महाराष्ट्रामधील सातारा जिल्हा म्हणजे दऱ्या डोंगरांनी भरलेला. बारमाही वाहत असलेल्या नद्या असलेला परीसर जास्तीत जमिनीवर असलेले नगदी ऊसाचे पिक ह्यामुळे हातामध्ये खुळखुळत असलेले पैसे. ह्यामधुन शेतीतून उरणारा वेळ व त्यातून वेळ घालविण्यासाठी म्हणुन गावाच्या राजकारणामध्ये असलेला सहभाग.
कातोली असंच एक गाव. कुठल्याही गावामध्ये असतात तसे इथेही दोन गट होतेच, आबा आणी नाना. आबा आणी नानां साखर कारखाना आपापल्या ताब्यात ठेवण्यासाठी अश्या अनेक गावांमधील लोकांना झुलवत ठेवत त्यातून गावांमध्ये मारामाऱ्या , दंगल, झालाच तर खून इ. ला तर निवडणूक काळामध्ये तर अगदी उत येत असे. ग्रामीण पोलिस तर अगदी वैतागून गेले होते करण काही कारवाई करावी तर लगेच स्थानिक नेते मंडळीचे वा आमदार, खासदार, मंत्री ई. चे पोलिस स्थानकामध्ये दूरध्वनी सुरु व्हायचे. व कारवाई आधीच गुन्हेगाराला सोडून द्यायची वेळ यायची, यातून उपद्रवी मंडळींचे चांगलेच फावायाचे. ह्यातूनच मग निवडणुका, गणपती, नवरात्र, शिवजयंती इ. ला दंगल ठरलेली असायचीच. सर्व सामान्य लोक तर अगदी वैतागून गेले होते. तक्रार तरी किती वेळा करायची? आणी केलीच तर दरोज गावामध्ये तोंड बघायचे… सगळे अगदी तोंड बांधून बुक्क्यांचा मार सहन करत होते म्हणाना.
अश्याच लौकिक असलेल्या म्हणजे अशी बरीचशी गावे असलेल्या एका तालुक्यामध्ये संजय पवार ह्या (आळंदीच्या माउलीच्या व तुकारामांच्या वारीची सुरुवात करण्यात मोलाचा वाटा असण्याऱ्या हैबतबाबा पवारांचा वशज सागणाऱ्या) उमद्या तरुणाची बदली तहसीलदार म्हणुन झाली.
संजय पवार हा १९९० च्या एम.पी.एस.सी. (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा) तुंकडीचा. पहिल्या प्रयत्नामध्ये पोलिस उप-निरक्षक म्हणून निवड झालेली असताना देखील, केवळ प्रशासकीय सेवेमध्ये जायचा ह्या एकाच झपाटलेल्या विचाराने अभ्यास करून अगदी माझी निवड होई पर्यंत मी दाढी देखील नाही करणार अशी प्रतिज्ञा केलेली. आणि त्याचाच भाग म्हणून सकाळी कॉलेज करून रात्री झोप येते तर अभ्यासाला बसताना पाटीमध्ये गार पाणी घेऊन त्यात पाय बुडवून रात्रभर बसणे इ. उपाय करून यश पदरामध्ये पाडलेले. झटपट निर्णय व कोणाच्याही दबावासमोर न झुकणारा हा मर्द मराठी गडी.
संजय पवार ने आल्या आल्या बेकायदेशीर वाळू उत्खनन बंद केले. प्रशासनावर वचक आणुन लोकांच्या त्याच त्याच कामासाठी मारायाला लागत असलेल्या चकरा थांबविण्यात आल्या. तहसीलदार व न्याय-दंडाधिकारी म्हणुन कामाला धडाक्यात सुरुवात करून उशिरा न्याय म्हणजे अन्याय हे सूत्र लागू करून अचूक व त्वरीत न्याय ह्यामुळे लोकांमध्ये अल्पावधीमध्येच प्रसिद्धी मिळाली. प्रशासनामध्ये याचा वचक तयार होऊन अवैध धंदे करणारे लोक अगदी शिपाई जरी समोर दिसला तरी घाबरू लागले.
असं चालू असतानाच साखर कारखानाच्या निवडणुका लागल्या. किरकोळ बाचा - बाची वगळता उमेदवार आपापल्या समर्थकांबरोबर येउन आपापले अर्ज तहसीलदार कार्यालयाकडे भरू लागले. एके दिवशी निवडणुका व त्यांचा बंदोबस्त ह्याविषयीची बैठक तहसीलदार कार्यालयामध्ये चालू असतानाच कातोली पोलिस आउट पोस्टचा बिनतारी संदेश आला की गावामध्ये जोरदार दोन गटांमध्ये दंगल झाली असून २५-३० जण जखमी झाले आहेत. ही खबर मिळताच बैठकीसाठी आलेले पोलिस उप-अधिक्षक तहसीलदारांकडे आले व घडलेली घटना सांगितली. तहसीलदारांनी त्यांना पोलिस अधीक्षक सातारा याना कळविण्यास सांगितले व तालुक्याच्या ठिकाणी बोलावले. निरोप मिळताच पोलिस अधीक्षक ताबडतोब आले.
पोलिस उप-अधिक्षकांनी त्यांना सर्व परिस्थिती सांगितली. पोलिस अधीक्षक तहसिलदारांना म्हणाले, सर काय करूयात? तहसीलदार म्हणाले झाला प्रकार गंभीर आहे. नशिबाने ह्यावेळेस खून बिन झाला नाही. काहितरी जालीम इलाज करायला पाहिजे. पोलिस अधीक्षक म्हणाले सर माझ्याकडे एक योजना आहे, असं म्हणुन ते तहसीलदारांच्या कानाला लागले. पण सर तुमची परवानगी लागेल. (तहसीलदार हे न्यायदंडाधिकारी पण असतात, त्यामुळे पोलिस कारवाई जसे लाठीमार, गोळीबार इ. साठी ते अथवा प्रांत अथवा जिल्हाधिकारी यांची प्ररिस्थितिनुसार परवानगी घ्यावी लागते). तहसीलदार म्हणाले आपण परिस्थितीनुसार निर्णय घेउयात. तोपर्यंत तहसीलदारांनी प्रांत व सातारा जिल्हाधिकारी यांना सर्व कल्पना दिली. पोलिस अधीक्षक व तहसीलदारांची गाडी गावामध्ये पोहोचली. मागोमाग जलद कृती दल व दंगा नियंत्रण पथकाची गाडी होती. पोलिस अधीक्षकांनी सर्व पोलिसांना योग्य त्या सुचना दिल्या होत्या.
सर्व जण गावामधील ग्रामपंचायती मध्ये गेले. तहसीलदारांनी सरपंच व ग्रामसेवकांना लोकांना चर्चे साठी बोलाविण्याची सुचना केली. यथावकाश काही धोका नाही हे पाहून दोन्ही गट चर्चे साठी आले. प्रत्येक गट एक दुसऱ्यावर आरोप करू लागला. तहसीलदार व पोलिस अधीक्षक त्यांना समजावत होते, पण पुन्हा जोरात वादावादी/हाणामारी होण्याची चिन्हे दिसू लागताच तहसिलदारांनी, पोलिस अधीक्षकांना काही सांगितले.
इकडे जलद कृती दलाचे पोलीस "पाय" मोकळे करण्यासाठी एक एक करून बाहेर पडत होते व चर्चा चालू असताना नियोजनबद्धरीत्या सर्व जमावाच्या मागे उभे राहिले होते. पोलिस अधीक्षकांना सर्व चित्र दिसताच व तहसिलदारां बोलणे होताच "खुण" केली. त्याबरोबर जलद कृती दलाचे पोलीस जमावावर अक्षरश: तुटुन पडले. तहसिलदारांनी सुचना केल्याप्रमाणे पोलिस लोकांच्या फक्त आणी फक्त पायावरच मारत होते. अक्षरश: काही मिनटांमध्ये उभा असलेला जमाव आडवा झाला होता. तहसिलदारांनी, पोलिस अधीक्षकांना सुचना करून जखमी लोकांना इस्पितळमध्ये हलविण्यास सांगितले. जे ठीक होते त्यांची हजेरी घेउन त्यांना अटक केली. दुसऱ्या दिवशी न्यायालयामध्ये हजर करून त्यांची कोठडी घेतली. ज्यांचा जामिन झाला त्यांना तहसिलदारांनी दररोज सकाळी १० वाजता तहसिलदारांच्या समोर हजेरी देणे बंधनकारक केले.
दसऱ्या दिवशी लोकं हजेरीसाठी आले तर तहसिलदार कुठे जागेवर होते, ते तर तालुक्यातील एका टोकावर अगदी डोंगरमध्ये असलेल्या गावामध्ये भेट द्यायला गेलेले. लोकांसाठी निरोप होता जास्तीत जास्त १ तासामध्ये त्या गावामध्ये पोहोचायचे, अन्यथा उशीर करेल त्याचा जामिन रद्द करून पुन्हा तुरुंगामध्ये रवानगी.
घामेघूम लोक तिथे पोहोचले, तर तहसीलदार कामामध्ये व्यस्त. दुपारचे जेवण नाही, लोकांच्या पोटामध्ये कावळे तुटुन पडलेले . पण करतात काय? त्यात तहसिलदारांनी ताकीद दिलेली मी कधीही हजेरी घेईन, कोणीही इथून जायचे नाही. अखेर सायंकाळी ५ वाजता हजेरी झाली. थकलेले व भुकेले लोक गावी परत गेले. दुसऱ्या दिवशी परत तसंच. परत दुसरे गाव , दुसरया टोकावरचे , पुन्हा सर्व तसेच. लोक अक्षरश तहसिलदारांना पाया पडुन म्हणायला लागली, साहेब चुक झाली, झक मारली आणि राजकारणामध्ये पडलो, साहेब पुन्हा गावामध्ये राजकारण काय घरीपण आवाज नाही काढणार.
१ महिन्याने त्या गावाची निवडणूक होऊन सर्वसामंजस्याने गावाने एकत्र येउन निम्मे विरुद्ध पार्टीचे व निम्मे सत्ताधारी पार्टीचे उमेदवार बिनविरोध निवडुन आणले. अगदी एकाचेही रक्त न सांडता. :)
वाचने
3263
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
है शाब्बास....
@ हर्षद....
सकारात्मक कथा असतील तर...
हैबत बाबा म्हणजे आरफळचे का
जे ब्बात.
+१११
In reply to जे ब्बात. by अर्धवटराव
हैबत बाबा म्हणजे आरफळचे का
मस्त.. आधी फक्त कानोसुनी
जबरी कथा. जमावासोबतच त्या
+१११
In reply to जबरी कथा. जमावासोबतच त्या by बॅटमॅन
एशः बॅटम्यानस्य प्रथमं
किम् अभवत् भो: विजुभौ? अहं तु
In reply to एशः बॅटम्यानस्य प्रथमं by विजुभाऊ
प्रतिसादान् सम्यक् सिञ्चयामि
In reply to किम् अभवत् भो: विजुभौ? अहं तु by बॅटमॅन
आमचं आपलं ठिबक. थेंबथेंब
In reply to प्रतिसादान् सम्यक् सिञ्चयामि by अर्धवटराव
हो
In reply to किम् अभवत् भो: विजुभौ? अहं तु by बॅटमॅन
+१
In reply to एशः बॅटम्यानस्य प्रथमं by विजुभाऊ
...
धन्यवाद