेख नसतो, किवा भाव वाढले म्हणून चर्चा मी तरी वाचली नाही कुठे.
  • Log in or register to post comments

अभिनंदन.....

मुक्त विहारि
Tue, 10/22/2013 - 15:32 नवीन
खर्‍या मिपाकराची बरीच लक्षणे मिळाली... विचारांना नव्या दिशा.... १. दूध वाले २. रद्दी वाले ३. हार वाले (अ.आ. ह्यांनी ही दिशा आधीच दाखवली होती) ४. दारू वाले एका एका दिशेत १०० प्रतिसादांचे बळ आहे.... तर चौथ्या दिशेत ५०० प्रतिसादांचे बळ असल्याने तो एक वेगळा धागा काढण्यात येईल. वरील प्रतिसाद विनोदी असल्याने गहन विचार करू नका ही विनंती.......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: त्रिवेणी

नाही मी गहन विचार खूपच कमी

त्रिवेणी
Tue, 10/22/2013 - 16:22 नवीन
नाही मी गहन विचार खूपच कमी करते,कारण असा विचार करावा तर बरीच बुद्धी खर्ची करावी लागते, आधीच ईतकी वर्ष अभ्यास करून बुद्धी खर्ची घातली आहे सो आता अजिबात गहन विचार करत नाही. पण तेवढं 4थ्या दिशेसाठी नवीन धागा काढा नक्की कुणीतरी, तेवडीच आमच्या ज्ञानात थोडी भर पडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

@ त्रिवेनि ....

मुक्त विहारि
Tue, 10/22/2013 - 16:35 नवीन
नाराज नका होवू... कदाचित माझ्या प्रतिसादाने आपण नाराज झाला असाल तर... माफी मागतो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: त्रिवेणी

कदाचित माझ्या प्रतिसादाने आपण

त्रिवेणी
Tue, 10/22/2013 - 17:56 नवीन
कदाचित माझ्या प्रतिसादाने आपण नाराज झाला असाल तर... माफी मागतो...>>>>>>>>> प्लीज असे बोलून मला लाजवू नका. मला आज्जीबत राग नाही आला. उलट तुम्ही दुसर्‍यांचा, त्यांचा भावनांचा विचार करता हेच खूप छान वाटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

हे अगदी बरोबर बोललात :)

बलि
Tue, 10/22/2013 - 15:30 नवीन
दारू चे दर किती दिवसांनी किवा महिन्यांनी वाढतात.कारण त्या भाववाढीचा कुठे उल्लेख नसतो, किवा भाव वाढले म्हणून चर्चा मी तरी वाचली नाही कुठे
दारूच्या दुकानात आम्ही मात्र जराही घासाघीस न करता , मागच्या वेळेची किंमत काय होती हे लक्षात न ठेवता नोटा काढून देतो.
  • Log in or register to post comments

अहो हीच

मुक्त विहारि
Tue, 10/22/2013 - 15:34 नवीन
जनरीत (बेवडे रीत.... बाय द वे रोझ डे असतो तसा वेवडे दिन का नाही?) आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बलि

बेवडे रीत वाचून मुपी वरची ती

बॅटमॅन
Tue, 10/22/2013 - 15:36 नवीन
बेवडे रीत वाचून मुपी वरची ती फेमस बेबडेओहोळ कमेंट आठवली. कॉलिंग मालोजीराव!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

हे असे कोडे नका टाकू हो....

मुक्त विहारि
Tue, 10/22/2013 - 15:39 नवीन
काहीतरी लिंक द्या.... (ब्रह्मे फॅन आणि माजी पो.पा.वि.)... मुवि...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

सापडली एकदाची.

बॅटमॅन
Tue, 10/22/2013 - 15:39 नवीन
सापडली एकदाची. माझा रखडलेला विमान प्रवास. तो लेख वाचा, अन सर्च बॉक्समध्ये बेबडेओहोळ टाईप करा मग दिसेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

धन्यवाद....

मुक्त विहारि
Tue, 10/22/2013 - 15:43 नवीन
पो.पा. लिंक शोधत आहे.... तो पर्यंत आमसूले खा.... http://online2.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5204332738114588355&SectionId=22&SectionName=%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A0&NewsDate=20130810&Provider=-&NewsTitle=%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80%20%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%82%20(%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A0)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

अगागागागागागागागा.........

बॅटमॅन
Tue, 10/22/2013 - 15:51 नवीन
अगागागागागागागागा..........चालणारी आमसुले बेक्क्क्क्क्क्क्कार एकदम =)) =)) =)) फेसबुकवर मुक्तपीठ प्रतिक्रिया फ्यान क्लब नामक पेज आहे, तिकडे चिकटवतो हे, बहुत धन्यवाद =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

धन्यवाद...कशाला,,,,,?

मुक्त विहारि
Tue, 10/22/2013 - 15:53 नवीन
एकमेकांना भरपूर हसवू... हसता हसता ज्ञान कण वेचू...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

काय कमेंट आहेत, वा वा वा.

बॅटमॅन
Tue, 10/22/2013 - 15:55 नवीन
काय कमेंट आहेत, वा वा वा. १. Amit - शुक्रवार, 23 ऑगस्ट 2013 - 02:31 PM IST उडणारे जिरे नाही का पहिले लेखिकेने? आम्ही त्यांना डास म्हणतो … २. Sud - बुधवार, 14 ऑगस्ट 2013 - 04:43 PM IST उद्या घरात ढेकुण पाहून त्यांना "चालणारा अक्खा मसूर " नका म्हणू किंवा भुंग्याला बघून "चालणारे व उडणारे चोकलेट एक्लेर्स " नका म्हणू हो ३. श्री - सोमवार, 12 ऑगस्ट 2013 - 08:15 PM IST लेख मस्त आहे आणि सत्य घटना आहे....मागे एकदा आमच्या घरात २०० विंचू घुसले होते आणि एका रांगेत चालले होते........बायको म्हणाली विंचू आहेत....मी म्हणालो नाही....हि तर चालती आमसुले आहेत............मग आम्ही ती बरणीत ठेवली आणि पित्त झाला कि एक आमसूल खायचो............या पेक्षा मजा एकदा आली......आमची मांजरी रात्री आम्हाला वाघाचा आवाज काढून घाबरवायची ..मग आम्ही तिची मजा केली...एकदा ती सकाळी प्रतार्विधीलीला जात असताना मी वाटेत झोपलो......तिला वाटला कि हा माणूस आहे ...............अश्या खूप सत्य घटना आहेत माझ्याकडे .................@ सकाळ .........कृपया छापाल ना ?????????????/ ४. बबली - सोमवार, 12 ऑगस्ट 2013 - 10:14 AM IST बिचारी पोर. सदाशिव पेठेत वाढलेली... तिस बरे कसे माहित अशणार विंचू.. आमसुले माहित कारण.. त्याची मस्त अशी चव येते आमटी मध्ये घातले वर.. ५. sachin - शनिवार, 10 ऑगस्ट 2013 - 07:06 PM IST नशीब आमसुलाचे सार करून प्यायला नाहीत. काय तर म्हणे चालणारी आमसुले. उद्या एखादी घूस बघून म्हणाल कि चालणारी बीटे. ६. गुरु महाराज - शनिवार, 10 ऑगस्ट 2013 - 06:50 PM IST कोकणात मी अंघोळ करत बसलो चुकुन दगड हलला,बघतो तर काय ! मगर होती ती....... दच्क्लात......पुढे ऐका....माज्या हातात साबन होता ना ? अहो ते अंडा हॉट तीच....आणि ते फुटून पिल्लू बाहेर आल आणि ते चक्क आमसुले खायला मगु लागल....बोला आता......आता दलु का दलन मुक्त पीठाच... ७. Andy USA - शनिवार, 10 ऑगस्ट 2013 - 06:50 PM IST काळ्या मुंग्या प्रथम पहिल्या तो अनुभव पुढच्या लेखात "चालणारी मोहरी" म्हणून लिहा. केव्हा वाचीन असे झालेय. हहहहहहहहहहह्पुवा!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

हे वाचून कुणीतरी मॉल मध्ये गेला आणि....विचारले तर...

मुक्त विहारि
Tue, 10/22/2013 - 16:00 नवीन
१. उडणारे जिरे द्या (तुमच्या कडे भरपूर आहेत) २. चालणारे ढेकूण द्या. ३. सरपटणारे दोर द्या (हे घेतांना जे.डी. ह्यांना घेवून जावे ही विनंती) इ.इ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

=)) =)) अगदी अगदी!!

बॅटमॅन
Tue, 10/22/2013 - 16:02 नवीन
=)) =)) =)) =)) अगदी अगदी!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

अशा प्रकारे......

मुक्त विहारि
Tue, 10/22/2013 - 16:07 नवीन
मॉलचा आणि चालणार्‍या आमसुलांचा बादरायण संबंध लावण्यात मी थोडाफार यशस्वी झालो....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

बादरायण न्हवे

बॅटमॅन
Tue, 10/22/2013 - 16:10 नवीन
आमसुलायण/विञ्चवायन संबंध.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

.

उद्दाम
Wed, 10/23/2013 - 10:22 नवीन
त्या हिमालयाच्या उशीतनं बाहेर पडा आता. नाहीतर कान किर्र्र्र्र्र्र्र्र बधीर होतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

त्या हिमालयाच्या उशीतनं बाहेर पडा आता.

मुक्त विहारि
Wed, 10/23/2013 - 10:55 नवीन
कशाला? मुद्दाम गहन विचार करायला? त्यापेक्षा नकोच ते.... आम्ही आहोत तेथेच खूष आहोत.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उद्दाम

वॉर्निंग : शाकाहा-यांनी वाचू

सांजसंध्या
Wed, 10/23/2013 - 11:20 नवीन
वॉर्निंग : शाकाहा-यांनी वाचू नये वास्को च्या मासळीबाजारात कोळणीकडून मासळी घेताना दाबून, उलटीपालटी करून घेण्यात मजा येते. मॉलमधली महागडी मासळी चवीला पण चांगली नाही लागत. इथून खालचा मजकूर सार्वजनिक (शाहा देखील वाचू शकतात) मॉल संस्कृतीबद्दलचा एक लेख. मटा मधे छापून आला होता. http://www.maayboli.com/node/21238
  • Log in or register to post comments

मासळीवरून पुण्याची आठवण झाली.

सांजसंध्या
Wed, 10/23/2013 - 21:22 नवीन
मासळीवरून पुण्याची आठवण झाली. हर्णेला कुणी राहतं का ? पुण्यात असताना एक जण हॉटेलसाठी थेट हर्णेवरून मासळी मागवायचे. आम्हाला टेंपो आला कि त्यातली हवी ती घेता यायची. ताजी मासळी असायची ती. बरेच दिवस टिकायची. आमच्या शेजारचे एक बंगाली गृहस्थ भल्या पहाटे उठून नाना पेठेत जायचे. बाहेर निघताना भांड्याचा आवाज यायचा. या रहस्याचा शोध घेतल्यावर कळालं कि अल्पना टॉकीज (कुठे आहे ही ?) जवळ बारामतीवरून एक जण सकाळी सकाळी येतो. इंदापूर कि कुठून गोड्या पाण्यातली मासळी तो आणायचा. हा बंगाली लोकांचा वीक पॉइण्ट असल्याने भल्या पहाटे उठून जायला त्यांना काहीच वाटायचं नाही. मॉल मधल्या मासळी, भाज्यांवर हे बंगाली बाबू खूप उसळून बोलायचे. त्यांच्या बरोबर एकदा मार्केट यार्डात जाउन फळं, भाजी आणि किराणा आणला होता. हवा तसा माल आणि पैशांची बचत हवी असेल तर असंच करायला पाहीजे. मार्केट यार्डाचाच मॉल बनवला तर ? शेतक-यांनाही फायदा आणि गि-हाईकांनाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सांजसंध्या
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा