✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

हिंदु धर्म आणि शाप

उ
उद्दाम यांनी
Tue, 10/22/2013 - 12:18  ·  लेख
लेख
हिंदु धर्म आणि शाप हिंदु धर्मात शाप देण्याची प्रथा आढळते. तशी ती हॅरी पॉटरमध्येही आहे. पण हिंदु धर्मातील बरेच शाप पीडीकृत शाप या कॅटॅगेरीत येतील. तत्क्षण मरण शाप अगदी क्वचितच. स्मित शंकराने मदनाला जाळून भस्म केला, हा त्या प्रकारात कन्सीडर होईल कदाचित. प्रचंड तिरस्कार मनात घेऊन शाप दिल्यास तो कदाचित फळाला येत असावा की काय असे वाटते. पण मग याने शाप देणार्‍याला काही त्रास नसेल का होत? प्रत्येकालाच कुणाचा ना कुणाचा शाप आहे. हिंदु धर्मात तशी एकंदरच क्षमा केल्याची उदाहरणे क्वचितच दिसतील. मग आपण स्वतःला क्षमाशील / सहिष्णू वगैरे का समजतो ? शापाला उ:शापही असतात का? ते नेमके कुणाकडून घ्यावेत ? ज्याने शाप दिले त्याच्याचकडून ? की कोणाकडूनही? कर्मविपाक म्हणतो की माझे फळ माझ्या कर्मानुसार मला मिळाले. मग माझे कर्म चुकीचेच असेल तर समोरचा मनुष्य मला शाप देवो किंवा माफ करो, मला फळ भोगावेच लागणार ना? मग शाप देणार्‍याने शाप द्यायच्या फंदात पडावेच कशाला? मग हिंदु धर्मातील लोक ऊठ सूठ शाप का देतात? अशा शापांच्या मनोरंजक कथा / प्रसंग / तात्पर्य एकत्र करण्यासाठी हा धागा आहे. इतर धार्मिक माहितीही चालेल. १. सर्वात भीषण शाप. वाल्मिकीनी व्याधाला दिला. पक्ष्याला मारल्याबद्दल. २. दशरथाला श्रावणाच्या पिताजींचा शाप. ३. कर्णाला परशुरामाचा शाप ( तुझी विद्या विफल होईल .) ४. अर्जुनाला उर्वशीचा शाप. ( तिची कामवासना पूर्ण न केल्याने तिने शाप दिला तू नपुंसक होशील. मग तो बृहन्नडा झाला.) ५. वेदवतीचा रावणाला शाप. ( तुला मुलगी होईल, ती तुझा नाश करेल. ती मुलगी म्हणजे सीता.) ६. रामाला वालीचा शाप. ( तू बाण लागून मरशील. तो कृष्णावतारात खरा ठरला.) ७. रामाला वालीची पत्नी तारा हिचा शाप. ( तुझी बायको तुला मिळेल, पण अल्पकाळात ती पुन्हा दुरावेल.) ८. गणपतीचा चंद्राला शाप. ( क्षय) ९. अर्जुनाचा समस्त स्त्रीजातीला शाप. ( तुमच्या मनात कोणतेही रहस्य लपून रहाणार नाही. ) १०. कृष्णाला गांधारीचा शाप. ( निर्वंश होशील.) ११. यादव कुळाला कुण्या ऋषीचा शाप. ( नष्ट व्हाल. ऋषीची चेष्टा केल्यामुळे.) १२. जय विजय याना कुणा अप्सरेचा शाप की तुम्ही प्रत्येक जन्मात राक्षस व्हाल. १३. ब्रह्मदेवाला शंकराचा शाप. तुझी कुणी पूजा करणार नाही. ( कारण काय?) १४. अश्वत्थाम्याला कृष्णाचा / द्रौपदीचा शाप . ( डिटेल्स ?) १५. कुणला तरी शाप . तू साप चाउन मरशील. मग बोराच्या बीतून अळी येऊन त्याचा साप होतो. १६. अंबेचा भीष्माला शाप. अंबेला शिखंडीचा जन्म मिळाला त्यातही आणखी कुठला तरी एक शाप आहे. १७. इंद्राला सहस्त्र भोकं पडतील असा शाप. ( अहिल्या लफडे प्रकरण ) अँड सो ऑन ............ शाप घेण्यात पुरुष आघाडीवर दिसतात, तर शाप देण्यात स्त्रीया.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
33389 वाचन

💬 प्रतिसाद (139)

प्रतिक्रिया

धन्यवाद...

मुक्त विहारि
Tue, 10/22/2013 - 12:37 नवीन
लहानपणी मी एक कथा वाचली होती.... एकदा एका मुनीने आपल्या २ शिष्यांना जवळ बोलावले आणि सांगीतले की जा आणि एक-एक मनुष्य शोधून आणा.कसा. तर एक वाईट आणि एक चांगला.प्रत्येक जण एक एक मनुष्य शोधून आणतो. तसेच आपण पण केले आहेच. असो, निदान हिंदू धर्माचे आपण अशा रीतीने तरी वाचन केलेत, हे ही नसे थोडके.
  • Log in or register to post comments

हा प्रतिसाद तुम्हाला नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 10/24/2013 - 18:28 नवीन
प्रतिसाद वर दिसण्यासाठी शॉर्टकट वापरला आहे. वरच्या १७ पैकी १५ शाप पुरुषांना मिळाले आहेत. १० शाप पुरुषांनी दिले आहेत. थोडक्यात बदला, प्रतिशोध घ्यावासा वाटावा अशी कामं पुरुषांनी प्रचंड प्रमाणात केलेली आहेत. आणि अशा कृत्यांचा रागही पुरुषांनाच जास्त आलेला आहे. धागालेखकाचे निष्कर्ष पटलेले नाहीत. हे संशोधन सुरू ठेवा, त्यासाठी शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

हा प्रतिसाद तुम्हाला नाही.

प्यारे१
गुरुवार, 10/24/2013 - 20:59 नवीन
>>>प्रतिसाद वर दिसण्यासाठी शॉर्टकट वापरला आहे. स्वगत : एवढ्या 'प्रामाणिक'पणं कबूल केला गेलेला हा पहिलाच प्रतिसाद असेल. इतक्या दिवसात अशी घुसखोरी साळसूदपणं होत होती. असो. बदलांचं स्वागत करायला शिक प्यार्‍या. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

बदलांचं स्वागत करायला तर शिकायलाच हवे...

मुक्त विहारि
गुरुवार, 10/24/2013 - 21:02 नवीन
"जसे आज काल आपण मुद्दाम आणि गहन विचार पण वाचतो आहोतच की..."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

असलाच तर नॉस्टॅल्जिया

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 10/24/2013 - 23:53 नवीन
बदल असलाच तर हा नॉस्टॅल्जिया आहे. एकेकाळी हे असे प्रतिसाद सर्रास दिसत. गेले ते दिन गेले (काही वाईट झालं असं नाही.) पण ते असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

पुरूष स्त्रिया

चौकटराजा
Tue, 10/22/2013 - 12:44 नवीन
शाप घेण्यात पुरुष आघाडीवर दिसतात, तर शाप देण्यात स्त्रीया. असतील असतील. पुरूष लोकांना शापा ऐवजी पाश घालणे जास्त आवडत असावे !
  • Log in or register to post comments

बघाना

मुक्त विहारि
Tue, 10/22/2013 - 12:47 नवीन
शेवटी कुणाचे लक्ष कूणावर? आम्ही देवीचे उपासक तर कुणी ????????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

.

उद्दाम
Tue, 10/22/2013 - 12:54 नवीन
मोक्षाला गेलेलं पब्लिक भारतीय की अमेरिकन हा सर्वे केला तर चालतो. मग शापाच्या क्षेत्रात बाया किती बापे किती हा स्टडी केला तर त्यात वाइट काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

अजिबात काही वाईट नाही.....

मुक्त विहारि
Tue, 10/22/2013 - 13:47 नवीन
इतिहास साक्षी आहे. "तुम्ही बायकांचा विचार जास्त करणार"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उद्दाम

खरे सान्गायचे

अनिरुद्ध प
Tue, 10/22/2013 - 13:01 नवीन
तर आपल्या पुराणग्रन्थात बर्याच गोष्टी नन्तर घुसडल्या गेल्या आहेत त्यामुळे खरे किती आणि खोटे किती हे देवच जाणे,असो आपण अभ्यास करत आहात हि चान्गलीच गोष्ट आहे,शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

आमच्या मते शाप हा सत्यकथांना

अत्रुप्त आत्मा
Tue, 10/22/2013 - 13:50 नवीन
आमच्या मते शाप हा सत्यकथांना लावायचा हुकमी चाप आहे. ;-) मग त्या कोणत्याही काळातील असोत! :)
  • Log in or register to post comments

इथे पण बर्‍याच लोकांना बरेच शाप आहेत.....

मुक्त विहारि
Tue, 10/22/2013 - 13:55 नवीन
आणि गंमत म्हणजे ते झाकून ठेवायचे सोडून मुद्दाम गहन विचार कर्रुन टंकत पण बसतात....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

५. वेदवतीचा रावणाला शाप. (

बालगंधर्व
Tue, 10/22/2013 - 14:13 नवीन
५. वेदवतीचा रावणाला शाप. ( तुला मुलगी होईल, ती तुझा नाश करेल. ती मुलगी म्हणजे सीता.) ह्ये नाहि समजल. रवनाने सितेचे हरन करन्यापुर्वी वेदवतीने सीतेचे रुप धारण केले होते अनि ख्रि सिता अग्निमय्धे समावुन गेली होते. पुनहा जेवहा रामाने रावनाला मारले.. तेह्वा अगनिपरिक्षा केली गेले. खोति सीता म्हनजे वेदवती अगनित गेली अनि खरी सिता बाहेर अले. अनि ती रमाबरोबर चालु पडली. पुह्ना युपीला. पन सीताचा ज्ञम्न हा जमिनीतुन झला होता. तो पन युपी साईदच्या कुथेततेरी रज्यात. मग ती साउदकदच्या रवनाकडुन कशी अले? त्यची मुल्गी कशे झाले? हे मला सान्गा. मिसल्पाववर्तीच मी कुथेतरी वचले होते की वेदवतीला रमाशी लगन करय्चे होते. पन तो एकबयको वला असल्यने त्यने वेद्वतीला पुडच्या ज्म्नी बायको करन्यचे वचन दिले. अनि वेदवती पुडच्या जम्नि थिरुपती बालाजीची बायको पदमावथी बनली. पन मग सीता रवनाची मुल्गी कशी झाले?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

@ बालगंधर्व....

मुक्त विहारि
Tue, 10/22/2013 - 14:23 नवीन
मला तर एक पण शाप समजला नाही..... मुळात आपण जे काही चांगले आहे ते शोधतो.... ते शाप वगैरे शोधण्याचे आणि बायकांना शोधण्याचे काम इतर जणांना करू द्यात. चला आज मस्त समस्त गंध्रर्वांची गाणी ऐकू आणि पडले राहू त्या स्वर चांदण्यांत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बालगंधर्व

मुत्कविहरी,तुह्मी खुप

बालगंधर्व
Tue, 10/22/2013 - 14:36 नवीन
मुत्कविहरी,तुह्मी खुप चानगल्या मनचे अहेत. पन अप्ल्या देवआन्बद्दल जी काय थोदेफर म्हायती आप्लयाला अहे,ती जर चुकेचे असेल,तर नककी कहरी महिते कय अहे हे अपलय्ल समझने महततवचे अहे.असे मलआ वतते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

जावू द्या हो.....

मुक्त विहारि
Tue, 10/22/2013 - 14:47 नवीन
तुम्ही नका जास्त विचार करू. जमले तर या डोंबिवली कट्ट्याला.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बालगंधर्व

तिथे काय "कंबल परेड" करायचा

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 10/22/2013 - 14:56 नवीन
तिथे काय "कंबल परेड" करायचा विचार आहे काय? +D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

तिथे कंबल परेड नाही...

मुक्त विहारि
Tue, 10/22/2013 - 15:01 नवीन
पण क्लब परेड आहे (असे मला वाटते)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

तुम्च नव मुत्क विहरी

स्पंदना
Wed, 10/23/2013 - 05:31 नवीन
तुम्च नव मुत्क विहरी कधीपाद्सुन झाल्य? :)) :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

नावात काय आहे?

मुक्त विहारि
Wed, 10/23/2013 - 10:50 नवीन
जे काही आहे ते मिपाच्या पदवीत आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

बलगन्धर्व, तुह्मी खुप

बॅटमॅन
Tue, 10/22/2013 - 14:56 नवीन
बलगन्धर्व, तुह्मी खुप चानगल्या मनचे अहेत. पन अप्ल्या देवआन्बद्दल जी काय थोदेफर म्हायती आप्लयाला अहे,ती तन्कनअधि नककी असे तन्कन्यचि कहरी प्रेरन कय अहे हे अपन लोकन्न समझावने महततवचे अहे.असे मलआ वतते. मोकलय भशेचे पन्दित अहत तुह्मी, तुमच्य पयवर लोतन्गन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बालगंधर्व

@तुमच्य पयवर लोतन्गन.>>>

अत्रुप्त आत्मा
Tue, 10/22/2013 - 15:23 नवीन
@तुमच्य पयवर लोतन्गन.>>> =)) किच्चु ताईईईईईईई .. लवक्ल ये! अतवन येथे! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

झाली मोकलाया लीपी सुरू झाली..

खटपट्या
Wed, 10/23/2013 - 01:00 नवीन
झाली मोकलाया लीपी सुरू झाली...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

आम्हाला वाटले

चौकटराजा
Tue, 10/22/2013 - 18:12 नवीन
आम्हाला या लेखनश्यलीमुले वातले की म्कट वीहरि देवांनम्द चे चहते असून त्यनी त्य्बद्द्ल कही महिती दिली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बालगंधर्व

प्न मल पहल्ल्यांदा हे संअगा

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 10/22/2013 - 14:55 नवीन
प्न मल पहल्ल्यांदा हे संअगा कि टूमचे "सुद्द्लेकन" वचन्याचा शाप तुमि मिपावाचकांना क दिलाहे? कारण तुमची सही तर सही आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बालगंधर्व

@ इ.ए.

मुक्त विहारि
Tue, 10/22/2013 - 14:56 नवीन
तुम्ही पण? चला आता खरे मिपाकर झालात.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

मल खउप मजाअ वत्लि अस लिहयल.

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 10/24/2013 - 18:52 नवीन
मल खउप मजाअ वत्लि अस लिहयल. ज्र्रा वेल ज्स्त लाग्तय ब्स ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

प्न मल पहल्ल्यांदा हे संअगा

बालगंधर्व
Tue, 10/22/2013 - 15:04 नवीन
प्न मल पहल्ल्यांदा हे संअगा कि टूमचे "सुद्द्लेकन" वचन्याचा शाप तुमि मिपावाचकांना क दिलाहे? कारण तुमची सही तर सही आहे Wink उत्तर द्या ते चोप्य पस्तेद अहे. मी अनेकदा शुद्द बाहशा तनकन्याचा प्रयन्त करतो... पन त्याल कुहुप वेल लग्तो. मलआ तुमचयशे भबह्र कहे बोलयचे असेल. तर ते बह्रबहर तनकतना अशुद्द होते. पन प्लिस मझया भवना समजुन ग्य्हा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

आडनावभगिनीची आठवण

सूड
Tue, 10/22/2013 - 15:29 नवीन
तुमचं लिखाण वाचून मला मिपावरच्या माझ्या आडनावभगिनीची आठवण झाली. तुमच्यासारखंच लिहायची बिचारी. आता कुठे असेल देव जाणे. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बालगंधर्व

बाय द वे

सूड
Tue, 10/22/2013 - 15:31 नवीन
तुमची स्वाक्षरी प्रतिसादांपेक्षा अंमळ जास्त शुद्ध वाटते, फार कष्ट पडले असतील नै टंकायला!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बालगंधर्व

त्य चोप्य पस्ते अस्त्य !

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 10/24/2013 - 18:55 नवीन
त्य चोप्य पस्ते अस्त्य !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

शुद्धलेखनासाठी मदत

अमित खोजे
गुरुवार, 10/24/2013 - 00:28 नवीन
कदाचित हि लिंक तुम्हाला उपयोगाची ठरावी. येथे english मध्येच type करावे ते आपल्या मीपा च्या शुद्ध भाषेत उमटत राहील http://www.google.com/intl/mr/inputtools/cloud/try/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बालगंधर्व

तुम्च्यसर्खे ज्येश्थे स्द्स्य

मृत्युन्जय
Tue, 10/22/2013 - 16:12 नवीन
तुम्च्यसर्खे ज्येश्थे स्द्स्य ज्र असे वगयल लगले तर मिपचे कसे व्हयचे? न्विन स्द्स्यम्न प्रोतहन दययचे सोदुन तुम्हे त्यन दिस्चोउरगे क्र्त अहत. मि यच प्रोतेस्त क्र्तो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

कदाचित हि लिंक तुम्हाला

अमित खोजे
गुरुवार, 10/24/2013 - 00:30 नवीन
कदाचित हि लिंक तुम्हाला उपयोगाची ठरावी. येथे english मध्येच type करावे ते आपल्या मीपा च्या शुद्ध भाषेत उमटत राहील http://www.google.com/intl/mr/inputtools/cloud/try/ - changala dattya
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

.

उद्दाम
Wed, 10/23/2013 - 09:10 नवीन
मुद्द्यांवरुन शापकथा तयार करा . ( ५ गुण) वेदवती नावाच्या स्त्रीचा रावणाने विनयभंग केला --- रावणाला शाप , तुला मुलगी होईल ती तुझा नाश करेल --- रावण मंदोदरी लग्न ---- मुलगी ---- शाप आठवला --- रावणाने घाबरुन ती मुलगी पेटीत घातली --- पेटी शेतात फेकली --- ते शेत जनकाचे होते ---- ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बालगंधर्व

पेटी शेतात फेकली --- ते शेत

विजुभाऊ
Wed, 10/23/2013 - 13:13 नवीन
पेटी शेतात फेकली --- ते शेत जनकाचे होते रामाला नाशीकपासून लंकेत जायला सहा महिने लाग्ले. रावणाला पेटी लंकेपासून दूर मालदीव वगैरे भागात फेकता आली असती. किंबहुना शेतात फेकायच्या ऐवजी त्याने ती समुद्रात फेकली हे जास्त सयुक्तीक वाटेल. पेटी फेकायला तो अयोध्या शेजारच्या जनकाच्या राज्यापर्यन्त आला हे पटत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उद्दाम

हो ना इथे ही आजकाल कोण पण आणि कुठून पण...

मुक्त विहारि
Wed, 10/23/2013 - 13:39 नवीन
नाकातुन तीर मारतो... ते पण गहन विचार कर्रुन. अरे तो मुद्दाम शब्द राहिलाच की? तुम्ही मुद्दाम गहन विचार करत नाही असे मी किंचीत विचार करुन ठरवले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

.

उद्दाम
Wed, 10/23/2013 - 15:28 नवीन
राम चालत फिरत होता. रावण पुष्पक विमानातून फिरत होता. ( पुष्पक विमान नाकारणे हे म्हणजे तुम्ही नास्तिक / बुद्धीप्रामाण्यवदी /परधर्मीय / हिंदु विरोधी / चार्वाकवादी / ब्रिगेडी / डाव्या पक्षाचे / रिपब्लिक / काँग्रेसवादी / संघविरोधी / अंनिसवाले यापैकी काहीतरी आहात याचा पुरावा ठरेल. त्यामुळे या मताचा आदर ठेवलाच पाहिजे. )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

पुष्पक विमानाची फॅक्टरी

ग्रेटथिन्कर
Wed, 10/23/2013 - 15:54 नवीन
पुष्पक विमानाची फॅक्टरी चैनैजवळच सापडली आहे, असा हिंदुत्ववाद्यांचा दावा आहे. २००८ मधील 'द हिंदू 'या वृत्तपत्रातली बातमी इथे पहा.. खरेच आपल्याकडे विमानं होती का हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उद्दाम

बहुधा असे दिसते की

आनन्दा
Tue, 10/22/2013 - 14:55 नवीन
बहुतांश कथांमध्ये असे दिसते की इतरत्र मिळालेल्या वरदानांमुळे जेव्हा सम्बंधित लोक उद्दाम झाले आणि त्यांनी अन्न्याय्य वर्तन करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना शाप मिळालेत.. तेव्हा वरांचे प्रमाण शापांपेक्षा जास्त दिसते.. असो भाउ तुम्ही पण जरा सावध, नाहीतर तुम्हाला पण पंख कापण्याचा शाप मिळायचा :)
  • Log in or register to post comments

शापयादी आवडली. असेही

बॅटमॅन
Tue, 10/22/2013 - 14:59 नवीन
शापयादी आवडली. असेही कंपायलेशन करणे गरजेचे आहे. बाकी, उद्दू काका आणि ग्रेट्या हे दोघेही आरेसेस एजंट आहेत असे आमचे स्पष्ट म्हण्णे आहे. (बॅटविजय सिंह)
  • Log in or register to post comments

@ बॅट मॅन......

मुक्त विहारि
Tue, 10/22/2013 - 15:04 नवीन
त्यांना आरेसेस एजंट म्हणाल्या बद्दल णिषेध.... अरे बाबा इतके गहन विचारी नसतात बाबा आरेसेस एजंट.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

अहो पण आहेतच ते एजंट.

बॅटमॅन
Tue, 10/22/2013 - 15:06 नवीन
अहो पण आहेतच ते एजंट. विरोधभक्ती करून करून या पदाला प्राप्त झालेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

इअत्कया पर्तिकिरिया येउनही

बालगंधर्व
Tue, 10/22/2013 - 15:05 नवीन
इअत्कया पर्तिकिरिया येउनही मझया प्रस्न्हाच उत्तर कहे मिलल न।अ‍ॅ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

पन प्रस्न्ह क अहे? ते त्री

बॅटमॅन
Tue, 10/22/2013 - 15:10 नवीन
पन प्रस्न्ह क अहे? ते त्री संगा ओ. कं मागे रह्हताय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बालगंधर्व

महानुभाव पंथाच्या लीळाचरित्र

प्रसाद प्रसाद
Tue, 10/22/2013 - 17:30 नवीन
महानुभाव पंथाच्या लीळाचरित्र वाचतोय की काय असं वाटलं असली भाषा वाचून.........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

मोकलाया नामक लीळाचरित्रातून

बॅटमॅन
Tue, 10/22/2013 - 18:46 नवीन
मोकलाया नामक लीळाचरित्रातून उगम पावलेली भाषाये ही...तषीच अष्णार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद प्रसाद

हुम्म्म

इरसाल
Fri, 10/25/2013 - 15:28 नवीन
मोकळाया दिशा आमुच्या गेलो आम्ही रानात लोकांना मिळाला मोक्ष बसल्या बसल्या वावरात. भेंडी हाय काय त्यात जोडला ट ला ट झाली कं नाय कविता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

असेही कंपायलेशन करणे गरजेचे आहे.

प्रसाद गोडबोले
Tue, 10/22/2013 - 15:05 नवीन
असेही कंपायलेशन करणे गरजेचे आहे.
मग पहिल्यांदा मोक्ष मिळालेल्या लोकांची यादी करुयात =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

हा हा हा, अगदी अगदी बादवे

बॅटमॅन
Tue, 10/22/2013 - 15:09 नवीन
हा हा हा, अगदी अगदी =)) बादवे आपण कुणाला मोक्ष मिळवून दिला तर त्याचं यादीत नाव घातलं तर चालेल ना ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा