✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

हे शाश्वत ज्ञान नव्हे !

ध
धन्या यांनी
Fri, 10/18/2013 - 16:49  ·  लेख
लेख
आजच्या मटाच्या "वाचकांची पत्रे" विभागातील एका पत्राने लक्ष वेधून घेतले. पत्राचे शिर्षक होते, "हे शाश्वत ज्ञान नव्हे !". पत्राचे लेखक आहेत य. ना. वालावलकर. पत्र छोटेखानी असल्यामुळे इथे टंकतो: 'मानवतेचे तारणहार' हे स्फुट (मटा, ९ ऑक्टोबर) वाचले. त्यात म्हटले आहे, की अमेरिकेने आजवर जगाला सर्वाधिक नोबेल विजेते दिले. त्यांच्या शतांशानेही भारतीय नाहीत. नोबेल पारितोषिकाचा हा आनंद क्षणभंगुर आहे. खरा शाश्वत, चिरंतन, ब्रम्हानंद मोक्षप्राप्तीत असतो. तो अध्यात्मवादयांनाच लाभू शकतो. 'अध्यात्मज्ञाननित्यत्वं तत्वज्ञानार्थ दर्शनम | एतद ज्ञानमिती प्रोक्तं अज्ञानं त्दतो न्यथा|' म्हणजे अध्यात्मज्ञान हेच खरे ज्ञान. बाकी सगळे अज्ञान असे गीतेत स्पष्ट म्हटले आहे. यावरुन पेशीकार्याचे ज्ञान हे अज्ञान आहे हे सिद्ध होते. तसेच पेशी देहान असतात. देह नश्वर आहे. म्हणू पेशींविषयीचे ज्ञान शाश्वत नव्हे, हे उघड आहे. नोबेलचा उदोउदो करणार्‍यांना हे समजेल तो सुदिन म्हणायचा! नोबेल विजेत्यांत भारतीय नाव नाही याची खंत नसावी. जन्म मरणाचे फेरे चुकवून आजवर मोक्ष मिळवणार्‍यांची यादी काढली तर त्यात भारतीय नावे सर्वाधिक असतील, हे निश्चित. पत्र वाचले आणि पत्रलेखकाबद्दल वाईट वाटले. लोक कुठल्या भ्रमात जगत असतात आणि "ग्रंथप्रामाण्याच्या" गुलामगिरीचं जोखड किती आनंदाने वाहत असतात याचं हे पत्र प्रातिनिधीक उदाहरण ठरावं. पत्रलेखकाच्या दृष्टीने अध्यात्म काय असेल ते असो, त्यांनी भगवदगीतेची साक्ष काढून वैज्ञानिक ज्ञानाला ज्या पद्धतीने निकालात काढलं आहे ते मात्र खरंच विचार करायला लावण्यासारखं आहे.
नोबेल पारितोषिकाचा हा आनंद क्षणभंगुर आहे. खरा शाश्वत, चिरंतन, ब्रम्हानंद मोक्षप्राप्तीत असतो. तो अध्यात्मवादयांनाच लाभू शकतो.
आजच्या घडीला नोबेल पारितोषिक हे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैदयकशास्त्र, अर्थशास्त्र, साहित्य आणि शांतता या क्षेत्रांमधील जागतिक पातळीवरचे सर्वोच्च पारितोषिक आहे. पारितोषिक विजेत्या व्यक्त या आपल्याला पारितोषिक मिळावे म्हणून नोबेल पारितोषिकाच्या कुठल्या स्पर्धेत भाग घेत नसतात. किंबहूना पारितोषिक जाहीर होईपर्यंत त्या व्यक्तीला हे माहितीही नसतं. नोबेल पारितोषिक हे वर उल्लेख केलेल्या क्षेत्रातील दिग्गजांचा त्यांनी मानवजातीच्या भल्यासाठी केलेल्या कामाची पोच म्हणून दिले जाते. ते एक प्रकारचे त्या पारितोषिक विजेत्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणं असतं. अशा वेळी त्या विजेत्या व्यक्तीला होणारा आनंद क्षणभंगुर कसा असेल? पत्रलेखक म्हणतोय की खरा शाश्वत, चिरंतन, ब्रम्हानंद मोक्षप्राप्तीत असतो. तो अध्यात्मवादयांनाच लाभू शकतो. माझ्या अल्पमतीप्रमाणे हिंदू धर्मशास्त्रांनूसार मोक्ष म्हणजे जन्म-मरणाच्या फेर्‍यातून सुटका. थोडा वेळ चौर्‍यांऐंशी लक्ष योनी, पुनर्जन्म वगैरे गोष्टी आहेत की नाहीत हे बाजूला ठेऊन असं गृहीत धरुया की मोक्ष म्हणून काहितरी आहे. मग मोक्ष मिळवून आपली जन्म मरणाच्या फेर्‍यामधून सुटका झाल्याचा आनंद आणी आपण मानवजातीच्या उपयोगी पडल्यामुळे याची देही याची डोळा मिळालेल्या पारितोषिकाचा आनंद यात श्रेष्ठ काय?
म्हणजे अध्यात्मज्ञान हेच खरे ज्ञान. बाकी सगळे अज्ञान असे गीतेत स्पष्ट म्हटले आहे.
कधीतरी चार साडेचार हजार वर्षांपूर्वी लिहिलेल्या गीतेत जे म्हटलंय तेच खरं. त्यानंतर कुणी काहीही म्हणो, तो सगळा मुर्खपणा. पत्रलेखक संन्याशाचं जीवन जगत असेल, आधूनिक ज्गातील एकही सुविधा वापरत नसेल तरच या म्हणण्याला निदान त्याचापुरता अर्थ आहे. पण मला खात्री आहे, पत्रलेखक आधुनिक "अज्ञानाने" निर्माण केललेया कितीतरी वस्तू आपल्या दैनंदिन जीवनात वापरत असेल.
यावरुन पेशीकार्याचे ज्ञान हे अज्ञान आहे हे सिद्ध होते. तसेच पेशी देहान असतात. देह नश्वर आहे. म्हणू पेशींविषयीचे ज्ञान शाश्वत नव्हे, हे उघड आहे.
वैदयकशास्त्र, जीवशास्त्र हे थोतांड आहेत हाच या वाक्यांचा अर्थ.
नोबेलचा उदोउदो करणार्‍यांना हे समजेल तो सुदिन म्हणायचा! नोबेल विजेत्यांत भारतीय नाव नाही याची खंत नसावी.
जे काही शोध लावायचे, जे काही मानवजातीचे पांग फेडायचे ते त्या पाश्चिमात्यांना करु दया. आपण आपल्या ग्रंथांमध्ये जे लिहिलं आहे ते प्रमाण मानून "मोक्ष" मिळवूया.
जन्म मरणाचे फेरे चुकवून आजवर मोक्ष मिळवणार्‍यांची यादी काढली तर त्यात भारतीय नावे सर्वाधिक असतील, हे निश्चित.
अशी कुठली यादी असेल तर त्यातील नावे वाचायला निश्चितच आवडेल. तसेच त्या यादीतील व्यक्तींना खात्रीने मोक्ष मिळाला आहे हे कसे ठरवले हे ही वाचायला आवडेल.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
57913 वाचन

💬 प्रतिसाद (216)

प्रतिक्रिया

पत्र विनोदी आहे.

प्यारे१
Fri, 10/18/2013 - 17:00 नवीन
पत्र विनोदी आहे. बाकी पत्रातले विचार हे अध्यात्मशास्त्राच्या दृष्टीने देखील पोषक नाहीत. उगाच्च आव आणला आहे असं व्यक्तीशः वाटतं. व्यवहारामध्ये व्यवहार पाळावाच. तो तसा पाळावा लागतोच. कुठल्याही संन्याशाला सुद्धा नित्यकर्मे करावीच लागतात. लेखामध्ये व्यक्त केलेल्या विचारांशी बहुतांशी सहमत आहे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

+१

अनिरुद्ध प
Fri, 10/18/2013 - 17:24 नवीन
+१ सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

थोडा खुलासा : पत्रातले शब्द

प्यारे१
Fri, 10/18/2013 - 19:38 नवीन
थोडा खुलासा : पत्रातले शब्द कितीही चुकीचे वाटत असले जसा धन्याशेठनं अर्थ काढला आहे तरी ते शब्द तसे नाहीत. फक्त ते 'अस्थानी' आहेत. म्हणून पत्र विनोदी म्हटलेलं आहे. मानवी जीवन जगत असताना वरचे सगळे लोक निव्वळ नोबेल मिळालं म्हणून श्रेष्ठ असं नाही. ते श्रेष्ठ आहेत म्हणून नोबेल मिळालं आहे, आत्यंतिक त्यागाचं मूर्तीमंत उदाहरण असतात हे लोक. ह्यातलं १०-२० % सामान्य लोकांनी जरी स्वीकारुन मार्ग अवलंबला तरी अध्यात्मप्रांतात सुद्धा प्रचंड प्रगती होईल. ५००० वर्षांपूर्वी लिहीलेल्या गीतेमध्ये (नायकाचा रोल लक्षात घेतला नि आपल्याला त्या जागी बसवताना आनुषंगिक बदल केले तर) आजही त्याच प्रकारे तत्त्वज्ञान लागू पडतं हे लक्षात घेण्याची गरज आहे. विज्ञान नि तंत्रज्ञान ह्यामध्ये धन्याशेठनी गल्लत केलेली आहे. विज्ञानाचे अ‍ॅप्लिकेशन्स वापरुनच पुढचा भाग होतो म्हणून विज्ञान मूलतः बदलत नाही तसंच तत्त्वज्ञानातला वरचा कथाभाग काढला तरी तत्त्वज्ञान शाश्वत राहील. नोबेल पुरस्कार मिळाल्याने अथवा संशोधनाने सुद्धा मिळ्णारा आनंद कितीही मोठा असला तरी निश्चितच मोक्षप्राप्तीपेक्षा थिटा आहे. अस्थानी उल्लेखांमुळे नि पत्रलेखकाच्या इन्टरप्रिटेशन मुळे विषय विनोदी वाटत आहे एवढंच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

मानवी जीवन जगत असताना वरचे

धन्या
Fri, 10/18/2013 - 19:55 नवीन
मानवी जीवन जगत असताना वरचे सगळे लोक निव्वळ नोबेल मिळालं म्हणून श्रेष्ठ असं नाही. ते श्रेष्ठ आहेत म्हणून नोबेल मिळालं आहे, आत्यंतिक त्यागाचं मूर्तीमंत उदाहरण असतात हे लोक.
सहमत.
ह्यातलं १०-२० % सामान्य लोकांनी जरी स्वीकारुन मार्ग अवलंबला तरी अध्यात्मप्रांतात सुद्धा प्रचंड प्रगती होईल.
हे कळलं नाही. समजावून सांगू शकाल का?
५००० वर्षांपूर्वी लिहीलेल्या गीतेमध्ये (नायकाचा रोल लक्षात घेतला नि आपल्याला त्या जागी बसवताना आनुषंगिक बदल केले तर) आजही त्याच प्रकारे तत्त्वज्ञान लागू पडतं हे लक्षात घेण्याची गरज आहे.
माझ्या मते हे उलट असायला हवं. पाच हजार वर्षांपूर्वी जे लिहिलं आहे त्या अनुषंगाने आपल्यात बदल न करता आजच्या काळानुरुप पाच हजार वर्षांपूर्वीच्या लेखनातील काल विसंगत गोष्टी टाकून दयायला हव्यात.
विज्ञान नि तंत्रज्ञान ह्यामध्ये धन्याशेठनी गल्लत केलेली आहे. विज्ञानाचे अ‍ॅप्लिकेशन्स वापरुनच पुढचा भाग होतो म्हणून विज्ञान मूलतः बदलत नाही तसंच तत्त्वज्ञानातला वरचा कथाभाग काढला तरी तत्त्वज्ञान शाश्वत राहील.
गल्लत नाही. तुमच्या दुसर्‍या वाक्याशी मी सहमत आहे. एकदा पोटाची चिंता मिटली की माणसाला तत्वज्ञानाची ओढ लागते. किंबहूना माणसाची ती गरज आहे. माझा विरोध आहे तो पत्रलेखकाच्या "जेव्हढं गीतेत लिहिलंय तेव्हढंच ज्ञान, बाकी सगळं अज्ञान" या आततायी मताला.
नोबेल पुरस्कार मिळाल्याने अथवा संशोधनाने सुद्धा मिळ्णारा आनंद कितीही मोठा असला तरी निश्चितच मोक्षप्राप्तीपेक्षा थिटा आहे.
तुम्ही मोक्ष आहे असं मानता, आम्ही मानत नाही. तरीही वूई अ‍ॅग्री टू डिसअ‍ॅग्री :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

ं

बॅटमॅन
Fri, 10/18/2013 - 20:00 नवीन
माझ्या मते हे उलट असायला हवं. पाच हजार वर्षांपूर्वी जे लिहिलं आहे त्या अनुषंगाने आपल्यात बदल न करता आजच्या काळानुरुप पाच हजार वर्षांपूर्वीच्या लेखनातील काल विसंगत गोष्टी टाकून दयायला हव्यात.
सहमत.
एकदा पोटाची चिंता मिटली की माणसाला तत्वज्ञानाची ओढ लागते. किंबहूना माणसाची ती गरज आहे.
म्यास्लोचा नीड हायरार्कीचा पिर्‍यामिड पाहिला तरी हे कळून येतं. बहुतेक रामदास म्हणतात (चूभूद्याघ्या): "जया खायाला अन्न मिळेना तया करंट्याला परमार्थ कैचा?"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

'ह्यातलं सामान्य लोकांनी १०

प्यारे१
Fri, 10/18/2013 - 20:04 नवीन
'ह्यातलं सामान्य लोकांनी १०-२० % जरी स्वीकारुन मार्ग अवलंबला तरी अध्यात्मप्रांतात सुद्धा प्रचंड प्रगती होईल.' हे असं हवंय. माय मिस्टेक. वाक्यरचना चुकली होती. बाकी मोक्ष म्हणजे बाहेरुन आणायची अथवा मेल्यानंतर कुठे पोचायची गोष्ट असा कुणाचाही समज असला तर तो निखालस चुकीचा आहे. मोक्ष म्हणजे 'मी आणि माझं' ह्याबद्दल ची आसक्ती संपणं नि स्वतःबद्दलची खरी ओळख पटणं. संपलं. त्या अनुषंगानं मार्ग पत्करुन वाटचाल करणं म्हणजे अध्यात्मशास्त्र नि हे ध्येय गाठणं ह्यालाच परमार्थ असं म्हणतात. ह्यात खणखणीत वास्तववाद आहे. अजिबात फसवणूक नाही. तरीही अ‍ॅग्री टु डिसअ‍ॅग्री आहेच्च.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

@ धन्या,

प्यारे१
Fri, 10/18/2013 - 20:12 नवीन
@ धन्या, बदलांबाबत! हरिपाठ नुसता म्हणायचा नाही रे. पाठ असून काय उपयोग मग? 'मंथुनि नवनीता तैसे घे अनंता , वाया व्यर्थ कथा सांडि मार्गु' चा अर्थ नक्की काय असतो सांगितलास तर आवश्यक बदल घडणं अपेक्षितच आहे असं ह्याच भगवद्गीतेच्या 'ऑथॉरिटी' ज्ञानेश्वरांनी म्हटलंय की. बाकी भगवद्गीतेमध्ये सांगितलेल्या गोष्टींमध्ये बदल करण्याची नेमकी कुठं गरज आहे ते सांगावं. ह्या उप्पर डिसकार्ड नुसतं न करता त्या ला त्याच तोडीचा पर्याय देखील द्या. ते जास्त महत्त्वाचं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

बाकी मोक्ष म्हणजे बाहेरुन

धन्या
Fri, 10/18/2013 - 20:37 नवीन
बाकी मोक्ष म्हणजे बाहेरुन आणायची अथवा मेल्यानंतर कुठे पोचायची गोष्ट असा कुणाचाही समज असला तर तो निखालस चुकीचा आहे. मोक्ष म्हणजे 'मी आणि माझं' ह्याबद्दल ची आसक्ती संपणं नि स्वतःबद्दलची खरी ओळख पटणं. संपलं. त्या अनुषंगानं मार्ग पत्करुन वाटचाल करणं म्हणजे अध्यात्मशास्त्र नि हे ध्येय गाठणं ह्यालाच परमार्थ असं म्हणतात. ह्यात खणखणीत वास्तववाद आहे. अजिबात फसवणूक नाही.
तुम्ही मोक्ष या शब्दाची वेगळीच व्याख्या सांगत आहात. चौर्‍यांऐंशी लक्ष योनींच्या जन्म-मरणाच्या फेर्‍यातून सुटका ही मोक्षाची पारंपारीक व्याख्या आहे. दहापैकी किमान सात धर्म मानणार्‍या (हिंदू) व्यक्ती मोक्षाची हीच व्याख्या सांगतील. जर तुम्ही म्हणताय ती व्याख्या योग्य असेल तर समाज अंधारात आहे. तो भलत्याच गोष्टीला मोक्ष समजतोय.
'मंथुनि नवनीता तैसे घे अनंता , वाया व्यर्थ कथा सांडि मार्गु' चा अर्थ नक्की काय असतो सांगितलास तर आवश्यक बदल घडणं अपेक्षितच आहे असं ह्याच भगवद्गीतेच्या 'ऑथॉरिटी' ज्ञानेश्वरांनी म्हटलंय की.
इथेही मी सहमत आहे. माझा विरोध आहे तो "गीतेत सांगितलं आहे तेच ज्ञान, बाकी सारं अज्ञान" या आततायी मताला.
बाकी भगवद्गीतेमध्ये सांगितलेल्या गोष्टींमध्ये बदल करण्याची नेमकी कुठं गरज आहे ते सांगावं.
पत्रलेखकाचं म्हणणं: म्हणजे अध्यात्मज्ञान हेच खरे ज्ञान. बाकी सगळे अज्ञान असे गीतेत स्पष्ट म्हटले आहे. परंतू मला इथे गीता हा ग्रंथ अपेक्षित नाही. आपल्या धर्मग्रंथांमधून लिहिलेलं सारं जे आज कालविसंगत आहे. आणि सुदैवाने कासवाच्या गतीने हे होतही आहे.
ह्या उप्पर डिसकार्ड नुसतं न करता त्या ला त्याच तोडीचा पर्याय देखील द्या. ते जास्त महत्त्वाचं.
पर्याय आहे. परंतू तो स्विकारण्यासाठी समाजाला परंपरांची, ग्रंथप्रामाण्यांची बंधने तोडावी लागतील. आपल्या आयुष्याची जबाबदारी आपण स्विकारायची, जे आपल्याला बदलता येईल ते बदलायचं, जे बदलता येणार नाही ते आहे तसं स्विकारायचं. त्यासाठी देव, धर्म, पाप-पुण्य, नशिब, प्रारब्ध वगैरे गोष्टींचा अजिबात आधार घ्यायचा नाही. माणूस म्हणून जगताना यातल्या कुठल्याच गोष्टीची गरज नसते. हे असं जगणं अवघड असलं तरी अशक्य नाही. मी अनिल अवचटांचं जे काही लेखन वाचलं आहे त्यावरुन मला वाटतं अनिल अवचट असंच आयुष्य जगले आहेत, जगत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

एक प्रयत्न.

अर्धवटराव
Fri, 10/18/2013 - 22:00 नवीन
>>तुम्ही मोक्ष या शब्दाची...तो भलत्याच गोष्टीला मोक्ष समजतोय. -- मुळात व्याख्येनुसार या सगळ्या गोष्टी अजमावतो म्हटलं तर पहिली पायरीच चुकते. व्याख्येला देखील सापेक्षता असते त्यामुळे सापेक्षतारहित कैवल्य त्यात मावणार कसं? >> माझा विरोध आहे तो "गीतेत सांगितलं आहे तेच ज्ञान, बाकी सारं अज्ञान" या आततायी मताला. -- एखाद्या प्रमेयाच्या अर्थाचा अनर्थ कसा होतो बघा. आपापल्या जिज्ञासेने, विचार शक्तीने शक्य होईल तेव्हढं ज्ञानभंडार मंथायला घ्यायचं व त्याच ज्ञानातुन, ज्याप्रमाणे ताकातनं लोणी वर येतं त्याचप्रमाणे आत्मज्ञान उमलेल, असा हा दृष्टांत आहे. आपण याचा अर्थ असा घेतला कि शेणात एक सोन्याचा तुकडा पडलाय तो उचलायचा व बाकी शेण फेकुन द्यायचं. ते चुक आहे. >>पत्रलेखकाचं म्हणणं: म्हणजे अध्यात्मज्ञान हेच खरे ज्ञान. बाकी सगळे अज्ञान असे गीतेत स्पष्ट म्हटले आहे. -- पत्रलेखकाने नेमकं कशावरुन हा अर्थ काढला हे मला तरी कळलं नाहि, पण साध्याला गवसणी घालायला अनेकानेक मार्गांची थोरवी गाणारी गीता, आणि आजन्म कर्मयोग आचरणारा श्रीकृष्ण असलं काहि बोलेल असं वाटत नाहि. >>आपल्या धर्मग्रंथांमधून लिहिलेलं सारं जे आज कालविसंगत आहे. आणि सुदैवाने कासवाच्या गतीने हे होतही आहे. -- ज्याला हिंदु धर्माचे धर्मग्रंथ म्हटल्या जातं ते याच रितीने तयार झाले आहेत. आणि हि थोरवी ग्रंथांची नाहि तर माणसाच्या सतत चिंतनशील विचारशक्तीची आहे. >>पर्याय आहे. परंतू तो स्विकारण्यासाठी समाजाला परंपरांची, ग्रंथप्रामाण्यांची बंधने तोडावी लागतील. -- माणसाचं स्वार्थभान इतकं जबरदस्त आहे कि ते त्याने कधिच, कुठल्याच धर्मग्रंथांची बंधनं स्विकारली नाहित. मग तो व्हॅटीकन सिटीचा पॉप असो, वा मक्का-मदीनेचा सर्वोच्च मौलवी असो वा शंकराचार्य. धर्मग्रंथप्रामाण्यवाद माणसाला बांधुच शकत नाहि. >> आपल्या आयुष्याची जबाबदारी आपण स्विकारायची, जे आपल्याला बदलता येईल ते बदलायचं, जे बदलता येणार नाही ते आहे तसं स्विकारायचं. -- कळत, नकळत आजवर माणुस याच पद्धतीने जगला, पुढेही तसाच जगेल. >>त्यासाठी देव, धर्म, पाप-पुण्य, नशिब, प्रारब्ध वगैरे गोष्टींचा अजिबात आधार घ्यायचा नाही. माणूस म्हणून जगताना यातल्या कुठल्याच गोष्टीची गरज नसते. -- या सर्व कुबड्या माणसाने स्वेच्छेने स्विकारल्या... केवळ आपली सोय म्हणुन. त्या कुबड्या स्वतः येऊन माणसाला चिकटल्या नाहित. आणि जोवर माणसाला कुठल्याही प्रकारची गरज भासत असेल तोवर कुबड्यांना तोटा नाहि. एक जाऊन दुसरी येईल, तिचं काम संपलं कि तिसरी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

>>>देव, धर्म, पाप-पुण्य, नशिब

प्यारे१
Fri, 10/18/2013 - 22:14 नवीन
>>>देव, धर्म, पाप-पुण्य, नशिब, प्रारब्ध वगैरे गोष्टींचा अजिबात आधार घ्यायचा नाही. Know the system, use the system, get the results and leave the system.... ! आमच्यासारख्या सामान्यांना कुबड्या म्हणण्यापेक्षा पांगुळगाडे लागतात ब्वा! पण ह्या पांगुळगाड्यांच्या जोरावर पावलं टाकायला शिकतो नंतर पायात ताकद आली की ते दुसर्‍यांसाठी सोडतो असं झालं तर मग त्याचा उपयोग झाला असं होतं. दुर्दैवानं आपलं महत्त्व वाढवण्याच्या नादात लोक पांगुळगाडेच सजवत बसतात नि तुलना करीत राहतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

तुमचा संदर्भ वेगळा आहे.

अर्धवटराव
Fri, 10/18/2013 - 22:19 नवीन
तुम्ही शाळा-विद्यालय-महाविद्यालय असा प्रवास करत मग स्वतंत्र अभ्यास करण्याची क्षमता बाणवायचं म्हणताय. मी शैक्षणीक कामात वेळ घालवायचा बहाणा करत आळशीपणाचे उद्योग करणार्‍यांच्या संदर्भात टंकलय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

हो मला धन्यालाच प्रतिसाद

प्यारे१
Fri, 10/18/2013 - 22:23 नवीन
हो मला धन्यालाच प्रतिसाद द्यायचा होता....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

कुबड्या ?

सस्नेह
Tue, 10/22/2013 - 12:58 नवीन
स्वामी विवेकानंदांनी राजयोगात म्हटलय की भौतिक ज्ञान हे मोक्षज्ञानाची पहिली पायरी आहे. भौतिक ज्ञानाची सीमा संपते तिथे पारलौकिक ज्ञान सुरू होते. इथे कुबड्यांचा प्रश्न येतोच कुठे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

मोक्ष म्हणजे 'मी आणि माझं'

विजुभाऊ
Sat, 10/19/2013 - 11:08 नवीन
मोक्ष म्हणजे 'मी आणि माझं' ह्याबद्दल ची आसक्ती संपणं नि स्वतःबद्दलची खरी ओळख पटणं असे असेल तर तिसर्‍या पेगला मोक्षाप्रत अवस्था सहज प्राप्त होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

पण तिसर्‍या पेगला देखील

चौकटराजा
Sat, 10/19/2013 - 12:13 नवीन
पण तिसर्‍या पेगला देखील मी माझ्या खर्चानं प्यायलोय की दुसर्‍याच्या याचे भान रहातच असेल ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

ते मिपावरील यनावाला नसावेत ..

बाळ सप्रे
Fri, 10/18/2013 - 17:10 नवीन
ते मिपावरील यनावाला नसावेत ..
  • Log in or register to post comments

अहो य ना वालावरकर तेच

आनन्दा
Sat, 10/19/2013 - 10:02 नवीन
म. टा. मध्ये या नावाने येणारी पत्रे यनावालांच्या भाषेला अनुसरूनच असतात. मला असे वाटते की यनावालांना याही पत्रातून काहीतरी वेगळेच सांगायचे असावे. पूर्ण पत्र वाचावे लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

बुध्दीदारिद्रय

प्रसाद गोडबोले
Fri, 10/18/2013 - 17:15 नवीन
पत्रलेखकाची कीव आली ...
  • Log in or register to post comments

जर पत्र य ना वालावलकर यांनी

गुलाम
Fri, 10/18/2013 - 17:55 नवीन
जर पत्र य ना वालावलकर यांनी लिहीलं असेल तर ते निश्चितपणे उपहासात्मक असावे असं वाटतं. कारण फायलीन वादळ येऊन गेल्यावर लोकसत्ता मधे त्यांचं वैज्ञानिकाचं अभिनंदन करणारं आणि ज्योतिषांची खिल्ली उडवणारं पत्र प्रसिध्द झालं होतं. ते पत्र खरंतर उपहासात्मक लिखाणाचं उत्तम उदाहरण होतं. मला वाटतं काहीतरी समजुतीचा घोटाळा आहे निश्चित..
  • Log in or register to post comments

पत्रलेखकाचे नाव य. ना.

धन्या
Fri, 10/18/2013 - 18:01 नवीन
पत्रलेखकाचे नाव य. ना. वालावलकर असे आहे. लेखाचा टोन उपहासात्मक नक्कीच नाही. कदाचित नामसाध्यर्म्य असेल. तरीही संपादक मंडळास लेखातील मिपा आयडी "यनावाला" यांचा उल्लेख काढून टाकावयाची विनंती केली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुलाम

+१०००

llपुण्याचे पेशवेll
Tue, 10/22/2013 - 13:04 नवीन
+१००० य ना वालावलकर यांचे पत्र अत्यंत उपहासगर्भ आहे हे यनावालांचे लेख ज्यांनी वाचले आहेत ते ही गोष्ट सहज ओळखतील. तरीही यनावाला हे अस्थानि तुलना करण्यात सु(कु)प्रसिद्ध आहेत हे जाता जाता नमूद करून ठेवलेले बरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुलाम

सहमत.

बॅटमॅन
Fri, 10/18/2013 - 18:08 नवीन
हे शाश्वत ज्ञान नव्हेच. पत्रलेखकास भेटून त्यांजवर एक दृढ लगुडप्रहार केल्यास ते तथाकथित शाश्वत ज्ञान कितपत उपयोगी पडेल हे विचारावयाची इच्छा होतेय.
  • Log in or register to post comments

वेदोक्त प्रकरणात जीर्ण भुक्कड

ग्रेटथिन्कर
Fri, 10/18/2013 - 18:11 नवीन
वेदोक्त प्रकरणात जीर्ण भुक्कड तत्वज्ञान असलेल्या ग्रंथांवरुन वितंडवाद घालणार्याचा हा अनुयायी असावा. तिकडे पाश्चिमात्य देशात शोध लागले की "हे आमच्या वेदात लिहूनच ठेवलेले आहे " हे कॉपीराईट वाक्य ऐकायला मिळते. अध्यात्मवाद नावाचा कोणताच वाद अस्तित्वात नाही ,भोळसट लोकांना फसवण्यासाठी काढलेले हे व्यवसाय आहेत.
  • Log in or register to post comments

?

मुक्त विहारि
Fri, 10/18/2013 - 20:04 नवीन
(स्मॉल पेगर)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ग्रेटथिन्कर

अहो ते थिंकर आहेत

आनन्दा
Sat, 10/19/2013 - 10:05 नवीन
त्यांचे चिंतन त्यांना मुक्तपणे करू द्या की. उगाच कशाला बिब्बा घालताय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

आजचा दिवस सार्थकी लागला.

