Skip to main content

झोपेत वर्गात येणे, अन येऊन पुन्हा झोपणे (विडंबन)

लेखक पल्लवी मिंड यांनी मंगळवार, 22/10/2013 या दिवशी प्रकाशित केले.
मंगेश पाडगावकरांची माफी मागून झोपेत वर्गात येणे, अन येऊन पुन्हा झोपणे ओळखून आहेत सारे , presenty साठी तुझे फक्त येणे भर दुपारी लेक्चर ला, पेंग तुला का यावा लागताच डोळा तुझा, प्रश्न नेमका तुलाच विचारावा तुझ्याच पेंगुळलेल्या डोळ्यांनी तुझ्याशी असा दगा का करावा तुझ्या निर्भत्सनेचा अर्थही तुला न उमगावा फेकलेल्या खडूचा नेमही चुकावा झोपेतल्या बरळण्याला तुझ्या, कोणी आपला अपमान का समजावा घेता छोटी डुलकी तू, अचानक यावा मोठा वारा अन जागी होऊन तू, करावास कुठे आहे मी चा देखावा अन वर्ग सारा हास्य कल्लोळात बुडावा
लेखनविषय:

वाचने 2343
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

लाजुन हासणे चेच विडंबन आहे...अजून मस्त करता आल असत , पण मला काही जमुच नाही......

In reply to by पल्लवी मिंड

पण मला काही जमुच नाही......
कोई बात नही, फिरसे ट्राय करो, नक्कीच जमेगा,

In reply to by मुक्त विहारि

मनापासून आभार...

In reply to by मुक्त विहारि

मी 'चला सख्यांनो हलक्या हाती नखानखावर रंग भरा' च्या चालीत वाचून पाहात होतो.

धमाल लिहिले आहे..