Skip to main content

पुणे :

लेखक विजुभाऊ
मंगळवार, 15/10/2013 या दिवशी प्रकाशित केले.
पुणे हे एक ऐतिहासीक शहर आहे.औरंगाबाद देखील तसेच आहे. मात्र औरंगाबाद मध्ये आलेल्या पाहुण्याना फिरवण्यासाठी बीबी का मकबरा , पाणचक्की यासारखी स्थळे दाखवता येतात. कोल्हापुरात रंकाळा , भवानी मंडप , जुना राजवाडा , शालीनी पॅलेस , कनेरी मठ अशी ठीकाणे दाखवता येतात. पुण्यात अशी कोणती स्थळे दाखवावीत असा विचार केला तर शनिवार वाडा /पर्वती या पेक्षा पुढे मजल मारता येत नाही.मात्र तेथे गाईड वगैरे उपलब्ध नसतो पुण्यात भटकंतीला दोन तीन दिवस आलेल्या पाहुण्याना कोणती ठिकाणे दाखवावीत हा प्रश्न पडतो. शनिवार वाडा , पर्वती ,जंगली महाराज मठ , ओशो पार्क या व्यतीरीक्त ठीकाणांची माहिती मिळाल्यास पुण्यात रहाणार्‍या न रहाणार्‍या मिपाकरांसाठी एक चांगली सोय होईल. कृपया जाणकारानी माहिती द्यावी.

वाचने 43085
प्रतिक्रिया 165

प्रतिक्रिया

ब्याटमना. को? नाड्यात उभी करां पसरुनी, ती परकरी सुता अहा खवट शेर्‍याचे मुखिं नाव घेत ती, मज्जा कुण्याची पहा!!

पुण्यातल्या 'दणकट पायजमा अन् मुलायम बंडी मिळेल' वाल्या पाटीचा उल्लेख ब्यान आहे का?

'दणकट पायजमा
हो हो बरोबर. चितळेंच्या दुकानासमोर मंडईत जायच्या कोपर्‍यावर होते ते दुकान.

१) राम देवरा - लोनी काळ्भोर २) बाणेश्वर - बाणेर

आि ण जमलाच तर पुणे विद्यापीठ ला हि भेट द्या !! चतुर्श्रुंगी देवी चे मंदीर पाहून डोळ्याचे पारणे फिटतील . सुजाताची मस्तानी आणि राजा भाऊ ची भेल आणि अमृततुल चहा घायला मात्र विसरू नकात ह. तुमच्या भटकंतीत !!!!

अमृततुल चहा घायला मात्र विसरू नकात ह
कसला हो तो चहा. अ‍ॅल्युम्युनियम च्या दुकानात मोळतो तो तीन चमचे साईझच्या ग्लासात देतात त्या चहाला अमृततूल्य म्हणुन संबोधणे हे केवळ पुण्यातच. अर्थात पाच फूट रुंद गल्लीला हाँगकाँग लेन जेथे म्हणतात तेथे तीच चमचे चहाच्या ग्लासला अमृततूल्य म्हणणे हा काव्यात्म न्यायच झाला की

ब्याट्या जागा झाला वाट्टे. अजून एक. हिंजवडीचा पूल बांधल्या नंतर तो चुकीचा आहे हे समजले हेही पुण्यातच होणे..... धन्य धन्य ते पुणे. बांधल्या नंतर पूलाची दिशा चुकणे.