✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

गांधी विरुद्ध आंबेडकर - नेमके काय घडले ?

र
राजघराणं यांनी
Mon, 10/14/2013 - 00:48  ·  लेख
लेख

गांधी विरुद्ध आंबेडकर - नेमके काय घडले ? (मला समजलेले गांधीजी भाग २ )

गांधी विरुद्ध आंबेडकर - नेमके काय घडले ? ********************************************************************************* संदर्भ स्पष्टीकरण : धनंजय कीर लिखित आंबेडकर चरित्राची दहावी आवृत्ती संदर्भ म्हणुन वापरली आहे . खैरमोडे लिखित आंबेडकर चरित्रही संदर्भाला घेतले आहे - ( खैरमोडे ३-६७) हा संदर्भ खैरमोडे लिखित चरित्रातील तिसर्या खंडातील ६ ७ वे पान असा वाचावा . बहिष्कृत भारत या पत्रातले बाबासाहेबांचे लेख उद्धृत केले आहेत त्यापुढे वर्तमान पत्राचा दिनांक दिला आहे. द न गोखले यांचे डॉ आंबेडकरांचे अंतरंग हे हि पुस्तक संदर्भ म्हणून वापरले आहे . ********************************************************************************* गांधी विरुद्ध आंबेडकर हा संघर्ष अटळ होता . एक दलितांचा नेता आणि दुसरा सवर्ण हिंदुंचा पुढारी यात गुलुगुलु गुलाबी ऐक्य शक्य नव्हते . त्याला सामाजिक कारणे जवाबदार होती . हा संघर्ष कधी निर्माण झाला ? कसा निर्माण झाला ? कसा वाढत गेला ? आणि कधी संपला ? हे आपण प्रस्तुत लेखात पहायचे आहे . आजच्या दलितांनी गांधिंचा द्वेष करण्याचे कारण नाही आणि सवर्णांनी आंबेडकरांचा किंवा आजच्या दलितांचा राग धरू नये .म्हणुन हि धडपड. वरची वाक्ये हिंदि किंवा इंग्लिश मध्ये लिहिली असती तर ठीक ! पण मर्हाटि माणसाला मुळात गांधी हा सवर्ण हिंदुंचा नेता होता हेच मुळी मान्य नाही ! म्हणुन सुरवात तिथून करावी लागेल . ज्या पक्षाला १३ % एव्हढी जास्तीत जास्त मते मिळाली तो हिंदु महासभा हा हिंदुंचा पक्ष म्हणणे तत्व म्हणुन ठिक आहे . पण लोकशाहीच्या राजकारणात हा एक जोक ठरत असतो . ज्याला लोक मते देतात तो पक्ष त्या समाजाचा असतो . सवर्ण हिंदुंनि फ़ाळणिपुर्वि आणि फ़ाळणिनंतरहि गांधिबाबाच्या कोग्रेसला मते टाकलि होती. तत्कालीन सवर्ण हिंदुंचा पुढारी - लोकनियुक्त पुढारी गांधी होता . गांधीना त्याकाळच्या सवर्ण हिंदुसमाजाचा पुढारी न मानणे हे मध्यमवर्गाच्या वांझ बुद्धीमातेचे गर्विष्ठ अपत्य आहे .असो . हिंदु संघटक गांधीनी हिंदु जाती पातीत फुटू नयेत म्हणुन केलेले प्रयत्न प्रस्तुत लेखात येणारच आहेत आंबेडकर गांधिंकडे सवर्ण हिंदुंचा नेता म्हणुनच पहात होते . तत्कालीन हिंदुंच्या हृदयावर गांधीच राज्य करत होते. हे सत्य एकदा मान्य केले कि पुढे जाता येईल . आंबेडकरांचा प्रश्न वेगळा होता. दलित समाजातल्या एका घटकाने त्याकाळी त्यांना पुढारी मानले होते . त्या काळाचा विचार आंबेडकरांनि राजकारणात प्रवेश करण्या आधीपासून केला पाहिजे. आणि त्या आधी परिस्थिती, अनुभव, वाचन आणि विचार करून माणुस सतत बदलत जात असतो हे ध्यानात ठेवले पाहिजे .

महाडचा धर्म संगर : फक्त गांधिजिंचि तसबीर

चवदार तळ्यासाठी केलेला सत्याग्रह हि बाबासाहेबांच्या संघर्षातलि पहिली मोठी लढाई . २५ डिसेंबर १९२७ रोजी ह्या लढ्याला आरंभ झाला. ७ - ८ हजार माणसे जमली होती . मंडपात येताना शिवाजी महाराज कि जय ! आणि गांधीजी कि जय ! अशा घोषणा देण्यात येत होत्या . यावेळी मंडपात फक्त एकाच नेत्याची तसबीर विराजमान होती - गांधीजी ! (खैरमोडे ३ - १५९ ) a आपल्या तडाखेबंद भाषणात बाबासाहेब म्हणतात - " चवदार तळ्याचे पाणि प्याल्याने आम्ही अमर होऊ अशातला भाग नाही . आजपर्यंत ते प्यायलो नव्हतो तेंव्हा काही मेलो नव्हतो . इथे आम्ही पाणि पिण्यासाठी जमलेलो नाही . आम्हीही माणसे आहोत हे सिद्ध करण्यासाठी जमलो आहोत. हि सभा समतेची आहे ... हिदू समाज समर्थ करायचा असेल तर चातुर्वण्य व असमता यांचे उच्चाटन करून हिंदु समाजाची रचना एकवर्णत्व व समता या दोन पायावर केली पाहिजे. अस्पृश्यता निवारण्याचा मार्ग हा हिंदु समाज समर्थ करण्याच्या मार्गापासून भिन्न नाही. म्हणुन मी म्हणतो - कि आपले कार्य जितके स्वहिताचे आहे , तितकेच राष्ट्र हिताचे आहे . …. हि सभा हिंदु समाजाचे संघटन करण्यासाठी बोलावली आहे. " (बहिष्कृत भारत ३-२ - २ ७ ) या काळात बाबासाहेब गांधी आणि गांधिविचार दोन्हीही मानत असलेले दिसतात. माहाडच्या धर्म संगराला बाबासाहेबांनी सत्याग्रह म्हटले होते . हे हि ध्यानात ठेवले पाहिजे . " सत्याग्रह हि विचारसरणी आम्ही गीतेतून घेतली असून . गीता हा धर्म ग्रंथ म्हणुन आम्हाला मान्य आहे " - बाबासाहेब (बहिष्कृत भारत - २५ - ११ - २ ७ ). याच परिषदेत बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली . १९ २ ७ सालीच बाबासाहेबांनी दादरच्या गणेशोत्सवात भाषण केले होते . आणि विरोधकांच्या बंदोबस्तासाठि खिशात पिस्तुल बाळगले होते! (खैरमोडे २ - १ ४ ९ ) हिंदु राहून समता प्राप्त करणे आणि त्यासाठी लढा देणे हे आंबेडकरांचे धोरण १९ २ ७ साल पर्यंत स्पष्ट दिसते आणि हिंदु पुढारी - गांधी हे आपले विरोधक आहेत असे आंबेडकरांना त्याकाळी वाटत नव्हते हे हि स्पष्ट होते . हिंदु समाज समर्थ आणि संघटित करण्याची मनीषा आंबेडकरांनि या काळात अनेकदा बोलून दाखवली आहे.

काळाराम ते सायमन : ठिणगी पेटली

काळा राम मंदिर प्रवेशासाठी अस्प्रुश्यांचा संघर्ष चालू होता. त्यावेळी आंबेडकरांनि गांधिंना सवाल केला होता - " मंदिर प्रवेशाचा प्रश्न मिटल्या नंतर जेंव्हा अस्पृश्य लोक जातीच्या आणि चातुर्वणाच्या उच्चाटनाचा प्रश्न हाती घेतील . तेंव्हा महात्माजी कोणाच्या बाजूने उभे राहतील ? " हा सवाल फक्त गांधीना नव्हता. पुर्या हिंदु समाजाला होता. गांधीजी उत्तरले - " मी मानत असलेल्या हिंदु धर्मात उच्च नीचता नाही पण डॉ आंबेडकरांना वर्णाश्रमाशि झगडा करायचा असल्याने मी त्यांच्या पक्षाला राहू इच्छित नाही. कारण वर्णाश्रम हा हिंदु धर्माचा अभिन्न भाग आहे, अशी माझी श्रद्धा आहे . " (कीर - २ ३ ९ ) गांधी विरुद्ध आंबेडकर संघर्ष इथून सुरु होतो. b (सनातनी हिंदु धर्माला डांबर फासत आहेत . गांधीजी ते कष्टाने पुसू पाहत आहेत आणि आंबेडकर त्याचा पाया असलेल्या वर्ण व्यवस्थेवर हातोड्याने घाव घालत आहेत. ब्रिटीश लांबून मजा बघत आहेत- तत्कालीन व्यंगचित्र ) सायमन आयोग : हा आयोग भारताला कोणत्या बाबतीत स्वायतत्ता द्यावी याचा विचार करण्यासाठी होता . बहुतेक सर्व राजकीय पक्षांनि त्याला अनेक मर्यादा आहेत म्हणुन विरोध केला . बहिष्कार घातला . आंबेडकरांनि मात्र सायमन आयोगाला सहकार्य केले आणि त्याला एक लांबलचक निवेदन नेउन दिले . का ? हा आंबेडकरांचा स्वातंत्र्याच्या चळवळीशी द्रोह होता का ? काय होते त्या निवेदनात ? या प्रश्नांचि उत्तरे पहाण्या आधी एका घटनेची नोंद केली पाहिजे . सायमन गो ब्याक ! म्हणत आंदोलन करताना लाला लजपत राय यांच्या छातीवर ब्रिटिश पोलिसी दंडुके बसले. त्याबद्दल ७ डिसेंबर १ ९ २ ८ च्या बहिष्कृत भारत च्या अग्रलेखात श्रद्धांजली वाहताना बाबासाहेब म्हणतात - " लाला लजपत राय यांनी राजकारण आणि समाजकारण यात फारकत करून आपल्या पंगुपणाचे प्रदर्शन कधीच केले नाही .त्याकाळी लालाजिंचा आर्य समाज मुस्लिमांच्या आक्रमणापेक्षा जातीभेदादि हिंदु समाजाच्या अंतर्गत दोषांकडे अधिक लक्ष पुरवत असे . अस्पृश्यांच्या चळवळीबद्दल लालाजिंचि सहानुभूती कळकळीची होती " १ ९ २ ७ ते ३ ० या काळात बाबासाहेबांच्या विचारात बदल घडू लागलेला दिसतो . त्यांना अजून हिदू समाजाकडून आशा आहे पण गांधिविरुद्ध मत बनू लागले आहे . ठिणगी पेटली आहे . ********************************************************************************* विभक्त मतदार संघ म्हणजे काय ? भारातात सध्या जी लोकशाही आहे त्यात संयुक्त भौगोलिक मतदार संघ आहेत . काही जागा मागास उमेदवारांना राखीव आहेत . पण प्रत्येक उमेदवारासाठी सर्व जाती धर्माचे लोक मत देतात . त्यामुळे निवडणुकीतल्या उमेदवाराला सर्वसमावेशक भूमिका घ्यावी लागते. विभक्त मतदार संघ म्हणजे काही जातीना वेगळे मतदार संघ . आजच्या पदवीधर मतदार संघात ज्याप्रमाणे पदवीधर उमेद्वरांसाठि केवळ पदवीधर च मतदान करतात त्याप्रमाणे - दलित उमेदवारासाठी केवळ दलितांनी मतदान करणे म्हणजे - विभक्त मतदार संघ. ********************************************************************************* ब्रिटिशांना दिलेल्या सायमन कमिशनच्या निवेदनात बाबासाहेब लिहितात - " १ ) आज अस्पृश्य समाजाच्या समस्या वेगळ्या असल्याने ते हिंदु समाजापासून वेगळे आहेत २) मात्र अस्पृश्यांसाठी मागितलेल्या मागितलेल्या सवलती तात्पुरत्या आहेत . सर्व भारत शेवटी एका व्हावा . " (गोखले १ १ ८ ) या काळात आंबेडकरांनि विभक्त मतदार संघाला कडाडून विरोध केलेला आहे. आणि राखीव जागा मागितलेल्या आहेत . निवेदनात बाबासाहेब म्हणतात - विभक्त मतदार संघ हे लोकशाहीच्या मुळावरच घाव घालतात. विभक्त मतदार संघात निवडुन गेलेले उमेदवार सभागृहात सर्वांसाठीच कायदे करतात . ज्यांनी निवडुन दिले नाही त्यांबद्दल कायदे करण्याचा हक्क विभक्त मतदार संघातल्या उमेदवारांना मिळतो . ज्यांनी निवडुन दिले नाही त्यांवर राज्य करणे हि कुठली लोकशाही ? ( Dr Ambedkar Writings and Speeches. Vol 2 pg 344 - 366, 1982) ह्या निवेदनात बाबासाहेबांचा लोकशाहीवाद आणि राष्ट्रवाद अनेकवार व्यक्त झाला आहे . पण सायमन शी सहकार्य केले म्हणुन त्याकाळी बाबासाहेब देशद्रोही असल्याची चुकीची टिका कोंग्रेसि वर्तमान पत्रांनी केली होती .

गोलमेज परिषद : वणवा पेटला

सायमन आयोगापुढे ३७ दलित संघटना गेल्या होत्या. त्यापैकी ३५ संघटनांनि विभक्त मतदार संघांचि मागणी केली होती . आंबेडकरांनि आपले वैयक्तिक मत बाजूला ठेवत पुढे लोकमताला मान दिला . (खैरमोडे ४ - १ ४ १ . १ ४ २ ) आणि गोलमेज परिषदेत बाबासाहेबांनी दलितांना विभक्त मतदार संघ मागितले . लोकमताच्या रेट्यात बाबासाहेबांनी बदललेला हा निर्णय आहे . इथे एक लक्षात ठेवले पाहिजे कि आंबेडकर हे केवळ विचारवंत नाहीत ते एक राजकारणीही आहेत . जे बाबासाहेबांबद्दल खरे आहे ते गांधीबाबा बद्दल हि खरे आहे. *********************************************************************************

प्रौढ सार्वत्रिक मताधिकार म्हणजे काय ?

ब्रिटिश राजवटीत हि निवडणुका होतच होत्या पण मतदानाचा अधिकार सर्वांना नव्हता. ठराविक जमीन ठराविक शिक्षण असलेलेच लोक मतदान करू शकत . या गाळण्यांमूळे बहुसंख्य दलितांना मतदानाचा हक्क मिळत नव्हता आणि त्यामुळे राखीव जागांवरुन निवडुन जाणारे दलित उमेदवारही सवर्णांचे चमचे असत. प्रौढ मताधिकार म्हणजे १८ / २१ वर्षे वयाच्या सर्व भारतियांना मतदानाचा अधिकार असणे . प्रौढ माताधीकारात सर्व दलितांनाहि मतदानाचा हक्क मिळतो आणि अस्पृश्य हिताबद्दल जागरूक असणारे उमेदवार निवडुन जाणे सोपे होते , असे आंबेडकरांचे मत होते . ********************************************************************************* dv स्वत:चे विभक्त मतदार संघाबद्दलचे प्रतिकूल मत राजकारणी आंबेडकरांनि बदलले . गांधिंमधल्या अट्टल राजकारणी पुरुषा बद्दल तर कोणालाच शंका नाही ! राजकारणात स्वत:च्या लोकांचा अनुनय करावा लागतो . हा लोकशाहीचा साइड इफ़ेक्ट आहे ! गांधीनी सवर्णांच्या भावना बोलून दाखवत दलितांच्या विभक्त मतदार संघाला विरोध केला असे काहिंना वाटते. प्रौढ मतदानाचे नाव सुद्धा नसताना केवळ उच्चशिक्षिताना मतदानाचा अधिकार असताना - आंबेडकरांची नवी मागणी चुकीची होती असे म्हणता येणार नाही. पण जर दलितांना विभक्त मतदार संघ दिले तर उद्या सर्वच जाती स्वत:चे वेगळे मतदार संघ मागतील -प्रत्येक जात स्वत:चे उमेदवार निवडुन देऊ लागली तर - उमेदवारांना सर्वसमावेशक भूमिका घेण्याची काहीच गरज उरत नाही त्यामुळे जातीवादी उमेदवारच निवडुन येतील आणि ते देशाचे तुकडे पाडतील हि गांधिजिंचि भीती हि अनाठाई नव्हती. गांधी विरुद्ध आंबेडकर संघर्ष पेटु लागला आणि त्यातच उभयतांचि भेट ठरली.

वादळी भेट आणि जळते उद्गार

इथे एका विनोदी गोष्टीचा उल्लेख करणे आवश्यक आहे . हि भेट संपेस्तवर आंबेडकर हे अस्पृश्य समाजातले आहेत हेच गांधीना माहित नव्हते. (कीर १८०) गांधीजी आंबेडकरांना पुण्याचे पुरोगामी ब्राह्मण समजत असत ! आंबेडकरांच्या शैक्षणिक डिग्र्यांकडे पाहून गांधिंनि हा ग्रह करून घेतला होता कि आंबेडकर या ब्राह्मण आडनावामुळे गांधिंचा तसा ग्रह झाला होता ते सांगता येत नाही . ( आं - बा -व -डे -क - र हे मुळ नाव बदलून त्यांच्या एका प्रेमळ ब्राह्मण गुरुजीने आंबेडकर असे स्वत:चे नाव दफ्तरी लावले होते. आंबेडकरांनि तेच पुढे कायम ठेवले) पण गांधिंचा समज आंबेडकर हे एक पुरोगामी ब्राह्मण गृहस्थ आहेत असा होता! आणि पुरोगामी ब्राह्मण हा प्राणि राजकारणात फारशी किंमत द्यायच्या लायकीचा नसतो ! कदाचित यामुळेच या भेटीत गांधिंच्या अजब पुर्वग्रहामुळे मोठे नुकसान झाले असे मानायला जागा आहे ! आंबेडकरांच्या जळत्या उद्गारांनी गांधी भानावर आले आणि ते अस्पृश्य समाजातले आहेत काय ? अशी सहकार्यांकडे विचारणा केली . कादाचित हा - पुरोगामी ब्राह्मण कशापाई नसती उठाठेव करतो आहे ? कशासाठी स्वतंत्र मतदारसंघाच्या लष्कराच्या भाकरी भाजतो आहे ? अशा भावनेतून गांधीनी भेटीची सुरवातच थोडी कडक केली. आंबेडकरांचि पार्श्वभूमी माहित नसल्याने - कोणत्या परीस्थित आणि दबावात हा निर्णय घेतला हे गांधिंना कळलेले नसणार . सुरवातीला त्यांनी आंबेडकरांकडे चक्क दुर्लक्ष केले आणि दुसर्याच कोणाशीतरी सुत कताइबद्दल बोलू लागले. थोड्या वेळाने गांधी म्हणाले " आंबेडकर तुमचा जन्म व्हायच्या आधीपासून मी अस्पृश्यांसाठी काम करतो आहे . (तेंव्हा मला शहाणपणा शिकवू नये ! ) कोग्रेसने अस्पृश्यांसाठी विस लाख रुपये खर्च केलेले आहेत. अशाप्रकारच्या बोलण्याने आंबेडकर चांगलेच व्यथित झाले असणार. त्यांनी चिडून गांधिंना खडे बोल सुनावले शेवटी म्हणाले " ज्या देशात आमच्या समाजाला कुत्र्यापेक्षा वाइट वागणुक मिळते त्या देशाला मी मायभूमी म्हणु शकत नाही , गांधीजी मी पुन्हा सांगतो - मला मायभूमी नाही !" या वादळी भेटीमुळे - गांधिंच्या दुर्लक्ष करण्यामुळे आणि आंबेडकरांच्या जळत्या उद्गारांमुळे या दोनही महान नेत्यात तयार झालेला व्यक्तिगत दुरावा बराच काळ टिकला.

पुणे करार : कौन जिता … कौन हारा

आंबेडकरांनि विभक्त मतदार संघांचि मागणी सोडुन द्यावी म्हणुन गांधिजिंनि उपोषण सुरु केले. ज्याच्या मागे जवळजवळ सारा सवर्ण समाज आहे त्याचा मृत्यू झाला तर गावोगावच्या अस्पृश्यांना काय झेलावे लागले असते ? आंबेडकरांसमोर पुणे करारावर सही करण्याशिवाय कोणता पर्याय होता ?

ताणलेले दोर

पण त्या आधी एका भानगडिचा वेध घेणे आवश्यक आहे. ती भानगड म्हणजे राजा - मुंजे करार होय . एम सी राजा हे एक अस्पृश्य पुढारी होते . राजा आणि त्याच्या सारख्या इतर अस्पृश्य पुढार्यांच्या दबावामुळेच आंबेडकरांना आपली मुळातली सायमन कमिशन समोरची भूमिका बदलत विभक्त मतदार संघाना पाठिंबा द्यावा लागला होता . हेच राजा आता गटबाजीचे राजकारण खेळले . आणि स्वत:चे महत्व वाढवण्यासाठी त्यांनी डॉ मुंजे या हिंदु महासभेच्या पुढार्याबरोबर एक करार केला. या करानुसार अस्पृश्यांना विभक्त मतदार संघ नको . वाढीव राखीव जागा हव्या अशी मागणी केली ! आता आंबेडकरांसमोर मोठा पेचप्रसंग होता . महाराष्ट्रातल्या महार समाजाचा पुर्ण पाठिंबा आणि मराठि दलीतात बर्यापैकी वजन या आंबेडकरांच्या जमेच्या बाजू असल्या तरी अखिल भारतीय पातळीवर त्या क्षणापर्यंत तरी आबेडकर हे सर्व दलितांचे एकमुखी नेते नव्हते . अखिल भारतीय पातळीवर दलितांचे नेतृत्व करण्यासाठी त्यांना राजा सारख्या अंतर्गत गटबाजांबरोबर हि राजकाराण भोगावे लागत होते . पंचाइत अशी कि राजा मुंजे करार मान्य केला तर आंबेडकरांनि राजाचे नेतृत्व राष्ट्रीय पातळीवर मान्य केलेले आहे आणि दलितांच्या वतीने करार मदार करण्याचे सर्व अधिकार राजा कडे आहेत असा सरळ अर्थ निघत होता . राजा आणि मुंजेंचि तीच राजकीय चाल होती . आता आबेडकरांना चटकन विभक्त मतदार संघाची मागणी सोडणे अशक्य झाले . राजा सारख्या गटबाज व्यक्ती च्या हाती राष्ट्रीय दलित चळवळीची सूत्रे देण्याचा गलथान पणा आंबेडकर करणे शक्य नव्हते. त्यामुळे आंबेडकरांनिहि विभक्त मतदार संघाचा मुद्दा ताणून धरला आणि गांधिंना प्राणांतिक उपोषण करण्या पर्यंत परिस्थिती ताणावी लागली.

तुटलेले बंध

परिस्थिती विकोपाला जाऊ लागली . गांधिजिंना कोणत्याहि परीस्थित जातीय तत्वावर विभक्त मतदार संघ नको होते . आणि आंबेडकर एका विचित्र राजकीय परिस्थितीमुळे झटकन निर्णय फिरवू शकत नव्हते. गांधिंचि तब्येत खालावू लागली . परिस्थिती स्फोटक बनू लागली. गांधिंचा मृत्यू ओढवला असता तर गावोगाव सवर्ण दलित दंगली पेटल्या असत्या . बाबासाहेबांसारख्या लोकशाहीवादी नेत्याला दंगली होणे कदापि मंजुर नव्हते त्यामुळे त्यांनी पुणे करारावर सही केली . व्यथित होऊन आंबेडकर म्हणाले होते " हे कोंग्रेस वाले माझे राजकीय जीवन संपुष्टात आणतील आणि मग तेच दलितांचे पुढारी होतील " ( खैरमोडे ५ - ३१ ) पुणे करारावर सही - हा आंबेडकरांचा राजकीय पराभव होता काय ? त्यांच्या सहकार्यांना तेंव्हा तसेच वाटले आजही आंबेडकर वाद्यांच्या हृदयातली ती एक भळभळति जखम आहे . त्यामुळे मने तुटली आहेत . पण सत्य काय आहे ?

अंतिम विजय कोणाचा ?

पुणे करारामुळे विभक्त मतदार संघ रद्द झाले आणि संयुक्त मतदार संघ आले असा बर्याच लोकांचा भ्रम असतो . ते खरे नाही . पुणे करारा मुळे संयुक्त आणि विभक्त मतदार संघाचे एक आगळेच फ्युजन जन्माला आले . त्यानुसार - १) दोन स्तरीय निवडणुक पद्धती आली . अस्पृश्यांनी स्वत:चे चार उमेदवार निवडायचे (विभक्तपणे) आणि त्यानंतर सर्व जाती धर्माच्या लोकांनी या चारपैकी एक उमेदवार (संयुक्तपणे ) निवडायचा. या कलमामुळे सवर्णांचे चमचे निवडुन जाण्याचा धोका आंबेडकरांनि टाळला. आणि खरे पाहता आंबेडकरांचा मुलभुत विचार गांधिंनि मान्य केला. २) या करानुसार अस्पृश्यांना १ ८ टक्के राखीव जागा मिळाल्या . (त्या पूर्वीच्या मेकडोनल्ड निवाड्यापेक्षा खूपच जास्त होत्या ) ३) अस्पृश्यांच्या शिक्षणासाठि वेगळी काढुन ठेवायची रक्कम ठरली यातही आंबेडकरांनि ठरवलेला आकडा ग्राह्य धरण्यात आला . c डॉ बाबासाहेब आंबेडकर हेच दलितांचे एकमेव राष्ट्रीय नेते आहेत आणि दलितांच्या वतीने करार मदार करण्याचे सर्व हक्क एकट्या आंबेडकरांना आहेत हि गोष्ट सिद्ध झाली . पुणे करारा नंतर आंबेडकर हे एकमेव राष्ट्रीय दलित नेते असून एम सी राजा सारखे लोक केवळ उपट्सुंभ आहेत हे सिद्ध झाले. पुढे भारत स्वतंत्र झाल्यावर सार्वत्रिक प्रौढ मतदानाचा हक्क दलितांसकट सर्वांना मिळाला . शीक्षण , जमीन इत्यादी चाळण्या गेल्या . त्यामुळे घटना परिषदेचे सदस्य असलेल्या आंबेडकरांनि स्वतंत्र भारतात एकदाही विभक्त मतदार संघ मागितले नाही . प्रौढ सार्वत्रिक मतदान आल्याने विभक्त कि संयुक्त हा मुद्दाच उरला नाही . गांधिंना जे साध्य करायचे होते ते हि घडलेच - द्विस्तरीय गुंतागुंतीची निवडणुक प्रक्रिया झाल्याने इतर जाती विभक्त मतदार संघ मागाण्याचा धोका टळला . कारण इतकी गुंता गुंतिचि प्रक्रिया सर्व जातींसाठी लागू करणे अशक्यच होते . त्यातून जातीय फायद्याची गणिते बांधणेहि दुरापास्त होते . थोडक्यात पुणे करार बरोबरीत सुटला किंवा थोड्या प्रमाणात आंबेडकरांच्याच बाजूला झुकला असे म्हणावे लागते. स्वातंत्र्यानंतर तर तो प्रश्न पुर्णपणेच आउट डेट बनलेला आहे . कारण सार्वत्रिक प्रौढ मतदान !

सम्यक पणे विचार बदलणारा - झपाटलेला अभ्यासक : डॉ आंबेडकर

बाबासाहेब आंबेडकर हे एक अभ्यासू आणि विद्वान गृहस्थ होते . राजकारण - समाजकारण - धर्म कारण याबद्दल ते सतत अभ्यास करत आणि नव्या अभ्यासानुसार - मते बदलत असत . उदाहरण घायचे झाले तर भगवत गीता या हिंदु धर्म ग्रंथाबद्दल लिहिता येईल . १) १९ २ ७ सालच्या महाडच्या संगरात त्यांनी मनुस्मृती जाळली पण गीता हा धर्मग्रंथ स्पृश्य आणि अस्पृश्य या दोन्ही लोकांना मान्य आहे असे ते त्याकाळी म्हणत असत . २) पुढे धर्मांतराच्या घोषणे नंतर गिता हा पुर्णपणे मूर्खपणे आणि बाष्कळ पणे लिहिलेला ग्रंथ आहे असे ते म्हणत . ३) धर्मांतरानंतर दिलेल्या एका मुलाखतीत बाबासाहेब म्हणाले - गीतेत ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या बुद्ध धर्मातून उसन्या घेतल्या आहेत . (म्हणजे गीतेत काही चांगल्या गोष्टी आहेत !) एकाच ग्रंथाबद्दल व्यक्त केलेली हि मते आहेत . प्रा शेषराव मोरे यांनी त्यांच्या आंबेडकरांवरिल ग्रंथात राजकारण , समाजकारण , इतिहास मिमांसा या सर्वच बाबतीतल्या बदलत जाणार्या मतांचा आढावा घेतला आहे . d अभ्यासक नवीन माहितीनुसार मते बदलत जातोच . पण आंबेडकरांचे सामाजिक धोरणही त्यांची धर्म मिमांसा आणि इतिहास मिमांसा बदलते. जोपर्यंत हिंदु राहून समता आणता येईल असे त्यांना वाटत होते तोपर्यंत ते गीतेला पुज्य मानत होते. हा हिंदु समाजावरचा विश्वास उडाल्यावर ते गीतेला मुर्ख ग्रंथ म्हणु लागले . पुढे घटना परिषदेत दाखल झाल्यावर ....जेंव्हा त्यांना हिंदु कोड बिल पास करून हिंदु स्त्रियांचे भले करायचे होते तेंव्हा........ ते बिल पास करायला त्यांना सवर्ण हिंदुंचा पाठिंबा हवा होता....... आणि त्यावेळी त्यांनी गीतेत काही चांगल्या गोष्टी आहेत पण ........त्या बुद्धाकडुन उधार घेतलेल्या आहेत असे मत व्यक्त केले . समता आणणे आणि लोकशाही रुजवणे हे बाबासाहेब आंबेडकरांचे ध्येय होते . त्यासाठी त्यांनी धर्म मिमांसा आणि इतिहास मीमांसा लिहिली , त्यात वेळोवेळी बदल केले , कारण त्यांना इतिहास केवळ लिहायचा नव्हता तर घडवायचाहि होता . स्वत:ची मते बदलण्याचे स्वातंत्र्य जर आंबेडकरांना आहे तर गांधिंना का नाही ?

परिस्थितीशी जुळवण्यासाठी विचार बदलत जाणारा देशभक्त राजकारणी : मोहनदास गांधी

परिस्थितीशी जुळवण्यासाठी विचार बदलत जाणारा देशभक्त राजकारणी : मोहनदास गांधी गांधीजी हे आंबेडकरांप्रमाणे विद्वान , अभ्यासक किंवा संशोधक निश्चितच नव्हते . पण त्यांना उभ्या देशाबद्दल कळकळ प्रेम आणि जिव्हाळा होता . दलितांचे भले करणे हा गांधिंसमोरचा एकमेव कार्यक्रम कधीच नव्हता पण उच्च निचतेला आणि मुख्यत: अस्पृश्यतेला त्यांचा विरोध पहिल्या पासून होता . त्याला गांधिंनि कमी महत्व दिल- हा आरोप खोटा म्हणता येणार नाही . पण गांधी म्हणजे अस्पृश्यांच्या जिवावर उठलेला सैतान निश्चितच नव्हे. गांधीही स्वत:ची मते अगणित वेळा बदलत आलेले आहेत . मी हिमालया एव्हढ्या चुका केल्या आहेत असे गांधिंनि अनेकदा म्हटले आहे . f कधीकाळचा चातुर्वणाचा समर्थक गांधी । यापुढे मी फक्त आंतरजातीय विवाहांनाच हजार राहीन अशी अट ठेवतो .। आणि राउंड टेबलाची नीती पुढे घटनाकारांना सन्मान देण्यापर्यंतही बदलते । बाकी गांधिंचि मते बदलत गेली आणि बाबासाहेब कायदामंत्रि (पहिल्या) मंत्रिमंडळात होण्यामागे गांधी होते । पहिल्या घटनेपरिषदेवर बाबासाहेब लीग च्या पाठिंब्यावर गेले होते । ती परिषद पुढे रद्द झाली आणि फ़ाळणिनंतर जी नवी घटनापरिषद आली त्यावर बाबासाहेब जाताना गांधिंनि पाठिंबाच दिला होता . कोग्रेसच्या पाठिंब्या शिवाय घटना मसुदा समितीचे अध्यक्ष होणे शक्य नव्हते … आणि आंबेडकरांसरखा विद्वान कायदा पंडित हातचा घालवायला गांधिजिहि मूर्ख नव्हते . सुरवातीला गांधी सनातनी आणि चातुर्वणाचे समर्थक आहेत असा अर्थ निघू शकेल अशी पुष्कळ वचने गांधिंच्याच साहित्यातून काढुन दाखवता येतील . पुढे मात्र . गांधिंनि त्यांचे विचार बदलले आणि हिंदु धर्माच्या सर्व स्मृतींचे आणि धर्म ग्रंथांचे पुनर्लेखन करावे आणि स्त्रिया आणि शुद्र यांवर अन्याय करणारा भाग त्यातून काढुन टाकावा असे स्पष्ट मत गांधिंनि व्यक्त केले . ( म. गांधी आणि समाजसुधारणा - आकलन . नरहर कुरुंदकर) हिंदु राहून समता प्राप्त करण्याचा हा विचार आहे . हा विचार १ ९ २ ७ सालच्या आंबेडकरांच्या विचारासारखाच आहे. गांधीच्या अर्धनग्न धार्मिक फ़किरिपेक्षा आंबेडकरांचे सुटा बुटात राहणे आणि त्यांचा आधुनिक विचार मला अधिक भावतो पण .... सुस्पष्ट , लोजिकल , तर्कशुद्ध विचार करणारा माणुस उभ्या भारताचा नेता बनणे अशक्यच होते. या देशाची विविधता समस्यांची गुंतागुंत व आकांक्षांचा अनेकपदरिपणा जितका संकिर्ण (Complex ) होता तितकेच गांधिंचे व्यक्तिमत्व हि संकिर्ण होते. भारतासारख्या अनेकपदरी देशात राजकारण करायचे झाले तर मायावतिलाहि शेवटी सर्वजन हिताय अशी घोषणा द्यावी लागते हे विसरून चालणार नाही . गांधीना सर्वोदय हवा होता . पण अंत्योदय हे त्याचे सूत्र होते . सर्वांच्याच डोळ्यातले अश्रू पुसण्याची गांधिंचि महत्वकांक्षा आहे . पण अंत्यजाच्या डोळ्यातले अश्रू पुसणे हि त्याची पहिली पायरी आहे . गांधी हे मुख्यत: राजकीय नेते आहेत पण त्यांनी समाजकारण झटकून टाकलेले नाही . त्यांची धर्माची परिभाषा , हरिजन वगैरे संकल्पना माझ्यासारख्या नास्तिकाला पचणार्या नाहीत पण गांधिंचा उदारमत वाद भारताला थोड्या बहुत प्रमाणात का होईना जोडू शकला हे नाकारता येत नाही . ghk

समारोप

घटनेचा साचा बनवून बाबासाहेबांनी ह्या देशाचा मनु पालटला . गांधिच्या पाठिंब्या शिवाय हे शक्य नव्हते . देशाचे भविष्य कसे चालावे याचा ढाचा आंबेडकर तयार करतात आणि त्यांच्या नियुक्तीला गांधिंचा पाठिंबा असतो . तेंव्हा मुख्य वाद मिटलेला असतो. हा देश सनातनी विचारांनी चालणार नाही … आधुनिक राज्यघटनेनुसार चालेल अशी ग्वाही मिळालेली असते . . बाकी थोडेबहुत मतभेद सगळ्याच माणसात असणार आणि ते नैसर्गीकही आहे . गांधी आंबेडकर मुख्य वाद आणि संघर्ष इथे संपतो . तरीही या दोन महान भारतीय नेत्यांत कधीही मनोमिलन झाले नाही हि भारतीय राजकारणाची शोकांतिका आहे . गांधी सवर्ण हिंदुचे नेते होते पण अस्पृश्यांचे दुश्मन नाही . आंबेडकर दलित समाजाचे नेतृत्व करत असले तरी त्यांचे घटना परिषदेतील काम , हिंदु कोड बिल , कायदा मंत्रि म्हणुन केलेले काम हे सर्व देशासाठी होते . एक अर्थशास्त्री म्हणुन आंबेडकरांचा रिझर्व बेंक ऑफ इंडिया च्या पायाभरणीत मोठा वाटा आहे . हे काम सर्वच देशासाठी आहे . त्या अर्थाने आंबेडकर हे राष्ट्रीय नेते आहेत . स्पृश्य - अस्प्रुश्यांचा संघर्ष जटिल होता . अस्पृश्यांची अस्मिता जागी करणे - अन्याया विरुद्ध लढणे - स्वत:चे न्याय्य हक्क मागणे आवश्यक होते. हे काम आंबेडकरांनी केले . त्याचवेळी अस्पृश्यांना त्यांचे हक्क देऊन टाकण्यासाठी सवर्णांचि मानसिकता तयार करणे आवश्यक होते . गांधिंनि तेच काम टप्प्या टप्प्याने केले . हे कामही अतिशय अवघड होते आणि आवश्यकही होते . त्या दोघात एकमत दुर्दैवाने झाले नाही म्हणुन आजही तो भांडण वारसा चालू ठेवणे वेडेपणाचे आहे .
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
इतिहास
लेखनप्रकार (Writing Type)
वाद

प्रतिक्रिया द्या
42774 वाचन

💬 प्रतिसाद (174)

प्रतिक्रिया

धन्यवाद! आभारी आहे.

सुहासदवन
Fri, 10/25/2013 - 13:05 नवीन
त्या काय बोलल्या ते कळलं का आधी?
↩ प्रतिसाद: ग्रेटथिन्कर

असे लेखन अगत्याचे!

अत्रुप्त आत्मा
Mon, 10/14/2013 - 07:18 नवीन
असे लेखन अगत्याचे! :) अवांतर- तुंम्ही सुट्टि लय घेता राव,१लेख लिहीला कि! ;-)

विचार करायला प्रवृत्त करणारा लेख!

अग्निकोल्हा
Mon, 10/14/2013 - 14:44 नवीन
.

सुरेख ..

विटेकर
Mon, 10/14/2013 - 14:59 नवीन
लेख आवडला ! सगळीच मते पट्ली नसली तरिही ! अवांतर : जातियता संपूर्ण नष्ट झाली असती ( सतीच्या प्रथेमाणे ) असा माझा दावा आहे पण राजकारण्यांनी ( विशेषतः कॉग्रेस ने ) ते घोंगडे भिजतच ठेवले केवळ राजकीय स्वार्थापोटी ! अस्पृश्यता नष्ट झालीच की !काही चीड आणणारे अपवाद सोडले तर अस्पृश्यता निवारणाला आता मर्यादित यश आले आहेच ! कालानुरुप नवे बदल स्वीकारण्याइतका हिंदूधर्म नक्किच लवचिक आहे. यज्ञांसारख्या गैर लागू गोष्टी सुद्धा बाहेर काढून टाकल्या जातातच. असेच जातियता नष्ट होइइल असा मला विश्वास आहे. सोशल ईम्जिनिअरिंगच्या नावाने केवळ मतांचे राजकारण सुरु आहे.ते जेव्हा थांबेल तेव्हाच खरा विकास होऊ शकेल. कॉग्रेस्ने सुरु केलेले हे राजकारण अन्य पक्षांनी साळ्सूद पणे सुरु ठेवले ही खरी शोकांतिका आहे. बाकीचे सारे पक्ष कानामागून येऊन तिखट झाले आणि आता राजकारण म्हण्जे समाजकारणाचा बळी देऊनच करायचे असते असा समज दृढ झाला आहे. आजच्या काळात मूल्यमापन करायचे झाल्यास डो. आंबेड्करांचे हिंदूच्यावरिल सर्वात मोठे उपकार म्हणजे त्यांनी मुस्लिम अथवा ख्रिश्चन धर्म स्वीकारला नाही. अन्यथा काय परिस्थिती झाली असती याचे कल्पना ही करवत नाही !

+ १

मुक्त विहारि
Mon, 10/14/2013 - 15:41 नवीन
+१
↩ प्रतिसाद: विटेकर

नेमका संदर्भ आठवत नाही...

धन्या
Mon, 10/14/2013 - 15:57 नवीन
डो. आंबेड्करांचे हिंदूच्यावरिल सर्वात मोठे उपकार म्हणजे त्यांनी मुस्लिम अथवा ख्रिश्चन धर्म स्वीकारला नाही.
असे वाचले आहे की धर्मांतरापूर्वी बाबासाहेब गाडगेबाबांना भेटायला गेले होते. गाडगेबाबा म्हणाले "तुम्ही शिकले सवरलेले. मला अडाण्याला काय कळतं त्यातलं. जो काही निर्णय घ्याल तो विचारपुर्वक घ्या".
↩ प्रतिसाद: विटेकर

होय बरोबर

विटेकर
Mon, 10/14/2013 - 16:07 नवीन
नाझ्या स्मरणाप्रमाणे हे बरोबर आहे. पण त्याच बरोबर अनेक मौलवि आणि पाद्री देखील त्याना सल्ला देतच होते. पू.बाबासाहेबांनी ढेबूजींचा सल्ला मानला. नाठाळ कार्ट्याला आईने एक ठेऊन द्यावी,त्याप्रमाणे बाबांसाहेबांनी हिंदू धर्माला चपराक दिली आणि हे योग्यच केले. त्यांना पक्की जाणीव होती की अन्य धर्मात प्रवेश म्हणजे भारतीयत्वाचा लोप !

छान माहिती...

मदनबाण
Mon, 10/14/2013 - 16:12 नवीन
छान माहिती... गांधीजींनी अस्पृश्य लोकांसाठी हरिजन हा शब्द प्रयोग वापरण्यास सुरु केला होता. बाकी लेखात बर्‍याच ठिकाणी गांधीजींचा एकेरी उल्लेख वाचला आणि तो योग्य वाटला नाही.

+ १

मुक्त विहारि
Mon, 10/14/2013 - 16:28 नवीन
लगता अगर तीर हमारे शरीर पर तो अच्छा होता शायद हमारी जान अगर जाती तो भी अच्छा था. घाव देखके हकीम भी कछ कर सकता था. लेकीन ये जालीम दोस्त तुमने तीर तो ऐसी जगह मारा है की घाव तो दिखता ही नहीं और दर्द तो ऐसे होते है की जनमभर सहने ही पडेंगे...
↩ प्रतिसाद: मदनबाण

...

आशु जोग
Mon, 10/14/2013 - 17:00 नवीन
अस्पृश्यता निर्मूलन झाले असेल तर आंबेडकर जयंतीला लोक्सचे उलट्सुलट प्रतिसाद का येतात मिसळीवर...

उत्तम लेख

पैसा
Mon, 10/14/2013 - 18:53 नवीन
अतिशय अभ्यासपूर्ण लेख. सगळीच मते पटतील असे नाही. पण तुमचा त्यामागे केवढा अभ्यास आहे हे जाणवतं आहे.

उत्तम लेख

अवतार
Mon, 10/14/2013 - 19:45 नवीन
काही अतिरिक्त मुद्दे गांधी आणि आंबेडकर हा संघर्ष केवळ दोन नेत्यांचा नसून दोन विचारधारांचा संघर्ष होता. समता प्रस्थापित करणे हे अंतिम ध्येय असले तरी त्यासाठी मार्ग कोणता निवडावा हा मतभेदाचा मुद्दा होता. शिवाय गांधीजींना ज्याप्रमाणे काँग्रेससारखी समाजातील विविध विचारधारांचे प्रतिनिधित्व करणारी संघटना सांभाळायची होती तसे काही दडपण आंबेडकर यांच्यावर नव्हते. त्यामुळेच गांधीजींची भाषा ही काहीशी संदिग्ध आणि आडवळणाची तर आंबेडकर यांची भाषा ही थेट आणि रोखठोक असल्याचे दिसते. ज्या वेळी दुसऱ्या गोलमेज परिषदेत आंबेडकर दलितांसाठी स्वतंत्र मतदार संघ मागत होते तेव्हा गांधीजींनी मुस्लिम प्रतिनिधींची स्वतंत्र भेट घेऊन आंबेडकरांच्या मागण्यांना विरोध करण्यासाठी मुस्लिमांच्या मागण्या मान्य करण्याची तयारी दाखवली होती. "मुस्लिम आणि ख्रिश्चन यांना विभक्त मतदार संघ दिले तर ठीक पण दलितांना मात्र देऊ नयेत", ही गांधीजींची भूमिका होती. तसेच या परिषदेत गांधीजी हे कोणत्याही पक्षाचे प्रतिनिधी म्हणून नव्हे तर भारताचे प्रतिनिधी या नात्याने उपस्थित राहिल्याचा दावा करत होते. सुरुवातीला आंबेडकर स्वत:ला प्रोटेस्टंट हिंदू म्हणवून घेत होते. आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा १९३५ मध्ये केली. त्यानंतर तब्बल २१ वर्षे ते वाट पाहत होते. पण त्यांना अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी अंतिम निर्णय घेतला. सद्य परिस्थितीत होणाऱ्या धर्मांतरांकडे पाहतांना हा मुद्दा उपयुक्त ठरावा.

"मुस्लिम आणि ख्रिश्चन यांना

धन्या
Mon, 10/14/2013 - 19:49 नवीन
"मुस्लिम आणि ख्रिश्चन यांना विभक्त मतदार संघ दिले तर ठीक पण दलितांना मात्र देऊ नयेत", ही गांधीजींची भूमिका होती.
खुप काही बोलून जातं हे वाक्य.
↩ प्रतिसाद: अवतार

गांधीजींची भूमिका कायमच

प्यारे१
Tue, 10/15/2013 - 00:19 नवीन
गांधीजींची भूमिका कायमच स्वतःशीच झगडा सुरु असल्यासारखी होती का? त्यांना संत बनायचं होतं पण राजकारणी झाले किंवा राजकारणात राहून संत व्हायचं होतं का आणखी काही ह्याचा खरंच प्रश्न पडतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका त्यांना नि त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना आलेल्या अनुभवांना अनुसरुनच असावी. दुर्दैवानं समाजाला एकूणच समाजाला त्यांचीही भूमिका झेपलेली दिसत नाही. एक रेषा लहान करुन दुसरी रेषा मोठी होत नाही. दुसरीनं पहिल्या रेघेपेक्षा मोठं व्हावं. असो.

सहमत

विटेकर
Tue, 10/15/2013 - 11:47 नवीन
गांधीजींची भूमिका कायमच स्वतःशीच झगडा सुरु असल्यासारखी होती का? बहुधा हो , राजकारण ही त्यांची प्रकृतीच नव्हती त्याच नेहरू आदीनी मस्त गैरफायदा घेतला.एखाद्या प्राचीन ऋषीमुनींसारखे त्यांचे व्यक्तिमत्व होते आणि त्याच पद्धतीने त्यांनी राजकारण करण्याचा क्षीण प्रयत्न केला.त्यांचे सारे जीवन हिंदू मान्यतेप्रमाणे होते आणि म्हणूनच त्यांना भारतात प्रचंड लोकप्रियता मिळाली. साधु-संतांच्या मागे जाणे हीच आमची परंपरा होती. धर्म सत्तेने राजसत्तेवर अंकुश ठेवायचा हाच इथला परिपाठ होता. पण म्हणून वसिष्ठांनी शस्त्र हातात घेतले नाही , तसेच विद्यारण्य स्वामीनी अथवा समर्थांनीही ! आपली पोलिसी मेकेर ची भूमीका सोडून गांधीजी ओपेरेशन मधे उतरले आनि घोळ झाला त्यांच्या आदर्शवादी विचारसरणीचा व्यवहारात शून्य उपयोग होता ! आपली लढाई तत्वाबरोबर नसून अमानुषतेबरोबर आहे याचे भानच त्यांना राहीले नाही ! इट इज अनवाईज टू बी वाईज विथ अनवाईज हे साधे तत्व ते विसरले! मुस्लिमांचा अनुनय हा तर शूद्ध भाबडेपणा होता. आणि त्यांच्या चुकलेल्या राजनीतीने जेव्हा रौद्ररुप धारण केले तेव्हा ते हताश आणि असहाय झाले ! त्यांनी गेल्या चारशे वर्षांच्या इतिहासाचा नीट अभ्यास केला असता तर मुस्लिमांच्यावर विश्वास टाकण्याची चूक त्यांनी केली नसती ! अस्तु, या जर-तर च्या गोष्टी आहेत, तरिही गांधीजी महानच होते, ज्या विशुढ्ध जीवन शैलीचा त्यांनी अंगिकार केला होता ती हिंदू संन्याश्याची जीवनशैली होती.निश्चित आदरणीय होती ! वाईट याचे वाटते की स्वार्थी काँग्रेसी राजकारण्यांनी गांधीच्या नावाने आपली पोळी भाजून घेतली आणि खराखुरा गांधीजींचा ( त्यांच्या तत्वज्ञानाचा) खून केला. अजूनही करताहेत !
↩ प्रतिसाद: प्यारे१

मुस्लिमांचा अनुनय हा तर शूद्ध

मदनबाण
Tue, 10/15/2013 - 12:06 नवीन
मुस्लिमांचा अनुनय हा तर शूद्ध भाबडेपणा होता. भाबडेपणा ???
↩ प्रतिसाद: विटेकर

भाबडेपणा ..

विटेकर
Tue, 10/15/2013 - 12:11 नवीन
अशा अर्थाने की , मुस्लिम देखील हिंदूप्रमाणे सहिष्णु होतील, त्यांच्या मनात बंधुत्व जागृत होईल .. हा भाबडा आशावाद !
↩ प्रतिसाद: मदनबाण

मुस्लिमांचा अनुनय हा भाबडेपणा

ग्रेटथिन्कर
Tue, 10/15/2013 - 12:31 नवीन
मुस्लिमांचा अनुनय हा भाबडेपणा होता
अनुनय केला म्हणजे काय?
↩ प्रतिसाद: विटेकर

@ ग्रे.थि.

मुक्त विहारि
Tue, 10/15/2013 - 14:37 नवीन
एक साधा सोपा प्रश्र्न विचार करून लिहावे की विचार न करता लिहावे? "ह्याचे उत्तर आपणच द्यायचे आहे" हे सांगणे न लगे.... माझ्या वरील प्रश्र्नाचे उत्तर विचार पुर्वक दिलेत की मग मी तुमच्या प्रश्र्नाचे उत्तर नक्की देईन. त्याचे काय आहे, तुमचे प्रश्र्न कधीच संपत नाहीत आणि इत्रांच्या शंकांचे समाधान तुमच्याकडून होत पण नाही. बरे खरडवही तर आपण बघत पण नाही. कळावे, आपला "स्मॉल पेगर"
↩ प्रतिसाद: ग्रेटथिन्कर

ग्रेट थिंकर साहेबांना

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 10/16/2013 - 10:55 नवीन
ग्रेट थिंकर साहेबांना "मिपावरील डिग्गीराजा" * ही पदवी कशीकाय वाटते?... त्यांची असंबद्ध आणि बेजबाबदार विधाने करून विनोदी कोलांट्याउड्या मारण्याची शक्ती त्या महामानवाइतकीच प्वॉवरफूल्ल हाय असं आमाला वाटू लागलयं. मुख्य मुद्दा सोडून भलतीकडे भरकटण्याची अचाट शक्ती हेही त्यांचं एक खास वैशिष्ट्य सांगता येईल. याशिवाय, मिपावर स्वतःचं हसं करून घेऊन इतरांची इतकी निखळ करमणूक करण्याची कामगिरी इतर कोणी गेलाबाजार दोन आठवडे तरी केली नाही असा आमचा दावा हाय. क म्हंताव?
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

+ १...

मुक्त विहारि
Wed, 10/16/2013 - 14:31 नवीन
माझे अनुमोदन आहे...
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

+ १ वाक्या वाक्याशी सहमत...

मुक्त विहारि
Tue, 10/15/2013 - 14:26 नवीन
त्यातही खालील २ वाक्ये तर जबराच... "आपली लढाई तत्वाबरोबर नसून अमानुषतेबरोबर आहे याचे भानच त्यांना राहीले नाही!" आणि "इट इज अनवाईज टू बी वाईज विथ अनवाईज हे साधे तत्व ते विसरले!"
↩ प्रतिसाद: विटेकर

"इट इज अनवाईज टू बी वाईज विथ

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 10/16/2013 - 10:58 नवीन
"इट इज अनवाईज टू बी वाईज विथ अनवाईज हे साधे तत्व ते विसरले!" मला वाटतं हे तत्व या धाग्यावरच्या काही चर्चेतही सिद्ध होत आहे म्हणा !
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

+ १

मुक्त विहारि
Wed, 10/16/2013 - 20:04 नवीन
+ १
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

.

उद्दाम
Wed, 10/16/2013 - 11:47 नवीन
गांधीजींनी मुस्लिमांचा अनुनय केला वगैरे रडगाणे गाइल्याशिवाय काही लोकान्ना अन्न गोड लागत नाही. १. मुस्लिम भारतात १६०० व्या शतकापासून आहेत. ते आले, तेच मुळी राज्य करण्याच्या महत्वाकांक्षेमुळे. मुघल गांधीजी|ंच्या आधीपासूनच या देशाचे राज्यकर्ते होते. मुस्लिम लीगही १९०६ साली स्थापन झाली, तेंव्हा गांधीजी राजकारणातही नव्हते. मधल्या काळात त्यांची संख्याही ४० % झालेली होती. ४० % जनता एकगठ्ठा असेल तर तिला स्वतःचा आवाज, स्वतःची इच्छाशक्ती निर्माण होणारच. २. गांधीजीदेखील स्वतःच्या विचारसरणीने मोठे झाले. गंमत म्हणजे एकाच वेळी हे दोघेही स्वतंत्रपणे मोठे झाले आणि इथल्या तथाकथित 'सनातन धार्मिक' गटांना ते मोठे झाले हे पचवणं आजही जमलेलं नाही. मग ते जिथे तिथे अमूक धर्माचे लोक विश्वासघातकी असतात म्हणे आणि गांधीजींनी त्यान्ना मोठं केलं की त्यान्नी यान्ना मोठं केलं याच्या रडकहाण्या ऐकवत फिरत असतात.
↩ प्रतिसाद: विटेकर

+१००

अर्धवटराव
Wed, 10/16/2013 - 20:33 नवीन
>>मुस्लिम भारतात १६०० व्या शतकापासून आहेत. ते आले, तेच मुळी राज्य करण्याच्या महत्वाकांक्षेमुळे. मुघल गांधीजी|ंच्या आधीपासूनच या देशाचे राज्यकर्ते होते. -- अ‍ॅब्सोल्युटली. भारतात मुस्लीम राज्यकर्ते त्यांच्या मनगटातले बळ आणि आणि निष्णात राजकारणात यांच्या भरोशावर स्थिरावले. >>४० % जनता एकगठ्ठा असेल तर तिला स्वतःचा आवाज, स्वतःची इच्छाशक्ती निर्माण होणारच. -- १००% सहमत.
↩ प्रतिसाद: उद्दाम

तेच तर

उद्दाम
गुरुवार, 10/17/2013 - 13:29 नवीन
१. गांधीजी ग्रेट थिंकर होते. २. मुघल उद्दाम होते. म्हणूनच दोघेही महान ठरले.
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

किंवा...

अर्धवटराव
Fri, 10/18/2013 - 10:06 नवीन
कुर्‍हाडीच्या दांड्यांनी गोतास काळ आणला व कावळा मशिदीच्या मिनारावर बसुन मौलवी बनला.
↩ प्रतिसाद: उद्दाम

.

उद्दाम
Fri, 10/18/2013 - 10:41 नवीन
मंडनमिश्रा बौध्ह धर्म सोडून तुमच्याकडे आला तर एका रात्रीत शंकराचार्य झाला. कावळा मौलवी बनला तर तुमच्या पोटात कावळे का ओरडताहेत?
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

असं म्हणताय...

अर्धवटराव
Fri, 10/18/2013 - 18:52 नवीन
मण्डनमिश्राने आपला अधिकार सिद्ध करुन आचार्य पदाला शोभा आणली तर कावळ्याने फक्त कावकाव करत मौलवीपद खुजे केले.
↩ प्रतिसाद: उद्दाम

हरे राम...आपलं ते हे हेर

बॅटमॅन
Fri, 10/18/2013 - 18:59 नवीन
हरे राम...आपलं ते हे हेर मार्क्स!!!! मण्डनमिश्राने बौद्ध धर्म कधीच स्वीकारला नव्हता. मतपिंका टाकायलासुद्धा एक शिस्त लागते हे विसरलात बहुतेक.
↩ प्रतिसाद: उद्दाम

आँ .... ????

चौकटराजा
Sun, 10/20/2013 - 18:50 नवीन
१. मुस्लिम भारतात १६०० व्या शतकापासून आहेत. उद्दाम साहेब हे तुम्ही मुद्दाम लिहिलय का ? आताशी २१ वे शतक चालू झाले आहे.
↩ प्रतिसाद: उद्दाम

मुस्लिम भारतात १६०० व्या शतकापासून आहेत.

मुक्त विहारि
Sun, 10/20/2013 - 19:00 नवीन
हे राम!!!!! उलटी गिनती....
↩ प्रतिसाद: चौकटराजा

+१

मुक्त विहारि
Tue, 10/15/2013 - 00:47 नवीन
+१

एक प्रश्न

विनायक प्रभू
Tue, 10/15/2013 - 08:06 नवीन
ग्रेट विचार करण्याकरिता लागणारा मेंदू नेमका कुठे असतो? कवटीत का ..त.?

+१

मुक्त विहारि
Tue, 10/15/2013 - 10:10 नवीन
आधी विचार चांगले विचाराने वर्तन चांगले वर्तनाने व्यक्तिमत्व ते भले असे व्यक्तिमत्व जगी गाजले (मुवि)
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

वाह वाह

अनिरुद्ध प
Tue, 10/15/2013 - 11:26 नवीन
+१ सहमत
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

चांगला लेख..

चिगो
Tue, 10/15/2013 - 12:52 नवीन
"जर.. तर.."च्या जाळ्यात न अडकता केलेले, इतिहासाचे समर्पक विश्लेषण.. लेख आवडला..

१. सावरकर फॅसिस्ट होते, २.

मृत्युन्जय
Tue, 10/15/2013 - 14:19 नवीन
१. सावरकर फॅसिस्ट होते, २. पुष्यमित्र शुंगाने मनुस्मृती लिहिली, ३. गांधीना त्याकाळच्या सवर्ण हिंदुसमाजाचा पुढारी न मानणे हे मध्यमवर्गाच्या वांझ बुद्धीमातेचे गर्विष्ठ अपत्य आहे. ही ३ वक्तव्ये ऐकली. आता : १. शिवाजी महाराज कर्मट मुसलमान होते, २. राजकारणात येण्यासाठी आंबेडकर नावाच्या ब्राह्मणाने अस्पृश्यता निवारन चळवळीचा वसा स्वीकारल्याचे ढोंग स्वीकारले आणी ३. सावरकरांना पोहता येत नव्हते ही ३ वक्तव्य वाचली की मी डोळे मिटायला मोकळा. बाकी चालु देत.

जावु द्या हो

अनिरुद्ध प
Tue, 10/15/2013 - 14:39 नवीन
असत एखाद्याचे 'ग्रेट थिंकींग' त्याला आपण काय करायचे? तर वरती विटेकर काकांनी सान्गीतल्या प्रमाणे 'पीयेला हय' असे म्हणुन सोडुन द्यावे कसे?
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

great stinker

श्रीगुरुजी
Tue, 10/15/2013 - 14:56 नवीन
ग्रेटथिन्कर का ग्रेटस्टिन्कर (great stinker) असा मला प्रश्न पडलेला आहे.
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध प

न्ना !!! हे तर खरे "ग्रेटशिटर

विद्युत् बालक
Fri, 10/18/2013 - 23:55 नवीन
न्ना !!! हे तर खरे "ग्रेटशिटर " =))
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

अगागागागा _/\_

बॅटमॅन
Tue, 10/15/2013 - 14:48 नवीन
अगागागागा _/\_ महान आहात हो मृत्युञ्जय साहेब.
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

@ मृत्युन्जय +१

शिल्पा नाईक
Tue, 10/15/2013 - 14:31 नवीन
@ मृत्युन्जय +१

@ मृत्युन्जय +२

मुक्त विहारि
Tue, 10/15/2013 - 14:45 नवीन
बाब्बो.... त्रिवार दंडवत....
↩ प्रतिसाद: शिल्पा नाईक

किती म्हणून कौतूक करावे इतकी

arunjoshi123
Tue, 10/15/2013 - 15:50 नवीन
किती म्हणून कौतूक करावे इतकी चांगली विचारसरणी आहे लेखकाची. अगोदरच्या काळातील विरोधांना किती मोठी तात्विक बैठक असायची. आणि त्यांचे प्रतिनिधित्व करणारे लोकही किती गोड. वाचनाचा आनंद काय ते हा लेख वाचून कळावे.

सावरकर

सौरव जोशी
Tue, 10/15/2013 - 23:59 नवीन
भारतीयह्रदयसम्राट स्वातंत्र्यसुर्य महात्मा गांधीजी असतीलही... असोत बापडे. पण हिन्दुह्रदयसम्राट फक्त आणि फक्त एकचः विनायक दामोदर सावरकर!

@ सौरव जोशी....

मुक्त विहारि
Wed, 10/16/2013 - 08:56 नवीन
हे असे काही तरी लिहून आपण मुद्दाम कुणाच्यातरी बुध्धीला गहन विचार करायला भाग पाडत आहात. असो. माझ्या कडून तरी +१ स्मॉल पेगर
↩ प्रतिसाद: सौरव जोशी

हिन्दुह्रदयसम्राट फक्त आणि

विजुभाऊ
गुरुवार, 10/17/2013 - 19:22 नवीन
हिन्दुह्रदयसम्राट फक्त आणि फक्त एकचः विनायक दामोदर सावरकर!
अरे बापरे असे भाजप उघडपणे म्हणाला तर महायुतीचे काय होणार
↩ प्रतिसाद: सौरव जोशी

छान लेख

सुनील
Wed, 10/16/2013 - 09:17 नवीन
लेख आवडला.
पण मर्हाटि माणसाला मुळात गांधी हा सवर्ण हिंदुंचा नेता होता हेच मुळी मान्य नाही !
हे थोडेसे सरसकटीकरण वाटते. काहींचे विचार तसे असतीलही पण सर्वांचे नक्कीच नाहीत. स्वातंत्र्यपूर्व काळातील काँग्रेस ही हिंदूंची आणि लीग ही मुस्लिमांची संघटना होती, हे नाकारण्यात हंशील नाही.
(सनातनी हिंदु धर्माला डांबर फासत आहेत . गांधीजी ते कष्टाने पुसू पाहत आहेत आणि आंबेडकर त्याचा पाया असलेल्या वर्ण व्यवस्थेवर हातोड्याने घाव घालत आहेत. ब्रिटीश लांबून मजा बघत आहेत- तत्कालीन व्यंगचित्र )
हहपुवा
इथे एक लक्षात ठेवले पाहिजे कि आंबेडकर हे केवळ विचारवंत नाहीत ते एक राजकारणीही आहेत . जे बाबासाहेबांबद्दल खरे आहे ते गांधीबाबा बद्दल हि खरे आहे.
गांधीबाबा अट्टल राजकारणी होता हे मानल्याशिवाय गांधीबाबा समजणारच नाही!
व्यथित होऊन आंबेडकर म्हणाले होते " हे कोंग्रेस वाले माझे राजकीय जीवन संपुष्टात आणतील आणि मग तेच दलितांचे पुढारी होतील " ( खैरमोडे ५ - ३१ )
हे बरेचसे खरे ठरले आहे! (यालाच स्वातंत्र्योत्तर काँग्रेसचे बेरजेचे राजकारण म्हणतात का?)
पुणे करारा मुळे संयुक्त आणि विभक्त मतदार संघाचे एक आगळेच फ्युजन जन्माला आले
ही माहिती नवी आहे. रोचक आहे.
तरीही या दोन महान भारतीय नेत्यांत कधीही मनोमिलन झाले नाही हि भारतीय राजकारणाची शोकांतिका आहे . ....... ....... त्या दोघात एकमत दुर्दैवाने झाले नाही म्हणुन आजही तो भांडण वारसा चालू ठेवणे वेडेपणाचे आहे .
१००% सहमत.
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा