Skip to main content

हे शाश्वत ज्ञान नव्हे !

लेखक धन्या यांनी शुक्रवार, 18/10/2013 16:49 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या मटाच्या "वाचकांची पत्रे" विभागातील एका पत्राने लक्ष वेधून घेतले. पत्राचे शिर्षक होते, "हे शाश्वत ज्ञान नव्हे !". पत्राचे लेखक आहेत य. ना. वालावलकर. पत्र छोटेखानी असल्यामुळे इथे टंकतो: 'मानवतेचे तारणहार' हे स्फुट (मटा, ९ ऑक्टोबर) वाचले. त्यात म्हटले आहे, की अमेरिकेने आजवर जगाला सर्वाधिक नोबेल विजेते दिले. त्यांच्या शतांशानेही भारतीय नाहीत. नोबेल पारितोषिकाचा हा आनंद क्षणभंगुर आहे. खरा शाश्वत, चिरंतन, ब्रम्हानंद मोक्षप्राप्तीत असतो. तो अध्यात्मवादयांनाच लाभू शकतो. 'अध्यात्मज्ञाननित्यत्वं तत्वज्ञानार्थ दर्शनम | एतद ज्ञानमिती प्रोक्तं अज्ञानं त्दतो न्यथा|' म्हणजे अध्यात्मज्ञान हेच खरे ज्ञान. बाकी सगळे अज्ञान असे गीतेत स्पष्ट म्हटले आहे. यावरुन पेशीकार्याचे ज्ञान हे अज्ञान आहे हे सिद्ध होते. तसेच पेशी देहान असतात. देह नश्वर आहे. म्हणू पेशींविषयीचे ज्ञान शाश्वत नव्हे, हे उघड आहे. नोबेलचा उदोउदो करणार्‍यांना हे समजेल तो सुदिन म्हणायचा! नोबेल विजेत्यांत भारतीय नाव नाही याची खंत नसावी. जन्म मरणाचे फेरे चुकवून आजवर मोक्ष मिळवणार्‍यांची यादी काढली तर त्यात भारतीय नावे सर्वाधिक असतील, हे निश्चित. पत्र वाचले आणि पत्रलेखकाबद्दल वाईट वाटले. लोक कुठल्या भ्रमात जगत असतात आणि "ग्रंथप्रामाण्याच्या" गुलामगिरीचं जोखड किती आनंदाने वाहत असतात याचं हे पत्र प्रातिनिधीक उदाहरण ठरावं. पत्रलेखकाच्या दृष्टीने अध्यात्म काय असेल ते असो, त्यांनी भगवदगीतेची साक्ष काढून वैज्ञानिक ज्ञानाला ज्या पद्धतीने निकालात काढलं आहे ते मात्र खरंच विचार करायला लावण्यासारखं आहे.
नोबेल पारितोषिकाचा हा आनंद क्षणभंगुर आहे. खरा शाश्वत, चिरंतन, ब्रम्हानंद मोक्षप्राप्तीत असतो. तो अध्यात्मवादयांनाच लाभू शकतो.
आजच्या घडीला नोबेल पारितोषिक हे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैदयकशास्त्र, अर्थशास्त्र, साहित्य आणि शांतता या क्षेत्रांमधील जागतिक पातळीवरचे सर्वोच्च पारितोषिक आहे. पारितोषिक विजेत्या व्यक्त या आपल्याला पारितोषिक मिळावे म्हणून नोबेल पारितोषिकाच्या कुठल्या स्पर्धेत भाग घेत नसतात. किंबहूना पारितोषिक जाहीर होईपर्यंत त्या व्यक्तीला हे माहितीही नसतं. नोबेल पारितोषिक हे वर उल्लेख केलेल्या क्षेत्रातील दिग्गजांचा त्यांनी मानवजातीच्या भल्यासाठी केलेल्या कामाची पोच म्हणून दिले जाते. ते एक प्रकारचे त्या पारितोषिक विजेत्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणं असतं. अशा वेळी त्या विजेत्या व्यक्तीला होणारा आनंद क्षणभंगुर कसा असेल? पत्रलेखक म्हणतोय की खरा शाश्वत, चिरंतन, ब्रम्हानंद मोक्षप्राप्तीत असतो. तो अध्यात्मवादयांनाच लाभू शकतो. माझ्या अल्पमतीप्रमाणे हिंदू धर्मशास्त्रांनूसार मोक्ष म्हणजे जन्म-मरणाच्या फेर्‍यातून सुटका. थोडा वेळ चौर्‍यांऐंशी लक्ष योनी, पुनर्जन्म वगैरे गोष्टी आहेत की नाहीत हे बाजूला ठेऊन असं गृहीत धरुया की मोक्ष म्हणून काहितरी आहे. मग मोक्ष मिळवून आपली जन्म मरणाच्या फेर्‍यामधून सुटका झाल्याचा आनंद आणी आपण मानवजातीच्या उपयोगी पडल्यामुळे याची देही याची डोळा मिळालेल्या पारितोषिकाचा आनंद यात श्रेष्ठ काय?
म्हणजे अध्यात्मज्ञान हेच खरे ज्ञान. बाकी सगळे अज्ञान असे गीतेत स्पष्ट म्हटले आहे.
कधीतरी चार साडेचार हजार वर्षांपूर्वी लिहिलेल्या गीतेत जे म्हटलंय तेच खरं. त्यानंतर कुणी काहीही म्हणो, तो सगळा मुर्खपणा. पत्रलेखक संन्याशाचं जीवन जगत असेल, आधूनिक ज्गातील एकही सुविधा वापरत नसेल तरच या म्हणण्याला निदान त्याचापुरता अर्थ आहे. पण मला खात्री आहे, पत्रलेखक आधुनिक "अज्ञानाने" निर्माण केललेया कितीतरी वस्तू आपल्या दैनंदिन जीवनात वापरत असेल.
यावरुन पेशीकार्याचे ज्ञान हे अज्ञान आहे हे सिद्ध होते. तसेच पेशी देहान असतात. देह नश्वर आहे. म्हणू पेशींविषयीचे ज्ञान शाश्वत नव्हे, हे उघड आहे.
वैदयकशास्त्र, जीवशास्त्र हे थोतांड आहेत हाच या वाक्यांचा अर्थ.
नोबेलचा उदोउदो करणार्‍यांना हे समजेल तो सुदिन म्हणायचा! नोबेल विजेत्यांत भारतीय नाव नाही याची खंत नसावी.
जे काही शोध लावायचे, जे काही मानवजातीचे पांग फेडायचे ते त्या पाश्चिमात्यांना करु दया. आपण आपल्या ग्रंथांमध्ये जे लिहिलं आहे ते प्रमाण मानून "मोक्ष" मिळवूया.
जन्म मरणाचे फेरे चुकवून आजवर मोक्ष मिळवणार्‍यांची यादी काढली तर त्यात भारतीय नावे सर्वाधिक असतील, हे निश्चित.
अशी कुठली यादी असेल तर त्यातील नावे वाचायला निश्चितच आवडेल. तसेच त्या यादीतील व्यक्तींना खात्रीने मोक्ष मिळाला आहे हे कसे ठरवले हे ही वाचायला आवडेल.

वाचने 58041
प्रतिक्रिया 216

प्रतिक्रिया

पत्र विनोदी आहे. बाकी पत्रातले विचार हे अध्यात्मशास्त्राच्या दृष्टीने देखील पोषक नाहीत. उगाच्च आव आणला आहे असं व्यक्तीशः वाटतं. व्यवहारामध्ये व्यवहार पाळावाच. तो तसा पाळावा लागतोच. कुठल्याही संन्याशाला सुद्धा नित्यकर्मे करावीच लागतात. लेखामध्ये व्यक्त केलेल्या विचारांशी बहुतांशी सहमत आहे. धन्यवाद.

In reply to by प्यारे१

थोडा खुलासा : पत्रातले शब्द कितीही चुकीचे वाटत असले जसा धन्याशेठनं अर्थ काढला आहे तरी ते शब्द तसे नाहीत. फक्त ते 'अस्थानी' आहेत. म्हणून पत्र विनोदी म्हटलेलं आहे. मानवी जीवन जगत असताना वरचे सगळे लोक निव्वळ नोबेल मिळालं म्हणून श्रेष्ठ असं नाही. ते श्रेष्ठ आहेत म्हणून नोबेल मिळालं आहे, आत्यंतिक त्यागाचं मूर्तीमंत उदाहरण असतात हे लोक. ह्यातलं १०-२० % सामान्य लोकांनी जरी स्वीकारुन मार्ग अवलंबला तरी अध्यात्मप्रांतात सुद्धा प्रचंड प्रगती होईल. ५००० वर्षांपूर्वी लिहीलेल्या गीतेमध्ये (नायकाचा रोल लक्षात घेतला नि आपल्याला त्या जागी बसवताना आनुषंगिक बदल केले तर) आजही त्याच प्रकारे तत्त्वज्ञान लागू पडतं हे लक्षात घेण्याची गरज आहे. विज्ञान नि तंत्रज्ञान ह्यामध्ये धन्याशेठनी गल्लत केलेली आहे. विज्ञानाचे अ‍ॅप्लिकेशन्स वापरुनच पुढचा भाग होतो म्हणून विज्ञान मूलतः बदलत नाही तसंच तत्त्वज्ञानातला वरचा कथाभाग काढला तरी तत्त्वज्ञान शाश्वत राहील. नोबेल पुरस्कार मिळाल्याने अथवा संशोधनाने सुद्धा मिळ्णारा आनंद कितीही मोठा असला तरी निश्चितच मोक्षप्राप्तीपेक्षा थिटा आहे. अस्थानी उल्लेखांमुळे नि पत्रलेखकाच्या इन्टरप्रिटेशन मुळे विषय विनोदी वाटत आहे एवढंच.

In reply to by प्यारे१

मानवी जीवन जगत असताना वरचे सगळे लोक निव्वळ नोबेल मिळालं म्हणून श्रेष्ठ असं नाही. ते श्रेष्ठ आहेत म्हणून नोबेल मिळालं आहे, आत्यंतिक त्यागाचं मूर्तीमंत उदाहरण असतात हे लोक.
सहमत.
ह्यातलं १०-२० % सामान्य लोकांनी जरी स्वीकारुन मार्ग अवलंबला तरी अध्यात्मप्रांतात सुद्धा प्रचंड प्रगती होईल.
हे कळलं नाही. समजावून सांगू शकाल का?
५००० वर्षांपूर्वी लिहीलेल्या गीतेमध्ये (नायकाचा रोल लक्षात घेतला नि आपल्याला त्या जागी बसवताना आनुषंगिक बदल केले तर) आजही त्याच प्रकारे तत्त्वज्ञान लागू पडतं हे लक्षात घेण्याची गरज आहे.
माझ्या मते हे उलट असायला हवं. पाच हजार वर्षांपूर्वी जे लिहिलं आहे त्या अनुषंगाने आपल्यात बदल न करता आजच्या काळानुरुप पाच हजार वर्षांपूर्वीच्या लेखनातील काल विसंगत गोष्टी टाकून दयायला हव्यात.
विज्ञान नि तंत्रज्ञान ह्यामध्ये धन्याशेठनी गल्लत केलेली आहे. विज्ञानाचे अ‍ॅप्लिकेशन्स वापरुनच पुढचा भाग होतो म्हणून विज्ञान मूलतः बदलत नाही तसंच तत्त्वज्ञानातला वरचा कथाभाग काढला तरी तत्त्वज्ञान शाश्वत राहील.
गल्लत नाही. तुमच्या दुसर्‍या वाक्याशी मी सहमत आहे. एकदा पोटाची चिंता मिटली की माणसाला तत्वज्ञानाची ओढ लागते. किंबहूना माणसाची ती गरज आहे. माझा विरोध आहे तो पत्रलेखकाच्या "जेव्हढं गीतेत लिहिलंय तेव्हढंच ज्ञान, बाकी सगळं अज्ञान" या आततायी मताला.
नोबेल पुरस्कार मिळाल्याने अथवा संशोधनाने सुद्धा मिळ्णारा आनंद कितीही मोठा असला तरी निश्चितच मोक्षप्राप्तीपेक्षा थिटा आहे.
तुम्ही मोक्ष आहे असं मानता, आम्ही मानत नाही. तरीही वूई अ‍ॅग्री टू डिसअ‍ॅग्री :)

In reply to by धन्या

माझ्या मते हे उलट असायला हवं. पाच हजार वर्षांपूर्वी जे लिहिलं आहे त्या अनुषंगाने आपल्यात बदल न करता आजच्या काळानुरुप पाच हजार वर्षांपूर्वीच्या लेखनातील काल विसंगत गोष्टी टाकून दयायला हव्यात.
सहमत.
एकदा पोटाची चिंता मिटली की माणसाला तत्वज्ञानाची ओढ लागते. किंबहूना माणसाची ती गरज आहे.
म्यास्लोचा नीड हायरार्कीचा पिर्‍यामिड पाहिला तरी हे कळून येतं. बहुतेक रामदास म्हणतात (चूभूद्याघ्या): "जया खायाला अन्न मिळेना तया करंट्याला परमार्थ कैचा?"

In reply to by धन्या

'ह्यातलं सामान्य लोकांनी १०-२० % जरी स्वीकारुन मार्ग अवलंबला तरी अध्यात्मप्रांतात सुद्धा प्रचंड प्रगती होईल.' हे असं हवंय. माय मिस्टेक. वाक्यरचना चुकली होती. बाकी मोक्ष म्हणजे बाहेरुन आणायची अथवा मेल्यानंतर कुठे पोचायची गोष्ट असा कुणाचाही समज असला तर तो निखालस चुकीचा आहे. मोक्ष म्हणजे 'मी आणि माझं' ह्याबद्दल ची आसक्ती संपणं नि स्वतःबद्दलची खरी ओळख पटणं. संपलं. त्या अनुषंगानं मार्ग पत्करुन वाटचाल करणं म्हणजे अध्यात्मशास्त्र नि हे ध्येय गाठणं ह्यालाच परमार्थ असं म्हणतात. ह्यात खणखणीत वास्तववाद आहे. अजिबात फसवणूक नाही. तरीही अ‍ॅग्री टु डिसअ‍ॅग्री आहेच्च.

