Skip to main content

हे शाश्वत ज्ञान नव्हे !

लेखक धन्या यांनी शुक्रवार, 18/10/2013 16:49 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या मटाच्या "वाचकांची पत्रे" विभागातील एका पत्राने लक्ष वेधून घेतले. पत्राचे शिर्षक होते, "हे शाश्वत ज्ञान नव्हे !". पत्राचे लेखक आहेत य. ना. वालावलकर. पत्र छोटेखानी असल्यामुळे इथे टंकतो: 'मानवतेचे तारणहार' हे स्फुट (मटा, ९ ऑक्टोबर) वाचले. त्यात म्हटले आहे, की अमेरिकेने आजवर जगाला सर्वाधिक नोबेल विजेते दिले. त्यांच्या शतांशानेही भारतीय नाहीत. नोबेल पारितोषिकाचा हा आनंद क्षणभंगुर आहे. खरा शाश्वत, चिरंतन, ब्रम्हानंद मोक्षप्राप्तीत असतो. तो अध्यात्मवादयांनाच लाभू शकतो. 'अध्यात्मज्ञाननित्यत्वं तत्वज्ञानार्थ दर्शनम | एतद ज्ञानमिती प्रोक्तं अज्ञानं त्दतो न्यथा|' म्हणजे अध्यात्मज्ञान हेच खरे ज्ञान. बाकी सगळे अज्ञान असे गीतेत स्पष्ट म्हटले आहे. यावरुन पेशीकार्याचे ज्ञान हे अज्ञान आहे हे सिद्ध होते. तसेच पेशी देहान असतात. देह नश्वर आहे. म्हणू पेशींविषयीचे ज्ञान शाश्वत नव्हे, हे उघड आहे. नोबेलचा उदोउदो करणार्‍यांना हे समजेल तो सुदिन म्हणायचा! नोबेल विजेत्यांत भारतीय नाव नाही याची खंत नसावी. जन्म मरणाचे फेरे चुकवून आजवर मोक्ष मिळवणार्‍यांची यादी काढली तर त्यात भारतीय नावे सर्वाधिक असतील, हे निश्चित. पत्र वाचले आणि पत्रलेखकाबद्दल वाईट वाटले. लोक कुठल्या भ्रमात जगत असतात आणि "ग्रंथप्रामाण्याच्या" गुलामगिरीचं जोखड किती आनंदाने वाहत असतात याचं हे पत्र प्रातिनिधीक उदाहरण ठरावं. पत्रलेखकाच्या दृष्टीने अध्यात्म काय असेल ते असो, त्यांनी भगवदगीतेची साक्ष काढून वैज्ञानिक ज्ञानाला ज्या पद्धतीने निकालात काढलं आहे ते मात्र खरंच विचार करायला लावण्यासारखं आहे.
नोबेल पारितोषिकाचा हा आनंद क्षणभंगुर आहे. खरा शाश्वत, चिरंतन, ब्रम्हानंद मोक्षप्राप्तीत असतो. तो अध्यात्मवादयांनाच लाभू शकतो.
आजच्या घडीला नोबेल पारितोषिक हे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैदयकशास्त्र, अर्थशास्त्र, साहित्य आणि शांतता या क्षेत्रांमधील जागतिक पातळीवरचे सर्वोच्च पारितोषिक आहे. पारितोषिक विजेत्या व्यक्त या आपल्याला पारितोषिक मिळावे म्हणून नोबेल पारितोषिकाच्या कुठल्या स्पर्धेत भाग घेत नसतात. किंबहूना पारितोषिक जाहीर होईपर्यंत त्या व्यक्तीला हे माहितीही नसतं. नोबेल पारितोषिक हे वर उल्लेख केलेल्या क्षेत्रातील दिग्गजांचा त्यांनी मानवजातीच्या भल्यासाठी केलेल्या कामाची पोच म्हणून दिले जाते. ते एक प्रकारचे त्या पारितोषिक विजेत्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणं असतं. अशा वेळी त्या विजेत्या व्यक्तीला होणारा आनंद क्षणभंगुर कसा असेल? पत्रलेखक म्हणतोय की खरा शाश्वत, चिरंतन, ब्रम्हानंद मोक्षप्राप्तीत असतो. तो अध्यात्मवादयांनाच लाभू शकतो. माझ्या अल्पमतीप्रमाणे हिंदू धर्मशास्त्रांनूसार मोक्ष म्हणजे जन्म-मरणाच्या फेर्‍यातून सुटका. थोडा वेळ चौर्‍यांऐंशी लक्ष योनी, पुनर्जन्म वगैरे गोष्टी आहेत की नाहीत हे बाजूला ठेऊन असं गृहीत धरुया की मोक्ष म्हणून काहितरी आहे. मग मोक्ष मिळवून आपली जन्म मरणाच्या फेर्‍यामधून सुटका झाल्याचा आनंद आणी आपण मानवजातीच्या उपयोगी पडल्यामुळे याची देही याची डोळा मिळालेल्या पारितोषिकाचा आनंद यात श्रेष्ठ काय?
म्हणजे अध्यात्मज्ञान हेच खरे ज्ञान. बाकी सगळे अज्ञान असे गीतेत स्पष्ट म्हटले आहे.
कधीतरी चार साडेचार हजार वर्षांपूर्वी लिहिलेल्या गीतेत जे म्हटलंय तेच खरं. त्यानंतर कुणी काहीही म्हणो, तो सगळा मुर्खपणा. पत्रलेखक संन्याशाचं जीवन जगत असेल, आधूनिक ज्गातील एकही सुविधा वापरत नसेल तरच या म्हणण्याला निदान त्याचापुरता अर्थ आहे. पण मला खात्री आहे, पत्रलेखक आधुनिक "अज्ञानाने" निर्माण केललेया कितीतरी वस्तू आपल्या दैनंदिन जीवनात वापरत असेल.
यावरुन पेशीकार्याचे ज्ञान हे अज्ञान आहे हे सिद्ध होते. तसेच पेशी देहान असतात. देह नश्वर आहे. म्हणू पेशींविषयीचे ज्ञान शाश्वत नव्हे, हे उघड आहे.
वैदयकशास्त्र, जीवशास्त्र हे थोतांड आहेत हाच या वाक्यांचा अर्थ.
नोबेलचा उदोउदो करणार्‍यांना हे समजेल तो सुदिन म्हणायचा! नोबेल विजेत्यांत भारतीय नाव नाही याची खंत नसावी.
जे काही शोध लावायचे, जे काही मानवजातीचे पांग फेडायचे ते त्या पाश्चिमात्यांना करु दया. आपण आपल्या ग्रंथांमध्ये जे लिहिलं आहे ते प्रमाण मानून "मोक्ष" मिळवूया.
जन्म मरणाचे फेरे चुकवून आजवर मोक्ष मिळवणार्‍यांची यादी काढली तर त्यात भारतीय नावे सर्वाधिक असतील, हे निश्चित.
अशी कुठली यादी असेल तर त्यातील नावे वाचायला निश्चितच आवडेल. तसेच त्या यादीतील व्यक्तींना खात्रीने मोक्ष मिळाला आहे हे कसे ठरवले हे ही वाचायला आवडेल.

वाचने 58041
प्रतिक्रिया 216

प्रतिक्रिया

In reply to by ग्रेटथिन्कर

"(मतिमंद असलेला आणि एका केसाचीही अक्कल नसलेला ... ग्रेटकुंथर)" चला नगु चा फायदा होत आहे असे वाटते.तरी पण ट्रोलिंगची सवय काही जात नाही.असो भारतात राहून प्रुथ्वी कशी काय बनवणार? हा प्रश्र्न आहेच...

मागे एका लेखावर धन्या ह्यांनी प्रतिक्रिया दिली होती कि त्यांनी ज्ञानेश्वरी वाचली अहे. परंतु त्यांना ती समजलेली नहि. ज्या माणसाला अध्यात्म हा विषयच समजलेला नाही त्याने त्या विषयावरचे लेख लिहावेत हाच मोठा विनोद अहे. बाकीच्या गोष्टींना अज्ञान म्हणणं हे बरोबर नहि. ह्याच्याशी मी सुधा सहमत अहेच. त्याला माहिती (Information) म्हणता येइल. माहिती म्हणजे अगोदरच अस्तित्वात असलेल्या असलेल्या गोष्टी शोधून काढणे . शास्त्रज्ञ शोध लावतात ते मुळातच असलेल्या गोष्टी शोधून काढतात . त्यांना नवीन निर्माण करता येत नहि. एखादी पूर्णता नवीन गोष्ट समजणे ह्याला ज्ञान म्हणतात . आणि हे फक्त अध्यात्मातच शक्य अहे. म्हणून बहुदा लेखकाने इतर गोष्टींना अज्ञान म्हणल असावं

In reply to by म्हैस

मागे एका लेखावर धन्या ह्यांनी प्रतिक्रिया दिली होती कि त्यांनी ज्ञानेश्वरी वाचली अहे.
हो.
परंतु त्यांना ती समजलेली नहि.
हे तुम्हाला कसं कळलं हे माहिती नाही. परंतू उत्तर हो असंच आहे. ज्ञानेश्वरी हा महासागर आहे. मज पामराच्यात तो महासागर पिण्याईतकी ताकद नाही. या महासागरातले जे काही थेंब माझ्या वाटयाला आले त्यात मी समाधानी आहे.
ज्या माणसाला अध्यात्म हा विषयच समजलेला नाही त्याने त्या विषयावरचे लेख लिहावेत हाच मोठा विनोद अहे.
मी अध्यात्मावर लेख लिहिलेला नसून अध्यात्माच्या नावाखाली आततायी मतांचा विरोध करणारा लेख लिहिला आहे.
बाकीच्या गोष्टींना अज्ञान म्हणणं हे बरोबर नहि. ह्याच्याशी मी सुधा सहमत अहेच. त्याला माहिती (Information) म्हणता येइल.
सहमत आहे.
माहिती म्हणजे अगोदरच अस्तित्वात असलेल्या असलेल्या गोष्टी शोधून काढणे .
अगोदरच अस्तित्वात असलेल्या गोष्टीचं आपल्याला जर आकलन नसेल तर ते अज्ञानच नाही का?
शास्त्रज्ञ शोध लावतात ते मुळातच असलेल्या गोष्टी शोधून काढतात . त्यांना नवीन निर्माण करता येत नहि.
हो. शास्त्रज्ञ निसर्गाच्या अज्ञात नियमांची उकल करतात आणि ती माहिती जगासमोर ठेवतात. ते नविन असं काही निर्माण करत नाहीत.
एखादी पूर्णता नवीन गोष्ट समजणे ह्याला ज्ञान म्हणतात . आणि हे फक्त अध्यात्मातच शक्य अहे. म्हणून बहुदा लेखकाने इतर गोष्टींना अज्ञान म्हणल असावं
अध्यात्माने ज्या गोष्टी पूर्णता नवीन समजल्या अशा फक्त तीन गोष्टी सांगा.

In reply to by धन्या

अध्यात्माने ज्या गोष्टी पूर्णता नवीन समजल्या अशा फक्त तीन गोष्टी सांगा. यासाठी आसाराम बापू यांच्या अध्यक्षते खाली एक खास अध्यात्म सेमिनार होणार आहे. त्यासाठी दिगीराजा स्वागताध्यक्ष असणार आहेत. गरीबी ही मानसिकता आहे याचीही उकल होणार आहे. हातात जादूची काठी नसलेला जिनियस म्हणजे काय याची उकल होणार आहे. कळावे....ओ बो बो बो बो ..... आमच्या मते अध्यात्माने तीन गोष्टी नव्याने कळतात. १. मी शाणा असून बाकी गाढव आहेत. २. अध्यात्म आधी त्म मधला त म्हणजे तू चा अभ्यास मग म म्हणजे माझा अभ्यास. ( ह्या व्युत्पतीबद्द्ल पवि वर्तक माफी करा हं ) ३. अथांग करमणुकीसाठी विज्ञान विरूद्ध अध्यात्म हा कव्वालीचा जंगी मुकाबला फुकट पहायला ऐकायला मिळतो.

In reply to by चौकटराजा

१. मी शाणा असून बाकी गाढव आहेत.
तुम्ही आयटीत असता तर गाढव शब्दाच्या जागी एक वेगळा शब्द वापरला असता.
२. अध्यात्म आधी त्म मधला त म्हणजे तू चा अभ्यास मग म म्हणजे माझा अभ्यास. ( ह्या व्युत्पतीबद्द्ल पवि वर्तक माफी करा हं )
विश्वात ठसवलेला तो विठ्ठल असं एक निरुपद्रवी संप्रदाय म्हणतो.
३. अथांग करमणुकीसाठी विज्ञान विरूद्ध अध्यात्म हा कव्वालीचा जंगी मुकाबला फुकट पहायला ऐकायला मिळतो.
याच्याशी लै वेळा सहमत.

ते यनावाला ते हेच का? तुम्ही सुद्धा असला लेख फाट्यावर मारण्याऐवजी इथे देऊन आणखी त्यावर काकू काढून नेमकं काय साधलं ? असो.

In reply to by शिल्पा ब

ते यनावाला ते हेच का?
ते अजूनही गुलदस्त्यात आहे.
तुम्ही सुद्धा असला लेख फाट्यावर मारण्याऐवजी इथे देऊन आणखी त्यावर काकू काढून नेमकं काय साधलं ? असो.
मिपावर जवळपास साडे-तीन वर्ष काढूनही तुम्हालाही हा प्रश्न पडावा ना. असोच.

काय झाले? यादी मिळाली का? --- ( ८४ लक्ष) योनीवाला उर्फ उद्दाम

In reply to by ग्रेटथिन्कर

नेहमीप्रमाणे, तुम्ही तुमच्या पुर्वजांचा फोटो पाठवला. असो, स्वतःची ओळख स्वतःच करून दिल्या बद्दल धन्यवाद.

In reply to by ग्रेटथिन्कर

भुताच्या तोन्डी रामनाम? हा चमत्कार कसा झाला?

In reply to by मुक्त विहारि

मुक्त विहारी आण्णा, ग्रेट्याचे उत्तर अगदीच चुकीचे नाही, जवळपास बरोबरच आहे. पुल नी तुज आहे तुजपाशी या नाटकात स्थितप्रज्ञ माणसाला गाढवाची उपमा दिलेली आहे. कारण मिठाई आणि उकीरड्यावरचा कागद ते एकाच भावनेने चघळते. स्थितपरज्ञ होणे ही मोक्षाची सुरुवात असावी कदाचित. त्यामुळे मोक्षाला गेलेल्या आत्म्याची अवस्थाही यापेक्षा फार वेगळी नसावी.

In reply to by उद्दाम

?

In reply to by मुक्त विहारि

हो कोणात जर सकारात्मक बदल झाला तर आपण आनंद मानुयात कसे.

In reply to by मुक्त विहारि

एक प्रसिद्ध वाक्य आहे, कुणाचं ते माहिती नाही. - किर्तनाने महाराष्ट्र सुधारला नाही आणि तमाशाने तो बिघडला नाही. दुसर्‍याच्या उपदेशाने, मग ते किती का सकारात्मक विचार असेनात माणूस सुधारत नाही. कारण माणसाच्या विचारांची झापडं अगदी घट्ट असतात. यदाकदाचित तो माणूस दाणकन कुठे आपटला, ती विचारांची झापडं फाटली तर त्याला वास्तव दिसतं आणि तो माणूस भानावर येतो. अन्यथा नाही. कारण ती विचारांची झापडं ही त्याची स्वतःच निर्माण केलेली खोटी प्रतिमा असते. ही स्वतःबद्दलची खोटी प्रतिमा त्याचं आतील तुटलेपण जगासमोर उघडं पडण्यापासून वाचवत असते. *हे सारं कुणा एका व्यक्तीला उद्देशून नाही.

In reply to by धन्या

"किर्तनाने महाराष्ट्र सुधारला नाही आणि तमाशाने तो बिघडला नाही." थोडी भर, "लाथा खावून पण गहन विचार करणे सोडले नाही आणि ट्रोल नांव पडले तरी प्रतिसाद देणे थांबवले नाही," असो,

In reply to by मुक्त विहारि

मी माणुस नाही ,मी गाढव आहे. स्थितप्रज्ञ गाढव!. मिपावर एक निराकार गाढव देखिल आहे. कधी कधी तर मला माणूस झाल्याची दुस्वप्न पडतात.

In reply to by अनिरुद्ध प

मी माणुस नाही ,मी गाढव आहे. स्थितप्रज्ञ गाढव!. मिपावर एक निराकार गाढव देखिल आहे. कधी कधी तर मला माणूस झाल्याची दुस्वप्न पडतात.

In reply to by ग्रेटथिन्कर

+०.०००००००००००००००००००००००००००००००००००००२ अजुन नगू घ्या.... थोडा थोडा फरक पडत आहे... पण थोडे पथ्य पण पाळा..... हे औषध घेतांना टंकनश्रम टाळावे लागतात...

नारायण ! नारायण ! ;) काय मंडळी झाली का आध्यात्मात पीएचडी ? ;) परत एकदा, नारायण ! नारायण ! ;)

हा धागा अध्यात्म आणि विज्ञान यावरची चर्चा आहे की कोंबडयांची झुंज हेच कळेनासे झालंय. या सोत्रींना काम नव्हतं. उगाचंच पातऴ चिखलात दगड मारला.

In reply to by धन्या

या सोत्रींना काम नव्हतं. उगाचंच पातऴ चिखलात दगड मारला.
हायला, ह्ये म्हंजे माझ्यावर अन्याय आहे. आता ह्याची दाद कोणाकडे मागा़यची? संमंकडे गेलो असतो पण तेही कंपुबाजांना मदत करतात असा 'विद्युत' वेगाने साक्षात्कार करुन दिला गेल्याने तोही मार्ग बंद. च्यामारी, तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी अवस्था झाली ही तर :( - (अन्यायग्रस्त) सोकाजी

बाकी कोणाचं म्हैत नै. पण इथली विचारप्रवर्तक चर्चा वाचून माझे डोळे दिपले. डोळे खाडकन उघडले, डोळे मिटले. आणि सदेह मोक्षप्राप्ती झाली. आता कोणाला मोक्ष मिळालेल्यांची यादी किंवा मुक्ती म्हणजे काय याचा अर्थ हवा असेल तर इच्छुकांनी मला व्यनि करावा. त्या आयडीला मोक्ष देण्यात येईल.

In reply to by पैसा

चला, मोक्ष मिळालेल्या मिपाकरांच्या यादीत तुमचे नाव टाकतो. धाला शुण्य शंबर, तुमचा पयला णंबर!!

बाकी हा धागा माझ्या सारख्या मोक्ष वगैरे सोडून ईतर क्षुल्लक गोष्टीत गुंतून राहणार्‍यासाठी नाहि. चीअर्स टू यू!! टाईम फोर अ लार्ज ऑण द रॉक्स ;)

पत्राचे लेखक आहेत य. ना. वालावलकर.
यनावाला ही यांची जालीय आयडि. यांच्या लेखनाशी परिचय असल्यावर हे शंभर टक्के उपहासच आहे, हे तुमच्या चटकन लक्षात यायला हवे होते. उपक्रमावर यनावालांचे भरपूर लेख होते.

In reply to by आनंदी गोपाळ

ते पत्र स्वतंत्रपणे वाचलं तर उपहास नक्कीच वाटत नाही. ज्यांना यनावाला यांची वैचारीक भुमिका माहिती आहे, त्यांची लेखनशैली माहिती आहे त्यांनाच हा उपहास आहे हे कळू शकलं असतं.

अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यात क्रोधापेक्षा करुणेची व उपहासापेक्षा आपुलकीची गरज जास्त असते.हे दाभोलकरांनी वारंवार सांगितले आहे. अंनिस च्या उत्साही कार्यकर्त्यांकडून ते दर वेळी होतेच असे नाही हा भाग वेगळा. यनावालांच्या पत्रा ठासून उपहास भरला आहे हे फक्त जाणकाराला कळते. पण तो उपहासाचा उत्तम नमुना आहे हे मात्र निर्विवाद.

In reply to by प्रकाश घाटपांडे

यनावालांच्या पत्रा ठासून उपहास भरला आहे हे फक्त जाणकाराला कळते. पण तो उपहासाचा उत्तम नमुना आहे हे मात्र निर्विवाद.
माझा या मताला आक्षेप आहे. त्या पत्राला "यनावाला" यांच्या जालीय लेखनाचा संदर्भ लावला नाही तर पत्राचा मसुदा उपहासाचा आहे हे कळायला काहीच मार्ग नाही. रच्याकने काका तुम्हाला भेटायचं आहे. कधी जमू शकेल?

In reply to by धन्या

त्या पत्राला "यनावाला" यांच्या जालीय लेखनाचा संदर्भ लावला नाही तर पत्राचा मसुदा उपहासाचा आहे हे कळायला काहीच मार्ग नाही.
हे बरोबर आहे. माझी बायको देखील हे पत्र वाचल्यावर चक्रावली. तिने अगोदरचे यनावालांचे सगुण निर्गुण मधील लेख वाचलेले असुन सुद्धा! मला जाणकार म्हणजे यनावालांच्या लेखनाला जाणणारा अशा अर्थाने म्हणा्यच होत. बाकी कवा बी! भेटू तुपल्याला सुटी आसन तव्हा!

@धन्या -
अध्यात्माने ज्या गोष्टी पूर्णता नवीन समजल्या अशा फक्त तीन गोष्टी सांगा.
अश्या गोष्टी सांगता आल्या असत्या तर त्याला 'आत्मज्ञान' म्हणायची गरजच काय होती? स्वतच स्वताला स्वताबद्दल झालेलं ज्ञान त्याला आत्मज्ञान म्हणतात . त्यालाच मुक्ती, मोक्ष , आत्मसाक्षात्कार , ईश्वर साक्षात्कार असा म्हणतात . आत्मज्ञान हे कोणीही कोणालाही सांगू, देवू शकत नाही ते आपल आपल्यालाच मिळवाव लागत . ते मिळवण्याचा फक्त मार्ग दाखवता येतो. दुसरी गोष्ट अशी कि ज्ञान हे सर्वश्रेष्ठ असल्यामुळे त्याची टिंगल , टवाळी करणार्यांपुढे ते जाहीर करायला मुळीच परवानगी नहि. ( (उदा: मि. पा . वर) वरील वाक्य तुम्हांला नहि. टवाळ खोरांसाठी अहे.

In reply to by म्हैस

ज्ञान वाटल्याने वाढते असा म्हणतात त्याचं काय करावं मग ? टिंगल टवाळ्या करणारे अनेक भेटतील तेवा ज्ञानाचं प्रदर्शन न करून त्याचं काय लोणचं घालणार का ?

In reply to by बलि

बलिशेठ या गोष्टी तुम्हला नाही कळायच्या. त्यासाठी आत्मज्ञान किंवा साक्षात्कार वगैरे व्हावा लागतो.
जे जे आपणांसी ठावे । ते ते दुसऱ्यांसी सांगावे । शहाणे करुन सोडावे । सकळ जन ।।
हे समर्थांचे वचन फक्त दासबोधाचे पारायण करताना वाचायचे असते. आचरणात आणायलाच हवे असे काही नाही.

In reply to by म्हैस

दुसरी गोष्ट अशी कि ज्ञान हे सर्वश्रेष्ठ असल्यामुळे त्याची टिंगल , टवाळी करणार्यांपुढे ते जाहीर करायला मुळीच परवानगी नहि. ( (उदा: मि. पा . वर)
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२|| असं ज्ञानदेव ज्ञानेश्वरीच्या पसायदानात म्हणतात. आता टींगळ टवाळी करणार्‍यांना जर हे सर्वश्रेष्ठ ज्ञान दिलं नाही तर त्यांच्या वाईट विचारांचा नाश होऊन त्यांच्या मनात चांगले विचार निर्माण होणार कसे?

हे तुमचं विवेचन म्हणजे गीतेतल्या श्लोकाला बरोबर ठरवण्यासाठी केलेली सारवासारव वाटली.. एका अर्थाने हेही ग्रंथप्रामाण्यच की!!
गीतेतल्या श्लोकाला बरोबर , चूक ठरवणारे आम्ही कोण? गीता हि काय एखादी कविता आहे का? आणि ती सांगणारा एखादा सामान्य मनुष्य आहे का?

In reply to by अत्रुप्त आत्मा

ते पूर्ण पोचलेले आहेत त्यामुळे त्यांना काssssssही फरक पडत नाही... हो की नाही थिंकरकाका ('क'च लिहिला आहे, 'ल' नाही आणि एकच आहे जोडाक्षर नाही) ! :)

In reply to by म्हैस

गीता हि काय एखादी कविता आहे का?
तांत्रिकदृष्ट्या उत्तर हो असंच आहे. गीता ही महाभारत या महाकाव्याचा भीष्मपर्वातील भाग आहे. त्यामुळे गीता या भागाला महाकाव्याच्या छोटया भागाला काव्य किंवा कविता नक्कीच म्हणता येईल.

In reply to by संजय क्षीरसागर

माझ्याकडे मनाच्या श्लोकांच्या दोन सीडीज आहेत. एका सीडीतील श्लोक अनुराधा पौडवाल यांनी गायले आहेत तर दुसर्‍या सीडीतील श्लोक सुरेश वाडकर यांनी. कव्हर्सवर त्या त्या गायकांची चित्रे आहेत.

माझी खात्री होत चाललीय की द्वैतात घेतलेले अतिसामान्य ज्ञानाने आम्ही मंदबुद्धी आहोत.जरा कुठल्या सरितेकिनारी किंवा वृक्षातळी पथारी पसरावयास हवी होती. भेंडी काय चाल्लय अनं काय नाही हेच कळेनासे झालयं! (हे चारमिनार अ‍ॅस्बेसटॉसच्या पत्र्याच्या जाहिराती सारखे वाचावे....कसला विचार करतोस रामय्या......)

काय ठरलं? उपहास, विरोधाभास का टाईमपास? ;) १९९. अब द्विशतक के लिये केवल एक रन की आवश्यकता. -प्यारेमदनलाल

In reply to by मोदक

अंपायर ने थर्ड अंपायर के तरफ इशारा किया है... (सेफ गेम खेलने वाला अंपायर है) नतीजा साफ है, २३. १६ को अर्धवटराव का प्रतिसाद आया है और मोदक का प्रतिसाद २३.२३ को. जाहीर है २०० वाँ रन लेने में पहले कामयाब हुए है अर्धवटराव. मोदक जी से गुजारिश है के वो बिना मायुस हुए ऐसे ही प्रतिसाद देते रहे! दॅट्स ऑल फॉर द नाईट फॉर इन्डियन्स अ‍ॅन्ड डे फॉर अमेरिकन्स. :) हॅव अ ग्रेट अ‍ॅज अ‍ॅप्लिकेबल.... ;)

In reply to by प्यारे१

मी म्हणतो आहे ना माझा प्रतिसाद २०० वा आहे.. मग..?? तू कितीपण लॉजीकल मुद्दे काढ. माझाच्च प्रतिसाद २०० वा ठरेल. ओके..?

In reply to by मोदक

अरे हो! बॅट तुझी नसली तरी बळकावलेली आहेस नाही का! मग काय तू म्हणशील तीच दिशा. (कोण रे तो परसाकडची म्हणतोय?)

In reply to by प्यारे१

एखादा खेळ आवडत नाही म्हणून बॅटमॅन सारख्या गुणी बाळाची आणि महाराष्ट्राचा मानबिंदू असलेल्या कोकण विभागाची निंदानालस्ती करणे चूक आहे.

In reply to by मोदक

जल्ला इषय काय होता? एक बॅट शब्द वाचून आक्ख्या बॅटमॅनला गुणी बाळ म्हणणं नि परसदार वाचून .... (इथे मी शांत बसलोय बरं का पैसातै, स्पावड्ञा, नि तमाम कोकणवासीयांनो) चूक आहे. ;)

In reply to by प्यारे१

जल्ला इषय काय होता? परंपरा प्यारे.. परंपरा. (येथे टुक्कार कखुकग मधल्या अतीटुक्कार* ह्रितीक रोशन च्या आवाजाचा फील आणावा) *हे ही मत प्यारेचेच!! ;-)

In reply to by पैसा

तसंच ठरलंय ना? ;) बाकी आम्हा वाईकरांसाठी वाईवरुनच सातारा. इट्स जस्ट पर्स्पेक्टिह यु सी!