Skip to main content

मॉल संस्कृति

लेखक बलि यांनी बुधवार, 16/10/2013 17:42 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वप्रथम मला सामील करून घेतल्याबद्दल मिपा चे आभार. माझं पहिलं लेखन तुमच्यासमोर ठेवतो आहे . चूकभूल माफ असावी . काही दिवसांपूर्वी मी माझ्या फेसबुक च्या भिंतीवर एक चित्र प्रकाशित केले होते. त्यात एक गरीब स्त्री रस्त्याच्या कडेला बसून भाजी विकत होति. त्या चित्राचा आशय असा होता कि, " कृपया रस्त्यावर भाजी विकणाऱ्या लोकांबरोबर भाव कमी जास्त करू नका. ते आपल्या शेतातील माल कमी किमतीला विकतात. मॉल मध्ये खरेदी करू नका. शेतकरी आपल्या उपजीविकेसाठी भाजी विकत असतो. " ह्या चित्रावर बऱ्याच प्रतिक्रिया आल्या. माझ्या मित्राबरोबर मी ह्या विषयी खूप वेळ गप्पा मारल्या . त्याचा सारांश असा , माझ्या मित्राला हे मान्य नव्हतं. त्याच्या म्हणण्यानुसार काही नामांकित मॉल चालवणाऱ्या संस्था भाजीपाला थेट शेतकऱ्यांकडून विकत घेतात आणि ते सुद्धा पिक यायच्या आधीच त्याचा बुकिंग करून ठेवतात. पण सगळ्याच शेतकऱ्यांना ह्याचा लाभ होत असावा का ? अगदी शहरातील भाजी विक्रेते सोडा, पण शहराबाहेरच्या रस्त्यांवर भाजी विकणारे नक्कीच शेतीमध्ये काम करणारे असतील आणि त्यांना जर फायदा होत असेल तर काय बिघडले ? आजच्या बाजारात दलालांचा सुळसुळाट आहे हे खरंय पण सगळेच धंदा म्हणून भाजी विकतात असेही नहि. त्याच्या म्हणण्यानुसार मोल्स मध्ये स्वस्त दरात भाजी मिळते म्हणून तिथून खरेदी करावं. ह्यावर माझी प्रतिक्रिया अशी होती कि, २००-३०० रुपयांच्या पिज्जा खाणार्यांनी २-३ रुपयांचा विचार करणं योग्य आहे का ? ( अर्थात पिज्जा मलादेखील आवडतो आणि इतर पिज्जा खाणार्यान्बद्दल मला काही आक्षेप नाही ). ह्या विषयावर मिपाकरांच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायची इच्छा झाली म्हणून हे लेखन करावा असं मनात आलं.

वाचने 35371
प्रतिक्रिया 146

प्रतिक्रिया

२००-३०० रुपयांच्या पिज्जा खाणार्यांनी २-३ रुपयांचा विचार करणं योग्य आहे का ?
२००-३०० रुपयांच्या पिज्जा खाणारे २-३ रुपयांचा विचार करत नाहित. सहा महिन्यातुन एखादा पिझ्झा खात असतिल तर गोष्ट निराळी...

२००-३०० रुपयांच्या पिज्जा खाणार्यांनी २-३ रुपयांचा विचार करणं योग्य आहे का ? >> शेतकर्‍यांना रास्त भाव मिळायला पाहिजे हे मान्य! पण हे मॉल आणि मॉर्डन संस्कॄतीविषयी बोलणारे नेहमी पिझ्झाचेच उदाहरण का देतात? उद्या १० रु ची भाजी कोणी २० रुपयांना विकली तर योग्य आहे का? यावर २००-३०० रुपयांच्या पिज्जा खाणार्यांनी त्या अतिरिक्त १० रु चा विचार करावा का? किंवा महिना १०-१५ हजार कमावणार्‍यांनी त्या अतिरिक्त १० रु चा विचार करावा का? किंवा ६-७ हजारांची पेन्शन मिळणार्‍यांनी त्या अतिरिक्त १० रु चा विचार करावा का?

२० वर्षापुर्वी पुण्यातल्या मंडईत मारुती800मधून आलेल्या एक गोर्या घार्या बाईने अनुनासिक स्वरात भाजीवाल्या म्हातारीशी चाराण्याची कोथिंबीर १० पैश्याला दे म्हणून घासाघिस चालवली होती, तो प्रसंग आठवला . मॉल आणि भाजिविक्रेते दोघांकडून माल खरेदी करावा...

In reply to by ग्रेटथिन्कर

मारुती800मधून आलेल्या एक गोर्या घार्या बाईने अनुनासिक स्वरात भाजीवाल्या म्हातारीशी चाराण्याची कोथिंबीर १० पैश्याला दे म्हणून घासाघिस चालवली होती
गोरी घारी आणि सानुनासीक स्वर्ई पुण्यातील एका पेठेची आणि एक्स्टेन्डेड कोथरुड भागची व्यवच्छेदक लक्षणे समजायची का? भगवान परषुराम पहाताहेत हो वरुन...

In reply to by विजुभाऊ

सहमत. अवान्तरः गोर्‍या, घार्‍या अन सानुनासिक स्त्रियांचे फ्यासिनेशन अम्मळ जरा जास्तच आहे का हो मराठी आंजावर?

In reply to by प्यारे१

पळपुटे प्यारेश्वर, स्त्रिया आंजावर आहेत की नाहीत हा मुद्दा अलाहिदा आहे. वर वर्णिलेल्या एवंगुणविशिष्ट स्त्रियांबद्दलचे फेसिनेसन मराठी आंजावर वेळोवेळी बाहेर पडते हा मुख्य मुद्दा आहे. असे पळून जाऊन काय होणार? बी अ म्यान, करू नका लेखणीची तल्वार म्यान ;)

In reply to by बॅटमॅन

वर वर्णिलेल्या एवंगुणविशिष्ट स्त्रियांबद्दलचे फेसिनेसन काही लोकांकडुन सगळ्याच माध्यमांतुन बाहेर पडते. त्यामुळे ...........

In reply to by ग्रेटथिन्कर

अगदी कालपरवाच मी चारचाकीत बसुन आलेल्या एका सावळ्या, काळ्या डोळ्यांच्या भसाड्या आवाजात बोलणार्‍या बाईला एक किलो बटाट्यावर कढीपत्ता फुकट द्या म्हणुन भांडणार्‍या बाईला बघितले तो प्रसंग आठवला.

माझ्या मते भाजी विकणार्‍यांकडून भाजी खरेदी करायला हवी. तीही एक दोन रुपयांसाठी घासाघीस न करता. आपल्या खिशातून एक दोन रुपये जास्त गेले तर आपल्याला फारसा फरक पडणार नसतो. परंतू त्या भाजी विकणार्‍यांना नक्की पडतो. मी सिंहगड रोडवरुन जिथून ऑफीसची बस पकडतो तिथे रस्त्याच्या बाजूला (हो, फुटपाथवरच) एक दहा पंधरा भाजीवाले बसतात. बसायला सिमेंटच्या गोणीचं कापड आणि समोरचा भाजीचा ढीग. काही भाजीवाले आता ओळखीचे झाल्यामुळे मोकळेपणाने बोलतात. त्या धंद्याचं गणित समजावून सांगतात. फारसं काही सुटत नाहीच. फक्त कुणा दुसर्‍याकडे राब राब राबायचे त्याच्याऐवजी हा स्वतःचा व्यवसाय ईतकंच. यातच बर्‍याच भानगडी असतात. ज्या एरीयात भाजी विकायची तिथले लोकल पुढारी "इथे बसायचंय ना?" असं धमकावत प्रत्येक "महोत्सवाला" वर्गणी गोळा करतात. कार्पोरेशनवाले पावत्या फाडतात. अशात त्यांचं कुणी एक दोन रुपयांसाठी घासाघिस करणारं गिर्‍हाईक पाहीलं की वाईट वाटतं.

In reply to by धन्या

छोटे व्यावसायिक बळीचे बकरे असतात लैवेळेस. तस्मात अंमळ घासाघिशीकडे दुर्लक्ष केले तरी फार अडचण होऊ नये. (खुश्कैरेधन्यौ)

In reply to by बॅटमॅन

छोटे व्यावसायिक बळीचे बकरे असतात लैवेळेस.
हेहे. हे सगळीकडेच होतं. उदा. दोन-तीनशे रुपयांचं लाईटबील थकलं की कनेक्शन तोडलं जातं. लाखांच्या थकबाक्या असणारे उदयोग मात्र वीज वापरतच असतात.
तस्मात अंमळ घासाघिशीकडे दुर्लक्ष केले तरी फार अडचण होऊ नये.
वर पिझ्झाचं उदाहरण खटकलं. पण खरंच पिझ्झाच्या चार छोटयाशा तुकडयांसाठी कमीत कमी दोनशे रुपये मोजणारे भाजीवाल्यांकडे केवळ दोन तीन रुपयांची घासाघीस करतात ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे.

In reply to by धन्या

पूर्ण सहमत आहे. संधी मिळेल तिथे बारगेनिङ्ग करणे हा तसेही आपला स्थायीभावच असतो. त्यात परत समोरचा छोटा भाजीवाला असला तर ही प्रवृत्ती उफाळून येते एकदम.

आणि तसेही आमच्या डोंबिवलीत अद्याप आजू बाजूच्या खेड्यातून भाजी विकायले येते.तिथल्याच भाजावाल्यांकडून घेतो. आणि घासाघीसच्या बाबतीत म्हणाल तर, भाजीची प्रत महत्वाची.प्रती प्रमाणे दर असेल तर खरेदी करायची.तसे २/३ भाजीवाले मला ओळखतात आणि योग्य त्या दरानेच भाजी विकतात. शेवटी काय हो टाळी एका हाताने वाजत नाही.....

In reply to by मुक्त विहारि

डोंबिवलीत भाजी घेताना आपलं एक तत्त्वं आहे, आगरी म्हातार्‍यांकडुन घ्यायची, शक्यतो भय्या टाळायचा.. भाजी चांगली मिळते, वजन शक्यतो नीट असतं आणि घरगुती असल्याने जास्त खतं/किटकनाशक मारलेले नसतात.

In reply to by मुक्त विहारि

चर्चेचा विषय भरकटतोय असं वाटतंय. चर्चा "भाजी मॉलमधून न घेता भाजीवाल्यांकडून घ्यावी" या विषयावर व्हावी असं धागाकर्त्याला अपेक्षित असावं. वरच्या दोन प्रतिसादांवरुन ही चर्चा "मराठी भाजीवाले आणि उत्तर भारतीय भाजीवाले" अशी भरकटेल असं दिसतंय.

In reply to by धन्या

तो आंग्ल नेटाचा नियम नैका? लै वेळ कुठलीही चर्चा चाल्ली की शेवटी कशीही हिट्लर अन नाझीपर्यंत येऊन थांबणारच. तसा मराठी नेटाचा नियमः लै वेळ कुठलीही चर्चा चाल्ली की शेवटी कशीही उत्तर भारतीयांपर्यंत येऊन थांबणारच.

In reply to by बॅटमॅन

लै वेळ कुठलीही चर्चा चाल्ली की शेवटी कशीही उत्तर भारतीयांपर्यंत येऊन थांबणारच." + १

In reply to by धन्या

चर्चा "भाजी मॉलमधून न घेता भाजीवाल्यांकडून घ्यावी" या विषयावर व्हावी असं धागाकर्त्याला अपेक्षित असावं

In reply to by बलि

आम्ही आपले जरा डीटेल मध्ये सांगातले तर लगेच उत्तर भारतीयांचा कैवार घेणारे पुढे आले की काय? मी आधीच म्हणालो की मी भाजी खरेदी आग्री माणसांकडून घेतो.(ह्याचाच अर्थ मी मॉल मधून घेत नाही.त्यातच हे पण सांगीतले की भैय्याकडून घेत नाही.तर काय बिघडले?) बरे आणि हे सगळे उप-प्रतिसादात आलेले मुद्दे आहेत.मुख्य प्रवाहातले नाहीत. महत्वाचे..... वरील सगळे टाइमपास म्हणून लिहीले आहे.मुद्दाम फार गहन विचार करू नका....पण मी मात्र जास्त विचार करूनच लिहीले आहे.....

In reply to by मुक्त विहारि

आम्ही आपले जरा डीटेल मध्ये सांगातले तर लगेच उत्तर भारतीयांचा कैवार घेणारे पुढे आले की काय?
हातावर पोट असणारे माणसं इथून तिथून सारखीच असतात. मी चार वर्षांपूर्वी उसगावात होतो तेव्हाची गोष्ट. आपल्याकडे ब्ल्यूप्रिंटवाले जोरात होते. मनात विचार यायचा, या उसगाववाल्यांनी जर ब्ल्यूप्रिंटवाल्यांसारखा विचार केला तर आपल्याला परतीचं विमान तरी पकडता येईल का. असो.

In reply to by धन्या

आणि तो तुम्हीच छान व्यक्त केला आहे... "मनात विचार यायचा, या उसगाववाल्यांनी जर ब्ल्यूप्रिंटवाल्यांसारखा विचार केला तर आपल्याला परतीचं विमान तरी पकडता येईल का?" तुम्ही हा विचार केलात तर भैय्ये लोक... मराठी माणसांनाच बाहेर कसे काढता येईल ह्याचा विचार करतात. हाच विचारातला फरक आहे. अहो संत भूमी आहे आपली.माझ्या मनांत पण असेच विचार येणारच ना? पण संताच्याच डोक्यात काठी बसली तर त्या संताने प्रतिकार करायचा की मार खातच रहायचे? मला अद्याप ह्याचे उत्तर मिळालेले नाही?

In reply to by बलि

जे आपल्याला समजते ते गहन विचार करणार्‍याला समजेलच असे नाही. आपण दोघेही पामर माणसे आहोत.

In reply to by मुक्त विहारि

मुविच्या या मुद्द्याला अनुमोदन. मराठी माणसाने हाडाची काडं करायची आणि फायदा उपटायला 'बिहारी' कशाला?

हेच धोरण मी मार्केटयार्डात पाळतो. शेतकरीच विक्रेता असेल, तर भावात (फार) घासाघीस करायची नाही.पण फुलं आडत्यांकडुन घेणं आलं कि तोडातोडी करायचीच! :)

In reply to by अत्रुप्त आत्मा

एकाला एक न्याय तर एकाला एक न्याय.... आता तुम्हीच असे वागताय तर आम्ही पण असेच वागायचे ठरवतो.. नाही म्हटले तरी आमचे गुरुजी बादशाही आहेत....

आठवड्याच्या बाजारी (रविवारी) पाषाणात आजूबाजूच्या गांवातून (लव्हाळं वगैरे) भाजी येते पण ती आठवडाभर टिकतेच असं नाही. थोडं वेगळं मत - भाजी रस्त्यावरच्या विक्रेत्याकडून घेतली जाते पण काही भाजीविक्रेते/ फळवाले चलाखी करतातच, मॉल मधून भाजी घेत नसलो तरी तिथे चलाखी करण्याचं आणि आपली तिथे फसवणूक होतेय असं वाटायचं प्रमाण कमी आहे. जे आहे ते रोख ठोक, पाहिजे तर घ्या नाही तर नको. वाजवी आहे की नाही किंमतिला ते ग्राहकानेच ठरवायचं. पण मटकीमध्ये खडे न येणं, कोथींबीर चांगली मिळणं (चांगला दर्जा) जर जर मॉल मध्ये सहज होत असेल तर घेण्यास अडथळा नसावाच, शेतकर्‍याने/ भाजी विक्रेत्याने मालाचा दर्जा उंचवलाच पाहिजे, तो 'व्यवसाय' करतोय दान मागत नाहिये. मी भाजी वाल्याला नेहमी हटकून सांगतो की तुझ्याकडे चांगला माल मिळत असेल तर मी अजून गिर्हाईक पाठवेन ते खुषीने दोन पैसे जास्त देतिल पण माल चांगलाच हवा, फळांच्या बाबतित हे विशेष! जाता जात एक प्रश्न - आंब्याची पानं + झेंडू ह्याच तोरण पाडव्यांना, दसर्‍याला घराला बांधलं जातं, त्याची वाजवी किंमत काय? मुंबईत जे १५-२० रुपयांत मिळत तेच पुण्यात (पाषाण / बाणेर भागात) ८० कसं काय असू शकतं? कुणी गणित समजावून सांगेल का, असं असल्याने बरेच जण प्लास्टीकच्या तोरणाचा पर्याय (जे पर्यावरणासाठी चांगलच कदाचित!) वापरु लागणारच. पण तोरणाच्या बाबतित तरी (आणि तेच मिटर न पाडता चालवणार्‍या रिक्षाच्या बाबतही) आपली लुबाडणूक होतेय, असं वाटत राहातं.

In reply to by उपास

तुमचे दोन्ही मुद्दे योग्य आहेत. मालाच्या गुणवत्तेत तडजोड नकोच. अशावेळी पुढच्या भाजीच्या गाडीकडे जायचं. सगळेच बेईमान नसतात. दोन तीन वेळा एकाच भाजीविक्रेत्याकडून भाजी घेतली की आपण त्यांचे "रेगुलर कस्टंबर" होतो आणि चांगली भाजी तर मिळतेच परंतू घासाघिस न करताच चार पैसे कमी दयावे लागतात.
आंब्याची पानं + झेंडू ह्याच तोरण पाडव्यांना, दसर्‍याला घराला बांधलं जातं, त्याची वाजवी किंमत काय? मुंबईत जे १५-२० रुपयांत मिळत तेच पुण्यात (पाषाण / बाणेर भागात) ८० कसं काय असू शकतं? कुणी गणित समजावून सांगेल का
शहरी भाग सोडला की आंब्यांचा झाडांना तोटा नसतो. झेंडूची मात्र निगराणी करावी लागते. परंतू त्याचे कुणी "सिझन" आहे म्हणून गैरफायदा घेत असेल तर अशा वेळी त्या चिजा खरेदी न करणं हेच उत्तम. खुशाल प्लास्टिकचं तोरण दाराला लावावं अशा मताचा मी आहे.

In reply to by धन्या

१. त्याच दिवशी तोरण बांधायलाच हवे असा काही नियम नाही आहे.तुम्ही थोडी स्वस्त दरांत पाने-फुले मिळायला लागली की पण तोरण बांधू शकता. २. तुमच्या आसपास जी कुठली झाडे असतील तर त्याची पाने आणि जमिनीवर पडलेली फुले वापरलीत तरी चालेल. मी वलसाड, गुजरातला असतांना आंब्याची पाने आणि सदाफुलीची फुले वापरून तोरण करत होतो.दोन्ही फुकट मिळत होते. लुबाडणूक आणि दादागिरी सहन करण्याच्या प्रमाणात वाढते....

In reply to by उपास

जे आहे ते रोख ठोक, पाहिजे तर घ्या नाही तर नको.
रस्त्यावरचा भाजी विक्रेता / ती कुठे आपल्या हाताला धरून पकडून ठेवतात . आवडली भाजी तर घ्यायची नाहीतर पुढचा ठेला . नाही का !!
मी भाजी वाल्याला नेहमी हटकून सांगतो की तुझ्याकडे चांगला माल मिळत असेल तर मी अजून गिर्हाईक पाठवेन ते खुषीने दोन पैसे जास्त देतिल
स्वागत असो

In reply to by उपास

हा हा...सहमत आहे. तुम्ही वर म्हटल्याप्रमाणे हे रिक्षावाल्यांच्या बाबतीतही म्हणता येईल. पुण्यात मिटरची पद्धत आहे, पण पिंपरी चिंचवड मधे मात्र वाट्टेल ते सांगतात. ३० रु. च्या खाली नाहीच काही. मिटर-बिटर हा प्रकारच नाही.

उत्तर भारतीयांच्या कैवाऱ्यांना मारा xxवर. मराठी माणसाला दोन चार रुपये जास्त द्यायला माझी अजिबात ना नाही. पण त्या भैयाला तेवढेसुद्धा मिळता कामा नये. किमान डोंबिवलीत तरी मराठी माणसाकडुन फसवणुक होत नाही. त्यामुळे दोन चार रुपये जास्त गेले तरी चांगल्या मालाची (भाज्यांची) खात्री असते. योग्य वेळी घासाघिस करावीच लागते. वैयाक्तिक अनुभव.

उत्तर भारतीयांच्या कैवाऱ्यांना मारा xxवर.
उत्तर भारतियांचा कैवार कुणी आणि कसा घेतला आहे ते सांगू शकाल का? सगळेच उत्तर भारतीय त्यांच्याबरोबर केल्या जाणार्‍या कुठल्याही व्यवहारात फसवणूकच करतात असं तुम्ही ठामपणाने म्हणू शकाल का? तसेच आजवर तुम्हाला कधीच मराठी व्यक्तीने फसवले नाही असेही तुम्ही ठामपणाने म्हणू शकाल का? आपल्या देशाचे हे दुर्दैव आहे. आपण समोरच्या व्यक्तीला कुव्यक्तीलाक्याटेगरीत टाकल्याशिवाय आपल्याला चैनच पडत नाही. मी फक्त चर्चा "मराठी भाजी विक्रेते आणि उत्तर भारतीय भाजी विक्रेते" अशी नाही हे निदर्शनास आणले तर मी तुमच्या नजरेत लगेच उत्तर भारतीयांचा कैवारी झालो का?
मराठी माणसाला दोन चार रुपये जास्त द्यायला माझी अजिबात ना नाही.
समजा तुम्ही मंडईत गेलात, एक मराठी भाजीवाला आणि एक उत्तर भारतीय भाजीवाला बाजूबाजूला बसले आहेत. मराठी भाजीवाल्याकडे असलेली भाजी चांगल्या प्रतीची नाही. उत्तर भारतीय भाजी विक्रेत्याकडे चांगल्या प्रतीची भाजी आहे. दोन्हीकडे भाजीचा भाव सारखा आहे. तरीही तुम्ही मराठी माणसाला दोन चार रुपये जास्त देऊण त्याच्याकडूनच भाजी घ्याल का?
किमान डोंबिवलीत तरी मराठी माणसाकडुन फसवणुक होत नाही. त्यामुळे दोन चार रुपये जास्त गेले तरी चांगल्या मालाची (भाज्यांची) खात्री असते.
ही खरंच चांगली गोष्ट आहे. परंतू तरीही मराठी माणसाकडून फसवणूक होत नाही किंवा उत्तर भारतीयांकडून नेहमी फसवणूकच होते असे सरसकटीकरण नाही होऊ शकत.

In reply to by धन्या

@ धन्या, माझी बोलतीच बंद करून टाकली की राव.... तुमच्या ह्या प्रतिसादाला आमचा पांढरा झेंडा.१००% सहमत.. विचारांना, विचारांच्या सहाय्यानेच प्रतिकार केलेला उत्तम.अशी आमची किंचीत विचारसरणी आहे.

In reply to by मुक्त विहारि

अहो त्यात काय एवढे? चूक लक्षात आल्यावर मोठ्या मनाने कबूल करण्यालाही **त दम लागतो. नैतर चूक असूनही कबूल न करता उलट ट्रोलिंग करणारे ट्रोलभैरव कमी नैत.

In reply to by बॅटमॅन

पुढेही माझ्या अशाच चूका झाल्या तर लक्षांत आणून द्या. मी चूक करणारच नाही, असे भाबडे वचन देवू शकत नाही.मी पण माणूस आहे. पण शक्यतो चूक होणार नाही ह्याची काळजी मात्र घेईन..

In reply to by धन्या

मला तुम्हाला अजिबात दुखावायचे नव्हते. आपल्या विचारांशी मी सहमत आहे. बापरे, मध्यमवर्गीय असल्याने दोन चार रुपये वाचवण्यासंबंधी एक वाक्य टाकले तर धाग्याने थेट शंभरी गाठली. यापुढे प्रतिसाद देताना थोडासा विचार करायला लागणार अस दिसतंय.

शेती, भाजीपाला करणारे स्वतः रस्त्याकडेला बसून क्वचितच भाजी विकतात. त्यांना तेवढ्या वेळात आणखी काहीतरी काम असतं. लहान भाजी विक्रेते घाऊक बाजारातून भाजी घेऊनच विकतात. स्वतः पिकवलेली भाजी स्वतः विकणारे अगदी कमी प्रमाणात असावेत. मॉलवाले मोठ्या प्रमाणात भाजीपाला खरेदी करत असतात, त्यामुळे त्यांच्याकडे बार्गेनिंग पॉवर जास्त असते. लहान भाजीविक्रेते बहुशः असंघटित असतात. आणि या साखळीतला शेवटचा दुवा म्हणजे खरे शेतकरी तर सर्वात वाईट परिस्थितीत असतात. ना त्यांच्याकडे बार्गेनिंग पॉवर, ना आणि कसली साधने. त्यांनी त्यांच्या उत्पादनाचा बेसिक भाव वाढवून मागितला तर सगळ्याच बाजूंनी ओरडा होतो. पण जेव्हा त्यांना भाव २ रुपयांनी वाढवून मिळतो तेव्हा मधले दलाल आपल्याला ५ रुपये जास्त घेऊन माल देतात. म्हणजे कोणत्यातरी स्वरूपात दलालांना जाणारे पैसे तुम्ही चुकवू शकत नाही. दलालांना टाळायचे असेल तर स्वतः भाजी पिकवणे हा एक उपाय आहे. किंवा मग शेतकरी सहकारी संघटनांकडून भाजीपाला घेणे हा एक पर्याय चांगला आहे. अन्यथा जिथे भाजीपाला पिकवला जातो तिथे म्हणजे शेतमळ्यात जाऊन घेता येत असेल तर अति उत्तम! म्हणजे सगळे पैसे त्या शेतकर्‍याला मिळतील. २/३ रुपयांचा विचार करावा का? जरूर करावा. कारण रोजचे ३ रुपये म्हटले तर महिन्याचे ९० होतात!

In reply to by पैसा

२/३ रुपयांचा विचार जरूर करावा कारण ते आपल्या कष्टाचे आहेत. पण जर मॉल मध्ये मिळणाऱ्या क्वालिटी चे उत्पादन रस्त्यावरचा भाजीवाला देत असेल तर घासाघीस करू नये असा मला वाटता . शिवाय रस्त्यावरून चालत जाता जाता भाजी घेत येऊ शकते . ९० वाचवण्यासाठी मॉल पर्यंत जाण्यासाठी लागणारे इंधन का घालवावे . हं अगदी मॉल घराच्या जवळ असेल आणि तुम्ही चालत जात असाल तर आमची काही हरकत नाही

In reply to by पैसा

जास्त व्यापक अर्थाने हा सगळा प्रकार "रिलेटिव बार्गेनिंग पॉवर"चाच आहे. पणनबाजूला शेतीव्यवसाय कधी संघटित झाला नाही (होऊ दिला नाही?) म्हणून एकांडे विक्रीप्रयत्न करणारा शेतकरी नेहेमी दाबलाच जातो. (आठवा: "लाल चिखल") यामुळेच आडते, कृषि उत्पन्न बाजार समिती असले मध्यस्थ फोफावतात, माजतात आणि कांद्याच्या साठेबाजीसारखे प्रकार करतात. थेट शेतकर्‍यांकडून माल घेऊ पहाणार्‍या वॉलमार्टसारख्यांना यशस्वीपणे थोपवून धरतात. जिथे शेतकरी संघटित झाला तिथे सुबत्ता आली - कारण त्यांची बार्गेनिंग पॉवर मध्यस्थांच्या तुलनेत वाढली. उदा. आणंद मिल्क युनियन लि. (अमूल). . एक उत्सुकता आहे - वर ज्यांनी ज्यांनी "आम्ही थेट शेतकर्‍यांकडून भाजी घेतो" वगैरे म्हटलं आहे त्यांना प्रश्नः काही दिवसांपूर्वी कृत्रिमरीत्या कांद्याचे भाव फुगवले गेले. तेव्हा या शेतकरी विक्रेत्यांनी या नेहेमीच्या गिर्‍हाईकांना मूळ (कमी) भावात कांदा विकला, का फुगवलेल्या भावात?

In reply to by आदूबाळ

वाढीव किंमतींचा फायदा नेहमीच मधल्या लोकांच्या घशात गेला आहे. २ उदाहरणे देते. गोव्यात कांदे पिकत नाहीत तर बेळगावकडून येतात. मागच्या वेळी कांदे ४० रुपये किलो झाले तेव्हा मी बेळगावला गेले होते. तिथल्या मार्केटमधे त्याच दिवशी कांदे २५ रुपये किलो होते. आता कांदे ६० रुपयांवर गेले तर गोव्यातील बागायतदार सहकारी संस्थेच्या दुकांनातून ३५ रुपये किलो दराने भरपूर कांदे उपलब्ध होते. ही अतिशय उत्तम रीत्या चालवली गेलेली सहकारी संस्था आहे. ते घाऊक मार्केटमधून माल घेऊन अगदी थोडा नफा घेऊन ग्राहकांना देतात. कांदे ३५ रुपयांनी विकूनही त्यांना थोडासा फायदा होता, तर मधले २५ रुपये कोणाच्या घशात गेले? भाजीपाला, दूध, अन्नधान्य यांच्या शेतकर्‍यांना मिळणार्‍या आधारभूत किंमती आणि प्रत्यक्षात आपण विक्रेत्याला देत असलेल्या किंमती यातली तफावत बघून डोळे पांढरे होतात. भाजीपाला आणि दूध हा नाशिवंत माल आहे आणि आवश्यक सुद्धा. त्यामुळे त्यात साठेबाजीला वाव नसावा. पण अन्नधान्याच्या भयंकर वाढलेल्या किंमतीत कमॉडिटी मार्केट आणि नफेखोर लोकांचा मोठाच हात आहे.

In reply to by आदूबाळ

>>>>जिथे शेतकरी संघटित झाला तिथे सुबत्ता आली - कारण त्यांची बार्गेनिंग पॉवर मध्यस्थांच्या तुलनेत वाढली. उदा. आणंद मिल्क युनियन लि. (अमूल). थोडीशी दुरुस्ती.... अमूलबाबत नुसते शेतकर्‍यांनी संघटित होऊन हे घडलेले नाही. आपले प्रायमरी उत्पादन "अ‍ॅज इज व्हेअर इज" बेसिसवर न विकता, ग्राहकोपयोगी स्वरूपात "स्वतःच्या संस्थेमार्फत रूपांतरित करून" विकायची व्यवस्था केल्यामुळे सुबत्ता आली. भाव मिळत नाही याचे दु:ख असलेले शेतकरी बहुतांशी "अ‍ॅज इज व्हेअर इज"* बेसिसवर माल विकतात. त्यांना भाव कमीच* मिळतो. हीच गोष्ट इतर प्रायमरी उत्पादनांबाबतीतही (फळे, फुले, कापूस, इतकेच काय खनिज उत्पादनांबाबतही) सत्य आहे. *इफ आय अ‍ॅम नॉट राँग भात सुद्धा तांदूळ काढून पॉलिश करून विकत नाहीत. **अमूल आपल्याकडची सरप्लस स्किम्ड मिल्क पावडर इतरांना घाऊकमध्ये विकतात तेव्हा खूप कमी भावानेच विकावी लागते.

In reply to by नितिन थत्ते

+१ कच्चा माल नेह्मीच कमी किंमतीत विकला जातो. काहितरी "व्हल्यू अ‍ॅडिशन" करून कच्च्चा माल गिर्‍हाईकाला ताबडतोप वापरता येण्याजोगा बनवून मग विकला तर त्याची किंमत अनेक पटीनी वाढू शकते. नाहितर ती व्हल्यू अ‍ॅडिशन करणारे दलाल मधे येऊन फायद्याचा मोठा हिस्सा स्वतःच्या खिशात टाकतात ही व्यापारातील वस्तूस्थिती आहे.

फार्फार पूर्वी असं घडत होतं का आजही घडतय ते म्हैत नै, पण आमच्या घराजवळच्या मॉलात (आता तो मॉल तरी तिथं आहे का हे माहित नाही) रात्रीच्यावेळी बंद होताना जी पालेभाजी कुजून वाया जाणार्‍या प्रकारात्ली असेल ती एकेक दोन दोन रुपयांना विकत असत. मग कमी उत्पन्न गटातील नागरिक ती घेण्यासाठी गर्दी करत. आमच्या घरकामाच्या बाईंना डॉक्टरांनी नुसते मटन खाऊ नका, रोज थोडीतरी पालेभाजी खात जावा असे सांगितले. मग यांना कोणीतरी सांगितले की मॉलमध्ये जाऊन रात्री भाजी आणली तर परवडू शकेल. ते त्या सांगत होत्या. त्यावेळी तरी मॉलातल्या भाजीचा उपयोग झाल्यासारखेच वाटले. बाकी आमच्या ठरलेल्या भाजीवाले काकांची हाक ऐकू आली की आम्ही जाऊन भाजी घेऊन यायचो. त्यांना अमूक एक भाजी आणावयास साम्गितल्यास तशी आणत असत. नैतर मंडई आहेच!

गेल्या चार वर्षातील अन्नधान्य व भाजीपाला व दूध याच्यातील भाव वाढ पहाता एकतर ही भाववाढ नवश्रीमंताच्या वाढत्या खरेदी क्षमते मुळे झालेली आहे किंवा भारताची शेतीमालाची निर्यात वाढलेली आहे व परिणामी येथील पुरवठा कमी झालेला आहे. हे जर काहीच नसेल तर शेतकरी अधिक महत्वाकांक्षी झालेला आहे.असेच याचे उत्तर आहे एवढी भाववाढ होऊनही शेतकरी जर आपले रडगाणे पुढे चालूच ठेवणार असतील तर आम्ही म्हणू श्रीमंत होण्याची आकांक्षा असणे स्वाभाविक आहे पण मग काहीतरी करा थेट ग्राहकांपर्यंत पोहोचा. ते शेतकरी कधीच करणार नाहीत कधी करू शकणार नाहीत.

डोंबिवलीचे नाव आले म्हणून खरडतो मोल मध्ये भाजी चा दर्जाबाबत निदान परदेशात तरी जास्त लक्ष द्यावे लागत नाही. पण भय्ये भाज्या विकतांना वाट्टेल तो मार्ग वापरून पैसा कमवण्याच्या मागे असतात. गावाला पैसा पाठवायचा असतो मात्र आगरी समाज परंपरागत धंदा असल्याने निष्ठेने करतो हे सत्य आहे मात्र डोंबिवलीत अनेक पिढ्या राहिलेल्या दक्षिणात्य समाज विशेतः केरळी व तमिळ , कर्नाटकी समाजाची खानपान सेवा डोंबिवलीत अव्वल आहे , तेव्हा उगाच परप्रांतीय म्हणून डोंबिवलीकर तरी नाकाने कांदे सोलत नाही मुळात भारतात भाजी ताजी घेणे अपेक्षित असल्याने मंडई मध्ये खरेदी करण्यास वेगळीच मजा आहे , तर भाज्या कापून व्यवस्थित वेष्टनात गुंडाळून मॉल मध्ये मिळतात. येत्या काळात भाजीवाल्यांना भाज्यांचा दर्जा राखावा लागणार आहे , रेल्वे नजीकच्या गटारांतील सांडपाण्यावर भाज्या पिकवून त्या विकणारे भाजीवाले पहिले आहेत.

In reply to by निनाद मुक्काम …

१००% सत्य... (बाय द वे... खवट नारळ परदेशातील मॉल मध्ये बदलून मिळतो काय? आमचा किराणी दुकानदार बदलून देतो. मागच्या वर्षी तर त्याने खराब निघालेले ४/५ बटाटे पण बदलून दिले.)