In reply to by प्यारे१

@ धन्या, बदलांबाबत! हरिपाठ नुसता म्हणायचा नाही रे. पाठ असून काय उपयोग मग? 'मंथुनि नवनीता तैसे घे अनंता , वाया व्यर्थ कथा सांडि मार्गु' चा अर्थ नक्की काय असतो सांगितलास तर आवश्यक बदल घडणं अपेक्षितच आहे असं ह्याच भगवद्गीतेच्या 'ऑथॉरिटी' ज्ञानेश्वरांनी म्हटलंय की. बाकी भगवद्गीतेमध्ये सांगितलेल्या गोष्टींमध्ये बदल करण्याची नेमकी कुठं गरज आहे ते सांगावं. ह्या उप्पर डिसकार्ड नुसतं न करता त्या ला त्याच तोडीचा पर्याय देखील द्या. ते जास्त महत्त्वाचं.

In reply to by प्यारे१

बाकी मोक्ष म्हणजे बाहेरुन आणायची अथवा मेल्यानंतर कुठे पोचायची गोष्ट असा कुणाचाही समज असला तर तो निखालस चुकीचा आहे. मोक्ष म्हणजे 'मी आणि माझं' ह्याबद्दल ची आसक्ती संपणं नि स्वतःबद्दलची खरी ओळख पटणं. संपलं. त्या अनुषंगानं मार्ग पत्करुन वाटचाल करणं म्हणजे अध्यात्मशास्त्र नि हे ध्येय गाठणं ह्यालाच परमार्थ असं म्हणतात. ह्यात खणखणीत वास्तववाद आहे. अजिबात फसवणूक नाही.
तुम्ही मोक्ष या शब्दाची वेगळीच व्याख्या सांगत आहात. चौर्‍यांऐंशी लक्ष योनींच्या जन्म-मरणाच्या फेर्‍यातून सुटका ही मोक्षाची पारंपारीक व्याख्या आहे. दहापैकी किमान सात धर्म मानणार्‍या (हिंदू) व्यक्ती मोक्षाची हीच व्याख्या सांगतील. जर तुम्ही म्हणताय ती व्याख्या योग्य असेल तर समाज अंधारात आहे. तो भलत्याच गोष्टीला मोक्ष समजतोय.
'मंथुनि नवनीता तैसे घे अनंता , वाया व्यर्थ कथा सांडि मार्गु' चा अर्थ नक्की काय असतो सांगितलास तर आवश्यक बदल घडणं अपेक्षितच आहे असं ह्याच भगवद्गीतेच्या 'ऑथॉरिटी' ज्ञानेश्वरांनी म्हटलंय की.
इथेही मी सहमत आहे. माझा विरोध आहे तो "गीतेत सांगितलं आहे तेच ज्ञान, बाकी सारं अज्ञान" या आततायी मताला.
बाकी भगवद्गीतेमध्ये सांगितलेल्या गोष्टींमध्ये बदल करण्याची नेमकी कुठं गरज आहे ते सांगावं.
पत्रलेखकाचं म्हणणं: म्हणजे अध्यात्मज्ञान हेच खरे ज्ञान. बाकी सगळे अज्ञान असे गीतेत स्पष्ट म्हटले आहे. परंतू मला इथे गीता हा ग्रंथ अपेक्षित नाही. आपल्या धर्मग्रंथांमधून लिहिलेलं सारं जे आज कालविसंगत आहे. आणि सुदैवाने कासवाच्या गतीने हे होतही आहे.
ह्या उप्पर डिसकार्ड नुसतं न करता त्या ला त्याच तोडीचा पर्याय देखील द्या. ते जास्त महत्त्वाचं.
पर्याय आहे. परंतू तो स्विकारण्यासाठी समाजाला परंपरांची, ग्रंथप्रामाण्यांची बंधने तोडावी लागतील. आपल्या आयुष्याची जबाबदारी आपण स्विकारायची, जे आपल्याला बदलता येईल ते बदलायचं, जे बदलता येणार नाही ते आहे तसं स्विकारायचं. त्यासाठी देव, धर्म, पाप-पुण्य, नशिब, प्रारब्ध वगैरे गोष्टींचा अजिबात आधार घ्यायचा नाही. माणूस म्हणून जगताना यातल्या कुठल्याच गोष्टीची गरज नसते. हे असं जगणं अवघड असलं तरी अशक्य नाही. मी अनिल अवचटांचं जे काही लेखन वाचलं आहे त्यावरुन मला वाटतं अनिल अवचट असंच आयुष्य जगले आहेत, जगत आहेत.

In reply to by धन्या

>>तुम्ही मोक्ष या शब्दाची...तो भलत्याच गोष्टीला मोक्ष समजतोय. -- मुळात व्याख्येनुसार या सगळ्या गोष्टी अजमावतो म्हटलं तर पहिली पायरीच चुकते. व्याख्येला देखील सापेक्षता असते त्यामुळे सापेक्षतारहित कैवल्य त्यात मावणार कसं? >> माझा विरोध आहे तो "गीतेत सांगितलं आहे तेच ज्ञान, बाकी सारं अज्ञान" या आततायी मताला. -- एखाद्या प्रमेयाच्या अर्थाचा अनर्थ कसा होतो बघा. आपापल्या जिज्ञासेने, विचार शक्तीने शक्य होईल तेव्हढं ज्ञानभंडार मंथायला घ्यायचं व त्याच ज्ञानातुन, ज्याप्रमाणे ताकातनं लोणी वर येतं त्याचप्रमाणे आत्मज्ञान उमलेल, असा हा दृष्टांत आहे. आपण याचा अर्थ असा घेतला कि शेणात एक सोन्याचा तुकडा पडलाय तो उचलायचा व बाकी शेण फेकुन द्यायचं. ते चुक आहे. >>पत्रलेखकाचं म्हणणं: म्हणजे अध्यात्मज्ञान हेच खरे ज्ञान. बाकी सगळे अज्ञान असे गीतेत स्पष्ट म्हटले आहे. -- पत्रलेखकाने नेमकं कशावरुन हा अर्थ काढला हे मला तरी कळलं नाहि, पण साध्याला गवसणी घालायला अनेकानेक मार्गांची थोरवी गाणारी गीता, आणि आजन्म कर्मयोग आचरणारा श्रीकृष्ण असलं काहि बोलेल असं वाटत नाहि. >>आपल्या धर्मग्रंथांमधून लिहिलेलं सारं जे आज कालविसंगत आहे. आणि सुदैवाने कासवाच्या गतीने हे होतही आहे. -- ज्याला हिंदु धर्माचे धर्मग्रंथ म्हटल्या जातं ते याच रितीने तयार झाले आहेत. आणि हि थोरवी ग्रंथांची नाहि तर माणसाच्या सतत चिंतनशील विचारशक्तीची आहे. >>पर्याय आहे. परंतू तो स्विकारण्यासाठी समाजाला परंपरांची, ग्रंथप्रामाण्यांची बंधने तोडावी लागतील. -- माणसाचं स्वार्थभान इतकं जबरदस्त आहे कि ते त्याने कधिच, कुठल्याच धर्मग्रंथांची बंधनं स्विकारली नाहित. मग तो व्हॅटीकन सिटीचा पॉप असो, वा मक्का-मदीनेचा सर्वोच्च मौलवी असो वा शंकराचार्य. धर्मग्रंथप्रामाण्यवाद माणसाला बांधुच शकत नाहि. >> आपल्या आयुष्याची जबाबदारी आपण स्विकारायची, जे आपल्याला बदलता येईल ते बदलायचं, जे बदलता येणार नाही ते आहे तसं स्विकारायचं. -- कळत, नकळत आजवर माणुस याच पद्धतीने जगला, पुढेही तसाच जगेल. >>त्यासाठी देव, धर्म, पाप-पुण्य, नशिब, प्रारब्ध वगैरे गोष्टींचा अजिबात आधार घ्यायचा नाही. माणूस म्हणून जगताना यातल्या कुठल्याच गोष्टीची गरज नसते. -- या सर्व कुबड्या माणसाने स्वेच्छेने स्विकारल्या... केवळ आपली सोय म्हणुन. त्या कुबड्या स्वतः येऊन माणसाला चिकटल्या नाहित. आणि जोवर माणसाला कुठल्याही प्रकारची गरज भासत असेल तोवर कुबड्यांना तोटा नाहि. एक जाऊन दुसरी येईल, तिचं काम संपलं कि तिसरी...

In reply to by अर्धवटराव

>>>देव, धर्म, पाप-पुण्य, नशिब, प्रारब्ध वगैरे गोष्टींचा अजिबात आधार घ्यायचा नाही. Know the system, use the system, get the results and leave the system.... ! आमच्यासारख्या सामान्यांना कुबड्या म्हणण्यापेक्षा पांगुळगाडे लागतात ब्वा! पण ह्या पांगुळगाड्यांच्या जोरावर पावलं टाकायला शिकतो नंतर पायात ताकद आली की ते दुसर्‍यांसाठी सोडतो असं झालं तर मग त्याचा उपयोग झाला असं होतं. दुर्दैवानं आपलं महत्त्व वाढवण्याच्या नादात लोक पांगुळगाडेच सजवत बसतात नि तुलना करीत राहतात.

In reply to by प्यारे१

तुम्ही शाळा-विद्यालय-महाविद्यालय असा प्रवास करत मग स्वतंत्र अभ्यास करण्याची क्षमता बाणवायचं म्हणताय. मी शैक्षणीक कामात वेळ घालवायचा बहाणा करत आळशीपणाचे उद्योग करणार्‍यांच्या संदर्भात टंकलय.

In reply to by प्यारे१

स्वामी विवेकानंदांनी राजयोगात म्हटलय की भौतिक ज्ञान हे मोक्षज्ञानाची पहिली पायरी आहे. भौतिक ज्ञानाची सीमा संपते तिथे पारलौकिक ज्ञान सुरू होते. इथे कुबड्यांचा प्रश्न येतोच कुठे ?

In reply to by प्यारे१

मोक्ष म्हणजे 'मी आणि माझं' ह्याबद्दल ची आसक्ती संपणं नि स्वतःबद्दलची खरी ओळख पटणं असे असेल तर तिसर्‍या पेगला मोक्षाप्रत अवस्था सहज प्राप्त होते.

In reply to by विजुभाऊ

पण तिसर्‍या पेगला देखील मी माझ्या खर्चानं प्यायलोय की दुसर्‍याच्या याचे भान रहातच असेल ना ?

In reply to by बाळ सप्रे

म. टा. मध्ये या नावाने येणारी पत्रे यनावालांच्या भाषेला अनुसरूनच असतात. मला असे वाटते की यनावालांना याही पत्रातून काहीतरी वेगळेच सांगायचे असावे. पूर्ण पत्र वाचावे लागेल.

जर पत्र य ना वालावलकर यांनी लिहीलं असेल तर ते निश्चितपणे उपहासात्मक असावे असं वाटतं. कारण फायलीन वादळ येऊन गेल्यावर लोकसत्ता मधे त्यांचं वैज्ञानिकाचं अभिनंदन करणारं आणि ज्योतिषांची खिल्ली उडवणारं पत्र प्रसिध्द झालं होतं. ते पत्र खरंतर उपहासात्मक लिखाणाचं उत्तम उदाहरण होतं. मला वाटतं काहीतरी समजुतीचा घोटाळा आहे निश्चित..

In reply to by गुलाम

पत्रलेखकाचे नाव य. ना. वालावलकर असे आहे. लेखाचा टोन उपहासात्मक नक्कीच नाही. कदाचित नामसाध्यर्म्य असेल. तरीही संपादक मंडळास लेखातील मिपा आयडी "यनावाला" यांचा उल्लेख काढून टाकावयाची विनंती केली आहे.

In reply to by गुलाम

+१००० य ना वालावलकर यांचे पत्र अत्यंत उपहासगर्भ आहे हे यनावालांचे लेख ज्यांनी वाचले आहेत ते ही गोष्ट सहज ओळखतील. तरीही यनावाला हे अस्थानि तुलना करण्यात सु(कु)प्रसिद्ध आहेत हे जाता जाता नमूद करून ठेवलेले बरे.

हे शाश्वत ज्ञान नव्हेच. पत्रलेखकास भेटून त्यांजवर एक दृढ लगुडप्रहार केल्यास ते तथाकथित शाश्वत ज्ञान कितपत उपयोगी पडेल हे विचारावयाची इच्छा होतेय.

वेदोक्त प्रकरणात जीर्ण भुक्कड तत्वज्ञान असलेल्या ग्रंथांवरुन वितंडवाद घालणार्याचा हा अनुयायी असावा. तिकडे पाश्चिमात्य देशात शोध लागले की "हे आमच्या वेदात लिहूनच ठेवलेले आहे " हे कॉपीराईट वाक्य ऐकायला मिळते. अध्यात्मवाद नावाचा कोणताच वाद अस्तित्वात नाही ,भोळसट लोकांना फसवण्यासाठी काढलेले हे व्यवसाय आहेत.

In reply to by मुक्त विहारि

त्यांचे चिंतन त्यांना मुक्तपणे करू द्या की. उगाच कशाला बिब्बा घालताय?

>>जन्म मरणाचे फेरे चुकवून आजवर मोक्ष मिळवणार्‍यांची यादी काढली तर त्यात भारतीय नावे सर्वाधिक असतील, हे निश्चित. -- =)) याला म्हणतात अस्सल विनोद... पु.लंच्या आत्म्याला आज शांती लाभली असणार.

In reply to by अर्धवटराव

जन्म मरणाचे फेरे चुकवून आजवर मोक्ष मिळवणार्‍यांची यादी काढली तर त्यात भारतीय नावे सर्वाधिक असतील, हे निश्चित.
मोक्ष मिळालेल्यांची यादी कशी काढणार? त्याना मोक्ष मिळाला आहे हे कसे ठरवायचे? धर्मासाठी कार्य केले हाच एकमेव निकश लावायचा तर बुद्धाने हिंदू तत्वज्ञानाची अक्षरशः पिसे काढली. विवेकानंदानी हिंदू धर्मामधील फालतू कर्मकांडावर कोरडे ओढलेत. हे सर्व मोक्षाला लायक ठरत नाहीत. मोहम्मद अट्टा / कसाब /बियन्त सिंग / भिंद्रावाले हे सर्व मोक्षाप्रत पार झाले असतील. जादूगार सत्यसाईबाबा ना मोक्ष प्राप्त झाला असेल. आसाराम बापु मोक्षाच्या वाटेवर असतील. अवांतरः मोक्षाला गेलेल्या लोकांची यादी बनवण्यासाठी सर्व्हे करण्यासाठी लोक हवे आहेत. इच्छुकानी अर्ज करावेत.

हाईट्ट आहे हे पत्र म्हणजे, अशी आळशी पण चतुर लोकं बघितली की प्रश्न पडतो कुठे चाल्लोय आपण. गीता, मोक्ष ह्यांचा असा चुकीचा अर्थ काढून आत्ममग्न राहाणार्‍याला काय जागं करायचं.. कीव करावी अशांची आणि त्यांना त्यांच्या मोक्षाच्या मार्गावर सोडून जावं, हेच खरं! आणि हो, मोक्ष मिळालेल्यांची लिस्ट बघायला आवडेलच :)

In reply to by उपास

आणि त्या लिष्टेत किमान या जन्मातून तरी लौकर सुटलेले म्हणून एकाचे नाव घालायला लै आवडेल. अशा लोकांनी जगूनही कुणाला फायदा नसतो म्हणा तसा.

In reply to by बॅटमॅन

तुम्ही हे वाक्य गमतीत लिहिले आहे याची जाणिव आहे. तरीही हा विचार मला जग हे फक्त काळया आणि पांढर्‍या रंगात पाहण्यासारखा वाटतो. तुम्ही म्हणताय तशा व्यक्तींना भानावर आणण्याचा जरुर प्रयत्न करावा. त्यांची भानावर यायची ईच्छा नसेल तर त्यांना त्यांच्या आयुष्याच्या भरवशावर सोडून दयावे.

In reply to by धन्या

बायनरी थिंकिंग होतेच त्यामागे, मी नाकारत नाहीच्चे ;) बाकी सहमत आहे, फक्त तो त्रागा केल्या जातो काहीवेळेस त्याचे हे फॉक्कन झालेले निस्सारण समजावे. :)

तुमचे विचार लवकर पचतील आणि समजतील असे नसतात. ह्याचे अजून एक छान उदाहरण म्हणजे हा लेख.. वाचतो, मनन करतो, चिंतन करतो आणि जर काही शंका असतील तर विचारतो... (मुद्दाम गहन विचार करून टंकण्यापेक्षा किंचीत विचार करून लिहीत आहे....)

In reply to by मालोजीराव

पत्र डोक्यावरून गेल्याचं की पत्र लिहिणारा डोक्यावर पडल्याचं पत्र पाठवणार आहात ;)

ते यनावालांचे पत्र आहे. १००% उपहासात्मक, किंबहुना (सध्या उपक्रम बंद असल्याने) आलेल्या प्रचंड उद्वेगाने लिहिलेले असावे. =)) बाकी हा धाग्यामुळे यनावाला कदाचित इकडे प्रकट होतील असे वाटतेय.

In reply to by प्रचेतस

=)) (यनावाला इथे आले तर कितीरंगी सामना होईल आणि त्यात कीबोर्डने कित्ती कित्ती जिल्ब्या पाडायचा चानस मिळेल या कल्पनेने हाताची बोटे शिवशिवू लागलेला) बॅटमॅन.

In reply to by बॅटमॅन

ते यनावालांचे पत्र आहे.
हे यनावालांचे पत्र असेल तर हे पत्र उपहासात्मक लेखनाचे एक उत्तम उदाहरण असेल. :)

मी इथे चौकट राजा हे नाव घेण्याचे कारण मी सिनेमातल्या चौकट राजा सारखाच मंद आहे आहे मला मनोमन वाटले, धन्याकाका ब्याट्याकाका ,प्यारे मामा, यांच्या पुढे आपण काय आहोत ? काही नाही ! चौकट राजा या नावाचे सार्थक झाले मला मोक्ष मिळाला. जप , ध्यान, माळा, गुरू, अनुग्रह, कृपा, आशीर्वाद , प्रसादाचा नारळ ,गुरु बंधू, गुरू भगिनी, पूर्वजन्मीचे सुकृत , सप्ताह,कशाचाही माझ्या आयुष्यात पत्ता नाही. हो, तरीही मोक्ष मिळाला. हे बहु काका मंडळीच्या मुळे . धन्यवाद !

In reply to by चौकटराजा

माझा मोक्ष या संकल्पनेवर विश्वास नसतानाही ज्यांच्यामुळे आपल्याला मोक्ष मिळाला त्यांच्या यादीत माझे नाव टाकून माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्यामुळे मी श्री. चौकटराजा यांचा जाहीर निशेध करतो.

In reply to by चौकटराजा

धन्यानं निषेध केला, बॅट्यानं पण केला... मी तरी का मागे? आक्ख्या मिसळपावचा 'का का' असताना माझा मामा केल्याबद्दल चौकटराजाचा हार्दिक.. आपलं जाहिर निषेध ;)

In reply to by प्यारे१

मी खरे तो बोल्लो . हा निषेध सोहळा पूर्व नियोजित आहे. मी मिपाकरच होतो आहे व राहीन . मला संपादक वगैरे कुठल्याही पदाचा मोह नाही. हे सपस्टीकरण आहे माफीनामा नाही.

In reply to by कवितानागेश

शाश्वत म्हणजे काय? ======> लग्न झाल्या वर बायको नवर्‍याच्या गळ्यात जे काही बांधते (कुणी "जू" म्हणतात तर कुणी "वेसण") ते शाश्वत. (हे अद्रुश्य असते, हे सांगणे न लगे) ज्ञान म्हणजे काय? ======> लग्न झाल्या नंतर बायको जे काही सांगते ते ज्ञान.. (शेजार्‍याला चांगली नौकरी मिळाली. माझ्या भावाने त्याच्या बायकोसाठी बांगड्या आणल्या (मग त्या ५ रु.वाल्या काचेच्या का असेनांत) इ,)

क्षुद्र पत्र आहे!
नोबेलचा उदोउदो करणार्‍यांना हे समजेल तो सुदिन म्हणायचा!
पण ओबामाला जर नोबेल मिळत असेल तेही शांतते साठी आणि वैश्विक ऐक्यासाठी तर हे अत्यंत हास्यास्पद आहे !!

In reply to by विद्युत् बालक

पण ओबामाला जर नोबेल मिळत असेल तेही शांतते साठी आणि वैश्विक ऐक्यासाठी तर हे अत्यंत हास्यास्पद आहे !!
इथे थोडासा प्रकाश टाकला आहे.

जन्म मरणाचे फेरे चुकवून आजवर मोक्ष मिळवणार्‍यांची यादी काढली तर त्यात भारतीय नावे सर्वाधिक असतील, हे निश्चित
खरा मोक्षं म्हणजे मी पणा , अहं भाव सोडणे . ते कोणी मोजावे ? आणि नोबेल चा आणि अध्यात्माचा काय संबंध ?

अध्यात्मज्ञान हेच खरे ज्ञान. बाकी सगळे अज्ञान असे गीतेत स्पष्ट म्हटले आहे.
असे कुठे म्हटलेले आहे याचा रेफरन्स हवा होता... तसेच, जर अध्यात्मज्ञान हेच खरे ज्ञान आहे तर बाकि सगळे खोटे ज्ञान अथवा भ्रम ठरते तर मग या भ्रमाला संपुर्ण "अज्ञान" कसे म्हणावे ? हवे तर असमग्र ज्ञान म्हणता येइल, कारण अज्ञान म्हणजे मुळात ज्ञानाचे अस्तित्वच नसणे होय. अन ते कदापि शक्य नाही, कारण ज्ञानाचे अस्तित्व नसणे म्हणजे स्वतःचे अस्तित्व नसणे होय.

उपहासात्मकता टोकाला नेली की तो विरुद्ध बाजूचा खराखुरा युक्तिवादच वाटायला लागतो याचं हे पत्र म्हणजे उत्तम उदाहरण आहे. मला धन्या यांचा लेखही सुरूवातीला त्याच धाटणीतला वाटला होता. पण प्रतिसादांवरून त्यांना यनावालांचा उपहास कळला नाही की काय अशी शंका वाटायला लागली आहे.

In reply to by प्यारे१

अस्मादिकांस हुच्चभ्रू होण्याचे काही एक प्रयोजन नाही. विचारांचा दांभिकपणा आम्ही कधीच करत नाही. मात्र हा टोकाचा उपहास असल्यामुळे तो अस्मादिकांस कळला नाही ही वस्तूस्थिती आहे.

In reply to by राजेश घासकडवी

उपहासात्मकता टोकाला नेली की तो विरुद्ध बाजूचा खराखुरा युक्तिवादच वाटायला लागतो याचं हे पत्र म्हणजे उत्तम उदाहरण आहे.
अगदी हेच म्हणतो.

बदल हीच एकुलती एक शाश्वत गोष्ट या जगात आहे :) (Change is the only thing constant in this world.)

हे खरेच की आत्म ज्ञानांशिवाय बाकी सारे अशाश्वतच, अगदी नोबेल विजेते ज्ञान असले तरिही ! ऐहिक ज्ञान फक्त भौतिक साधनांसाठीच उपयोगी आहे, चिरंतन सुखासाठी नाही , याच्याशी लै वेळा सहमत. हा ग्रंथप्रामाण्याचा विषय नसून आत्मप्रचितीचा आहे. साखरेची गोडी सांगून कळत नाही ती खावी लागते... बाकी चालू द्या ... समास पाचवा : बहुधाज्ञान निरूपण ||श्रीराम || जंव तें ज्ञान नाहीं प्रांजळ| तंव सर्व कांहीं निर्फळ |ज्ञानरहित तळमळ| जाणार नाहीं ||१|| ज्ञान म्हणतां वाटे भ्रम| काये रे बा असेल वर्म |म्हणौनि हा अनुक्रम| सांगिजेल आतां ||२|| भूत भविष्य वर्तमान| ठाऊकें आहे परिछिन्न |यासीहि म्हणिजेत ज्ञान| परी तें ज्ञान नव्हे ||३|| बहुत केलें विद्यापठण| संगीतशास्त्र रागज्ञान |वैदिक शास्त्र वेदाधेन| हेंहि ज्ञान नव्हे ||४|| नाना वेवसायाचें ज्ञान| नाना दिक्षेचें ज्ञान |नाना परीक्षेचें ज्ञान| हें ज्ञान नव्हे ||५|| नाना वनितांची परीक्षा| नाना मनुष्यांची परीक्षा |नाना नरांची परीक्षा| हें ज्ञान नव्हे ||६|| नाना अश्वांची परीक्षा| नाना गजांची परीक्षा |नाना स्वापदांची परीक्षा| हें ज्ञान नव्हे ||७|| नाना पशूंची परीक्षा| नाना पक्षांची परीक्षा |नाना भूतांची परीक्षा| हें ज्ञान नव्हे ||८|| नाना यानांची परीक्षा| नाना वस्त्रांची परीक्षा |नाना शस्त्रांची परीक्षा| हें ज्ञान नव्हे ||९|| नाना धातूंची परीक्षा| नाना नाण्यांची परीक्षा |नाना रत्नांची परीक्षा| हें ज्ञान नव्हे ||१०|| नाना पाषाण परीक्षा| नाना काष्ठांची परीक्षा |नाना वाद्यांची परीक्षा| हें ज्ञान नव्हे ||११|| नाना भूमींची परीक्षा| नाना जळांची परीक्षा |नाना सतेज परीक्षा| हें ज्ञान नव्हे ||१२|| नाना रसांची परीक्षा| नाना बीजांची परीक्षा |नाना अंकुर परीक्षा| हें ज्ञान नव्हे ||१३|| नाना पुष्पांची परीक्षा| नाना फळांची परीक्षा |नाना वल्लींची परीक्षा| हें ज्ञान नव्हे ||१४|| नाना दुःखांची परीक्षा| नाना रोगांची परीक्षा |नाना चिन्हांची परीक्षा| हें ज्ञान नव्हे ||१५|| नाना मंत्रांची परीक्षा| नाना यंत्रांची परीक्षा |नाना मूर्तींची परीक्षा| हें ज्ञान नव्हे ||१६|| नाना क्षत्रांची परीक्षा| नाना गृहांची परीक्षा |नाना पात्रांची परीक्षा| हें ज्ञान नव्हे ||१७|| नाना होणार परीक्षा| नाना समयांची परीक्षा |नाना तर्कांची परीक्षा| हें ज्ञान नव्हे ||१८|| नाना अनुमान परीक्षा| नाना नेमस्त परीक्षा |नाना प्रकार परीक्षा| हें ज्ञान नव्हे ||१९|| नाना विद्येची परीक्षा| नाना कळेची परीक्षा |नाना चातुर्य परीक्षा| हें ज्ञान नव्हे ||२०|| नाना शब्दांची परीक्षा| नाना अर्थांची परीक्षा |नाना भाषांची परीक्षा| हें ज्ञान नव्हे ||२१|| नाना स्वरांची परीक्षा| नाना वर्णांची परीक्षा |नाना लेक्षनपरीक्षा| हें ज्ञान नव्हे ||२२|| नाना मतांची परीक्षा| नाना ज्ञानांची परीक्षा |नाना वृत्तींची परीक्षा| हें ज्ञान नव्हे ||२३|| नाना रूपांची परीक्षा| नाना रसनेची परीक्षा |नाना सुगंधपरीक्षा| हें ज्ञान नव्हे ||२४|| नाना सृष्टींची परीक्षा| नाना विस्तारपरीक्षा |नाना पदार्थपरीक्षा| हें ज्ञान नव्हे ||२५|| नेमकेचि बोलणें| तत्काळचि प्रतिवचन देणें |सीघ्रचि कवित्व करणें| हें ज्ञान नव्हे ||२६|| नेत्रपालवी नादकळा| करपालवी भेदकळा |स्वरपालवी संकेतकळा| हें ज्ञान नव्हे ||२७|| काव्यकुशळ संगीतकळा| गीत प्रबंद नृत्यकळा |सभाच्यातुर्य शब्दकळा| हें ज्ञान नव्हे ||२८|| वाग्विलास मोहनकळा| रम्य रसाळ गायनकळा |हास्य विनोद कामकळा| हें ज्ञान नव्हे ||२९|| नाना लाघवें चित्रकळा| नाना वाद्यें संगीतकळा |नाना प्रकारें विचित्र कळा| हें ज्ञान नव्हे ||३०|| आदिकरूनि चौसष्टि कळा| याहि वेगळ्या नाना कळा|चौदा विद्या सिद्धि सकळा| हें ज्ञान नव्हे ||३१|| असो सकळ कळाप्रवीण| विद्यामात्र परिपूर्ण |तरी ते कौशल्यता, परी ज्ञान- | म्हणोंचि नये ||३२|| हें ज्ञान होयेसें भासे| परंतु मुख्य ज्ञान तें अनारिसें |जेथें प्रकृतीचें पिसें| समूळ वाव ||३३|| जाणावें दुस-याचें जीवीचें| हे ज्ञान वाटे साचें |परंतु हें आत्मज्ञानाचें| लक्षण नव्हे ||३४|| माहानुभाव माहाभला| मानसपूजा करितां चुकला |कोणी येकें पाचारिला| ऐसें नव्हे म्हणोनी ||३५|| ऐसी जाणे अंतरस्थिती| तयासि परम ज्ञाता म्हणती |परंतु जेणें मोक्षप्राप्ती| तें हें ज्ञान नव्हे ||३६|| बहुत प्रकारींची ज्ञानें| सांगों जातां असाधारणें |सायोज्यप्राप्ती होये जेणें| तें ज्ञान वेगळें ||३७|| तरी तें कैसें आहे ज्ञान| समाधानाचें लक्षण |ऐसें हें विशद करून| मज निरोपावें ||३८|| ऐसें शुद्ध ज्ञान पुसिलें| तें पुढिले समासीं निरोपिलें |श्रोतां अवधान दिधलें| पाहिजे पुढें ||३९|| इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे बहुधाज्ञाननाम समास पंचवा ||५||५. ५

In reply to by विटेकर

सकळांसि पूज्य ब्राह्मण । हे मुख्य वेदाज्ञा प्रमाण । वेदविरहित तें अप्रमाण । अप्रिये भगवंता ॥ १०॥ ब्राह्मणीं योग याग व्रतें दानें । ब्राह्मणीं सकळ तीर्थाटणें । कर्ममार्ग ब्राह्मणाविणें । होणार नाहीं ॥ ११॥ ब्राह्मण वेद मूर्तिमंत । ब्राह्मण तोचि भगवंत । पूर्ण होती मनोरथ । विप्रवाक्येंकरूनी ॥ १२॥ ब्राह्मणपूजनें शुद्ध वृत्ती- । होऊन, जडे भगवंतीं । ब्राह्मणतीर्थे उत्तम गती । पावती प्राणी ॥ १३॥ लक्षभोजनीं पूज्य ब्राह्मण । आन यातिसि पुसे कोण । परी भगवंतासि भाव प्रमाण । येरा चाड नाहीं ॥ १४॥ असो ब्राह्मणा सुरवर वंदिती । तेथें मानव बापुडें किती । जरी ब्राह्मण मूढमती । तरी तो जगद्वंद्य ॥ १५॥ याला काय म्हणायचे पोथीवाद अध्यात्मवाद कि आणखि काही?मूढमती जगदवंद्य कसा?? इटेकरशास्त्री उत्तर द्या..

In reply to by ग्रेटथिन्कर

शिवरायांचे आठवावे रूप ।शिवरायांचा आठवावा प्रताप । शिवरायांचा आठवावा साक्षेप ।भूमंडळी ।।१।। शिवरायांचे कैसें बोलणें ।शिवरायांचे कैसें चालणें । शिवरायांची सलगी देणे । कैसी असे ।।२।। सकल सुखांचा केला त्याग ।म्हणोनि साधिजें तो योग । राज्यसाधनाची लगबग ।कैसीं केली ।।३।। याहुनी करावें विशेष ।तरीच म्हणवावें पुरुष । या उपरीं आता विशेष ।काय लिहावे ।।४।। शिवरायांसी आठवावें ।जीवित तृणवत् मानावें । इहलोकी परलोकीं उरावे ।कीर्तीरूपें ।।५।। निश्चयाचा महामेरू ।बहुत जनांसी आधारू । अखंड स्थितीचा निर्धारु ।श्रीमंत योगी ।।६।। >>> याला काय म्हणायचे :D

In reply to by प्रसाद गोडबोले

इ स ३००० "हे असे लिहिणारे वेगळे आणि ते तसे लिहीणारे वेगळे" असा पण शोध लागेल. त्यावेळी सावरकरांना पोहता येत न्हवते.राजांना लिहीता येत न्हवते म्हणून त्यांनी त्यावेळी ज्यांना लिहीता-वाचता येत होते, त्यांनाच कामावर ठेवले.त्या लोकांना संगनमत केले आणि परमदयाळू औरंगजेब आणि राजे ह्यांच्यात बेबनाव घडवून आणला.इ.इ. मुद्दाम केलेले गहन विचार = नविन शोध आणि नविन समाज हाताला घड्याळ कशाला? प्रार्थनेची वेळ लक्षात ठेवायला.....

In reply to by ग्रेटथिन्कर

याला काय म्हणायचे पोथीवाद अध्यात्मवाद कि आणखि काही?मूढमती जगदवंद्य कसा?? इटेकरशास्त्री उत्तर द्या..
तुमच्या या प्रश्नाचे उत्तर दयायला कोणी धजावणार नाही. जे प्रश्न उत्तर दयायला अडचणीचे वाटतात त्यांची उत्तरे देणे टाळले जाते. ज्ञानदेव, एकनाथ, समर्थ, तुकाराम ही सारी तुमच्या-आमच्यासारखी माणसेच होती. काही बाबतीत ते सर्वसामान्यांच्या चार पावले पुढे होते. पण म्हणून काही ते सर्वज्ञ नव्हते. त्यांच्या अशा स्वतःच्या धारणा होत्या ज्या आता कालविसंगत असल्या तरी ज्या काळात हे थोर पुरुष होऊन गेले त्या काळचा तो "धर्म" होता. त्यामुळे त्या वेळच्या रुढी परंपरांचा या सार्‍या संतांवर पगडा असणे साहजिक होते. त्यासाठी त्यांना दोष देता येणार नाही. उदा. आज स्त्री पुरुष समानतेचे युग आहे. पण एकनाथ भागवतात काय म्हणतात स्त्रीबद्दल?
नको स्त्रियांशी बोलणे | नको स्त्रियांसि भेटणे | स्त्री देखतांचि पळणे | उठाउठी ||
किंवा ही तुकारामांची ओळ पाहा:
स्त्रियांचा तो संग नको नारायणा | काष्ठ या पाषाणा मृत्तिकेच्या ||
यात एकनाथ किंवा तुकारामांना व्यक्तीशः दोष देण्यासारखे काहीच नाही. त्यांच्या काळात अध्यात्माच्या क्षेत्रातील सार्‍याच व्यक्तींची अशीच धारणा होती. इथे ज्ञानदेवांची हरीपाठातील ओळ लिहाविशी वाटते,
मंथूनी नवनीता तैसे घे अनंता | वाया व्यर्थ कथा सांडी मार्गू ||
तुकाराम, एकनाथ किंवा ज्ञानदेवांनी जे काही लिहून ठेवलं आहे ते त्यांच्या काळानुरुप असेल. त्यातलं सारंच्या सारं तसंच्या तसं आचरणात आणता येणार नाही. त्यासाठी आपली अक्कल वापरुन त्यांचं काय घ्यायचं आणि काय टाकायचं हे ठरवावं लागेल.

In reply to by धन्या

धन्याशेठ वर लिहीलेला प्रतिसाद पटलेला आहे. उत्तर द्यायला धजावण्या न धजावण्यापेक्षा त्या उत्तर देण्याचा उपयोग कुणाला कसा किती होतोय ह्याचा विचार व्हायला पाहिजे. तत्कालिन सामाजिक परिस्थिती काय होती समर्थांच्या काळात? जातींच्या उतरंडी आजदेखील जशाच्या तशा आहेत ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. खुद्द शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करुन घ्यावा लागला. अशा परिस्थितीमध्ये जुन्या रुढी फेकून नव्या रुजवण्यासाठी ट्रान्झिशन/ ओव्हरलॅप लागतो तो सुद्धा विचारात घेतला पाहिजे. एकनाथांनी श्राद्धावेळी १००० महार जोडपी जेवायला घातली, गंगेचं पाणी गाढवाला प्यायला दिलं, रामदासांच्या शिष्यांमध्ये सगळ्या प्रकारच्या स्त्रीपुरुषांचा समावेश होता, तुकाराम महाराजांनी घरी चालून आलेली स्त्री नि संपत्ती नाकारली ह्या सगळ्या गोष्टींचा विसर सोयिस्कर पडतो. चांगलंय. समर्थांचंच वचन आहे येर महार चांभार त्यांचे राखावे अंतर (राखावे म्हणजे जपावे आणि अंतर म्हणजे त्यांचे मन नाहीतर इथे पण कीप सेफ डिस्टन्स म्हणाल) आजही गावामध्ये त्या त्या समाजाच्या वस्त्या त्या त्या नावाने उल्लेखिल्या जातात. ४०० वर्षांपूर्वी संतमंडळी बाहेरुन तसं म्हणत असली तरी त्यांची मनःस्थिती काय होती ह्याचा विचार करावा. ह्याच दासबोधात म्हटल्याप्रमाणे 'समूळ ग्रंथ पाहिल्यावीण उगाच ठेवी जो दूषण.... तो एक मूर्ख' असंही म्हटलेलं आहे. आपण असंच करत नाही आहोत का? बाकी ज्यांना फक्त फोलकटांमध्येच रस आहे त्यांनी तीच चिवडत बसावीत.

हे पत्र लिहुन पत्र लेखकाने स्वत:चे हसे करुन घेतले आहे बाकी काही नाही. जर हे गंभीरपणे लिहिलेले असेल तर हा तद्दल मुर्खपणा आहे. आणि जर हे उपहासात्म लिहिले असेल तर मुर्खपणाचा कळस आहे. १. उपहासात्मक लिहिताना किमान तुम्ही तसे लिहित आहात हे वाचकांना समजणे अपेक्षित आहे. २. उपहास करण्यामागे एक विवक्षित भूमिका असणे अपेक्षित आहे. वर्तमानपत्रात उगा काही आगापिछा नसताना आणि काही प्रयोजन नसताना असले लेख लिहिणे हे रिकामटेकडेपणाचे उत्तम लक्षण आहे. ३. लेखाचे प्रयोजन नक्की कळत नाही. आस्तिकांच्या आस्तिकतेवर काही करुन आसूड ओढायचा हा एकमेव उद्देश असेल तर हरकत नाही. एरवी गीतेचे दाखले देउन नोबेल पारितोषिक विजेत्यांचा उपमर्द , उपहास किंवा निंदा करणारा अजुन मला भेटलेला नाही. जो भेटेले तो एक महामुर्खच असेल. ४. गीतेत काय लिहिले आहे याचा विपर्यास करण्यापेक्षा अजुन काही भरीव कामगिरी केल्यास नक्कीच बरे होइल. ५. अज्ञान आणि अंधश्रद्धा दूर करायचा प्रयत्न जरुर करावा परंतु श्रद्धा, अध्यात्म आणि अविचारी अंधश्रद्धा यामधील सीमारेखेचे भान न ठेवता सरसकटीकरण करुन अर्धवट उपहास करायला गेल्यास हे असले पत्ररुपी अपत्य जन्माला येते. विज्ञान आणि वैज्ञानिकांच्या कार्याचा आदर नक्कीच आहे. आणि प्रत्येक माणसाने मानवजातीच्या कल्याणासाठी पूरक असे वैज्ञानिक संशोधन आणि अभ्यास नक्कीच करावे. जमत नसेल तर त्या कार्याचे मोल जाणून त्याला सहाय्य करण्यासाठी किंवा प्रोत्साहन देण्यासाठी किंवा त्या कार्याचा आदर करण्यासाठी जे काय करता येइल ते सर्व करावे. हाच संदेश या उपहासातुन द्यायचा असेल तर तो स्तुत्य आहे पण त्यासाठी हा उपहास आणि गीतेचे अनावश्यक आणि अस्थायी दाखले देण्याची आणि त्याची टर उपडवण्याची काहिच गरज नव्हती. गीतेच्या प्रस्तुत श्लोकांचा पत्रलेखकाने लावलेला अर्थ घेउन मुक्ताफळे उधळणारा महात्मा माझ्या पाहण्यात नाही. तसा तो पत्रलेखकाच्या पाहण्यात असेल तर एवढे सग्ळे लिहिल्याबद्दल मी त्यांची बिनशर्त माफी मागतो.

गेल्या १०५ वर्षात सर्वात जास्त नोबेल्स ज्यू लोकांना मिळाली आहेत.(१५ डझन नोबेल्स १४ मिलीओन ज्यू लोकांपैकी). अमेरिकन्सना नाही. बाकी अध्यात्म,शाश्वत नश्वर वगैरे बाबत अस्मादिकांचे अज्ञान शाश्वत आहे. अमेरिकन्स ठरवणार कोण नोबेल ते.....हेच विनोदी नाही का ?

याला काय म्हणायचे ते सांगतो , आधी ते वरचे श्लोक कशासाठी लिहलेत ते सांगा! ||वेद विरहीत ते अप्रमाण || असे समर्थ सांगतात, याचा अर्थ काय! विज्ञान अप्रमाण????....मग प्रमाण काय ..लक्षभोजणावळ्या कि मूढमती विप्र?

In reply to by ग्रेटथिन्कर

अरेच्चा!!! तुम्ही अद्याप ते "चुर्ण" घेतले नाहीत का? आणि ट्रोल म्हणजे काय? इ. जुने प्रश्न आहेतच...आधी ती उत्तरे दीलीत तर बरे बाकी तुम्ही स्मायल्यांची साथ सोडलीत ते बरे झाले... त्याचे काय आहे, स्मायल्यांची गरज तुम्हाला नाही... निदान हे तरी तुम्हाला पटले...