Skip to main content

अव्यक्त…

लेखक मेघनाद
सोमवार, 14/10/2013 या दिवशी प्रकाशित केले.
पहिला भाग लिहून बरेच दिवस झाले असल्यामुळे येथे पहिल्या भागाचा दुवा येथे देत आहे. इच्छुक वाचकांनी दोन्ही भाग अनुक्रमे वाचावेत हि विनंती. --------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- आणि गाणं पूर्ण होत न होत तोच तो नाजूक चेहरा पुन्हा राजीवच्या डोळ्यासमोर अवतरला…आता ती सुंदरी तिच्या शुभ्र कपड्यांमध्ये तर अगदी परीवाणी भासत होती. राजीवच्या नजरेस तर आता दुसरं काही दिसतंच नव्हतं. आता पर्यंत राजीवच्या तिच्यावर खिळलेल्या नजरेचा अंदाज तिलाही येऊ लागला होता. तिने सुरुवातीला राजीवला नजरेनेच खोट खोट उडवून लावले होते. राजीव बिचारा अगदीच हिरमुसल्या सारखा झाला होता… इतक्यातंच राजीवच्या उपवर भावाने राजीवला स्टेज वर बोलावल घेतलं. राजीवही दुखावलेल्या मनाचा असल्याने थोडसं दुर्लक्ष (?) करून सरळ भावाकडे गेला होता. आतापर्यंत वांगनिश्चयाचा विधी पार पडला होता व राजीव वर स्टेज वर उभं राहून काहीतरी काम पार पाडण्यची जबाबदारी आली होती. त्यामुळे एकीकडे मिळालेल्या कामामुळे आणि सर्वांसमोर उभं राहण्याच्या मिळालेल्या संधीमुळे राजीव भलताच खुश होता, पण समोरून अधूनमधून होत असलेल्या दुर्लक्षामुळे मधेच निराश होत होता. एवढ्या सर्व घाईगडबडीतहि उपवर असलेल्या राजीवच्या भांवाच मात्र राजीवच्या ह्या सर्व चूळबुळीकडे लक्ष होतं. त्याने तर एकदमच विचारल " काय रे बाबा लग्न माझ आहे लक्षात आहे ना, कि तू स्वताच्याच तयारीला लागला आहेस?" ह्या अनपेक्षित प्रश्नाने राजीव गोंधळूनच गेला व त्याच्या मुद्रेवरून भावाने जे ओळखायचे होते ते ओळखल होतं, फक्त कोण? हा प्रश्न अनुत्तरीत होता, आणि ते उत्तर रात्रीपर्यंत मिळवायचंच हा निश्चय त्याने मनाशी केला होता. सर्व विधी झाल्यावर रात्रीच्या सह्भोजनाची वेळ जवळ आली होती, आणि राजीवने मनाशी जुळवलेल्या बेताची काहीही करून अंमलबजावणी राजीवला करायचीच होती. भोजनाच्या पंगतींची तयारी झाली आणि राजीवने उपवर भावाच्या बाजूची जागा पटकावली. अहो भाग्यम ती सुंदरी राजीवच्या समोरील पंगतीत अगदी समोरच येउन बसली, दुधात साखर. हळू हळू भोजनाबरोबर गप्पा सुरु झाल्या आणि त्यातूनच राजीव आणि त्या सुंदरीची नजरभेट वाढू लागली, राजीवला आजचं जेवण म्हणजे अगदी मेजवानीच वाटू लागली कधीही संपू नये अशी. आता मात्र मगाचपर्यंत होत असलेल दुर्लक्ष हळूहळू नाहीस झालेलं होत आणि अनोळखी भावनाहि कमी झाली होती. उपवराची उत्सुकता हि ताणली जात होती. होता होता भोजन झाल व परत नजरेतील अन्तर वाढल. त्याच रात्री घराच्या अंगणात बसलेल्या राजीवला त्याच्या भावांनि गाठलाच, उपवर भावाने तर त्याची कसून चौकशी सुरु केली होती आणि इतर २-३ भावांनी पण राजीवची हि चोरी पकडली होती त्याच्या नकळतंच. आणि मग शोध लागला कि राजीवच्या होणाऱ्या वाहिनीच्या बहिणीची ती खास मैत्रीण होती…नांव होत मनाली, मना आली ती मनाली. दुसरा दिवस म्हणजेच लग्नाचा दिवस उजाडला, राजीव भल्या पहाटेच जागा झाला होता, सर्व आन्हिकं आटपून मोतिया रंगाचा राजेशाही शेरवाणी घालून तयार झाला होता. राजीवचं ते रूप भलतंच राजबिंड वाटत होतं. सकाळी ६ पासूनच सर्व आप्त मंडळी जमण्यास सुरुवात झालि होती. गावातील शेजारी, दूरचे-जवळचे नातेवाईक सर्वच सहकुटुंब येऊ लागले होते. तरीही राजीवचं मन काही थाऱ्यावर नव्हतं कारण त्याची मनाली काही अजून दिसली नव्हती. आज तरी तिने लवकर मंडपात यावं अशी राजीवची मनोमन इच्छा होती, तिने आज कुठला ड्रेस घातला असेल? ती आज कशी दिसत असेल? ती मला ओळखेल कि नाही? असे एक ना अनेक प्रश्न त्याला टोचणी लावून होते. आणि ती वेळ आलीच उपवधू बरोबर मनाली सुध्धा दिमाखात बाहेर आली, तिने आज लाल रंगाचा उंची चुडीदार घातला होता अगदी एखाद्या राजकन्येसारखी दिसणारी ती सुंदरी आपल्यासाठीच सजून धजून आली आहे असंच वाटलं राजीवला क्षणभर. त्याच मन अगदी पिसाप्रमाणे हळुवार तरंगत होत मनालीच्या आसमानी सौंदर्यावर. आज तिची नजरहि राजीवला शोधत होती, दोघांची नजरभेट होताच एकही शब्द न बोललेली ती दोघ एकमेकांशी बरंच काही बोलली होती. आज राजीवचे भाऊ पण ह्या प्रेमकथेत सामील झाले होते, राजीवला साथ द्यायला. वरपक्षाकडून अक्षता वाटायचं काम आपसूकच राजीवच्या ताब्यात दिलं गेल, काय ते दृश्य राजीवचे हात मनालीच्या हातात अक्षता देत होते आणि नजर मात्र एकमेकांच्या नयनांत हरवून गेली होती. मंगलाष्टके सुरु असताना देखील राजीव मनाली कडेच बघत होता आणि मनाली राजीवकडे. पेढे वाटप देखील राजीवकडेच सोपवलं गेलं होतं, बंधूंची कृपा दुसरं काय. कधी बाजू-बाजूला तर कधी समोरासमोर उभे राहून मनाली आणि राजीव पेढे व गुलाब वाटायचं काम पार पाडत होते. एकीकडे उपवर भाऊ लग्न होऊन नवरा झाला होता आणि दुसरीकडे राजीव तश्याच काहीश्या स्वप्नामध्ये हरवून गेला होता. परत लग्नानंतरची पंगत बसवली गेली आणि त्यातही राजीव आणि मनाली समोरासमोर बसली होती अगदी जाणूनबुजून, हळू हळू पदार्थ घेण्याचा आग्रह नजरेनेच होऊ लागला होता. नंतर राजीवने आग्रह करून दोन ज्यादा गुलाबजामून मनालीच्या ताटात वाढून मनातील इच्छा पूर्ण करून घेतली होती आणि मनालीने देखील हळुवार लाजून ते गुलाबजामून जरा जास्तच गोड मानून खाल्ले होते. लग्न आटपून रात्री घरी आल्यावर दोन्ही पक्षातील मंडळींची ओळख करून दिली गेली, राजीवची ओळख जरा जास्तच जोर लावून करून दिली होती त्याच्या सगळ्या भावांनी अगदी नवविवाहितासकट. फिल्मी गाण्यांच्या भेंड्या खेळण्याच फर्मान राजीवच्या भावाकडून सोडण्यात आलं मग काय आयती चालून आलेल्या संधीच राजीवने अगदी सोन केल तेही " तुझे देखा तो ये जाना सनम " गाण्यातील मोक्याच्या शब्दांवर मनालीला झकास नजर देऊनंच. मनाली देखील काही कच्ची खिलाडी नव्हती तिने पण "दीदी तेरा देवर दिवाना" गाण्याने राजीवला चोख उत्तर दिल होतं. हे दोन दिवस राजीवसाठी अगदी अनपेक्षित आणि स्वप्नवत गेले होते. सर्व छान छान सुरु असताना होऊ नये तेच घडणार होते, मनाली उद्या जाणार ह्या बातमीने राजीव अगदी अस्वस्थ झाला होता. मनाली नजरेपासून दूर होणार हा विचारंच त्याला सहन होत नव्हता, त्याने सर्व विचार बाजूला सारून भावाला गाठून "मनालीच्या घरच्यांना उद्याचा दिवस थांबायला सांग ना, प्लीजजज" भावाने देखील हा विडा उचलून मध्यस्थी करायचा खूप प्रयत्न केला पण व्यर्थ काही कौटुंबिक कारणांमुळे मनालीच कुटुंब दुसऱ्या दिवशी पहाटेच निघणार होतं. हि बातमी ऐकून राजीवला त्या रात्री दिवसभराचा थकवा असूनही झोपच लागत नव्हती, तिचं ते मोहक हसणं, हवेच्या झुळुकीबरोबर चेहरयावर पसरणाऱ्या त्या हळुवार काळ्याभोर बटा, परी सारखी दिसणारी ती आणि चोरून बघणारी तिची नजर वारंवार त्याच्या डोळ्यांसमोर येत होती. पहाटेच उठून राजीव अंगणात आणि घरात फेऱ्या मारत होता, निघणाऱ्या मंडळींची देखील आवारावर सुरु झाली होती, अशातच त्याची परी मनाली अंगणात आली आणि दोघांची नजरानजर होताच राजीवने नजरेतूनच नापसंती व्यक्त करून दाखवली, मनलीला देखील निघायची इच्छा नव्हती पण तिला जाणं भाग होतं. तिने दुरूनच कान पकडून राजीवला सॉरी म्हटलं, परंतु हा दुरावा सहन न करू शकणारा राजीव काही ऐकून घ्यायला तय्यार नव्हता. पण काही वेळाने राजीवने स्वतःला सावरून घेतलं आणि अंघोळीच गरम पाणी देण्याच्या निमित्ताने का होईना त्याच्या परीला, मनालीला अगदी डोळ्यांत साठवून घेतलं. ती निघताना अगदी जड मनाने त्याने तिला निरोप देत होता आणि मागे उभा राहून राजीवचा भाऊ खांद्यावर हात ठेवून राजीवला सांभाळून घेत होता. राजीव आणि मनालीच कोवळ प्रेम असंच अव्यक्त राहून गेलं…………………………। नोट: हि कथा आणि मनालीच नाजूक भावविश्व उलगडण्यासाठी जास्ती तपशीलवार लिहिली आहे. मिपा चे सुजाण वाचक ह्या कथेला योग्य तो न्याय देतीलच हि खात्री आहेच, अशी कथा लिहिण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे तेव्हा चूकभूल सांभाळून घ्यावी हि विनंती. सत्यघटनेवर आधारित.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3212
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

ही तुमच्या स्वतःच्या बाबतीत घडलेली कथा आहे का? पहिल्या भागाला कोणीतरी हम आपके है कौन म्हटलं होतं. पण तसं नाही. त्या दोघांची ओळख एवढीच का राहिली?

ओ दादा " उपवर आणि उपवधु " या शब्दांच्या अर्थात तुमची बरीच गल्लत झाली आहे कन्या उपवर झाली या चा अर्थ ती वयात आली तिचे लग्न लावायला हरकत नाही असा होतो. "उपवधु " असा शब्द नाहिय्ये. तुम्हाला बहुतेक नवरदेव किंवा नवरी असे शब्द वापरायचे असतील

पुढील भाग येणार आहेत की कथा सम्पली आहे. पुढे काय झाले हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे. ते परत भेटले का ? त्यान्चे लग्न झाले का ?

In reply to by खटपट्या

त्यांनी लिहीले आहे की, एका सत्य घटनेवर आधारीत. ("खाली क्रमशः कुठे आहे?" हे वाक्य आणि आणि "नाटक कुठे आहे? तो म्हातारा तर नुसताच चहा पित आहे."हे वाक्य वेगळे असले तरी उद्देश सारखाच समजलात तरी चालेल.

In reply to by खटपट्या

असामी असामी...पूलं... फार मोठे वाक्य आहे... ता.क. खालील वाक्य पण अशीच आहेत... लेक्चर कुठे आहे? तो तर नुसताच बडबडतोय..... सौंदर्य कुठे आहे? ही तर प्रसाधनांची जाहीरात आहे.... प्रतिसाद कुठे आहे? हा तर नुसता खवटपणा आहे...

@ पैसा ताई : आता तुम्हीच समजून घ्या नां. कथा मीच लिहिली आहे ती पण इतक्या तपशिलासकट. ओळख वाढली नाही कारण त्या दोघांची नंतर कधी भेट झालीच नाही किवा ती होणारच नव्हती म्हणून. @ विजुभाऊ: तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, मला नवरा-नवरीच म्हणायचं आहे. पण मला ते उगाचच खटकत होत, म्हणून हे शब्द वापरले पण त्याचे असे अर्थ होतात हे नक्की माहित नव्हत. माहिती बद्दल धन्यवाद. @ अग्निकोल्हा: वाचल्याबद्दल धन्यवाद, अजून माझी लिखाण प्रतिभा तेवढीशी प्रगल्भ झाली नाहीये. फार विचार करूनच शब्द सुचतात. @ मुक्त विहारी: वाचल्याबद्दल धन्यवाद, हो मी पण डोंबीवलीचाच आहे, पूर्वेला सावरकर पथ येथे राहतो. @ खट्पट्या: कथा संपली आहे, समाप्त लिहिण्यास विसरलो. @ aparna akshay: सगळीकडुन बॅकींग तर व्यवस्थित होते पण ती दोघं मनातले विचार एकमेकांकडे व्यक्त करू शकली नाहीत अगदी शेवटपर्यंत, म्हणून अव्यक्त. बराच वेळ विचार करून एकदाच हे नाव सुचंल.

मिपा वर लिहिलेलं लिखाण वाया जात नाही, त्या लिखाणाला वाचक मिळतातच. आणि लिखाण कसं झालंय याबद्दल आणि लिखाणातील मुद्द्यांबद्दल अगदी सडेतोड प्रतिसाद पण दिले जातात हेच मिपाच खरं यश आहे अस मला वाटतं.

In reply to by मेघनाद

"मिपा वर लिहिलेलं लिखाण वाया जात नाही, त्या लिखाणाला वाचक मिळतातच. आणि लिखाण कसं झालंय याबद्दल आणि लिखाणातील मुद्द्यांबद्दल अगदी सडेतोड प्रतिसाद पण दिले जातात हेच मिपाच खरं यश आहे अस मला वाटतं." हे ज्याला समजले तो खरा मिपाकर...तुमचे इथे जमणार बघा.... लिहीत रहा...