Skip to main content

पुणे :

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 15/10/2013 11:45 या दिवशी प्रकाशित केले.
पुणे हे एक ऐतिहासीक शहर आहे.औरंगाबाद देखील तसेच आहे. मात्र औरंगाबाद मध्ये आलेल्या पाहुण्याना फिरवण्यासाठी बीबी का मकबरा , पाणचक्की यासारखी स्थळे दाखवता येतात. कोल्हापुरात रंकाळा , भवानी मंडप , जुना राजवाडा , शालीनी पॅलेस , कनेरी मठ अशी ठीकाणे दाखवता येतात. पुण्यात अशी कोणती स्थळे दाखवावीत असा विचार केला तर शनिवार वाडा /पर्वती या पेक्षा पुढे मजल मारता येत नाही.मात्र तेथे गाईड वगैरे उपलब्ध नसतो पुण्यात भटकंतीला दोन तीन दिवस आलेल्या पाहुण्याना कोणती ठिकाणे दाखवावीत हा प्रश्न पडतो. शनिवार वाडा , पर्वती ,जंगली महाराज मठ , ओशो पार्क या व्यतीरीक्त ठीकाणांची माहिती मिळाल्यास पुण्यात रहाणार्‍या न रहाणार्‍या मिपाकरांसाठी एक चांगली सोय होईल. कृपया जाणकारानी माहिती द्यावी.

वाचने 43115
प्रतिक्रिया 165

प्रतिक्रिया

फक्त पंचावन्न??? विजुभाऊ काय म्हणतील मिपाबद्द्ल. त्यांना शंभर प्रतिसाद हवेत म्हणून ना त्यांनी पुण्यावर धागा टाकला. धिस इज अगदी अगेन्स्ट मिपाची क्रेडिबिलिटी बाबा. 'पुणे' असा नुसता शब्द उच्चारताच शंभरी भरली पाहिजे.

In reply to by रमताराम

ररा, हे बहुतेक 'पुणे' असा शब्द ऐकल्या/म्हटल्याबरोबर लगेचच त्याबद्दलचा जाज्वल्य अभिमान बाळगणारी मंडळी इथे दिसायची बंद झालीयेत त्यामूळे असेल कदाचित. ;)

In reply to by किसन शिंदे

याविषयावरचा धागा चालवायला पुणेकरांची आवश्यकता नसतेच.

थोडी आटोमोबाईल मध्ये आवड असेल तर Autocluster, चिंचवड च्या अगदी पुढे तेथे "Science पार्क" सुरु झाला आहे. आटोमोबाईल कसे काम करते यापासुन सर्व भागांचे सेक्शन सुद्धा दिले आहेत. मुलांसाठी तर आवर्जुन जावे असे. अवान्तर :- पुणे विषय असतांना पिंपरी चिंचवड ची माहिती चालते का हो :)

विजुभौ, मी तुमचा सर्वप्रथम निषेध व्यक्त करतो. निषेध यासाठी की ''पुणे हे एक ऐतिहासीक शहर आहे.औरंगाबाद देखील तसेच आहे'' औरंगाबाद या ऐतिहासिक शहराची तुलना करायला एखादं तुल्यबळ शहर निवडायला पाहिजे होतं, असं माझं प्राथमिक मत आहे. आमच्या औरंगाबाद शहराचा इतिहास काय सांगायचा. सातवाहन सम्राट आमच्या पैठणचे. पैठण तसं हाकेच्या अंतरावर. वेरुळ, अजिंठा बघायचं तर टाचा उंच करुन पाहिलं की लेण्या दिसतात. औरंगजेब विसावला तो इथेच. पैठणची पैठणी. हिमरु शाली, ही आमची ओळख. इ.स.पू. पासून आमच्या शहराचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध आहे. आमच्या मराठवाड्यावर बहामनी,निझामशाही, आदिलशाही,बरीद शाही, कुतुब शाही, मोगल आणि हैदराबादचा निजाम यांनी राज्य केलंय. आहे का तसा कोणा शहराचा इतिहास ? स्वातंत्र्यही आम्हाला दीडवर्ष उशिरा मिळालं. आमच्या मराठवाडा यातलं 'वाडा' शब्दांचा संबध 'पाटक' या शब्दाशी आहे. पाटकाचा विकास होऊन वाडा शब्द बनला. ऋग्वेदात 'पत' हा शब्द आहे त्याच्या अर्थ प्रवाहित होणे असा आहे. 'प्रपात' म्हणजे धबधबा प्रपातापासून पाटक शब्दाची जडणघडण झाली. पाटक म्हणजे पसरुन भिजणारी सपाट भूमी. आता ऋग्वेदात उल्लेख म्हणजे आमचा वारसा किती प्राचीन आहे, हे काय सांगायचं. पुराणे,महाकाव्ये, बौद्धवा:मय,जैन वाडःमय आणि इतर अनेक ग्रंथ इथलेच. त्याच्या खाणाखुणा शोधणा-याला दिसतात. रेडे वेद वदले ते इथेच. नाथ,महानुभव, आणि वारकरी हे सर्व संप्रदाय फुलले इथेच. प्राचीन मानवी संस्कृतीचे अवशेष औरंगाबाद जिल्ह्यातच आढळले. अश्मयुगीन संस्कृतीच्या विविध अवस्थांचा विकास इथलाच. पुराणात असलेलं भोगवर्धन आमचं जालना जिल्ह्यातलं भोगवर्धन. असो. खायचं म्हणाल तर मराठा हॉटेल गुलमंडीत आहे. लोक ताटकळतात तिथला चिकनचा रस्सा ओरपायला. बिर्याणी, तर क्या कहने. (हैदराबादी लोकांनी काहीही बनवलं तर अशी चवदार तर्री आणि टेष्ट असते त्यांच्या भाज्यांना की मत पुछो) माझ्याच तालुक्यात हंडी नावाचा प्रकार आहे. एका कापडाच्या गठुड्यात एक चिकनच्या भाजीचं भगुनं. सोबत वीस पंचवीस पोळ्या, कांदा,लिंबु, मीठ असा लवाजमा पाचशे रुपयात मिळतो. कुठेही पोहचती करतात ही मंड्ळी. नै तर त्यांच्या घरी जेवायला जायचं. शेनाने सारवलेल्या घरी बसावं लागतं. हाय का असं कुठं. असो. विजुभौचा धागा म्हणुन भर घालणं आलं. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

याला म्हणतात अभिमानाने लिहिणं. अर्थात इथे पुण्याची माहिती बर्‍याचशा नदीपलिकडच्या, अगदी चिंचवडच्या लोकांनी लिहिल्यामुळे त्यात फारसं नवल नाही! ;)

In reply to by पैसा

याला म्हणतात अभिमानाने लिहिणं. :) अहो, आज बकरी ईद कामाला आली नै तर या अशा अभिमानाच्या गोष्टी सांगायच्या राहून गेल्या असत्या.
बकरी ईद च्या सर्वांना शुभेच्छा

In reply to by पैसा

"इथे पुण्याची माहिती बर्‍याचशा नदीपलिकडच्या, अगदी चिंचवडच्या लोकांनी लिहिल्यामुळे "
अगदी अगदी. + १०००१ . बाकी (ज्येष्ठ) संपादक सुद्धा आजकाल स्कोर सेटलिंग करायला लागलेत हे खरे आहे का ;)

In reply to by पैसा

पुण्याचा विषय असताना रत्नाङ्ग्रीकराञ्चे काड्या सारणे पाहून एक मिपाकर म्हणून शरम वाटली. पूर्वीचं पुणं/आमच्या वेळी असं नव्हतं. (शरमलेला) बॅटमॅन.

In reply to by पैसा

पण पुण्याचा विषय असताना कोणी रत्नाङ्ग्रीस बरेवाईट काहीही का म्हणून म्हणेल? पुणे विरुद्ध मुंबै नामक रिक्काम** वादापासून रत्नाङ्ग्री अलिप्त आहे हे चाङ्गलेच आहे, नैका ;)

In reply to by बॅटमॅन

ब्याट्या तो शब्द 'रत्नांग्री' असा आहे, उगाच त्याचं 'रत्नाङ्ग्री' करुन संस्कृतप्रचूर करु नकोस. 'चांगले'चं 'चाङ्गले' केलंयस तेवढं पुरे !!

In reply to by बॅटमॅन

काय 'समजलेंनीत'? वशाडी येवो. :)) काय समजलें, समजलांत किंवा अगदी बाणकोटीत वैगरे असेल तर काय 'समाजलीव' (अर्थात हे आदरार्थी). दिलेनीत, केलेनीत हे नेहमी तृतीयपुरुषी असते. तिथे नसलेल्या व्यक्तीबद्दल बोलत असतो तेव्हां!! जसं की, 'किती घेतलंनीत/ घेतलंन् रे या उदबत्तीच्या पुड्याचे?' जाणकार भर घालतीलच!! ;)

In reply to by सूड

अर्रर्र हो की, चुकलो. :) आयमाय स्वारी. आमचे कोङ्कणमण्डलभाषाव्याकरण अधिक चाङ्गले व्हावयास अशा करेक्षन्स वेळोवेळी उपयोगी पडत असतात, धन्यवाद :)

In reply to by सूड

आम्चा जनम रत्नायरीचा. तिला बोल्ल्लेलं खपणार नाही. मी त्याना सैत्लय (सांगितलं आहे) तसेच थिबा राजाला कोणी बैत्लय (म्हणजे बगितलं आहे) असं उच्चारण लहानपणी ऐकलेलं आठवतंय !

In reply to by चौकटराजा

पुणे आणि मुंबै या दोन्ही शहरांचे बहुचर्चित गुणविशेष रत्नांग्रीतूनच तिकडे गेलेले. त्यामुळे आम्हाला रत्नांग्रीची परंपरा पुढे चालल्याचा अभिमानच आहे. त्यातून तुम्ही जोपर्यंत वईवरून तात्त्विक वाद घालायला येत नाही, तोपर्यंत कोणीपण कायपण बोला. कोणाच्या तीर्थरूपांचे काय जाणारे?

In reply to by पिशी अबोली

म्हञ्जे? (कोङ्कण-गोमन्तक-अनभिज्ञ महाराष्ट्रमध्यदेशीय) बॅटमॅण.

In reply to by बॅटमॅन

'आडस!' म्हणजे पुणेरी भाषेतील 'लय भारी' या एक्स्प्रेशनद्वारे निर्देशिलेल्या गोष्टीपेक्षा जरा कांकणभर अजून भारी गोष्ट असेल तेव्हा वापरायचं रत्नांग्रीच्या नवीन पिढीचं एक्स्प्रेशन आहे..

In reply to by पिशी अबोली

ओह ओके, धन्यवाद! (बादवे ते लय भारी हे मूळचे पुणेरी - कोङ्कणो-पुणेरी ऑर मावळी पुणेरी नसून दक्षिण महाराष्ट्रीय इंपोर्ट असण्याची जास्त शक्यता आहे.) (खवळून झोपणार्‍या रंगहीन विचारांचा फ्यान) बॅटमॅन.

In reply to by बॅटमॅन

असेलही... झी मराठीने खास पदरात घेतलेलं आहे ते एक्स्प्रेशन... ;)
खवळून झोपणार्‍या रंगहीन विचारांचा
प्रचंड आवडल्या गेले आहे... :)

In reply to by क्रेझी

अठरा दरवाजे हे तर आमचं वैशिष्ट्ये. कोणत्याच शहरात नसतील असे दरवाजे. थ्यांक्स हं.... -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वा सर वा....एव्ह्द्यवर थांबुन नै होनर हो....अहो जेवना नंतरचे पान खायचे ते तारा पान सेंटरचे. अपल्या औरंगाबदचे प्रसिधद तारा पान सेंटर ते रहिले कि हो....:) ज्यचि ख्याति दुरर्परेन्त पसरली आहे . बकि तसे बरेच आहे पण असो धागा पुणे ..साथि आहे ना ..:(

In reply to by रुमानी

तारा पान सेंटर. अहाहा. काय आठवण देऊ राह्यले राव तुम्ही औरंगाबादकर. एकसे बढकर एक. भाऊबंदकीमुळे दोन पान सेंटरं झाली. पण पानाची चव तशीच आहे. पान सेंटर बद्दल लिहिलं पाहिजे, हे खरं आहे. >>> बकि तसे बरेच आहे पण असो धागा पुणे ..साथि आहे ना ..:( धागा पुणेसाथि असला तरी औरंगाबाद शहराचं नाव घ्यायचं काय काम नव्हतं ना. म्हणुन आपल्याला लिहिणं आणि प्रतिसाद वाढवणं आलं. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एकसे बढकर एक. भाऊबंदकीमुळे दोन पान सेंटरं झाली. पण पानाची चव तशीच आहे.
काय म्हणता? नाही हो. पार चव बिघडली आहे.

In reply to by निखिल देशपांडे

चव आहे तशीच आहे, पण कधी कधी होतं उन्नीस बीस. (निदे, आपल्या शहराचं कौतुक करायच्या गोष्टी सांगायच्या सोडून उणिवा कशाला सांगत आहात छ्या. ) आता विविकानंद महाविद्यालयाजवळचं थाटबाट चांदीच्या ताटातली थाळी बंद झाली. मटनाच्या चारच फोडी आणि दोनच बाजरीच्या भाकरी मिळतील, असं म्हणनारा लोकसेवाचा मालक थोडा अजून रस्सा देता का म्हटल्यावर अजूनही चीडचीड करतोच.भर उन्हाळ्यात पानचक्कीत मोटरीनं पाणी सोडतात आणि आपण अजूनही लोकांना या पानचक्कीला नहरीतून पाणी येतं, असेच सांगतो ना. बीबीका का मकब-याचं काम वर्षानुवर्ष सतत चाललेलं असतं. तरी आपण बीबीका मकबरा पाहुनच जा असा हट्ट पाहुण्यांना धरतोच की नाही. नाथांचं पैठण आता खूप घाणेरडं होत चाललेलं आहे तरी नाथा घरी कृष्णाच्या कावडीनं अजूनही रांजण भरल्या जातो ,हे सांगतोच की नाही. तसं कोणालाही काही सांगतांना शक्यतो अ‍ॅटीट्युड कसा सकारात्म असला पाहिजे, आता हे आम्ही तुम्हाला सांगायचं व्हय. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आता हे आम्ही तुम्हाला सांगायचं व्हय
मग अ‍ॅटिट्युड सकारात्मक असणे हे ठिक पण उगाच खोटा जाज्वल्य अभिमान दाखवायला आपण काय पुणेकर आहोत?;) थाट-बाट बंद झाले हे माहीत नव्हते हो!! बाकी तारा बद्दल अनेक वेगवेगळ्या आठवणी असल्यामुळे त्यांची भाउबंदकी पाहुन वाईट वाटते. बाकी औरंगाबाद मधले भारत माता मंदीर आहे का अजुन? ते पहाण्यालायक होते. ते जाउ द्या दिवाळीच्या आसपास कट्टा जमवायचे घ्या मनावर प्रा. डॉ.!!

In reply to by क्रेझी

तुम्ही औरंगाबादचेचे दिसता. :) नियमित येत चला. मिपावर. अवांतर : 'दिलीप'च्या नावानंतर तेवढं 'जी' नका लावू. मला खूप अवघडल्यासारखं होतं. बिंधास्त अरे,तुरे, काहीही म्हणा. आपण सर्व इथे इक्वल आहोत. :) -दिलीप बिरुटे

पुण्यात एफसी रोड की लॉ कॉलेज रोड की काय ते ...पक्षी निरीक्षणासाठी फेमस आहेत म्हणे ... जरा कोणी कन्फर्म करता का ?

In reply to by प्रसाद गोडबोले

पुण्यात एफसी रोड की लॉ कॉलेज रोड की काय
गिरीजा भाऊ. लॉ कॉलेज रोड मागची टेकडी पक्षी( पंख असणारे आणि हवेत उडणारे) निरीक्षणासाठी प्रसिद्ध. एफ सी रोड नजरभेट होताच (र्‍हदयाला पंख देवूनहवेत उडायला लावणार्‍या) पक्षी निरीक्षणासाठी प्रसिद्ध. अजून एक रोड आहे. शिवाजी रोड त्याचे नाव. मात्र तेथिल प्यासा सारख्या ठिकाणां मुळे लोक तसेही हवेत तरंगत असतात.

In reply to by प्रसाद गोडबोले

एफ् सी रोड आहे फेमस पक्षीनिरीक्षणासाठी...पण तिथल्या पक्ष्यांना त्या रोडवरचे निरनिराळे प्राणी चांगलेच ओळखता येतात हो... ;)

औरंगाबाद या ऐतिहासिक शहराची तुलना करायला एखादं तुल्यबळ शहर निवडायला पाहिजे होतं,
मी मराठेशाहीची राजधानी सातारा निवडलं असतं तर माझ्यावर प्रांतीयतेचा आरोप झाला असता. त्यामुळे बहुतेकांच्या जिव्हाळ्याचे मराठेशाहीच्या पंतप्रधानांचे गाव निवडले. पुण्याचे म्हणाल तर इथेही दादोजी कोंडदेवानी ,औरम्गजेबाने , अफजुलखानने , ब्रीटीशानी राज्य केले होते. नानासाहेब पेशवे ही इथलेच नाना फडणवीस इथलाच. ब्रीटीशानी केलेल्या लढायांबद्दल काय सांगायचे. पेशवाईच अस्त करवणार्‍या बाजीरावाला इथल्या टेकड्यांटेकड्यंवर त्यानी बागडायला लावले. भोर जवळच्या नीरा नदीच्या काथावरची ती विंगची ऐतिहासीक लढाई आठवा. दीड महिना तळ ठोकून फक्त एक गोळी झाडली गेलेली कदाचित इतिहासातील एकवेम ऐतिहासीक लढाइ असेल. देहू / आळंदी पुण्यात येत नाहीत म्हणून नाहीतर तुकाराम महाराजाना वनवासी करून नंतर थेट वैकुंठाला पोहोचवले गेले ते इथेच. जगात कुठेच दिसणार नाहीत अशा जाज्वल्य पाट्या इथे पुण्यातच दिसतात. " स्वच्छ पुणे... हरीत पुणे...महापौर पुणे " असे होर्डींगदेखील पुण्यातच पहायला मिळते. आमचे येथे सायकल पंक्चर काढून मिळेल. मूळव्याधीवर औषध मिळेल " असा यंत्र आणि शरीर शास्त्राचे एकत्रीकरण करणारी पाटीदेखील इथेच पहायला मिळते. गटाराप्रमाणे वहाणार्‍या पाण्याच्या काळ्या प्रवाहाला नागझारी हे नाव पुण्यातच मिळते. दारुवाला पूल.... क्वार्टर गेट...दूध भट्टी ..डुल्या मारुती... अशी ठीकाणे इथेच. खायचे अन हाटेलांचे काय सांगताय. नाव सांगा फक्त सावजी / नागपुरी/ कोल्हापुरी ..... सगळ्या नॉनव्हेज व्हरायटीज सदाशिव पेठेत मिळतात. चितळें सारख्या सांगलीच्या भिलवडी भागातील माणसाने जम बसविला पुण्यातच.( त्याना पुणेकर की कोण म्हणायचे ते तुम्ही ठरवा) फुलेंचा वाडा जतन केलाय महात्मा फुले पेठेत( हो घोरपडे पेठे नजीक) तेथे अजूनही विड्या वळणार्‍या कुटुंबांची दाट वस्ती ब्घायला मिळेल. संभाजी महाराजांच्या नावाने बीडी उत्पादन केले गेले इथेच. ........ बिरुटे सरांची पोष्ट म्हणून उत्तर देणे आलं ;)

In reply to by विजुभाऊ

विजुभाऊ तुम्ही नक्की कोणत्या बाजुचे? एक तो घोडा बोलो या चतुर बोलो ये क्या घोडा-चतुर, घोडा-चतुर चालु है ;)

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

विजुभाऊ पहिल्यापासून टीआरपीच्या बाजूचे. शंभर करायचेत हो. बघा स्वतःच किती रन्सा काढल्यात ते. ते आपलेच आहेत म्हणून आम्हीही नॉन-स्ट्रायकर एन्डला उभे राहून चार-पाच रन्सा काढून हातभार लावतोय. बघताय काय एक धक्का और दो...

In reply to by रमताराम

अदरवाईज़ ब्यालन्स्ड असलेले रा.रा. ररागुर्जी या विषयावर कसे पेटून उठतात नै ;) काडी विजुभौ टाकणार | ररागुर्जी लग्गेच पेटणार | आपण बाजूने पाहणार | मज्जा येणार निश्चित ||

In reply to by बॅटमॅन

एकाच वेळी इतके गैरसमज??? १. राजमान्य राजश्री ररागुर्जी २. 'अदरवाईज ब्यालन्स्ड' ३. या विषयावर कसे पेटून उठतात ४. (अध्याहृत) अन्य विषयांवर पेटून उठत नाहीत. छ्या: मी तर तुला खूपच हुशार समजत होतो. (ता.क. विजुभाऊ हे आमचे जुने मित्र असल्याने त्यांना शेंचुरी मारायला मदत करणे हे आमचे कर्तव्य समजून आम्ही स्ट्राईक रोटेट करत आहोत. हा ९५ वा प्रतिसाद आलाच आहे. अजून पाच झाले की 'आता मी सुखाने मरतो' असे म्हणायला मी मोकळा. -रराप्रभू वेशकाळा)

In reply to by रमताराम

सचिन नं निवृत्त व्हावं म्हणत म्हणत बांगलादेश विरुद्ध शंभरावी सेंच्युरी 'कुंथत कुंथत मारावी असं का वाटतं हो ?

In reply to by प्यारे१

सचिन नं निवृत्त व्हावं म्हणत म्हणत बांगलादेश विरुद्ध शंभरावी सेंच्युरी 'कुंथत कुंथत मारावी असं का वाटतं हो ?>> नाय पट्लं तुमचं. विजुभाऊंनी आता निवृत्त व्हावं असं म्हणणं आहे ना तुमचं? आमचा हा तेंडुलकर अजून हुकमी शेंचुरी मारतो बघा. (हा १०६वा प्रतिसाद आहे) उगाच रिटायरमेंटची बात करायचं कारण नाय, हांऽऽ. विजुभाऊ, तुम्ही अजिबात रिटायर होऊ नका हो. आम्ही आहोत तुमच्या पाठीशी. बघा इथे दहा-एक रन्सा काढून दिल्यात तुम्हाला. मी आहे बरोबर. तुम लडो. या धोनी प्यारेकडे अजिबात लक्ष द्यायचे कारण नाही.

In reply to by रमताराम

हे बघा, विजुभौंचा आवाज काय असा बारीक आहे का? उगाच आमचा हा सचिन म्हणताय त्यांना? मुळात पीच बॅटींग आहे म्हणून तरी! पार्थिव पटेल पण ७०-८० काढेल. उगाच्च समर्थन का करताय? सचिननं ह्या अशा पीचवर किमान १७०-१८० केलेच पाहिजेत. सुपारी कितीची आहे??? ;)

In reply to by रमताराम

हा हा हा गुर्जी, अन्य विषयांवर पेटा अथवा न पेटा, इथे पेटता ते मागेही पाहिलेय हो. गरीब बिचार्‍या शिष्याला उगी मारू नका, हुशार नसलो तरी तुमचा शिष्य आहे :D (कृपया विद्रट लोकाण्णी विदागार स्वयेंच चाळावे, रेफ्रन्स रिक्वेष्टीस "फाट्यावं" मारिल्या जाईल.)

In reply to by बॅटमॅन

फार पूर्वी मी अर्ध्या चड्डीत होतो (ध्वन्यर्थाने नि वाच्यार्थानेही), त्यापूर्वी कधीतरी - फार फार फार पूर्वी त्याविनाही. मग काय आता... असो. पुन्हा म्हणशील म्हातारा अश्लील बोलतो म्हणून.

आमचे येथे सायकल पंक्चर काढून मिळेल. मूळव्याधीवर औषध मिळेल " असा यंत्र आणि शरीर शास्त्राचे एकत्रीकरण करणारी पाटीदेखील इथेच पहायला मिळते. यंत्र आणि शरीर शास्त्राचे एकत्रीकरण. =)) मेलो. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

@यंत्र आणि शरीर शास्त्राचे एकत्रीकरण. >>> :-D तसाही दोन्हीचा उद्देश पंक्चर काढणं हाच नै का? =))

In reply to by अत्रुप्त आत्मा

तसाही दोन्हीचा उद्देश पंक्चर काढणं हाच नै का?
नाही. दोन्हीचा उद्देश 'सीटवर बसता येत नाही' हा आहे. ;) बाकी क्षारसुत्र वापरतात की सुलोचन ;) ह्यो येगळा इशय.

In reply to by अभ्या..

बाकी क्षारसुत्र वापरतात की सुलोचन ह्यो येगळा इशय.एक नंबर्,जर क्षारसुत्राएवजी,सुलोचन लावले तर्,एखाद्या पेशंटवर प्रयोग करायला हरकत नाही.

In reply to by पिशी अबोली

झटक्यांत पकडलेंच तुम्ही तर ;) (आमचे येथे व्याक्रण शिकविले जाईल. छन्दःशास्त्र शिकवायची जबाबदारी आमची नाही. विद्यार्थ्यांनी लावणीचे छन्दःशास्त्राविषयीं पृच्छा केल्यास त्यांची रवानगी मठात करून उपनिषदाच्या पोथ्या नकलायचे काम दिले जाईल. सूत्रे विसरल्यास पुन्हा शिकविली जाणार तर नाहीतच, शिवाय फक्त आणि फक्त प्राकृत बोलायची शिक्षा दिली जाईल. दुपारी १ ते ४ वेळेत वामकुक्षी भंगल्यास प्रवेश आजिबात मिळणार नाही. लघुसिद्धांतकौमुदी सोडून अष्टाध्यायीतल्या उरलेल्या सूत्रांचे शुक्लकाष्ठ मागे लावल्यास पदरीच्या श्वानास विचारणारावर सोडून "श्वानं युवानं मघवानमाह" ची प्रचीती दिल्या जाईल. आणि होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना पाणिनीसोबत कोकशास्त्रसंहिताही भेट दिलें जाईल.)

In reply to by बॅटमॅन

तुम्हीच खावा अन जिवंत भाषा आमच्यासाठी ठेवा. बादवे, गेल्या जन्मात तुम्ही रमण्यात हजेरी लावून पुणे ३० मधल्या एखाद्या ऐतिहासिक वाड्यात रहात होता काय हो? नाही म्हणजे ते शिक्षांचे प्रकार वाचून अंमळ श़ङ्का आली!
होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना पाणिनीसोबत कोकशास्त्रसंहिताही भेट दिलें जाईल
त्यासोबत 'योगवासिष्ठ' दिल्यास अजून उत्तम! :-/