✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

हे शाश्वत ज्ञान नव्हे !

ध
धन्या यांनी
Fri, 10/18/2013 - 16:49  ·  लेख
लेख
आजच्या मटाच्या "वाचकांची पत्रे" विभागातील एका पत्राने लक्ष वेधून घेतले. पत्राचे शिर्षक होते, "हे शाश्वत ज्ञान नव्हे !". पत्राचे लेखक आहेत य. ना. वालावलकर. पत्र छोटेखानी असल्यामुळे इथे टंकतो: 'मानवतेचे तारणहार' हे स्फुट (मटा, ९ ऑक्टोबर) वाचले. त्यात म्हटले आहे, की अमेरिकेने आजवर जगाला सर्वाधिक नोबेल विजेते दिले. त्यांच्या शतांशानेही भारतीय नाहीत. नोबेल पारितोषिकाचा हा आनंद क्षणभंगुर आहे. खरा शाश्वत, चिरंतन, ब्रम्हानंद मोक्षप्राप्तीत असतो. तो अध्यात्मवादयांनाच लाभू शकतो. 'अध्यात्मज्ञाननित्यत्वं तत्वज्ञानार्थ दर्शनम | एतद ज्ञानमिती प्रोक्तं अज्ञानं त्दतो न्यथा|' म्हणजे अध्यात्मज्ञान हेच खरे ज्ञान. बाकी सगळे अज्ञान असे गीतेत स्पष्ट म्हटले आहे. यावरुन पेशीकार्याचे ज्ञान हे अज्ञान आहे हे सिद्ध होते. तसेच पेशी देहान असतात. देह नश्वर आहे. म्हणू पेशींविषयीचे ज्ञान शाश्वत नव्हे, हे उघड आहे. नोबेलचा उदोउदो करणार्‍यांना हे समजेल तो सुदिन म्हणायचा! नोबेल विजेत्यांत भारतीय नाव नाही याची खंत नसावी. जन्म मरणाचे फेरे चुकवून आजवर मोक्ष मिळवणार्‍यांची यादी काढली तर त्यात भारतीय नावे सर्वाधिक असतील, हे निश्चित. पत्र वाचले आणि पत्रलेखकाबद्दल वाईट वाटले. लोक कुठल्या भ्रमात जगत असतात आणि "ग्रंथप्रामाण्याच्या" गुलामगिरीचं जोखड किती आनंदाने वाहत असतात याचं हे पत्र प्रातिनिधीक उदाहरण ठरावं. पत्रलेखकाच्या दृष्टीने अध्यात्म काय असेल ते असो, त्यांनी भगवदगीतेची साक्ष काढून वैज्ञानिक ज्ञानाला ज्या पद्धतीने निकालात काढलं आहे ते मात्र खरंच विचार करायला लावण्यासारखं आहे.
नोबेल पारितोषिकाचा हा आनंद क्षणभंगुर आहे. खरा शाश्वत, चिरंतन, ब्रम्हानंद मोक्षप्राप्तीत असतो. तो अध्यात्मवादयांनाच लाभू शकतो.
आजच्या घडीला नोबेल पारितोषिक हे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैदयकशास्त्र, अर्थशास्त्र, साहित्य आणि शांतता या क्षेत्रांमधील जागतिक पातळीवरचे सर्वोच्च पारितोषिक आहे. पारितोषिक विजेत्या व्यक्त या आपल्याला पारितोषिक मिळावे म्हणून नोबेल पारितोषिकाच्या कुठल्या स्पर्धेत भाग घेत नसतात. किंबहूना पारितोषिक जाहीर होईपर्यंत त्या व्यक्तीला हे माहितीही नसतं. नोबेल पारितोषिक हे वर उल्लेख केलेल्या क्षेत्रातील दिग्गजांचा त्यांनी मानवजातीच्या भल्यासाठी केलेल्या कामाची पोच म्हणून दिले जाते. ते एक प्रकारचे त्या पारितोषिक विजेत्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणं असतं. अशा वेळी त्या विजेत्या व्यक्तीला होणारा आनंद क्षणभंगुर कसा असेल? पत्रलेखक म्हणतोय की खरा शाश्वत, चिरंतन, ब्रम्हानंद मोक्षप्राप्तीत असतो. तो अध्यात्मवादयांनाच लाभू शकतो. माझ्या अल्पमतीप्रमाणे हिंदू धर्मशास्त्रांनूसार मोक्ष म्हणजे जन्म-मरणाच्या फेर्‍यातून सुटका. थोडा वेळ चौर्‍यांऐंशी लक्ष योनी, पुनर्जन्म वगैरे गोष्टी आहेत की नाहीत हे बाजूला ठेऊन असं गृहीत धरुया की मोक्ष म्हणून काहितरी आहे. मग मोक्ष मिळवून आपली जन्म मरणाच्या फेर्‍यामधून सुटका झाल्याचा आनंद आणी आपण मानवजातीच्या उपयोगी पडल्यामुळे याची देही याची डोळा मिळालेल्या पारितोषिकाचा आनंद यात श्रेष्ठ काय?
म्हणजे अध्यात्मज्ञान हेच खरे ज्ञान. बाकी सगळे अज्ञान असे गीतेत स्पष्ट म्हटले आहे.
कधीतरी चार साडेचार हजार वर्षांपूर्वी लिहिलेल्या गीतेत जे म्हटलंय तेच खरं. त्यानंतर कुणी काहीही म्हणो, तो सगळा मुर्खपणा. पत्रलेखक संन्याशाचं जीवन जगत असेल, आधूनिक ज्गातील एकही सुविधा वापरत नसेल तरच या म्हणण्याला निदान त्याचापुरता अर्थ आहे. पण मला खात्री आहे, पत्रलेखक आधुनिक "अज्ञानाने" निर्माण केललेया कितीतरी वस्तू आपल्या दैनंदिन जीवनात वापरत असेल.
यावरुन पेशीकार्याचे ज्ञान हे अज्ञान आहे हे सिद्ध होते. तसेच पेशी देहान असतात. देह नश्वर आहे. म्हणू पेशींविषयीचे ज्ञान शाश्वत नव्हे, हे उघड आहे.
वैदयकशास्त्र, जीवशास्त्र हे थोतांड आहेत हाच या वाक्यांचा अर्थ.
नोबेलचा उदोउदो करणार्‍यांना हे समजेल तो सुदिन म्हणायचा! नोबेल विजेत्यांत भारतीय नाव नाही याची खंत नसावी.
जे काही शोध लावायचे, जे काही मानवजातीचे पांग फेडायचे ते त्या पाश्चिमात्यांना करु दया. आपण आपल्या ग्रंथांमध्ये जे लिहिलं आहे ते प्रमाण मानून "मोक्ष" मिळवूया.
जन्म मरणाचे फेरे चुकवून आजवर मोक्ष मिळवणार्‍यांची यादी काढली तर त्यात भारतीय नावे सर्वाधिक असतील, हे निश्चित.
अशी कुठली यादी असेल तर त्यातील नावे वाचायला निश्चितच आवडेल. तसेच त्या यादीतील व्यक्तींना खात्रीने मोक्ष मिळाला आहे हे कसे ठरवले हे ही वाचायला आवडेल.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
57913 वाचन

💬 प्रतिसाद (216)

प्रतिक्रिया

....ये मेराईच्च्च्च्च्च्च्च

मोदक
गुरुवार, 10/24/2013 - 02:53 नवीन
....ये मेराईच्च्च्च्च्च्च्च निर्विवाद प्रतिसाद और वाचक आंदोलीत!!!! २००.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

अंपायर ने थर्ड अंपायर के तरफ

प्यारे१
गुरुवार, 10/24/2013 - 03:04 नवीन
अंपायर ने थर्ड अंपायर के तरफ इशारा किया है... (सेफ गेम खेलने वाला अंपायर है) नतीजा साफ है, २३. १६ को अर्धवटराव का प्रतिसाद आया है और मोदक का प्रतिसाद २३.२३ को. जाहीर है २०० वाँ रन लेने में पहले कामयाब हुए है अर्धवटराव. मोदक जी से गुजारिश है के वो बिना मायुस हुए ऐसे ही प्रतिसाद देते रहे! दॅट्स ऑल फॉर द नाईट फॉर इन्डियन्स अ‍ॅन्ड डे फॉर अमेरिकन्स. :) हॅव अ ग्रेट अ‍ॅज अ‍ॅप्लिकेबल.... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

मी म्हणतो आहे ना माझा

मोदक
गुरुवार, 10/24/2013 - 03:11 नवीन
मी म्हणतो आहे ना माझा प्रतिसाद २०० वा आहे.. मग..?? तू कितीपण लॉजीकल मुद्दे काढ. माझाच्च प्रतिसाद २०० वा ठरेल. ओके..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

अरे हो! बॅट तुझी नसली तरी

प्यारे१
गुरुवार, 10/24/2013 - 03:22 नवीन
अरे हो! बॅट तुझी नसली तरी बळकावलेली आहेस नाही का! मग काय तू म्हणशील तीच दिशा. (कोण रे तो परसाकडची म्हणतोय?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

एखादा खेळ आवडत नाही म्हणून

मोदक
गुरुवार, 10/24/2013 - 03:24 नवीन
एखादा खेळ आवडत नाही म्हणून बॅटमॅन सारख्या गुणी बाळाची आणि महाराष्ट्राचा मानबिंदू असलेल्या कोकण विभागाची निंदानालस्ती करणे चूक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

जल्ला इषय काय होता?

प्यारे१
गुरुवार, 10/24/2013 - 03:28 नवीन
जल्ला इषय काय होता? एक बॅट शब्द वाचून आक्ख्या बॅटमॅनला गुणी बाळ म्हणणं नि परसदार वाचून .... (इथे मी शांत बसलोय बरं का पैसातै, स्पावड्ञा, नि तमाम कोकणवासीयांनो) चूक आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

जल्ला इषय काय होता?

मोदक
गुरुवार, 10/24/2013 - 03:35 नवीन
जल्ला इषय काय होता? परंपरा प्यारे.. परंपरा. (येथे टुक्कार कखुकग मधल्या अतीटुक्कार* ह्रितीक रोशन च्या आवाजाचा फील आणावा) *हे ही मत प्यारेचेच!! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

काय चाल्लंय प्यारेकाका आँ?

बॅटमॅन
गुरुवार, 10/24/2013 - 11:01 नवीन
काय चाल्लंय प्यारेकाका आँ? अल्जीरियन अच्रत काडीसम्राट कुतले!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

काय ओ?

पैसा
गुरुवार, 10/24/2013 - 12:41 नवीन
वाईवरून सातारा गाठलंत का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

तसंच ठरलंय ना?

प्यारे१
गुरुवार, 10/24/2013 - 15:19 नवीन
तसंच ठरलंय ना? ;) बाकी आम्हा वाईकरांसाठी वाईवरुनच सातारा. इट्स जस्ट पर्स्पेक्टिह यु सी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

बाइज और एक्सट्रा रनो की वजह

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 10/24/2013 - 08:35 नवीन
बाइज और एक्सट्रा रनो की वजह से ,धागे ने २०० की रन संख्या पूरी कर ली है। ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

हाय्ला

इरसाल
गुरुवार, 10/24/2013 - 09:47 नवीन
इठं ईशांन शरमा कोन हे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

हा धागा मला संपूर्ण कळला आहे

खटपट्या
गुरुवार, 10/24/2013 - 04:31 नवीन
हा धागा मला संपूर्ण कळला आहे - माझे घोर अज्ञान ------गाढवांच्या यादीत स्थान मिळवू इच्छिणारा एक.
  • Log in or register to post comments

ज्ञान वाटल्याने वाढते असा

म्हैस
गुरुवार, 10/24/2013 - 15:20 नवीन
ज्ञान वाटल्याने वाढते असा म्हणतात त्याचं काय करावं मग ? टिंगल टवाळ्या करणारे अनेक भेटतील तेवा ज्ञानाचं प्रदर्शन न करून त्याचं काय लोणचं घालणार का ?
स्पष्टपणे सांगूनही तुमच्या डोक्यात अजून शिरलेलं दिसत नाहीये ज्ञानाचं प्रदर्शन न केल्याने ज्ञानी माणसाला काहीच फरक पडत नहि. त्यात नुकसान टवाळ खोरंचाच आहे . मी हे हि म्हणलाय कि ज्ञान मिळवण्याचा मार्ग दाखवता येतो. तुम्हाला स्वताला काही करायला नको. फुकटात हवंय का सगळं . उदाहरण द्यायचं झालं तर : भर उन्हाळ्यात एखादा माणूस दमून येतो. त्याला तहान लागली अहे. घसा कोरडा पडला अहे. अश्यावेळी थंडगार पाणी प्यायल्यावर जी तृप्ती मिळते ती तुम्ही त्याला शब्दांमध्ये कितीही सांगितली तरी, जो पर्यंत तो स्वत पाणी पिवून तहान भागवत नाही तो पर्यंत त्याला समजणार आहे का? ज्ञानाचं असंच आहे . अजूनही शंका असतील तर आता एकच उपाय आहे . स्वतः ज्ञान मिळवायचं आणि चेक करायचं माझं म्हणण बरोबर आहे कि चुक.
  • Log in or register to post comments

दै.सकाळ मधे ( पुणे आवृत्ती)

प्रकाश घाटपांडे
Fri, 10/25/2013 - 09:32 नवीन
दै.सकाळ मधे ( पुणे आवृत्ती) वाचकांच्या पत्रात प्रा. य.ना.वालावलकर यांचे फलज्योतिष ही अंधश्रद्धाच असे मत व्यक्त करणारे पत्र आले आहे. प्रा. य.ना.वालावालकर हे कठोर बुद्धीवादी म्हणुन ओळखले जातात ते यामुळेच. त्याचा दुवा http://epaper.esakal.com/sakal/24Oct2013/Normal/PuneCity/page6.htm
  • Log in or register to post comments

ते असू द्या

संजय क्षीरसागर
Fri, 10/25/2013 - 18:35 नवीन
इथे मात्र ते उत्तर देऊ शकले नाहीत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा