Skip to main content

पुणे :

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 15/10/2013 11:45 या दिवशी प्रकाशित केले.
पुणे हे एक ऐतिहासीक शहर आहे.औरंगाबाद देखील तसेच आहे. मात्र औरंगाबाद मध्ये आलेल्या पाहुण्याना फिरवण्यासाठी बीबी का मकबरा , पाणचक्की यासारखी स्थळे दाखवता येतात. कोल्हापुरात रंकाळा , भवानी मंडप , जुना राजवाडा , शालीनी पॅलेस , कनेरी मठ अशी ठीकाणे दाखवता येतात. पुण्यात अशी कोणती स्थळे दाखवावीत असा विचार केला तर शनिवार वाडा /पर्वती या पेक्षा पुढे मजल मारता येत नाही.मात्र तेथे गाईड वगैरे उपलब्ध नसतो पुण्यात भटकंतीला दोन तीन दिवस आलेल्या पाहुण्याना कोणती ठिकाणे दाखवावीत हा प्रश्न पडतो. शनिवार वाडा , पर्वती ,जंगली महाराज मठ , ओशो पार्क या व्यतीरीक्त ठीकाणांची माहिती मिळाल्यास पुण्यात रहाणार्‍या न रहाणार्‍या मिपाकरांसाठी एक चांगली सोय होईल. कृपया जाणकारानी माहिती द्यावी.

वाचने 43115
प्रतिक्रिया 165

प्रतिक्रिया

दगडुशेठ हलवाई गणपती म्हणत असतील ते. सारस्बाग, चतु:श्रुंगी पण दाखवु शकता. आगाखान पॅलेस कात्रज सर्पोद्यान आणि तेथील प्राणी संग्रहालय दर्दी अजुन भर घालतीलच ;)

कोल्हापुरात रंकाळा , भवानी मंडप , जुना राजवाडा , शालीनी पॅलेस , कनेरी मठ अशी ठीकाणे दाखवता येतात. टेंबला‌ई टेकडीवरील टेंबला‌ई देवीचे देवालय तसेच ऐतिहासिक नसले तरी चंद्रकांत मांढरे यांचे कलादालन पाहण्यासारखे आहे.जवळच पन्हाळा आणि ज्योतिबाला सुद्धा जाउन येता येते.

१. पाताळेश्वरः ८/९ व्या शतकात राष्ट्रकूट कालखंडात एका पाषाणात तेही जमिनीवरून खालच्या पातळीत खोदले गेलेले देखणे लेणे २. भारत इतिहास संशोधक मंडळः इथले ऐतिहासिक वस्तूंचे संग्रहालय अतिशय जबरदस्त. वीरगळ, गधेगाळ, जुन्या मंदिरांचे अवषेश, दुमिळ मूर्ती, शिलाहारकालीन, यादवकालीन अस्सल ताम्रपट, शिवकालीन, पेशवेकालीन कागदपत्रे, औरंगजेबाच्या पंजाची मुहर असलेले अस्सल फर्माने, जुन्या काळातले दुर्मिळ नकाशे, चित्रशाळेतील जुनी चित्रे सारेच कसे अगदी बघण्यासारखे. मात्र हे बघायला सकाळी ९ च्या दरम्यान जावे लागते आणि कमीत कमी ७/८ माणसे असल्याशिवाय संग्रहालय दाखवीत नाहीत. स. ११.३० पर्यंत खुले असते. ३. त्रिशुंड गणपती मंदिरः मंगळवार पेठेत असलेले हे कोरीव शिल्पकामाने नटलेले शिल्पसमृद्ध मंदिर. ४. शेलारवाडीची लेणी (घोरावडेश्वरः) देहूरोडजवळ असलेली ही बौद्धकालीन लेणी

Punyatil sarvat mast akarshan mhanaje Kelkar musium. Punekaranna nemaka tyachach abhiman nahi ase disate. Chitale athavatat pan Kelkar athavu nayet he durdaiv.

केळकर म्युझियम कुठे आहे. पूर्वी ते आप्पा बळवन्त चौकापासून चालत जाण्याच्या अंतरावर होते . तेथून ते कोठे हलवले ते माहीत नाही. भारत इतिहास संशोधम मंडळ /पाताळेश्वर हे नक्की कुठे आहेत ते साम्गावे. रीक्षावाल्याला पत्ता सांगता येइल असे.

In reply to by विजुभाऊ

केळकर संग्रहालय नातूबागेच्या जवळच्या गल्लीत अगदी बाजीराव रोडला लागूनच आहे. भारत इतिहास संशोधक मंडळ पेरूगेट भावे स्कूलच्या जवळ आणि भरत नाट्य मंदिराच्या शेजारीच आहे. पाताळेश्वर तर ऐन जंगली महाराज रोडलाच जंगली महाराज मंदिराला खेटून आहे. बाकी माझा वरचा प्रतिसाद अपडेट करून त्यात आधीच्या लेखांच्या लिंका दिल्यात.

In reply to by प्रचेतस

धन्यवाद वल्ली काका. केळकर म्युझीयम बाजीराव रोड ( बापट उपहार गृहा जवळ) वर नाहिय्ये. तेथून ते कोठेतरी दूर हलवलय.

In reply to by विजुभाऊ

तिथेच आहे की. मधे त्यांचे बावधन जवळ मोठी जागा घेऊन शिफ्ट करायचे चालले होते पण झाले का नै ते माहित नै.

In reply to by विजुभाऊ

बाजीराव रोड वर ची गोखले मांडववालेंची पाटी ज्या गल्लीच्या टोकाशी आहे त्या गल्लीतच केळकर संग्रहालय आहे. 'गोखले' च्या समोरच साठे बिस्कीटस च्या जवळ पुण्यात जगप्रसिद्ध असलेले व्याडेश्वर भुवन आहे. तिथली इडली खाल्ली की तुम्हाला पुणे दर्शनाची खरी चव कळेल. आणि रस्त्यांवर कसरत करत जाणारे दुचाकीस्वार अगदी 'पहाणेबल' बर्का ! आजकाल काही चारचाकीस्वार पण ही कला जोपासतात असे ऐकून आहे . (सध्या अनिवासी पुणेकर असल्याने परिस्थितीची नेमकी कल्पना नाही.)

द बेस्ट आणि ओशो कम्युन द अल्टीमेट (ते तुम्हाला सगळं पाहायला मिळणार नाही, बट स्टील!) कम्युनच्या मागे असलेलं ओशो पार्क अफलातून (सकाळी सहा ते दहा आणि संध्याकाळी चार ते सहा)

बर्‍याच दिवसांनी विजुभाऊंना टीआरपीची गरज भासलेली दिसते. हुकमी शतक ठोकणार्‍या विषयावर धागा काढलाय.

In reply to by रमताराम

तर तर..... तुम्हाला खात्री आहे. मी पुणे ३० म्हणणार होतो. पण म्हंटलं नको उगाच. लोक पेरू गेटजवळचा अनपटवाडा वगैरे स्थळे किंवा मग ज्ञाप्रबोधिनीसमोरचा अनरसे सामोसेवालेंचा स्टॉल ( तेच ते जिवाल खा जीवाला खा जीवाला खा अनरसे सामोसे वाले. पाटी लावणारे) किंवा बादशाही मधल्या पाट्या हे सगळे प्रेक्षणीय ऐतीहासीक स्थले म्हणून आले असते.

तुम्ही पुण्यातली माणसं दाखवा .. ती ही ऐतिहासिकच आहेत ....आणि " प्रेक्षणीय " ही आहेत !

हडपसर गाडीतळाजवळचे ग्लायडिंग सेंटर लै जबरी आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत प्रतिमाणशी वट्ट रु. १८७/- (होय, सर्कारी असल्याने कमी रक्कम अन ऑड फिगर येणे मस्ट) इतक्या दराने ३-४ मिनिटे आकाशात हजारेक फूट वर जाऊन सगळे पाहता येते. फातिमा नगर इथलेच बोटॅनिकल गार्डनही मस्त आहे. आप्पा बळवंत चौकापासून जवळच केसरीवाडा आहे जिथे लोकमान्य टिळकांचे राहते घर आहे. त्यांच्याशी संबंधित बर्‍याच वस्तूंचे उत्तम संग्रहालय आहे. घोले रोड येथेही एक चांगले संग्रहालय आहे-महात्मा फुल्यांशी संबंधित. तिकडे मात्र अजून जाणे झाले नाही :( खडकी इथे दुसर्‍या महायुद्धात मरण पावलेल्या ब्रिटिश आर्मीतील काही सैनिकांची थडगी आहेत. अतिशय सुंदरपणे व्यवस्था राखली आहे. भारत इतिहास संशोधन मंडळाचे संग्रहालयही पाहता येईल. शक्यतो शनिवार-रविवारी सकाळी ११ च्या आत जावे. एंट्री फी १०/- फक्त. ४-५ जण बरोबर असतील तर अजून बरे. बर्‍याचदा कोणी दाखवायला नसतो तिथे, पण संग्रहालय अप्रतिम आहे. दादोजी कोंडदेव, शहाजीराजे, औरंगजेब, मलिक अंबर, शाहू महाराज (सातार्‍याचे), छत्रपती राजाराम, इ.इ. व्यक्तींची अस्सल पत्रे, जुने शिलालेख, अनेक मोठमोठे जुन्या पद्धतीचे नकाशे, मराठी आरमाराशी संबंधित जहाजांची चित्रे, अप्रतिम देखण्या हस्ताक्षरांतील हस्तलिखिते, असे अनेक काही सापडेल तिथे. व्हेरिटेबल गोल्डमाईन. कोथरूडमधले रेल्वे म्यूझियम अन कँपातले ट्रायबल म्यूझियमही पाहण्यासारखे आहे असे रिपोर्ट्स ऐकलेत. प्रत्यक्ष जाणे बाकीये अजून. वाडे इ. पहायचे असतील तर विश्रामबागवाडा पहावा. उत्तम स्थितीत राखला असून आत संग्रहालयही आहे. सध्या इतकेच आठवते.

महादजी शिंद्यांची छत्री ( दादोजी कोंड्देवांचा पुतळा नसलेला ) लाल महाल कसबा गणपती डेक्कन वरचा संभाजी महाराज पुतळा फर्ग्युसन महाविड्यालय , त्यातील वसतिगृहातील स्वा. सावरकारांची खोली हनुमान टेकडी . वेताळ टेकडी

जमल्यास मारा फेरी... मस्त ताक वगैरे पिऊ , पिठले-भाकरी खावू आणि पडू आरामात.

लेखाचे नाव 'पुणे' आणि लेखक 'विजुभाऊ' बघून बर्‍याच काड्या-सर्पण-समिधा असतील अशा आशेने धागा उघडला होता. पण घोर अपेक्षाभंग झाला.

In reply to by पैसा

"पुणे - ३०" असा उल्लेख केला असता तर गोष्ट वेगळी होती. उर्वरीत पुणे आणि पुणे-३० ह्या दोन वेगळ्या=वेगळ्या संस्क्रुत्या आहेत. इति माझे पुण्यातील असंख्य नातेवाईक. बाकी सगळे सारखे असले तरी मुद्दलात थोडा फार फरक करुन आपापली संस्क्रुती जपली जाते. उदा. पुणे-३० मध्ये नुसता सुधारस मिळतो. कोथरूड-बिबवेवाडी इ. भागात सुधारसात चारोळी असते. औंध भागात सुधारसात चारोळी अधिक केशर आणि १/२ केळीच्या चकत्या असतात. पाकातील घट्तपणा पण असाच वेगळ्या वेगळ्या पातळ्या दाखवतो..

In reply to by पैसा

लेखाचे नाव 'पुणे' आणि लेखक 'विजुभाऊ' बघून बर्‍याच काड्या-सर्पण-समिधा असतील अशा आशेने धागा उघडला होता. पण घोर अपेक्षाभंग झाला.
छ्या.... संपादीका महोदया........ अगोदरच माझ्यावर पुणेद्वेष्टेपणाचा आरोप केला जातो. लोकांचे मत चांगले करता यावे म्हणून थोडा प्रयत्न करतोय........ तेवढा तरी मला चांगुलपणा सिद्ध करु द्या की.

In reply to by विजुभाऊ

तेवढा तरी मला चांगुलपणा सिद्ध करु द्या की.
घोर कलियुग ... आजकाल लोकांना चांगुलपणा सिद्ध करावा लागतोय .. (मग तो असो अथवा नसो) पूर्वी चांगुलपणा असायचा हो.. आणि तो वागण्यात आणि बोलण्यात दिसायचा. :)

सदाशिव पेठ.अजुनही ऐतिहासीक दुकाने पहायला मिळतात. दुकानदारसुद्धा.

In reply to by विनायक प्रभू

+१

नगर रोड वरील आगाखान पॅलेस पण सुंदर आहे. --रा.गा.--

काही ठिकाणं ज्या बद्दल अजून उल्लेख झालेला नाही : १. तळजई/तळजाई २. मोराची चिंचोली ३. खडकवासला/पानशेत ४. ताम्हणी घाट (सिजनल) ५. कानिफनाथ मंदिर (मंदिराच्या अजुबाजुचा परिसर आणि वातावरण अप्रतिम असतं.. डबे घेऊन जायचं - मज्जा!!!) ६. पुण्याच्या टेकड्या ७. Evening walk at camp/M.G. Road - छान वाटतं! आणि पाहुण्यांना नवीन पुणे दाखवायला पण काय हरकत आहे ना ... १. लवासा सिटी २. अ‍ॅमनोरा टाऊन सेंटर मॉल ३. फिनिक्स मार्केट सिटी ४. इनऑर्बीट मॉल

In reply to by उदय के'सागर

अरे हो आत्ता आथवलं बाजीराव रस्त्याच्या सुरवातीला( शनिवार वाडा टोक) शारदा हॉटेलच्या मागचे केतकर वाड्यासमोरचे म्युझीयम ऑफ आर्थ्रोपोडा (संधीपाद प्राणी) राहिलेच की

बुकमार्क करून ठेवतो. बरीच ठिकाणं समजली.

बस्स्.इतकीच ठीकाणे. फक्त हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच? हे ऐतिहासीक पुणे म्हणायचे की सीक पुणे? त्यापेक्षा आमचे नासीक बरे. गंगा काठ, रामकुंड,सीता कुंड ,तपोवन्,राम मंदीर ,वेद मंदीर ,पंचवटी , फाळके स्मारक ,ब्रम्हगिरी ,कित्तीतरी आहे पहाण्यासारखे.

In reply to by बॅटमॅन

कोण(?) पुणेकर? धन्यवाद. कोण(?) पुणेकर? धन्यवाद. कोण(?) पुणेकर? धन्यवाद. कोण(?) पुणेकर? धन्यवाद. कोण(?) पुणेकर? धन्यवाद. कोण(?) पुणेकर? धन्यवाद. बाकी ते पुणेकर म्हणजे काय/कोण याच्या तुमच्या व्याख्येवर अवलंबून आहे.

In reply to by विजुभाऊ

विजुभाऊ, तुम्ही कर्वेरोड वरचा ऐतिहासिक बार विसरलात का? जिथे बसुन तुमच्या नासिकच्या सर्व काठ, कुंड याचे पुण्य मिळत होते.

In reply to by विजुभाऊ

@हे ऐतिहासीक पुणे म्हणायचे की सीक पुणे?>>> हो का????? मग १ काम करा , शनिवार/सदाशिव/नारायण या पेठा सोडुन(ही) बाकिच्या सर्व पेठां मधली शंकराची देवळं पहा. पुणे भेट भरून पावाल!

In reply to by अत्रुप्त आत्मा

सर्व पेठां मधली शंकराची देवळं पहा उदाहरणादाखल एखादे ठीकाण साम्गा की. एकदम जेनेरीक माहिती देऊ नका. पुण्यातील शंकरांच्या देवळांबद्दल फारसे माहीत नाही. पांचाळेश्वर ,वगैरे अपवाद वगळता ( मारुती /गणपती /विठोबा /देवी ) या व्यतीरीक्त मंदीरे आहेत हीच नवी माहिती आहे.

In reply to by शेखर

महत्वाचे म्हणजे पुणेकरांमुळे ईनोचा खप वाढतो
शेखर राव तुमचे वाक्य परत एकदा तपासून पाहा ……… भलताच अर्थ निघतोय :D :P =))

असं अमजू नका .. हो .. वर लिहिल्याप्रमाणे पुण्यातील प्रत्यएक माणूस ऐतिहासिक आणि प्रे़क्षणीय आहे ! त्या हिषेबाने पुण्यात ६० लाख प्रेक्षणीय स्थळे आहेत !

In reply to by विटेकर

पुण्यात ६० लाख प्रेक्षणीय स्थळे आहेत !
पुण्यात फक्त ६० लाख लोक राहतात? आणि बाहेरून पुण्यात आलेल्यांची यात गणना नसेल ना केली? कारण ते (पुणेकर) नसल्याने प्रेक्षणीय नक्कीच नाहीत. :D

त्यापेक्षा आमचे नासीक बरे.
तर मग नाशिक मुक्कामीच राह्णेचे करावे, नाहीतरी आताशा पुण्यात गर्दी अंमळ जास्तच आहे तेव्हा प्रवासाचे कष्ट नाही घेतलेर तरच बरें... कसें??

बिबी का मकबराची अवस्था पाहता त्यात प्रेक्षणीय काय असा प्रश्न आणि त्यात ती औरंगजेबाची बीबी.. त्यात काय पहायचंय.. रंकाळा 'ऐतिहासिक' आहे हे माहीत नव्हतं.. बाकि काडया सरपण आहे पण जरा झाकलेलं --
औरंगाबाद मध्ये आलेल्या पाहुण्याना फिरवण्यासाठी बीबी का मकबरा , पाणचक्की यासारखी स्थळे दाखवता येतात. कोल्हापुरात रंकाळा , भवानी मंडप , जुना राजवाडा , शालीनी पॅलेस , कनेरी मठ अशी ठीकाणे दाखवता येतात.
-- यात औरंगाबादेत दोन आणि कोल्हापुरात पाच जागा आहेत.
पुण्यात भटकंतीला दोन तीन दिवस आलेल्या पाहुण्याना कोणती ठिकाणे दाखवावीत हा प्रश्न पडतो. शनिवार वाडा , पर्वती ,जंगली महाराज मठ , ओशो पार्क या व्यतीरीक्त ठीकाणांची माहिती मिळाल्यास पुण्यात रहाणार्‍या न रहाणार्‍या मिपाकरांसाठी एक चांगली सोय होईल.
पहिल्या झटक्यात विजुभाऊंना चार चांगली सुस्थितीतली ठिकाणं सापडली आहेत तरी इतक्या प्रतिसादांनंतर सूर कसा --
बस्स्.इतकीच ठीकाणे. फक्त हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच?
ऐतिहासिक म्हटल्यावर लगेच मनात येणारी पहिला जागा - पाताळेश्वर ती वल्ली साहेबांनी डिटेलवार सांगितली आहे. दुसरा अर्थात आमचा अभिमान (अर्थात जाज्वल्यच) - सिंहगड.. वरचे प्रतिसाद जरी पाहिले तरी - १. पाताळेश्वर २. सिंहगड ३. शनिवारवाडा ४. पर्वती ५. ओशो कम्युन ६. जंगली महाराज मंदिर ७. केळ्कर म्युझियम ८. महादजी शिंदे छत्री - वानवडी ९. आगाखान पॅलेस - गांधी स्मारक १०. कसबा गणपती ११. लाल महाल १२. विश्रामबाग वाडा - अपुणेकर आणि ऐतिहासिक स्थळांमध्येच रस असेल तर इथले पुनवडी ते पुणे प्रदर्शन पहाच.. इतकी ठिकाणे आहेत. पण तरी इतकीच? म्हणून स्वाहाकार चालू आहेच :) इतर म्युझियम सुद्धा -(फुले, जोशी रेल्वे, इ.) सांगितली आहेत. एम्प्रेस गार्डन, पुल देशपांडे उद्यान अशीही सर्व ठिकाणं धरली तर अस्सल पुणेकर सुद्धा चार आठ दिवस जिवाचे पुणे करत फिरू शकेल.

In reply to by मैत्र

आणि अशा प्रकारे मैत्र ह्यांनी आपण 'पुणेकर' असल्याचं सप्रमाण सिद्ध केलेलं आहे.... टाळ्या! ;) ह घ्या मैत्र सेठ!

लंडनमध्ये एक "वन स्क्वेअर माईल" नावाचा भाग आहे - जुन्या "सिटी ऑफ लंडन"चा. (हो - सिटी ऑफ लंडन आणि लंडन ही वेगवेगळी शहरं आहेत.) तसा पुण्यातही "एक चौरस मैल" आहे. गावातला, ऐन गर्दीचा गजबजलेला भाग. इथे पहाण्यासारखं म्हणजे खास पुणेरी दुकानं आणि त्यांचे अव्वल मालक. - दगडूशेठ गणपतीकडून लक्ष्मी रस्त्याकडे जाताना काळे यांचं पेनचं दुकान आहे. अतिशय भारी दर्जाची फाऊंटन पेनं यांच्याकडे मिळतात. (माझ्या संग्रहीच्या आवडत्या पेनांमध्ये एक जर्मन पेलिकन आहे आणि दुसरं काळे!) निबची ५ वर्षांची वॉरंटी देणारे माझ्या माहितीत हे एकच महाभाग. पेनची कमाल किंमत रु. २१. पेन घेतल्यावर (तुम्ही नेहेमीचं गिर्‍हाईक नसाल तर) "पेन कसं वापरावं" यावरचं प्रवचनसुद्धा मिळतं. - अहिल्यादेवी शाळेजवळ अभ्यंकरांचं चपलांचं दुकान आहे. त्यांच्याकडे अभेद्य चपला मिळतात. माझा एक मित्र अकरावीपासून बीएएमएस होईपर्यंत अभ्यंकरांच्या एकच चपला वापरत होता. त्या तोडण्यासाठी त्याने हरतर्‍हेचे प्रयत्न केले, पण काही उपयोग झाला नाही! माझ्या चपला पाचवं वर्षं नॉटाऊट काढताहेत! - लक्ष्मी रस्त्यावर जनता खादी भांडार. साधे, झकास सुती / खादीचे कपडे. (त्याचा मालक थोडा "सखाराम गटणे" आहे!) - लक्ष्मी रस्त्यावरच उंबर्‍या गणपती चौकात "बालाजी बेल्ट हाऊस" आहे. त्यांचे बेल्ट घ्यायला लोक कुठून कुठून येतात. मालकांचं आता वय झालं आहे. त्यामुळे सकाळी दोन तास संध्याकाळी दोन तास दुकान उघडतात. सुट्टे नसले तर सरळ "घेऊ नका" सांगतात. उपहारगृहं आणि त्यांचे मालक हा तर वेगळाच विषय! मिसळवाले बेडेकर, रामनाथचा खन्ना, श्री उपहारगृहाच्या फटकळ मालकीणबाई असे अनेक नमुने. पेरूगेटासमोरच्या न्यू पूना बोर्डिंगचे प्राध्यापक उडपीकर माझ्या काकाला शिकवायला होते! असं बरंच काही काही :)

In reply to by मुक्त विहारि

हो. मी नेहेमी घेतो ती पेनं १६ रुपयांना मिळतात (प्लॅस्टिकची बॉडी). मी हे कौतुक एका मित्राला सांगितलं. तो अगाव मनुष्य काळ्यांच्या दुकानात गेला आणि "सर्वात जास्त किमतीचं पेन द्या" असं काहीतरी म्हणाला. काळ्यांनी स्टीलची कॅप वगैरे असलेलं पेन त्याच्यासमोर ठेवलं आणि रु. २१ अशी किंमत सांगितली. "अहो हे गिफ्ट द्यायचंय" मित्र त्या पेनाचं एकंदर रुपडं पाहून म्हणाला. "तसली पेनं आम्ही ठेवत नाही. फरासखाना चौकातून डावीकडे वळलात तर व्हीनस दिसेल. तिथे मिळतील तुम्हाला तसली पेनं!" काळे मख्खपणे म्हणाले. 'आम्ही लिहायची पेनं विकतो, दाखवायची नव्हे. तसली पेनं घेणारे ** असतात' असं त्यांनी ध्वनित करून टाकल्याने मित्र रु. २१ चं पेन घेऊन निमूटपणे परतला. :)

In reply to by आदूबाळ

माझ्याकडे मी सातवीला असताना घेतलेले काळे-पेन आहे. मला नविन पेन घ्यायचंय म्हंटल्यावर वडिलांनी "चांगल्यापैकीच घे" म्हणून फ्लेअर, बटर्फ्लाय्,हिरो वगैरेंच्या हिशोबाने पैसे दिले. मी आणि माझे मित्र शाळेमागच्या गल्लीतून लगेच काळेंकडे ! भारी पेन द्या, असं म्हणालो तर, "कितवीला आहेस, मग काय करायचाय एव्हढा भारी पेन?" वगैरे सुरू केलं. तरी हट्टाने म्हणालो की, मी फक्त शाईपेन च वापरत आलोय. त्यात वाढदिवस पण आहे, नवीन घ्यायचाच तर भारी घे, म्हणून बाबांनी पैसे दिलेत. "असंय होय" म्हणत, त्यांनी मला हिरो-सारखं दिसणारं नीब आत घुसवलेले ते राखाडी रंगाचं पेन तात्काळ तयार (असेंबल) करून दिलं. लगेच तिथेच लिहुन वगैरे बघून, नीब सेटींग करुन दिलं मस्तपैकी! सोबत, एक काळ्या शाईचा पाऊच पण दिला वाढदिवसाची भेट म्हणून !! भारी होते ते काळेकाका.

In reply to by आदूबाळ

:)

In reply to by आदूबाळ

उपाहार गृह आणि त्यांचे मालक यात सर्वात वरच्या क्रमांकावर येतील ते बादशाही चे तवकर आजोबा. त्या नंतर वैद्य मिसळवाले रवीवार पेठेतले , एस पी समोरचे भेळेचे दुकानवाले आणि शिक्केवाले छत्रे ( अप्पा बळवंत चौक जुने रतन टॉकीज)