अर्धवटराव
Fri, 10/18/2013 - 19:03 नवीन
>>जन्म मरणाचे फेरे चुकवून आजवर मोक्ष मिळवणार्‍यांची यादी काढली तर त्यात भारतीय नावे सर्वाधिक असतील, हे निश्चित. -- =)) याला म्हणतात अस्सल विनोद... पु.लंच्या आत्म्याला आज शांती लाभली असणार.
  • Log in or register to post comments

जन्म मरणाचे फेरे चुकवून आजवर

विजुभाऊ
Fri, 10/18/2013 - 19:58 नवीन
जन्म मरणाचे फेरे चुकवून आजवर मोक्ष मिळवणार्‍यांची यादी काढली तर त्यात भारतीय नावे सर्वाधिक असतील, हे निश्चित.
मोक्ष मिळालेल्यांची यादी कशी काढणार? त्याना मोक्ष मिळाला आहे हे कसे ठरवायचे? धर्मासाठी कार्य केले हाच एकमेव निकश लावायचा तर बुद्धाने हिंदू तत्वज्ञानाची अक्षरशः पिसे काढली. विवेकानंदानी हिंदू धर्मामधील फालतू कर्मकांडावर कोरडे ओढलेत. हे सर्व मोक्षाला लायक ठरत नाहीत. मोहम्मद अट्टा / कसाब /बियन्त सिंग / भिंद्रावाले हे सर्व मोक्षाप्रत पार झाले असतील. जादूगार सत्यसाईबाबा ना मोक्ष प्राप्त झाला असेल. आसाराम बापु मोक्षाच्या वाटेवर असतील. अवांतरः मोक्षाला गेलेल्या लोकांची यादी बनवण्यासाठी सर्व्हे करण्यासाठी लोक हवे आहेत. इच्छुकानी अर्ज करावेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

हाईट्ट..

उपास
Fri, 10/18/2013 - 19:14 नवीन
हाईट्ट आहे हे पत्र म्हणजे, अशी आळशी पण चतुर लोकं बघितली की प्रश्न पडतो कुठे चाल्लोय आपण. गीता, मोक्ष ह्यांचा असा चुकीचा अर्थ काढून आत्ममग्न राहाणार्‍याला काय जागं करायचं.. कीव करावी अशांची आणि त्यांना त्यांच्या मोक्षाच्या मार्गावर सोडून जावं, हेच खरं! आणि हो, मोक्ष मिळालेल्यांची लिस्ट बघायला आवडेलच :)
  • Log in or register to post comments

+१

बॅटमॅन
Fri, 10/18/2013 - 19:22 नवीन
आणि त्या लिष्टेत किमान या जन्मातून तरी लौकर सुटलेले म्हणून एकाचे नाव घालायला लै आवडेल. अशा लोकांनी जगूनही कुणाला फायदा नसतो म्हणा तसा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपास

तुम्ही हे वाक्य गमतीत लिहिले

धन्या
Fri, 10/18/2013 - 19:32 नवीन
तुम्ही हे वाक्य गमतीत लिहिले आहे याची जाणिव आहे. तरीही हा विचार मला जग हे फक्त काळया आणि पांढर्‍या रंगात पाहण्यासारखा वाटतो. तुम्ही म्हणताय तशा व्यक्तींना भानावर आणण्याचा जरुर प्रयत्न करावा. त्यांची भानावर यायची ईच्छा नसेल तर त्यांना त्यांच्या आयुष्याच्या भरवशावर सोडून दयावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

सहमत

बॅटमॅन
Fri, 10/18/2013 - 19:42 नवीन
बायनरी थिंकिंग होतेच त्यामागे, मी नाकारत नाहीच्चे ;) बाकी सहमत आहे, फक्त तो त्रागा केल्या जातो काहीवेळेस त्याचे हे फॉक्कन झालेले निस्सारण समजावे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

फॉक्कन ?

आनन्दा
Sat, 10/19/2013 - 10:07 नवीन
ब्वॉक्क्क्क्क्क्क
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

@ धन्या.....

मुक्त विहारि
Fri, 10/18/2013 - 20:02 नवीन
तुमचे विचार लवकर पचतील आणि समजतील असे नसतात. ह्याचे अजून एक छान उदाहरण म्हणजे हा लेख.. वाचतो, मनन करतो, चिंतन करतो आणि जर काही शंका असतील तर विचारतो... (मुद्दाम गहन विचार करून टंकण्यापेक्षा किंचीत विचार करून लिहीत आहे....)
  • Log in or register to post comments

पत्र डोक्यावरून गेल्याचं पत्र

मालोजीराव
Fri, 10/18/2013 - 20:03 नवीन
पत्र डोक्यावरून गेल्याचं पत्र मटा ला पाठवीत आहे
  • Log in or register to post comments

पत्र डोक्यावरून गेल्याचं की

बॅटमॅन
Fri, 10/18/2013 - 20:06 नवीन
पत्र डोक्यावरून गेल्याचं की पत्र लिहिणारा डोक्यावर पडल्याचं पत्र पाठवणार आहात ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव

@ मालोजीराव...

मुक्त विहारि
Fri, 10/18/2013 - 20:09 नवीन
हाताला घड्याळ बांधले असेल तर आणि तरच मटा वाले लक्ष देतात....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव

ते यनावालांचे पत्र आहे.

प्रचेतस
Fri, 10/18/2013 - 20:09 नवीन
ते यनावालांचे पत्र आहे. १००% उपहासात्मक, किंबहुना (सध्या उपक्रम बंद असल्याने) आलेल्या प्रचंड उद्वेगाने लिहिलेले असावे. =)) बाकी हा धाग्यामुळे यनावाला कदाचित इकडे प्रकट होतील असे वाटतेय.
  • Log in or register to post comments

(यनावाला इथे आले तर कितीरंगी

बॅटमॅन
Fri, 10/18/2013 - 20:12 नवीन
=)) (यनावाला इथे आले तर कितीरंगी सामना होईल आणि त्यात कीबोर्डने कित्ती कित्ती जिल्ब्या पाडायचा चानस मिळेल या कल्पनेने हाताची बोटे शिवशिवू लागलेला) बॅटमॅन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

ते यनावालांचे पत्र आहे.

धन्या
Fri, 10/18/2013 - 20:45 नवीन
ते यनावालांचे पत्र आहे.
हे यनावालांचे पत्र असेल तर हे पत्र उपहासात्मक लेखनाचे एक उत्तम उदाहरण असेल. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

अगदी

प्रचेतस
Fri, 10/18/2013 - 20:52 नवीन
अगदी :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

हॅहॅहॅ

प्रकाश घाटपांडे
Fri, 10/18/2013 - 20:49 नवीन
फारच मनातल लिहिल ब्वॉ! वल्ली या निमित्ताने यनावालांचे लेखन मिपाकरांनी जरुर वाचावे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

मला मोक्ष मिळाला

चौकटराजा
Fri, 10/18/2013 - 20:17 नवीन
मी इथे चौकट राजा हे नाव घेण्याचे कारण मी सिनेमातल्या चौकट राजा सारखाच मंद आहे आहे मला मनोमन वाटले, धन्याकाका ब्याट्याकाका ,प्यारे मामा, यांच्या पुढे आपण काय आहोत ? काही नाही ! चौकट राजा या नावाचे सार्थक झाले मला मोक्ष मिळाला. जप , ध्यान, माळा, गुरू, अनुग्रह, कृपा, आशीर्वाद , प्रसादाचा नारळ ,गुरु बंधू, गुरू भगिनी, पूर्वजन्मीचे सुकृत , सप्ताह,कशाचाही माझ्या आयुष्यात पत्ता नाही. हो, तरीही मोक्ष मिळाला. हे बहु काका मंडळीच्या मुळे . धन्यवाद !
  • Log in or register to post comments

माझा मोक्ष या संकल्पनेवर

धन्या
Fri, 10/18/2013 - 20:42 नवीन
माझा मोक्ष या संकल्पनेवर विश्वास नसतानाही ज्यांच्यामुळे आपल्याला मोक्ष मिळाला त्यांच्या यादीत माझे नाव टाकून माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्यामुळे मी श्री. चौकटराजा यांचा जाहीर निशेध करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

मुबारक हो.

अर्धवटराव
Fri, 10/18/2013 - 21:27 नवीन
काँग्रॅच्युलेशन्स :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

अस्मादिकाञ्चे वय वाढवून

बॅटमॅन
Fri, 10/18/2013 - 21:39 नवीन
अस्मादिकाञ्चे वय वाढवून स्वतःचे काकापण मला बहाल केल्याबद्दल काकाञ्चा निषेध!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

धन्यानं निषेध केला, बॅट्यानं

प्यारे१
Fri, 10/18/2013 - 21:47 नवीन
धन्यानं निषेध केला, बॅट्यानं पण केला... मी तरी का मागे? आक्ख्या मिसळपावचा 'का का' असताना माझा मामा केल्याबद्दल चौकटराजाचा हार्दिक.. आपलं जाहिर निषेध ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

मी खरे ते बोल्लो

चौकटराजा
Sat, 10/19/2013 - 09:17 नवीन
मी खरे तो बोल्लो . हा निषेध सोहळा पूर्व नियोजित आहे. मी मिपाकरच होतो आहे व राहीन . मला संपादक वगैरे कुठल्याही पदाचा मोह नाही. हे सपस्टीकरण आहे माफीनामा नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

तुम्हाला पण

आनन्दा
Sat, 10/19/2013 - 10:09 नवीन
तुम्हाला पण नवीन पिढीने अडगळीत टाकलेले दिसतय..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

शाश्वत म्हणजे काय?

कवितानागेश
Fri, 10/18/2013 - 21:13 नवीन
शाश्वत म्हणजे काय? ज्ञान म्हणजे काय?
  • Log in or register to post comments

शाश्वत म्हणजे काय? ज्ञान म्हणजे काय?

मुक्त विहारि
Fri, 10/18/2013 - 22:16 नवीन
शाश्वत म्हणजे काय? ======> लग्न झाल्या वर बायको नवर्‍याच्या गळ्यात जे काही बांधते (कुणी "जू" म्हणतात तर कुणी "वेसण") ते शाश्वत. (हे अद्रुश्य असते, हे सांगणे न लगे) ज्ञान म्हणजे काय? ======> लग्न झाल्या नंतर बायको जे काही सांगते ते ज्ञान.. (शेजार्‍याला चांगली नौकरी मिळाली. माझ्या भावाने त्याच्या बायकोसाठी बांगड्या आणल्या (मग त्या ५ रु.वाल्या काचेच्या का असेनांत) इ,)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा